Welcome to misalpav.com
लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कारण ते त्या शास्त्राच्या मर्यादेत कदाचित घडत नसतील पण त्या शास्त्राच्या मर्यादेबाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून कसे कळणार? किंवा ठरवणार? त्यासाठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे. कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्रे आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिकशास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे.
ओक साहेब, १. भौतिक शास्त्राच्या मर्यादा म्हणजे काय हे मला कळलेले नाही. भौतिक शास्त्र हे पदार्थ आणि उर्जेचे विज्ञान आहे. कुठल्याही गोष्टीला या दोन गोष्टींच्या मर्यादेतच असणे भाग आहे. किंबहुना पदार्थ हेच उर्जे चे एक रूप आहे. शास्त्राच्या ज्या काही कसोट्या आहेत, त्यावर कुठलेही शास्त्र उतरणे आवश्यक असते. भौतिक शास्त्र हे मूळ शास्त्र (fundamental science) असल्या मुळे त्याला कोणतीही गोष्ट वर्जित नाही. एखादी लहर (wave) सापडली नसेल तर ती आस्तित्वात नाहीच असे भौतिक शास्त्र म्हणणार नाही. पण त्याचे आस्तित्व सापडे पर्यंत ती मान्य सुद्धा करणार नाही. करू शकत नाही. हिग्ज बोसॉन सारखा मूलकण गणिताने फार पूर्वीच शोधला होता. पण जो पर्यंत तो सिध्द होत नाही तो पर्यंत विज्ञान तो शोधत रहाणार आणि त्याचे आस्तित्व तात्विक पातळीवरच मान्य केले जाईल. शास्त्रज्ञांना "विहिरीतील बेडूक" म्हणणे म्हणजे त्यांचा विनाकारण अपमान आहे. २. तुमच्या लेखनात मला सुसंगती आढळत नाही. उदाहरणार्थ,
बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
तुम्हाला काय म्हणायचं आहे? क्वांटम सिद्धांत या गोष्टी अधोरेखीत करतो? हे हास्यास्पद आहे. क्वांटम सिद्धांताचे मूळ आहे की "कुठलीही गोष्ट पुंज पातळीला (quantum level) unpredictable असते". कर्मफल, विधिलिखित इत्यादी बाबतीत तो कसा वापरता येईल? असो. मला बरच लिहायचं होतं पण मराठी लिहायचा कंटाळा म्हणून सध्या एवढंच.

त्यांच्या ग्रंथातील काही भागांवर आपणास वेगळे विचार मांडलायचे असतील तर जरूर मांडा. शिवाय दुसऱ्या याची विषयावरच्या धाग्याखालील सरांची मांडणी वाचा. पूर्ण ग्रंथ वाचा. ही विनंती.

म्हणतात ना 'नळी फुन्कली सोनारे इकडून तिकदे गेले वारे' किव्वा ' जित्याची खोड.......' तसला प्रकार आहे हा. त्याच्या घडा नेह्मीच पालथा. उलथूदे, दुर्लक्श केलेलेच बरे.
विनोद१८

बॅटमन आणि अन्य तमाम तमिळ जाणकार मित्रांनो, सोबतच्या फोटोमधे व्यक्तिचे नाव कोरलेले आहे. काही महत्वपूर्ण मजकूर हायलाईट करताना काळपट झाला आहे. कृपया आपण किंवा आपल्या तमिळ भाषेच्या जाणकार व्यक्ति कडून ताडपत्रावरील लेखनावर अभ्यास करून नाव अन्य मजकूर वाचून सादर करावा ही विनंती. आपण तत्परतेने सादर केलेल्या पुराव्यांना तपासण्यासाठी ज्याची ती पट्टी आहे याची साक्षी मिळेल याची खात्री बाळगावी. आता ही नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टी खरी कशावरून? तमिळ लिपीमध्ये काही लिहिलेलेच नाही! कार्डीओग्राम सारख्या दिसणाऱ्या रेषांच्या मुळे लिपी तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून वाटत नाही! वगैरे फाटे फोडून काहीही लिहिलेले सापडले नाही, नाडी भविष्यातील ताडपत्रावरील मजकूर बनवाबनवी 'असावी' हा आमचा दावा आता शास्त्रीय पायावर सिद्ध झाला आहे. सबब या पुढील अभ्यास कार्यात रस उरलेला नाही असे आपण म्हणून अंग काढणार नाही असे जाहीर आश्वासन देऊन मागे फिरू नका. या अभ्यास कार्याला किती दिवसांचा अवधी लागेल ते तमिळ भाषेच्या संबंधित तज्ञांना विचारून सादर करावे. आपल्या तमिळ तज्ज्ञ सहकाऱयाची नावे व अन्य ओळख आपण द्यावी. ही माझ्या दृष्टिकोनातून एकमेकांशी केलेली स्पर्धा, कुश्ती, आव्हान देऊन हारवण्याची चाल नाही. या पुढील अभ्यास कार्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य हवे आहे. ही प्राचीन विद्या - विविध महर्षींचे ज्ञान आपल्या भारतीयांचे आहे हा दंभ नको पण अभिमान वाटायला काय हरकत आहे? नाडी ग्रंथांचा द्वेष वा तिरस्कार करून त्याला हीन ठरवणे योग्य आहे का याचा विचार व्हावा. नाडी ग्रंथ वाचन एक विशेष कला आहे. ते सचोटीने वाचून योग्य त्यांच्याकडे पोहोचवणे ही त्या नाडी ग्रंथ केंद्र चालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती त्यानी पाळून व्यवसाय म्हणून कुटुंबासह मानधन कमाईचे साधन म्हणून वापरावे असे नाडी ग्रंथ महर्षींच्या कथनातून सांगितले जाते. सध्याच्या काळात अतिवरिष्ठांची सचोटी व साधनशुचिता किती खालावलेली आहे याची जाणीव सर्वांना आहे. नाडी केंद्रावर याचा परिणाम झाला तर नवल नाही. पण म्हणून सर्व नाडी केंद्रांची वर्तणूक वाईट असते असे मानणे गैर आहे. प्रश्न ओकांची व्यक्ती गत निंदा नालस्ती करून समाधान मिळवायचे की आपण उराशी मान्य म्हणून ठरवलेल्या विचारधारेशी बेईमानी करायची हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे. आपल्या मिपावरील सहकार्याने एकत्रितरीतिने काम करायची संधी मिळाली याचे समधान आहे... असो. Nanda

___/\___ ही तर खरंच नाडी निघाली. (स्पावड्या, जिलेबीसदृश एकही आकार नाही की रे चित्रात! लेखाबद्दल तू बोलशीलच. ) थोडी धुवून वाळवून इस्त्री करुन वापरावी लागेल पण हरकत नाही. तुमच्यासाठी काय पण! आता थोडं सिरियसः भूतकाळाविषयी माहिती मिळाली. तंतोतंत. ओके. मान्य! पण तो गेलाय. आता बदलणार आहे? नाही. वर्तमानाचं काय सांगणार? तिथे तुम्ही नाडीपट्टीसमोर बसला आहात. काहीतरी तात्कालिक अडचण आहे म्हणून गेलेला आहात. वर्तमान संपला. भविष्याचा वेध घ्यायचा म्हणताय. काय सांगणार आहात? कधी मरणार हे? आजारी पडणार हे? की कधी म्हातारं होणार हे? होणारं चुकवणार आहात का? बरं चुकवून साध्य काय करणार? लांबणीवर टाकणार? त्यानं काय होईल? उद्याच्या विवंचना आज जाणून घेणार की एखादी गोष्ट झाली नाही तर त्याला कारणमीमांसा शोधणार? तात्कालिक अडचणींसाठी असे टेकू शोधू लागलो तर अवघडच की! अत्यंत सुंदर भारतीय तत्त्वज्ञान अशा प्रकारच्या विसंगत दैववादी स्वार्थी नि संधीसाधू इन्टरप्रिटेशनमुळं आधीच बदनाम झालंय. आणखी बदनाम का करतोय आपण ह्याचा विचार व्हायला हवा. होणार नाहीये हे ठाऊक आहे. तरीही लिहीतोय. असो. - इलास्टीकचा बर्म्युडा वापरणारा प्यारे.

पण बाकीचे इतके महान नाहित. गुरुकृपेने आपला पाया पक्का आहे तसा प्रत्येकाचा असेलच असे नाही म्हणुनच या धकाधकीच्या जीवनात कमकुवत व सैरभैर मनाला असे चार शब्दही जादूची कांडी ठरतात हे विसरु नये.

प्यारे यु आर ग्रेट! हायला! कधी ठरलं हे? (उपहास मानवत नाही हो! =)) ) >>> कमकुवत व सैरभैर मनाला असे चार शब्दही जादूची कांडी ठरतात मान्य. पण मग असं कधीपर्यंत सैरभैर नि कमकुवत राहू या? ज्या चिकाटीनं ओकसाहेब हे लिहीत आहेत त्याचा थोडास्सा जरी भाग एखाद्यानं मन कणखर करण्यासाठी केला तर खूप उपयोग होईल असं वैयक्तिक मत आहे. (इथे ओक सरांच्या चिकाटीचं कौतुक वाटतंय एवढंच) बाकी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्याच्या अखत्यारीतला विषय आहे म्हणा! ;)

जोपर्यंत जन्म मृत्यु अस्तित्वात आहेत तोपर्यंत विविध जाती धर्म वयोगट लिंगाच्या व्यक्ति वेग्वेग्ळ्या काल खंडात सैर भैर असत राहणार.... जो महान आहे त्याने स्वत: यातून अंग काढून घेतलेले असावे अन्यथा उपदेशामृत योग्य नाही याची जाण पूर्ववत करावी

इतरांच्या(माननीय ओक काका यांच्या) गुरुंची इच्छा म्हणून करत असलेल्या कार्याला खोडा घालू नये. मुख्य मुद्दा समजुन घ्या वा म्हणजे असे अवांतर होणार नाही.

एखाद्या शांत धीरगंभीर हत्ती सारखे आहेत..... . मी वैयक्तिक स्तरावर आपल्या खोडा घालाय्च्य्या प्रवृत्तीला अनुमोद्नच देइन पण ते करताना मिपास्माजाला उपदेशड़ोस पाजायचा आपला बेगडी अट्टहास तिरस्कारणियच आहे

काय सांगणार आहात? कधी मरणार हे? आजारी पडणार हे? की कधी म्हातारं होणार हे? होणारं चुकवणार आहात का? बरं चुकवून साध्य काय करणार? लांबणीवर टाकणार? त्यानं काय होईल? उद्याच्या विवंचना आज जाणून घेणार की एखादी गोष्ट झाली नाही तर त्याला कारणमीमांसा शोधणार? तात्कालिक अडचणींसाठी असे टेकू शोधू लागलो तर अवघडच की! अत्यंत सुंदर भारतीय तत्त्वज्ञान अशा प्रकारच्या विसंगत दैववादी स्वार्थी नि संधीसाधू इन्टरप्रिटेशनमुळं आधीच बदनाम झालंय. आणखी बदनाम का करतोय आपण ह्याचा विचार व्हायला हवा. होणार नाहीये हे ठाऊक आहे. तरीही लिहीतोय. असो.

वा! तत्परतेने फटू दिल्याबद्दल धन्यवाद. ही नेहमीची तमिऴ किंवा ग्रंथ तमिऴ लिपी तरी नक्कीच नाहीये. असो, ओळखीच्या तमिऴ जाणकारांना विचारून पाहतो. काय ते उत्तर नक्की देईन इतके बाकी खरे.

माझ्या एका तामीळ मित्राला हि पट्टी दाखवली... सोनीया गांधींनी संस्कृतात ब्रह्मसूत्र वाचावे तसं त्याने मिपाचं भविष्य घडाघडा वाचुन दाखवले या पट्टीत.

टाळ्यापिटूंसाठी दहा मिनिटांची मजा. ओक नाडीत फसले तर वावा, नाही फसले तरी वावा... ज्यांनी हा नाडीपट्टीच्या फोटोचा फेर धरला ते तर केंव्हाच पसार झालेत... आता कोणाची प्रतीक्षा करतायत ओक, कोण जाणे....

मित्रांनो, ज्याना भविष्यातील घटनांची चिंता नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. तसाच काहींना नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी जावेसे वाटते. जोवर वेळ येणार नाही तोपर्यंत कोणीही ग्रंथ अवलोकन करायला जात नाही. आता अन्य गोष्टीना घोळवतात मुख्य मुद्द्याला कात्रज केली जाणारी खेळी होईल.

ओक साहेब मला माझे नाडी नाडी ग्रंथ भविष्य बघायचे आहे, पण मला त्याबाबतित काहिहि माहिति नाहि आहे. आपण मला सहकार्य कराल का? पुण्यात मला हया बाबतीत कुठे मदत मीळेल? मि आपल्याला आपल्या मो. क्र - 0९८८१९०१०४९ वर सम्पर्क करु शकतो का?

होबासराव आणि अन्य मित्रांनो, नाडीग्रंथांच्या बाबत प्राथमिक माहितीसाठी कृपया आपण रात्री ९ नंतर संपर्क करावा. ही विनंती.

आपली रात्री बारा नन्तरची बरोबर ना आत्माराम?(असे आपणच एका धाग्यावर उध्रुत केले होते)

त्या लोकगंगेत तरंगणाय्रा गोष्टी कधीकधी आत्मा'मत म्हणून उध्रुत कराव्या लागतात रे... कोल्ह्या! ;) तू तुझा अग्नी जरा शांत ठेव पाहू! :p

ही वरची पट्टी मला कुणी ईसीजी म्हणून आणुन दिली असती तर 'अ‍ॅट्रीयल फिब्रिलेशन विथ ए- वी डिसोसिएशन' असा याचा अर्थं मी काढला असता. 'जातक "वर" जायच्या मार्गावर आहे' असे भविष्यकथन केले असते. ;) लिपी तामिळ वाटत नाही. ।

मित्रा, नाडीग्रंथ ताडपत्राचा एक फोटो सादर केला आहे. पुर्वी आपण म्हणाला होतात, (आपण स्वतः व कै. रिसबूड )
आम्ही फक्त नावांची शहानिशा करू इच्छितो, आणि ती करण्याचा एवढा एकच मार्ग आम्हाला दिसतो. कूटलिपी हेच जर त्या अगस्त्य नाडी-केंद्राच्या चालकांचे ट्रेड-सीक्रेट असेल तर ते तिची गुरुकिल्ली ओकांच्यासुद्धा हाती लागू देणार नाहीत. जर तसे नसेल तरच ओक ती किल्ली मिळवू शकतील. आमच्यासारख्यांना ही गोष्ट अशक्य आहे हे आम्ही कबूल करतो.
आता आपल्याला तेंव्हा अशक्य असलेली गुरूकिल्लीची बाब मिपावरील सदस्याने त्या नाडीग्र्ंथाच्या पट्टीतील मजकूर वाचायला त्याची तयारी असल्याचे मान्य केल्याने साध्य होणार आहेत. तेंव्हा आपण त्यांच्याकडून पट्टीतील मजकूर किंवा आपण म्हटल्याप्रमाणे फक्त नावाची शहानिशा करायला त्यांना प्रेरणा द्यावी ही विनंती. या धाग्यावरील एका वेगळ्या प्रतिसादात मी त्यांना म्हटले आहे - आता आपणाकडून काय प्रगती आहे कळवावे. आपणास मजकुर वाचायला जमला असेलच नाही तर, किंवा अडले तर तमिळजाणकार मित्रांकडून व तमिळभाषेच्या पुस्तकावरून त्यातील तमिळ लेखनाचा अभ्यास करून त्यातील मजकूर आपण मिपावर सादर करणार आहात अशी अपेक्षा करत आहे.

ओळखीच्या तमिऴ जाणकारांना विचारून पाहतो. काय ते उत्तर नक्की देईन इतके बाकी खरे.
आपले उत्तराच्या प्रतीक्षेत...

टाळ्यापिटूंसाठी दहा मिनिटांची मजा. ओक नाडीत फसले तर वावा, नाही फसले तरी वावा... ज्यांनी हा नाडीपट्टीच्या फोटोचा फेर धरला ते तर केंव्हाच पसार झालेत... आता कोणाची प्रतीक्षा करतायत ओक, कोण जाणे....

https://archive.org/details/10309048/page/n219 हा विज्ञान आणि चमत्कार भाग १ ला वाचला. मात्र जालावर भाग २ मिळाला नाही.

नमस्कार शाम भागवत, आपण हा धागा उपसून दाखवल्याबद्दल धन्यवाद. १६ हजार पेक्षा जास्त सदस्यांनी क्लिक केल्याचे पहाण्यात आले. आपल्याकडून लिंक वर सुव्रत सुत यांनी हा ग्रंथ २०१७ मधे लोड केला होता असे दिसते. भाग २ हा त्या पुस्तकात समाविष्ट आहे. हा संपूर्ण ग्रंथ scribed वर सांगलीच्या विश्वास भिडे यांनी लोड केले आहे. पण आजकाल ती साईट पेड झाली आहे. असो. कोल्हापूर च्या अजब पुस्तक यामार्फत ह्या ग्रंथाचे नाव बदलून दोन पुस्तकात रुपांतरीत केले आहे. ती रु ६० प्रत्येकी अशा माफक किंमतीत उपलब्ध आहेत. सवडीनुसार त्यांची नावे आणि मुखपृष्ठे सादर करेन.