इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत.
काही उदाहरणे देत आहे.
१) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्याची 'कीव' कराविशी वाटते.
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट'
३) Bicycle करिता 'सायकल'
४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !!
६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं.
७) Cinema/Movie साठी 'पिक्चर'
तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?
पण X या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून Y हा दुसराच इंग्रजी शब्द वापरला जातो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते.याचे चपखल उदाहरण वरच्याच प्रतिसादात दिलेले आहे. "अपरोक्ष" या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आणि त्याचा मराठी अर्थ पाहिल्यास हे स्पष्ट होईल.