पाककृती

जीरा आलू (सिंपल)

Primary tabs

साधी सोप्पी बॅचलर्स रेसीपी आहे, सटल टू टेस्ट अन झटपट तर जीरा आलु

साहित्य :-

१. ३ मध्यम बटाटे (उकडुन सालं न काढता केलेले मध्यम तुकडे)
२. चिमुटभर हिंग अन दोन अडीच चिमटी (थोडे जास्त ) जिरे (जिरा आलु आहे ना!!!)
३. चवीपुरते मीठ
४. गरम मसाला अर्धा छोटा चमचा (ऑप्शनल)
५. अर्धा चमचा भाजलेलं जिरं ( वरतुन पेरायला)

Ingredients

सर्वप्रथम पॅन मधे तेल गरम करा (जे आवडते ते पण ऑथेंटीक पंजाबी चवीसाठी सरसों ऑइल मस्ट आता ह्यात जिरे हिंगाची फोडणी द्या तेल गरम झाल्यावर (जिरं जळायला नको फक्त तडतडायला हवं इतकंच गरम असावं तेल)

Tadka

hing

आता ह्यात बटाटे टाका व मस्त परता काहीवेळ (५-७ मिनिट्स)

aloo

बटाटे थोडे फ्राय झाल्यासारखे वाटले की त्यत हळद टाका अन लगेच गॅस बंद करुन ३० सेकंद मिसळुन घ्या
थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला (माझ्याकडे नव्हती)

Haldi

stir

final

प्रचेतस

गणेशा झालाय माझा.

अल्बमचे सेटिंग प्रायव्हेटच राहिलेय का?

माझा पण गणेशा झालाय.

आवडती भाजी आहे माझी, फटु पाहण्यास उत्सुक.

आलु...माय ऑल टाईम फेव! पण वजन वाढेल या भितीमुळे हल्ली जपुनच खातेय. प्लीज फोटो द्या ना. नजरेनीच खाऊन घेइन म्हणतेय..

बहुतेक असंच कायतर झालेलं दिसतं आहे, मी चुकुन पिकासावरुन ते फोटो डिलिट केलेन आता परत पोस्ट मधे एंबेड करता येतील का आपण आपलं कॉमेंटेतच टाकावा फोटु ?

सुहास झेले

फोटो कमेंटमध्ये दे.. किंवा संपादकांना दे. ते अपलोड करतील धाग्यात

प्यारे१

+१११

दिपक.कुवेत

वाचुनच तोंडाला पाणी सुटलयं पण फोटो असता तर महापुर आला असता........

पैसा

ओ बाप्पू, फोटो परत गूगल/फेसबुकवर टाकून मला लिंक द्या. अपडेट करते.