कोकणवारी..
Primary tabs
दर वर्षी भारतात येणं होतं, पण ह्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये घरी जाण्याचा योग आला. कोकणांत ह्या दिवसांत म्हणजे नुसती धम्माल. ह्या वेळी बाहेर खूप फिरणं नाही झालं, बहुतेक वेळ घरीच गेला. त्यातूनही घरी आणि आजूबाजूला काढलेली काही छायाचित्रं टाकत आहे.
1. ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच.

2. रविवार स्पेशल - मटण वडे

3. बागेतील कल्पवृक्ष

4. फळांनी भरलेले हापूस आंब्याचे झाड

सुटलं ना तोंडाला पाणी?
झाडाच्या इथे असताना समोरच एक कैरी पडली, मग काय लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, त्यावेळी मीठ तिखट मिळालं तर मिळालं नाहीतर हाण तशीच.. आता मात्र मस्तपैकी कापून, तिखट मीठ लावून आस्वाद घेतला.

नारळ.

मार्च अखेर असल्यानी आंब्याची आवक कमी होती खरी पण जे काही मिळालं त्यात तृप्त झालो.

अननस

वर म्हटलेली "काजूची उसळ"

फणसाची (कुयरी) भाजी तितकी आवडत नसल्याने फणस झाडावरच होते..

शिंपल्या आणि भाकरी.. काही लिहायला शब्द नाहीत.

रत्नागिरीला गेलो आणि सुरमई नाही, कसं शक्य आहे? ताज्या सुरमईची कापं

सुरमई थाळी तयार :)

ऑल टाईम फेव्हरीट - बांगडा

फ्रीजमध्ये एक कणस मिळालं. गच्चीच्या कोप-यात कोळश्याचं पोतं होतंच. मग काय.. लागलो कामाला. कोळशे पेटवून त्यावर कणस भाजायला चांगला अर्धा तास श्रम घेतले. एक/दोनदा बोटाला चटकाही बसला पण तिखट मीठ आणि लिंबू लावलेल्या कोळश्यावर भाजलेल्या कणसाचे ४ दाणे तोंडात जाताच श्रमपरिहार झाला

थोडफार फिरणं पण झालं.
रत्नागिरीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या गावखडी बीच वर जाणं झालं.

ऐन भरतीची वेळ मिळाली.

तिथेच हे महाशय.. एकटा जीव सदाशिव

तसाच पुढे २० किमी वर आडीवरे ला चक्कर मारली. तेथील प्रचि

इतक्या वर्षांत पहिल्यांदा गुरांना बीच वर फिरवताना पाहिलं

रत्नागिरी-गणपतीपुळे कोस्टल हायवे वर लागणारा आरे-वारे बीचची प्रचि



मार्च महिन्यातही सकाळी थोडी थंडी होती. एका पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर धुकं होतं..

रत्नागिरीतील भगवती किल्ला

रत्नागिरीहून अक्कलकोट ला जाणं झालं..
सोलापूर रस्त्यावर ऊसाच्या रसाच्या ब-याच टपरी दिसतात. ४२ टेंप्रेचर मध्ये गाडीतून उतरायची हिम्मत होत नव्हती, तरी एके ठिकाणी थांबलो. रस विक्रेत्याकडून कळालं की तिथं मागील ३ वर्षं पाऊस नाही पडला. तरी येणा-या जाणा-यांसाठी विक्रेत्याने पाण्याचे माठ ठेवले होते. त्याला दिलसे सलाम!! त्या गरम्यात नुसत्या माठाकडे पाहिले तरी थोडा थंडावा मिळाला.

घाटमाथ्यावरून कोकणातला सूर्यास्त..

सगळेच फोटो भारी! पण ते कापलेल्या कैरीचे आणि हापूस आंब्याच्या टोपलीचे पाहून तोंडाला लय पाणी आलं!(तोंडातून लाळ गळणारी स्मायली आहे का कोणाकडं??)
@सगळेच फोटो भारी!>>> +१
@पण ते कापलेल्या कैरीचे आणि हापूस आंब्याच्या टोपलीचे पाहून तोंडाला लय पाणी आलं!>>> परचंड सहमत.. :)
@(तोंडातून लाळ गळणारी स्मायली आहे का कोणाकडं??)>>> ही घ्या ;-)
ह्या स्मायली कुठून आणता राव?
खत्रा फोटू आहेत!!!!!!!!!!!!!
दोन महिने झाले घराकडे गेलो नाहीये,आता तिकडं पण अशाच कैऱ्या लागलेल्या असणारेत..कशाला उगाच आठवण करून द्यावी, :(
शिंपल्या म्हणजे काय अन्? पहिल्यांदा पाहिलं आज.
शिंपल्या म्हणजे तिसर्या.. किंवा शिंपले असतात ना त्यांचे कालवण
खाणे आनि फिरणे दोहो साठी कोकण बेश्ट्च...

फोटू पण झ्याक आलेत.. (पेशली मटणवडे आणि सूरमै थाळीचे... तोंडाला पाणी सूट्या..)
पावसाळ्यात एकदा कोकणवारी झाली होती. तेव्हाचा पाउस आणि निसर्ग चमत्कृतींना तोडच नाही..
आडिवरे की रत्नागिरी?
जबरी... सगळेच फोटो मस्त. माठाचा फोटो विशेष आवडला :) :)
हे विषेश भावलं..
मस्त फोटो.
अगदी मस्त,असे की जेवणाचे ताट पाहुन तोंडाला पाणी अन भुक लागली.
धागा पहाताना फार फार त्रास झाला.
+१
धागा पहाताना .... फार त्रास झाला.
(आता मांसाहारी नसल्याने तो भाग वगळून)
अनिवासी लोकांना टार्गेट करून असे धागे निघतात.
जीव घायकुतीला आला राव
छान! जळजळ वगैरे झाली नाही. कारण अजून आम्ही याच वातावरणात रहातो. रत्नागिरी असो, की गोवा, निसर्ग तोच. समुद्र तोच! आरे म्हणजे बसणीच्या समुद्रावर सगळं लहानपण गेलं. नवर्याच्या गावाला आंबे फणस काजूची झाडं नेहमी प्रेमाने भेटतात. परत एकदा जाणवलं मी किती श्रीमंत आहे ते! :)
मी पण... काही बाबतीत सहमत... (म्हणजे ते नवरा वगैरे लागू नाही)...
मोठी दौलत आहे तुमच्याकडे :)
छान फोटो. ह्या वर्षी जायला मिळाले नाही..:(
देवाधीदेवांनीच असे फोटो टाकुन जळवायचं म्हटल्यावर आम्हि पामर काय बोलणार? लटकत्या कच्च्या आंब्याचा फोटो विषेश आवडला...
व्वा..व्वा..कोंकण खाद्य संस्कृतीच्या झलकेसहित निसर्गदर्शनाने मन तृप्त झाले. धन्यवाद.
कोळशाला तिखट, मीठ आणि लिंबू लावून त्यावर कणसं भाजतात हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला.
स्वल्पविराम हुकला त्येंचा, काका..
भावनाओंको समझो :). नशीब कि त्यांनी भाजलेल्या कोळश्याचे चार दाणे तोंडात टाकले नाहि :D (देवसाहेब ह.घ्या हं)
चालतं हो.. काही लोकं नको त्याच गोष्टी ़जास्त बघतात.. नजर आपली आपली.. :) (दिपककुमार ह. घ्या हं पण भावनांको नक्की समझो :p )
हो..नं..! माझ्या प्रतिसादातील पहिलं कौतुकाचं वाक्य दिसलं नाही. चुक दाखवून दिली तेवढी बरोब्बर खुपली. असो.
साहेब चुक दाखवून द्यायची पण पद्धत असते.. असो.. नेचर आपलं आपलं.. :)
अतिशय सुन्दर. माझे साडु बसणिलाच राहातात. मि दरवर्षि आरेवारे मार्गे गणपति पुळ्याला जातो. भरपुर आम्बे खातो. शेतातुन फिरतो. जाम्भळे खातो. खुप धमाल येते.
मला ते मटणवडे, सुरमईची थाळी, तिसर्याचं कालवण आणि आरे-वारेचे फोटो का बरं दिसत नाहीय्येत? ;)
फोटू तर बहोत बढिया देवबाप्पा, पण जरा थोडं भटकंतीबद्दलही लिहा की राव. :)
झकास.. बरेच दिवसांनी कोकणात जाउन आल्याचा आनंद झाला. सुरेख..
नुकताच गेल्या रविवारी रत्नागिरीला जाऊन आलो त्याची आठवण आली.
वाह देव साहेब ,.
अतिशय सुन्दर प्रचि.छान सफर घडवलीत.
पुलेशु.
तुम्ही खुप व्यवस्थित आहत का हो? म्हणजे तुमच्या ना लेखात मला नेहमी नीट - नेटकेपणा जाणवतो.
हाही लेख फारच म्हणजे फारच मस्त....!!!
तुम्ही भाग्यवान आहात......
धन्यवाद रायडर.. नीट - नेटकेपणा ठिकठाक आहे, आणि माझ्या बायकोच्या द्रुष्टिने अजिबात नाही.. ;)
सुंदर चित्रे अन सादरीकरण.
व्यनि करायचात, बाकी आमच्या कोकणचे फोटो म्हणजे अप्रतिम्च असणार!!
ताई, मी मार्च अखेरीस आलो होतो.. आपली ओळख एप्रिल मध्ये झाली. पुढच्या वर्षी नक्की कळवतो! :)
सूरमई, मटण-वडे आणि काजूच्या उसळीचे फोटू ................................................ निशब्द (कारण लाळ शब्द अडवतेय !!!!)
:D
मिपा करानी नुसता माझा छळ मांडला आहे, आई बघ न ग, कसले खत्री फोटु टाकतात खाऊचे.
तोंडाला पाणी सुट्या, पाणी सुट्या तो सुट्या, लाळेने घर भाऱ्या, त्याचे काय करया?
जी ले जरा। जी ले ज़रा।
कहता है दिल। जी ले ज़रा ।
जी ले जरा। जी ले ज़रा।
कहता है दिल। जी ले ज़रा ।
लेख भारी आणि फोटो तर अतिसुंदर! फोटोत सुद्धा त्या घडीच्या पोळ्या लुसलुशीत आणि पापुद्रेवाल्या आहेत हे जाणवतंय.
कोकणातील योग्य स्थळे दाखवून आणि अशी खाण्याची चंगळ करणारे कोणी टूर ऑपरेटर्स आहेत का ? असल्यास माहितगारांनी उपकार करावे.
कोंकण नकाशा घ्या, आणि गाडी घेऊन सुटा.
कोंकणात जवळपास सगळ्या गावांमध्ये तुम्हाला सुंदर निसर्ग & छान खाणे मिळेल.
गवि यांचे जुने लेख वाचून घ्या. पुरेशी माहीती जमा होइल.
मस्त आलेत फोटो.... आपनाकडे कोणता एस्.एल्.आर आहे????
सर्व फोटो बघून कोकणवासीयांचा हेवा वाटला.
खुपच छान लेख आणि फोटो.
फोटो लैच्च जबरी आलेत बॉ!!!!!
सुरेख फोटो :)
अमोल केळकर
नजरेत आणि कॅमेरात मज्जा आहे हो तुमच्या.. :-)
मटणवड्यांचं आणि सुरमईथाळीचं चित्रं पाहून हमसाहमशी रडलो..! कृपया ही दोन्ही चित्रं व त्याचे सर्व प्रताधिकार मला तहहयात द्यावेत अशी हात जोडून प्रार्थना..!
मी देखील पावसाळ्याचीच वाट बघतोय.. कोकणवारी नक्की...
एक सिंधुदुर्गकर
बाकी आपले फोटो... अर्थातच अप्रतिम.. :)