Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?

उ
उडन खटोला यांनी
Sun, 04/27/2014 - 08:03  ·  लेख
लेख
मुलाच्या मुंजीचे निमंत्रण करायला एक जोडपे आले होते. ते पिकनिक ला निघालेयत कि काय असे वाटले. मुलाचा बाप ३/४ विजार - टी शर्ट तर आई फोर्मल शर्ट -ट्राउझर मुंजीचे निमंत्रण मिळाले निघता निघता बापाने अजून एक निमंत्रण दिले. मुंजीच्या दिवशीच संध्याकाळी कुठल्याश्या पब ला अमुक रंगाचे कपडे घालून ये, इ थोडक्यात मुलाच्या आयुष्यातील पहिली संध्या, आचमने तो करणार आणि आम्ही इकडे पब मध्ये आचमने करणार!! मान्य आहे. खरोखर देशी-विदेशी मित्र येणार आहेत … पण म्हणून हे असे?? ..परवाच एका NRI जोडप्याने पुण्यात येऊन मुलांच्या मुंजीचा असाच घाट घातला होता .......मुंज ईतर सोहळे उत्तम पारंपारिक वेशात ......अन भिक्षावळीच्या वेळी मुंज मुलांच्या आईची आणि ईतर महिला नातेवाईकांची "खिट्टी" सटकली ब्यांड वाल्यांना खास फर्माईश ......मला जाऊ द्या ना घरी वाजले कि बारा ......मुंगळा .......या वर कहर.......चिकनी चमेली .......सगळा ब्रह्मवर्ग नऊवारी साड्या ....पारंपारिक वेशात रस्त्यावर धिंगाणा घालत होता .......पैसे ओवाळून टाकत होता .....दुसऱ्या दिवशी चक्क कॉकटेल पार्टी .......इथे त्या कुटुंबाची उपजात सांगायचा मोह टाळत आहे याची नम्र नोंद असावी आई-बाबा, वडलांचे भाऊ, मित्र त्यांच्या बायाकांसाहित ३१ डिसे ला संध्याकाळी घरी येतात, सारेच यथेच्छ दारू पिउन तंगड्या तोडत पहाटे ३ -४ पर्यंत दंगा चालू असतो …. मग १० - ११ पर्यंत उठून पुन्हा बिअर प्यायला चालू करतात आणि बाहेरून पुन्हा खाणे मागवून १ च्या रात्रीपर्यंत हे चालू असते --- हे जो मुलगा बघत असेल त्याला कशाचे काय वाटणार आहे? वरील दोनही अनुभव हे वेगवेगळ्या , मराठी ब्राह्मण घरातील आहेत आई-बापावरच असले संस्कार तर काय पुढे काय होणार? असली लोकं "मुंज" नावाचा विधी करायच्या भानगडीत पडतातच कशाला ? साधे get - together आहे म्हणायचे , त्यात येणाऱ्या नी अमुक रंगाचे कशाला कपडे न घालता आले तरी चालेल म्हणून सांगायचे ! ज्यांच्या घरी देशी - विदेशी मद्याने भरलेले बार आहेत, ग्रिल करण्यासाठी अगदी लाखभर खर्चून संयंत्र आणले आहे. त्यावर चिकन तंदुरी किती छान होते, कुठूनसा कुठला मासा आम्ही कोल्ड स्टोरेज करून कसा आणला आणि भरून खाल्ला ह्याची वर्णने ऐकायला मिळतात तिथे "गायत्री मंत्र" हे शब्द तरी माहित असतील का?? संपादित /आधारित -स्रोत- अन्यत्र

प्रतिक्रिया द्या
61891 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

व
वेल्लाभट Wed, 07/29/2015 - 06:43 नवीन
ओक्के
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
अभिदेश Wed, 07/29/2015 - 00:05 नवीन
मला हा लेख म्हणजे निव्वळ कल्पनाविलास वाटतोय..... ह्यातल्या किती बाबी खऱ्या आहेत ह्या बाबतित शंका आहे. एका क्षणासाठी मान्य करु कि हे खरे आहे , तर माझा प्रश्न आहे कि त्यांनी तसे केले तर तुमचे काय गेले ? पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे "त्यांनी प्रेम केले , तुमचे काय गेले ?" तुमच्या का एवढे पोटात दुखतय ? जर तुम्हाला PUB मध्ये जाणे पटत नवते तर कशाला गेलात? कोण कोण mini skirt मध्ये वावरतंय ते बघायला? की कोण काय खातंय ते बघायला? मला एकूण हा प्रकार कल्पनारांजीतच वाटतोय . उगाच कोणत्या तरी समजा विरुद्ध गरळ ओकायाची झालं आणि हे सगळे आपले खरे नाव लपवून.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 07/29/2015 - 11:02 नवीन
कोण कोण mini skirt मध्ये वावरतंय ते बघायला?
पुण्यनगरी वाचलंत नाही का? पुण्याच्या लोकांची सवयच आहे, बघताना/खाताना मारे मिटक्या मारतील. त्यानंतर आव मात्र संस्कृतीरक्षकाचा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा