Welcome to misalpav.com
लेखक: भावना कल्लोळ | प्रसिद्ध:
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले. ज्या ज्या अनाहिता पिंगा घालत घालत कट्ट्यात सामील झाल्या होत्या त्याची नावे पुढील प्रमाणे : सानिकास्वप्नील, सविता ००१, पद्मश्री चित्रे, दुर्गावी, मीच मधुरा, भावनाकल्लोळ, सूर, अजया, लिमाउजेट, दिपालीकिरण. तसेच आपापल्या आयांचे प्रतिनिधित्व करत तीन छोट्या अनाहिता पण या कट्ट्यात सामील झाल्या होत्या. मीच मधुरा यास कडुन स्विनी तर सूर यास कडुन आर्या व फक्त ४ महिनाच्या अनन्या यांनी या कट्ट्यात सामील होत सर्वांत लहान मिपाकर होण्याचा मान मिळवला. तर यांच्या बाललीलांनी कट्ट्याला अधिकच समृद्ध केले. तर कट्ट्याचा वृतांत पुढील प्रमाणे. . काही मुंबईकर व परदेशी वास्तव्यास असणाऱ्या आमच्या काही अनाहीतानी संगनमत करून रविवारचा दिवस कट्ट्यासाठी आखला. त्याप्रमाणे मजल दरमजल करत सर्वं अनाहिता पैकी सगळ्यात पहिली हजेरी अजया यांनी वेळेआधी लावली. पण त्यांनी या वेळेचा सदउपयोग स्वतःला एक छान साडी घेऊन केला आणि लवकर आल्याचा स्वतःलाच स्वतः भुर्दंड पाडून घेतला.हा खर्च त्या उशिरा आलेल्या अनाहिताकडून करून घेणार असल्याचा मानस त्यांनी कट्ट्या दरम्यान बोलून दाखवला हि पण नंतर रंगलेल्या गप्पानी त्यांना याचा विसर पाडला. (हे बाकी आमच्या बायकाचे बाकी बरे असते, गप्पा मध्ये महत्वाचे विसरूनच जातो, असो शेवटी फायदा बाकी अनाहिताचा झाला). मग फोनाफोनी करून सगळ्या नक्की आल्या आहेत न यांची खात्री करून घेण्यात आली. सगळ्याजणी १०-१५ मिनिटांच्या अंतराने इच्छित जागी पोहचल्या. a मग स्वाद मधल्या बेसमेंट मध्ये ठाण मांडण्यात आले. अस्मादिकाना मात्र वसई विरार परिवहन यांच्या रविवारच्या सुस्त सेवेपोटी इच्छित जागी पोहचण्यास १ तासाचा विलंब लागला. पण स्वाद मध्ये जाताच कोणीही खाद्य म्हणुन आपला फडशा पडू नये उशिरा आल्यामुळे म्हणुन दरवाजा उघडून आत शिरताच "समुद्रामध्ये मोती शोधणे सोपे पण हे हॉटेल शोधणे महाकठीण असा शेरा हास्य वदनाने देत शामिल झाले". (काय करणार सगळ्या भुकेलेल्या वाघिणी होत्या न आणि उशिरा आलेली मीच एक म्हणुन हा खटाटोप). पण सगळ्यानी हसत हसत मला अनुमोदन दिले आणि स्थापन्न होताच समोर रुचकर घरगुती जेवणाची चव असलेली स्वादची मर्यादित थाळी ठेवली गेली. a (आमच्यापेक्षा हॉटेल मालकालाच खुप घाई होती म्हणुन आमच्या अन्नपुरवठ्याकडे जास्त लक्ष दिले जात होते, काय करणार बाहेर माणसे ताटकळत उभी होती आणि आम्ही मात्र निवांत पणे गप्पा टप्पा मारत जेवण करत होतो). . तर असे जास्त वैचारिक देवाणघेवाण न करता मस्त पैकी एकमेकांची शाळा घेत जेवण उरकले. जेवणातर गुलाबजाम आणि बासुंदी वर यथेच्छ ताव देत मेजवानी फस्त केली. . तिथे उभ्या असलेल्या (मालक कि मेनेजर?) कोण जाणे याच्या चेहऱ्यावर बायांनो आता खण आणि नारळ हवे तर घेऊन येतो पण या दहा जागा खाली करा ग असे काहीसे भाव पाहुन आम्ही बाहेर पडलो. पण हॉटेल बाहेर येताच एकमेकीचे भ्रमण ध्वनी क्रमांक घेत पुढचा कट्टा हा हॉटेल मध्ये न करता एका अनाहितेच्या घरी करण्याचे ठरवुन एक छानसे समुहचित्र टिपले गेले. मग प्रत्येकजणीने टाटा बाय बाय म्हणत या कट्ट्याची सांगता केली. . या बरोबरच कट्ट्याचा वृतांत संपला, पुन्हा भेटुया नवीन कट्ट्याचा वृतांता सोबत. तो पर्यंत याच कट्ट्याच्या वृतांतावर समाधान माना. नमस्कार. छायाचित्रकार सानिकास्वप्नील/ अजया सोबत वार्ताहर भावनाकल्लोळ ठाणे येथुन.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

एक शंका एखाद्या शिक्रणछाप धाग्यावर भारंभार प्रतिसाद देण्यासाठी वेळ खर्ची घालणं हा शहाणपणा की बिनडोकपणा?. -हळु घ्यालच हो ना?. :HAPPY:

पहिल्या वहिल्या यशस्वी कट्ट्या बद्दल समस्त अनाहितांच अभिनंदन आणि कौतुक. उत्तरोत्तर असे कट्टे इतर शहर-गावांत/देशांतही व्हावोत यासाठी शुभेच्छा ! :)

खुप खुप हबिणन्दन ... फोटू दिसत नाहीयेत मला ... नाहीतर जाम जळजळ झाली असती .. पुढल्या कट्ट्याला येण्याचा चंग बान्ध्णेत आला हाय

अग, काहीही काय? लिहि बिंधास तू. प्यारे ने तुला अधिकृत वृत्तांतकार म्हणून पदवी देउन टाकली आहे. त्यामुळे आगे बढो!!!!!!!!!!!!

अगं भावना ,तारे तोडले कोणी तर इतकं नाय काय मनावर घ्यायचं,आपण अनाहितावर तोडलेल्या तार्यांची कलाक्रुती असा धागा काढु,अस्सल बायकी ;) वाटतं काही लोकांना की तारे फक्त त्यांनीच तोडायचे! ( शतकी धाग्याकडे आमचीही एक आहुती!)

हेमे वृत्तांत आवडला बरं का सगळ्या अनाहितांना भेटून खूप छान वाटले व कट्ट्याला आलेली मजा एकदम झकास :) अनाहिताचे असेच कट्टे होत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करते :) (धाग्याचे शतक पूर्ण होण्यास माझा ही हातभार)

एकदम मस्त वृत्तांत हेमा, अगदि आपल्या कट्ट्यासारखा. मिसळपाव मेंबर्स याशिवाय दुसरी कोणतीही ओळख नव्हती आपली, पण असं वाटत होतं की किती वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. खूप छान वाटलं !!

मस्तच झालेला दिसतोय कट्टा हे साधं वाक्य लिहून मी माझी जळजळ व्यक्त करते. भावनेनी सगळा कल्लोळ उडवून दिलेला आहे. अशीच मजा करत रहा असा आपला मी म्हातारी एका आशीर्वाद देते हां! ;)

मिपावरच्या अनाहिताच्या जाहीर धाग्याची टिंगल करण्याचा मिपाकर पुरुष आयडींचा प्रयत्न पाहून मला एक मिपाकर म्हणून शरम वाटली. या पुरषी टारगटपणाबद्दल शिक्षा म्हणून अनाहिता असा शब्द असलेल्या एकाही धाग्यावर त्यांना प्रतिसाद न देता येण्याची सोय करावी.

हे पाहा बॅटमॅनभाऊ, उगाच विषय बदलू नका. तुम्ही मुळात गरज नसताना टीका करून प्रोव्होक केलंत. मग त्यांची प्रमाणाबाहेर प्रतिक्रिया येणारच.. आणि तुमची चूक झाली असं म्हणणारावरच बंदी आणा म्हणताहात. वा रे न्याय.

टीका? आम्ही? प्रत्यक्ष "कट्टा" नव्हे तर "वृत्तांत" अंमळ ब्लँड झाला म्हटल्यावर ते समजून घेणे राहूदेच, खांद्यावर चिपांचे दुकानच असल्यागत प्रोव्होक होणे अन त्यावर अजून बोंबा ठोकणे हे कुणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे ते कळालेच आहे. असो. दॅट असाईड, तुमचे 'विदापाणी' बंद केले पाहिजे =))

मुळात हेतूच वाईट असला की कट्ट्याची टीका न करता वृत्तांताची केली असं पोलिटिकली करेक्ट म्हणता येतं, आणि तरीही त्यातून ते वाईट हेतू दिसतातच ना? तुमचं स्त्रीद्वेष्टेपण, अनाहिताच्या समृद्धीबद्दलची जळजळ अशा साध्या वाटणाऱ्या विधानांतून कितीही झाकली तरी बिनबटणांच्या चड्डीतून खोचलेला शर्ट बाहेर यावा तशी बाहेर लोंबतेच. आणि मग दिसताना दिसतं काय तर या बिचाऱ्या फार न बोलणाऱ्या स्त्रियांनी तुमच्या पुरषी कट्ट्यांवर टीका केल्या. असं काही होऊ नये म्हणूनच मुळात अनाहिताचा स्वतंत्र विभाग बनवावा लागला. आणि त्या थोड्या मोकळ्या होऊन बाहेर यायला लागल्या आहेत तर पुन्हा अशी दगडं मारायची. अशा वागणुकीबद्दल बॅटमॅन यांना आठ दिवसांची बंदी होऊन ती दहा दिवस राबवली जाईल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

तुमचं स्त्रीद्वेष्टेपण, अनाहिताच्या समृद्धीबद्दलची जळजळ अशा साध्या वाटणाऱ्या विधानांतून कितीही झाकली तरी बिनबटणांच्या चड्डीतून खोचलेला शर्ट बाहेर यावा तशी बाहेर लोंबतेच.
बिन बटणाची चड्डी? मुळात चड्डी नामक प्रकाराला बटण असते का? इथे चड्डी नामक शब्दाचा हिंदी अर्थ घेतल्या गेला आहे. बाकी गुर्जींना
अशा वागणुकीबद्दल बॅटमॅन यांना आठ दिवसांची बंदी होऊन ती दहा दिवस राबवली जाईल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
आपल्या आस्तिकतेची कबुली अशा पेचप्रसंगी द्यावी लागली हे रोचक आहे =)) बाकी आम्ही कशावरही टीका केली की स्त्रीद्वेष्टे अन पुरुषद्वेष्टे प्रतिसाद देणार्‍या/रे समतावादी हे समीकरण ठावकी असल्याने मूगं गिळन्ति सत्वरम् केल्या गेले आहेच ;)

माझ्याकडुन एक https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRlMIpP9xA-OpTTkdQQNvpwSkxW5me9zSyyMGx65FN09t-gL8OBWw कट्ट्यात काय खाल्ले म्हणे तर डाल्भात लोनचा कोन नाय कोनचा ? ;)

मजा केलीत मुलींनो. पुढच्या कट्ट्याची जागा एखादी निवांत बघून ठेवा. थाली रेस्टॉरंटात मागे लोक वेटिंग आहेत म्हटल्यावर मानेवर खडा ठेवल्यासारखं वाटतं.

एकोळी धागावृत्तांत आडौला. अत्यंत सूक्ष्म निरीक्षणानं लेखिकेनं सारा अवकाश तिसर्‍या वाक्यात समाविष्ट करुन घेतला आहे. पहिल्या वाक्यात एक गेयता दिसून येते. गेयता आहेच त्याबरोबर वाक्याचा शेवट सुद्धा जीभेवर एक वेगळाच संवादाघात करुन जातो. नंतर आलेलं उद्गारवाचक चिन्ह म्हणजे कट्ट्याच्या यशस्वीतेबद्दल वाटलेला अचंबा च जणू. दुसर वाक्य कट्ट्याचं ठिकाण, खाद्य पदार्थ नि आजूबाजूच्या खुर्च्यांवर असलेली स्थळं ह्याबाबत प्रकाश टाकून 'मजा' ह्या शब्दाद्वारे आपलं समाधान व्यकत करते. दोन गूढगर्भी स्मायल्या आपलं वेगळं अस्तित्व निश्चितच दाखवून देतात. म्हणायचं खूप आहे खरं पण दाखवत नाहीत. थोडा गडबडीत असल्यानं सध्या एवढंच. ;)

कट्ट्याचा वृत्तांत वाचून आनंद झाला आणि प्रतिक्रिया वाचून करमणुक जाहली.