Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

उ
उडन खटोला यांनी
Sun, 04/27/2014 - 08:03  ·  लेख
लेख
मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर मुंजीचे निमंत्रण मिळाले निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!! मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे?? ..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे? वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का?? संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र

प्रतिक्रिया द्या
61891 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

भ
भडकमकर मास्तर Sun, 04/27/2014 - 18:08 नवीन
खूप छान पाककृती.. वीकांताला करून पाहीन !!
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Sun, 04/27/2014 - 19:25 नवीन
वीकांताला करून पाहीन !! काय? गोटा? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
प
प्यारे१ Sun, 04/27/2014 - 19:41 नवीन
त्यांनी असल्या बर्‍याच पाकृ करुन बघितल्या आहेत. ;) हवं असल्यास खोदकाम करा अथवा (त्यांच्याशीच) संपर्क साधा! @ भडकमकर मास्तर, नया(लगता) है वह! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Sun, 04/27/2014 - 19:50 नवीन
अस्सा हाय काय? खोदकाम करतो मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन Sun, 04/27/2014 - 19:38 नवीन
ष्ट्यांडर्ड भडकमकरी प्रतिसाद ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
च
चौकटराजा Sun, 04/27/2014 - 18:23 नवीन
सगळे पर्तिसाद रॉक्स !!!! मौजी त मौज असते. गोटा असतो . बेटकुळी भरण्याची धमकी असते. गोट्यावरून घेर्‍यातून खोडकर पणे हात फिरविणे असते.मुंज मुलाला सिल्कची सुळासुळीत चड्डी घालयला मिळते. मौजी एक सामाजिक कार्य आहे. नाभिकाना एरवीच्या पाचपट पयशे मिळतात.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 04/28/2014 - 13:34 नवीन
नाभिका वरुन आठवले, नाभिकारे वारा वाहे रे... डौलाने हाक जरा नाव आज रे असे वाटायचे. म्हटलां नाभिक कसा नाव हाकल शेवटी ते नाविका रे असे आहे हे सम्जले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ध
धन्या Sun, 04/27/2014 - 19:32 नवीन
धागा आणि प्रतिसाद वाचून मजा आली. असे काही चटपटीत वाचले की छान वाटते.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Sun, 04/27/2014 - 20:07 नवीन
या धाग्यात शतक पार करण्याचे पोटेन्शियल दिसते आहे.... :) बाकी आत्मुबाबा स्मायलीवाले यांचा जरा सविस्तर प्रतिसाद अपेक्षित !
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 04/27/2014 - 20:56 नवीन
एखाद्या अधुनिक पद्धतीने रहाणार्‍या कुटुंबातील मुलाची मुंज जर त्यानी त्यांना पहिजे त्या पद्धतीने केली तर हरकत काय आहे? माझ्या दोनही भावांच्या आणि नात्यातल्या काहींच्या मुंजी अगदी साग्रसंगीत, वाड्यात मांडव वगैरे घालून केलेल्या आठवतात. काही दिवस त्यांनी संध्या, जेवताना चित्राहूती घालणे वगैरे केल्याचे स्मरते. पण नंतर आजतागायत पळी, ताम्हन हातात तरी घेतले असेल की नाही शंका आहे. गणपतीच्या वेळी नवे जानवे विकत घ्यावे लागते. (त्यांचं ऐकून गायत्री मंत्र मलाही पाठ झाला होता... ) पण यात कुणाला दोष देण्याचे आणि आकांडतांडव करण्याचे काही कारण मला दिसत नाही. पूर्वी मुंज झाल्यानंतर मुलगा गुरूगृही जात असे आणि त्याच अनुषंगाने मुंजीचे विधी असतात. म्हणजे मातृभोजन, भिक्षावळ, पित्याने गुरूमंत्र (मुलाच्या कानात) सांगणे इ. पण आता मुलं गुरूगृही जात नाहीत त्यामुळे तसेही मुंजीचे सांकेतिक महत्व आता राहीले नाही. मुंज ८ व्या ९व्या वर्षी होऊन मग विद्याभ्यासाला प्रारंभ होत असे. आता शिक्षण वयाच्या ३र्‍या ४थ्या वर्षा पासून सुरू होते. मग मुंज करण्यात काय अर्थ राहीला आहे ? पण तरीही असे समारंभ होत रहावेत असे मला वाटते. त्यातल्या धार्मिक घटकां बरोबरच तो एक आनंद सोहळा आहे हे समजावे. म्हणजे करण्यात काही कमी-जास्तं झाले तर राग येणार नाही. असे समारंभ म्हणजे एक कौटुंबिक संमेलन असते. इतरवेळी कार्यव्यग्रतेमुळे भेटु न शकणार नातेवाईक, मित्रंमंडळी आवर्जुन एकत्रं येतात अशा वेळी थोडीफार मौजमजा केली तर काय हरकत आहे? चिकनीचमेली गाण्यावर नाचणे वगैरे जरा अतिशयोक्ती वाटते आहे. कारण मी तर सकाळी मुंज, संध्याकाळी दारुपार्टी असं घडताना पाहिलेलं नाही. लोकं (विशेषतः मराठी) इतकं तारतम्यं नक्कीच बाळगत असतील. ते जोडपं तुम्हाला आवर्जुन निमंत्रण द्यायला आले हे लक्षात न घेता तुम्ही त्यांच्या कपड्यावर टिका करणे याला काय म्हणावे ? जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल. आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली.
  • Log in or register to post comments
स
सखी Mon, 04/28/2014 - 05:27 नवीन
मनीषा सगळाच प्रतिसाद आवडला, शेवटचे दोन परिच्छेद विशेष आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
प
पांथस्थ Wed, 04/30/2014 - 07:04 नवीन
जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.
काय बहारदार प्रतिसाद आहे! क्या बात है! अनेक प्रतिसाद वाचनीय आहेत, विदा, स्वानुभव पण दिले आहेत अनेकांनी. पण तुम्ही दोन ओळीत जो सार सांगीतलात त्याला तोड नाही! अपना तो दिन बन गया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 04/30/2014 - 20:00 नवीन
@जुन्यात नवं मिसळून नविन संस्कृती उदयास येणे हेच तर त्या समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जुनं तेच आणि फक्तं तेच सोनं असा विचार कवटाळून राहीले तर जीवनप्रवाह गोठून जाईल.>>> Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. @आणि एक आठवले : निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, आणि सोपानदेव यांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकले आणि त्यांच्या मुंजी लावायला कुणी ब्राम्हण तयार नव्हता. मुंज नाही म्हणून गुरूचा अनुग्रह नाही. पण याच भावंडांनी मायमराठीला लाखमोलाची लेणी घडवली. .>>> आमच्या धर्मशास्त्र्यांना त्याची किंमत नसते. आजही ते..अज्ञाताच्या गुहेत काठ्या मारत फिरण्याला आदर्श-सदाचारी-जीवन समजतात. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
न
निनाद मुक्काम … Sun, 04/27/2014 - 21:16 नवीन
माझ्या मुंजीची १९८८ साली विडीयो केसेट केली होती. घोड्यावरून भिक्षावळ फडके रोड वरून गणपतीच्या मंदिरात गेली होती. त्यांनतर महिनाभर मी संध्या केली. मग आठवत नाही पण पुढे त्यात खंड पडला ,आज इतक्या वर्षाने कधीतरी ती विडीयो कसेट पहिली तर ह्या सभारंभाच्या निमित्ताने जमलेले अनेक नातेवाईक ज्यातले काही कैलासवासी झाले आहेत त्यांना पाहता आले. बरे वाटले. धाग्याचा विषय पाहून ज्या अपेक्षेने तो उघडला होता व तडक प्रतिसाद वाचायला घेतेले , मग मूळ लेख वाचला. तेव्हा अपेक्षापूर्ती झाली.
