Welcome to misalpav.com
लेखक: रुमानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नीलकांत राव , लग्न म्हणजे थ्री इन वन आईसक्रीम ( सहकारी सचिव सखी/सखा ) ! तिन्ही रोल मधे दोघेही मन लावून कार्यरत रहा ..... !! बाकी मिपाकरानी आहेर म्हणून एक सर्व्ह्रर द्यावा काय ...ऑं ,,,,,,, ???

वेलकम टु क्लब मित्रा निलकांत. "सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं.... थाटायचा आपला व्हर्च्युअल संसार त्या मिपासोबत"... अशा अनेक टोमण्यांसाठी शुभमंगल साआआआवधाआआन ;) बाय द वे, बॅचलर पार्टीचा काय प्लॅन?? अर्धवटराव

>>>> "सारखं सारखं मेलं ते मिपा, मिपा, मिपा.... मी म्हणते, एव्हढच प्रेम होतं मिपावर तर माझ्याशी लग्नच का केलं.... हाहाहा.... खरंय...! मी जर लग्नाला पोह्चलो तर प्रथम हेच बोलणार आहे की आमच्या मालकाचं पहिलं प्रेम मिपा आहे, बाकी, आपला अनुक्रम मालक तुम्हाला सांगतीलच....! ;) ( आता होतं भविष्यात माझं मिपावरील खातं ब्लॉक) -दिलीप बिरुटे

नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!! छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा…! !!!!!!

अतिशय आनंदाची बातमी. नीलकांत आणि चोत दोन यांना (गणपाभाउंनी म्हणल्याप्रमाणे -शेपरेटली) हार्दिक शुभेच्छा!!! नांदा सौख्य भरो तुमच्या चौघांच्या जीवनात.

नीलकांत आणि डानराव, अभिनंदन. नांदा सौख्य भरे! अवांतर - शिर्षक वाचून गंमत वाटली. लग्नाच्या शुभेच्छा (बेस्ट ऑफ लक) म्हणण्यापेक्षा अभिनंदन (कॉग्रेज्युलेशन्स) करणे सयुक्तिक नाही का. 'लग्न म्हणजे परिक्षा' असं म्हणायचं असेल तर मग शुभेच्छा (बेस्ट ऑफ लक) बरोब्बर! ;)

हार्दीक शुबेच्चा बर्र का डान्राव. नांदा सौख्यभरे. तसंही आजकाल डान्राव मिपावर जास्त दिसत न्हाइत... आता तर आषाढी-कार्तीकेलाच उगवतील. अर्धवटराव

यावत्‌ वीचितरंगात्‌ वहति सुरनदी जान्हवी पुण्यतोया । यावत्‌ आकाशमार्गे तपति दिनकरौ भास्करो लोकपालः ॥ यावत्‌ वज्रेंद्रनीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुश्रुंगे । तावत्‌ शंभोप्रसादात्‌ स्वजनपरिवृतौ जीविताम दंपति वै ॥ जोवर पुण्योदका सुरनदी गंगा, समुद्रलहरींप्रत प्रवाहित आहे, जोवर आकाशातून गतीमान असणारा दिवाकर, सूर्य तळपत आहे, जोवर इंद्रवज्रासमान असणारी नील स्फटिकाची शिळा, मेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान आहे, तोवर शंभूकृपेने स्वजनांसहवर्तमान दंपती संसार करो. आहे जोवर वाहती, सुरनदी, पुण्योदका जान्हवी । आहे जोवर चालता, तपत तो, चंडांशु तेजोनिधी ॥ आहे जोवर मेरुच्या शिखरिही, नीळी शिळा वज्रशी । राहो तोवर दंपती, स्वजनही, शंभूकृपेने सुखी ॥

नीलकांत आणि छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा… a g डावीकडील चित्रः कृष्ण-सत्यभामा विवाह (बीकानेर १५९०)

नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!!!!! छोटा डॉन यांचे अभिनंदन आणि त्यानांही भावी दांपत्य जीवनास मन:पूर्वक शुभेच्छा !!!!!!

मिपाचे मालक निलकांत हे ज्या परिपक्वतेने संकेतस्थळ चालवितात त्यावरून निलकांत हे वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ असावे, असा माझा समज होता. :) असो, नीलकांत आणि प्रियांका हार्दिक अभिनंदन आणि वैवाहिक जीवनाला शुभेच्छा !!

ऑपरेशन विजयच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन...अभिनंदन..अभिनंदन!!! :) साला एकाच आठवड्यात दोन दोन दोस्तांची लग्नं आणि नेमकं आम्ही तिच्यायला इतकं लांब! :( अरे...जाणार्‍यांपैकी कोणीतरी लाईव्ह फीड द्या रे इकडं. आणि वरातीत कांतालापण नाचवा बे. :) अवांतर-बरेच दिवस पश्या ऑनलाईन दिसला नाही, नीलकांतच्या लगिनघाईत मिपाचे CTO 'नारायण' झालेले दिसताहेत. ;)