नमो लाटेचे साईड ईफेक्ट
नमस्कार,
रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात,
१. शिवसेनेला जीवदान मिळाले
२. मनसेची धुळ्दाण झाली
३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या
असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ?
टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते.संघाचे राक्षसीकरण करण्याची मुळात गरजच काँग्रेसला कधी नव्हती, संघ हा राजकीय आणि तात्त्विक लेव्ह्लवर काँग्रेसचा प्रतिस्पर्धीसुद्धा नव्हता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून ते पुढची जवळपास ४०-४५ वर्षे गांधी-नेहरुंच्या आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांचा प्रभाव जनमानसावर खोल रुजलेला होता. हा प्रभाव निव्वळ राजकीय असा नव्हता तर तो तात्त्विक आणि नैतिक असा सुद्धा होता. विशेषतः गांधींजींचा आध्यात्मिक आणि नैतिक अधिकार जनतेवर मोठा होता- गांधीजींबरोबर कितीही मतभेद असले तरी कुणीही हे मान्य करेल असे वाटते. आणि त्याच बरोबर भगतसिन्घ इ. क्रांतिकारक, सावरकर, आंबेडकर प्रभृति काँग्रेसविरोधक यांचा सुद्धा मोठा प्रभाव जनमानसावर होता. या सगळ्या धामधुमीत संघ कुठेच नव्हता. ही झाली राजकीय क्षेत्रातली स्थिती. सामाजिक क्षेत्रात जेव्हा विनोबा भावे, पटवर्धन, महर्षी आणि र धो कर्वे- स्त्रीशिक्षण, सावरकर- हरिजनसुधार, गांधी- हरिजनसुधारणा, बाबा आमटे, आंबेडकर- दलितसुधारणा, मास्टर तारासिंग- पंजाबात ही आणि अशी अनेक उदाहरणे देशात सांगता येतील. तिथेही संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा संघाचे काय योगदान होते हा संशोधनाचाच विषय आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणूनही संघाचा फारसा प्रभाव नव्हता (१९२५ पासून पुढच्या ३०-३५ वर्षापर्यंत तरी). एवढेच नव्हे तर पहिल्या १९५२ निवडणुकीत सावरकरांच्या हिंदू महासभेविरुद्ध जनसंघाने आपले उमेदवार उभे करुन हिंदूंची मते फोडण्याचा नतद्र्ष्टपणा केला होता. थोडक्यात, संघ ही कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसलेली, कर्तृत्त्वशून्य संघटना होती-कमीतकमी १९४८ पर्यंततरी. गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. संघाचे "राक्षसीकरण" करुन उगाच त्याचे महत्त्व वाढविण्याचे काम काँग्रेस करेल असे वाटत नाही. त्यामुळे केलंच असेल तर संघाचे राक्षसीकरण तर ते गोडसेने नकळत का होईना पण केलय. त्यामुळे संघाचे उद्दिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय आहे असे जे म्हणतात त्या दोन्ही क्षेत्रात संघाने नक्की काय कर्तृत्त्व गाजवलय ते जाणून घ्यायला आवडेल. अर्थात, संघाने कुठल्या भूकंपात/ वा आपत्तीत कार्यकर्ते वगैरे पाठवले आणि त्यालाच सामाजिक कार्य म्हणावे अशी फुटकळ उत्तरे तुम्ही देणार नाहीत अशी अपेक्षा. डिस्क्लेमर- मी स्वतः शाखेत ७-८ वर्षे गेलो आहे, कॉलेजात असताना अभाविप च्या वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो आणि माझी बायको देखील यूके मध्ये राष्ट्रसेविका समितीचे कार्य करते. त्यामुळे हे प्रश्न विचारण्यामागे पार्श्वभूमी आणि अभ्यास दोन्ही आहे. त्याच बरोबर, संघाच्या भूमिकेमुळे आलेले नैराश्य सुद्धा. त्यामुळे इथले टिपीकल संघीय जी उडवाउडवाची आणि उद्धट उत्तरे देतात ती माझ्यावर काम करणार नाहीत. :)ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा ! "धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ? मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून. आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे. अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार. स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्याला सावरा म्हणून कसं सांगणार?