Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

श
श्रीगुरुजी यांनी
Tue, 03/25/2014 - 16:19  ·  लेख
लेख
केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते. आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्‍यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही. नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली. १९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी. एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला. --------------------------------------------------------------------------- केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.

प्रतिक्रिया द्या
65242 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

स
संपत Fri, 03/28/2014 - 06:45 नवीन
अगदी योग्य वेळी.. थोडे अतिरंजित असेल तरी वरवर राष्ट्रहिताच्या वाटणाऱ्या एका खेळीमागे चार खेळीनंतर होऊ शकणारा स्वताचा फायदा बघणे अतिशय रंजक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
अर्धवटराव गुरुवार, 03/27/2014 - 12:42 नवीन
आज काश्मीर मधल्या फुटीरतावादी पक्षांचं म्हणणं देखील सार्वमताच्या बाजुने आहे...व त्यांना देखील आपण भारताचे नागरीकच समजतो. आआप केंद्रात सत्तेवर येते कि नाहि हा वेगळा भाग झाला. पण भारताप्रमाणेच बाहेर देखील आआपला मोदिंविरुद्ध लढणारा पक्ष म्हणुन मिडीया कव्हरेज मिळतय. तेंव्हा घरातल्या भांडणाला चव्हाट्यावर आणु नये, त्यामुळे शत्रुला काहिएक फायदा मिळु नये असं वाटतं. मी जे काहि थोडंफार राजकारणाबद्दल वाचन करतो त्यात बरेचदा तत्कालीन निवडणुका व राजकीय पक्षांच्या भुमीकांचा लेखाजोखा असतो, त्याच्या प्रत्यक्ष्य-अप्रत्यक्ष्य परिणामांचा उहापोह असतो. आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय पक्षाची बीजं असणारा पक्ष म्हणुन पाहात असु तर त्यांच्याकडुन योग्य त्या खबरदारीची अपेक्षा आहे. अन्यथा बेताल राजकीय पक्षांची आपल्याकडे वानवा नाहिच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 03/27/2014 - 13:05 नवीन
आआपकडे आपण एक जबाबदार राजकीय पक्षाची बीजं असणारा पक्ष म्हणुन पाहात असु तर त्यांच्याकडुन योग्य त्या खबरदारीची अपेक्षा आहे. अन्यथा बेताल राजकीय पक्षांची आपल्याकडे वानवा नाहिच.
सहमत आहे. फक्त एखाद्या पक्षाला- थेट बोलायचं तर आआपला - एकाच व्यक्तीच्या माकडचाळ्यांवरून, एखाद्या वक्तव्यावरून जोखुन - खरतर त्यावरून नुसतीच राळ उडवून देत - आपण घाई करतोय का? अशी शंका येऊ लागली आहे. अशी वक्तव्ये, चुका सगळेच पक्ष करतात. एकाने एक उदा काधले की लगेच समोरच्याचे दुसरे उदा काढणार. आआपच्या उमेदवारांची यादी पाहिली की खरंतर आनंदून जावंस वाटतं असे उमेदवार उभे आहेत. एका वाचाळवीरामुळे त्यांना सार अव्हेरून टाकावं असं वाटत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 03/27/2014 - 16:08 नवीन
माझा मुख्य आक्षेप आपण कुठल्या बाबतीत वाचाळवीरता खपवुन घ्यावी यावर आहे. देशांतर्गत मुद्द्यांवर करा ना कंठशोक... कुणि नाहि म्हटलय... पण देशाच्या सीमारेषांच्या मर्यादा पाळायला हव्यात. दुसरा मुख्य आक्षेप तर स्वतः पक्षप्रमुखांच्या वाचाळवीरतेचा आहे. विरोधी मताचा आदर, त्याचे विरोध करण्याचे हक्क सर्वथैव मानणे हा लोकशाहिचा गाभा. अशी सर्वात मोठी लोकशाही मिरवणारा भारत हा जगमान्य देश. या देशाच्या निवडुकीत विरोधिपक्षाकडुन एक संभाव्य प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर होणं. व या उमेदवारावर एक दशकभर विरोधकांचं शिरकाण करण्याचा आरोप करणं. त्याला केंद्राची हरकत नसल्याचा प्रच्छन्न आरोप करणं. हि संपूर्ण घटना मला फार गंभीर वाटते. याला फक्त वाचाळवीरता म्हणुन सोडुन देणं थोडं कठीण जातं. अशा कट्यांचे नायटे होतात व ते देशाच्या इभ्रतीला मारक ठरु शकतात. केवळ केजरीवालंविरुद्ध राळ उठवावी इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा आलाप नाहि. आआपचा राजकारणातला उदय अनेकांगानी आशादायक आहेच. भारताच्या राजकारणाला व्यक्तीसमस्या, भ्रष्टाचारविरोध वगैरे मुद्द्यांवर फोकस करायला लावणारे आआपचे कार्यक्रम केवळ फँटसी न राहता ते वास्तवात उतरावे म्हणुनच नुकताच जन्माला आला असतानाही आआपकडुन जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
विकास गुरुवार, 03/27/2014 - 16:19 नवीन
संपूर्ण प्रतिसादाशीच समहमत पण विशेष करून खालील भागाशी:
केवळ केजरीवालंविरुद्ध राळ उठवावी इतक्या क्षुल्लक कारणासाठी हा आलाप नाहि. आआपचा राजकारणातला उदय अनेकांगानी आशादायक आहेच. भारताच्या राजकारणाला व्यक्तीसमस्या, भ्रष्टाचारविरोध वगैरे मुद्द्यांवर फोकस करायला लावणारे आआपचे कार्यक्रम केवळ फँटसी न राहता ते वास्तवात उतरावे म्हणुनच नुकताच जन्माला आला असतानाही आआपकडुन जास्त जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे.
राजकारणात आले ते देखील उत्तमच पण त्यानंत\र जे काही चालले आहे ते आक्षेपार्ह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ऋ
ऋषिकेश Fri, 03/28/2014 - 09:48 नवीन
भुमिका व अपेक्षा समजली. अंशतः सहमतीचे काहि छोटे मुद्दे आहेत पण ते काही खरे नव्हे! माझ्या दृष्टीने आआपची भारतीय परिप्रेक्ष्यातील अपेक्षित भुमिका व तुमच्या अपेक्षित भुमिका यात बरेच मोठे अंतर आहे. त्यामुळे आपले एकमत होणे बरेच कठिण आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
उ
उपास Wed, 03/26/2014 - 20:13 नवीन
अहो संक्षि, त्याबतीत तुम्ही बरोब्बर तुमच्या बाब्या म्हणजे केजरीवालच्या लायनीवर गेल्यात.. आपल्याला अडचणीचं ते सगळं सोडून द्ययाचं आणि आपलचं घोडं पुढे दामटत राहायचं! तुम्हाला मागे मी म्हटलं होतं की आपली अमेरिकन लोकशाही नाहिये, तेथे तुम्ही सोयीस्कर दुर्लक्श केलतं. दोन्ही कडून उभं राहाणं काहीच गैर नाही आणि वाराणसीतल्या एखाद्या मतदार संघाने (किंवा कुठल्याही एका मतदारसंघाने) भारताचा भावी पंतप्रधान ठरवावा असं तुमचं मत असेल तर धन्य झाली. आपण काही मोदी समर्थक नाही पण केजरीवालपासून खुप मोठा धोका ढळढळीत दिसतोय भारताला.. आंतरराष्ट्रीय पातळीवर वर अर्धवटरावांनी म्हटल्याप्रमाणे भारताची प्रतिमा मलिन करुनच सोडणार तो..! ढोंगीपणा, स्वार्थीपणा आणि आपण आहोत त्यापेक्षा ग्रेट असं दाखवणं ह्यात केजरीचा हात सद्ध्या तरी कुणी धरेल असं वाटत नाही, गंमत म्हणजे सुशिक्षित लोकं जी केजरीच्या बाजूने होती, दिल्ली प्रकरणानंतर बाजूला झालेयत एवढं सुद्धा कळेना त्याला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
व
विकास Wed, 03/26/2014 - 20:27 नवीन
अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? मोदींनी जे पाहीले ते सांगितले काँग्रेसने दुर्लक्ष केले हा फरक आहे. मोदींनी "ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट" म्हणलेले नाही. त्यांचे वाक्य असे आहे: "There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," अर्थात केजरीवालांच्या एकाच वेळेस खुळचटपणामुळे आणि लबाडीमुळे ते असे काही वागत आहेत जे पाकीस्तानच्या पथ्यावर पडत आहे आणि म्हणून पाकीस्तान त्यांचे कौतुक करत आहे... असे काय ते करत आहेत? खालची चित्र पहा... हे आप च्या संस्थळावरचे आहे. नकाशातले काश्मीर भारतात नाहीच! तेच अरूणाचल प्रदेशाचे पण... अर्थातच बोंबाबोंब झाल्यावर ते काढून टाकण्यात आले आहे. पण माहीतीतंत्रज्ञानाच्या जगात काही कायमस्वरूपी खोडणे अवघडच असते. तेच येथे पण झाले आहे: (इंडीया टूडे मधून घेतलेला आहे). Image removed. The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.

गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?

हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते. Image removed. त्या व्यतिरीक्त आपचे नेते प्रशांत भूषण काय म्हणाले ते माहीत असेलच. नक्षलवादासंदर्भात आत्ता चर्चा नको. तो मुद्दा पण येईलच लवकर... थोडक्यात मोदींच्या भाषणात एके हे एजंट आहेत असे म्हणलेले नसताना देखील, कस्सा माझा गरीबबिचार केजरू... ट्वीट करतो, "Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? " ... ह्याला खोटारडेपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव Wed, 03/26/2014 - 20:38 नवीन
आपल्या सक्ख्या/सावत्र भावाला विरोध करण्यासाठी कुणी आपल्या आईला भर रस्त्यावर नागडं करावं, तसलं वागतोय केजरीवाल... आणि त्याचं कौतुक होतय भारतात... अहो राजकारण, सत्तासंघर्ष वगैरे ठीक आहे. तो मोदी किंवा दुसरं कुणीही सत्तेत यावं, येऊ नये, काय व्हायचं ते होईल. हे जाणं येणं सुरुच असतं. पण देशाची इज्जत विकुन इमानदारीची टोपी विकत घेणार्‍यांचं पीक उपजावं हे अत्यंत लांछानास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बंडा मामा Wed, 03/26/2014 - 21:53 नवीन
अर्धवटराव असले बरेच मुद्दे/विडीयो आले आणि गेले. केजरीवालचे काश्मिर विषयी काय मत आहे हे स्पष्ट आहे. त्याने बर्‍याचदा ते मांडले आहे. उगाच नकाशे काढले आणि प्रशांत भुषण काय म्हणाले वगैरे वरुन सभ्यतेच्या मर्यादा सोडू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 03/26/2014 - 22:07 नवीन
नकाशे, प्रशांत भूषण, काँग्रेस नेत्यांची हत्या वगैरे तुम्हाला सिरीयस वाटाव्या असा माझा काहि आग्रह नाहि. देशाच्या सीमेपलीकडे त्याचे काय व्हायचे ते परिणाम झालेच आणि होतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
व
विकास गुरुवार, 03/27/2014 - 01:30 नवीन
मर्यादांच्या बाबत बोलताना ... नकाशासंदर्भातील परत वरच्या प्रतिसादातील भाग चोप्य पस्ते करतो...
गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
व
विकास गुरुवार, 03/27/2014 - 02:09 नवीन
केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या...
  1. राजकारणात येणार नाही.
  2. (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
  3. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
  4. दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
  5. वगैरे वगैरे
तेंव्हा भातावरून शिताची परीक्षा केली तर चालेल नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
च
चिगो Fri, 03/28/2014 - 11:26 नवीन
पण देशाची इज्जत विकुन इमानदारीची टोपी विकत घेणार्‍यांचं पीक उपजावं हे अत्यंत लांछानास्पद आहे.
क्या बात, अर्धवटराव.. अत्यंत धारदार वाक्य. च्यामारी, तुम्ही लढाच निवडणूक आता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 03/27/2014 - 13:31 नवीन
जो भाग भारताच्या ताब्यात नाही तो भारतानी त्याच्या नकशात का दाखवावे? उद्या भारत चीन पण दाखवेल नकाशात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास गुरुवार, 03/27/2014 - 14:21 नवीन
जो भाग भारताच्या ताब्यात नाही तो भारतानी त्याच्या नकशात का दाखवावे? उद्या भारत चीन पण दाखवेल नकाशात. त्या नकाशात श्रीनगर पण भारतात नसल्याचे दाखवले आहे. मग तुमचे असे म्हणणे आहे का की श्रीनगर भारतात नाही म्हणून? चीन अरूणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवते. आपचा नकाशा पाहीला तर त्यात तो भाग देखील डिस्प्युटेड म्हणून दाखवला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Fri, 03/28/2014 - 13:29 नवीन
श्रीनगर पण भारतात नसल्याचे दाखवले आहे
जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रीगुरुजी Fri, 03/28/2014 - 16:49 नवीन
पाकिस्तानची सरहद्द ओलांडून श्रीनगरमध्ये अतिरेकी घुसतात व तिथून उर्वरीत भारतात जाऊ शकतात. काश्मिरवरून भारत-पाकिस्तानमध्ये ४ वेळा युद्ध झालेले आहे. त्यामुळे तिथे लष्कर अत्यावश्यक आहे. तुमच्या वाक्यावरून तुम्हाला असे म्हणायचे असावे की काश्मिरी जनतेला भारतात रहायचे नाही व निव्वळ लष्कराच्या जोरावर त्यांना गप्प करण्यात आले आहे आणि संधी मिळाली तर तिथली जनता भारताच्या बाहेर पडेल. चॅथम इंटरनॅशनल या इंग्लंड मधील संस्थेने २००९ मध्ये काश्मिरमध्ये एक सर्वेक्षण केले होते. त्यांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे - काश्मिर स्वतंत्र देश म्हणून हवा - ४३ % (श्रीनगर खोर्‍यातील बहुसंख्य नागरिकांना काश्मिर स्वतंत्र देश हवा आहे. जम्मू व लडाख मधील नागरिकांचे मत उलटे आहे) भारतात विलिनीकरण हवे - २८% (श्रीनगर खोर्‍यातील बहुसंख्य नागरिकांना भारताबरोबर विलिनीकरण नको आहे. जम्मू व लडाख मधील नागरिकांचे मत उलटे आहे.) पाकिस्तानात विलिनीकरण हवे - २ % (फक्त २ टक्के) सध्याची ताबारेषा ही कायमस्वरूपी सीमारेषा करावी (म्हणजे भारताकडील भाग भारताकडे आणि पाकिस्तानने बळकावलेला पाकिस्तानकडे) - १९ % माहित नाही/भारत-पाकिस्तान संयुक्त नियंत्रण - ८ % एकंदरीत भारतातच रहायचे असे ४७ % लोकांचे मत आहे व स्वतंत्र व्हायचे असे ४३ % लोकांना वाटते. निम्म्याहून जास्त लोकांना भारताच्या बाहेर जावयाचे नाही. स्वतंत्र काश्मिर किंवा भारतात विलिनीकरण किंवा सध्याची ताबारेषा हीच कायमस्वरूपी सीमारेषा असेच ३ मुख्य पर्याय दिसत आहे. असे विचित्र मतविभाजन असल्यामुळे काश्मिरमध्ये सार्वमतातूनसुद्धा बहुमताने कोणताही तोडगा निघणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे काश्मिर खोरे व लडाख आणि जम्मूतील लोकांची मते पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. हा अहवाल इथे उपलब्ध आहे. http://www.chathamhouse.org/sites/default/files/public/Research/Asia/0510pp_kashmir.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ग
गब्रिएल Sun, 03/30/2014 - 15:14 नवीन
जर तुम्ही श्रीनगर ला गेलात तर तुम्हाला कळेल की ते खरच भारतात नाहीये. लष्कराच्या बळावर दाबुन ठेवले आहे. येक लंबर निर्बुद्ध प्रतिसाद. का काय आएसाय का दावूदकड्न काय मलिदा येतोय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Fri, 03/28/2014 - 13:31 नवीन
चीन अरूणाचल प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवते
अरुणाचल प्रदेश कधी भारतात होआ? ब्रिटिशांच्या कृपेनी तो भारताला जोडला गेला. आणि दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला आणि त्याला चीनी म्हणत होते. जर तो चीनी होता तर मग मणिपुर आणि अरुणाचल, मेघालय भारतात कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
क्लिंटन Fri, 03/28/2014 - 13:35 नवीन
दिल्लीत मणिपुरी मुलाला चीनी म्हणुन तुम्हा भारतीय लोकांनीच मारला
तुम्हा भारतीय लोकांनी म्हणजे याचा अर्थ तुम्ही भारतीय नाही का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Fri, 03/28/2014 - 13:37 नवीन
जन्मानी भारतीय ( जे कोणाच्या हातात असते ?). मी भारतीय आहे की नाही ह्या पेक्षा मी काय लिहीले आहे त्यावर विचार करा. टीपिकल भारतीय मनोवृत्ती दाखवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ब
बंडा मामा Fri, 03/28/2014 - 19:23 नवीन
मी भारतीय आहे की नाही ह्या पेक्षा मी काय लिहीले आहे त्यावर विचार करा. टीपिकल भारतीय मनोवृत्ती दाखवू नका.
अवास्तव मागणी केली आहेत तुम्ही. ह्या स्वघोषीत पॉलीटीकल अ‍ॅनालिस्ट लोकांच्या डोक्यात काहीही शिरणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ग
गब्रिएल Sun, 03/30/2014 - 15:17 नवीन
जल्मानम भार्तिय पन कर्मानं कोन? पाकीस्तानी की चीनी की हायब्रीड... नाय येक शंखा आप्लि :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
म
मंदार दिलीप जोशी गुरुवार, 03/27/2014 - 14:23 नवीन
मित्रा, ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा सोडलेला नाही तो भाग कागदोपत्री आपल्या नकाशात दाखवणे योग्य आहे. कारण त्याने आपला त्या भागावर क्लेम राहत असावा. उद्या युद्ध झालेच तर तो भाग आपण प्रत्यक्षात ताब्यात घेऊ शकतो. जर आत्ताच तो दाखवला नाही तर क्लेप सोडून दिल्यासारखे आहे, मग युद्धात जय झाला तरी तो भाग आपण आपला आहे असे म्हणू शकत नाही - अर्थात हे भारत हा आंतरराष्ट्रीय (वाचा: अमेरिकन) दडपणाखाली अती झुकणारा देश आहे आहे हे समजूनच लिहीले आहे. नाहीतर चीन सारखे देश असूरी लष्करी ताकदीच्या आणि मुख्य म्हणजे ठाम राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर वाट्टेल ते परदेशी प्रदेश आपल्या नकाशात दाखवतात (यातली दुसरी गोष्ट नक्कीच आपल्याकडे नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Fri, 03/28/2014 - 13:24 नवीन
ज्या भागाचा अधिकृतरित्या ताबा सोडलेला नाही
अधिकृत रित्या म्हणजे काय? ह्याच कॉग्रेस सरकार नी "कसेल त्याची जमिन" असा कायदा आणुन ब्राह्मणांच्या जमिनी लाटल्या. पाकिस्तान आता तो भाग गेली ६२ वर्ष कसत आहे, मग तो त्यांचा नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
प
प्रसाद१९७१ Fri, 03/28/2014 - 13:27 नवीन
नाहीतर चीन सारखे देश असूरी लष्करी ताकदीच्या
तुमचे लष्कर म्हणजे देवाचे सैन्य आणि चीन चे लष्कर म्हणजे "असुरी"????? असे नसते हो. जरा मोठे व्हा. आणि युद्धात जय वगैरे होइल असली दिवास्वप्न बघु नका. सैन्या कडे २० दिवस पुरेल एव्हडा पण दारुगोळा नाहीये. कारगील च्या छोट्याश्या चकमकीत बोफोर्स चे तोफगोळे संपायला आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
ग
गब्रिएल Sun, 03/30/2014 - 15:20 नवीन
मंग तर तुमच्या म्हण्ण्यापर्माने हे भुस्काट कॉन्ग्रेस सर्कार पाडलं पायजेच नाय्का? वा वा प्रसाद१९७१म्हंत्यात, वोट फॉर मोदी. लै झ्याक नाय्का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/27/2014 - 09:31 नवीन
>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! भारताचा नकाशात काश्मिर वगळल्यामुळे व काश्मिरमध्ये सार्वमत घ्यावे अशी मागणी 'आप'च्या वरिष्ठ नेत्याने केल्यामुळे काही जण केजरीवालांना आयएसआय चे हस्तक व पाकिस्तानचे एजंट म्हणत आहेत. जर केजरीवालांना या टीकेचा राग आला असेल, तर असे न म्हणता आपण त्यांना उदारमतवादी व निधर्मी म्हणूयात. आता तरी खूष ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/27/2014 - 16:30 नवीन
>>> आज तर जम्मूत मोदींनी हाईट केली. अरविंदना AK 49 असं संबोधून ते पुढे म्हणाले की केजरीवाल ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट आहेत! आता काय फरक राहीला काँग्रेसी नेत्यात आणि मोदींच्यात? भावी PM इतका खोटारडा आणि भंपक वक्तव्य करणारा असू शकतो याचं नवल वाटतं. अर्थात स्वतःच्या सत्ताभिलेषाला दुसरा शह देतोयं असं वाटल्यावर असा बेलगामपणा स्वाभाविक आहे. केजरीवाल तर गेले अनेक महिने हाईट करत आहेत. गुजरातेत जाऊन कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी थेट गंभीर आरोप केले की,"मोदी आपल्या विरोधकांना विकत घेतात किंवा मारून टाकतात". अशा गंभीर आरोपांसाठी कोणतेही पुरावे द्यायची त्यांना गरज वाटत नाही. कदाचित विरोधकांना ते मॅनेज करत असतील. पण ते थेट त्यांना मारून टाकतात? अशा मारल्या गेलेल्यांची यादी आहे का केजरीवालांकडे? परवा वाराणशीत बोलताना बेजबाबदार आरोपांची नवीन उंची त्यांनी गाठली. "मोदी वाराणशीतून निवडून आले तर इथले सगळे उद्योगधंदे बंद पडतील. वाराणशीच्या आजूबाजूच्या गावातील सर्व शेतकरी आत्महत्या करतील." असे अत्यंत बेलगाम आरोप त्यांनी केले. स्वच्छ राजकारणाचा पुकारा देणारा व व्यवस्था बदलायला ज्याने अवतार धारण केला आहे, अशा महात्म्याने असे बिनबुडाचे गंभीर आरोप करावे याचा अत्यंत खेद वाटतो. मोदी वाराणशीतून निवडून आले तर ते इथला विकास करणार नाहीत किंवा ते या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतील असे आरोप एकवेळ ठीक आहेत. पण ते निवडून आले तर इथले सगळे उद्योगधंदे बंद होतील आणि सर्व शेतकर्‍यांना आत्महत्या करावी लागेल? केजरीवालांच्या बाबतीत किती खालची पातळी गाठावी याला काहीच मर्यादा दिसत नाही. >>> आणि केजरीवालांचा हा ट्विट देखिल लक्षात घेण्यासारखा आहे : >>> Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? Kya PM ke daawedar ko ye bhasha use karna shobha deta hai? ..... केजरीवालांनी आणि आप समर्थकांनी जरा अंतर्मुख होऊन आपण जे बिनबुडाचे सनससाटी आरोप करत आहोत ते आपल्याला शोभा देतात का याचा विचार करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ध
धन्या गुरुवार, 03/27/2014 - 06:36 नवीन
छान चालू आहे. आयायटीच्या यमटेकचा उदो उदो करणार्‍यांना सांगावेसे वाटते, बाबानो शालेय किंवा पुस्तकी शिक्षणाचा आणि माणसाच्या माणूस म्हणून असण्याचा विशेष संबंध नसतो. वास्तवाचं, आजू-बाजूच्या परिस्थीचं नेमकं भान नसलेला पुस्तकी हुशार स्वतःला आणि इतरांना खडडयात घालू शकतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 03/27/2014 - 13:39 नवीन
माझ्या कंपनीत तर "मी आय आय टी मधुन पास झालो" असे बोर्ड लावुन बसला तरी विश्वास बसणार नाही अशी बथ्थड आय आय टी पासआउट माणसे बघितली आहेत ( अनेक )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बंडा मामा Fri, 03/28/2014 - 19:20 नवीन
आय आय टी आणि आय आय एम मधले बत्थड इथे सुद्धा मुबलक दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
म
मैत्र Sun, 03/30/2014 - 17:49 नवीन
काही दहावी नापास आहेत की काय वाटावं असे बत्थड सुद्धा दिसतात - बरोबर ना? त्यांच्या आय आय टी / आय आय एम बद्दल काहीच कल्पना नाही त्यामुळे ते बत्थड असण्याबद्दल जास्त शक्यता वाटते.. तुम्हाला वाटतात बत्थड म्हणजे १००% बत्थड असलेच पाहिजेत - कारण तुम्हाला वाटतं तेच आणि फक्त तेवढंच खरं आणि बरोबर.. - हो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 03/27/2014 - 15:43 नवीन
अहो ते आय टी आय असतील ,परत विचारुन पहा.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 03/27/2014 - 15:53 नवीन
अहो ते आय टी आय असतील ,परत विचारुन पहा. आय टी आय मधून असणार्‍यांना तुच्छ लेखणे हा देखील एक नवजातीयवादच आहे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/28/2014 - 05:31 नवीन
मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात कुल्याला पाय लाऊन पळून गेलेले केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थान मात्र अद्यापही सोडलेले नाही (काय प्रामाणिकपणा आहे बघा :P ) अशा या महाशयांना ८५,०० भाडे भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. Arvind Kejriwal told to pay Rs 85,000 as monthly rent NEW DELHI: The Delhi government has issued a notice to former chief minister and Aam Aadmi Party chief Arvind Kejriwal to pay Rs 85,000 per month as rent for the Tilak Lane flat in which he has been staying since February 1. Party sources said no notice had been received till Thursday night, but Kejriwal would pay the rent and continue to stay in the house till August. The AAP leader had resigned on February 14, only days after he had moved into the flat —C-II/23. Shortly after that, he had announced that he would stay in it till his daughter's exams are on, which finished last week. On Thursday, sources said he would stay in the flat for five more months and will pay the rent for that duration. According to the norms, a Delhi minister is allowed to stay in his or her official residence for 15 days without paying rent after a particular government ceases to exist. The notice issued by the special secretary of PWD after lieutenant governor's clearance has asked Kejriwal to pay the market rent of Rs 85,000 per month from March 1 for the three-bedroom flat in central Delhi. He has also been asked to respond to the notice within a week. Earlier this month, PWD had sent another letter to Kejriwal, asking him to vacate the flat since he had already crossed the 15-day period. Party sources said that soon after resigning, Kejriwal had announced that he would continue to stay in the house by paying rent for the permissible six months. "Both notices were sent as per protocol. Kejriwal has not started paying rent right now since there was no intimation by the government on the amount to be paid. Once he receives the notice, he will pay the rent. He will also not stay in the house beyond the duration that has been permitted for ministers," a source said.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 03/28/2014 - 05:34 नवीन
मुख्यमंत्रीपदावरुन ४९ दिवसात कुल्याला पाय लाऊन पळून गेलेले केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थान मात्र अद्यापही सोडलेले नाही (काय प्रामाणिकपणा आहे बघा )
त्यांच्या मुलांच्या परिक्षा संपल्या की ते निवासस्थान बदलणार आहेत असे त्यांनी मुलाखतीत सांगितल्याचे आठवते. ऐन परिक्षेत घरे बदलणे किती त्रासदायक होऊ शकते याची कल्पना असल्याने हे कारण मला संयुक्तिक वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/28/2014 - 05:36 नवीन
१४ फेब्रुवारीपासून ते ऑगस्ट पर्यंत चालणारी कुठली परीक्षा असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Fri, 03/28/2014 - 05:38 नवीन
अच्छा! ऑगस्टपर्यंत तिथे रहाणार आहेत का? मग ते अयोग्य वाटते याच्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
स
संजय क्षीरसागर Fri, 03/28/2014 - 11:56 नवीन
केजरीवालांनी दिल्ली सरकारला तशी विनंती केली आहे आणि त्यासाठी लागणारे जास्तीचे भाडे (तो फरक मोठा आहे) देणार आहेत. पाच बेडरुमचा फ्लॅट वगैरे बोंबाबोंब मिडियानं केली होती पण तो तीन बेडरुम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मंदार दिलीप जोशी Fri, 03/28/2014 - 12:10 नवीन
८५००० रुपये भाडे द्यायला या माणसाकडे पैसा कुठून येणार ते उघड आहे. फोर्ड फौंडेशन नैतर लोकांकडे हात पसरणार. पाच बेडरुमचा फ्लॅट वगैरे बोंबाबोंब मिडियानं केली होती पण तो तीन बेडरुम आहे. >> किती तो त्याग. फ्कत ३ बेडरूमचा फ्लॅट घेतला, पण तो अजून सोडवत नाहीये सरकारी फ्लॅट. अहाहा काय प्रामाणिकपणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 03/28/2014 - 15:28 नवीन
सरळ व्यवहार आहे. तुम्हाला पंचाइत असण्याचं कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
व
विकास Fri, 03/28/2014 - 16:06 नवीन
त्यांचे निकटवर्तीय त्यांना मदत करतायंत हे निकटवर्तीय कोण समजायला हवे नाही का? नाहीतर एकीकडे हेलीकॉप्टर/विमानावरून बोलायचे आणि दुसरीकडे स्वतःचे झाकून ठेवायचे! त्या व्यतिरीक्त निवडणूक लढवत असताना नक्की कुणाचा निधी घेतला आहे, कुठे वापरला जात आहे वगैरे गोष्टी कायद्याने देखील गरजेच्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 03/28/2014 - 16:38 नवीन
ऑगस्टपर्यंत घर ठेवणारेत म्हणत होते. ते मुलीची परीक्षा होईपर्यंत म्हणजे मे पर्यंत आहे. दिल्ली सरकारनं आता ( १ मार्च पासून) ८५,००० प्रती महिना भाडे ठरवले आहे. तीन महिन्याचं एकूण भाडं २.५५ लाख होईल. ही रक्कम त्यांना परवडणारी नसेल तर ते घर सोडतील. पण मोदी अंबानींचं विमान सोडू शकणार नाहीत. केजरीवालांनी Joint Commissioner of Income Tax म्हणून कार्यभार सांभाळला आहे. पैसे कुठून आणले याचा वॅलिड पुरावा द्यावा लागतो हे याची त्यांना कल्पना नसेल असं समजणं निवाळ अज्ञान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 03/28/2014 - 17:06 नवीन
केजरीवालांनी Joint Commissioner of Income Tax म्हणून कार्यभार सांभाळला आहे. आता हा विषय काढलाच आहे म्हणून तेथे काय दिवे लावले होते, हे ह्या हिंदू मधील Consumer Protection Council, Tamil Nadu, च्या सेक्रेटरीने लिहीलेल्या लेखात वाचू शकता: Understanding Arvind Kejriwal अर्थात असल्या लेखाने एके चाहत्यांमधे काही फरक पडणार नाही. बाब्या बाब्याच रहाणार तरी, विषय निघाला म्हणून सांगितले.... काही भाग खाली चिकटवत आहे. Consider how he got out of government service. While serving as a Joint Commissioner in the Revenue Department (Income Tax) under the Finance Ministry, he went on a sabbatical (paid leave) from November 1, 2000 to October 31, 2002, and went abroad. One condition for such leave is that the employee must serve continuously for at least three years after return, failing which he or she must pay back the salary he drew over two years with penalty. अर्थात केजरीवाल ते मान्य करायला तयार नव्हते आणि नेहेमीसारखा आक्रस्ताळे पणा केला. पण शेवटी जेंव्हा कारावास आणि घरजप्तीपर्यंत कायद्यानुसार वेळ आली तेंव्हा: "When it became clear the government would initiate proceedings, he announced on October 30, 2011 that he would borrow from his friends and pay the dues of Rs.9.28 lakh. He wrote to Prime Minister Manmohan Singh on November 3, 2011 enclosing the cheque." आता हे ९.२८ लाख रूपये कुणाकडून घेतले आणि त्याच्या बदल्यात काय फेवर केले ह्याला गुलदस्यात ठेवले गेले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 03/28/2014 - 18:49 नवीन
त्यात `दिवे लावले' वगैरे भाषा वापरण्यात अर्थ नाही. आणि अट, घेतलेला पगार अधिक पेनाल्टी अशी होती (जी कोणत्याही सरकारी नोकरीत असते). कुठलीही फालतू लिंक देण्या आधी रॅमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फौंडेशनवर प्रकाशित झालेली त्यांची ही बायोग्राफी वाचा KEJRIWAL’S first posting was as assistant commissioner of income tax in a district in Delhi. He had a staff of around ten people who received and processed the income statements and tax returns of the residents and businesses in the area. The office had the power to conduct raids on the premises of those suspected of tax evasion and other irregularities, and to choose a few statements at random for deeper scrutiny. There was ample scope for corruption, and tax officers were expected to feed at the trough. Kejriwal would come to work on his scooter. Kejriwal often discussed the issue of corruption with some colleagues. “There was a sense of disgruntlement among the honest officers,” he says. “If you’re corrupt, you’re in the mainstream. If you’re honest, you’re sidelined.” But he says he did not suffer because of his honesty. Many in his staff were making a lot of money on under-the-table activities, but the responsibility for taking disciplinary action did not lie with him. “It was at a much higher level,” he explains. It would have been “extremely difficult for me if I started chasing them, because then I would just be chasing them and not be doing my own work.” Despite his misgivings about corruption, however, Kejriwal found tax matters “highly intellectually stimulating because a person will present a tax statement to you and you have to make out from that tax statement and your own investigative skills what his actual income is. I did some very good cases, so I also kind of made a name for myself in the department.” He was promoted to deputy commissioner in 2000 and was an additional commissioner when he resigned in 2006, a designation just below the top titles of chief commissioner and commissioner. His departure came about because the job, intellectually fascinating as it was, could not prevail over Kejriwal’s spiritual side. एकतर तुम्हाला विषयाची काहीही माहिती नाही. अत्यंत फालतू मुद्दे काढून चर्चा ढवळणं इतकाच काय तो प्रयास दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 03/28/2014 - 20:19 नवीन
कुठलीही फालतू लिंक देण्या आधी ऐका हो ऐका... या पुढे जर कोणी The Hindu या वर्तमानपत्रातील लि़ंक दिली तर तीची वर्गवारी फालतू सदरात केली जाईल! असो. आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे बाब्या तो बाब्याच असणार, तेंव्हा आपला प्रतिसाद वाचताना आश्चर्य वाटले नाही आणि मला खात्री आहे की त्या "फालतू" लिंकमधील मजकूर न वाचताच पुढचे लिहीणे चालू असेल म्हणून. चालूंदेत... तरी देखील काही वाक्यांचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे... रॅमन मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड फौंडेशनवर प्रकाशित झालेली त्यांची ही बायोग्राफी वाचा अशा euphemistic अथवा नरोवा कुंजरोवा बायोग्राफीज टंकायला ढिगावारी प्रोफेशनल्स मिळतात... Cesar R. Bacani Jr. तर काय आंतर्राष्ट्रीय पत्रकार आहे. आता खालील वाक्यासंदर्भात He was promoted to deputy commissioner in 2000 and was an additional commissioner when he resigned in 2006, a designation just below the top titles of chief commissioner and commissioner. त्याच मॅगेसेसे च्या संस्थळावर मला केजरीवाल यांच्या एका लेखाचा दुवा मिळाला. वाचत असताना एकदम भरभरून येत होते. कधी एकदा चळवळीत उडी मारतो असे होत होते, पण... मग शेवटी वाचले (त्यांच्याच लेखात म्हणजे त्यांनीच लिहीलेले असणार): Arvind Kejriwal earned a degree in Mechanical Engineering from IIT Kharagpur in 1989. He joined the Indian Revenue Service in 1992a and set up Parivartan in Jan 2000. He was a Deputy Commissioner of Income Tax in Nov 2000 when he took two years sabbatical to work full time on Parivartan. He is currently on another two year leave working full time on Parivartan. थोडक्यात त्यांनी २००४ पर्यंत रजा घेतली हे ते मान्य करतात. आता हिंदूमधील (तुम्ही फालतू म्हणलेल्या) दुव्यामधे म्हणल्याप्रमाणे त्यांची पहीली २ वर्षे रजा पगारी होती तर नंतरची हिंदूच्या म्हणण्याप्रमाणे १८ महीन्याची केजरीवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे २ वर्षांची (२४ महीन्यांची) अतिरीक्त बिनपगारी रजा घेतली होती. या सर्वासाठी त्यांनी बाँडवर सही केली होती. त्यानुसार रजा संपल्यावर सलग तीन वर्षे काम करणे अथवा दोन वर्षांचा (फुकट) घेतलेला पगार + त्यावरील व्याज देणे. अर्थातच ते करायला एके तयार नव्हते. आणि ते मॅगेसेसेच्या संस्थळावर लिहीण्यास ते विसरले. असो. होता है! ऐसा भी होता है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 03/29/2014 - 06:12 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
च
चिगो Fri, 03/28/2014 - 11:37 नवीन
मुलांच्या परीक्षा असल्याने शासकीय घर ठेवावे लागेल, हे ते बोलले होते. "किंवा माझ्या पत्नीचे आय.टी. कमिश्नरपदाची पदोन्नती ड्यू आहे. तिला इथेच घर मिळेल, तिथे जाऊ.." एका माजी सरकारी अधिकार्‍याने सरकारी पोस्टींगबद्दल एवढा आत्मविश्वास दाखवणे, ह्याचे आश्चर्य वाटले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा