नमो लाटेचे साईड ईफेक्ट
नमस्कार,
रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात,
१. शिवसेनेला जीवदान मिळाले
२. मनसेची धुळ्दाण झाली
३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या
असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ?
टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.
देशाला विघातक आहेतअगदी बरोब्बर संपत जी.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहेसहमत आहे, मी देखील अनेक निरलसपणे, नि:स्वार्थीपणे चांगली कामे करणारी लोक बघितली आहेत, माझे अनेक जवळचे मित्र संघवाले असून वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रकारे समाजसेवा करतात. पण संघतत्त्वे ही घातक, दुभाजक आहेत याबद्दल शंका नाही.तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही.अल्पसंख्य असल्याचा आणि तसे वागणूक द्यायचा नेहमी आग्रह धरायचा आणि मग आम्हाला वेगळे वागवतात असा आरोप करायचा ! मुख्य म्हणजे या सगळ्यात तथाकथित विचारवंतांना काही विरोधाभास (कांगावाखोरपणा ?) दिसत नाही !! जय हो !!! असे "जाती-धर्मावर आधारीत भेदाभेद" करण्याचा आग्रह करण्याऐवजी "प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर आधारून मदत आणि समान संधी" याचा आग्रह धरण्याइतका या तथाकथित विचारवंतांचा मानसिक विकास कधी होईल ?