"मी आहे" याची जाणीव झाली की बाकी सर्व भ्रम आहेत हे आपोआप कळते आणि असा प्रतिसाद लिहिला जातो. माझ्या अशास्त्रीय प्रतिसादांचा निषेध करणे यानंतर तरी थांबेल अशी आशा आहे ;)
'मी'चे प्रतिसाद वाचूनच पुरेसे मनोरंजन होते. आणखी पैसे देऊन, तिकीट काढून, विकतचे चित्रपट मनोरंजन सध्या तरी अनावश्यक आहे. त्या प्रतिसादांचेही कुणीतरी परीक्षण लिहा रे.
अवांतर बरंच झालं, आता मुळ धाग्याबद्दल,
छान लिहिलंय, पल्लवी जोशी,अर्चना जोगळेकर आणि मालविका तिवारी या जाणतेपण येणाच्या वयात जी बायकोबद्दलची स्वप्नं पडायची त्यातल्या बायकोच्या फ्रेममधल्या हिरॉईनी. त्यामुळं अजुनही टिव्हिवर दिसल्या तरी पहाव्या वाटतात, (गाण्याच्या कार्यक्रमात आताची प्रत्यक्षातली बायको त्यांच्या साड्या पाहात असते, तोपर्यंत त्यांच्याकडं पाहता येतं.)
बाकी प्रेम,लग्न आणि संसार या गोष्टी एकत्र आणणं हाच मोठा उपद्याप आहे, ज्यांना हे एकत्र जमत नाही ते खोट्या सुखाचा मोठा मुखवटा घालुन आनंदात जगतात तर ज्यांना हे जमतं त्यांचा ख-या जगण्यातला आनंद किंवा जगण्यातला खरा आनंद काहीतरी एक निघुन जातो, उरतं ती एक खरंतर रटाळ पण बाकी आलम दुनियेला आदर्श वाटावं अश्या आयुष्याचं चित्र त्याच्या चकाकि आणि फ्रेमसह टिकवण्याची निरर्थक धडपड.
या फ्रेमचा एक खिळा निघुन गेला तिथं मोकळ्या झालेल्या जागेतुन आतल्या चित्रातले चिमुकले पक्षी उडुन जायला निघालेत असं वाटायला लागतं,आणि मग त्या पक्षांना आवरता आवरता मुळात विस्कळीत झालेलं आयुष्य अजुन दोन ठिकाणी फाटतं.
असो, पिक्चर जमलं तर पाहेन, हल्ली कोणताच पिक्चर पाहावा असं वाटत नाही किंवा त्यात काय पाहायचं हे कळत नाही.
लव लव करी पातं
डोळं नाही था-याला
एकटक पाहु कसं
लुकलुक ता-याला ,
अन
ना मानोगो तो दोंगी तोहे गारी रे,
हे विसरणं शक्य आहे का हो गवि, आणि समदुखी: लोकांत कसलं वैर अन वितुष्ट.
पाहिजेच तर एकदा बसु समजणारी अर्चना पाहात अन न समजणारे ग्रेस (वा-यानं हलते रान, तुझे सुनसान, हृदय गहिवरले, गाईचे डोळे करुण उभे की, सांज निळाईतले) ऐकत.
निवडुंग चित्रपटातलं एक गाणं आहे, वर लिहिलंय तसं, अर्चना जोगळेकर, कवि ग्रेसांच्या कविता आणि त्यांना हृदयनाथांनी लावलेल्या चाली.
ऐका आणि पहा, लई भारी आहे.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार या चित्रपटपरीक्षणात्मक लेखाचा दुवा श्रीमति मृणाल देव यांच्या फेसबुक पानावर प्रसिद्ध केला आहे. त्याबद्दल इनिगोय यांचे अभिनंदन!
स्त्रियांच्या बाबतीत श्रीमती हे संबोधन केव्हा वापरावे याचे संकेत मला अजून स्पष्टपणे कळलेले नाहीत. मात्र सौ. हे संबोधन येथे योग्य वाटावे. किंवा केवळ मृणाल देव असे लिहिले तरी चालेल.
श्रीमति हे कोणाही स्त्रीला उद्देशून वापरता येते. पूर्वी विवाहित सधवा स्त्रियांसाठी "सौभाग्यवती" तर विधवा स्त्रियांसाठी "गंगाभागिरथी" अशी संबोधने वापरायची पद्धत होती. घटस्फोटित स्त्रियांना यातले कोणतेच संबोधन वापरता येणार नाही. आता सौ. (सौभाग्यवती) हे संबोधन पुरुषी वर्चस्वाचे द्योतक किंवा वैवाहिक स्थितीवरून फरक करणारे वाटल्याने काही स्त्रिया मुद्दाम वापरत नाहीत. श्रीयुत सारखेच श्रीमती हे अगदी सर्वसामान्य संबोधन आहे.
सुंदर परिक्षण. आवडलं. चित्रपट पाहीन.
बाकी, मृणाल कुलकर्णी यांनी लेखनाचं कौतुक केलं आहे. तेव्हा आता आम्ही वाचकांकडे कौतुक करण्यासारखं काही शिल्लकर राहीलं नाही. अभिनंदन....आणि आनंद वाटला.
-दिलीप बिरुटे
बाकी प्रेम,लग्न आणि संसार या गोष्टी एकत्र आणणं हाच मोठा उपद्याप आहे
असणारंच! कारण काय?... तर हे:
पल्लवी जोशी,अर्चना जोगळेकर आणि मालविका तिवारी या जाणतेपण येणाच्या वयात जी बायकोबद्दलची स्वप्नं पडायची त्यातल्या बायकोच्या फ्रेममधल्या हिरॉईनी. त्यामुळं अजुनही टिव्हिवर दिसल्या तरी पहाव्या वाटतात, (गाण्याच्या कार्यक्रमात आताची प्रत्यक्षातली बायको त्यांच्या साड्या पाहात असते, तोपर्यंत त्यांच्याकडं पाहता येतं.)
किती प्रामाणिकपणा. आणि अगदी हेच तर सांगितलं होतं :
`मन का स्वभावही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!'
प्रत्यक्षातली पत्नी जवळ आहे आणि आपण काय बघतोय तर टीवीवरच्या तरूणी!
ज्यांना हे एकत्र जमत नाही ते खोट्या सुखाचा मोठा मुखवटा घालुन आनंदात जगतात
एकदम बरोब्बर! सिनेमातल्या व्यक्तींचे वरचे फोटो पाहा.
तर ज्यांना हे जमतं त्यांचा ख-या जगण्यातला आनंद किंवा जगण्यातला खरा आनंद काहीतरी एक निघुन जातो,
इथे कमालीचा वैचारिक गोंधळ आहे. आनंद दोन नाहीत, एकच आहे. एकदम साधी गोष्ट आहे, एकतर तुम्ही आनंदात आहात किंवा नाही.
आणि ज्याला जमलं तोच तर आनंदात असतो. `ख-या जगण्यातला आनंद किंवा जगण्यातला खरा आनंद' अशी त्याच्या मनाची संभ्रमित स्थिती कधीच नसते.
उरतं ती एक खरंतर रटाळ पण बाकी आलम दुनियेला आदर्श वाटावं अश्या आयुष्याचं चित्र त्याच्या चकाकि आणि फ्रेमसह टिकवण्याची निरर्थक धडपड
हे ज्याला जमत नाही त्याचं यथार्थ वर्णन पण (खरं तर ती चिडचिड) जमलंय त्याच्यावर काढण्याचा प्रयत्न.
या फ्रेमचा एक खिळा निघुन गेला तिथं मोकळ्या झालेल्या जागेतुन आतल्या चित्रातले चिमुकले पक्षी उडुन जायला निघालेत असं वाटायला लागतं,आणि मग त्या पक्षांना आवरता आवरता मुळात विस्कळीत झालेलं आयुष्य अजुन दोन ठिकाणी फाटतं.
आहे त्या पत्नीशी अनुबंध नाही त्यामुळेच तर `आयुष्य अजुन दोन ठिकाणी फाटतं'. कल्पना तर आधीच निरूपयोगी आणि वास्तवात पण अपयश.
असो, पिक्चर जमलं तर पाहेन, हल्ली कोणताच पिक्चर पाहावा असं वाटत नाही किंवा त्यात काय पाहायचं हे कळत नाही.
एकदम सही! जर खरा प्रणय सार्थ असेल तर पिक्चर (आणि त्यातनं असला पिक्चर) कोण बघतोय? आणि ज्याला ते जमलं त्याला स्वतःच्या पत्नीबरोबर सगळंच एंजॉय करता येईल मग तो पिक्चर असो की सहल.
पुढे उपप्रतिसादात अपर्णानं विचारलांय
कशी झाली हिमालय यात्रा?
ओ माय गॉड! कुणाकडेही रोख नसलेला आणि कुणाचीही व्यक्तिगत माहिती नसतांना दिलेला माझा पहिला निर्वैयक्ति प्रतिसाद किती सार्थ होता!
चित्रपट बघुनच नन्तर हा प्रतिसाद दिला होता,दिग्दर्शन जमले नाहि असे वाटले,सर्व कलकारन्चा अभिनय उत्क्रुष्ठ होता,सर्वच कलाकार अनुभवी आणि कस असलेले असल्याने,दिग्दर्शनात प्रचन्ड त्रुटी वाट्ल्या,बहुतेक भागा नन्तर आलेले Pause ही Editing मधिल चूक अथवा दिग्दर्शकाचि सम्भ्रम अवस्था हे कळुन येत होते,बाकि Dolby व एकन्दरित आधुनिक्तेचा उपयोग उत्तम.
सहमत आहे. बोळा तुंबला की विचारांची गर्दी होते. आणि ऐकणारी माणसे दर्दी असली तर त्यांना त्या विचारांची सर्दी होते. व्हेरिली, धिस इस हाउ अ विचारवंत इज बॉर्न ;)
प्रतिक्रिया
वा!
त्याचं काय आहे
"मी आहे" याची जाणीव झाली की
(No subject)
मला
आंबा केशर मस्तानी बद्दल मी
आर यू शुअर..?
इनितै,
असेलही.. आय्यॅम नाॅट शुअर..!
तुम्ही "मी" असतानाही नॉ शुअर?
प्रतिसाद
छान दिसतो आहे सिनेमा. नक्की
अवांतर बरंच झालं, आता मुळ
इतक्या मनापासून आणि विषयाला
पन्नास .. आपले काय ठरलेले
लव लव करी पातं
समदु:खी लोकांत कसलं वैर आता..
गेली आजची झोप गेली.........तो
>>>ना मानोगो तो दोंगी तोहे
निवडुंग चित्रपटातलं एक गाणं
या फ्रेमचा एक खिळा निघुन गेला
हिमालय नाही हो.
इनिगोयचे अभिनंदन!
श्रीमती की सौ?
कोणाही स्त्रीला
सहमत
धन्यवाद
+१
पैसाताई, आभार!
इनि, अभिनंदन!
अभिनन्दन!!
लग्नानंतर त्या कुलकर्णी हे
+ १
हा प्रतिसाद पैसाताईचा अभिनंदनाचा प्रतिसादा साठी आहे.. :)
मिपावर अवांतराला मरण नाही.
उत्तम झालंय परीक्षण...
जबरदस्त लिहिलयस ..... !!!
मस्तच
सुंदर परीक्षण, प्रसंगवर्णन
छान.
अवांतर बरंच झालं, आता खर्या आयुष्याबद्दल!
परि़क्षण
प्रत्यक्षात चित्रपट रटाळ वाटला!
चित्रपट न पाहताच हलाहल
चित्रपट बघुनच नन्तर हा प्रतिसाद दिला होता
ओ अनिरुद्ध काका तुमच्यासाठी
एक तर लैंगिकता नाहीतर शांतता
बोळा तुंबणे हे विचारवंत
सहमत आहे. बोळा तुंबला की
अहो हे दोन्ही बोळे निघतील
Pagination