काथ्याकूट
बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट
Primary tabs
अत्ताच बातम्यात वाचले की बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट झाले आहेत..
आशा करतो आपले सर्व बंगलोरवासी मिपाकर सुखरुप आणि सुरक्षित आहेत..
कृपया अधिक माहिती द्यावी..
(काळजी ग्रस्त)केशवसुमार
अत्ताच बातम्यात वाचले की बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट झाले आहेत..
आशा करतो आपले सर्व बंगलोरवासी मिपाकर सुखरुप आणि सुरक्षित आहेत..
कृपया अधिक माहिती द्यावी..
(काळजी ग्रस्त)केशवसुमार
बंगलोरवासी मिपाकरांनी काळजी घ्या !!!!!
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
http://www.josh18.com/showstory.php?id=259171
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
बंगलोरातले मिपाकर सुरक्षित आहेत अशी आशा!
स्वाती
मी आत्ताच घरी पोचलेय. सुदैवानं सगळे लो इण्टेसिटीचे स्फोट होते... संध्याकाळपर्यंत सगळं नॉर्मल चालू व्हावं...
आपापली खुशाली कळवा रे बाबांनो....
जपून रहा.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
बेंगलोर मधील मिपाकर आपआपली खुशाली कळवा रे.........
सर्व मिपाकर काळजीत आहेत.....
ईकडे अजुन तरी परीस्थिती अटोक्यात आहे.
सगळी कार्यालये / शाळा सोडून देण्यात आल्या आहेत
आर्य (बेंगलोर वासी)
अजून तरी सर्व काहि ठिक आहे.
माझ्या ओफिसजवळच दोन ठिकाणी हे ब्लास्ट झाले आहेत.(माडिवाला व अडुगोडी.)
पोलिसांनी सर्वांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे.
संध्याकाळपर्यंत सर्व काहि सुरुळीत होइल अशी आशा आहे.
संभाळून रहा
चिन्मय
सर्व बेंगलोर वासी मिपा करांच्या आणि त्यांच्या आप्तेष्टांच्या सुरक्षिततेबद्दल सदिच्छा व्यक्त करतो ...
सगळे बंगलोरवासी मिपाकर सुखरूप असावेत हीच प्रार्थना...!
सगळे बंगलोरवासी मिपाकर सुखरूप असावेत हीच प्रार्थना...!
मिपाकरच नव्हे... तर सगळेच बेंगलोरवासी सुखरूप असावएत हीच प्रार्थना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
होय रे .. सुखरुप आहोत .. हल्ली बरेच मराठी बंगळुर वासी झालेले दिसतायेत
बाबांनो काळजी घ्या रे.
आणि स्वतःची काळजी घेताना रस्त्यातल्या एखाद्याला मदतही करा...मुंबईचा आदर्श ठेवा समोर.
सगळं काही नक्की ठीक होईल. आई जगदंबेला काळजी आहे.
सर्व बेंगलोर वासी मिपा करांच्या सुरक्षिततेबद्दल ईश्वरचरणी प्रार्थना.
शेखर
सर्व बेंगलोरवासियांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित आहे. (घडलेल्या दुर्घटनेत एक स्त्री मृत्युमुखी पडली त्याचा खेद आहे.)
चतुरंग
असेच. काळजी घ्या!
असल्या घटना सातत्याने घडत रहातात या बद्दल खेद वाटतो.
सर्वजण खुशाल असतील अशी प्रार्थना.
माझ्या ओळखीतले सगळे जण ठीक आहेत. डॉन्याशी बोलणं झालं. अनुराधा ऑफीस मधे असल्याचं त्यानी सांगितलं. मेघनानी वर पोस्ट टाकलाय. अभिज्ञ ठीक असल्याचं मदनबाण नी कळवलं. ओळखीतली बाकीची जनता पण ठीक आहे
खुशाली कळवल्या बद्दल धन्यवाद..
सगळे जण काळजी घ्या..एकमेकांच्या.. घरच्यां लोकांच्या संपर्कात रहा..
केशवसुमार
जोशी सायब, हमको विसर्या ना!! काय राव!! असो , मी पण ठीकच आहे :)
थ्यांकू, थ्यांकू मिपावासी :)
चला, सगळे ठीक आहेत हे पाहून खरंच बरे वाटले! :)
हो रे, मी घरी पोहचलो आहे ...
बाकीच्या मिपाकरांची सुद्धा खबर घेतली आहे. सगळे व्यवस्थीत आहेत.
काळजी नसावी .....
वातावरण निवळले आहे. रोड सुद्धा पुर्वीप्रमाणे ओसंडुन वहात आहेत ...
माझ्या घरापासुन ५ मिनीटे अंतरावर स्फोट झाला ...
पण लोकं पुन्हा जिगर दाखवुन उभी राहिली आहेत. सामान्य जनजिवन सुरळीत चालु आहे ...
मी एका हॉटेलात चहा पिऊन घरी आलो ....
घटनेत मॄत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीबद्दल व इतर जखमींबद्दल सहानभुती वाटते आहे ....
चीअर्स टु बेंगलोर्स स्पीरीट !!!
प्राऊड बेंगलोरकर - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
सर्व सुखरूप हे वाचून बरे वाटले.
घटनेत मॄत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीबद्दल व इतर जखमींबद्दल सहानभुती वाटते आहे ....
निश्चितच. ताज्या बातमीप्रमाणे ३ लोक मृत्युमुखी पडले असे कळते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पण लोकं पुन्हा जिगर दाखवुन उभी राहिली आहेत. सामान्य जनजिवन सुरळीत चालु आहे ...
==========================================================
जिगर म्हणावे कि आपल्या भावना आता बोथट होत चालल्या आहेत, कदाचित दहशतवाद मुळापासुन निपटुन न टाकणारी राजकिय निष्क्रियता आपल्याला आहे त्यातच सुख मानायला शिकवतेय.
परंतु भारतातील मुख्य शहरे सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
चला, सगळे ठीक आहेत हे पाहून खरंच बरे वाटले!
हेच म्हणतो !
साई कृपा !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
सुखरूप आहेत, हे ऐकुन बरं वाटलं. काळजी घ्यावी.
सात नाही आठ विस्फोट झाले..... आताच ५.३० च्या आस पास एक झाला.... एक मृत्युमुखी !
:(
दुवा : http://www.josh18.com/showstory.php?id=259171
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
परत स्फोट झाला? :(
सगळे काळजी घ्या. सुखरूप रहा.
अतिरेकी कारवायांमुळे वाईट वाटणे, राग येणे, नित्याचेच झाले आहे. त्यात काही नवीन नाही.
"Gopal Hosur, joint commissioner, crime, said that there was nothing to worry. He said that the blasts were low intensity in nature. He assured the people that the situation was under control." हे वाचून हसावे का रडावे, कळेना.
ही बाब केवळ वस्तुस्थिती निदर्शक असते. अफवा पसरु नयेत म्हणुन घेतलेलि ती काळजी असते. अफवा ही बातमीपेक्षा जास्त वेगाने पसरते.लोकांच्या डोळ्यासमोर लगेच मुंबईचे बॉम्बस्फोट येतात. हानी ती हानीच हे तात्विक विवेचन करण्याची ती वेळ नसते.
प्रकाश घाटपांडे
ही बाब केवळ वस्तुस्थिती निदर्शक असते. अफवा पसरु नयेत म्हणुन घेतलेलि ती काळजी असते.
सहमत. आजकाल आधीपेक्षा जास्त वेगाने अफवा पसरतात.
म्हणून मी ही बंगळूरूमधील माझ्या मित्रांना फोन करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
आपला काय रिस्पॉन्स असता?
लोकांमधे घबराट पसरू नये, अफवांचे पेव फुटू नये, विशेषतः आपल्याकडे त्या फारच वेगाने परिणाम करतात, ह्या साठी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे असेच सांगावे लागते! गोपाल होसूर पार घामाने डबडबून, टेंशनने थरकापलेला असला तरीही त्याला असेच सांगावे लागते! त्या पातळीवर वावरत असताना असलेल्या मानसिक ताणाची कल्पना करा!
आपणच आपल्या अधिकार्यांवर विश्वास दाखवला नाही तर कोणी दाखवायचा?
चतुरंग
सहमत आहे. जनतेला धीर देणे महत्वाचे .
असंतोषापुढे जगातील कुठली ही सुरक्षा व्यवस्था थिटी असते.
प्रकाश घाटपांडे
हे तर भयंकरच !
मी लगेच सकाळ पाहिला तर त्यात आता नउ स्फोट झाले असे म्हणत आहेत.
पण केंद्रिय गृहमंत्र्यांनी लगेच या कृतीचा निषेध केला आहे चांगले. अशीच तीव्र स्वरुपाची परिणामकारक उपाययोजना अश्या कृत्यांना आळा घालते.
-- (खिन्न) लिखाळ.
हो, एकूण ९ स्फोट झालेत.
सकाळ मध्ये दिलेल्या बातमीनुसार
"स्फोटानंतर काही वेळातच मोबाईल कंपन्यांनी काही काळासाठी आपले 'आपले नेटवर्क' बंद ठेवले होते"
ह्यामागचे नेमके प्रयोजन काय?
वास्तविक अशा वेळी फोन चालू असले तर लोकांना एकमेकांची खुशाली/सुरक्षितता-असुरक्षितता तसेच त्या भागातील सद्य परिस्थिती कळविण्यास सोपे पडते. तसेच त्या भागातील लोकांना पुढे काय पाऊल उचलावे ह्याबाबतही थोडा विचार कळू शकतो. पण जर फोन बंद असले तर अवलंबून रहावे लागते ते बातम्या वा तत्सम यंत्रणांवर. पण ह्याचाही आजकाल उपयोगापेक्षा गोंधळ वाढविण्यात हातभार लागू शकतो.
Six blasts rock Ahmedabad, 6 injured
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
सत्तेची हाव असणारे केवळ खुर्ची टिकवण्यात वेळ घालवत असतील तर दुसरं काय होणार? :(
(उद्विग्न) टिंग्या
सहमत.
रिडीफ वरील लेख वाचण्यासारखा !
http://www.rediff.com/news/2008/jul/25kp.htm
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
राजे,
मी माझी प्रतिक्रिया लिहिल्यावर तो लेख वाचला. तिथे ही तेच म्हटले आहे.
Any time now, the state government will start blaming central intelligence agencies for not alerting them. The Centre, in turn, will blame some unpronounceable outfit whose benefactors are across the border.
आणि सुरक्षिततेचे म्हणाल तर खरोखरच जास्त काहीच केले जात नाही. असे काही घडले तरच थोडी सुरक्षितता वाढवतात. पण मग पुन्हा तेच.
२००५ मध्ये बंगळूरूच्या ITPL च्या बेसमेंट मध्ये बाँब ठेवल्याचा फोन आला होता. त्यामुळे संध्याकाळी ४:३०/५ च्या आसपास सर्व कार्यालये रिकामी केली होती. आम्ही मग खाली ITPL बागेत येऊन उभे होतो. तेव्हा त्यांनी सांगितले की अजून १-२ तास ही तपासणी चालेल. त्यामुळे मग मी माझ्या गट नेत्याला (टीम लीडर) विचारून घरी गेलो. वास्तविक ITPL मध्ये शिरताना कंपनीचे ओळखपत्र दाखविल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. पण ह्या घटनेच्या दुसर्या दिवशी मी माझे ओळखपत्र न दाखविता कार्यालयात जाऊ शकलो होतो.
पहिल्यांदा जयपुर नंतर बेंगलोर आणि नंतर अहमदाबाद!
तिन्ही भाजप सरकारांची राज्ये! :(
काही लिंक मिळतेय का?
तसे असेल तर १९९३/२००६ चे मुंबईतील बॉम्बस्फोट व इतरही काँग्रेस सरकारच्या राज्यात झाले. त्याची लिंक का लावू नये?
ही वेळ मुख्यतः लोकांना मदत करण्याची, त्यांना धीर देण्याची असून गुजरातचे गृहमंत्री आणि आता यशवंत सिन्हांनी हेच सांगितले की तिनही राज्यात भाजपचे सरकार होते, त्यांना टार्गेट केले जातेय.
आणि जर तुम्ही म्हणताय की केंद्र सरकार (काँग्रेसचे) ह्याला कारणीभूत आहे तरी त्या राज्यात तुमचेच राज्य आहे ना? मग तुम्ही घेतली का खबरदारी? तुमची ह्यात हार नाही का?
मुख्य म्हणजे ही वेळ आहे का आरोप करण्याची? अरे ह्या महत्वाच्या वेळी लोकांना जर अशा गोष्टींवरून चिथावले तर पुढे काय?
http://www.josh18.com/showstory.php?id=260161
"
गुजरात के शहर अहमदाबाद में सिलसिलेवार 12 बम धमाके होने की देश भर में प्रतिक्रिया हुई है और राष्ट्रपति प्रतिभा पाटील तथा प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने इन धमाकों की कड़ी निंदा की है।
"
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की सद्यपरिस्थितीत केवळ भाजपा सरकार असणार्या राज्यांमध्येच हे प्रकार चालु आहेत्.....किंबहुना बर्याच न्युज चॅनेल्सनी हाच मुद्दा उपस्थित केला आहे.
सेकंडली, मी कोणावरही आरोप करत नाहीये परंतु
>>अरे ह्या महत्वाच्या वेळी लोकांना जर अशा गोष्टींवरून चिथावले तर पुढे काय?
याच्याशी १००% सहमत!
मी तुमच्या लिहिण्यावर आक्षेप नाही घेतला :)
मी फक्त त्या वाक्यावर (कोणीही म्हटले असो) ती प्रतिक्रिया लिहिली. कारण नेमके त्याच वेळी मी यशवंत सिन्हांचे ते वाक्य ऐकून संगणकावर आलो होतो. माझ्या प्रतिक्रियेत 'तुम्ही, तुमचे राज्य' म्हणजे भाजपा संदर्भात होते.
:)
अह मदाबाद ची बातमी ऐकुन मन सुन्न झालय...
रात्रिचा १ वाजलय्..नाहि झोप येनार आज...
का? का ही लोक दुसर्यांच्या जीवावर उठली आहेत?
हे कुठेतरी थांबायला हवं!
पण कसं??????????????????????????