  • Log in or register to post comments
स
साती Sun, 04/27/2014 - 23:38 नवीन
पूर्वी म्हणे बायका पण शिकत असत आणि वैदिक ज्ञान वैगेरे घेत असत. मग मुंज फक्तं मुलाचीच का? मुलीची का नाही? अगदी हौशी मौजीसाठी मुंज म्हटलं तरी मुलीच्या नावाने हौस मौज का नाही? ता. क. माझ्या नवर्याच्या धर्मात मुंजीसारखा विधी मुलगा मुलगी दोघांसाठी आहे. मुलासाठी 'शाल' आणि मुलीला 'किरगुणी' बर्याचदा एकाच मांडवात घरातल्या मुलामुलींची एकत्र शाल किरगुणी करतात. आजकाल यातही मुख्य विधी संपल्यावर मुलांना भेटवस्तू द्यायच्या वेळेस बाजूला ऑर्केस्ट्रा चालू करतात. ;) अजून दारू पिणे वैगेरे पाहिले नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 04/28/2014 - 00:01 नवीन
अवांतर उत्सुकता: धर्म/पंथ कुठला? लिंगायत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
स
साती Mon, 04/28/2014 - 02:48 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 04/28/2014 - 11:07 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
प
पिशी अबोली Mon, 04/28/2014 - 09:41 नवीन
माझ्या मैत्रिणीची झाली आहे मुंज. मुंज मुलींची करु नये असं शास्त्र कुणाला माहीत असल्यास संदर्भ जाणून घ्यायला आवडेल. बाकी हौसेमौजेखातर मुलीची मुंज करायची आहे असं एक उदाहरण आणि वैदिकीचा अधिकार तिला यावा म्हणून करायची आहे असं दुसरं अशी दोन हल्लीच ऐकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
क
कवितानागेश Mon, 04/28/2014 - 15:00 नवीन
होय. मुलींची मुंज करता येते. पूर्वी मनशक्ती केंद्रात स्वामी विज्ञानानंद सामूहिक मुंज करायचे,त्यात मुलींचीही मुंज होत असे. अजूनही करत असतील , कल्पना नाही. बाकी , मुंजीनिमित्त 'चिकन पार्टी' आमच्या काही नातेवाईकांमध्येही झाली आहे. अगदी माझ्या लहानपणीपण पाहिलिये. ज्याची त्याची मर्जी! हे जर का खरोखरच 'चुकीचे' असेल, तरी असे वागणार्‍यांना मी दोष देणार नाही. तर 'मुंज' म्हणजे नक्की काय, हे कधीही न कळलेल्या आपल्या समाजाच्या आधीच्या काही पिढ्यांना देइन. माझ्या डोळ्यासमोर झालेली गोष्ट, एक दाक्षिणात्य ( कर्मठ ब्राह्मण) काकू मुलाच्या मुंजीचे आमंत्रण करायला घरी आल्या होत्या. त्याचवेळेस एक उत्तर भारतीय (ब्राह्मण) काका बसले होते. त्यांनी विचारलं, 'उपनयन' चा अर्थ काय हो? आई काहीतरी सांगणार तेवढ्यात काकू चटकन म्हणाल्या , ' उप' म्हणजे 'सब' ( इन्लिशमध्ये). म्हणजे ते एक छोटं 'लग्न'च असतं!! ... आईनी तोंडावर आलेले सगळं संस्कृत गपकन गिळून टाकलं... मी हसायला आत पळाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
श
शुचि Mon, 04/28/2014 - 15:04 नवीन
लिम्स, लगेच अर्थ शोधला. - 'उपनयन' का अर्थ है "पास या सन्निकट ले जाना।" सम्भवत: आरम्भ में इसका तात्पर्य था "आचार्य के पास (शिक्षण के लिए) ले जाना।" हो सकता है; इसका तात्पर्य रहा हो नवशिष्य को विद्यार्थीपन की अवस्था तक पहुँचा दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
य
यशोधरा Mon, 04/28/2014 - 16:26 नवीन
असं शास्त्र नाही, असं वाटतं. कधी वाचण्यात आलं नाही. माझ्याही मैत्रिणीची आणि तिच्या घरातील प्रत्येक मुलीची मुंज झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
म
मंदार दिलीप जोशी Tue, 04/29/2014 - 15:22 नवीन
मुलींचीही मुंज करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
ज
जोशी 'ले' Mon, 04/28/2014 - 04:18 नवीन
अर्थात, लेखक महाशयांचे... :-)
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 04/28/2014 - 04:39 नवीन
पारशांमध्ये नवजोत समारंभ मुलगे-मुली दोघांचाही करतात. क्रिस्टिअनांमध्ये फर्स्ट कम्यूनिअन दोघांचेही असते. पारशांमध्ये सात वर्षांखालच्या 'खुर्द'--लहानग्यांचे नवजोत होऊ शकत नाही. त्यावेळेस प्रथमच मुला/मुलीला सद्रा चढवण्यात येतो आणि 'कश्टि' नावाचा जानव्यासारखा धागा कंबरेला बांधण्यात येतो. पुढील आयुष्यात त्यांनी या दोन गोष्टी कायम अंगावर बाळगायच्या असतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 04/28/2014 - 08:34 नवीन
गालिब शराब पीने दे मस्जिद मी बैठकर या वो जगह बता दे जहां पार खुदा न हो I एखाद्या गोष्टीचे औचित्य असते तेवढाही विधिनिषेध नसेल तर प्रश्नच मिटला. शेवटी आपण देवळात बसून ओली पार्टी केली किंवा राजघाटावर बायका नाचवल्या आणी ओली पार्टी केली तरी फरक पडत नाही. महात्मा गांधीना शिव्या देणारे लोक सुद्धा त्या स्थळाचे पावित्र्य समजून घेताना पाहीले. ( जेंव्हा त्यांना प्रश्न विचारला कि हे कसे तेंव्हा ते म्हणाले आमचा गांधीजींच्या विचारसरणीला विरोध आहे. त्यांच्या प्रामाणिक पणाला किंवा इतर गुणांना नव्हे). आत्यंतिक विरोध असूनही त्यांना स्थळाचे पावित्र्य समजत होते. कोर्टात अर्धी चड्डी घातली तर चालेल काय? किंवा आपल्या बायकोला घेऊन स्त्रीरोग तज्ञा कडे गेल्यावर लोड शेडींग आहे म्हणून तो अर्ध्या चड्डीत बसलेला असेल तर चालेल काय? आता याचे उत्तर हो असेल तर प्रश्नच मिटला. बाकी मुंज केली काय किंवा नाही केली काय? काय फरक पडतो. हा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या डॉक्टर मित्राच्या दवाखान्याच्या बाहेरून एक लग्नाची वरात चालली होती त्यात बँड वाले अतिशय सुरात गाणे वाजवत होते "दिल मी छुपा के प्यार का तुफान ले चले I हम आज अपनी मौत का समान ले चले I कसलाही विधिनिषेध नसेल तर आईबापांचे कामजीवन अशा विषयावर सुद्धा रसभरीत चर्चा करता येईल किंवा मुलान्समोरही कामक्रीडा करता येईल . असो ज्याचे मत त्याच्या पाशी.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 04/28/2014 - 13:45 नवीन
"औचित्य" या एका शब्दात सर्व आले. १००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुहास.. Mon, 04/28/2014 - 09:04 नवीन
दोन जणांचे प्रतिसाद आलेले नाहीत अजुन .. प्रतीक्षेत ...
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 04/28/2014 - 11:46 नवीन
उपजात सांगायचा मोह आवरलात नि माती खाल्लीत. ती सांगता तर एव्हाना दोन-अडिचशे प्रतिसाद सहज मिळत होते. बाकी मुंज हा विधी फक्त ब्राह्मणांतच करतात हा ब्राह्मणेतरांतला गैरसमज आणि आमची बरोबरी करायला ब्राह्मणेतर मुंज करतात ही एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्याने (आता त्याची उपजात सांगायचा मोह मी आवरतो) उधळलेली मुक्ताफळे असं दोन्ही ऐकून कान केव्हाच तृप्त झालेत. जाता जाता, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Mon, 04/28/2014 - 12:14 नवीन
बघा बघा...खाल्लीत कि नाही माती तुम्ही पण..!! या, बरोबरच केक कापू..! जाता जाता, हल्ली असे उपजातीपातींवरुन युद्ध पेटत नाहीत हो...जास्त थोर्थोर विषय हवेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 04/28/2014 - 12:21 नवीन
>>खाल्लीत कि नाही माती तुम्ही पण..!! धागा माझा नाय हो!! नायतर मी कशाला हात आवरता घेतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
द
दिव्यश्री Mon, 04/28/2014 - 11:58 नवीन
काही वर्षांपूर्वी एका सुप्रशिद्ध महाराजांनी त्यांच्या नातवाची मुंज केली होती . त्यावेळी लैच धुराळा उडाला होता . यागोष्टीची आठवण झाली . असो . ज्यांनी फोटू दिसण्यासाठी कष्ट घेतले त्यांचे जाहीर आभार . धन्यवाद . वरील फटू पाहून सुजाण , चाणाक्ष लोक/वाचक लग्गेच ओळखतील कि ब्राह्मणी नौ वार कोणती आणि 'नऊ वार साडी अने तंगडी उघडी' हा प्रकार कोणता . बाकी ती म्हण कोपी पेस्ट केली आहे हे सुज्ञाना वेगळे सांगायला नकोच . धन्यवादच .
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 04/28/2014 - 12:08 नवीन
तू पब्लिकसाठी शेअर केले नसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
इ
इष्टुर फाकडा Mon, 04/28/2014 - 12:13 नवीन
लेख थोडा दात ओठ खाऊ झालाय. मुंज प्रकार कालबाह्य झालाय हे खरच आहे. तरीही माझ्या मुलाची मुंज घरातल्या लोकांना करायचीच असेल तर ती घरातच करायला लावेन आणि बाकी समारंभ न केल्यामुळे वाचलेल्या पैशातून काहीतरी माझ्या गावातल्या शाळेतल्या पोरांसाठी करेन. हे मी करेन बाकीच्यांनी काय करावं हे ते ठरवतील :)
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 04/28/2014 - 13:08 नवीन
नऊवार लुगडी अने बन्ने तंगडी उघडी ही म्हण बडोदा मराठीत (हिला धेडगुजरी म्हणावं की धेड मराठी?) खूप चालते. मराठी सरदारांच्या आणि एकूणच मराठी लोकांच्या पोकळ बडेजावाची टिंगल करण्यासाठी ती वापरली जाई. ब्राह्मण बायकांचे नऊवारी नेसण ओचे खोचलेले असते, आणि इतर अनेक जातीतल्या बायकाही ओचे खोचतात मात्र ते थोडे आखूड खोचतात. काम करताना आखूड नेसण बरे पडते. मी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले एक दुर्मीळ कुटुंबछायचित्र पाहिले आहे. त्यात त्या ब्राह्मण कुटुंबातल्या बाईंनी ओचे अगदी आखूड म्हणजे अर्ध्या पोटरीपर्यंत खोचलेले आहेत. पायांवर निर्‍या लोळवणारे नेसण मला वाटते बालगंधर्वांनी लोकप्रिय केले. त्यांची उंची कमी होती त्यामुळे त्यांना भरपूर पन्ह्याचे लुगडे पायघोळ होत असावे. ते पदराचा एक काठदेखील अगदी खालून म्हणजे अगदी घोट्यापासून घेत. जुन्या लोकांकडून असे ऐकले आहे की असे पायघोळ आणि पावलांवर निर्‍या लोळवणारे नेसण गरत्या बाईचे लक्षण मानले जात नसे. बाईचे नेसण सैल, अघळपघळ फलकारणारे असू नये असा संकेत होता. स्वयंपाकाची वगैरे कामे करणार्‍या गरीब ब्राह्मण बायकांनाही असे नेसण सोयीचे होते. कष्टकरी बायका दुहेरी ओचे खोचत. म्हणजे डावीकडे खोचलेल्या ओच्यामधे पुन्हा उजवीकडची एखादी निरी अडकवीत. यामुळे कुठल्याही पावलामध्ये लुगडे अडकण्याचा प्रश्न येत नसे. बाकी नऊवारी नेसण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी निर्‍या उजवीकडे फिरवून खोचतात तर कोणी डावीकडे. कोणी कोणी निर्‍यांचे दोन भाग करून ते विरुद्ध दिशांना म्हणजे डावी-उजवीकडे वळवून खोचतात. कोळी बायका निर्‍या फार ठेवीत नसत. कमी निर्‍यांमुळे सुटा राहिलेला पदर कंबरेभोवती घट्ट गुंडाळीत. यामुळे वजन उचलताना कंबरेत लचक किंवा उसण भरत नसे. या संबंधात कुणाकडे जुनी चित्रे, जुने संदर्भ (पेशवाईपूर्वीचे) असतील तर जाणून घ्यायला आवडेल. पेशवाईमुळे महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा परिणाम झाला. खाणे-पिणे, वस्त्रप्रावरणे, भाषा अशा बाबतीत नवी मूल्ये प्रस्थापित झाली. तेव्हा त्या आधीचा महाराष्ट्र कसा होता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
र
राही Mon, 04/28/2014 - 13:11 नवीन
स्वयंपाकादि कामे करणार्‍या बायकांनाही असे आखूड नेसण सोयीचे होते. असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
क
कपिलमुनी Mon, 04/28/2014 - 13:51 नवीन
या संबंधात कुणाकडे जुनी चित्रे, जुने संदर्भ (पेशवाईपूर्वीचे) असतील
चित्रगुप्त यांच्याकडे जुनी चित्रे असतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
आ
आनन्दा Mon, 04/28/2014 - 14:41 नवीन
अबाबाबाबाबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुहास.. Mon, 04/28/2014 - 14:53 नवीन
http://www.misalpav.com/node/18445 लुगड्यात गमावल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
स्वप्नांची राणी Mon, 04/28/2014 - 14:54 नवीन
नऊवार नेसुन घोड्यावर पण बसता यायचे म्हणे. त्यादृष्टीनेही आखूड नेसणच योग्य असावं. अर्थात आखुड नेसा वा पायघोळ नेसा, नऊवार फक्त पुढुनच पिसारा फुलवलेल्या मोरासारखी आकर्षक दिसते. मागुन नेटका पदर अंगभर घेतला तरच ठीक... (नऊवार अज्जिबात ना आवडणारी...स्वरा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
उ
उडन खटोला Mon, 04/28/2014 - 14:38 नवीन
धागा शतकपार नेल्याबद्दल समस्त मिपा करांचे आभार ! बरीच साधक बाधक चर्चा झालेली आहे . पण ती नौवारी साडीवर घसरेल, अशी अपेक्षा नव्हती! असो आभार
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Mon, 04/28/2014 - 14:47 नवीन
आपण एकदा लाहोरला भेट द्यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
र
रेवती Mon, 04/28/2014 - 15:30 नवीन
मानले का आभार! इथली आतषबाजी संपलेली दिसतीये. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
स
सूड Mon, 04/28/2014 - 15:30 नवीन
पूर्वी नऊवारी/ धोतर (थोडक्यात कोणतंही सकच्छ नेसलेलं वस्त्र)हे घरंदाज पणाचं लक्षण मानलं जाई. कासोट्याशिवायची लुगडी फक्त देवदास्या (मुरळ्या वैगरे), वारांगना आदि स्त्रिया नेशीत असत, म्हणून घरंदाज स्त्रियांनी अशी लुगडी नेसणं पसंत केलं जात नसे. नंतरच्या काळात शन्वारे तेल्यांच्या स्त्रिया पाचवारी लुगडी नेशीत असत. थोडक्यात त्या काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी होता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 04/28/2014 - 16:01 नवीन
सूड साहेब एकदा वैद्यकीय सर्वेक्षणासाठी बुधवार पेठेत जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा तेथील स्त्रियांची चेहेर्याची अतिशय भडक रंगरंगोटी (मेक अप) पाहून मी माझ्या मित्राला विचारले कि या स्त्रिया एवढे भडक रंग का वापरतात? त्याचे उत्तर असे होते कि साधे सोज्वळ रंग वापरले तर त्या स्त्रिया "तशा" आहेत हे लोकांना कसे कळेल? थोडक्यात कोणत्याहि काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी असू शकतो. .
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 04/28/2014 - 16:09 नवीन
अगदी असाच संवाद मी आणि आईमध्ये झाला. बुधवार पेठेतील बायका वेगळ्या का दिसतात यावर आईने घाबरून लक्ष्मीरोडवर रिक्षा थांबवली व मला घरी आणले. यापुढे त्यापेठेबद्दल काही विचारायचे नाही वगैरे दटावले. मी नवव्या यत्तेत होते व असे काही स्पष्टीकरण देणे तिला अवघड वाटले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सूड Mon, 04/28/2014 - 16:20 नवीन
>>थोडक्यात कोणत्याहि काळी तुमचा पेहराव ही तुमची आयडेंटिटी असू शकतो ह्म्म!! शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आदिजोशी Wed, 04/30/2014 - 08:52 नवीन
मुळात असलं काही घडलं ह्यावरच माझा विश्वास नाही. कितीही उच्चभॄ झाले तरी ब्राह्मण इतके उथळ होणार नाहीत. उगाच ब्राह्मणांना नावं ठेवण्यासाठी तयार केलेला कल्पनाविलास आहे हा. पुरावे द्या.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 04/30/2014 - 11:39 नवीन
+ ईन्फिनिटी. हेच म्हणतो. ह्यांच्या 'टु डु लिस्ट' मधे ब्राम्हणांच्या नावानी शंख करणे ही रोजची एक टास्क असते. (गो ब्राम्हणाभिमानी) अनिरुद्ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
म
मंदार दिलीप जोशी Fri, 05/02/2014 - 06:45 नवीन
ह्यांच्या 'टु डु लिस्ट' मधे ब्राम्हणांच्या नावानी शंख करणे ही रोजची एक टास्क असते.>>> :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा