Welcome to misalpav.com
लेखक: रुमानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा

>>नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा -- हे लोण मिपापर्यंत पोचलं म्हणायचं =)) =)) =)) =)) अर्धवटराव

मालकांना व डॉन रावांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. अनिवासी असल्याने अनेक आप्तांच्या मंगलकार्यात मनात असून उपस्थित राहता येत नाही , मग चेहरा पुस्तकातून फोटो पाहून दुधाची तहान ताकावर भागविता येते. फोटोंची वाट पाहत आहे.

नीलकांतला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………! http://www.google.co.in/search?q=eka+lagnachi+dusari+goshta&source=lnms&tbm=isch&sa=X&ei=DaPfUaSjA4eJrge_koCICg&ved=0CAcQ_AUoAQ&biw=1023&bih=151#facrc=_&imgdii=_&imgrc=pFyxfST88OHAPM%3A%3BB7nmBaQGpF_g5M%3Bhttp%253A%252F%252Ftv.burrp.com%252Fimages%252Fs%252F8%252Fd%252F8dqektzg_1ywr_3_300.jpg%3Bhttp%253A%252F%252Ftv.burrp.com%252Fseries%252Feka-lagnachi-dusari-goshta%252F91899%3B450%3B300

कुणी गेलं होतं का काल डानरावांच्या लग्नाला...? व्रुतांत द्या की.. मला जाता नाही आलं (माहेरी जायचा गोल्डन चान्स मेल्या पावसाने घालवला.. :( )

छोटा डॉनच्या लग्नाला प्रा.डॉ., बिका,आणि चिंतामणी हे मिपाकर उपस्थित होते. लग्न वेळेवर लागले. चिंतामणी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ (बुके) देण्यात आले. फोटो सेशन आणि ओळख परेडमधे छोटा डॉन यांनी हे माझे सर्व मिपामित्र म्हणुन ओळख करुन दिली. एवढ्या धावपळीतही छोटा डॉन यांनी आम्हाला बर्‍यापैकी वेळ दिला. बाकीची मंडळी अभिनंदन करण्यासाठी ताटकळली आहे, असे लक्षात आल्यामुळे बिका, चिंतामणी, आणि प्राडॉला काढता पाय घ्यावा लागला. जेवण उत्तम होते. जेवण यथेच्छ हाणले. बाहेर पाऊसही भूरभूरत होता. निघण्यापूर्वी डॉनला पुन्हा एकदा आम्ही बाय करुन निघालो. पठ्ठ्याच्या चेहर्‍यावर आम्ही भेटल्याची खुशी दरवळत होती...आम्हालाही ते पाहतांना आनंद वाटला. बिका आणि चिंतामणी यांच्याशी धावत्या गप्पा झाल्यानंतर त्यांचाही निरोप घेतला ते आपापल्या कामावर, तर आम्ही देहूला रवाना झालो...! -दिलीप बिरुटे

मराठी आंतरजालाला ब्रह्मचर्याचा शाप आहे असे ऐकुन होतो. यावर्षी उ:शाप मिळालेले दिसताहेत सहचरिणी मिळाल्याबद्दल नीलकांतला हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. शेपूट तुटलेल्यांची यादीत अजुन एकाची भर पडली म्हणुन आनंद आणि स्वातंत्र्याचा स्वहस्ते सत्यानाश करुन घेतल्याबद्दल नीलकांतबद्दल सहानुभूती ;)

नीलकांत आणि प्रियंकाचे हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा..!!! चला आता मि.पा. जोमात चालणार. नीलकांत यांना घरची साथ मिळाल्याने कुठलाही spamer ची मि.पा.कडे वाकड्या नजरेने पहाणार नाही. डॉनराव यांचे ही हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा..!!!

मालकांना अनेकोत्तम शुभेच्छा आणि त्यांनी आपले पहिले प्रेम विसरु नये ही विनंती. तसेच आमचे परममित्र डानराव यांचे देखिल मनापासुन अभिनंदन.

नीलकांत यांना लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!! आत्तापर्यंत माझाही हाच समज होता की निलकांत हे वयस्कर गृहस्थ असावेत. छोटा डॉन आणि त्यांच्या भावी धर्मपत्नीस हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!

नीलकांत व प्रियंका यांचे मनःपूर्वक अभिनंदन व अनेक शुभेच्छा!! श्री छोटा डॉन व सौ छोटा डॉन यांचेही अभिनंदन व अनेक शुभेच्छा! सन्माननीय सदस्यांनी नीलकांत यांच्या भावी पत्नीचे नाव लिहिताना अधिक काळजी घ्यावी ही विनंती.

श्री. व सौ. नीलकांत आणि श्री. व सौ. छोटा डॉन या दोन्ही नवविवाहित दाम्पत्यांस सहजीवनाच्या अनेक शुभेच्छा!