भटकंती

भिमाशंकर - "शिडी घाट" - काही शंका

Primary tabs

मी आणि माझा मित्र परिवार भिमाशंकर भ्रमंतीला जाणार आहोत, आम्हाला सर्वाना गणेश घाटातून चढाई करण्याचा ५-६ वर्षाचा अनुभव आहे. परंतु सध्या ६-७ वर्षांचा खंड पडला आहे चढाई करण्यात.
ह्या वेळेस पहिल्यांदाच गणेश घाट सोडून "शिडी घाटाने" जाण्याचा मनसुबा आहे, परंतु शिडी घाट मार्गाचा कोणालाही अनुभव नाहीये. आता पर्यंत बर्याच जणांकडून वेगवेगळी माहिती मिळाली आहे, तसेच जालावर देखील बर्याच चित्रफिती आणि छायाचित्रे बघून झाली आहेत. त्यावरून तरी शिडी घाट मार्ग जर कठीणच आहे अस जाणवतंय. मुख्य म्हणजे मध्ये जो "रॉक पॅच" लागतो त्याबद्दल सर्वांच्या मनात थोडी दहशत, उत्सुकता आणि खुमखुमी देखील आहे (असायलाच हवी ना?).
तर मुद्दा असा आहे कि मिपा तील कोणीतरी नक्कीच "शिडी घाट" मार्गाने भीमाशंकरला गेलेले असतीलच, तेव्हा अनुभवी गिर्यारोहकांनी आम्हा पामरांना "शिडी घाट" मार्गाविषयी थोडे सविस्तर मार्गदर्शन करावे, गरजेच्या सूचना द्याव्यात हि विनंती. तसेच स्वताच्या दुचाकी नेल्यास त्या कुठे पर्यंत नेता येतील आणि गावात वाहनस्थळाची विश्वासार्ह सोय कुठे आहे ते देखील सुचवावे.

एस

ह्या पावसात शिडी घाटाने जाऊ नये असे अनुभवाने सांगू शकतो. आम्ही पुढे चढत जात होतो तसा मागच्या ओलांडलेल्या ओढ्यांना पूर येऊन मागे फिरायची वाट बंद होत होती. वरचा कातळटप्पा कसा पार केला ह्याचं अजूनही आश्चर्य वाटत राहतं. एकूणच तो वेडेपणा होता आणि जीवावर बेतलं नाही म्हणून. शिडी घाटाने जायला हिवाळा किंवा उन्हाळा ठीक आहे. पावसाळ्यात टाळाच असा आग्रहाचा सल्ला!

मेघनाद

धन्यवाद स्वॅप्स…. आम्ही देखील असाच विचार करून शिडी घाट मार्ग टाळण्याचाच विचार केला आहे.

कंजूस

खरं आहे .जाऊ नका .कातळटप्प्यापेक्षाही आडवी जाणारी पाऊलवाट फार धोकादायक आहे .मी बऱ्याचवेळा तिकडे जाण्यासाठी वळलो की मला कुणीतरी भेटतो आणि हाकलतो .या अशा पावसात मी जीवधन घाटघर वाटेने दोर न लावता चढलो आणि उतरलोही आहे पण आठवतो तेव्हा भीती उभी राहते .कसा काय परत आलो ?

कोट्या धीश

स्वतः चा अनुभव सांगतो, pls त्या मार्गाने पावसाळ्यामध्ये जाऊ नका
आम्ही गेलो होतो, पण वाटेवर १ परत येणारा group भेटला, त्या group पैकी काही जण त्याच वाटेवरून पुढे जाताना "बाल बाल" वाचले होते , म्हणून त्यांनी परत यायचा निर्णय घेतला होता आणि आम्हाला पण परतीच्या वाटेवर येण्यास विनंती केली. तो किस्सा खूप मोठा आहे, so इथे टंकत नाहीय ...
असो, "BHA PO" असतीलच ..
final decision is urs only , आम्ही बापडे कोण ??
काळजी पायी वरील वाक्ये लिवली हायेत

शिडी घाटाची जितकी दहशत घातली आहे तितकी ती आता नाही आहे. आत्ता शिडी फारच चांगली बनवलेली आहे. अनेक group एका दिवसात भीमा शंकर करतात, जातांना शिडी घाट व येतांना गणेश घाट. आपण म्हटलेच आहे कि ५-६ वर्षे जाताय म्हणजे आपणास तेथील पावसाचा नि धबधब्यांचा अंदाज आहे नि आपण नवशिके नाहीत त्यामुळे होऊन जाऊ द्या.....

२० जुलैला एका दिवसात भीमाशंकर केलाय त्यामुळे हे बोल स्वानुभवाचे आहेत. आपणास रस्ता माहित नसेल तर गावातून वाटाड्या मिळू शकतो. शिडी घाटातून पदर गडाचे जे दर्शन होते ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. वाटेत शिडी चढतांना आपणास जुनी शिडी दिसेल ती पाहून या आधी लोक कसे शिडी घाटातून जायचे हे आठवून डोळ्यासमोर तारे मात्र जरूर चमकतील.

भीमाशंकर वृतांत लिहिणारच होतो पण तुमच्या प्रश्नामुळे आता जर लवकरच लिहायला लागेल.

धुके नि पाऊस पहायचा असेल तर भीमाशंकर is must .... परत येतांना तर पाण्यात भिजायची इछाच मरून जाते.... फक्त एक सावधानीचा सल्ला श्रावण सुरु झाल्यामुळे trekkars पेक्षा भाविकांची जास्त गर्दी होते. आता तिथे सुलभ शौचालय बांधले आहे पण तेथे पाणी नाही आहे...;)))))
त्यामुळे राहायचा बेत असेल तर दर्शन घेण्याआधी जागा बुक करा. अन्यथा "पठारावर टाका तंबू....." अशी अवस्था होईल....

मेघनाद

आपण लवकरच वृतांत प्रकाशित कराल अशी आशा आहे.

खांडस गावात हरी भाऊंचे किरण मालाचे दुकान आहे. हे दुकान पुलापासून कमीत कमी २-३ किमी. आहे. येथे आपणास नाश्ता पाण्याची , पाठ टेकण्याची सोय होऊ शकते. त्यांचा नंबर हा असा ०९२०९४२५६४५

भीमाशंकरला थाळी हवी असेल नि मोठा group असेल तर order आधीच देणे. आयत्यावेळी वाईट अवस्था होते. दक्षिण भारतीय पदार्थ वर जरी मिळत असले तरी ट्रेक केल्यानंतर थाळी कधीपण चांगली.....

मेघनाद

विअर्ड विक्स: आपण दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे, सध्या तरी आम्हाला अजून एका गावकऱ्याचा मोबाईल नंबर मिळाला आहे. परंतु तुम्ही दिलेला संपर्क देखील टिपून घेतला आहे.

त्या भागांत अतिवृष्टी झाली आहे आणि तेथून जवळच झालेल्या भूस्ख्लनामुळे केंद्र सरकारने "राष्ट्रिय आपत्ती" जाहीर केली आहे.

सद्या तेथे ट्रेक करणे टाळावे हेच उत्तम.

एस

'राष्ट्रीय आपत्ती' ही फार मोठ्या प्रमाणावर घडलेली आणि विस्तृत प्रदेशावर घडलेली घटना असते. ह्या घटनेत राष्ट्रीय आपत्ती घोषित होण्याचा प्रश्न येत नाही म्हणा. आणि तसे कुठल्याही दुव्यात वा बातमीत आढळले नाही. National Disaster Response Force ह्या बलाचे पथक तिथे पोहोचले आहे. पण माळीण गावावरील संकट हे डिझास्टर आहे, नॅशनल डिझास्टर नाही. राष्ट्रीय आपत्ती घोषित करायला केंद्राला संबंधित राज्याने बरेच गदागदा हलवावे लागते. उदा. गुजरात भूकंप ही राष्ट्रीय आपत्ती घोषित व्ह्यायला फार वेळ लागला नव्हता. पण त्याचवेळी ओरिसातील चक्रीवादळास मात्र राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यास केंद्र सरकारने बरेच कांकूं केले होते.

काहीही असले तरी भीमाशंकर परिसरात डोंगरयात्रा सध्या टाळाव्यात. समजा ट्रेक यशस्वी जरी झाला तरी भीमाशंकरवरून नंतर पुण्याकडे यायला गाड्या मिळणे अवघड जाईल. रस्ताही डिंभ्यापासून ब्लॉक झालेला किंवा आपत्ती निवारण कार्याच्या वाहनांसाठी राखून ठेवलेला असावा.

सह्यमित्र

इथे नावा प्रमाणे शिड्या लावलेल्या आहेत. खरे तर ते लोखन्डी जिनेच आहेत. आम्ही ह्या घाटातून मागील पावसाळ्यात गेलो होतो. योग्य ती काळजी घेतल्यास ह्या वाटेने जायला काही हरकत नाही.

फक्त वरती जर चिलटान्चा त्रास होतो इतकेच.

मेघनाद

सर्व मिपा सदस्यांचे मनपूर्वक आभार….आपली मते वाचून निर्णय बनवणे सोपे झाले आहे.

वरील सर्व प्रतिसाद बघून आणि ग्रुप मध्ये असलेल्या दोन नवख्या गिर्यारोहकांमुळे सध्या तरी शिडी घाट मार्गाने चढाई करायचा बेत रहित केला आहे. न जाणो "घाट" आणि "घात" उगाच एकत्र यायचे आणि आमचे मनसुबे पावसात वाहून जायचे.
सध्या झालेल्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर देखील भीमाशंकर ला जाण्याचा बेत पक्का आहे. गणेश घाट मार्गे श्री गणेशाच्या आशीर्वादाने मार्गक्रमण सुकर होईल हि खात्री आहे.

शैलेन्द्र

या तथाकथीत भविकांनी भिमाशंकर ट्रेकची पार वाट लावलिये.. आपणांस शुभेच्छा..

सोमवार आणि विशेषतः सुट्टी असणारा सोमवार टाळून जरातरी आनंद मिळेल.

रॉक पॅच नवख्या लोकांसाठी कठीण ठरू शकतो; पण रॉकपॅचवर त्यांचं सामान वाहून नेणारे आणि उत्साह वाढवणारे अनुभवी लोक सोबत असतील तर हरकत नाही. पण हा माझा अनुभव सगळ्यांना असाच येईल याची काही खात्री नाही.

किसन शिंदे

मुंबई हायकर्सचा ग्रुप त्या शिडीच्या वाटेने ट्रेक ऑर्गनाईज करतोय. अशा आपत्तीच्या वेळी त्यांनी हा ट्रेक ऑर्गनाईज करणं कितपत योग्य आहे?

किसन भाऊ..... भूस्खलन हे आहुपे घाटावर झाले आहे. जी वाट पुण्यातून बस मार्गे येणार्यांसाठी आहे... हे मानवनिर्मित आहे , निसर्गनिर्मित नाही... तरीपण काळजी घेणे केव्हाही चांगले. कर्जत side हून तर पूर्ण कातळ आहे. तसेच भीमा शंकरचा ट्रेक हा हात पाय पूर्ण झाकून करावा.... मी स्वतः हा ट्रेक एकही पावसाळी चिलखते न घालता केलेला आहे. मजा येते भिजायला.... हात उघडे चालतील पण पाय झाका अन्यथा कीटक वर्गीय तुमचा कीचकवध करतील.... :)

कंजूस

डासांनी फोडले याचा अनुभव घ्यायचा असल्यास महापे (नवीन मुंबई )पूर्वीच्या नोसिल कँपनीच्या मागे गवळीदेव डोंगर आणि धबधबा उत्तम जागा आहे .शंभरेक मिटरस उंचावर आहे .चट्टेरी पट्टेरी डास कपड्यांवरूनही चावतात .
वाशी ठाणे ११नं बस जाते .महापे ते रबाले मागचा रस्ता .

जागा ऐकून आहे... पहिली नोकरी महाप्यातच होती. CROWD खराब असतो तिथे म्हणून कधी गेलो नाही. ११ नं च्या बसच्या फार कष्टप्रद आठवणी आहेत. ठाणे -वाशी लोकल चालू होयाच्या आधी ११ नं ने प्रवास करणे हे विरार गाडीत बोरिवलीला उतरण्यापेक्षा सुद्धा कठीण होते. लोकल सुरु झाल्यावर तर सुरुवातीच्या दिवसात टपावरून सुद्धा प्रवास केला आहे....;०

जय२७८१

१५ ऑगस्टला आमचा १७ लोकांचा ग्रुप भिमाशंकरला जाणार आहे. तिथे कुठी राहण्याची सोय होईल का ? कुणाचा contact no. मिळेल का ?

कंजूस

जय२७८१ ,श्रावण महिना आणि सुटी लक्षात घेता खात्री देता येत नाही परंतू राममंदिरामागे डबेवाले धर्मशाळा आहे .संपर्क मनोहर शेंगाळे 7588217285आणि
9421078185 यांना विचारा .
सकाळी लवकर अकराच्या अगोदर जाणाऱ्यांस जागा मिळते .
एमटीडीसीची जागा एका ठेकेदाराला दिली आहे तिथेही विचारा .त्यांचा नंबर अगोदरच्या एका धाग्यात आलेला आहे .