पाककृती

मसाल्यातील पदार्थ्-काळी मिरी तयार कशी करतात.

Primary tabs

हा लेख कोणत्या प्रकारात टंकावा हे समजेना.स्वयंपाकाशी संबंधित असल्याने शेवटी पाककृती विभागात दिला.
जाणकारांनी महिती दिल्यास पुढे योग्य त्या प्रकारात टंकता येईल.तर असो.

हा मिरीचा वेल.आंबा,फणस,नारळ,सुपारी अश्या झाडांवर हा वेल चढवतात.

हे मिरीचे घोस.

हि घोसापासून वेगळी काढलेली मिरी.

उकळवत ठेवलेले पाणी.यात पाणी तापले की मिरी टाकून १० मिनिटे उकळवून घेतात.


मिरी उकळल्यावर फडक्यात उसपून घेतात.

पाणी गळून गेल्यावर उन्हात सुकत घालतात.५-६ दिवस उन्हात सुकवावी.

तयार काळी मिरी.

हुश्या,माहिती देवून झाली.आता मिरी बाजारात विकण्यासाठी द्यायला मोकळी.

बॅटमॅन

रोचक धागा! मिरीबद्दल ही माहिती पहिल्यांदाच ऐकली. मिरीचा वेलबील माहिती होते पण हिरवीकंच ते काळी मिरी हा प्रवास घडताना पाहून आनंद वाटला.

गणपा

अगदी असेच म्हणतो.
मीरी उकडून मग वाळवतात हे माहित नव्हतं.
मला वाटायचं की डायरेक्ट उन्हात वाळवत असतील.

पैसा

छान माहिती. आमच्याही गावाला मिरीचा वेल आहे. हल्ली मिरीला चांगली किंमत येत आहे. घरी असलेल्या झाडांवर मिरवेल चढवणे हे चांगले उत्पन्न मिळवून देणारे ठरेल. हिरवी मिरी मिठाच्या पाण्यात घालून ठेवतात. पोटदुखीवर वगैरे औषधी.

सूड

वेळासला गेलो होतो मध्यंतरी तेव्हा हे मिरीचे वेल, जायफळाचं झाड, त्याची फळं हे सगळं बघायला मिळालं होतं. पण मिरी नेमकी बनते कशी ते आता कळलं.

michmadhura

मिरी उकळवण्याची पायरी माहीत नव्हती. ताजी असताना हिरवी दिसणारी मिरी नंतर सुकवल्यावर काळी होत असेल असं वाटत होतं.

दिपक.कुवेत

खुप छान माहिती आणि प्रत्येक प्रोसेसचे फोटो सुद्धा. ज्योतितै तु मिरी घरि करतेस का? असं असेल तर एक पाकिट ठेवुन दे...येत्या भारतवारित विकत घेईन :)

दादा कोंडके

...येत्या भारतवारित विकत घेईन :)

कशाला ते? डोक्यावर वाटायला का? ;)

हो,घरी भरपूर मिरीवेल आहेत्.त्यामुळे मिरी घरी तयार करूनच बाजारात विकण्यास पाठवावी लागते.तुमच्यासाठी नक्की ठेवेन्,कधी येताय कळवा.

दादा कोंडके

माहितीसाठी धन्यवाद.

मला वाटलं मिरी फक्त जावा-सुमात्रा (ही बेटं देखिल नकाशावर शोधण्याचा प्रयत्न केला नाही. शाळेत शिकवलेल्या काही डोक्यात फिट्ट बसली आहेत. पण पडताळून पहावीशी वाटली नाहीत. सर्वात जास्त पाउस पडणारं चेरापुंजीचंसुद्धा तसच. शिंच भारतात उत्तरेकडे कुठं आहे काय माहित? ;)) बेटावरूनच मागवली जाते.

आमचा दुकानदार एक किलो मिरीमध्ये मुठभर तरी पपईच्या आपलं पपिताच्या सुकवलेल्या बीया घालत असे. ;)

दिपक.कुवेत

तुमच्या डोक्यावर कुणी वाटतं का तुम्हि ईतरांच्या वाटता तसं?

प्यारे१

वाटाघाटी संपल्या का?
- वरवंटा

छान माहिती दिली आहे!

- गरम मसाला प्रमाणात आवडणारा प्यारे१

नेहमीच्या वापराच्या गोष्टींच्या बाबतीतही किती अज्ञान असते ह्याचा पुरावा म्हनजे हा धागा !

वेलावरची मिरी वाळवून काळी मिरी बनत असेल असे वाटत होते... ज्ञानात भर पडली.

पांढरी मिरी बनताना काही इतर (उकळण्यापेक्षा) वेगळी प्रक्रिया करतात की ती फक्त मिरीच्या झाडाची थोडी वेगळी जात आहे?

धनुअमिता

छान माहिती मिळाली..मिरीबद्दल ही माहिती पहिल्यांदाच ऐकली.

nishant

सुंदर माहीती आणि फोटो..

रेवती

छान माहिती व फोटू ज्योतीताई! धन्यवाद.
पांढर्‍या मिरीबद्दल काही सांगता येईल का?
चित्रात दाखवलेली मिरी वेलीवर तयार होण्यास किती दिवस लागले?
मिरीचे वेल वर्षभर फळत असतात का?

राही

पांढरी मिर्‍यें तयार करण्याची एक पद्धत माहीत आहे. उकळल्यावर जराशी ओलसर असताना ती गोणपाटासारख्या जाड खरखरीत कापडात ठेवून अलगद चोळावीत. वरची साल निघून जाते, आतमधले मिरी पांढरे दिसते. आता कदाचित यंत्र वापरत असतील .खूप पूर्वी काळे तीळही असेच पाण्याचा शिपका मारून गोणपाटात रगडताना पाहिले आहे, पण सफेद तिळाची वेगळी जात असते असेही ऐकले आहे. ते तीळ अर्थात आजच्या पॉलिश्ड तिळांइतके स्वच्छसफेद नसत पण त्या काळी अतिसफेद तीळ वापरण्याची पद्धतही नव्हती.

नाही.जानेवारी मधे घोस लागायला सुरुवात होते.व पूर्ण तयार होईपर्यंत १ ते दीड महिना लागतो.

आतिवास

मिरीच्या वेलाबद्दल आणखी माहिती द्याल का? कोणत्या काळात ती फळते? आयुष्य किती असते वेलीचे? मिरी साठवण्याची काही वेगळी पद्धत आहे का? मिरी किती काळ टिकते - वगैरे. किंवा ही माहिती कुठे मिळेल ते फक्त सांगा.

जेनी...

मस्त माहिती ज्योती प्रकाश मिपाकर .

त्यात ती लाल मिरी आहे ती उन्हात सुकुन चॉकलेटी दिसतेय , काळी नाहि दीसत ...
मी आतापर्यंत लाल्वाली मीरी कधीच पाहिली नव्हती ..
त्यासाठी स्पेशल धन्यवाद ... :)

अनन्न्या

माझ्या घरी मिरी आणि जायफळ दोन्ही तयार होतात. माझे सासरे अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजला प्रोफेसर होते. त्यामुळे त्याना ही सर्व माहिती आहे. तुम्हालाही त्याचा उपयोग होईल म्हणून मुद्दाम सांगितले.

Mrunalini

मस्त माहिती ज्योती ताई. :)

ganu

मिरी उकळवण्याची पायरी माहीत नव्हती.
छान माहिती मिळाली..

gaikiakash

मिरवेलीची पाने, विड्याची पाने म्हणून पण काही जण वापरतात. हे खरे आहे काय? तुम्ही टाकलेल्या फोटोज वरून मिरवेलीची पाने विड्याच्या पानासारखी दिसतात. कृपया खुलासा करावा. धन्यवाद.

दीपा माने

ज्योती तुमच्या माहीतीवरुन आठवले, मागे मी भारतात आले होते तेव्हा गावी रत्नागिरीला गेले होते आणि तेथून पारिजातक आणि मसाल्याचे रोपं आणली होती. त्यातील मसाल्याचे रोप होते त्या झाडाची १-२ पाने पदार्थ शिजवताना टाकल्यास म्हणे खडा मसाला टाकल्याचा स्वाद येतो. मी ते पान तेव्हा चुरगळुन पाहीले होते आणि त्याला मिश्र असा गरम मसाल्याचा वास येत होता. हे झाड आमच्या नातेवाईकांनी कलम करुन तयार केले होते. असो.
ज्योती, तुमच्या माहीतीबद्दल अनेक धन्यवाद.

स्पंदना

फारच छान माहिती. अन तुम्ही ती इथे टाकल्यावर त्यात आणखी थोडी भर पडली इथल्या प्रतिसादांनी नाही का?
एकुण मी काळी मिरी घेउन लावली तर ती काही अंकुरणार नाही तर. बर जायफळ तरी उगवेल का? ते जे टरफलासकट असते ते? काही नाही एखाद झाड लावायची हौस आली आहे म्हणुन.

कच्ची कैरी

मिरीबद्दल अस काही माहितच नव्हत ,माहितीसाठी खुप खुप धन्यवाद .

साऊ

तो हिरवा लाल मिरीचा फोटो खुपच छान आहे.

प्रचेतस

फोटू आवडले.
बाकी हे हिरवे मिरे नुसते खायला पण लै भारी लागतात.

राही

@ gaikiakash, मिरवेल ही साधारणतः नागवेलीसारखीच दिसत असली तरी मिरवेल अधिक भरगच्च असते. नागवेलीची (विड्याच्या पानांच्या वेलीची) पाने फिकट हिरवी,पोपटी रंगाकडे झुकणारी, किंचित लांबट,आणि मऊ स्पर्शाची असतात तर मिरवेलीची पाने किंचित गडद हिरवी,किंचित गोलसर आणि थोडी खरखरीत असतात. मिरवेलीचे पान विड्यात वापरत नाहीत.विड्यात म्हणजे मसालापानात वापरली जाणारी बारीक पाने ही वेलगुंजेची पाने असतात. ह्याच गुंजेच्या वेलीच्या काड्या अगदी ज्येष्ठमधासारख्या लागतात. कदाचित तोच ज्येष्ठमध असेल. गुळवेलही साधारण मिरवेलीसारखीच दिसते.

gaikiakash

@राही - माहितीबद्दल धन्यवाद.

माहिती आवडली. मिरीबद्दल एवढा विचार केला नव्हता. (हिंगाबद्दल केला होता. आणि घरातल्या बहुसंख्य मोठ्यांना हिंग कसा येतो हे सांगता आलं नव्हतं. यथावकाश देवाने कंप्यूटर, इंटरनेट आणि विकीपीडीयाचा शोध लावला आणि उत्तर मिळालं.)