Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ते तुमच्याकडे तळणीसाठी तूप आहे का नाही त्यावर अवलंबून आहे.

हे हेच्च ते. असं सुरु होतंय. गैरसमज नुस्ता. आम्ही म्हणतोय काय तुमचं चाल्लंय काय? आम्ही विचारलं कुठं? कच्चा माल तयार होता 'स्टोअर' मध्ये त्याचा वापर 'असा' केला एवढंच म्हणालो.

मोबाईलवर बघताना शीर्षक प्यारेकाकांना परी आवडते का असं दिसलं ना राव. अन खाली त्याचा उत्तरार्ध की परा ? असा असेल की काय असं वाटलं.... (शंकित) भीडस्त

पण गव्हाच्या पीठाची भाकरी कशी करता येईल. (अवांतर-त्यांनी प्रतिसादात पोळी की पुरी असे लिहिले आहे त्यावरून अंदाज बांधला की ती गव्हाची कणीक होती.

गव्हाच्या पिठाच्या भाकर्‍या होणार नाहीत पण तेलात मळल्यामुळे त्याच्या दशम्या निश्चितच करता येतील. रच्याकने: दशम्या करता येत नसतील तर रेशीपी लवकरच देतो.

आमच्या इथे मिळतात अरबी खुब्ज... गव्हाच्या भाकर्‍याच असतात त्या अरबी तंदूरमध्ये भाजलेल्या ! (वेळप्रसंगी लष्करच्या भाकर्‍या बडवाव्या अश्या मताचा) इए

गजानन महाराज सन्स्थान शेगाव येथे दुपारी प्रसादाला दिली जाणारी भाकरी ही सुद्धा गव्हाच्या कणकेची असते असे ऐकुन आहे.

गुणपूर्णता आणि लोकप्रियता यांचे प्रमाण व्यस्त असते ! अपवाद : पु.ल. तस्मात अधिक प्रतिसाद म्हणजे अधिक चांगला लेख असे मुळीच नाही. आणि बर्याच वेळा प्रतिसादच मूळ लेखापेक्षा चांगले अधिक माहीती देणारे अधिक आनंद देणारे असतात. त्यामुळे त्याचा व्यत्यास ही चूकच ! मूर्ती आणि आरास अशी तुलना करता येणार नाही , फार तर मुख्य पदार्थापेक्षा डावे- उ़जवे अधिक भाव खाउन जातात असे म्हणता येईल. आण़खी एक , प्रतिसादांनी लिहिणार्याचा उत्साह वाढतो हे ही खरे त्यामूळे नवोदितांना आश्वासक प्रतिसाद जरुर द्यावेत. ( अगदी लगेच बाजार उठवू नये !) आणि "लेख-पाडू" लोकेषणावाल्यांचा उत्साह २-४ लेखांच्यापलिकडे जात नाही हे ही तितकेच खरे !

काल आमच्या इथे ' मैंने प्यार किया ' मधलं कबुतर पाण्याच्या टाकीला धडकलं , दोन थेंब गळुन ...आपल हे....दोन पंख गळुन पडले ...पडले म्हणजे काय ...साक्षात रामकाका प्रेमात पडले ...आधी त्यांना टक्कल पडले मग प्रेमाच्या खड्ड्यात पडले...गाडीतले पेट्रोल संपले असताना फटाके कसे वाजविणार म्हणुन ते विणाताईंकडे गेले ...कोण विणाताई ...रिना ताई ची बहीण ...बहीण ..वहीणी नव्हे ...सविता वहीणी (पक्षी : भाभी ) राष्ट्रीय भाभी आहेत ...आता राष्ट्रीय काय ते विचारू नकोस ... आणी कितवा ते पण ;)

हे म्हणजे शाळेतल्या निबंधासारखे झाले गाय दूध देते. त्याचे दही,ताक ,लोणी करतात.गाय पवित्र अस्ते.पवित्र वस्तूची पूजा करतात. पूजा माझ्याशेजरच्या बाकावर बस्ते.ती मला फार आवडते...वगैरे वगैरे

सविता वहिनींना या धाग्यावर बोलावता येईल का ?? नाही म्हणजे त्यांचा 'विषय' निघालाच आहे म्हणून आपलं... विषयासक्त (नसलेला) भीडस्त

काल आमच्या इथे ' मैंने प्यार किया ' मधलं कबुतर पाण्याच्या टाकीला धडकलं , दोन थेंब गळुन ...आपल हे....दोन पंख गळुन पडले ...पडले म्हणजे काय ...साक्षात रामकाका प्रेमात पडले ...आधी त्यांना टक्कल पडले मग प्रेमाच्या खड्ड्यात पडले...गाडीतले पेट्रोल संपले असताना फटाके कसे वाजविणार म्हणुन ते विणाताईंकडे गेले ...कोण विणाताई ...रिना ताई ची बहीण ...बहीण ..वहीणी नव्हे ...सविता वहीणी (पक्षी : भाभी ) राष्ट्रीय भाभी आहेत ...आता राष्ट्रीय काय ते विचारू नकोस ...
चांगल्या विषयावरील बाष्कळ आणि टुकार प्रतिसाद...
मूर्ती आणि आरास अशी तुलना करता येणार नाही , फार तर मुख्य पदार्थापेक्षा डावे- उ़जवे अधिक भाव खाउन जातात असे म्हणता येईल.
हे पटलं.

छे हो... स्पष्ट मत मांडलेलं मला केव्हाही आवडतं. मग ते मी कोणाबद्दल मांडलेलं असो, किंवा इतर कोणी माझ्या धाग्यावर/प्रतिसादावर... तुमचा प्रतिसाद तर विशेष आवडला होता... :) पण हा नाही आवडला... असो. इथे अजून अवांतर नको. कारण इथल्या धाग्याकर्त्याचं म्हणणं पटलंय. हवं तर खव किंवा व्यनि मध्ये बोलू :)

कारण इथल्या धाग्याकर्त्याचं म्हणणं पटलंय. >>> अरे मॅच बघु का नको आज !! पेर्‍या , लेका नशीबवान आहेस ;) ( आज हसुन मरणार आहे मी !!! )

अवांतराबद्दल बहुसंख्य सदस्यांना कुतुहल असेल की नक्की कसं धोरण असतं. संपादक मंडळातर्फे सांगायचं तर त्याबाबत अगदी कडक धोरण नसतं. बरंच लवचिक असतं. म्हणजे असं की टवाळ कार्ट्याचा एक धागा होता, मुली अशा का वागतात? आणखी एक धागा होता, गुळांब्याच्या राहिलेल्या पाकाचं काय करावं? अशा धाग्यांवर मौलिक प्रतिसाद येणं अवघडच असतं. राजकीय्/सामाजिक विषयांवर धागे असतात, त्यात अनेकदा धाग्यापेक्षा प्रतिसाद उत्तम अशी अवस्था असते. कधी अवांतर मूळ विषयाला पोषक असतं. कधी अवांतर चर्चा चांगली झाली असेल तर ती मूळ धाग्यापासून वेगळी काढून त्याचा नवीन धागा करण्यात येतो. अशी चर्चा बॅटमन, पिशी अबोली आणि वल्ली (बहुधा) इ. यांनी काही दिवसांपूर्वी भाषाशास्त्रावर केलेली सहजच आठवते आहे. कधी कधी एखाद्या गंभीर विषयावर धागा असताना त्यावर प्रतिसादात अवांतर झाले तर धागाकर्ता सं.मं. ला विनंती करतो. त्यानुसार ते अवांतर उडवण्यात येते. मग भले त्यात संपादकांनी केलेले अवांतर का असेना! नवीन लेखकांना हतोत्साहित करण्याचे प्रकार आता खूप कमी झाले आहेत. मात्र वारंवार सांगून शुद्धलेखन इ. मधे काही सुधारणा होत नसतील तर इतर सदस्यांनी चेष्टा केली तर त्याला काही उपाय नसतो. सदस्य म्हणून बोलायचं तर मला मिसळपाव यासाठीच (अवांतरासाठी आणि तिरप्या होत जाणार्‍या प्रतिसादांसाठीच) फार्फार आवडतं. अनेकदा माझे प्रतिसाद सुद्धा या दुष्ट संपादकांनी अवांतर म्हणून उडवले आहेत! काय सांगू तुम्हाला!! :-/

तु काही म्हण ज्यो !! या अश्या धाग्यांवर सगळ्यात मोठा प्रतिसाद टंकणारे दोन च असणार .. एक म्हणजे सल्लाकाका आणि दुसरे प्रतिसाद काका ....;)

एक ठराविक खाका मान्य केलाय लोकांनी, कदाचित काही कंपुबाजांनी, की ज्याला जास्त प्रतिसाद तो जास्त भारी किंवा लोकप्रिय लेखक्/लेखिका इ.इ. म्हणुन धाग्याने शंभरी गाठावी यासाठी लोक काय काय करतात ते मिपावर अलगदच कळते. पण ह्या थेरांमधे एखादा उत्कृष्ट धागा दुर्लक्षिला जातो. वात्रट लेकाचे

म्हणुन धाग्याने शंभरी गाठावी यासाठी लोक काय काय करतात ते मिपावर अलगदच कळते >> आपल्याला ईर्‍याचे प्रतिसाद याच मुळे आवडतात ...कसा सरळ लिहितो हा खानदेशी ...मुळात आपला एरियाच असा आहे :) सिल्लोडचा वाश्या

हे सध्याच्या समाजमनाचं प्रतिक तर नव्हे? अत्यंत टुकार चित्रपट करोडोंचा बिझनेस करतात. आंतरजालावर ४-५ वर्षांमध्ये पिढी बदलतेय की काय असं वाटू लागलंय.

प्रतिसांदा मधलं भांडण जाऊ दे.. स्वाक्षरी मधलं भांडण जास्त इंटरेस्टींग आहे..!!! बाकी अवांतर नाही केलं तर मि.पा ची कळा जाईल.. ग्लॅमर जाईल.. ट्यार्पी जाईल.. आमचा टाईमपास जाईल.. असं कोण सिरेसली आणि सिन्सिअरली वागत असतं का बे मि.पा वर?

तुमच्या स्वाक्षरीकडे पाह्यलंच नाही मी. वय आणि पगार चारचौघात विचारु नये. ;)