Welcome to misalpav.com
लेखक: भावना कल्लोळ | प्रसिद्ध:
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले. ज्या ज्या अनाहिता पिंगा घालत घालत कट्ट्यात सामील झाल्या होत्या त्याची नावे पुढील प्रमाणे : सानिकास्वप्नील, सविता ००१, पद्मश्री चित्रे, दुर्गावी, मीच मधुरा, भावनाकल्लोळ, सूर, अजया, लिमाउजेट, दिपालीकिरण. तसेच आपापल्या आयांचे प्रतिनिधित्व करत तीन छोट्या अनाहिता पण या कट्ट्यात सामील झाल्या होत्या. मीच मधुरा यास कडुन स्विनी तर सूर यास कडुन आर्या व फक्त ४ महिनाच्या अनन्या यांनी या कट्ट्यात सामील होत सर्वांत लहान मिपाकर होण्याचा मान मिळवला. तर यांच्या बाललीलांनी कट्ट्याला अधिकच समृद्ध केले. तर कट्ट्याचा वृतांत पुढील प्रमाणे. . काही मुंबईकर व परदेशी वास्तव्यास असणाऱ्या आमच्या काही अनाहीतानी संगनमत करून रविवारचा दिवस कट्ट्यासाठी आखला. त्याप्रमाणे मजल दरमजल करत सर्वं अनाहिता पैकी सगळ्यात पहिली हजेरी अजया यांनी वेळेआधी लावली. पण त्यांनी या वेळेचा सदउपयोग स्वतःला एक छान साडी घेऊन केला आणि लवकर आल्याचा स्वतःलाच स्वतः भुर्दंड पाडून घेतला.हा खर्च त्या उशिरा आलेल्या अनाहिताकडून करून घेणार असल्याचा मानस त्यांनी कट्ट्या दरम्यान बोलून दाखवला हि पण नंतर रंगलेल्या गप्पानी त्यांना याचा विसर पाडला. (हे बाकी आमच्या बायकाचे बाकी बरे असते, गप्पा मध्ये महत्वाचे विसरूनच जातो, असो शेवटी फायदा बाकी अनाहिताचा झाला). मग फोनाफोनी करून सगळ्या नक्की आल्या आहेत न यांची खात्री करून घेण्यात आली. सगळ्याजणी १०-१५ मिनिटांच्या अंतराने इच्छित जागी पोहचल्या. a मग स्वाद मधल्या बेसमेंट मध्ये ठाण मांडण्यात आले. अस्मादिकाना मात्र वसई विरार परिवहन यांच्या रविवारच्या सुस्त सेवेपोटी इच्छित जागी पोहचण्यास १ तासाचा विलंब लागला. पण स्वाद मध्ये जाताच कोणीही खाद्य म्हणुन आपला फडशा पडू नये उशिरा आल्यामुळे म्हणुन दरवाजा उघडून आत शिरताच "समुद्रामध्ये मोती शोधणे सोपे पण हे हॉटेल शोधणे महाकठीण असा शेरा हास्य वदनाने देत शामिल झाले". (काय करणार सगळ्या भुकेलेल्या वाघिणी होत्या न आणि उशिरा आलेली मीच एक म्हणुन हा खटाटोप). पण सगळ्यानी हसत हसत मला अनुमोदन दिले आणि स्थापन्न होताच समोर रुचकर घरगुती जेवणाची चव असलेली स्वादची मर्यादित थाळी ठेवली गेली. a (आमच्यापेक्षा हॉटेल मालकालाच खुप घाई होती म्हणुन आमच्या अन्नपुरवठ्याकडे जास्त लक्ष दिले जात होते, काय करणार बाहेर माणसे ताटकळत उभी होती आणि आम्ही मात्र निवांत पणे गप्पा टप्पा मारत जेवण करत होतो). . तर असे जास्त वैचारिक देवाणघेवाण न करता मस्त पैकी एकमेकांची शाळा घेत जेवण उरकले. जेवणातर गुलाबजाम आणि बासुंदी वर यथेच्छ ताव देत मेजवानी फस्त केली. . तिथे उभ्या असलेल्या (मालक कि मेनेजर?) कोण जाणे याच्या चेहऱ्यावर बायांनो आता खण आणि नारळ हवे तर घेऊन येतो पण या दहा जागा खाली करा ग असे काहीसे भाव पाहुन आम्ही बाहेर पडलो. पण हॉटेल बाहेर येताच एकमेकीचे भ्रमण ध्वनी क्रमांक घेत पुढचा कट्टा हा हॉटेल मध्ये न करता एका अनाहितेच्या घरी करण्याचे ठरवुन एक छानसे समुहचित्र टिपले गेले. मग प्रत्येकजणीने टाटा बाय बाय म्हणत या कट्ट्याची सांगता केली. . या बरोबरच कट्ट्याचा वृतांत संपला, पुन्हा भेटुया नवीन कट्ट्याचा वृतांता सोबत. तो पर्यंत याच कट्ट्याच्या वृतांतावर समाधान माना. नमस्कार. छायाचित्रकार सानिकास्वप्नील/ अजया सोबत वार्ताहर भावनाकल्लोळ ठाणे येथुन.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

ृतांत छान. सर्व आयोजकांचे आणि सहभागी महिला मिपाकरांचे पहिलाच कट्टा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन...!!! (महिला फक्त उणी दूणी काढायला जमतात असा एक जो माझा पारंपरिक समज होता आज त्या विचाराला तडा गेला) ;) -दिलीप बिरुटे

व्वा... छान बातमीपत्र..आपलं ते हे वृत्तांत! =)) @पण हॉटेल बाहेर येताच एकमेकीचे भ्रमण ध्वनी क्रमांक घेत पुढचा कट्टा हा हॉटेल मध्ये न करता एका अनाहितेच्या घरी करण्याचे ठरवुन>>>

ह्हांsssssssssss

अता कसं बरं साजेसं बोल्लात! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-041.gif ........................................ http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-1044.gif

किती अपेक्षेने उघडला धागा. पण कट्टावृत्तांत वाटावा असं एक वाक्य नाहि. खंप्लीट डिसअपॉइण्टेड. हे म्हणजे गणपा भाऊंची चमचमीत रेसिपी उघडावी आणि त्यात उकडलेल्या भेंडीच्या भाजीचं वर्णन असावं असं झालय. काय ग म्याऊ... नक्की तुच ऑर्गनाइझ केलास ना कट्टा??

हत्ती हा एक शांत प्राणी आहे. हत्तीला दोन प्रकारचे दात असतात. एका प्रकारच्या दातांनी तो खातो. दुसरे दात 'चीज' म्हणून स्माईल करुन दाखवण्यासाठी असतात. ह्या दातांना सुळे सुद्धा म्हणतात. सुळे कधी कधी टोचू शकतात. कधी कधी सुळ्यांचा उपयोग शोभेच्या वस्तू..... भावना कल्लोळ झाला! ;)

हो ना,किती शिक्रणछप! कोणी बासूंदी पिऊन तर्राट झालं नाही, शिग्रेटी फुंकल्या नाहीत्,बायकांबद्दल तारे तोडले नाहीत, घर्,चूल,मूल फाल्तु विषय चघळले असतील झालं. नथींग हॉट....पुरुषी कट्टे कसले भारी असतात नै.

ओ हॅलो...वृत्तांताबद्दल बोललोय. प्रत्यक्ष कट्ट्यात तुम्ही मस्त धमाल केली असेलच त्याबद्दल वाद नाही. ते प्रतिसादांवरूनही दिसते आहेत. तस्मात न समजून घेऊन तारे तोडणे कृपया थांबवावे. जे वक्तव्य होते ते निव्वळ वृत्तांतलेखनाबद्दल होते. तेही खुपत असेल तर उडवा, आमचं काय नै का?

कोणी बासूंदी पिऊन तर्राट झालं नाही
एकाच गोष्टीचे परत परत स्पष्टिकरण देउन कंटाळा आला आहे. तेव्हा जे सुचित केले आहे त्याचा निषेध व्यक्त करुन तुर्तास थांबतो.

सोड रे! ते प्रतिकात्मक का काय ते अस्तंय असं समजूया. बाकी आम्ही बासुंदी, सोलकढी, फ्रेश लाईम सोडा नि गप्पा ह्याने'देखील'(हे चाणाक्ष लोक ओळखतील) तर्राट होतो. तर्राट व्हायला बर्‍याचदा फक्त सोबतीची गरज असते. दारु काय अथवा गुलांबजाब काय, सिर्फ बहाना हय :)

हो ना,किती शिक्रणछप! कोणी बासूंदी पिऊन तर्राट झालं नाही, शिग्रेटी फुंकल्या नाहीत्,बायकांबद्दल तारे तोडले नाहीत, घर्,चूल,मूल फाल्तु विषय चघळले असतील झालं. नथींग हॉट....पुरुषी कट्टे कसले भारी असतात नै.
सामान्यीकरण! (जनरलायझेशन!) :( असो.

माफ करा, हा वृतांतलिखाण आपल्या पसंतीस पडले नाही. मला जसे सुचले तसे लिहिले, मी काही तुमच्याइतकी पोच पावलेली, अत्यंत गहन अभ्यास असलेली लेखिका नाही. जे माझ्या मनाला साध्या शब्दात सुचले ते मी लिहिले. त्यावरून उगाच वादावादी नको. अर्धंवटरावाची हि माफी मागते उगाच त्यांनी माऊ ताईला का असे प्रश्न विचारावे. चूक माझी झाली कि पोच नसताना सुद्धा मी वृतांत टाकण्याचे धाडस केले. क्षमा असावी. या पुढे अशी चूक होणे नाही.

बॅटमॅन से शांतता चाहती हो..? बडी ना समझ हो.. ये क्या चाहती हो.. (ह.घ्या म्हणुन काय रे ब्याट्या.. बघ तिला नकोय भांडण तिच्या धाग्यावर.. आपण ख.व मध्ये झिंज्या उपटु एक्मेकांच्या..!)

अरे?????? अनाहिता ना तुम्ही? अशी माघार? नामंजूर! लवकरात लवकर आणखी एक कटटा करा नि वृत्तांत तुम्हीच टाका. अनाहिताची अधिकृत प्रवक्ती पिरा नि तुम्ही अधिकृत वृत्तांतकार. होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं!

चार कमेंटींनी माघार घेणार काय अनाहिता? बघा बुवा.
होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं!
+१११११११११११११११११११.

कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकीलकूजितं किम् | परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुधीभिः || (व्याकरणदृष्ट्या चुका असू शकतील कदाचित)

अग ए.. हे असलं नसतं लिहायचं इथे.. "निमंत्रण दिलं होतं का वाचायचं? नसेल आवडला, नका वाचु.. गेलात उडत.. " वगैरे वगैरे... हे लिहायचं होतस की.. किमान "मोठे व्हा".. गेला बाजार "वाढदिवसाच्या शुभेच्छा " तरी.. आणि अनाहिताला पाण्यात पहाणारे बक्कळ लोक आहेत इथे (जळतात मेले..).. इग्नोर मारने का.. ;)

गुणाची हो पोर! ;) अगदी योग्य हातात प्रवक्तेपद दिलं गेलं. आता पैसातै डोळे मिटायला मोकळी. (अहो वामकुक्षीसाठी!)

आणि अनाहिताला पाण्यात पहाणारे बक्कळ लोक आहेत इथे (जळतात मेले..).. इग्नोर मारने का..
भलतेच गैरसमज बॉ तुमचे. अनाहितामध्ये काहीही का चालेना, अन्य लोकांना त्याचे काही म्हणता काही सोयर अथवा सुतक नै. उगा गैरसमजात राहू नये. तस्मात "वाढदिवसाच्या शुभेच्छा" दिल्या गेल्या आहेत. (याबद्दलचा या धाग्यावरील मजकडोन शेवटील प्रतिसाद. पुढील केशनिष्कर्षण खवमध्ये कुरु कुरु स्वाहा |)

सर्वांच्या वतीने उत्तर दिले हो..तू नै का समस्त अनाहिता ग्रूपच्या वतीने बोलतेस तसं ;) बाकी तुमच्या घोषणेतच हरणे अंतर्भूत आहे ;) =))

अशा नवख्यागत का वागताय? च्याआयला आजकाल मिपावर नवसदस्य देखील अगदी "तयार" होऊन येतात (एक्सेप्ट डुआयडी ;) ) ... आणि तुम्ही तर साक्षात पाशवीशक्ती क्लबच्या गंडाबंध दिक्षीत सदस्या ना? मग हे चुक झाली, काफ करा, धाडस केले वगैरे भानगड कुठुन आणली मधेच ? म्याऊ... काय चाललय तुझ्या राज्यात? अनाहितावर सौजन्यसप्ताह गिरवतेस कि काय तु?

नाई रे, ते सौजन्य संवत्सर फक्त पैसाताईचं सुरु आहे. ( मारतेय आता ज्यो. ;) ) आम्ही सगळ्या नॉर्मल आहोत! प्रॉब्लेम वेगळाय.. हल्ली तुला लोक सिरियसली घेतात उगीच्च!! सांभाळ स्वतःला. =))