Welcome to misalpav.com
लेखक: राजेश घासकडवी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सध्याचा मिपावर चाललेला तथाकथित अध्यात्मिक गोंधळ पाहता आणि मार्कस भौंनी केलेल्या खास सुडंबनानं, घासुगुर्जींनी केलेल्या ह्या स्वतंत्र वृत्तीच्या डुंबनाची प्रकर्षानं आठवण जाहली. सात वर्षांपुर्वीची परिस्थिती अजूनही जवळ-जवळ तशीच कायम आहे हे पाहून खरंच विस्मय जाहला..! धमाल आहे अगदी!! हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ म्हणतात त्याचा पुनःप्रत्यय आला!! म्हटले, हा आनंद आपण एकट्यानंच घेण्याचे पातक का करावे?? म्हणून हा खननोद्योग! =))

तब्बल १० वर्षांनी ह्या लेखनाची आठवण आली . जुन्या आठवणी जाग्या झ्याल्या अन हसु आले =)))) परिस्थीतीत आजही जैसे थे च आहे ! =)))) जय गुर्देव __/\__

हॅज कन्सिस्टन्सी ! परफेक्शन को इम्प्रुव करना मुश्कील होता है - दिल चाहता है ! आजही मीपा संक्षीना मिस करते आहे म्हणजे बघा !

त्वचा जाड, तेलकट, आणि मेंदूभोवती कवच निर्माण तर होईलच. कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.
ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय? :) बाकी लेख फक्कडच. स्पांडोबांच्या, आपलं प्रसन्नच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत ;) (प्रास प्रास!)

व्हेअर इज द स्पा ऑफ द अस? :( टीम लीडर बेपत्ता असल्यानी कुठला स्टँड घ्यायचा ते कळत नाहीये. त्यामुळे कालपासून फक्त हसत लोळतेय.. ;)

ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय?
=)) =)) =)) बा नंदना...तुजपुढे अगदी हातच टेकले आहेत रे!

कदाचित साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील.
हे म्हणजे धोनीष्टाईल झालं.. लास्ट बॉलवर सिक्स आणि वर्ल्ड्कप खिशात.. ;-)
ब्रेनचाईल्ड या शब्दाची व्युत्पत्ती हीच असावी काय?
=)) =))

अभिनंदन ध्यानाचे एकशे आठ प्रकार आजवर ठाऊक होते, त्या सर्वांहून वरचढ ही लादेन ध्यानपद्धती निर्माण करून आपण एक अद्वितीय आणि अभिनंदनीय कृत्य केलेले आहे, आणि समस्त मानवजातीवर अगणित उपकार करून ठेवलेले आहेत. कृपया "साइड इफेक्ट म्हणून लाघवी मुलंही होतील" हे कसे घडते, या ध्यान पद्धतीतून साधकाची एकंदरित वाटचाल 'समाधीतून संभोगाकडे' अशी होते का, 'स्ट्रीकिंग करणे' या ध्यान-प्रकाराशी याचा काही संबंध आहे का, वगैरे खुलासा करावा. याशिवाय 'बेशर्त स्वीकृती' असल्याशिवाय सुद्धा हे ध्यान करता येते का, हेही लिहावे. अभ्यास वाढवावा, म्हणून हे प्रश्न विचारले आहेत, वाचकांनी सुद्धा नीट वाचून समजवून घ्यावे, म्हणजे जीवन आनंदमय होईल.

"पूजा" कार घासू गुर्जींकडून इतक्या उथळ आणि हलक्या लेखाची अपेक्षा नव्हती असले ध्यान प्रकार शिकवून तुम्ही समाजाला अंध:श्रद्धेच्या दरीत लोटताय असे वाटत नाहीये का तुम्हाला?

असले ध्यान प्रकार शिकवून तुम्ही समाजाला अंध:श्रद्धेच्या दरीत लोटताय असे वाटत नाहीये का तुम्हाला?
मी अंधश्रद्धेच्या दरीत लोटतोय? अहो मी माझे आणि इतर साधकांचे अनुभव सांगितले. ते सत्यच आहेत. या साधनेने मोक्षाच्या वाटेवर अनेक सिद्धी मिळतात. मला सांगा, तुमची त्वचा आहे का बावीस सेंटीमीटर जाड? नाही ना? मग ही पद्धती वापरून बघायला काय हरकत आहे?

लोकांच्या अध्यात्माबद्दल काय काय कल्पना असतात! राजेश, तुम्ही स्वतःच अतिशय संभ्रमित आहात. त्यात अजून इतरांना काय सांगताय?
कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो
जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे
वरील दोन वाक्यांतच तुमचा संभ्रम उघड झालेला आहे.
सर्व मानवजातीची निर्मिती सुपीक चंद्रकोरीच्या भागात झाली.
हे म्हणजे तर संभ्रमित अवस्थेची पुढची पायरी दाखवण्याचा प्रकार आहे. लेखाचा आणि या वाक्याचा काहिएक संबंध नाहीये.
मी तुम्हाला केवळ एक नवीन तंत्र शिकवतो आहे
मी या ध्यानपद्धतीविषयी सांगतो
हा आधुनिक काळात निर्माण झालेला ध्यानप्रकार आहे.
कधी तंत्र, कधी पद्धती, कधी प्रकार.. इतके संभ्रमित मन असतांना तुमच्या ज्ञानाची काय पातळी आहे ते समजलेच आहे.
अध्यात्म समजलंच नाही असं मी म्हणेन.
इथे तर स्वतःच मान्य केलेलं आहे की तुम्हाला काहीही समजलेलं नाही. विषय संपला! केवळ काहीतरी असंबद्ध खरडायचे आणि आपल्या तोकड्या ज्ञानाचे जगजाहीर प्रदर्शन करायचे याशिवाय या लेखाचे काहीही प्रयोजन नाही असे मी म्हणेन. असा प्रतिसाद देण्याची माझी इच्छा नव्हती. पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. --- केवळ मीच सत्य लिहितो.

पण स्वतःला कळत नसलेल्या विषयात कुणी उगाच काही बोलू लागला तर त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.
म्हंजे तुम्ही लिवलंय त्या विषयात तुमाला बी काय कळत नाय असं म्हंताय का?

आनंदी गोपाळ, या लेखावर माझ्या बाजूने प्रतिसाद देणारे तुम्ही पहिलेच! यावरून एकट्या तुम्हालाच प्रगल्भता नाही तरी किमान अक्कल आहे हे दिसून येतं. मला एक समजत नाही. मी या लेखात केवळ एक तंत्र सांगितलेलं आहे. असं असूनही माझ्यावर सगळ्यांनी असे हल्ले करण्याचं कारण काय? या लेखात काही भडकाऊ नाही, कुणाविरुद्ध बदनामीकारक शब्द नाही. मिसळपावच्या आधिकारिक धोरणात तर बसतोच आहे, नाहीतर संपादकांनी उडवला असता. मग सर्व सदस्यांनी असं माझ्यावर तुटून का पडावं? म्हणजे सगळेच सदस्य अज्ञानी तर आहेतच, पण त्यांना किमान सुसंस्कृतपणाही नाही असं समजावं का?

सर्व सदस्यांनी असं माझ्यावर तुटून का पडावं?...... .....त्यांना किमान सुसंस्कृतपणाही नाही असं समजावं का?
अरेरे! थोडक्यात लेखाच्या मुळ स्वभावाला सोडून दूर गेलात. प्रश्न नाही. विधानं करा. 'सर्व सदस्य विनाकारण माझ्यावर तुटून पडत आहेत.' आणि 'त्याच्यापाशी किमान सुसंस्कृतपणाही नाही.' मी तुमच्या प्रतिसादावर लिहीलं आहे. हा तुमच्यावर वैयक्तिक हल्ला वगैरे नाही.

हे एक. त्यावर तशाच मनोवृत्तीत जाऊन प्रतिसाद देणे हे म्हणजे खालील बिरबलाच्या गोष्टिसारखे आहे. तुमचे अभिनंदन! * एकदा एक बहुरूपी बादशहासमोर म्हणे बैलाचे सोंग करीत असतो. बघ्यांत उभा असलेला एक लहान मुलगा त्या बैलाला खडा मारतो. अन मग नंतर खुश होऊन स्वतःची मळलेली टोपी बैलाला उर्फ बहुरूप्याला बक्षीस देतो. हे पहाणारा बादशाह त्या मुलाला बोलावून घेतो अन विचारतो, की हे नक्की काय केलेस? मुलगा सांगतो, खाविंद, जनावराला खडा मारला, तर ते तिथली चामडि हलविते. ते या बहुरूप्याने केले. त्याचे सोंग वठले, म्हणून मी टोपी बक्षीस दिली! तर 'म्हणे', तो बादशहा होता अकबर, व हा मुलगा बिरबल. घासकडवींनी नुसता खडूस लेख लिहिलेला नाही, तर त्यावर त्यांच्या प्रकृतीच्या विसंगत असे भांडकुदळ व आक्रस्ताळे प्रतिसाद देखिल देत आहेत. हे मला एकट्याला नव्हे, अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना जाणवले आहेच. मी मारलेल्या खड्याला योग्य प्रतिसाद आला, याचाच अर्थ, बहुरूप्याचे सोंग चांगले वठते आहे.. * गुर्जी, जौ द्या ना. की फर्क पैन्दा?

छे बुवा. सगळीकडे या भुंग्यांच्या रुणझुणाटाने उच्छाद मांडलाय नुसता.

मागच्या वेळी आपण पूजेची पथ्ये सांगितली होती. त्याचा अनेकांना फायदा झाला होता. तशी काही या लादेन ध्यानाची पथ्ये असतात का?

पुढला भाग आला की कळेलसं वाटतंय. आत्ता तरी लेख कर्टली अँब्रोजचा उसळलेला चेंडू सचिन न वाकतासुद्धा त्याच्या डोक्यावरून जावा तितका बाऊन्सर गेलेला आहे.

हा मी तुमच्यावर "लादेन" तोच सर्वोत्तम ध्यानप्रकार, जरादेखील शंका घेतलीत तर.... याप्रकारचा वाटतो, म्हणून त्याचे नाव "लादेन ध्यानप्रकार" असे पडले असावे.

लै दिवसांपास्नं विचारावं म्हणतोय, हे "शिरां पडो" मधलं शिरां म्हंजे हो काय नक्की?? मला तर शिरा पडो तुझ्या तोंडी असंच वाटायचं, अजूनही वाटतं. तरी यावर शिरा आपलं प्रकाश पाडावा ही विनंती.

म्हणतोय, हे "शिरां पडो" मधलं शिरां म्हंजे हो काय नक्की?? मला तर शिरा पडो तुझ्या तोंडी असंच वाटायचं, अजूनही वाटतं. तरी यावर शिरा आपलं प्रकाश पाडावा
ती मालवणी सभ्य शिवी आहे रे. "शिरा पडो तोंडात" या वाक्यात शिरा या ऐवजी शीळा हा शब्द वापरा म्हणजे अर्थ उमजेल. फक्त र च्या जागी ळ. चोप्य पेस्ते करायचे.

लेखन समजले नाही, आताच १७६० प्रिन्ट काढल्या समजून घेतो, नाहीच समजले तर, परत परत वाचतो.. तरी *ट कळणार नाही हे माहीत असून देखील परत वाचतो व मग टंकतो.. धन्यवाद!

संग्राह्य लेख. तुमचा या ध्यानप्रकारावरचे प्रभुत्व लक्षात घेता आम्ही काही सुचविणॅ म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. पण तरी निव्वळ नजरचुकीने एक महत्वाचे लक्षण मांडायचे राहून गेले आहे. ते येणेप्रमाणे... प्रत्येक वेळी कोणीतरी एक महान व्यक्ती निवडून त्यांच्या अध्यात्म मार्गातल्या, त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यातल्या चुका काढायच्या (आपण कोण आहोत, आपली लायकी काय, आपल्या अकलेचं कोरडं पडलेलं डबकं इत्यादी किरकोळ गोष्टी विचारात न घेता). व्यक्ती निवडताना ती सर्वांना वंद्य असेल आणि तिच्याबद्दल कसलेही वाद नाहीत ही काळजी घ्यावी. जितके निर्विवाद महान व्यक्तीमत्व तितके बोनस पॉईंट जास्त. तर याने फायदा असा होतो की त्या महान व्यक्तीमत्वाचे भक्त पेटून उठतात. प्रतिवाद करायला लागतात. पण आपण अगोदरच मेख मारून ठेवावी की याबद्दल आत्ता चर्चा होणार नाही. मग ते बसतात बॉलिंग करत. आपण फक्त 'हा आजच्या चर्चेचा विषय नव्हे' अशी बॅट घुमवत बसावी. मागे ष्टंपाच नसल्याने आऊट व्हायची भीती नाही. आणि भक्त संप्रदाय मोठा असल्याने आपले पॉईंट मात्र आकाशाला भिडतात.

ध्रुतराष्ट्र उवाच : "हे संजया, माझ्या महापराक्रमी मुलांना घाबरुन तो स्वता:ला भगवान म्हणवून घेणरा क्षीरसागराच्या तळाशी जाऊन तर बसला नाही ना ?

हो, अर्थातच मोक्ष मिळतो. मोक्षाची हाव सोडली तरच तो प्राप्त होतो हे कोणा मतिमंदालाही समजेल. खरा साधक मोक्षाच्या मृगजळामागे कधीच धावत नाही. त्याची आस धरत नाही. त्यामुळे ही साधना हेच साध्य. तुम्हाला ही साधना करण्याची तीव्र इच्छा नसेल तर केवळ 'मोक्ष मिळेल, मोक्ष मिळेल' असं घोकत साधनेच्या पाट्या टाकून काहीएक फायदा होणार नाही. मी जी ही साधना करायला सांगतो आहे याचं कारण या साधनेवरच प्रेम बसावं यासाठी. ज्या सिद्धी या साधनेतून प्राप्त होतात त्या मिळाल्या तर इहलोकातलं आयुष्यही आनंददायी होतं. या साधनेची गंमत म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या सिद्धींमुळे साधना अधिक सोपी होते. म्हणजे अमुक एक अंतर गेल्यावर तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी अधिक वेगवान गाडी मिळेल असं दर पायरीला होतं. प्रयत्न करून पहा.