Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

उ
उडन खटोला यांनी
Sun, 04/27/2014 - 08:03  ·  लेख
लेख
मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर मुंजीचे निमंत्रण मिळाले निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!! मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे?? ..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे? वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का?? संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र

प्रतिक्रिया द्या
61891 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

म
मंदार दिलीप जोशी Fri, 05/02/2014 - 06:45 नवीन
आदि, अगदी बरोबर. इतका उथळपणा ब्राह्मण करणारच नाहीत. अनुमोदन. पुरावे ते देणार नाहीत. फक्त घाणेरडे आरोप करत आणि कपोलकल्पित घटना सांगत धुरळा उडवायचा एवढेच जमते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आनन्दा Tue, 07/28/2015 - 10:04 नवीन
कॉकटेल पार्टीचे माहीत नाही, पण रस्त्यावरचा धिंगाणा मी स्वतः पाहिलेला आहे. माझी पण तेव्हा उखंसारखीच सटकली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ट
टवाळ कार्टा Tue, 07/28/2015 - 11:29 नवीन
तो तर इथे पण चालतोच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 07/28/2015 - 12:47 नवीन
इथे म्हणजे कुठे? पुन्हा एकद सांगतो.. आक्षेप धिंगाण्याला नाही.. (म्हणजे आहे, पण तो वेगळ्या कारणासाठी). आक्षेप मुंजीच्या वरातीत कोंबडी पळालीवर नाचण्याला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 07/28/2015 - 12:59 नवीन
http://www.misalpav.com/comment/722684#comment-722684 याच प्रतिसादात लिहिलेले परत लिहायला आलेलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
N
nasatiuthathev Wed, 04/30/2014 - 16:59 नवीन
वरील सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया वाचल्या …. काही पटल्या काही पटल्या नाहीत बदलेल्या काळाबरोबर बदलले पाहिजे अगदी बरोबर … पण अस ??? १ . मला अस वाटते कि असले समारंभ हल्ली फक्त दिखाऊपणा साठी आणि एकदाचे झाली मुंज या साठी होतात ( घरात जर कोणी वडीलधारी मंडळी असतील तर त्यांना समाधान (झाले पण नंतर म्हणू नका हे करत नाही ते करत नाही ) म्हणून केले जातात . २. ३१ डिसेंबर किंवा दारू पिणे हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण वरील समारंभाचा पार्टी साठी कारण म्हणून जर उपयोग करणारे असतील तर त्यांची वैचारिक पातळी नक्कीच …… (टीप दारू पिण्यासाठी / पार्टी करण्यासाठी काही कारण असलच पाहिजे अस नाही अस म्हणणारे पाहण्यात आहेत ) ३. ब्राम्हण जातीचा उल्लेख कदाचित अश्या साठी असावा कि ब्राम्हण वर्ग कुठलाही बदल असो (चांगला अथवा वाईट ) तो स्वीकारायची तयारी दर्शवतो आणि स्वीकारतो देखील . पण ह्या सगळ्यात त्या बदलाकडे वाहवत पण जातो . ४. राहिला प्रश्न आजच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी पाळता येतील कि नाही ???? तर माहिती म्हणून सांगतो आमच्या ऑफिस मध्ये लघुशंकेला जाताना जानवे कानावर अडकवणारे बरेच जण आहेत त्यामुळे पाळणार कसे ??? आता ते शक्य आहे का?? इथे वेळ कोणाला आहे ??? असले फालतू कारण देण्या पेक्षा मला जमणार नाही हे कारण तरी निदान खर आहे …. बाकी संविधानाने व्यक्ती स्वातंत्र दिले आहेच …।
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 05/02/2014 - 18:33 नवीन
येत्या ४ तारखेच्या मुहूर्तावर एका पुणेकर मित्राच्या १० वर्षे वय असलेल्या मुलाची मुंज आहे. त्याला कुठली भेट द्यावी?
  • Log in or register to post comments
स
साती Fri, 05/02/2014 - 20:56 नवीन
आवडेल त्याला. आयुष्यभर लक्षात रहाल तुम्ही त्याला. (नाहीच मिळालं तर ध्रुवबाळ, श्रावणबाळ यांच्या गोष्टी पण देऊ शकता. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आयुर्हित Fri, 05/02/2014 - 21:36 नवीन
ह्यासाऱ्या गोष्टी त्याने आईच्या गर्भात असतांनाच ऐकल्या असाव्यात. कारण दरवर्षी वेद व पुराणांचे वाचन होत असते त्यांच्या घरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
स
साती Sat, 05/03/2014 - 09:44 नवीन
श्रावण बाळाची गोष्टं रामायणात आहे की पुराणात? असल्यास कुठल्या पुराणात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
स
सूड Mon, 05/05/2014 - 08:42 नवीन
तुम्हाला खरंच टँजंट जातंय की तसं भासवताय?? =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
ट
टवाळ कार्टा Sat, 05/03/2014 - 09:59 नवीन
"भक्त प्रल्हाद"...१० व्या वर्षीच??? =)) संपादकांसाठी, हा अवांतर प्रतिसाद आहे...आवडला नाही तर पंख लावावेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
स
सूड Mon, 05/05/2014 - 08:31 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Mon, 05/05/2014 - 09:05 नवीन
=)) हेच आठवलं होतं, द्या टाळी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
च
चिन्मय खंडागळे Fri, 05/02/2014 - 21:41 नवीन
किंवा श्यामची आई. सर्व कुमारवयीन मुलगे आवडीने पाहतात.
  • Log in or register to post comments
स
साती Sat, 05/03/2014 - 09:43 नवीन
त्यांना टँजेंट जातंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
उ
उडन खटोला गुरुवार, 05/22/2014 - 19:53 नवीन
तर मंडळी ती बहुचर्चित मुंज पार पडली. इथे पोस्ट टाकली त्या वेळी त्या मित्राशी वेळोवेळी चर्चाहि सुरुच होती. मला मुख्य भीती होती कि मुंजीच्या जेवणावळीत सामिष अन्न ठेवतोय का काय? अर्थात "तसे झाले तर मी न जेवता जाईन" अशी इमोशनल धमकी दिली होती. मुंज उत्तम झाली. चक्क सा-या तरुणी, भूतपूर्व तरुणी नऊवारी नेसून होत्या. जेवणाचा बेत अगदी पारंपारिक होता. : : संध्याकाळचे कुठल्याश्या मॉल मधील पब चे निमंत्रण होते. ठरल्या प्रमाणे मी गेलोच सकाळी नथ - नऊवारी ल्यालेल्या तरुणी मिनी आणि मायक्रोमध्ये कंबर हलवत नाचत होत्या … कहर म्हणजे मुंज मुलगा पार्टीस हजर होता. मोकटेल पीत चिकन लॉलीपॉप चे लचके तोडत होता. ब्राह्मण्याचा कडेलोट बघून मी पाणी पिउन मित्रास केवळ ग्रीट करून, माझ्या छोट्या मित्रा बरोबर त्याच्या उत्सफूर्त आग्रहाखातर नृत्यहि केले आणि तिकडून काढता पाय घेतला. ब्राह्मण्यावरील बलात्कार रोखण्यात मी कमी पडलो. माझा धिक्कार असो. मूळ पोस्ट - अभिराम्न साठ्ये ,पुण्यनगरी
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 05/22/2014 - 20:09 नवीन
ब्राह्मण्यावरील बलात्कार रोखण्यात मी कमी पडलो. माझा धिक्कार असो. अर्रर्र! बरं, जाऊ द्या, आता यापुढे तुम्ही मुंजींना जाऊच नका कसे! पबमधील आमंत्रणांना होकारही देऊ नका, म्हणजे बरे वाटेल. ;) (हलके घ्या, मी उगीच चिडवतीये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
च
चिन्मय खंडागळे गुरुवार, 05/22/2014 - 21:27 नवीन
ही ब्राह्मण्या कोण आणखी? आणि मिनि घालून नाचत होती तर बलात्कार होणार नाही तर काय? आपल्या पवित्र संस्कृतीला न शोभणारे कपडे घालून या बाया नाचतात म्हणून बिच्चारे पुरुष चाळवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 05/23/2014 - 03:16 नवीन
आँ? काय हो चिन्मयसाहेब? तुम्हाला काय झालं एकदम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
ट
टवाळ कार्टा Fri, 05/23/2014 - 08:41 नवीन
तर काय लहान मुलींवर बलात्कार करणारे आपल्या "उच्च" संस्क्रुतीतले नसतातच मुळी आणि परदेशात कमी लेव्हलच्या संस्क्रुतीमधे "बिकिनी"तल्या मुली/बायकांवर पण बलात्कार होत नाहीत कारण त्यांची संस्क्रुती आपल्याइतकी "उच्च" नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मय खंडागळे
श
शब्दबम्बाळ Wed, 07/29/2015 - 10:43 नवीन
परदेशात कमी लेव्हलच्या संस्क्रुतीमधे "बिकिनी"तल्या मुली/बायकांवर पण बलात्कार होत नाहीत!! बलात्काराचे समर्थन आजिबात करायचे नाही पण हे वरच वाक्य काहीच्या काही उगीच लिहिलंय! तो प्रतिसाद जुना आहे त्यामुळे आता तरी facts तुम्ही वाचल्या असतील अशी आशा आहे... आपल्या इथेही वाईट प्रवृत्ती आहेतच आणि त्यावर योग्य उपाय निघायला हवा पण त्या "केवळ" आपल्या इथेच आहेत हे म्हणणे म्हणजे इथे असलेल्या चांगल्या लोकांचाही अपमान करणे आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नानासाहेब नेफळे Fri, 05/23/2014 - 05:05 नवीन
मुंज या विधीमध्ये वर्णाश्रम पाळावा असे सांगतात, त्यामुळे या विधीवर कायदेशीर बंदी आणावी. पाच वर्षांची सक्तमजुरी आणि पच्चास पच्चास तोला दंड ठेवावा. -हुकमावरुन
  • Log in or register to post comments
म
म्हैस Fri, 05/30/2014 - 11:19 नवीन
मुंज हे celebrate करण्याचं कारण झालं आहे हल्ली. मुंज करणार्यांना ती कशासाठी आणि कशी केली जाते हे हि ठावून नसतं. उगीच परंपरा पाळायची म्हणून मुंज केली जाते. त्यापेक्षा न केलेली बरी कि
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 11:26 नवीन
मालकाचे जाते आणि कोठावळ्याचे मात्र पोट दुखते तशी काहीशी गत आहे ही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस
स
सूड Fri, 05/30/2014 - 12:22 नवीन
आमच्याकडे याला भिकार्‍याला सुपारी नि सावकाराला ओकारी म्हणतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 05/30/2014 - 12:23 नवीन
च्यायला *ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/30/2014 - 12:56 नवीन
अगागागागागागागागागागा......... Image removed. मर्मभेदक सुडुक!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
र
रेवती Fri, 05/30/2014 - 15:09 नवीन
टाळ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Wed, 06/04/2014 - 11:07 नवीन
आयला, या धाग्यावरची प्रातिसादिक दिवाळखोरी अजूनही थांबलेली दिसत नाही अजून! (प्रतिसाद चांगलेत ओ, पण बास की आता.)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 06/04/2014 - 12:28 नवीन
दोनसं कराचं ना भो. अशी हिंमत हारून कसं चालेल..? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 06/04/2014 - 12:41 नवीन
अरे हो की. दोनशे करा!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बॅटमॅन Wed, 06/04/2014 - 12:41 नवीन
करा ना, करा ना, करा ना, गडे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विटेकर Wed, 06/04/2014 - 13:46 नवीन
मी माझा अनुभव सांगतो ! मी माझ्या मुलाची यथासांग शास्त्रोक्त पद्द्धतीने श्रद्धापूर्वक सर्व विधीयुक्त मुंज केली ! गुरुजीनी तत्पूर्वी मला सांगितलेला गायत्री मंत्र जप देखील मी पूर्ण केला. विधी बरोबरच त्याच्या आईने मुंजीत भरपूर मिरवून घेतले,( मातृभोजनानंतर आईला काहीही काम नसते , केवळ मिरवणे! भिक्षावळीची वेगळी साडी नेसणे हा ही एक प्रोग्राम असतो ! भिक्षा हा पण एक इवेंट !) कधीही न भेटणारे सारे पाहुणे भेटले,माझे आई - वडील खूष झाले. मला झालेले फायदे - १. हा सारा समारंभ मी पूर्णपणे एन्जोय केला. गायत्री जप देखील ! मी देखील किंचित अंतर्मुख झालो. २. मुलाचा खोडकरपणा ( त्याच्या आईच्या भाषेत ताप देणे ) आश्चर्यकारक रित्या कमी झाले.आता तो रोज संध्या करत नाही पण तरीही ! ३. आई- वडील खूष ,बायको खूष ! दोन्ही एक्दम खूष असे प्रसंग संसारी माणसाच्या आयुष्यात फार कमी येतात. ४. डिंगणकरांचे जेवण जेऊन समस्त मंडळी खूष झाली. तेव्हा , स्वानुभवावरुन सांगतो , मुलाची / मुलीची , कोणत्याही जातीतल्या , मुंज जरुर करावी , आपली श्रद्दा असेल तर ! डॉ. सुबोध खरेंच्या सूरात सूर मिसळून म्हणेन - रायगडावर जाऊन दारु पिऊ नये , त्याच्यासाठी शेकोडो अन्य ठिकाणे आहेत!! त्यामुळे धागाकर्त्याच्या भावनेशी १००% सहमत ! मला ही जर कोणी रायगडावर दारु प्यायचा कार्यक्रम पूजेचे आंमंत्रण सांगून करेल, तर मी त्याच्या कानाखाली खेचीन ! शेण खाण्याच्या जागा आणि प्रसंग ठरलेले आहेत , मला व्यक्ति स्वातंत्र्य आहे म्हनून मी रस्त्याने नागडा चालेन म्हणणार्‍या इसमाला पोकळ आनि भरिव बाम्बूने आलटून- पालटून फटके देण्यात यावेत.
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Mon, 07/27/2015 - 14:30 नवीन
या धाग्याशी तसा सम्बन्धित नसला तरी थोडासा अवान्तर आणि थोडसा धाग्यालाच चिकटलेला एक मुद्दा मान्डतो- नुकतेच एक महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य व्यक्तिशी भेट झाली . त्यान्च्याशी बोलताना ब्राह्मण आयटी किंवा सॉफ्टवेअर इन्जिनियर्स व इतर परदेशी जाणार्या मन्डळींच्या धर्मबाह्य वर्तनाचा विषय निघाला . म्हणजे असे की अशी बाहेर जाणारी मन्डळी ब्राह्मण्याचे नियम सर्रास पायदळी तुडवतात. उदा. मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन ( वन-नाइट स्टॅन्ड इ.इ.इ.) तर अशा मन्डळीनी केलेल्या पापाचरणाबाबत धर्माचे काय मत आहे? यावर त्या "महामहिम कथित (?)धर्मशास्त्रकार ढुढ्ढाचार्य "नी दिलेले उत्तर ऐल्कून मी उडालोच! ते म्हणाले की "आयटी इन्जिनियर्स परदेशात जावुन भारताचे भले (?) करत असलेने आम्ही त्याना नियमातून सूट दिली आहे. गळ्यातील जानवे काढून ठेवावे व मग सर्वकाही (मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन इ.इ.इ.) जे करायचे ते करा . फक्त एकादशीला किंवा गणपती /सत्यनारायण पूजेच्या वेळेला गोमूत्र पिवून जानवे घाला , मग काही दोष नाही , ब्राह्मण्य अबाधित राहते " च्यायला , हे मला इतकी वर्षे माहित नव्हते . धर्मात अशीदेखील सोय आहे तर ! आम्ही फुकट गेली ५० वर्षे ब्राह्मण्य धर्माचे पालन करीत राहिलो ! हिंदू धर्म इतका सुधारला ? मला माहितच नव्हते बुवा ! * कॄपया कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही , पण उपरोल्लेखित प्रसन्ग १००% खरा आहे !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/27/2015 - 15:30 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ षिळ्या कढीला उत आणलाय पण भारी उत आणलाय ... ५-५० प्रतिसाद तर कुठे गेले नाहीत ! १)बाकी ढुढ्ढाचार्य ह्याम्छ्या 'भारताचे हित' ह्या लॉजिकशी सहमत नाही , आधी धर्म महत्वाचा , मग देष ( हे आम्ही सौदीत जाऊन शिकुन आलो आहोत ) त्यामुळे भारताच्या हित अहिताशी संबंध नाही ! २) जानवे काढून ठेवावे >>> जानवे काढायचा संबंधच येत नाही ! जानवे हे केवळ पितृऋण , ऋषिऋण आणि देवऋण ह्यांचे सतत स्मरण करुन देणारे एक साधन अर्थात रिमाईंडर ह्या अर्थाने जानवकाघालत असणार्‍यांन्ना जानवे काढुन ठेवायचा संबंधच येत नाही ( आणि जर जानवे न घालताही ह्या तिन्हींचे स्मरण रहाणार असेल तर जानवे घालयाची संबंध येत नाही !!) ३) मद्य-मांस भक्षण , परस्त्रीगमन >>> महाभारतात वाचलेल्या कित्येक गोष्टींवरुन हे सिध्द होते की ब्राह्मण वैदिक काळात मांसभक्षण करत होते ( संदर्भ : महाभारत सभापर्व यज्ञानंतर युधिष्टिराने दिलेल्या पार्टीचे वर्णन : " ब्राह्मणांना वेगवेगळे प्रकारचा वराहांचे आणि हरणांचे मांस खायला घालुन संतुष्ट केले " :) त्यामुळे मद्य मांसभक्षण हे काही पाप नव्हे ! परस्त्री ह्या शब्दाचा अर्थ "दुसर्‍याची पत्नी" असा आहे आणि अ‍ॅडल्टरी हा हमेरिकेतही गुन्हा असल्याने शहाणी माणसे त्या भानगडीत पडत नाहीत . ( पडलीच तर त्यांन्ना पाप नाही , अमेरिकन बांबु लागेल !!) धर्मात अशीदेखील सोय आहे तर ! >>> धर्मात सोय आहे असे नसुन मुळ धर्माचा अभ्यास न केल्याने पुरोहित वर्गाने त्यांच्या सोयी ने खपवलेल्या रुढींना धर्म मानण्याची चुक बहुसंख्य लोक करत आहेत ! मुळ धर्माकडे चला ! बरेच शॉक्स आणि सर्प्राईजेस मिळतील !! आता ह्या श्रावणात सत्यनारायण घालयच्या ऐवजी महाभारत वाचा . उपनिषद वाचा किमान इशावास्योपनिषद तरी वाचाच ! एकदा 'न कर्मः लिप्यते नरे ' ही अवस्था प्राप्त झाल्यावर ब्राह्मण्य अबाधित राहते की नाही असले प्रश्ण पडणार नाहीत !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Mon, 07/27/2015 - 15:44 नवीन
सर्वकाही (मद्य-मांस भक्षण , / विवाहबाह्य- विवाहपूर्व शरीरसम्बन्ध ,परस्त्रीगमन इ.इ.इ.)पापाचरणाबाबत धर्माचे काय मत आहे? असे वाचावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/27/2015 - 16:35 नवीन
तेच सांगतोय सनातन धर्माच्या मते मद्य-मांस भक्षण , / विवाहबाह्य- विवाहपूर्व शरीरसम्बन्ध ,परस्त्रीगमन ह्यातील परस्त्रीगमन सोडता बाकी काहीही पाप नाही !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
स
सुबोध खरे Mon, 07/27/2015 - 16:48 नवीन
अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम परोपकारः पुण्यः पापायः परपीडनं अठरा पुराणे वाचली तरी त्यातून व्यासांची दोनच वाचणे खरा अन्वयार्थ सांगतात. परोपकार करणे हे पुण्य आहे आणी दुसर्याला त्रास देणे हे पाप आहे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
काळा पहाड Mon, 07/27/2015 - 20:43 नवीन
पण जो त्रास सहन करतो हे त्याचं पुर्व संचित असेल तर? म्हणजे असं की अ नं मागील जन्मात ब ला त्रास दिला आणि ब हा या जन्मात त्याची परतफेड करतोय. ब हा पापी कसा? वैश्विक न्यायानुसार ब हा पापी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बॅटमॅन Mon, 07/27/2015 - 16:49 नवीन
यग्जाक्टली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
काळा पहाड Mon, 07/27/2015 - 18:21 नवीन
तुमची थट्टा क्रत असतील ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
प
पगला गजोधर Tue, 07/28/2015 - 07:31 नवीन
गाय गावठी हवी ? की जर्सी चालेल ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
ह
होबासराव Tue, 07/28/2015 - 09:27 नवीन
देशी गाय म्हणा हव तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 07/28/2015 - 11:07 नवीन
सप्तसमुद्रापलीकडे भारतातून कुरिअरने मागवावी लागेल चापटी (गोमुत्राने भरलेली हो), आणि पुढे तिचा अपेयपान करण्यासाठीसुद्धा वापर करता येइलच कि, (अहो पहिल्यांदा गोमुत्राने भरल्यावर, पुढच्या अपेयपानाच्या फिलिंग्स/ टॉपअप्स आपोआपच पवित्र झाल्याच की )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
न
नाखु Tue, 07/28/2015 - 07:21 नवीन
त्या मुंज-मुलाचे लग्नापर्यंत चालू राहण्याचे कंत्राट ऊ़खंनी घेतले आहे तेव्हा बटूला+मिपापालकाला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
श
शंतनु _०३१ Tue, 07/28/2015 - 09:24 नवीन
नेमका प्रॉब्लेम काय आहे ? आधी सोवळ ओवळ पाळतो म्हणून बोंब होती, आता कोस्मोपोलिटिअन झालो तर हे सोवळ्या ओवाळ्या च्या मागे लागलेत तर्क : विरोध ब्राह्मणाना आहे, आकर्षण ब्राह्मण्याच आहे
शेरिंग मध्ये राहताना याचा अनुभव घेतला, मग अगदी ताटाला ताटाला ताट लावून सामिष पंगतील वरण भात खाल्ला ( सामिष आपल्या कुवती बाहेरचं ) मग तीर्थ प्राशन …… आता जाणव्याने तीर्थ महाग केला म्हणून बोंब
बाकी लेख म्हणजे कल्पना विलास आहे
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 07/28/2015 - 12:43 नवीन
या प्रकाराला माझाही विरोध आहे. अर्धवट संस्कृती पेक्षा संस्कृती नसलेली उत्तम. निदान विटंबना तरी होणार नाही. मुंज मुलाची, पण 'एन्जॉय' हे पालक करणार. पुढची वाट मुलासाठी घालून देणार. केवळ युसलेसपणा आहे हा. आणि एकच म्हणतो; तुमच्या धाग्यात तुम्ही जो नम्र आक्षेप घेत पुढे तितक्याच नम्रपणे त्या जातीवर्/उपजातीवर बोट ठेवलं आहेत; तिथवरच गोष्टी थांबत नाहीत. हळद हा प्रकार मला आजवर कळला नाही. हळदीला ये हं ताईच्या! फुल दारू नॉनव्हेज डीजे बिजे आहे असं सांगणा-या मुलाकडे मी मख्ख चेह-याने बघत होतो. हे काय आहे? याचंही जरा उत्तर शोधावंत. अशी अनेक उदाहरणं आहेत. लग्न समारंभ, पहिला दुसरा वाढदिवस, सत्यनारायण अशा अनेक प्रसंगी 'अनकॉल्ड फॉर' गोष्टी केल्या जातात आणि या प्रसंगांचं विद्रुपीकरण होतं. हा कुण्या एका जातीचा प्रश्न नसून आपल्या समाजातील एकंदरित मानसिकतेचा आहे. जिकडे तिकडे चैन, मौज शोधताना सत्वाची विटंबना करताना आपल्याला काहीच गैर वाटत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे.
  • Log in or register to post comments
र
राही Tue, 07/28/2015 - 21:19 नवीन
गंमत आहे. आपल्याकडे कोणताही आनंदाचा प्रसंग साजरा करताना मद्यप्राशन आणि मांसभक्षण करण्याची प्रथा तीन हजार वर्षांपूर्वी होती. त्यानंतरही अनेक शतके ती प्रचलित होती. किंबहुना सर्वांनी एकत्र जमून मांसभक्षण आणि मद्यप्राशन करणे हाच आनंदाचा प्रसंग असे. आता गंमत अशी की बदलत्या संस्कृतीनुसार काही लोकांनी मद्यमांस सोडून दिले, पण अनागर आदिम, किंवा ज्यांच्यापर्यंत संस्कृतिबदलाचे वारे पोचले नाहीत, अशा बहुसंख्य लोकांमध्ये ती प्रथा अजूनही कायम राहिली आहे. या आदिम किंवा अनागर समाजात प्राचीन काळच्या अनेक प्रथा-परंपरा मूळ रूपात टिकून आहेत पण आज त्याच प्रथा निकृष्ट, टाकाऊ, विद्रूप मानल्या जातात. ह्याला समांतर उदाहरण स्थलांतरितांच्या संस्कृतीचे देता येईल. ज्या काळात हे स्थलांतर झाले, त्या त्या काळच्या भाषा, प्रथा हे लोक आपल्याबरोबर घेऊन गेले. मूळ भूमीत अनेक बदल झाले ते त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत आणि त्यांची भाषा तुलनेने जरी मूळ रूपात कायम राहिली तरी मूळ भूमीत ती अशुद्ध समजली जाऊ लागली. संस्कृतीत होणारे बदल हे चांगल्यासाठीच होतात किंवा असतात असे मानता येईल. पण पुन्हा या प्रथा आपल्या माहितीनुसारच्या किंवा आपल्या समजानुसारच्या मूळ-शुद्ध रूपातच साजर्‍या करण्याचा अट्टाहास करताना काही लोक दिसतात तेव्हा या विरोधाभासाची गंमत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
य
यसवायजी Wed, 07/29/2015 - 06:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा