Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर

म
मराठी कथालेखक
Fri, 07/25/2014 - 13:18
🗣 271 प्रतिसाद
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. ५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !! ६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं. ७) Cinema/Movie साठी 'पिक्चर' तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?

प्रतिक्रिया द्या
96475 वाचन

💬 प्रतिसाद (271)
न
नानासाहेब नेफळे Fri, 07/25/2014 - 17:21 नवीन
प्रमाणाचा अट्टाहास धरला कि असेच होणार... बायदवे, तेलाची बाटली, आंब्याची टोपली , पाण्याचे भांडे, तुपाची वाटी यावरही आपले ज्ञानकिरण पाडावेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/25/2014 - 18:37 नवीन
आपण आपले अंग शर्टात घालत असताना "शर्ट अंगात घालणे" हा शब्दप्रयोग कसा काय वाटतो ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
य
यसवायजी Mon, 07/28/2014 - 20:15 नवीन
'पँटला चेन लावून मिळेल' असे म्हणायचे असेल. का पायजम्याला साखळी? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ध
धन्या Fri, 07/25/2014 - 14:07 नवीन
आमच्या गाडीचा शॉकपसर खराब झाल्यामुळे धक्के बसत होते.
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 07/25/2014 - 14:13 नवीन
आपण पाव हा मराठीत लिहून ब्रेड इंग्रजीत bread लिहिला आहेत. पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का? तुम्हाला एक कोडे घालू का?- ब्रेडला पोर्तुगीज भाषेत काय म्हणतात?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 07/25/2014 - 14:35 नवीन
पाव हा शब्द मराठी आहे असे सुचवायचे आहे का?
हो. म्हणजे मी तरी तसेच समजतो ? चुकलाय का शब्द ? बाकी पोर्तुगीज शब्द माहित नाही. खालील लिंक प्रमाणे "पांव" असा मराठी शब्द आहे. http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/word
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 14:42 नवीन
पाव/पांव या शब्दाचा पूर्वज पोर्तुगीज़ मधला पाव हा शब्द आहे. पोर्तुगीज भाषेतून आलेले पण बहुतेकांच्या तसे गावीही नसलेले अजून काही शब्द खालीलप्रमाणे: पगार, चावी, मेज, कमरा, बटाटा, इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
प
प्यारे१ Fri, 07/25/2014 - 14:54 नवीन
अरबी भाषा बोलणारे अल्जिरियावाले लोक १३२ वर्षांच्या फ्रेंच राजवटीनंतरही वरील पोर्तुगिज शब्द वापरतात तर...! मला हे फ्रेंच अथवा अरेबिक शब्द असावेत असं वाटत होतं. दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 15:04 नवीन
हे शब्द पोर्तुगीज भाषेत आहेत एवढं नक्की- यद्यपि पोर्तुगीजनं उसनवारी केलेली असण्याची शक्यता दुर्लक्षून चालणार नाही, तूर्तास ते माहिती नाही त्यामुळे पोर्तुगीज असे म्हणतो.
दुकान, कानून, कायदा, ज्यादा, पेटी हे अरेबिक असावेत असा अंदाज आहे.
सहमत, फक्त (हाही बादवे अरेबिकच शब्द आहे), अरबी की फारसी हे ठाऊक नाही, जाणकारांना (उदा. बिका, प्रपे, इ.) विचारलं पाहिजे. त्या दोन भाषांची आपसांत देवाणघेवाण बरीच झालेली असल्याने थोडे ट्रेनिंग मिळाल्याखेरीज एखादा शब्द मूळचा अरबी, फारसी की तुर्की हे कळणार नाही. इंड्यन माणसाला 'तिकडनं' आलेला शब्द इतकं पक्कं ठौक असतं, पण त्यापलीकडे नै. आणि असणार तरी कसं म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
न
नानासाहेब नेफळे Fri, 07/25/2014 - 15:26 नवीन
यावरुन आठवले,सावरकरांना मराठी भाषेवरचा फारसी प्रभाव नष्ट करायचा होता ,कारण अर्थात फारसी मुस्लिमांची भाषा होती व सावरकर हिंदुत्ववादी होते. त्यांच्याभाषेत 'भाषाशुद्धी'साठी त्यांनी मराठीचे' संस्कृतकरण 'करण्याचा घाट घातला होता. खास संस्कृत शब्द मराठीत दिले त्यांनी. उदा- तारिख- दिनांक तहसीलदार- प्रांताधिकारी मैदान- क्रिडांगण पगार- वेतन,ईत्यादी. भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/25/2014 - 15:30 नवीन
भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात
असं कसं असं कसं ? तसं असतं तर नानासाहेब ह्या शब्दाला नानासाहेब पेशवे जे की तुमच्यालेखी जातीयवादी किंव्वा नानासाहेब फडणवीस जे की तुमच्या लेखी लंपट ह्यांच्या अस्मिता चिकटल्या नसत्या काय ? तरीही तुम्ही नानासाहेब हा आयडी घेता ह्यावरुन अस्मिता चिकटणे वगैरे घडत नसावे असे वाटते *biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Fri, 07/25/2014 - 15:43 नवीन
नानासाहेबच्या उल्लेखावरुन आठवले ,'साहेब' या फारसी शब्दाला 'महोदय, असा कुणीही सध्या वापरत नसलेला शब्द सावरकरांनी शोधला होता,... आणि पेशवा हा ही फारसी शब्दच आहे ,त्याला काय म्हणायचे मग.... पुण्यस्वराज्य?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
च
चिगो Mon, 07/28/2014 - 13:09 नवीन
'महोदय' संसदेत वापरतात.. बाकी, "संसदीय" मराठी आणि हिंदी ऐकून / वाचून फेफरं यायला होतं, ही गोष्ट वेगळी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 15:32 नवीन
भाषेलाही धार्मिक अस्मिता चिकटतात ....
या बाबतीत सावरकर एकटेच अद्वितीय इ. नाहीत. सगळ्या जगभर असेच झालेले आहे. मराठीवरचा फारसी प्रभाव कमी करायला म्हणून तर शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोश बनवायला सांगितला ढुंढिराज व्यासांना. त्यातही पोलिटिकल-रिलिजियस अजेंडा होताच. पण बाकी काही असो, सावरकरांचे प्रतिशब्द अतिशय चपखल आहेत. विनासायास रुळले- मराठीतच नव्हे, तर हिंदीतही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Fri, 07/25/2014 - 15:52 नवीन
कुठे रुळलेत!!!! आज तारिख कीती? असेच लोक विचारतात, आज कोणता दिनांक आहे? असे कुणीही विचारत नाही!!! एखादा मोठा माणुस भेटल्यास ,नमस्कार साहेब' असे म्हणणारे कितीजण आहेत आणि नमस्कार महोदय, म्हणाणारे किती ???? पोस्टाला' डाक, असा शब्द सावरकरांनी शोधला, कितीजण डाक कार्यालयात जाउन येतात? आणि डाक कार्यालयातल्या अधिकार्याला काय म्हणायचे ,डाकाधिकारी????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 15:58 नवीन
किमान लेखनात तरी बरेच रुळलेत हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Fri, 07/25/2014 - 15:57 नवीन
शिवाजींचा प्रयत्न जरी फारसीचा प्रभाव नष्ट करण्याचा असला तरीही संस्कृतकरण करण्याचा त्यांचा कोणताच अजेंडा नव्हता,याउलट संस्कृतकरणामागचे कारण उघड धार्मिक आहे आणि ते संस्कृतकरण बहुजनांच्या अंगवळणी पडत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 15:59 नवीन
आयला हे बरंय. एकच गोष्ट केली, ती शिवाजीमहाराजांनी केली तर अजेंडा नाही अन सावरकरांनी केली तर मात्र अजेंडा? मज्जाच आहे की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/25/2014 - 16:07 नवीन
हो ते तसंच आहे ! ह्याचं अजुन एक उदाहरण म्हणजे , आजारी पडल्याचं नाटक करुन , औरंगजेबाला मिनत्या विनंत्याकरुन महाराज आग्रातुन सुटतात तो मुत्सद्दीपणा आणी सावरकर माफीनामा देवुन अंदमानच्या सेल्युलर जेल मधुन सुटतात तो पळपुटेपणा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 16:18 नवीन
आणि सावरकरांचा 'सा' उच्चारायची लायकी नसलेले नेभळट जालकेसरी जेव्हा माफीवीर इ.इ. मुक्ताफळे उधळू पाहतात तेव्हा तर चिक्क्कार मणोरञ्जण होते राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नानासाहेब नेफळे Fri, 07/25/2014 - 16:22 नवीन
हो ते तसंच आहे! आग्रातुन बुद्धीचातुर्याने निसटणे आणि नंतर स्वराज्याची रितसर निर्मिती करुन छत्रपती होणे व शेवटापर्यंत लढत राहणे.. याउलट.. प्रचंड 'मुत्सद्दीपणा' दाखवुन १९२१ नंतर घरी बसणे... हो ते तसेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/25/2014 - 17:57 नवीन
१९२१ नंतर घरी बसणे
ह्यावरुन आपल्या अभ्यासाची पातळी कळाली ... आत्ता लक्षात येते की महाराष्ट्र शासनाने आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय का घेतला असावा ते )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Fri, 07/25/2014 - 16:16 नवीन
राजव्यवहारकोष म्हणजे राजकारभारातले त्यांचे ठराविक मायन्यातील शब्द लिहुन घेतले, त्यातही संस्कृतकरण केल्याचे दिसत नाही. याउलट थेट सामन्यांच्या तोंडी असलेल्या भाषेत संस्कृत घुसडण्याचा प्रयत्न वेगळ्या वाटेने जाणारा होता, सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे व राज्यव्हवहारकोष तयार करणे यातला फरक समजून घ्या! स्वतः शिवाजींची पत्रे बरीच फारसीप्रभावाखाली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 16:24 नवीन
नेफळेबुवा, राज्यव्यवहारकोष कधी वाचलात काय? की उचलली जीभ लावली टाळ्याला असंच करायचंय? माझ्याकडे आहे आणि वाचलाय म्हणून सांगतो. लेखनपद्धती पूर्णपणे संस्कृत धाटणीची करावी असा स्पष्ट उद्देश दिसतो- नव्हे, ग्रंथकारही तेच म्हणतो. घरी गेलो की ते श्लोक टंकतो. अन महाराजांची पत्रे फारसीत आहेत ती राज्याभिषेकाअगोदरची, नंतरची सगळी पत्रे संस्कृत शब्दवालीच आहेत. बाकी सामान्यांच्या तोंडी संस्कृत घुसडू पाहत होते असं जरी मानलं तरी सामान्यांना अक्कल नको काय? की त्यामुळेच ते सामान्य ठरतात- कुणीही या आणि काहीही शिकवा, जसे शिकवेल तसे ओरडू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/25/2014 - 16:24 नवीन
नेफळे राव तुम्ही अगदी मॅकोले चे आदर्ष सुपुत्र दिसता ! कारकुनी सिस्टीम मधुन तयार केलेले अन स्वकीयांपेक्षा परकीयांचाच अभिमान बाळगणारे !! बाकी सामान्यांचे एकेकाळी इंग्रजीशीही वावडे होते आणि बाबासाहेब म्हणाले की इंग्रजी हे वाघीणीचे दुध आहे ...पण बाबासाहेबांबद्दल
सामान्यांचे ज्या भाषेशी वावडे आहे तिचा पगडा बसवणे
असे काही तुम्ही बोलु धजावणार नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Fri, 07/25/2014 - 16:37 नवीन
बाबासाहेबांनी इंग्रजीचा प्रभाव बसवण्याचा प्रयत्न केला असल्यास तो स्त्युत्यच मानावा लागेल, इंग्रजी ही ख्रिस्तांची भाषा ,'अब्रह्म' वगैरे खुळचटगिरी त्यापाठी निश्चितच नव्हती... वैश्विक भाषेतुन भारतीयांना ज्ञानाची कवाडे खुली व्हावीत हाच उदात्त उद्देश त्यामागे होता.... याऊलट चार पाच पोथ्या व स्त्रोत्रांच्या चवलिपावलीत येणार्या पुस्तकातली अगम्य व मरणासन्न संस्कृत भाषा स्वतःच्या धार्मिक मुलतत्ववादासाठी इतरांवर थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे यातला फरक लक्षात घ्या ,लक्षात कसा येईल? ,चष्मा काढा आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ध
धमाल मुलगा Fri, 07/25/2014 - 16:45 नवीन
पोथ्या, स्तोत्रं, धार्मिक मूलतत्ववाद आणि सावरकर हे एकत्र बांधलेलं पाहून हसावं की रडावं तेच कळेना! शंका: सदरहू सदस्य ब्रिगेडच्या ब्रेनवॉशिंग सेशन्सला न चुकता हजेरी लावत असावेत की काय अशी शंका आल्यावाचून राहिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ब
बॅटमॅन Fri, 07/25/2014 - 16:47 नवीन
या शंकेत ब्रेनचे अस्तित्व गृहीत धरल्या गेले आहे असे वाटते. तस्मात गृहीतक तपासून पहावे अशी इणंती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/25/2014 - 16:54 नवीन
@या शंकेत ब्रेनचे अस्तित्व गृहीत धरल्या गेले आहे असे वाटते.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मृत्युन्जय Wed, 07/30/2014 - 10:25 नवीन
भें** बा***. साल्या तु १०० नंबरी पुणेकर आहेस (नसलास तरीही). किमान शब्दात कमाल अपमान करण्याची लय भारी कुवत आहे तुझ्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 20:30 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 20:31 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
य
यशोधरा Fri, 07/25/2014 - 16:51 नवीन
सावरकरांचं नाव घेतलं की कसं जबरदस्त वाटत आसंल राव, मी सावरकरांच्या चुका काढतो/ ते वगैरे. तुमास्नी इतकं कळंना! छ्या! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
नानासाहेब नेफळे Fri, 07/25/2014 - 16:58 नवीन
यशुताई,'जबरदस्त' हा फारसी शब्द आहे ,"विस्मयकारक" वगैरे संस्कृत शब्द वापरा :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 07/25/2014 - 17:00 नवीन
अर्थ बदलतो म्हाराजा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ह
हुप्प्या Fri, 08/01/2014 - 06:41 नवीन
जबरदस्त हा फारसी नव्हे. जबर हा जब्बार ह्या अरबी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ सर्वशक्तीमान असा आहे. दस्त म्हणजे हात. तो मात्र फारसी आहे. पण तो संस्कृत हस्तचा भाऊ आहे. जबरदस्त हा सरमिसळ केलेला शब्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/01/2014 - 07:46 नवीन
इतके सिरियस स्पष्टीकरण श्रीमती नानासाहेबांच्या डोक्यावरून गेले असणार ;) त्यांना विचार न करता काहीपण शेरे मारायची सवय आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ब
बाळ सप्रे Fri, 08/01/2014 - 07:56 नवीन
शेरे मारायची सवय आहे खरी त्यांना.. पण गेल्या काही दिवसात काही प्रतिसाद नोंद घेण्यालायक आहेत. आणि तसंपण शेरे मारण्याची सवय बर्‍याच मिपाकरांना आहे.. सो डोन्ट राइट हिम ऑफ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/01/2014 - 08:00 नवीन
खूपदा बेजबाबदार शेरे मारले ही विश्वासार्हता आपोआप कमी होते आणि आयडी वाचकांच्या मनातून आपोआप राईट ऑफ होते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बॅटमॅन Fri, 08/01/2014 - 09:01 नवीन
माहितीकरिता धन्यवाद. हस्त-दस्त माहिती होतं, पण जबरचं मूळ अरबी आहे हे ठौक नव्हतं ते आत्ता कळालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
प
पिलीयन रायडर Sat, 07/26/2014 - 07:48 नवीन
हा एक नवाच पैलु आमच्या अल्पमतीला आज कळाला... आजवर सावरकर ते पु.लंचा तिरस्कार केवळ जातीमुळे करताना पुष्कळ लोकांना पाहिल्यामुळे त्याबद्दल काही विशेष वाटले नाही.. ज्ञानेश्वरपण सुटले नाहीत ह्यांच्या तडाख्यातुन... (बोलणार्‍याची लायकी सुद्धा विचारात घ्यावी लागते म्हणा..).. शिवाय शिवाजी महाराज ह्यांच्यावरही मक्तेदारी दाखवायचा सोस लोकांना सुटत नाही.. (पुन्हा एकदा.. कीव येते.. असो..) पण आता हा माज इतका वाढलाय की संस्कृतपेक्षा परकीय भाषा जवळच्या वाटु लागल्या.. नुसतं तेवढंच नाही तर स्वभाषांशी "वावडं"च होऊ लागलं..?? मोठ्या संख्येने समाज असा निर्बुद्ध विचार करु लागला तर भारतीय भाषा मृतवत होणार नाहीत तर काय? बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे.. शाळेत असताना एक धडा होता.. "महापुरुषांचा पराभव".. राहुन राहुन त्या धड्याची आज फार आठवण आली.. बॅट्या आणि प्रगो.. तुमच्या सगळ्या पोस्टसाठी +१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नाव आडनाव Mon, 07/28/2014 - 11:50 नवीन
"महापुरुषांचा पराभव" हे एकदम बरोबर उदाहरण दिलंय. मला पण हेच लिहायचं होतं पण शनिवारी आणि रविवारी मिसळपाव बंद होतं. मला लहान असताना हा धडा जास्त कळला नव्हता पण मोठा होताना आजू बाजूला जे काही चाल्लय ते बघून बर्याच वेळेला या धड्याची आठवण आली आणि हळूहळू कळला / अजूनही कळतोय. कुणाला सावरकरांची बदनामी करायची आहे, तर कुणाला संभाजी महाराजांची. कुणाला आंबेडकरांवर चिखल उडवयचाय तर कुणाला गांधींवर. नेत्यांच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही आम्ही हे सगळं होत असताना तिथे नव्हतो आणि इतिहास लिहिताना बर्याचदा दोन बाजूनी वेगवेगळा लिहिला जातो. त्यातला जो चांगला आहे तेवढाच ठेवू, बाकीच्या गोष्टींची (ज्याने कुणाचीही बदनामी होत असेल) चर्चा जाहीर रित्या तरी टाळली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चिगो गुरुवार, 07/31/2014 - 14:00 नवीन
बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे..
क्या बात है, पिराताई.. १००% सहमत .. त्यातल्यात्यात आजकाल स्वतःला बाबासाहेबांचे किंवा आणखीही कुणाकुणा महापुरुषांचे समर्थक म्हणवणार्‍यांचा चेपुवर जो प्रचंड वैचारीक सावळागोंधळ आणि वायझेडपणा सुरु असतो ना, तो प्रचंड डोक्यात जातो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रभाकर पेठकर Fri, 07/25/2014 - 17:21 नवीन
दूकान, मैदान, ज्यादा, फत्ते (विजय), मालूम, हे शब्द अरेबिक भाषेत (मस्कतच्या) ऐकले आहेत. 'पेटी'ला संदूक म्हणतात. अरबी भाषेतही प्रदेशनिहाय बदल दिसून येतात. आपल्याकडे जसे मुंबई-पुण्याची मराठी, कोकणातील मराठी, नागपूरची मराठी वगैरे वगैरे कांही प्रमाणात वेगवेगळ्या असतात. तसेच, मस्कत, दुबई, सौदी, बाहरेन वगैरे देशांमध्ये अरेबीक थोडी थोडी बदलत जाते. तेही शब्द मुळ अरेबिक आहेत की बाहेरुन आयात केले आहेत सांगणे अभ्यासकाचेच काम असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/29/2014 - 18:41 नवीन
फ्रेंचमध्ये पावाला pain असा शब्द आहे, उच्चार पां किंवा पॉं, कोकणी उच्चाराशी बरंच जास्त साधर्म्य असणारा. अल्जिरीयन-फ्रेंच उच्चार मला माहित नाही. फ्रेंच, इतालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज या भाषा लॅटिनोद्भव आहेत आणि बरेच शब्द सारखे आहेत. काही शब्दांची स्पेलिंग्ज कदाचित समानही असतील, पण उच्चार निरनिराळे असतात. अवांतर - नोबेलविजेता फ्रेंच कथालेखक आल्बेर कामू अल्जिरीयात जन्माला आला. --- मूळ धागालेखक - आमच्यात लोकांवर येताजाता लैन मारतात, १४ फेब्रुवारीला "लौ यू" म्हणतात. मूळ शब्द काय आहेत हे समजून त्यांचे विचित्र उच्चार, गंमतीखातर करणं निराळं असतं. आणि माहित नसताना भलते काहीतरी शब्द वापरणं निराळं. अस्मितांची गळवं टरारलेली असणं सगळ्यात जास्त विनोदी. पण तरीही जेव्हा भलते शब्द भलत्या अर्थाने बऱ्याच प्रमाणावर लोकांकडून वापरले जातात तेव्हा भाषा बदलते. वर अनुप ढेरेंनी झेरॉक्सचं उदाहरण दिलेलं आहेच. आता याच धाग्यात अशा अर्थाचा प्रतिसाद वाचला, स्लीप म्हणजे झोपणं नाही. उच्चार आणि स्पेलिंग पाहिलं तर sleep या शब्दाचा उच्चार-लेखन स्लीप आणि slip चा उच्चार-लेखन स्लिप असंच पाहिजे. pen, pane, pain या तीन इंग्लिश शब्दांचे उच्चारही निरनिराळे आहेत, पेन्, पेन आणि पेऽन. पण लक्षात कोण घेतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
केदार-मिसळपाव Wed, 07/30/2014 - 10:02 नवीन
मी म्हणतो नेहमी आपणच लक्ष का द्यायच? इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय. तुम्ही त्यांना सांगा ना ते की ते योग आहे. त्यांना ही करु द्या ना चुकांची दुरुस्ती. महत्वाचा मुद्दा असा की आधी आपले घर व्यवस्थित आवुया लावुया आणि मग इतरत्र बघुया. इथे मला युरोपातले उदाहरण द्यावेसे वाटते. हे लोक स्पष्ट सांगतात की इंग्रजी परकीय भाषा आहे. ती आम्ही फक्त अत्यावश्यक वेळीच वापरु. मला त्यात काही चुकिचे वाटत नाही. बहुतेक भारतिय इंग्रजीबहुल देशात वास्तव्यास असल्याने त्यांना इतर भाषिय देशातला अनुभव नसतो. माझा अनुभव असा आहे की युरोपातले लोकही शक्यतो त्यांच्या भाषेतिल वाक्ये कामचलाउ इंग्रजीत रुपांतरित करतात आणि ती खपतातही. मी सुद्धा बरिच मराठी वाक्ये दॉईच भाषेत रुपांतरीत करतो. तुर्तास इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्यारे१ Wed, 07/30/2014 - 15:22 नवीन
आभार्स. फ्रेन्च फुटबॉल पटू झिनेदाईन झिदान जन्मानं अल्जिरियाचाच. (डूक्करमुसंडी वाला) 'पां' च आहे. 'लेऐ (lait) एत पां' :) बाकी फ्रेंच लोक्स नि फ्रेंच भाषेला टेम्पोत बसवायलाच हवंय. लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव. आधी शिकलो असतो तर कदाचित जमलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/02/2014 - 04:49 नवीन
लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव.
फ्रेंचचे उच्चाराचे नियम इंग्लिशपेक्षा निराळे आहेत. ते एकदा समजले की बरंच फ्रेंच सहज वाचता येतं ... अगदी अर्थ समजला नाही तरीही. (पण उच्चार समजला म्हणून फ्रेंच स्पेलिंग लिहीता येईल का हे मला माहित नाही; जे इंग्लिशबद्दल मला म्हणता येतं.) फ्रेंचमधल्या 'र'चा उच्चार किती मराठी लोकांना जमेल याबद्दल मला बरंच कुतूहल आहे. मला तरी तो जमत नाही. --- केदार-मिसळपाव -
इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय.
माझ्या कागदोपत्री नावाची आणि टोपणनावांची उच्चार आणि लेखन दोन्हींमध्ये वाट लावणारे उच्चशिक्षित मराठी लोक मला लहानपणापासून माहित आहेत. लोकांचे उच्चार आणि शुद्धलेखन सुधारण्यात घालवण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही याची जाणीव मला लहानपणापासूनच झाली. त्यामुळे परदेशी लोकांनासुद्धा मी त्यांना झेपेल तोच उच्चार सांगते. ज्यांना करायचंय त्यांनी करावं. फक्त दुसरा कोणी अमक्या पद्धतीने वागतो म्हणून मी ते करत नाही. किंवा दुसरा कोणी आवडीने मला नावडणारी गोष्ट खात असेल तर मी त्यांना अडवायलाही जात नाही. माझं मराठी (हिंदी, इंग्लिश, फ्रेंच) फार चांगलं आहे अशातला भाग नाही; निदान आहे त्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करते हे माझ्यापुरतं मला पुरेसं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
असंका Fri, 07/25/2014 - 15:14 नवीन
एवढे आहेत होय? मला तो पाव एकच माहित होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रभाकर पेठकर Fri, 07/25/2014 - 17:05 नवीन
'पगार' हा शब्द पोर्तुगिज आहे? माझ्या ऐकिव माहिती नुसार हा उर्दूतून आला आहे. पूर्वी श्रीमंतांच्या पदरी 'आश्रीत' असायचे त्यांना 'हातखर्चा'साठी जे पैसे दिले जायचे त्याला 'पगार' म्हणत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा