Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

श
श्रीगुरुजी यांनी
Tue, 03/25/2014 - 16:19  ·  लेख
लेख
केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते. आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्‍यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही. नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली. १९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी. एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला. --------------------------------------------------------------------------- केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.

प्रतिक्रिया द्या
65242 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

अ
अर्धवटराव गुरुवार, 03/27/2014 - 00:47 नवीन
या मुलाखतीला जर कोणि मोदिंचा पळकुटेपणा म्हणत असेल तर त्यांना केजरीवालांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा म्हणजे 'त्याग' , 'तत्वनिष्ठा' वगैरे वाटणं स्वाभावीक आहे. असो. सरणावरच्या प्रेतांनी मनोरंजन करणं - वांझोट्या ज्ञानाच्या पदव्या देणं आणि न पेलणार्‍या जबाबदार्‍यांनी त्यागी बनवण्याचे प्रयोग भारताला नवीन नाहि. एकवेळ मोदिला मृत्यु आहे... पण केजरीवाल अमर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
व
विकास गुरुवार, 03/27/2014 - 01:36 नवीन
नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का? चुकीचे गृहीतक आहे. कारण प्रत्येकजणाला आय आय टीला जावेसे वाटते असे तुम्हाला म्हणायचे आहे, जे हास्यास्पद आहे. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते. केजरीवाल ढ आहेत का नोबेल पारीतोषिकाच्या लायकीचे आहेत ह्या बद्दल मी काहीच म्हणत नाही. पण आय आय टी तून शिकले म्हणून हुषार असे म्हणायचे असते तर त्यात काहीतरी कॉम्प्लेक्स भाव नक्कीच आहे... मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही. खालील फोटोतला कसा देशाचा पंतप्रधान काय विश्वनायकच वाटतोय नाही का? :) Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
ज
जोशी 'ले' गुरुवार, 03/27/2014 - 08:36 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बंडा मामा गुरुवार, 03/27/2014 - 11:28 नवीन
१. आपण चित्रे दिलेला माणूस ना मी पंतप्रधानाचा दावेदार समजतो ना तो स्वतः तसे म्हणतो. २. मी व्हिडीयो दिला आणि आपण फोटो दिलेत. फोटो पाहुन आपण गुणवत्ता जज करणार असणार तर काय बोलायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
वेताळ Mon, 03/31/2014 - 07:00 नवीन
लेकानो शिक्षणाचा आणि बुध्दीमत्तेचा संबध असतो हे तुम्हाला कोणी शिकवले रे? साधा ग्रज्युएट नसलेल्या गेटस कडे ढिगबंडल आयआयटीयन्स चाकरी करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
ख
खटपट्या Wed, 03/26/2014 - 23:08 नवीन
इंग्रजी फाडफाड येत असेल तरच तल्लख. असे म्हणायचे का मामा तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
ब
बंडा मामा गुरुवार, 03/27/2014 - 11:31 नवीन
नाही. ज्या भाषेत इंटरव्यु देत आहोत त्या भाषेवर प्रभुत्व आणि कठोर प्रश्नांचा सामना सडेतोड मुद्दे मांडून ह्याला मी तल्लखपणा मानतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
क्लिंटन गुरुवार, 03/27/2014 - 06:13 नवीन
तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT
अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा हा प्रतिसाद आहे. म्हणजे काय तर इंजिनिअर (किंवा कदाचित डॉक्टरही) म्हणजेच तल्लख बुध्दीमत्तेचे आणि आर्ट्सवाले आडाणी. आधीच विंजिनिअर आणि त्यातून आय.आय.टीचा म्हणजे काय बोलायलाच नको.सगळ्या जगाची अक्कल केवळ यांनाच दिलेली आणि इतरांना काही समजत नाही.गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे किस झाड की पत्ती.आधीच आर्ट्सवाले म्हणजे थोडेसे 'मेन्टली चॅलेन्ज्ड' आणि त्यातून गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे ते किती मंद असतील याची कल्पनाच केलेली बरी!! या असल्या विकृत मानसिकतेचा मला स्वतःला भयंकर त्रास झाला आहे त्यामुळे असले कोणीतरी काहीतरी बरळायला लागले की ते प्रचंड डोक्यात जाते. आणि आय.आय.टी खरगपूरची काय मातब्बरी सांगता?मी पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे त्या संस्थेत ३०-३५ आय.आय.टी खरगपूरचे बी.टेक होते आणि अनेक आय.आय.टी खरगपूरवाल्यांना तिथे प्रवेश मिळालाही नव्हता. (अर्थातच आमच्याच संस्थेतील लोकांना जगातील सगळी अक्कल दिली आहे आणि बाकीचे आडाणी असा माझ्याकडे नक्कीच नाही-- अशा अ‍ॅटिट्यूडवाल्यांना इंटरव्ह्यूमध्येच वगळले जाते :) ) या असल्या 'होलिअर दॅन दाऊ' अ‍ॅटिट्यूडमुळे भारतातील कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे (आपल्याच समाजातील मोठ्या माणसांनी आणि इतरांनी). या प्रकाराला जितका होईल तितका विरोध केलाच पाहिजे.
त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.
कोणाच्याही भाषणाचा आणि कर्तृत्वाचा संबंध जोडायला काय सगळे आम आदमी पार्टीवाले वाटले का या कंसमामाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
प
पिशी अबोली गुरुवार, 03/27/2014 - 07:49 नवीन
+१००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मालोजीराव गुरुवार, 03/27/2014 - 08:32 नवीन
यावरून जगातल्या नामवंत कंपन्यांचे कॉलेज ड्रॉपआउट असणारे संस्थापक आठवले…ज्यांच्या पदरी हे आय आय टी, एम आय टी वाले काम करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ब
बंडा मामा गुरुवार, 03/27/2014 - 11:33 नवीन
मालोजीराव,
तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते.
ह्या माझ्या प्रतिसादातील वाक्याचा अर्थ काय होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
प
प्यारे१ गुरुवार, 03/27/2014 - 11:39 नवीन
त्या दृष्टीनं आमचे सांगलीचे वसंतदादा पाटील हे लौकिकार्थानं (फक्त) प्राथमिक शिक्षण घेतलेले माजी मुख्यमंत्री हुशार ठरावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
म
मालोजीराव गुरुवार, 03/27/2014 - 05:55 नवीन
केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे.
गुर्जी…तुम्ही मोदीप्रेमामुळे वाहावत जाता कधी कधी…तुमच्या पोस्ट अभ्यासपूर्ण असतात म्हणून नेहमी वाचतो. पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
क्लिंटन गुरुवार, 03/27/2014 - 06:16 नवीन
स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
याविषयी असहमती दर्शवायचे कारण नाही. तरीही...
पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.
१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मालोजीराव गुरुवार, 03/27/2014 - 06:55 नवीन
१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?
९१,९६,९८ मध्ये चव्हाण जिंकले होते हे नजरेआड कसं केलत…१९५७ ते १९९८ पर्यंत त्यांच्या घरातलाच खासदार होता (प्रेमलाकाकी आणि आनंदकाका). ९९ च्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते…तत्कालीन स्थितीप्रमाणे श्रीनिवास पाटलांना फायदा होणार उघड होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 03/27/2014 - 07:01 नवीन
हो बरोबर आहे ना. पृथ्वीराज १९९१,१९९६ आणि १९९८ मध्ये जिंकले होते. तसे तीन निवडणुका जिंकलेले अनेक खासदार आहेत.तरीही इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती असणे म्हणजे त्या मतदारसंघावर पूर्ण पकड हवी (अशी पकड नरेन्द्र मोदी किंवा वाय.एस.राजशेखर रेड्डी, सोनिया गांधी इत्यादींचीही नाही). तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मालोजीराव गुरुवार, 03/27/2014 - 08:27 नवीन
तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.
बरोबर आहे, त्यांना तिकीट मिळालं असतं तर कदाचित स्पष्ट झालं असतं असो माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/27/2014 - 08:35 नवीन
>>> माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली. पृथ्वीराज चव्हाण उच्चविद्याविभूषित आहेत. परंतु काँग्रेसमध्ये त्यांची हुशारी वाया गेल्यासारखी वाटते. त्यांची कारकीर्द मनमोहन सिंगांसारखी वाटते. सुदैवाने अधिकार पद आहे पण दुर्दैवाने निर्णयक्षमतेचा अभाव आणि निष्क्रीयता आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर निष्क्रीयता जास्तच खुपते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
न
नानासाहेब नेफळे Fri, 03/28/2014 - 11:23 नवीन
मुद्दा मान्य बरं का ! परंतु ही गुजरातमधली निर्णयक्षमता का ढेपाळते आहे तेही जरा स्पष्ट करा. हे बघा इथे. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 03/27/2014 - 12:34 नवीन
त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
हे थोडेफार मान्य आहे. पण काँग्रेस पक्षात रहायचा निर्णय त्यांचाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
व
विवेकपटाईत Wed, 03/26/2014 - 14:53 नवीन
नेफळ;, गप्पांवर विश्वास ठेवू नका , फक्त प्लान्निंग कॅमिशन चे अहवाल वाचा. गुजरात मध्ये विकास जास्त झाला हे सत्य आहे. नद्या जोडण्यात आलेल्या आहे. सरदार सरोवरचे पाणी दूरपर्यंत पोहचले आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरात कडे जास्त आहे. गेल्या दहा वर्षात फक्त १ शेतकर्याने खराब शेतीमुळे आत्महत्या केली आहे. (विश्वास नसेल तर माहिती कृषी विभाग ज्यांचे मंत्री माननीय शरद पवार आहे आर टी आईच्या माध्यमातून मिळू शकेल). महाराष्ट्रात ८०,००० कोटी खर्च करून किती जमीन ओलीता खाली आली आहे, मुख्यमंत्री सांगू शकतील का? शिवाय केजरीवाल जोर जोरात ओरडून खोट बोलण्याशिवाय काही ही करत नाही. (अर्थातच त्यांची लगाम आणखीन कोणाच्या हातात आहे) अश्या माणसाची चर्चा करणे म्हणजे मूर्खासमोर बांसुरी वाजविणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
स
संपत Wed, 03/26/2014 - 15:00 नवीन
According to NCRB database number of suicides during 2005-2009 in Gujarat 387 लिन्क : http://en.wikipedia.org/wiki/Farmers%27_suicides_in_India आणखी लिन्क्स: http://archive.indianexpress.com/news/sudden-rise-in-farmer-suicides-due-to-debt-crop-failure-gujarat-govt-figures/1192811/ http://www.dnaindia.com/ahmedabad/report-what-drove-135-gujarat-farmers-to-suicide-1815086
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व
विकास Wed, 03/26/2014 - 15:46 नवीन
एकापेक्शा जास्त असाव्यात सहमत. पुढचे वादाकरता नसून माहिती/चर्चेकरता आहे. :) According to NCRB database number of suicides during 2005-2009 in Gujarat 387 त्याला दिलेला दुवा मिंट.कॉमचा आहे. त्यात NCRB चा उल्लेख नाही जरी Government Data असे म्हणले असले तरी. Suicides in India या चॅप्टरमधे NCRB शेतकर्‍यांचा उल्लेख स्वयंरोजगारांमधे करते. त्यांची वेगळी वर्गवारी दिसली नाही. गुजरातमधे ज्या काही आत्महत्या दाखवल्या आहेत त्या विशेष करून आजारपणातून आलेल्या नैराश्यामुळे असल्याचे ही वर्गवारी दाखवते. महाराष्ट्रातील आत्महत्या आजारपण आणि कौटूंबिक कलह/प्रश्न (ज्यात कदाचीत कर्ज म्हणून शेतकरी येत असतील, नक्की माहीत नाही) असे दाखवते. एकंदरीत त्या विदाचा उपयोग शेतकर्‍यांची माहिती काढण्यासाठी दिसला नाही. केजरीवालांनी ५०००+ आकडा जो गुजरातसंदर्भात वापरला तो पूर्णपणे खोटा असावा असे वाटते. तुम्हाला त्या आकड्यासंदर्भात अधिक माहिती असल्यास अवश्य सांगावीत. वर जो केवळ एक आत्महत्येचा मुद्दा आला आहे. तो गुजरातसरकारच्या केजरीवालांच्या आरोपास दिलेल्या अधिकृत उत्तरातील आहे:
Kejriwal had alleged at the Varanasi rally that over 5,000 farmers have committed suicide in Gujarat over crop failure in the last 10 years. To this Gujarat government stated, "This is a blatant lie. During his visit to Gujarat, Kejriwal had claimed that 800 farmers had committed suicide in the last 10 years. He is so excited with forging figures that now he claims to over 5,000 farmers have committed suicides in Gujarat. The fact is only one farmer has committed suicide due to crop failure in the last 10 years."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
स
संपत Wed, 03/26/2014 - 17:13 नवीन
मी ८०० चा आकडा ऐकला होता. ५००० बद्दल मला माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
च
चिरोटा Wed, 03/26/2014 - 07:00 नवीन
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील,
तसे मनमोहन पंतप्रधान असताना लघुद्योग बंद पडतच आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोजायच्या तर सर्वात जास्त आत्महत्या पृथ्वीबाबांच्या राज्यात्,खालोखाल आंध्रप्रदेशात आहेत .दोन्ही ठिकाणी कॉन्ग्रेस्वालेच अनेक वर्षे खुर्च्या गरम करत आहेत. केजरीवाल महाराष्ट्र दौर्‍यात याविषयी बोलले का?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 03/26/2014 - 15:00 नवीन
उद्योग उघडतात आणि बंद ही होतात. दुसर्या कुठल्याही राज्यापेक्षा जास्त जास्त उद्योग गुजरात मध्ये आहे. सर्वात कमी शेतकर्यांनी गुजरात मध्ये आत्महत्या केली आहे (फक्त १ दहा वर्षात). भू संपादना बाबतीत गुजरातचे धोरण सर्वात श्रेष्ठ आहे. आणि सर्वात खराब महाराष्ट्रात. दोन वर्ष आधी चंद्रपूरला गेलो होतो. तेंव्हा नोएडा एक्स विवाद जोरात होता. जेंव्हा मी सांगितले प्रती हे. कोटी पेक्षा जास्त आणि ६% विकसित जमीन. (तिची किमंत ही कित्येक कोटी होईल) तरी ही शेतकरी नाराज आहे. हे ऐकून एकाच टिप्पणी आली: आम्ही मूर्ख आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
स
सचिन Wed, 03/26/2014 - 17:25 नवीन
अरे .... या "क्रेझी"वाल वर किती वेळ घालवायचा रे ? देवा सोळा मे लवकर येऊ दे रे बाबा !!!
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 03/26/2014 - 18:37 नवीन
.....नादी जास्त लागु नये मिपाकरहो.
  • Log in or register to post comments
B
bhaoo Wed, 03/26/2014 - 19:14 नवीन
http://www.youtube.com/watch?v=tlyG3X170S8
  • Log in or register to post comments
ब
बंडा मामा Wed, 03/26/2014 - 19:24 नवीन
एका मोदी मिनिअननी लिहिलेला पूर्वग्रह दुषीत लेख वाचण्या पेक्षा प्रत्यक्ष विडीयो प्रत्यक्ष पाहून जे काय ते ठरवावे:
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Wed, 03/26/2014 - 19:37 नवीन
इराद्यानं मोदींना वडोदरा गाठावा लागला याची चर्चा इथे झालीये. जर मोदी इतके ग्रेट आहेत तर त्यांना असा दुहेरीपणा शोभत नाही. आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? भावी PM इतका खोटारडा आणि भंपक वक्तव्य करणारा असू शकतो याचं नवल वाटतं. अर्थात स्वतःच्या सत्ताभिलेषाला दुसरा शह देतोयं असं वाटल्यावर असा बेलगामपणा स्वाभाविक आहे. वर दिलेल्या लिंकमधलं हे निरिक्षण अत्यंत योग्य आहे : For a prime ministerial candidate of the BJP this was clearly a rather low blow. Rather than debate issues that Mr Kejriwal has brought out, especially on gas prices, the Adani-Ambani connect, alleged growth figures in Gujarat etc Modi instead chose to make insinuations and target Kejriwal with such falsehoods. आणि केजरीवालांचा हा ट्विट देखिल लक्षात घेण्यासारखा आहे : Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? Kya PM ke daawedar ko ye bhasha use karna shobha deta hai? ..... एकतर स्वतःच स्वतःच्या गुरुंना (अडवानी) फुल्ल हॉर्सपॉवर दाखवून पंतप्रधानपदासाठी उतावळे झालेत आणि आता (बहुदा) वडोदर्‍यात पण साशंकता निर्माण झाल्यामुळे पार बिथरलेत. आता अशाच चुका करत करत शेवटी (इथले पापभीरु सदस्य आलेत त्याप्रमाणे) `मूळ मुद्यावर' येणार!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 03/26/2014 - 19:59 नवीन
भारताच्या नकाशावरुन काश्मीर नाहिसं करणं खरच सिरीयस मॅटर नाहि? गरज नसताना उगाच काश्मीरमधे सार्वमत घावे वगैरे भाषा करणार्‍यांना डोक्यावर बसवणं समर्थनीय आहे? दहा वर्षे गुजरातमधे काँग्रेसी नेत्यांचं हत्याकांड चाललय म्हणणं वार्‍यवर सोडुन देण्यालायक आहे? आपण काय बोलतोय, त्याचे रिपल इफेक्ट काय होऊ शकतात याचे भान सोडुन काहिही बरळत सुटायचं? भारतात विरोधीपक्षाने प्रपोज केलेल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविरुद्ध लढणारा दिल्लीचा भूतपूर्व मुख्यमंत्री काश्मीरला भारतापासुन विलग करणारे नकाशे मिरवतो, भारताची काश्मीरच्या सार्वमताबाबतची आजवरची अधिकृत भुमीका पायदळी तुडवणार्‍यांशी सलगी करतो, हा मॅसेज आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा घेतला जाईल याची काहिच काळजी करायची नाहि? एखाद्याला बेताल वक्तव्यासाठी इग्नोर करतो म्हटलं तरी त्याची काहि लिमीट? अगदीच स्पष्ट बोलायचं तर केजरीवाल अ‍ॅक्च्युली जोड्याने बडवण्याच्या लायकीचं बोलतोय आणि त्याचं कौतुक होतय?? देशातल्या देशात राजकीय पक्षांनी कितीही भांडावं, पण जागतीक पातळीवर भारताचं नाक नकटं करुन विरोधकांना अवलक्षण करण्याची हि निंदनीय दुर्बुद्धी समर्थनीय म्हणावी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 03/27/2014 - 05:29 नवीन
मोदी व केजरीवाल या अजिबातच तुल्यबळ नसलेल्या लढाया लढण्यात मला इंटरेस्ट नाही. ना केजरीवाल पंतप्रधानपदाचा दावा करताहेत ना आआप स्वबळावर सरकार स्थापन करणे शक्य आहे. त्यामुळे सरकार बनवु न शकणार्या आआपच्या परराष्ट्र धोरणांमध्ये मता फारसा इंटरेस्ट नाही. इतके नक्की दिसतेय की आआप (भाजपा व काँग्रेसपासून मुळातूनच वेगळा असल्याने)एक उत्तम - व अतिशय गरजेचा / सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी न करणारा - विरोधी पक्ष होऊ शकेल व त्यासाठी त्या पक्षाला या निवडणुकीत मत देणे फार चुकीचे ठरू नये. या निमित्ताने पुढिल मुद्द्यावर मात्र चर्चा व्हावी असे वाटते:
गरज नसताना उगाच काश्मीरमधे सार्वमत घावे वगैरे भाषा करणार्‍यांना डोक्यावर बसवणं समर्थनीय आहे?
माझ्या आठवणीनुसार भारताची अधिकृत भुमिका अशी आहे: युनोच्या सुचवणीप्रमाणे भारत सार्वमत घ्यायला तयार आहे, त्या आधी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मिरमधून सौन्य परत घ्यावे ही पूर्वअट भारताने घातली आहे. जोवर हे होत नाही तोवर भारतव्याप्त भागात निवडणुका घेत आहे, ज्या हे दाखवून देत आहे की तेथील जनता भारतात रहायला अनुकूल आहे. तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहे - अर्थात त्याची (बहुदा नजीकच्या भविष्यात अजिबात पूर्ण होऊ न शकणारी ;) ) पूर्वअट पाळूनच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
क
क्लिंटन गुरुवार, 03/27/2014 - 05:40 नवीन
तेव्हा काश्मिरात रेफरेन्डम घ्यावे ही मागणी मुळातून भारत विरोधी वाटत नाही किंबहुना ती भारताच्या अधिकृत भुमिकेशी सुसंगत अहे
पूर्णपणे अमान्य. १९५७ मध्ये काश्मीरच्या घटनासमितीने एकमताने ठराव करून काश्मीर भारताचा भाग आहे हे मान्य केले. त्यानंतर भारत सरकारने काश्मीरात सार्वमत घ्यायची मागणी कायम धुडकावून लावली आहे. त्या घटनासमितीच्या निवडणुका कशा झाल्या वगैरे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत.तरीही काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी भारताच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत आहे हे म्हणणे अयोग्य आहे. हे वक्तव्य ऋषिकेशकडून येईल अशी अपेक्षा नव्हती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 03/27/2014 - 06:18 नवीन
अपेक्षा वगैरे सगळं ठिक आहे, कोणी काय अपेक्षा कराव्यात यावर माझा धरबंद असु शकत नाही. मुळात काश्मिरच्या घटनासमितीचा ठराव आणि मी म्हणतोय तो UN चा ठराव या वेगळ्या गोष्टी आहेत. काश्मिरची घटनासमिती या बाबतीत भारताची अधिकृत भुमिका ठरवु शकत नाही. त्यानंतर भारताने सार्वमताची मागणी धुडकावून लावली आहे ते खरेच आहे, पण त्याचे कारण काय? अधिक तपशीलात शिरूयातः १. २४ जानेवारी १९५७ रोजी UN ने हा ठराव पास केला, ज्या नुसार 'that the final disposition of the State of Jammu and Kashmir will be made in accordance with the will of the people expressed through the democratic method of a free and impartial plebiscite conducted under the auspices of the United Nations' सदर ठराव एकही विरोधी मत न येता मंजूर झाला होता. अर्थात भारतावर असे सार्वमत घेणे 'बंधनकारक' झाले. त्यानंतर घटना समितीने तुम्ही म्हणताय तो ठराव एकमताने मंजूर केला. भारताची हा ठराव अनेकांना चकीत करून गेला त्यानंतर २ डिसेंबर १९५७ नंतर भारताच्या दबावाखाली पुन्हा UN एक ठराव आणाव लागला ज्यात -- असे सार्वमत घेणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नसल्याचे UN ने मंजूर केले. व आपला तिथे त्वरीत सार्वमत घेण्याचा आग्रह बाजुला ठेवला. -- (भारताने सांगितल्या प्रमाणे) Free and fair सार्वमतासाठी काश्मिरचे "डिमिलिटरायझेशन" करणे अधिक अगत्याचे व आहे हे संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केले. -- पहिली स्टेप म्हनून भारत व पाकिस्तानने स्वतंत्रपणे हे डिमिलीटरायझेशन कसे करावे हे समोरसमोर बसुन ठरवावे असे सुचवले. -- जोवर हे होत नाही तोवर सार्वमताचा २४ जानेवारीचा ठराव मागे घेतला. अर्थात भारताने सार्वमत धुडकावले नाही, तर ते घेण्यासाठी पाकिस्तान कधीही मंजूर करणार नाही अशी कल्पक अट घातली! त्यामुळे भारतची अधिकृत भुमिका आधी डिमिलिटरायझेशन करा मग सार्वमताचे बघु अशी झाली. अर्थात सार्वमताला भारताने विरोध केलाच नाही वर म्हटल्याप्रमाणे एक चतुर अट घातली आहे! माझे म्हणणे पोचले असेल अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन गुरुवार, 03/27/2014 - 13:53 नवीन
नेहरूंनी मुळातच काश्मीर प्रश्न यु.एन मध्ये नेला तो ज्या कार्टर अंतर्गत यु.एन केवळ रेकमेन्डेशन या स्वरूपाचे ठराव पास करते (आणि ते ठराव बंधनकारक नसतात) या कार्टर अंतर्गत. त्यामुळेच यु.एन ने पहिल्यांदा युध्दबंदीचा ठराव करूनही पुढचे ७-८ महिने भारतीय सैन्य त्या ठरावांना फाट्यावर मारून लढत होते. या मुद्द्यांवर मिपावर आधीच इतके चर्वितचर्वण झाले आहे की त्यावर आणखी काही नको. तरीही हा यु.एन चा ठराव भारतावर बंधनकारक कसा काय झाला असता हे समजले नाही. या दुव्यावर दिल्याप्रमाणे यु.एन ने हा ठराव पास केल्यानंतर गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी काश्मीरल्या दिलेल्या भेटीमध्ये काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून सार्वमताचा प्रश्नच नाही असे म्हटले. ही गोष्ट बरीच जुनी झाली. नंतरच्या काळातही भारत सरकारने वेळोवेळी सार्वमत घ्यायची मागणी धुडकावून लावली होती. २००० साली फारूख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना काश्मीरला स्वायत्तता द्यावी असा ठराव काश्मीर विधानसभेत पास झाला.त्यावेळी पंतप्रधान वाजपेयींनी तर म्हटले की कोणी जर राज्यांना अधिक अधिकार द्यावे अशी मागणी करत असेल तर त्यावर नक्कीच विचार होईल.पण कोणी जर काश्मीरात १९५३ पूर्वीची परिस्थिती आणा अशी मागणी करत असेल तर ते मात्र अजिबात मान्य केले जाणार नाही.तसेच २००१ मध्ये भारत सरकारने अधिकृतपणे काश्मीरात सार्वमत घ्यायची मागणी अमान्य केली. त्यापूर्वी १९८९ मध्ये राजीव गांधींनी पाकिस्तान भेटीतही काश्मीरातील सार्वमत हा 'settled issue' आहे असे म्हटले होते असे वाचल्याचे पक्के आठवते. (आता दुवा मिळत नाही). असे असतानाही आआपच्या नेत्यांनी सार्वमताचे टुमणे लावलेले कसे काय समर्थनीय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
क
क्लिंटन Fri, 03/28/2014 - 07:50 नवीन
यावर तुमचे उत्तर काय ऋषिकेश? या प्रशांत भूषण, कमलमित्र चिनॉय आणि कंपनीला काश्मीरात सार्वमत व्हावे असे वाटत असेल तर त्यापूर्वीची पायरी-- पाकिस्तानने पी.ओ.के मधून बाहेर जाणे, दहशतवादी कारवाया थांबविणे इत्यादी कराव्यात हे आजपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही पाकिस्तानला सांगितलेले नाही. तसे सांगितले असल्यास जरूर निदर्शनास आणा. की आपलं सार्वमताची मागणी करून आणि त्याला समर्थन देऊन आपण किती लिबरल आहोत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न?असो. भारतात लोकशाही आहे त्यामुळे काहीही बोलायचा (खरं म्हणजे बरळायचा) हक्क प्रत्येकाला आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ऋ
ऋषिकेश Fri, 03/28/2014 - 09:43 नवीन
यावर उत्तर आधीच दिले होते पण ते काहि प्रॉब्लेममुळे प्रकाशितच झाले नाही - पेज नॉट फाऊंड एरर आला :( म्हणून इतकं पुन्हा टंकत बसलो नाही. असो. गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचे नुसते वक्तव्यच महत्त्वाचे नाही. तर त्यानंतर भारताने उचलेलली अनेक पावले महत्त्वाची आहेत. त्यापैकीच एक UN वर दबाव वाढवणे आहे. माझ्या मुळच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या प्रयत्नांचे फलित म्हणजे स्वतः UNनेच रेफरेंडमचा ठराव मागे घेतला. तेव्हा रेफरेंडमचा निर्णय बंधनकारक असायचा प्रश्नच येत नाही. मात्र त्यावेळी भारताची भुमिका काय होती? आमच्याशी राजा हरिसिंगाने अ‍ॅक्सेशनचा करार केलाय, तेव्हा काहिहि झाले - लोकेच्छा काहिहि असेल तरी आम्ही काश्मिरवरील हक्क सोडणार नाही अशी आडमुठी भुमिका भारताने तेव्हाही घेतली नव्हती. लोकांचे मत जाणुन घेता येईलच, मात्र त्या आधी काश्मिरचे "डिमिलिटरायझेशन" होणे गरजेचे आहे. माझा मुद्दा इतकाच लिमिटेड आहे, किंबहुना यात भारताने दाखवलेले कुटनितीक चातुर्य हायलाईट करणे माझा मुख्य उद्देश आहे. राहता राहिला प्रश्न प्रशांत भुषण यांचा. पहिल्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या काय किंवा केजरीवाल यांच्या काय वक्तव्यात एका मर्यादे पलिकडे अजिबात रस नाही कारण त्यांना सध्या तेव्हढे महत्त्व का द्यावे असा प्रश्न मला पडतो. माझी इतकी उर्जा या वाचाळवीरांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी खर्च करू शकत नाही - इच्छाही नाही. तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते. मला त्यांचा हा प्रश्न मुलतः AFSPA सारख्या कायद्याशी निगडीत वाटतो. आणि माझे स्वतःचे मत सद्यस्थितीतील AFSPA कायद्याच्या विरोधात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/28/2014 - 10:39 नवीन
"लोकांचे मत" या मध्ये काश्मीरी पंडितांना सुद्धा सामील करा आणि मग बघा मजा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सुनील Fri, 03/28/2014 - 10:44 नवीन
त्याने मजा बघण्याइतपत फरक पडू नये. कारण जरी सर्वच्या सर्व पंडित कश्मिर खोर्‍यात परतले तरी त्यांची टक्केवारी ५ च्यावर जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
ऋ
ऋषिकेश Fri, 03/28/2014 - 10:48 नवीन
+१ मागे श्री गुरूजी व माझी झालेली चर्चा शोधा. त्यात त्यांनी योग्य आकडेवारी (व चुकीची टक्केवारी ;) ) दिली होती. एकुण हिंदूंपैकी २५% हून अधिक हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, मात्र ते झाले नसते तरी काश्मिरात ते अल्पसंख्यच राहिले असते, तेव्हा ते परतले तरी निष्कर्षात फरक पडू नये. मुळात ज्यांना काश्मिर वेगळे हवे आहे त्याची कारणे निव्वळ धार्मिक नसावीत, नाहितर त्यांनी काश्मिर पाकिस्तानात विलीन करावे अशी मागणी केली असती. त्यांना ते स्वतंत्र हवे असण्यामागे आर्थिक + वेगळे आंटरराष्ट्रीय राजकारण आहे असे मला वाटते, मात्र त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/28/2014 - 10:56 नवीन
ते काश्मीरात अल्पसंख्य कसे झाले? काश्मीरचा इतिहास काय? ते पण शोधा. असो. जनमत काय असायचे ते असो. ती जमीन भारताच्या मालकीची आहे. त्या जागेचे आम्हाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वही आहे (अमरनाथ वगैरे). तुम्हाला रहायचे नसेल तर पाकीस्तानाच चालू लागा असे सांगायला हवे त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
सुनील Fri, 03/28/2014 - 10:58 नवीन
अरेच्चा! मजा बघता बघता रागावलात? असं नाय करायचं!! मजा बघायची!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
ऋ
ऋषिकेश Fri, 03/28/2014 - 11:09 नवीन
ते काश्मीरात अल्पसंख्य कसे झाले? काश्मीरचा इतिहास काय? ते पण शोधा.
किती मागे जायचं ते ही सांगा! माझ्या माहितीप्रमाणे हिंदु काश्मिरात किमान गेली शंभरवर्षे तरी अल्पसंख्यच आहेत! काश्मिरीपंडित तिथेच रहात असतानाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
ऋ
ऋषिकेश Fri, 03/28/2014 - 10:48 नवीन
+१ मागे श्री गुरूजी व माझी झालेली चर्चा शोधा. त्यात त्यांनी योग्य आकडेवारी (व चुकीची टक्केवारी ;) ) दिली होती. एकुण हिंदूंपैकी २५% हून अधिक हिंदूंना विस्थापित व्हावे लागले, मात्र ते झाले नसते तरी काश्मिरात ते अल्पसंख्यच राहिले असते, तेव्हा ते परतले तरी निष्कर्षात फरक पडू नये. मुळात ज्यांना काश्मिर वेगळे हवे आहे त्याची कारणे निव्वळ धार्मिक नसावीत, नाहितर त्यांनी काश्मिर पाकिस्तानात विलीन करावे अशी मागणी केली असती. त्यांना ते स्वतंत्र हवे असण्यामागे आर्थिक + वेगळे आंटरराष्ट्रीय राजकारण आहे असे मला वाटते, मात्र त्याबद्दल पुन्हा कधीतरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 03/28/2014 - 10:46 नवीन
तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.
असे असेल तर वर झालेली सर्वमतावरील चर्चा व्यर्थ गेली! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Fri, 03/28/2014 - 10:49 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
क
क्लिंटन Fri, 03/28/2014 - 11:14 नवीन
राहता राहिला प्रश्न प्रशांत भुषण यांचा. पहिल्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मला त्यांच्या काय किंवा केजरीवाल यांच्या काय वक्तव्यात एका मर्यादे पलिकडे अजिबात रस नाही कारण त्यांना सध्या तेव्हढे महत्त्व का द्यावे असा प्रश्न मला पडतो. माझी इतकी उर्जा या वाचाळवीरांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी खर्च करू शकत नाही - इच्छाही नाही.
हे वाचाळवीर आहेतच.तरीही जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा नेता असे काहीतरी बोलत आहे.त्यातूनही बोलणार्‍या पक्षाचा नेता बाबा दूरदर्शींच्या दूरदर्शी पक्षाचा नाही तर दिल्लीत २९% मते आणि २८ जागा जिंकणार्‍या पक्षाचा नेता आहे.तेव्हा या गोष्टीला इतके निग्लेक्ट करणे कितपत योग्य आहे?
तरी त्यांचा प्रश्न/मत सार्वमत हे पाकव्याप्त काश्मिरबद्दल नसून 'भारतव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय सैन्य हवे का नको? यावर सार्वमत घ्यावे' अश्या अर्थाचे होते असे आठवते.
यातील भारतव्याप्त या शब्दावरच मुळात आक्षेप आहे.भारतात लोकशाही आहे याचा हा गैरफायदा घेतल्यासारखे झाले. आणि आआपला उठल्यासुटल्या सगळ्या गोष्टीवर सार्वमते घ्यायची खाज असेलही.पण काश्मीरातून सैन्य काढून घेतले तर त्याचे नक्की काय परिणाम होतील (अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्रधोरण इत्यादी) याचा सारासार विचार करण्यासाठी लागणारी सगळी माहिती सामान्य जनतेला नसते आणि तशी देणे योग्यही नाही. आपल्या एरियात बाग हवी की शाळा हवी यावर सार्वमत घेणे वेगळे आणि इतके दूरगामी परिणाम करू शकणार्‍या गोष्टीवर सार्वमत घेणे वेगळे एवढी जाण प्रशांत भूषण जे काही बरळला त्यात काहीही गैर न वाटणार्‍या मिपावरील अतिलिबरल लोकांना कशी नाही याचेच आश्चर्य वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
स
संपत गुरुवार, 03/27/2014 - 07:49 नवीन
एक उत्तम - व अतिशय गरजेचा / सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी न करणारा - विरोधी पक्ष होऊ शकेल व त्यासाठी त्या पक्षाला या निवडणुकीत मत देणे फार चुकीचे ठरू नये.
अगदी माझ्याच भावना मांडल्यात. आणखीन एक गोष्ट म्हणजे आआपच्या निवडणूक निधी जमवण्याच्या पद्धतीमुळे त्याना मोठ्या उद्योगांची गरज नसेल म्हणून लॉबिंगला बळी पडण्याची शक्यता कमी. (अवांतर : लॉबिंगवरून आठवले, कोणी अमेरिकन राजकारणावर आधारित 'हाउस ऑफ कार्ड्स' बघते का? अतिशय रंजक मालिका) बाकी काश्मीर सार्वमताबद्दलची माहिती मला पूर्ण नवीन होती. आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
अ
असंका गुरुवार, 03/27/2014 - 12:39 नवीन
योग्य वेळी आली आहे ही मालिका नाही? USA काय किंवा आपण काय्...माणूस इथून तिथून एकच....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा