आमची पन्नासावी लग्नगांठ
Primary tabs
आमची पन्नासावी लग्नगांठ
"एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं."
"गेली पन्नास वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो" असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लगन्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी. एखाद्दया तरूण जोडप्याला प्रेम करताना पहाणं हे डोळ्यांना नक्कीच आनंददायी वाटतं, पण एखाद्दया वृद्ध जोडप्याला तसं पहाणं हे एक खरोखरचं भाग्य म्हटलं पाहिजे.
पन्नास वर्ष एकमेकाशी नातं ठेवून रहाणं हेच जणू सन्मानाचं कारण आहे.पन्नास वर्षाच्या लग्नगांठीची-म्हणजे ऍनिव्हर्सरीची-आठवण म्हणजेच प्रेमाची आठवण, एकमेकावरच्या विश्चासाची आठवण, एकमेकाच्या सहभागाची आठवण,सहनशक्तिची आठवण, चिकाटीची आठवण आहे.
आणि ह्या सर्व आठवणी जीवनाच्या प्रत्येक वर्षाला मागे पुढे होवू शकतात.
इतके वर्ष रहाणं म्हणजेच एकमेकाच्या स्वभावाचं परिवर्तन होत असताना, एकात दुसरं मिसळून जाणं आणि त्यामुळे एक-दुसऱ्याला आणखी चांगलं करणं असं म्हणता येईल.
एखादं अपक्व-म्हणजेच इममॅच्यूर-प्रेम म्हणतं,
"मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मला तुझी जरूरी आहे म्हणून."
परंतु पक्व प्रेम म्हणतं,"
मला तुझी जरूरी आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो."
एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.
१२ जून १९५८ साली माझी पत्नी माझ्या घरी आपलं रहातं घर सोडून आली.किती कठीण आहे हे असं करणं. किती विश्वास होता तिचा. आपल्या आईवडीलाना मागेवळून पहाताना क्षणभर दुःखाने डोळे भरून यावेत आणि मान फिरवून समोर दुसऱ्या क्षणी पहाताना त्याच डोळ्यात भविष्यातल्य़ा सुखाचं तेज भरून यावं.
काय हा विपर्यास!
"माझा होशिल का
वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का"
ह्या गाण्याची आठवण एव्हड्या साठीच झाली की पन्नास वर्षापुर्वी आम्ही पण तरूण होतो ना!.
मी पंचविस वर्षाचा होतो आणि पत्नी एकविस वर्षाची होती.ती आणि मी त्यावेळी कशी दिसायचो हे फक्त ह्यावेळी आमची स्मरणशक्तिच सांगू शकते.त्यावेळी "माझा होशिल का" हे गाणं पण प्रसिद्ध होतं. त्याची आठवण आज प्रकर्षाने आली.
निसर्गातल्या अनेक गोष्टीमधे मला समुद्राने खूपच आकर्षित केलं.अशा ह्या समुद्र्रुपी संसारात मी आणि माझ्या पत्नीने पन्नास वर्षापुर्वी होडी टाकली आणि प्रवासाला निघालो.तो अथांग सागर समोर पाहून मोठ्या विश्वासाने मोठ्या जिद्दीने दोघानी हातात वल्हं घेतली आणि मागे न पहाता होडी वल्हवायला लागलो. प्रवासात बरोबर आईवडिलांच्या आणि थोरामोठ्यांच्या आशिर्वादाची,आमच्या भविष्या बद्दलच्या विश्वासाची, वाटेत येऊ घातलेल्या वादळांच्या शक्यतेची, आनंदी क्षणांच्या आशेची,पडले तरी कष्ट झेलण्याची, आणि समोर दिसणाऱ्या भव्य क्षितीजाकडे झेप घेण्याची मोठी पुरचुंडी घेवून प्रवासाला निघालो. आमच्या बरोबर अनेकांच्या अशाच होड्या होत्या.हसत खेळत,चर्चा करत जो तो क्षितीजाचाच वेध घेवून वल्हवत होता.
कधी समुद्र शांत असायचा,कधी खवळायचा,कधी लाटा यायच्या,कधी वारा बेफाम व्हायचा,कधी छोटी छोटी वादळं यायची,कधी कधी वाऱ्याच्या दिशेने शिडाची दिशा बदलावी लागायची.पण तरी सुद्धा समुद्र खुषीत दिसायचा.त्याला धीर नसायचा.आमच्या होडीला तो ठरू देत नव्हता.तो होडीला धरू बघायचा.समुद्राचं पाणी हिरवं हिरवं पांचू सारखं दिसायचं.आणि सफेद फेसाची त्याच्यावर खळबळ असायची.मास्यांसारखीच आमच्या काळजांची तळमळ व्हायची.आमची होडी हा समुद्र खाली-वर ओढायचा.
"आला खुषीत समिंदर
त्याला नाही धीर
होडीला बघतो ग धरू
ग!सजणी होडीला देई ना ठरू"
ह्या गाण्याची प्रकर्षाने आठवण यायची.
प्रवासात एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्न झालं. प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा.मुलांची मदत व्हायची.नंतर काही होड्या किनाऱ्याकडे परत फिरल्या आमची पाळी आली त्यावेळी आम्ही दोघानी पण परत फिरायचं ठरवलं. कारण आता मुलं मोठी झाली होती.त्यांच्या पण आता होड्या तयार करायच्या होत्या.त्यांच्या होड्या तयार झाल्या.त्याना घेवून पुन्हा समुद्राच्या दिशेने प्रवास चालू केला.आता आमच्या होडीत आम्ही दोघंच होतो.प्रवास चालूच होता.मिळूनच प्रवासाला निघालो होतो.कुणी मागे तर कुणी पुढे.पण एकमेकांच्या दृष्टीक्षेपात होतो.जवळ जरी असलो तरी प्रत्येकाला आपआपल्या होडीतच दिवस काढायचे असतात.मागे वळून वळून मुलांच्या होड्या नीट चालल्या आहेत पाहून बरं वाटायचं.कधी कधी मनात काळजी पण वाटायची.
ते वसंत ऋतुचे दिवस होते.
"जीवनात ही घडी अशीच राहूदे.
प्रीतिच्या फूलावरी वसंत नाचू दे."
असं गाणं मनात गुण्गुण करायचं.
सुरवातीला समुद्रात आल्यावर किती प्रवास केला ह्याचा हिशोब करता यायचा.मध्य समुद्रात आल्यावर सुद्धा क्षितीज अजून दूरच वाटायचं. अजून किती पल्ला गांठायचा आहे कोण जाणे. मुलांच्या होड्या जवळच असल्याने धीर सुटत नव्हता.पण एकदा एकाएकी एक मोठी लाट येऊन आमची होडी जवळ जवळ उलटणार होती. मुलांनी आणि अगदी जवळच्या नातेवाईकानी होडी उलटण्या पासून वाचवली.पण तोपर्यंत त्या लाटेचा फटका माझ्या पत्नीला बसला.जवळ जवळ तिचा पुनर्जन्म झाला.त्यावेळी हे गाणं रेडिओवर ऐकलं की मन खूप भाबडं व्हायचं.
" भातुकलेच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी "
बिचारी गेली सतरा वर्ष तो फटका सहन करून उमेदीत जगत आहे.आयुष्य हे असंच असतं.
"मी कुणाचं वाईट केलं की देवाने मला ही शिक्षा देली.?"
असं ती मला म्हणते.
"पण माणसाचं सर्वच काही मनासारखं होत नसतं. देवाने "आशा" नावाची एक माणसाला क्षमता दिली आहे.त्याच्या वर आपण जगूया"
असं मी तिला नेहमी म्हणतो. ती तशी जगत आहे.हे घेण्यासारखं आहे.
हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं.आणि आमच्याच होडीत निवांत वेळी कधी कधी मी माझ्या पत्नीला विचारतो,
"उद्दया कसं होणार?"
आणि ती पण कधी कधी मला सहाजिकच म्हणते
"उद्दया कसं होणार?"
तेव्हां मी तिला म्हणतो,
आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. तेव्हां,
"आता कशाला उद्दयाची बात
बघ उडून चालली रात
आता कशाला कशाला उद्दयाची बात
बघ उडुनी चालली रात
भर भरूनी पिऊ
रस रंग नऊ
चल
बुडुनी जाऊ रंगात
आता कशाला उद्दयाची बात"
तेव्हां सर्वांच्या शुभेच्छावर आता आमचा उद्या आहे.
श्रीकृष्ण सामंत
आयुष्याचा प्रवास अतिशय सुंदर लिहिला आहे. शब्दसामर्थ्य उत्तम. आपल्याला आणि आपल्या पत्निला उदंड आयुष्य लाभो आणि आपली ही पन्नास वर्षांची साथ आणखी पुष्कळ वर्षे अशीच टिकून राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आपल्या शुभेच्छा आम्हा दोघाना लाख मोलाच्या आहेत
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
फार छान मनोगत मांडले आहे.
आपणा दोघांचे अभिनंदन आणि अनेकोत्तम शुभेच्छा !!
--लिखाळ.
आपल्या ही शुभेच्छा आम्हा दोघाना लाख मोलाच्या आहेत
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
अर्धशतक पुर्ण केले.
अभिनंदन !!!!!!!!!!!!!
देव करो आणि तुम्ही पुर्ण शतक पुर्ण करो.
आमच्या शुभेच्या.
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
उत्तम लेख.
आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. तेव्हां,
"आता कशाला उद्दयाची बात
उद्याच्या पुढच्या अनेक उद्यांसाठी आज तर आजचीच बात करतो- सुखी वैहाविक जीवनाकरता लाखो शुभेच्छा. आमची होडी तुमच्या सतरा योजने मागे आहे.
अरूण आणि चित्रा मनोहर.
आपल्या उभयतांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
छान लिहिलं आहे, माझ्याकडूनही आपल्या दोघांना अनेकानेक शुभेच्छा....!
आपला,
(अविवाहीत) तात्या.
तात्याराव,
"अविवाहीत" असून सुद्धा एका विवाहीत जोडप्याला आणि ते सुद्धा पन्नास वर्षं विवाहीत असलेल्या जोडप्याला आपण दिलेल्या शुभेच्छा खरंच लाख मोलाच्या आहेत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
एखादा फोटो टाका.
आपली सुचना आवडली.प्रयत्न करतो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
तुम्ही दोघे म्हणजे भारतीय विवाह संस्कतीचे milestone आहात.
ख्ररेच आजच्या तकलादु होडयाना तुमच्या होडीकडे बघुन सागर पार करयचि जिद्द येवो.
तुम्हा दोघाचे सहजीवन असेच व्रुधिंगत होवो हि इश्वरा चरणी प्रार्थना.
रुपेश आणि आश्विनी ( नाबाद १० वष्रे)
आपल्या प्रशंसे बद्दल आभार.
आपल्या उभयतांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामंत साहेब,
आपण शब्दांत मांडलेलं सहजीवन छान आहे. पुढील प्रवासासाठी तुम्हां दोघांना मनापासुन शुभेच्छा!!!
-ह्रषिकेश
http://sucheltas.blogspot.com
हृषिकेशजी,
आपल्या शुभेच्छे बद्दल मनःपुर्वक आम्हा दोघांकडून आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
हार्दिक अभिनंदन ..
असं ऐकलंय की आयुष्य चाळिशीनंतर सुरू होतं आणि वैवाहिक आयुष्य पन्नाशीनंतर सुरू होतं. तेव्हाच तर जोडीदाराची खरी गरज असते दुसर्याला समजून घेण्यासाठी. भवताली झपाट्याने होणार्या बदलात साथ देण्यासाठी.
तुम्ही तर लग्नाचीच पन्नासावी लग्नगाठ मारली ! मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------
आपलं म्हणणं अगदी खरं आहे.जोडीदाराच्या जरूरीची जाणीव आम्हाला प्रत्यक्ष होत आहे.
आपल्या शुभेच्छा बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो .
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
आपल्या शुभेच्छा बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामंत साहेब,
आपला प्रवास सुंदर शब्दबद्ध झाला आहे.
आपल्या शतकाकडील प्रवासासाठी आमच्या मनपुर्वक शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
आपल्या अभिनंदना बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
डॉं. दिलीपजी,
आपल्या शुभेच्छा आम्हा दोघांना लाख मोलाच्या आहेत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
छान लिहिलं आहे,
माझ्याकडूनही आपल्या दोघांना अनेकानेक शुभेच्छा....!
पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो !!!!
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
राजेजी,
आपलं ग्रिटींग किती सुंदर आणि समर्पक आहे.
आपल्या शुभेच्छे बद्दल खूप आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
श्री. श्रीकृष्ण सामंत,
आयुष्याचा पट आपण फार उत्कटतेने मांडला आहे आम्हा समोर. समाधानी जीवनासाठी एखाद्या आदर्शाची साथ फार फलदायी ठरते. तो मोलाचा आदर्श आपण आमच्या आयुष्यात आणला आहे. इतक्या वर्षांच्या सांसारिक जीवनात मनाला कुठलीही हताशा स्पर्शू न देता आजच्या संगणकिय जीवनातही हे नवे तंत्र आत्मसात करून आपण आपले विचार शब्दांकित करून आमच्या समोर मांडलेत हा ह्या वयातही आपल्या मनाचा रसरशीतपणा दर्शविणारा सबळ पुरावा आहे. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायावर आपल्या आयुष्याची बुलंद इमारत उभी आहे. आपले अभिनंदन करणारा मी कोण? आपले आशिर्वाद आमच्या पाठीशी असो द्यावेत. नमस्कार करतो.
अवांतरः 'पन्नासावी लग्नगांठ' की 'लग्नगाठीचा पन्नासावा वर्धापन दिन'?.... दोन गोष्टींत खूप अंतर आहे.
प्रभाकरपंत,
आपण माझा लेख किती अभ्यासपुर्वक वाचला आहे हे आपल्या लेखनावरून मला दिसून आलं.एव्हडंच नव्हे तर माझ्याही लक्षात न आलेल्या गोष्टी आपण अतिशय अभ्यासू वृत्तीने आणि समर्पक शब्दांचा वापर करून मला त्याची माहिती करून दिलीत या बद्दल आपले आभार.खरंच आपण म्हणता तसंच माझं जीवन आहे.सकस अन्न,नियमीत व्यायाम,भरपूर विश्रांती,लेखन करून होणारा मानसिक व्यायाम आणि आपल्या पुढच्या पुढच्या पिढीचं बोट धरून त्यांच्या बरोबरीने जाणाच्या प्रयत्न, माझ्या पत्नीची साथ,आधूनिक टेकनॉलीजी बद्दल शिकण्याचा हव्यास, आणि आपणासर्वांकडून वाचायला मिळणारे अमोल विचार हेच माझं खुराक मला आपण लिहिता त्याप्रमाणे माझी "आयुष्याची बुलंद इमारत" अजून पर्यंत उभी ठेवत आली आहे.ह्याही वयावर मी जिना आधार न घेता चढतो,आणि उतरतो.वजन काबूत ठेवलं आहे.अजून मी माझ्या विस वर्षाच्या नातवाबरोबर पळू शकतो.
हे सर्व लिहिण्याचा माझा उद्देश आत्मप्रौढी मुळीच नसून,आपल्या सारख्या तरूणाना एकच सांगण आहे की "नथिंग इज लेट" आपण किती जगावं-विथ क्वालिटी लाईफ- हे आपल्याच हातात असतं.
आपल्या सारखे वाचक हेच माझे "मायबाप" आहेत आणि आपल्याकडून होणारे अभिनंदन हेच माझं "टॉनीक" आहे.
"पन्नासावी लग्नगांठ' की 'लग्नगाठीचा पन्नासावा वर्धापन दिन'?....
हे आपलं एकच वाक्य सर्वार्थी आहे.
आपणा सर्वांना आमचे सदैव आशिर्वाद.
आणि आपल्या शुभेच्छा बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
धन्यवाद श्री. श्रीकृष्ण सामंत,
आपल्या सारख्या तरूणाना एकच सांगण आहे की "नथिंग इज लेट" आपण किती जगावं-विथ क्वालिटी लाईफ- हे आपल्याच हातात असतं.
मी वय वर्षे ५४. आपल्यापेक्षा वयाने लहान पण आपल्यापेक्षा 'तरूण' म्हणावयास जीभ आणि मन धजावत नाही. असो.
'नथिंग इज लेट' हे मात्र पटले. शारीरीक आरोग्यासाठी काटेकोर वेळापत्रक आखणे गरजेचे आणि निकडीचे आहे. तसा प्रयत्न करतो आहेच. मनाचे स्वास्थ्य म्हणाल तर प्रिय आणि अप्रिय घटनांभोवती जास्त घोटाळत राहात नाही. सतत पुढे जात राहावे, शिकत राहावे आणि समाधानी राहावे ह्यावर विश्वास ठेवतो. असो.
आपण मिपावर लिहीत राहावे, आम्हाला मार्गदर्शन करीत राहावे ही विनंती.
तुमचे विचार चांगले आहेत तेव्हा काहीच काळजी नसावी
मला तुम्हा सर्वाशी मिपा वर लिहायला व वाचायला आणि संपर्क ठेवायला आनंद होतो
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आजच्या संगणकिय जीवनातही हे नवे तंत्र आत्मसात करून आपण आपले विचार शब्दांकित करून आमच्या समोर मांडलेत हा ह्या वयातही आपल्या मनाचा रसरशीतपणा दर्शविणारा सबळ पुरावा आहे. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायावर आपल्या आयुष्याची बुलंद इमारत उभी आहे.
हेच म्हणतो...
सामंतकाका,
तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे...
आपल्याला पण आशीर्वाद हवा...
आधी माझा विश्वासच बसला नाही (की आपण ७५ वर्षांचे आहात)असे मान्य करतो ... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
भडकमकरजी,
प्रभाकर पेठकरानी खरोखरंच आपल्या लेखनाद्वारे मला अचंबीत केलं.त्यांच्या मनातला आशय त्यांनी शब्दांची उत्तम निवड करून अगदी मोजक्या शब्दात परिणाम करून दाखवायची त्यांची हातोटी दाखविली आहे.
आपल्याला ही ते त्यांच लिहिणं भावलं.
आमचे आपल्याला सदैव आशिर्वाद आहेत.
मी माझ्या वीस वर्षाच्या नात आणि नातवाच्या सहवासात असतो.त्यामुळे माझं वय मी विसरून जातो.
"म्यान इज नोन बाय द कंपनी ही किप्स" असंच काहीसं आहे वाटतं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
ह्या वयात सुदधा सांमत साहेब संगणकावर टंकतात ते पाहुन विशेष वाटते.
आम्ही सुदधा आता लग्नाची पन्नाशी पर्ण करुन मिपावर फोटो टाकायचा निर्णय घेतला आहे.
सखाराम गटणे
आपल्या मनोकामाना यशस्वी होवोत अशी आमची त्या दयाघना कडे सदैव प्रार्थना.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
५० वर्षांच्या या प्रेमळ प्रवासाला माझा मनापासून सलाम आणि अभिनंदन!
पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
आपल्या अभिनंदना बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
येथे एक गोष्ट सांगायचा मोह टाळता येत नाही. ती अशी...
भारतीय संस्कृतीत, पती-पत्नी एकमेकांची साथ सहसः सोडत नाहीत, परंतु, पाश्चात्य संस्कृतीत हे नेहमी घडत नाही.
भारतात आलेल्य एका जर्मन जोडप्याने, आपल्या लग्नाच्या २५व्या वर्षगाठीच्या निमिताने पार्टी दिली.
तेव्हां हजर असलेल्या एकाने विचारले, की आपले लग्न एवढा काळ कसे काय टिकले?
तेव्हां दोघा पति-पत्नीने एकजात त्यांच्या कुत्र्या कडे बोट दाखवले व उत्तर दिले कि "ह्या कुत्रा मुळे"!
त्याचे स्पष्टीकरण त्यांनी असे केलेकी...
पती अथवा पत्नी एकमेकांवर चिडले की, आपसात न भांडता, त्या कुत्र्याला भरपूर शिव्या घालायच्या!
प्रसंगी राग अनावर झाल तर, त्या कुत्र्याच्या पेकटात लाथ घालायची, परंतु एकमेकांना डार्लींग आणी हनी म्हणुनच हाक मारायची.
कुत्रं खपल की दुसरे आणायचे, परंतु कुत्रं सतत घरात हवे!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
आपली गोष्ट वाचून करणूक झाली.माझ्या पत्नीलाही मी ती वाचून दाखवली.
ती म्हणाली "पति परमेश्वर आणि पत्नी सती सावित्री" असले कंसेप्ट भारताच्या संस्कृती आहेत ते त्यांच्या संस्कृतीत नाहीत.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
काका अभिनंदन्,,,
पुढील आयुष्य आनंदी,सुखसमाधानाचे आणि आरोग्यदायी जावो..
मदनबाण.....
आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! ही घडी फार थोड्या भाग्यवान लोकांच्या आयुष्यात येते.
वयाचा ७५ व्या वर्षीही तुमचे ताजेतवाने मन तुमच्या लेखनातून दिसते.
काळाबरोबर चालण्याची नुसती इच्छा असणे आणि तसे प्रत्यक्ष करणे ह्यातले अंतर आपण पार केलेले आहे. आपले लेखन फारच भावपूर्ण आणि प्रत्ययकारी उतरले आहे.
आपल्या मानाने मी अजून बराच लहान आहे त्यामुळे आपला आशीर्वाद पाठीशी रहावा ही इच्छा व्यक्त करतो!
चतुरंग
आपल्या सारख्या गुणी मिपाच्या लेखकाना आणि वाचकाना आमचे सदैव आशिर्वाद आहेत
आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं.
सामंतांना माझ्या अनेकानेक शुभेच्छा. वरील परिच्छेद वाचला आणि हेलावल्यासारखे झाले. इतका प्रदीर्घ सहवास. इतका दूरचा प्रवास. कदाचित इतर नौकांमधले काही समवयीन प्रवासी साथ सोडून गेले असतील. काहीजणांचा प्रवास एकट्यानेच चालू असेल. पन्नासाव्या वाढविवशी सगळे गोत आजी आजोबांच्या आजूबाजूला पुन्हा एकदा जमले असेल. आपली मनोगते लोकांनी मांडली असतील...
"दु:ख ना आनंदहि, अंत ना आनंदहि" हे खरे नव्हे. दु:खे असतील, खूपसे सौख्याचे क्षणही असतीलच ! पण "नाव आहे चाललेली , कालही अन् आजही" हे मात्र परमसत्य ; असले काही वाचले की याची खात्री पटते :-)
"दु:ख ना आनंदहि, अंत ना आनंदहि"
किती समर्पक वाक्य आपण लिहिलं आहे.ह्यातून बोध घेण्यासारखा आहे.
आपल्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत
आपल्या अभिनंदना बद्दल धन्यवाद
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामंतकाका,
विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आपल्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेछ्छा..!!
स्वप्निल..
आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामंतसाहेब आपल्या वैवाहिक नाबाद अर्धशतकाबद्दल आपल्या उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन! ह्यापुढेही असाच चौफेर खेळ सुरु राहू द्या. त्याबद्दल ५६ वर्षांच्या ह्या 'म्हातार्या'कडून आपल्यासारख्या चिरतरूण नाबाद जोडीस हार्दिक शुभेच्छा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
आपण पण आपल्या भावी आयुष्यात चीरतरूण राहून नाबाद जोडीने रहावं अशी आमची त्या दयाघनाकडे प्रार्थना
आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
काका,
तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि यापुढील आरोग्यदायी वाटचाली साठी शुभेच्छा !!!
आभार यासाठी ....की....
>>> प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा
या तुमच्या शब्दांनी आमच्या सारख्यांनाही आयुष्यातील संघर्षाला सामोरे जायला बळ मिळेल...
आपल्याला नक्कीच बळ मिळेल.
आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
५० वर्षे सुखी वैवाहीक सहजीवना बद्दल अभिनंदन व उभायतांना सहस्त्र चंद्र दर्शन लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
शेखर.
आपल्या शुभेच्छा बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
अगदी हेच म्हणतो.....
५० वर्षे सुखी वैवाहीक सहजीवना बद्दल अभिनंदन व उभायतांना सहस्त्र चंद्र दर्शन लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
दोघांचेही अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा :)
http://chilmibaba.blogspot.com
आपल्या शुभेच्छे बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आम्हाला...
आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. किती छान लिहिलय...
हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं
डोळ्यात पाणी आलं एकदम...
तुम्हाला आणि आजींना ५० वर्ष सहजीवनाच्या खूप खूप शुभेच्छा! आणि तुमचं जीवन असंच आरोग्यदायी, आनंदी राहो ही इश्वरचरणी प्रार्थना..
आणि एक हट्ट सुद्धा...तुमच्या आयुष्यातले काही प्रसंग आणि तुम्ही शोधलेली उत्तरं आम्हालाही सांगा आम्हालाही मार्गदर्शन मिळेल. तुमचे आशिर्वाद आणि अनुभव आम्हालाही अशीच ५० वर्षाची साथ करायला शिकवतील!
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
वरदा ,
आपल्या शुभेच्छे बद्दल आम्हा दोघांचे आभार. आपल्याला आमचे नेहमीच आशिर्वाद.
आपला हट्ट पुरवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सामंतसाहेब,
आपले हार्दिक अभिनंदन!
दिड महिन्यापूर्वीच माझ्या आई-वडिलांच्या लग्नाला पन्नास वर्षे झाली.