भटकंती

Train To DAHANU

Primary tabs

चायना मध्ये १ म्हण आहे , तशी ती चायनीज मध्ये आहे पण मराठीतच सांगतो .
१० किलोमीटर फिरा किंवा १००० पुस्तक वाचा .
तसं हे जर खरं मानलं तर आम्हाला इंजिनिरिंगमध्ये केटी नसती लागली .कारण भटकण्यात आमची ४ वर्ष गेली . हे कॉलेज मध्ये फिरणं किंवा फिरवण ,यामुळे भले हि ५% १०% कमी का पडले असेना .. :-) अक्कल मात्र आली नि पाझाळली पण .

असो, १२ फेब्रूवारी , मोठ्या भावाच्या सासुरवाडीहून फोन आला , भावाच्या साल्याचा ( शिवी नाही आहे ;-) साला म्हणजे बायकोचा भाऊ ) साखरपुडा होता . तसं आधुनिक युगातले कुटुंब त्याला engagement म्हणतात .पण मी त्याला entertainment म्हणूनच पाहतो .( no offense please ) . ठिकाण होते डहाणू . साखरपुड्याची तारीख होतो १५ मी १४ फेब्रुवारीला :Pनिघायचे ठरवले . पुणे वेरावल एक्सप्रेसचे तत्काल मध्ये बुकिंग केले .
रात्री ७.५० ची ट्रेन होती .ऑफिसमधून लवकर निघालो ,घरी आलो , bag भरली नि पीएमटीने निघालो , सर्व पेठा बघत बघत एकदाची बस स्टेशन ला पाहोचली . थोडस खाऊन , प्लटफॉर्मवर पहोचालो . reservation list पहिली तर त्यात माझं नावच नव्हतंच.

आयुष्यातला आणखी १ धक्का .मग काय , बॅग उघडली ,तिकीट पाहिलं तर १४ फेब्रूवारी च्या एवेजी १४ मार्चचे बुकिंग झाले . चला , १४ फेब्रूवारी काही आम्हाला लाभत नाही , :-( .आता पुन्हा आमचे बाबा नि आई वर्ष ,२ वर्ष हा किस्सा सर्वांना ऐकवणार , मी किती वेंधला आहे हे परत सांगणार . असंच एकदा मी एक नात्यातली पोरगी पहिला गेलो होता , जाताना घाई घाईनेच अंगात जाकीट चढवल . त्यांचं घरी पहोचालो ,मुलगी आली , हसली पण .. :-) तितक्यात जाकीट वर लक्ष गेल, पाहिलं तर कपडे वळवताना लावायचा चाप तसाच त्याला. काय बोलणार , त्या दिवसापासून आई ,बाबाचं बोलतात , मी किती वेंधला आहे ते ! माझ्या मावस बहिणीच्या ,सासूला पण हि गोष्ट माहित आहे .

असो मूळ मुद्द्यावर येऊ या ,तिकीट तर आता नव्हतच . काय करायचं विचार चालू झाला .पहिलाच नामी पर्याय सुचला , जाणे रद्द करू या . तो मला आवडला हि पण परत आई , बाबांच्या टोमणे आठवले . दुसरा विचार केला , मुंबई ला सकाळी जाऊ या , तिथून रेल्वेने जाता येईल . मग विचार केला अरे रेल्वेनेच जायच असेल तर याच ट्रेनने जाऊ या . धावत धावत फलाटावरून ,तिकीट खिडकीवर पोहोचलो. तिथे भली मोठी रांग . मी हि जरा हिमतीने सर्वात पुढे रांगेत घुसलो .रांगेत घुसत नाही तर मागून हिंदी , मराठी शिव्या ऐकू येऊ लागल्या. २ ४ अंग्रेजी मधल्या पण होत्या .त्या non-sesnse, idiot अश्या असल्यामुळे बहुतेक त्या मुलीनेच घातल्या होत्या .त्या सर्व शिव्या या माझ्यासाठी नसून , कोण ,दुसर्याकोणा व्यक्तीला प्रेमाने बोलवत असाव्या , अस समजून मी त्या कडे कानाडोळा केला . पण शेवटी बरयाच विनवण्या केल्यावर एकाने मला तिकीट घेऊ दिली .मला त्या माणसाविषयी बरीच आस्था वाटली , चांगला माणूस वाटला. पुढच्या क्षणाला आस्था व्यर्थ झाली . तो मला म्हटला , या जगात भूतदया आपण नाही दाखवणार तर कोण दाखवणार ? भूतदया !!!! जरा मराठीचा वर्ग घ्यावा वाटला , पण फलाटावर आमची आगगाडी उभी असल्यामुळे , मी आभार प्रदर्शन करून कलटी मारली .धावत धावत येऊन गाडी पकडली . गाडी सुरूच झाली होती मी स्लीपर च्या डब्यात चढलो , आणि तिकीट तपासनिकाची वाट पाहू लागलो . ….

गाडीने वेग घेतला ,मी हि जरा बसायला जागा मिळते का ? या साठी २ डबे पालथे घातले .
काही ठिकाणी जागा हि होती , पण वेळ रात्रीची असल्यामुळे काही वेळातच हि सर्व लोक झोपी जाणार हे हि गृहीतच होते , मी १ का डब्याच्या दरवाज्या जवळ येऊन तशरिफ टेकवली .
पाण्याची बाटली पण विसरलो होतो , ती घेतली आणि मस्त थंड हवा चेहऱ्यावर घेत पुढचा प्रवास चालू झाला .कॉलेज ला असताना मी ट्रेननेच रोज प्रवास करत असल्यामुळे दरवाज्याजवळ बसने ,काही कमी पणाचे वाटत नव्हते . साधारणत: १/२ १ तासांनी १ गृहस्थ दरवाज्याजवळ आले , त्याच्या नासिकाजन्य आणि थोडाश्या तिरसट मराठीतून हटकले ,काय दरवाजात बसलायत , वारा थंड आहे , आमच्या प्रकुतीला मानवणार नाही . अर्थात या वाक्याने , यांचे सबंध आयुष्य मुळा मुठेच्या काठी गेले असणार याची मला खात्री पटली .लोणावळ्याच्या जवळ , रात्री साधरणतः ८.३० वाजता , उन्हाच्या झळा लागणार आहेत का ? पण मी वादात न पडता , दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट ignore केली .हा 'अस्सल पुणेकरांना ' टाळण्याच्या सर्वात सोपा , न तापदायक मार्ग आहे . (please note it down ).
लोणावळ्याला शिंधी गरीब व्यापारी डब्यात चढला आणि तो पण इथेच दरवाज्यात बसला. मळकटलेला ड्रेस, दाढी वाढलेली , दिवसभर काम करून थकलेला चेहरा .तितक्यात चहा वाला आला ,नि चहा घेऊन गप्पा रंगल्या .
गप्पात तो म्हंटला , “साहेब , ये तो रोज का हि ही , बीस सालो से सुबह ६ बजे घरसे निकालना , यहा माल बेचना , मुंबईमे माल खरीदते है और यहा बेचते है" ,
"बच्चे हात नाही बटाते?" मी विचारले .
“साहब बच्चा तो कब का गुजर गया, बस बिवी और मे हु .”
पुढे मला काय विचारव काही सुचले नाही , चहाचा घोट घ्याला पेला होठाला लावला , तर चहा कधीच संपला होता . आता कोणीच बोलत नव्हते , त्या शांततेला साथ देणारी एकाच गोष्ट होती , तो ट्रेन चा एक लयीत येणारा आवाज .
कर्जत आले , तो उतरला , उतरताना म्हटला , "साहब फिर मिलेंगे" .मी मंद हसलो कदाचित स्वतःशीच म्हणालो ”हो नक्कीच" …..

जस अंबरनाथ गेले , मुंबईने स्वत:च्या अस्तीवाची जाणीव करून द्यायला सुरवात केली .दूर दिसणाऱ्या उंच इमारती , ट्रकच्या शेजारच्या झोपड्या , वस्तू लादाव्यात तश्या माणसांनी लादलेल्या लोकल , आणि या सर्वाना दरवाजात पाहणारा मी .हे सगळ मला जाम "confuse” करत , बहुतेक नेहमीच . हे सगळ कशासाठी ? हा प्रपंच कशासाठी ?
१ बालगीताच्या २ ओळी ओठात आल्या , “कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी ", माधव जुलिअन कि पाडगावकर ? प्रश्न पडला , मी हि उत्तराच्या भानगडीत पडलो नाही .कारण पहिलच प्रश्न सुटला नव्हता , कशासाठी ?

दरवाज्या जवळ बसल्यामुळे ,बरीच मंडळी नजर ओळखीची झाली होती ,१ का ने येऊन चौकशी केली , :-) नि निघून हि गेला . गाडी ठाण्यावरून पुढे बोरावालीला जाते , १०.३० वाजून गेले होते , शक्यतो सर्व मंडळी झोपी गेली होती , एव्हाना जर माझं हि reservation असते तर मी हि माझ्या i-pod ला जवळ घेऊन झोपी गेलो असतो. पण आता मस्त गाणी गुणगुणत बसलो होतो ,शिळ हि वाजवत होतो.

“बैठू क्या ?”
अरे मला हा का विचारतो ? , दरवाज्याजवळ कोणी हि बसू शकतो. हा बर्थ थोडीच आहे .
मी मागे पहिले ,
“हा बिलकुल , तशरिफ रखो " मी हि शुद्ध हिंदीत सांगितले .
त्याने हि त्याची तशरीफ टेकवली .
मी हि वळवलेली मान सरळ केली , गाणी गुणगुणणे चालूच ठेवले .
बोरावली गेले होते .

“काही खायला आहे का?”
फोन वर मी मराठीत बोललं असल्यामुळे मला मराठी येत हे त्याला समजले असावे .
पुन्हा त्याने विचारले " काही खायला आहे का ?”,
मी बागेतून गुड डे चा पुढा काढाला नि उघडून त्याचा पुढे ठेवला , त्याने न लाजता ४ , ५ बिस्कीट उचलली , मी हि चवीसाठी १ उचललं.त्याने न बोलता पुडा संपवला .त्याचे कडे काही समान दिसत नव्हते , म्हणून पाणी पण मीच दिले .
सडपातळ ,इन न केलेला आडव्या रेघांचा सदरा, प्लेन pant आणि clean shave . साधारणत: ४० वर्षाचा असेल तो इसम .धन्यावद देऊन नाव , गावाच्या गप्पा चालू झाल्या .माझा कर्मभूमी mate , म्हणजे तो पुणेकर गृहस्थ २दा डोकावून गेला .

मी विचारलं, “कुठे जायचे ",
“अहमदाबाद "
“काय एकटेच",
तो म्हंटला , “नाही , भाऊ नि वाहिनी पण आहे "
“ते कुठे आहे ",
“वो आगे सोये हुये है ",
“मग तुम्हाला झोप नाही येत आहे का", मी विचारलं .
तो म्हंटला , “नाही , माझं बुकिंग नाही आहे "
“confirm नाही आहे का?”,
“ नाही काढाल नाही आहे " तो म्हंटला .
Now I was shocked .
“काय ??”
"काय माझं general तिकीट आहे ,भाभी ने भाईला नाही सांगितलं "
मी विषय टाळायला विचारल , “बिस्कीट खाणार का ?”
तिथून थोड्या वरमलेल्या स्वरात आवाज आला . “हो ",
आणि दुसरा good day चा पुडा पुढ्यात आला .

त्याने विचारले , “ डहाणूला कशासाठी ".
“साखरपुड्यासाठी .” “मग लग्न झाले का ?”, मी बोललो .
“नाही " “ भाभी नाही म्हणते ", तो म्हंटला.
त्याला पुढे हि बोलायचे होते , पण मीच विषय बदलला ,” अजून डहाणू किती दूर ",
“बस आधा घंटा" ,तो बोलला आणि बोलण्याची गाडी दुसर्या विषयावर घसरली .
१० मिनिटांनी त्याचा भाऊ तिथे आला , हातात चपाती नि भाजी होती ,
ते हि खाली बसले , नि दोघ खाऊ लागले ,तोडफार बोलून १० १५ मिनिटांनी ते निघून गेले .
हा अजून हि चपाती,भाजी खात होता,डहाणू हि जवळ आले होते , गाडीचा वेग मंदावला , स्टेशन आलेच होते , मी पाण्याची बाटली त्याच्या हातात दिली . मला तशी आता लागणारच नव्हती , किबहुना लागली जरी असती तरी गरज त्याला जास्त होती .
रात्रीचा १ वाजून गेला होता ,स्टेशन आले मी खाली उतरलो .
तो म्हंटला "फिर मिलेंगे ",
मी परत मंद हसलो , काही न बोलता वळलो ,
“फिर मिलेंगे ??” तो खडुस गृहस्थ , तो रोज प्रवास करणारा व्यापारी किंवा हा दरवाज्याजवळ बसून भाजी पोळी खात असलेला इसम नि मी , आम्ही खरच भेटणार आहोत का ? नाही....बहुतेक ? माहित नाही .खूप सारे प्रश्न मनात होते, थोडा नियतीचा राग हि होता , पण मूळप्रश्न अजून तसाच होता , आज हि आहे , कशासाठी ?? अगदी कशासाठी ?

लेखणीतून ….
नावात काही नाही

नीलकस्तुरी

कपडे वाळवताना लावायचा चापच किस्सा अवडला! येऊ द्या आणखी...

गणपा

वा !!! आमच्या गावावर लेख.
पहिला भाग फार त्रोटक झाला राव.
येउंद्या जोमानं.

हवालदार

अशी कुठ्लीच गाडी ऐकलेली नाही. कथा म्हणून चालवून घेतले आहे :-)

साधरणत: या गोष्टीला वर्ष उलटून झाले , मुंबईला मी फारच कवचित येत असल्याने हि चूक झाली . पण हि काल्पनिक कथा नाही आहे .

अगोचर

अक्कल मात्र आली नि पाझाळली पण

कारण पहिलच प्रश्न सुटला नव्हता , कशासाठी ?

अश्या वाक्यान्नी मजा आणली.

रेल्वे आणि दरवाज्याच्या आठवणी जाग्या झाल्या. पण तिकिट तपासनीस उगवलाच नाही वाटते !

आदिजोशी

पण मुदलातल्या चुका करू नये. त्यामुळे ही सत्यघटना नाही हे लक्षात येते.