नमो लाटेचे साईड ईफेक्ट
नमस्कार,
रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात,
१. शिवसेनेला जीवदान मिळाले
२. मनसेची धुळ्दाण झाली
३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या
असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ?
टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.
आरेसेस ही एक तकलादू संघटना आहे,तुम्ही एकदम निष्कर्षच काढला आहे ! आता काय बोलणार ? गेली ९० वर्षे सतत वृद्धींगत होणारी संघटना " तकलादू " आहे हे आम्हां अज्ञ लोकांना पटत नाही. जरा विदा द्याल का ?मोदींनी ती ८५ सालीच सोडलीश्री. मोदींनी राजीनामा दिला का ? लिंक आहे का ? का सोडली संघटना मोदींनी ?संघाकडे जर एवढी ताकद आणि शिस्त होती तर २००४/०९ला ह्या गोष्टी विजयादशमीच्या मुहुर्तावर दहा वर्ष पुजायला ठेवल्या होत्या काय?माझा मुद्दा क्रमांक १ वाचावा . आपल्या ताकदीची सुद्धा जाणीव असावी लागते आणि सर्व ताकद पणाला लावावी अशी परिस्थिती यावी लागते !