पाककृती
चट्पटीत शंकरपाळे (दिवाळी स्पेशल)
Primary tabs
साहित्यः अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट, ओवा, हळद, मैदा, तळण्यासाठी तेल.
कॄती: प्रथम अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट (चवीनुसार), थोडीशी हळद हे सर्व एकत्र करून उकळावे. आणि गार करण्यास ठेवावे. ओवा थोडा बारीक करून घ्यावा. आणि तयार पाण्यात मिसळावा. पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात मावेल एवढा मैदा मिसळावा. गोळी करून त्याची पोळी लाटावी. शंकरपाळे कापावेत. तेलात तळून घ्यावेत. मस्त कुरकुरीत होतात.
मस्तच.
तिखट शंकरपाळे बरोबर टोमेटो सॉस आणि अधुनमधुन थंड सरबताचे घुटके मज्जा येते एकदम.
दिवाळीला थोडा वेळ आहे अजुन तोपर्यंत अजुन फराळ, मिठाई वगैरे पाकक्रुती येऊ द्यात.
अपमान....
"अहो बियर बरोबर खाण्यासाठीच ह्याचा जन्म झाला आहे" असे माझे ठाम मत आहे.
मस्तू!!
मस्त !
(कडबोळी प्रेमी) :)
छान...!
मस्तच ग तायडे.
करून बघणार आणि फोटो पण टाकणार.
पण खर खर सांगु का मला शंकरपाळे थोडे सादळलेलेच आवडतात. कुरकुरीत पदार्थ घश्याला टोचतात.
छान !!!!!!!
पण हे शंकरपाळे सगळा मैदा न घालता, थोडी कणीक आणि रवा घालून केले तर कसे होतील?
मस्तच्च!
"सीतेला रावणाने पळवली आणि रावणाचा वध करुन रामाने सीतेला परत आणली" येवढ्यातच रामायण संपवावं अशी वाटली रेशिपी.
एक लाईकचं बटण दे रे नीलकांत!
=)) =))
ही...ही....
मला शंकरपाळीचा आणि शंकराचा काय संबंध असे वाटत होते आणि खरच काही संबंध नाही. शंकरपाळी शब्द हिंदीतल्या शक्करपारे शब्दाचा अपभ्रंश आहे.
रेशिप्या, तरच भरपूर प्रकार करता येतात! @पैसाताई, मी केली नाहीय, पण करून पहायला हरकत नाही.
करा नक्की सर्वानी!! @ त्रिवेणि, हे घशाला टोचण्यासारखे कडकडीत नाही होत, मस्त खुसखुशीत होतात.
प्रथम अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट (चवीनुसार), थोडीशी हळद हे सर्व एकत्र करून उकळावे.
>>
तेल आणि पाणी एकत्र उकळावे? तेल अंगावर उडणार नाही का?
नाही उडत. कारण आपण तेल गरम केलेले नाही. ते नुसत पाण्याबरोबर बाकिचे सारे मसाले घालुन उकळायच. चांगल खळखळ उकळा. मग तसच झाकुन ठेवा अन चांगले दोन तास थंड होउ द्या. मग मावेल तेव्हढा मैदा.
मस्त होतात राव.
तर नाही अंगायर उडत, पण तेलात थोडेच पाणी किंवा पाण्याचा थेंब पडला तर अंगावर उड्ते. गोड शंकरपाळे करतानाही असेच साखर, पाणी, तेल्/तूप एकत्र करून उकळी आणली जाते.
छा बरोबर खायला लै भारी लागतील . :)
खायला अप्रतिम लागतात..पण चिल्ड बियर बरोबरच...
कुणा शंकर आवडे देउळा रावळिही
केणी त्याला पाहती रानातही पानातही!
बरोबर बुवा
चला दिवाळि आली म्हणायची!
नमकपारे व शक्करपारे
या दोन मुळातील हिन्दी शब्दांच्या मराठीकरणात गिल्ल्लत मराठी भाषेत फार वर्षापूर्वी झालेली आहे . आपण अनन्या यांनि दिलेल्या पाक कृतीचे नाव शंकरपाळे म्हणजे साखरपाळे असे ठेवले आहे. आता साखरपारे केले तर त्याच्यातील घटक, नावा प्रमाणे असावे असे वाटते. परंतु असा पदार्थ महाराष्ट्रात फारसा बनत असल्याचे ऐकीवात नाही.
अशीच गिल्ल्लत गुजरात मध्ये लोंजिंग आणि बोर्डिंग या शब्दांची केली जात असे.' लोज चालू छे' असे पाटीवर लिहिले कि त्याचा अर्थ जेवण तयार आहे असा असे, आणि 'बोर्डिंग नि सगवड' असे लिहिले म्हणजे खोल्या भाड्याने मिळतील असा करून घेतला जाई.
सोडा राव! चविला छान लागले ना बास्स! नावाने काय फरक पडतो?
बोलीभाषेत फक्त गोडाचे किंवा तिखटाचे हा शब्द शंकरपाळ्यांच्या (म्हणजे त्या शब्दाच्या ) मागे लावला जातो, आमच्या भागात! तो न लिहिता मी चटपटीत लिहिलय कारण या शब्दाने डोळ्यासमोर तिखट पदार्थ येतो.
अनेकाना हे शंकरपाळे पाहून बियर आणि काय काय आठवले!!