Welcome to misalpav.com
लेखक: राजेश घासकडवी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नावात काय नाही ! अशी एक म्हण आहे मराठीत.

ठार! क्रमशः राहिलंय काय? असो, तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल?? =))

तरी पुढचे लेख न लिहिण्यासाठी काय घ्याल??
असं लिहून तूच इथे लेखकांना निरुत्साही करण्याचा प्रयत्न करते आहेस. माझ्या बाजूनं तर सतत संकेतस्थळाच्या मूल्यवर्धनाचाच प्रयत्न असतो. मात्र संपादकांनीच असा तेजोभंग आरंभण्याला काय म्हणावं? इतक्या झटक्यात तू वर जे काही लिहलं आहेस ते तुझ्याविषयी कुणी लिहीलं असतं तर तुझी काय परिस्थिती झाली असती याचा विचार कर. सूज्ञ व्यक्तीकडे कृतज्ञता आणि दिलदारी दोन्ही असते. ती 'पुढचे लेख लिहू नका' असं कसं म्हणू शकते?

माफ करा पण इतरांच्या बुध्दीची कुवत काढणे किंवा इतर लोक किती वैचारिक उंची गाठू शकतात यावर लेखात भाष्य करून कितपत मूल्यवर्धन होते? तुमच्या लेखातील कन्टेन्टपेक्षा इतर गोष्टींवर चर्चा का होते? याचे कारण (माझ्या मते) इतरांच्या बुध्दीची कुवत काढण्याचा प्रकार आणि असे वारंवार झाले तर ते कोणाला आवडेल? आणि बाय द वे, मी या संकेतस्थळावर एका निकनेमने लिहिते आणि कोणी कोणत्या नावाने लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न झाला. तुम्हाला माझे नाव माहित आहे पण ते नाव मी इथे वापरत नसताना तुम्ही परस्पर ते इथे कसे वापरू शकता? आँ. आणि संपादक झाले म्हणून काय झाले, आम्हाला काय आवडीनिवडी, भावना असू नयेत काय! -हिलरी क्लिंटन

तुझं खरं नाव काय आहे मला माहित नाही. किंबहुना तूही खरी आहेस की नाही हे मला माहीत नाही. हे मी स्वीकारू शकतो. कारण माझं मन मला काय सांगतं याकडे मी लक्ष देत नाही. पण सहीमध्येच तू ज्योति कामत असं लिहिलेलं आहेस. कदाचित ते तुझं नाव नसेलही. कदाचित 'योगी पावन मनाचा' हेही नाव असू शकेल. या सगळ्या गोष्टी मी सूज्ञ असल्याने मला समजतात. तुला समजत नाहीत म्हणून अनुकंपा वाटते. पण सर्वांनीच सतत माझी वैयक्तिक पातळीवर उतरून चेष्टा करावी हे बरोबर नाही. हे स्पष्ट सांगणं याला जर तुझ्या बुद्धीची कुवत काढणं असं वाटत असेल तर समज बापडी. त्यावरून तुझ्या मानसिकतेची समज येते.

माझी मानसिकता काढल्याने तुमचा प्वॉइंटाचा मुद्दा कसा काय सिद्ध होतो ब्वॉ? सगळी माया आहे हे समजायला सूक्ष्मात जायची गरज नाही. असं तुम्हाला कधीपासून होतंय हो?

तुमची मानसिकता काढल्याने प्वॉइंटाचा मुद्दा सिद्ध बिलकुल होत नाही. मला या साधनेचे मिळणारे प्वॉइंट्स वाढतात. हे लेखात इतक्या स्पष्टपणे लिहिलेलं आहे. लेख पुन्हा एकदा शांतपणे वाचून काढावा ही विनंती. माया या शब्दाच्या अर्थाच्या पातळ्याही तुमच्या लक्षात आलेल्या नाहीत. माया म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेली - तो फारच ढोबळ अर्थ आहे. माया म्हणजे प्रेमसुद्धा. माया म्हणजे जाडी वाढल्यावरही कपडा मोठा करता यावा यासाठी ठेवलेली जागासुद्धा. आणि माया म्हणजे गोळा करण्याची मायाही. मी इथे प्रतिसादांची माया गोळा करतो आहे हेही तुमच्या लक्षात आलेलं नाही. एकंदरीत तुमचं नाव काहीही असलं तरी 'सूज्ञा' निश्चित नसावं असं वाटत रहातं आहे.

तुमचंच बरोबर! लेख शांतपणेच काय प्रिंट औट काढून वाचेन आणि अर्थ कळलाच तर परत येईन. आता माझी सूक्ष्मात जायची वेळ झाली. तुमचं चालू द्या!

अशा तिरक्या प्रतिसादांत जेव्हा समोरची व्यक्ती दगडावर डोकं आपटत बसल्याचं फीलिंग घेऊन शेवटी कंटाळून, वैतागून निघून जाते तेव्हा मला बोनस पॉइंट्स मिळतात...

बोनस पॉइंट्स हे निराकारच असतात. तुमच्याकडे काही क्रेडिट कार्ड वगैरे नाही का? त्या कंपन्या ज्या बोनस पॉइंट्स वगैरे देतात त्यांविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही? आपलं इतकं अज्ञान इतक्या प्रच्छन्नपणे उघड करण्याची लोकांना हौस असावी. स्ट्रीकिंग करणं वगैरेची काही लोकांना विकृत हौस असते त्यातलाच हा प्रकार असावा. असो. तुमच्या अज्ञानावर पांघरूण घालून लज्जारक्षण करण्याचाच माझा प्रयत्न आहे. तर या निराकार बोनस पॉइंट्सचा वापर मला पुढच्या सिद्धी मिळवण्यासाठी करता येतो. जसे की इथल्या सर्व सदस्यांची व्यक्तिगत माहिती उघड करण्याची शक्ती. ती थोड्या प्रमाणात मिळालेली आहेच, पण पुरेसे पॉइंट्स झाले की ही शक्ती अजूनही वाढेल. मग मला सगळ्यांचे क्रेडिट कार्ड नंबर्स, बॅंक अकाउंट नंबर्स, पासवर्ड्स, व्यक्तिगत पत्रं सगळं काही दिसेल. अमेरिकन सिक्युरिटीवाल्या लोकांना या सिद्धीमुळेच तर हे सगळं करता येतं.

अर्रे..??? साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!! नेहेमीप्रमाणे अंमळ गल्लत होते आहे की तुमच्या कंपूत (त्या मैदानावर पळणार्‍यांच्या) ओढण्याचा प्रयत्न..? असो.. सिद्धी प्राप्त झाली की कळवा. त्यावेळचे त्यावेळी पाहू ;-)

साध्या प्रश्नावरून पार स्ट्रीकींग पर्यंत पोहोचलात की!!
लादेन ध्यानपद्धती अशीच असते मोदका, लादेन ध्यानपद्धती अशीच असते. (श्रेयअव्हेर वि.वा.शिरवाडकर)

शेवटचा प्रतिसाद आपलाच ठेवण्याची धडपड आवडली. पण मी ती चालू देणार नाही. कारण शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात.

रविवार दुपार फुकट घालवण्याची गरज नाही. मी कधीतरी साताठ दिवसांनी येईन आणि हळूच इथे शेवटचा प्रतिसाद देऊन जाईन.

हे बघ्ण्याची सिद्धी एका सोफ्ट्वेर (Software),मध्ये आधीच आहे,आपण सिद्धी प्राप्त करे पर्यन्त त्यानी सुद्धा पुढील पातळी गाठ्ली असेल्,असो सिद्धी प्राप्त कर्ण्यासाठी शुभेच्छा.

हेच काम बीपीओ कंपन्यातल्या कर्मचार्‍यांना व्हितॅमीन एम् चा प्रसाद चढवून काही साधकांनी अगोदरच केल्याच्या बातम्या वाचल्या आहेत ;)

फ्रंट व्ह्यू मध्ये दात डाव्या बाजूला कसे दिसतील ओ?? ही घ्या हो एक स्माईली. यात पोट धरून हसत नाहीये पण तुमचं काम होऊन जाईल याने. :) as

"शेवटचा प्रतिसाद आपलाच असण्याचे स्पेशल पॉइंट्स असतात." असं तुम्हीच ना म्हणाला होतात. विजुभाऊ मिसळपाववरचे सन्माननीय आणि अनुभवी सदस्य आहेत. अशा (लवेचेप्रच्या) युक्त्या तुमच्या आधीपासून त्यांना माहित आहेत.

अरे अरे घासू, मी कित्ती कित्ती हसू..! ? हसून हसून हुभा र्‍हाऊ,की मांडी घालुन बसू..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/belly-laugh.gif =================================== @मला काही साधक असे माहित आहेत की ज्यांची त्वचा बावीस सेंटिमीटर जाड आहे.>>> =)) @लादेन ध्यानपद्धतीत या आंतर्गत प्रक्रियेचं बाह्य प्रक्रियेत रूपांतर करण्यावर भर असतो.>>> =)) प्रत्येक वाक्या वाक्यावर हसतो आहे..! http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे. तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही. सतत निष्कारण उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता एकदा उलगडून दाखवतो म्हणजे पुन्हा असं करण्यापूर्वी जरा विचार केला जाईल. निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.

"निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते. " याचा व्यत्यास असा होईल काय ? "उच्च स्तरावर काम करतो असे वाटणार्‍या बुद्धीला कमालीचा अहंगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक खोली गाठता येत नाही. मग गंभीरपणाचा आव आणून ती स्वतःचा समर्थन करू पाहते."

पण मी सोडून इतर सर्वांच्या बाबतीत.
प्रतिसाद आवडल्या गेला आहे.. हाण्ण.आत्मविश्वास असावा तर असा.

कुठेतरी वाचले आहे कि 'अहन्कार जळोनी जावा' पण ईथे 'मी' पणा काही सुटत नाही,असो या आमच्या प्रतिसादाने आपले बोनस (बोगस) गुण वाढोत.

@मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे. तर तुम्हाला स्मायली टाकण्यापलिकडे काही सुचत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif @निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो>>> =)) हे राम... http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/setting-himself-on-fire.gif आत्मा दहन..आपलं ते हे..आत्मदहन करीत आहे मी या वाक्यावर! =)) @कारण तिला कुठलीही वैचारिक उंची http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.>>> http://www.sherv.net/cm/emo/simpsons/mr-burns-evil-laugh-smiley-emoticon.gif

हे कस काय बुवा,कारण आम्ही गीतेतील 'नैनन छिन्दन्ति' असे काहिसे ऐकले आहे.तेव्हा या अज्ञानाचे निराकरण करावे.

हे पहा राजेश की काय कोण असाल ते...., तुम्ही हा धागा लिहिताना तुमचा फार नि पार गोंधळ उडलाय याला आमच्या आमच्या अध्यात्माच्या भाषेत ( तुम्हाला ती भाषा कळणे नाही ) संभ्रमावस्था म्हणतात. अर्थात ज्याला बुद्धी त्यालाच संभ्रम पडणार हेही आम्ही जाणतो.आता तुमच्यावरआम्ही ही सरळ सरळ का टीका करतो आहोत हे सांगतो. धाग्यात तुम्ही म्हणताय शिक्षण मौजमजा . ओके? मग मी गंभीरपणे तुम्हाला एक नवीन तंत्र शिकवू पहातो आहे हे वाक्य कशासाठी ? ऑं ? तुम्ही एकतर मौज ठेवा किंवा गंभीरपणा.. एक पे रहना .. ग्वोडा चतुर ग्वोडा चतुर ये कया लगाया हे या ग्वोडा बोलो या चतुर...... अरे बापरे पण मी इथे मौज मजा करायला आलो होतो मलाही संभ्रमाची बाधा झाली की काय ?? ..