गुजरात विकासाचे मृगजळ..
अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.
संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे.
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.
त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे. भरपूर आकडेवारीही दिलेली आहे. केजरीवाललाही हे चांगलेच माहित आहे, आणि म्हणूनच त्याने मुळावरच घाव केला आहे.
लेख इथे वाचा: http://www.frontline.in/the-nation/mirage-of-development/article4430889.ece
तातील काही तक्ते:
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
आता ह्यातुन पुढे काय होणार हे मात्र रोचक असणार आहे.
💬 प्रतिसाद
(163)
प
पिवळा डांबिस
Wed, 03/05/2014 - 20:02
नवीन
नुसता विकासाचा आढावा जर घ्यायचा असेल तर राजकीय सभा/रॅली घ्यायची गरज काय?
आणि जर रॅली घेतली तर त्यासाठी परवानगी घेतली की नाही?
आणि जर रॅलीसाठी प्रवानगी घेतली नसेल तर पोलिसांनी कारवाई केली यात काय चुकलं?
कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की पण तुमच्या वाक्यांवरून हे केजरवालाचं पाणी मुरतंय असं दिसतंय!!
बाकी गुजरातच्या विकासावर चर्चा करायची असेल तर मोदी सत्तेवर येण्याआधी विविध प्रकारचे निर्देशांक गुजरातसाठी काय होते आणि आताच्या परिस्थीतीशी कंपॅरिझन करून आता ते काय आहेत यावरून गुजरातची मोदींच्या करकिर्दीत प्रगती झाली की नाही ते ठरवता येईल. उगाच गुजरातसारख्या मोठ्या राज्याची अंदमान, मिझोराम, गोवा यासारख्या लहान राज्यांशी त्या फ्रंटलाईनमधल्या लेखात तुलना केलेली बघून त्या लेखात कुठेतरी पाणी मुरतंय असंही वाटलं....
- Log in or register to post comments
ब
बंडा मामा
Wed, 03/05/2014 - 20:06
नवीन
कुठे दिसली तुम्हाला रॅली किंवा सभा? किंवा किमान तशी घोषणा तरी? पोलिसांनी जे केले तो रडीचा डाव आहे.
स्वच्छ चष्म्यातुन लेख वाचा, किमान वरचे तक्ते तरी न्याहाळा. महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, पं. बंगाल अशी अनेक 'मोठी' राज्ये तुलनेसाठी घेतलेली दिसतील.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Wed, 03/05/2014 - 20:16
नवीन
रॅली सभा घेतली नसेल किवा तिची घोषणाही जर केली नसेल तर केजरीवालांना झालेली अटक (झाली असेल तर) ही बेकायदेशीर आहे. त्याविरूद्ध न्यायालयात दाद मागण्याचा त्यांना हक्क आहे की!
माझ्या मते ते चुकीचं आहे. एखाद्या व्हेरियेबलमध्ये कालानुसार होणारा बदल जर मापायचा असेल तर त्याच व्हेरियेबलचे गुजरातबद्दलचे दोन वेगवेगळे टाईम स्नॅपशॉटस घेऊन बदल मोजायला हवा आणि मग त्यावरून प्रगती झालिये की अधोगती हे ठरवायला हवं.
सेम टू यू!!!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/06/2014 - 05:25
नवीन
केजरी यांना रोड शो साठी परवानगी न घेतल्याचे कारण देऊन निवडणूक अधिकार्यांच्या मार्फत कारवाई करून पोलिसांनी ताब्यात घेतले असे सांगण्यात येत आहे. हा तथाकथित निवडणूक आयोग राज्याच्या अखत्यारित असतो का? आश्चर्य वाटले.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5159874882849071689&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20140305&Provider=-%20%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%AF&NewsTitle=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 03/06/2014 - 15:06
नवीन
हा शब्दप्रयोग चुकला.
"रोड शो" असे म्हणायला हवे होते.
(रोड शो हा शब्द मान्य असेल अशी आशा आहे.)
बाकी साधेपणाचे ढोल बडवणार्याच्या ताफ्यात २२ गाड्या कशासाठी होत्या याचे उत्तर द्या.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 03/05/2014 - 20:59
नवीन
अहो बंडा मामा, फ्रंटलाईन हे डाव्या विचारसरणीचे मासिक आहे. त्यांच्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा? जरा ऑर्गनायझर किंवा पाञ्चजन्य मध्ये आलेले विश्वासार्ह दुवे द्या की.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 03/24/2014 - 10:34
नवीन
>>> करेक्ट ! १००% सहमत !!
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 03/05/2014 - 21:57
नवीन
केजरीवाल हे एक कांगावखोर आणि चालू व्यक्तीमत्व आहे. गुजरातमधे काहीतरी घडणार हे नक्कीच होते आणि तसेच झाले. डझनाहून अधिक गाड्यांच्या ताफ्याने केजरीवाल जात असताना पाटन जिल्हाधिकार्याने त्यांना थांबवले आणि विचारले की आचारसंहीता लागू झालेली असताना परवानगी न घेता असे कसे जाऊ शकतात. केजरीवाल नेहमीप्रमाणे म्हणाले की त्यांना म्हणजे केजरीवाल यांना माहीत नव्हते! तेव्हढी चौकशी झाल्यावर सोडून दिले. जिल्हाधिकार्यांच्या मते ते अधिकृत डिटेन्शन नव्हते तर चौकशीसाठी त्यांना थांबवले होते. मग त्यांच्या म्हणे गाडीच्या काचेवर दगडफेक झाली. त्या काच फुटलेल्या गाडीचा केजरीवालांनी मग केजरीवालांनी फोटोऑप साठी वापर केला. जसा आप च्याच राखी बिर्ला यांनी केला होता तसेच. अर्थात केजरीवालांनी या गुन्ह्याविरोधात पोलीसात तक्रार नोंदवली का नाही ते माहीत नाही. असो, हा कांगावखोरपणा १६ मे पर्यंत सहन करावा लागेल नंतर दिल्ली विधानसभेचे त्यांना राज्य मिळाले तर नीट चालवतील अशी आशा करूयात आणि बहुमतात राज्य मिळाले नाही तर धरणे धरायला रस्ता आणि शोमनशीप साठी मफलर आहेतच!
त्यानिमित्ताने मला साधारण एक वर्षापुर्वीचा फ्रंट्लाईन मधे आलेला हा लेख आठवला. संपूर्ण गुजरातचा आढावा ह्यात एका बर्ड्स आय व्ह्यु प्रमाणे घेतला आहे.
आता दंगलींवरून बोलता येणार नाही. त्यामुळे नवीन काही तरी पोटापाण्यासाठी झालं! या लेखातले पहीलेच वाक्य आहे: "Social development indicators in Gujarat are poor, proving that development in the State is lopsided." याचा अर्थ, लेखाचा भर सोशल इंडीकेटर्स वर आहे आणि म्हणणे आहे की विकास हा एकांगी आहे (विकास नाही असे नाही, फक्त लेखकाला आणि त्या विचारसरणीस हवा तसा नाही). वर अजानुकर्ण यांनी म्हणल्याप्रमाणे त्यात नवल देखील नाही कारण ते डाव्या विचारसरणीचेच नाही तर अगदी कम्युनिस्टधार्जिणे मासिक आहे. तसेच वर पिडां यांनी म्हणल्याप्रमाणे अॅपल-ऑरेंज तुलना आहे. समान पातळीवर नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहेच.
तरी देखील तुर्तास हे मान्य करूयात की आधी कुठला विकास हा तात्विक मतभेद आहे. पण मला काय म्हणायचे आहे की हे गुजराती पब्लीक एव्हढे अडाणी आहे की सलग तिनदा मोदींना निवडून दिले आहे. का तसे बहुमतात आणणार्यांना मोदींच्या ध्येयधोरणाचा फायदा झाला म्हणून त्यांनी मोदींच्या बाजूने मतदान केले? बरं महाराष्ट्रात इतके सगळे चांगले चाललेले असताना, बरेचसे पब्लीक भले भाजपा-सेनेच्या बाजूने नसेल पण दोन्ही काँग्रेसच्या बाजूने आहे असे म्हणायचे आहे का?
भारत एक लोकशाही राष्ट्र आहे. नॉर्थ कोरीया सारखी सरकारकडूनच माहिती मिळत नाही. नुसते इंडीया शायनिंग म्हणून मते मिळत नाहीत, हा इतिहास माहीत असेलच... एस एम एस, इमेल्स, फोन कॉल्स सगळ्या संवाद माध्यमांचे, सोशल मेडीयांचे आणि प्रसिद्धीमाध्यमांचे जाळे आहे. त्यातून जर जनतेस मोदीसरकारच्या कारकिर्दीबद्दल खरेच नापसंती असती तर ती दिसली असती. पण तसे दिसत नाही. याचा एक अर्थ जनतेचा मोदींच्या ध्येयधोरणास पाठींबा आहे असा होऊ शकतो.
पण त्याहूनही अधिक वास्तव हे आहे की: कम्युनिस्ट मॅनिफेस्टो रद्दीत विकायचे अथवा चण्याच्या पुड्या बांधायला वापरायचे सोडून, त्यातले व्यवहारात निरूपयोगी ठरलेले सिद्धांत परत परत उगाळून, मोदी/भाजपा आणि उद्योगव्यवस्थेवर बोटे मोडणारे विचारवंत आणि राजकारणी स्वतः बसलेल्या झाडाची फांदी करवतीने कापायचे काम करण्यात मग्न आहेत. अर्थात पाय जमिनीवर न ठेवता बर्ड्स आय व्ह्यू करत बसणार्यांकडून ह्याहून वेगळी अपेक्षा काय करणार?
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
गुरुवार, 03/06/2014 - 07:31
नवीन
गमतीदार विषय आणि चर्चा. निवडणूक संपेपर्यंत करमणुकीसाठी चांगले खाद्य मिळणार आता चोहीकडे. :)
वाचनमात्रच रहाणार होतो या धाग्यावर, पण रहावले नाही म्हणून म्हटले एक पिंक टाकूयाच. ;)
आणि सलग तीन वेळा निवडून आलेल्या आघाडीसरकार बद्दल...
आता मोदींऐवजी आघाडी, गुजरातऐवजी महाराष्ट्र वरच्या वाक्यात तसेच महाराष्ट्राऐवजी गुजरात, भाजपा-सेना ऐवजी आघाडी व आघाडीच्या जागी महायुती लावून पाहूया बरं. ;)
बाकी, या सगळ्या तथाकथित नमो, रागा, केजरीवाल वगैरे ढवळाढवळीतून फक्त पाणी गढूळ होईल. फार मोठा बदल वगैरे घडण्याची अपेक्षा नाही. उलट कुणालाच नीट बहुमत नाही अशी परीस्थीती न येवो आणि राष्ट्रीय पक्षांचा घोडेबाजारीचा धंदा तेजीत न येवो इतकीच देशाचरणी प्रार्थना. चालूद्यात.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 03/06/2014 - 08:46
नवीन
बिचारा गुजरात..
५ पक्ष, अनेक अपक्ष, बहुरंगी लढत, तीव्र फोडाफोडी/ पाडापाडी वगैरे. मुतु घातलेले, फिल्मी डायलॉग मारणारे राजकारणी.
किती पिछाडीवर आहे नाही का?
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 03/06/2014 - 15:08
नवीन
वाचनमात्रच रहाणार होतो या धाग्यावर, पण रहावले नाही म्हणून म्हटले एक पिंक टाकूयाच.
सहमत.
माझेसुध्दा असेच झाले.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/06/2014 - 15:21
नवीन
बाकी, या सगळ्या तथाकथित नमो, रागा, केजरीवाल वगैरे ढवळाढवळीतून फक्त पाणी गढूळ होईल. फार मोठा बदल वगैरे घडण्याची अपेक्षा नाही.
अंशतः सहमत. केजरीवाल यांनी बदल घडवण्याच्या ऐवजी बिघडवून दाखवला आहे. ते पंतप्रधान होण्याची शक्यता देखील कमी आहे. फक्त थयथयाट करून ते भाजपाची मते कमी करण्याचा प्रयत्न करणार इतकेच.
राहूल गांधी म्हणजे काँग्रेस, जर तेच परत आले तर मागील पानावरून पुढे चालू राहील. थोडक्यात नक्कीच बदल होणार नाही.
मोदींनी स्वतःवर इतकी चिखलफेक करणारे, द्वेष करणारे तथाकथीत विचारवंत, बायास्ड माध्यमे असून देखील कुठलाही तमाशा न करता त्यांनी स्वतःचे प्रशासन कौशल्य दाखवले आहे. त्या अर्थाने त्यांनी नक्कीच समतोल वृत्ती दाखवलेली आहे. अर्थात राज्यात जेव्हढा पटकन प्रभाव दाखवता येऊ शकतो तितका देशावर दाखवता येणार नाही हे देखील एक वास्तव आहे.
थोडक्यात मोदी आले तर सर्वप्रथम सध्याचे भ्रष्ट सरकार सत्ताभ्रष्ट होणे इतका का होईना नक्कीच बदल झालेला असेल. तो देखील काही कमी नाही. त्यापुढे जाऊन ते काय करू शकतील ते २७२ ची रेषा ते कुठल्यापद्धतीने ओलांडणार यावरच अवलंबून राहील.
त्याहीपुढे खरे म्हणाल तर भारतीय नागरीकांनी एक कर्तव्य म्हणून जे कुठले सरकार येईल त्यांच्यावर सध्याच्या सोशल मेडीया आणि प्रसार माध्यमांचा वापर करून कायम वचक ठेवला पाहीजे असे वाटते, तरच खरा बदल घडेल. पण असा बदल समाजमनात घडू शकेल का, हे देखील एक न सुटणारे कोडे आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 03/05/2014 - 22:11
नवीन
बंडामामा म्हणजे कोणी ओळखीची व्यक्ती असावी असं वाटतंय. :)
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 03/06/2014 - 07:07
नवीन
कधीतरी टाकुन आल्यासारखे प्रतिसाद देतो आणि चर्चा चालु झाल्यावर गायब होतो.
- Log in or register to post comments
म
मारकुटे
गुरुवार, 03/06/2014 - 12:39
नवीन
बंडामामाच्याच पोस्टवर कमेंट करणारे आयडी पहा म्हणजे कळेल नक्की कोण आहेत बंडामामा ते ;)
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 03/05/2014 - 23:12
नवीन
केजरीवाल कसे वाद घालत आहेत, स्वत:च मला अटक करा म्हणून ओरडत आहेत हे यात बघण्यासारखे आहे. याबद्दलची मते आणि नक्की कुणाचे पाणी मुरते आहे हे समजून घेण्यास आवडेल.
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 03/06/2014 - 12:07
नवीन
विकासजी, मी तर तुम्हाला संयमित, नि:स्पृह आणि देशाबद्दल कळकळ असलेला माणूस समजत होतो. पण हे काय? आद्य क्रांतिकारी, भ्रष्टाचार निर्मुलक, राजकीय नाट्य-शिरोमणी आणि ह्या देशातील एकमेव चारीत्र्यवान, ईमानदार आणि देशभक्त असलेल्या रा.रा. श्री. अरविंदजी केजरीवालजी ह्यांचे आक्रास्तळे सत्य बाहेर आणण्याचा गुन्हा करुन तुम्ही माझा समज फोल ठरविला. तुमचा निशेढ..
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/06/2014 - 05:39
नवीन
अरे वा. पहावे ते सगळे रोचकच.
बहुतेक सगळा विदा हा २०१० पूर्वीचा आहे. म्हणजे त्यातलेही अद्ययावत नोंद ही २०१०-११ चीच आहे. म्हणजे हा वर्षभरापूर्वीचा लेख वापरून केजरी चा फुकट उदो उदो करणार का?
http://www.thehindubusinessline.com/news/maharashtra-and-gujarat-the-growth-engines/article5179764.ece
एक उदाहरण म्हणून तुमच्या आवडत्या लेखातले पर कॅपिट इनकम ५२००० च्या आसपासचे आहे. वरचा हिंदू बिझीनेस लाईनच दुवा चाळला तर ते ८९००० च्या घरात पोचलेले दिसते.
असो, अंधभक्ती ही राहणारच.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 03/06/2014 - 05:58
नवीन
गुजरात विकासाची तथ्ये आणि केजरीवाल या दोन भिन्न बाबी उगाच कशाल कनेक्ट करण्यात येत आहेत हे एक कोडं आहेच. केजरी साहेब आपली राजकारणी गरज भागवायला तिकडे गेले आहेत. गुजरातच्या विकासाच्या मॉडेलशी त्याचा काहि संबंध नाहि.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 03/06/2014 - 06:24
नवीन
विकासाचे एकच माप नसते.त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार पाहिजे. नुसतेच एखाद्या राज्यात सचिन तेंडूलकर वा लताबाई आहेत.नुसतेच अंबानीचे २७ मजली घर आहे. नुसतेच भन्नाट वेगाने जाता येणारे रस्ते आहेत. दहा दहा दिवसांचे उत्सव आहेत.म्हजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. त्या राज्यातील कनिष्ट मद्यमवर्गीयाना पूर्वीसारखा मसाला डोसा हॉटेलमधे खाता येत नाही. तर रत्यावरच्या मल्याळी माणसाच्या तव्यावरचा खावा लागतो. पाहुणा आला तर पूर्वीसारखा सरसकट चहा घेऊन जा न म्हणता येण्याएतके दूध साखर व चहा महाग झाले आहेत. आजही आमच्या सारख्या खाजगी पेन्शनराना ४०० नी पाचशे रूपये पेन्शन मिळते. कोणत्याही सरकारी ठिकाणी पैसे दिल्याखेरीज काम होताना दिसत नाही.
हे सगळे पाहिले की काही फुगले आहेत काही खंगले आहेत हे दिसते. रिओ पाहून ब्राझील समजून घेता येत नाही . आकदे खोटारडे देत असतील त मोदी खोटारडे असतीलच पण आदर्श वाल्या चव्हाणांना मचावर बसू देणारे राहुल किती खरे असतील ?
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 06:40
नवीन
अतीशय द्वेषमूलक आणि भंकस लेख
प्रत्यक्ष गुजरात मधे मात्र वेगळीच परिस्थिती आहे. आणि हे बर्याच लोकांना चांगलेच ठाऊक आहे. एखादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर इतर अनेक राज्यांच्या बराच मागे आहे. सध्या केजरीवालने ह्याच मुळावर घाव घातल्याने अर्थातच भाजप कडून प्रचंड विरोध होणार हे स्पष्ट होते.
>>>
मी आणि माझे अनेक नातेवाईक स्वतः गुजरात मधे जाऊन आलो आहे आणि स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलेल्या विकासावरुन इतके ठामपणे म्हणू शकतो की खादे आयसोलेटेड उदाहरण सोडल्यास, इन जनरल गुजरात अनेक कसोट्यांवर आघाडीवर आहे.
बाकी बकवास लेख पाडत रहा.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 03/06/2014 - 06:51
नवीन
गंमतीशीर लेख आहे
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 03/06/2014 - 07:01
नवीन
केजरीवाल यांच्यासारख्या वाचाळवीराने हा विषय हाती घेतला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटते.
राजकीय धुळवडीच्या काळाअत हा दौरा निव्वळ स्टंट असेलही पण त्यानिमित्ताने गुजरातमध्ये देशातील इतर 'कंपेरेबल' राज्यांच्या तुलनेत किती व कोणत्या क्षेत्रात वेगळा व अधिक व/वा अधिक वेगाने विकास झाला आहे हे बघणे/समजून घेणे रोचक (व आयओपनिंगही) ठरावे!
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 07:12
नवीन
आकडेवारीवरुन शिरीष कणेकरांच्या 'फटकेबाजी' मधल्या एका उदाहरणाची आठवण झाली.
एक अकराव्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज (म्हणजे तो मूळ गोलंदाज) नेहमी पाच-दहा धावा खेळून नाबाद राहत असे. एका सीझनच्या शेवटी त्याची सरासरी ११० होती.
याचा अर्थ तो चांगला फलंदाज असा घ्यायचा का?
तसंच आहे या तूलनेचे....
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 03/06/2014 - 07:19
नवीन
तुम्ही जर मोदीवर जहरी टिका केली तर तुम्ही पुरोगामी,सेक्युलरवादी,समाजातील तळागाळातील लोंकाविषयी फक्त तुम्हालाच कळवळा आहे,भ्रष्टाचारविरोधी,समाजातील सर्वात प्रामाणिक तुम्हीच असे विवीध बिरुदे आपोआप तुम्हाला प्राप्त होतात.
खेचरवाल कोणत्या आधारावर गुजरातचा विकास बघायला गेला होता. ह्याने त्याच्या आयुष्यात खोकण्याशिवाय काय उजेड पाडला आहे? पळपुटा....
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 07:56
नवीन
अहो ज्या माणसाला दिल्लीसारखे लहान राज्य पाच वर्ष सांभाळता आले नाही, पळून गेला पार्श्वभागाला पाय लाऊन, त्याने गुजरातसारख्या राज्याच्या विकासाची तपासणी करायला जाणे यासारखा मोठा विनोद नाही.
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 03/06/2014 - 07:24
नवीन
किती भाजपा कार्यकर्त्यानी दंगा केला? किती बसेस जाळल्या,रैल्वे फोडल्या? दगडफेक केली?
मग काल पळपुट्या लोकानी कशासाठी दिल्लीत दंगा केला?
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 07:55
नवीन
औमोदन
- Log in or register to post comments
र
राजो
गुरुवार, 03/06/2014 - 08:05
नवीन
मराठी भाषेला नवीन शब्दाची देणगी दिल्याबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 03/06/2014 - 09:15
नवीन
हेच बघा
निषेध व्यक्त करायला जमलेल्यांवर अमानुश गुंडागर्दी... बेशुध्द होइ पर्यंत आप कार्यकर्त्याला मारहाण. अन बातमीचे दिशाभुल करणारे टायटल काय तर "हाणामारी प्रकरणी 'आप' कार्यकर्त्यांवर गुन्हे" जणू काही आपने ठरवुनच हल्ला केला होता आणी ते बेफाम हल्ला झाल्याबद्दल स्वसंरक्षणासाठीचे प्रत्युत्तर न्हवते ? तिथे आप काय काठ्या तलवारी घेउन गेली होती का ?
एव्हडं पुरेसे नाही काय ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 03/06/2014 - 09:51
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 03/06/2014 - 10:00
नवीन
जे काहि मिडीया फुटेज बघितलं त्यावरुन तरी असं दिसतय कि भाजप कार्यकर्ते बालेकिल्ल्यातुन (म्हणजे ऑफीसच्या गेटच्या आतुन) हाणामारी करत होते आणि आआप बाहेरुन. "अमानुष" मारहाण करायला भाजप बाहेर पडलाच नव्हता. इन फॅक्ट या संपूर्ण घटनेत "अमानुष" वगैरे काहि घडलच नाहि. दोन-चार टाळकी फुटली, पण त्याला जबाबदार आशुतोष मंडळी आहेत. आपण केजरीवाल नाहि हे आशुतोषने ध्यानात ठेवायला हवं होतं. त्याला पेललंच नाहि हे आंदोलन.
बाकि पहिला दगड भाजपने फेकला असावा याची मला १००% खात्री आहे. पण तशी सिच्युवेशन आआप ने तयार केली. केजरी साहेबांनी सरळ माफि मागुन आपल्या विरुद्धची सगळी हवाच काढुन टाकली...व्हेरी स्मार्ट मुव्ह. आआपचे सर्व विरोधक त्यांना अराजकतेचं लेबल चिकटवायला निघाले आहेत. नजीक काळात तशा पुरक घटना मुद्दाम घडवल्या जातील. पण केजरीसाहेब एकटे कुठेकुठे उत्तर देणार. असो.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 03/06/2014 - 10:38
नवीन
फुटेज अजुनही बघितलं नाहीये. त्यामुळेच जे बातमीत लिहलेले आहे त्याच्याशी सुसंगत टायटल द्यावे आणी बातमीही सवीस्तर असावी. उदा.गुन्हे दाखल फक्त आपवरच झाले की परस्परांवरही झाले (अथवा कोणावर का झाले नाहीत) वगैरे वगैरे सविस्तरपणा नसेल तर एकतर्फी कवरेज का गणु नये ? मला व्यक्ती/पक्ष सापेक्षचर्चा अपेक्षीत नाही. मेडीयाने यासंदर्भात थोडे भान ठेउन बातमी लिहली तर उत्तम होइल इतकीच माफक अपेक्षा आहे. दोन्ही बाजु सवीस्तर समोर येउ देत. आणी टायटलही तितकेच समतोल अपेक्षीत आहे.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 03/06/2014 - 11:07
नवीन
एकुणच ती बातमी वाचताना काहीतरी अस्पश्ट आहे असे आता जाणवु लागलय.
म्हणूनच
हा एकमेव प्रश्न सोडला इतर सर्व विधाने मी मागे घेतो.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 03/06/2014 - 12:13
नवीन
मिडीयाचा वापर करताहेत दोन्ही पार्ट्या. मिडीया एक हत्यार बनलय. त्यांच्या कडुन कसल्या निश्पक्षतेच्या अपेक्षा करणार :(
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 11:18
नवीन
फुटेज अजुनही बघितलं नाहीये. >>
:D
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 03/06/2014 - 14:34
नवीन
मी फक्त दुवा दिलेली बातमी वाचली. आणि त्याचे शब्दांकन मला खटकले
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 03/06/2014 - 12:46
नवीन
काय हे?
सुरुवात कोणि केली ते आपणच ठरवा.
याचा अर्थ काय ते ही आपणच ठरवा.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 03/06/2014 - 14:30
नवीन
आता गीता वाचत बसत नाही.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 03/06/2014 - 09:40
नवीन
तुम्ही दिलेल्या टेबल मध्ये पहीलेच टेबल ईंफान्ट मॉरट्यालीटी रेटचा आहे.सर्वात कमी रेट गुजरातचा आहे
आणि ते नक्किच भुषणावह आहे.
बंडामामा तुम्ही दिलेल्या पहील्या पुराव्या वरुनच कळते कि तुम्ही डोक्यावर पडले आहेत.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 03/06/2014 - 09:55
नवीन
नक्की कोण डोक्यावर पडले आहेत त्याबद्दल शंका वाटते आहे.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 03/06/2014 - 14:10
नवीन
थत्ते उर्फ बंडामामा,
दर १००० जन्मा मागे ४४ बाल मृत्यू हा आकडा बाकीच्या राज्या पेक्षा नक्कीच चांगला आहे अस म्हणण आहे. त्याबद्दल तुम्हाला का ही म्हणायच आहे? असेल तरच तोंड उघडा अन्यथा ,.......
- Log in or register to post comments
स
संपत
गुरुवार, 03/06/2014 - 16:20
नवीन
अहो डँबिस००७ साहेब,
गुजरातचा ११वा नम्बर लागतो म्हणजे १८ राज्यांत बालमृत्यू प्रमाण गुजरातपेक्षा कमी आहे.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 03/06/2014 - 19:23
नवीन
त्या तक्त्यावरुन मलातरी गुजरात सगळ्यात चांगला वाटतोय..
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Fri, 03/07/2014 - 04:41
नवीन
हे घ्या !! अहो दिलेल्या लिस्ट मध्ये गुजरातचा नंबर शेवटचा आहे ना ? हा तक्ताच गुजरातची नाचक्की करण्यासाठी दिला होता पण देण्यार्याला आपण काय देतो आहोत ह्याच ज्ञान असायला पाहीजे ना? म्हणूनच म्हणा लो डोक्यावर पडलेला आहे हा माणुस.
दुसरी गोष्ट:
पोषण आणि सामाजीक विकास ईंडेक्स मध्ये ही गुजराथ भारतात तिसर्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्राच्याही वर,
१.केरळ २.हरियाण ३.तामिळ नाडू ४गुजरात ५महाराष्ट्र
- Log in or register to post comments
स
संपत
Fri, 03/07/2014 - 08:29
नवीन
अहो साहेब, भारतात २९ राज्ये आहेत. मध्य प्रदेशाचा पहिला क्रमांक म्हणजे त्यांची कामगिरी सगळ्यात खराब आहे. गुजरातचा ११ क्रमांक लागतो म्हणजे १८ राज्यांची कामगिरी गुजरातपेक्षा चांगली आहे.
तुमच्या दुसया मुद्द्याबद्दल सहमत.
मी फक्त तुम्हाला बंडामामानी दिलेला तक्ता समजावयाचा प्रयत्न करत आहे.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 03/06/2014 - 09:58
नवीन
गुजरात बकवास राज्य आहे. मागच्या २ वर्षांपासुन इथे रहातोय. भेंडी धड पाणी नाय का लाईट नाय २५-२५ तास लोड्शेडिंग करतात लेकाचे, पाणी तं मी नंदुरबाराहुन मागवतो टँकर. च्यायला रस्ते म्हंजे एवढे खड्डे की समजा तुमची गाडी गेली खड्ड्यात तर तिकडुन येणारा ट्रक जातो डोक्यावरुन.तेला बी पत्त्या नाय की हेला बी पत्त्या नाय, हाय काय त्या गुजरातात. नवा जॉब शोधतोय...... लय वैताग.
- Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/06/2014 - 11:19
नवीन
शप्पथ :D
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/06/2014 - 13:48
नवीन
गुजरातमधे पण येम.ये.शी.बी. हाय काय वं???
:) :) :) :) :) :)
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/06/2014 - 14:44
नवीन
एम एस इ बी (MSEB) - अर्थात "मंडे टू संडे इलेक्ट्रीसिटी बंद" असे म्हणायचे आहे का तुम्हाला? ;)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »