Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(तुम्ही कोण म्हणून काय पुसता ? हिम्मत असेल तर वळा मागे?)

स
स्पा
गुरुवार, 07/31/2014 - 10:49
🗣 107 प्रतिसाद
"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत. नारायण धारप, रत्नाकर मतकरी, संत रामसे ह्यांनी अनेक ग्रंथातून ,चित्रपटातून भूतांचे अस्तित्व रेखाटले आहे, पण अर्थात हे सगळे काल्पनिकच असे नास्तिक म्हणतात. पण एकाकी टेकडावर, कुठल्या पडीक किल्ल्यावर, कोकणातल्या जुनाट घरात किंवा कोणाच्या घरात अनेक मित्र जमलेले असताना अशा गप्पा रंगल्या कि अट्टल नास्तिक पण वाद ण घालता त्या एन्जोय करतो मीही एखा दोन कथा लिहिल्या पण काल्पनिकच अनुभव शून्य !! त्यामुळे नास्तिक ह्याच क्याटेगरीत मोडणारा, पण काही दिवसांपूर्वी एक अनुभव असा आला कि मला ह्यावर विचार करणे भाग पडले तर झाले असे प्रोजेक्ट चा वर्कलोड असल्याने जवळपास महिनाभर रात्री मी करी रोड वरून शेवटची ट्रेन पकडतो. करी रोड स्टेशन वरून बाहेर यायचे असेल तर पूल चढून फ्लाय ओवर वरून चालावे लागते. सध्या मोनो रेल चे काम चालू असल्याने तो फ्लाय ओवर वाहनांसाठी बंद केलेला आहे रात्री तर तिथे कोणीच नसतं, तर असाच wats app वर चॅट करत मी फ्लाय ओवर वरून स्टेशन कडे जायला निघालो, आजूबाजूला लक्ष नव्हतच. अचानक समोर एक नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती आणि तिने मला विचारलं ल्येकरा ...टाईम काय झाला ? मी बावचळून घड्याळात पाहिलं आणि सांगितलं तशी मान हलवत ती बाजूने निघून गेली, दोन पावले पुढे गेल्यावर मी सहजच मागे पहिले तर अक्खा फ्लाय ओवर रिकामा होता, कोणीच नव्हतं. एक दोन सेकंदात हि घटना घडली. इतकी फास्ट कि मला नक्की अशा कोणा बाईने वेळ विचारलेली का कि भास झाला वाटावी इतपत. खाली आलो बाकड्यावर बसलो .. एकदम डोकं हललेल .. दिवसभराची झोप उडलेली :) तर नंतरही मी तीच ट्रेन अनेकवेळा पकडली , पण ती बाई काही मला दिसली नाही. ह्या अनुभवला कुठल्या क्याटेगरीत टाकायचे ते समजलेले नाही तुम्हालाही असे आस्तिक नास्तिक च्या लेवल पेक्षा वेगळे अमानवीय अनुभव आले असतीलच वाचायला आवडेल

प्रतिक्रिया द्या
33689 वाचन

💬 प्रतिसाद (107)
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 10:52 नवीन
वर्णपट भूताने गायब केले काय?
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 10:55 नवीन
तुमच्या या अनुभवावरुन माझी खात्री पटली आहे की जगात भूते आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 10:57 नवीन
स्पावड्या म्हणतोय तर भुते असणारच. स्पावड्या इथे तर जमतील भुते.
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 11:03 नवीन
स्पावड्या इथे तर जमतील भुते.
त्या म्हातारीचं जाऊदया. स्पावडयालाच कुणी एकटयाने रात्रीच्या निरव शांततेत पाहीला तर तो भूत भूत म्हणत ओरडत सुटेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्पा गुरुवार, 07/31/2014 - 11:04 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 11:07 नवीन
निरवच कशाला, सरव शांतता असली तरीही हेच म्हणू हाकानाका ;) पायजे तर फॉर अ चेञ्ज वर्तमानही म्हणू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/31/2014 - 11:03 नवीन
?
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 11:06 नवीन
मुविकाका, इतक्या प्रामाणिक अनुभव कथनांवर आपल्यासारख्या जेष्ठ सदस्याने प्रश्नचिन्ह उभे करावे ही खचितच चांगली गोष्ट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 11:08 नवीन
नैतर काय! एक मिपाकर म्हणून शरम इ.इ. वाटल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
स
स्पा गुरुवार, 07/31/2014 - 11:11 नवीन
अगदी अगदी , नास्तिक कुठचे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/31/2014 - 11:15 नवीन
नास्तिक कुठचे? अर्थात मध्यवर्ती ठिकाणाकडचे. :D (च्यायला स्मायल्या लौकर सुरू करा राव.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 11:25 नवीन
मी लहानपणी जे काही भूतांबद्दल ऐकले आहे त्यावरुन भूते नास्तिकांना सुद्धा झपाटत असावेत असे मला वाटते. शहरातून आमच्या गावाला जाणारा रस्ता एका वापरात नसलेल्या एका विहीरीच्या बाजूने जातो. या रस्त्यावर विहिरीला चिकटून एक ओढा जातो. पावसाळ्यात जरा पाऊस जास्त झाला की आमच्या काळ नदीला पूर येतो आणि मग हा रस्ता बंद होतो. एकदा पूरात एक प्रेत वाहत आले आणि ते विहिरीला अडकून तिथेच राहीले. गावकरी म्हणतात की त्या विहीरीत आधी जीव दिलेल्या दोन बायांनीच त्या व्यक्तीचा जीव घेतला. खरं खोटं माहिती नाही. मात्र अंधार पडल्यानंतर मी अगदी मोटारसायकलवर असलो तरीही राम राम राम राम म्हणत मोटारसायकल जोरात पळवतो. मोटारसायकल आता इथे बंद पडली तर काय करायचे या भीतीने ती दोन तीन मिनिटे जीव घाबरा होतो. एरव्ही सगळीकडे "देव नाही" असं बेंबीच्या देठापासून बोंबलत फीरणारा मी त्या विहीरीच्या बाजूने जाताना मात्र राम नामाचा जप करतो. राम असेल नसेल, "रामाचे नांव घेतले की भूते दूर पळतात" ही लहानपणाची शिकवण खुप आधार देते तेव्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा गुरुवार, 07/31/2014 - 11:30 नवीन
अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्रचेतस गुरुवार, 07/31/2014 - 11:34 नवीन
'मंदा पाटणकरचे हात' आठौली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
भ
भिंगरी Fri, 08/01/2014 - 20:53 नवीन
खरोखरचं मंदा पाटणकर प्रकरणाने घाबरवलेच होते. आता त्याहून भयंकर प्रकार होतात पण मन कोडगे झाल्याने त्याचे काहीच वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सतीश कुडतरकर Tue, 06/09/2015 - 14:18 नवीन
अजूनही दिवा आणि ठाणे यामधला पारसिक चा बोगदा हा झपाटलेला म्हणून ओळखला जातो बोगद्यात गाडी शिरली कि दरवाजात उभी असलेली लोक "जय भवानी जय अंबे " असं भोगदा संपेपर्यंत बेंबीच्या देठापासून कोकलत असतात>>>>>>> त्यासाठी नाही. वर मुब्रादेवीच देऊळ आहे म्हणून ओरडत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/31/2014 - 11:35 नवीन
प्रश्नचिन्ह उभं करायचा अधिकार काय तुम्हाला?? कधी अनुभव घेतलाय का अमावस्येच्या रात्री करी रोडच्या रस्त्यावर?? उगाच घेतला कळंफलक लागले बडवायला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सूड गुरुवार, 07/31/2014 - 11:12 नवीन
अरे देवा !!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 11:15 नवीन
अरे भुता!
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 07/31/2014 - 11:17 नवीन
कंपूबाजांनी कंपूबाजांकरीता काढलेला धागा. ;) (पळा...नाहीतर भुतं मागे लागतील)
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 11:24 नवीन
नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती काय पण स्साला नशीब आहे.. अंधेरी रातोमें, सुनसान सडकोपर आणी म्हातारी बाई? चिकनी हडळ असती तर मजा केली असती की. :))
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 07/31/2014 - 11:27 नवीन
>>चिकनी हडळ असती तर मजा केली असती की. :)) चिकनी हडळ? लॉल्स !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
क
केदार-मिसळपाव गुरुवार, 07/31/2014 - 11:34 नवीन
नेहमी भुतिण म्हणुन एखादी नउवार नेसलेलीच बाई का दिसते? आय मीन एखादी मिनी स्कर्ट घातलेली, शॉर्ट घातलेली अथवा बिकिनीवाली नवयौवना का दिसत नाही? तेच भुतबाबा बाबद. नेहमीच पांढरी आकृती, अरे बर्मुडा वाला किंवा स्युट वाला भुत का दिसत नाही कोणाला? पाहायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी गुरुवार, 07/31/2014 - 12:28 नवीन
पुणे-मुंबैपण 'सेफ' राहिलं नाही आजकाल. असले स्कर्ट वगैरे घालून हडळी फिरायला लागल्या तर, इथल्या 'पाशवी शक्ती' जीव नकोसा करुन सोडतील की त्यांचा. त्या घाबरतात ह्या भुत्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 11:30 नवीन
यावरुन आमच्या आवडत्या गायक बंधूंचे एक गाणे आठवले:
सांगवी गावात, बामन ढवात, बयाला धरलंय भूतानी बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी नदीकाठाची गरम वाळू, भूत खुशाल लागलं खेळू किंचाळी फोडली, तिथंच पडली, खबर दिलिया शीतानी बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी
पांडया वाचलास रे बाबा. त्या म्हातारीने तुला करीरोडच्या पुलावर उताणी पाडलं असतं तर रे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 11:33 नवीन
म्हातारी भुताने वेळेवरतीच निभावले म्हणतो मी .तरण्या भुताने शेवटची ट्रेन विचारली असती तर काय झाले असते अशी 'कल्पना' सुध्दा करवत नाही .आणि स्टेशनच्या पाट्यांवर छोकरी रोड कसे काय येते ?रात्री असे प्रसंग कुण्या एकट्या तरुणावर येवू नयेत अशी 'आशा' करूया सर्व आस्तिक आणि नास्तिकजनहो .स्पावर तरी नकोच नको .बिचाऱ्याचे चित्त विचलित व्हायचे (टैबमधून हो)एखाद्या रात्री . तसं आम्ही आख्खं रेल्वेटाईमटेबल सांगायच्या तयारीत आहोत कुणी तरूण भूतीणीने रात्री माटुंग्याच्या झेड ब्रिजवर गाठून विचारलं तर .आणि नंतर मागेवळूनही सांगू उद्या वेस्टन झोनचं शिकवेन .
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/31/2014 - 11:36 नवीन
रायगडावर रात्री १२ च्या पुढे फिरताना आमचे एक मित्र ' ए मला मध्ये येऊ द्या रे, बाजूने जाताना भीती वाटते' असे भेदरलेल्या चेहर्‍याने आम्हास म्हणत होते.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 12:29 नवीन
अशा वेळेसच नविन मित्र भेटतात. कम्पू वाढतो. :) पण, १२च्या आधीदेखिल असे मित्र जवळपास येउ शकतात. फक्त आपल्या या अश्या १२वाजलेल्या अन्धश्रद्धांमुळे आपण त्यांना ओळखत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 12:38 नवीन
लोक काय काय लक्षात ठेवतात ब्वा! =)) (खरी वाटली ना अ‍ॅक्टींग? ;) ) बाकी हल्ली त्या राणीवशातून येऊ शकणार्‍या भुतांपेक्षा 'ह्या' माणसांचीच भीती जास्त वाटायला लागलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अधिराज गुरुवार, 07/31/2014 - 12:02 नवीन
येकदा बघा असं झालं, रातीचं दिड वाजलं व्हतं. धोंडूबाबांचं किरतान व्हतं लांब मित्राच्या वस्तीवर ते आयकून आमच्या वस्तीवर परत येत हुतो सायकल दामटत दामटत, अशी मस्त हवा सुटल्याली व्हती, लय रोमन्टेक वाटत व्हतं. म्या बी तोंडानं एक झ्याक गाणं गुणगुणत चाललो व्हतो. थोडा रस्ता कापल्यावर पुढं आलो, तर काय बघतो. एक तरणी पोरगी सायकलच्या दिशेनं बघून हात करत होती, थांबण्यासाठी. आजपत्तूर कुठल्या पोरीनं माझ्याकडं ढुकुन्बी बघितलं नव्हतं आन हि चक्क मला लिफ्ट मागत व्हती! म्या लय म्हणजे लय खुश झालो. तिच्यापर्यंत लवकर पोचण्यासाठी सायकलचा वेग वाढवला. पन बाबौ, जसजसा तिच्याजवळ जायला लागलो तसतशी हवा लईच गार वाटाया लागली आन तिचं रूप बी येगळचं दिसाया लागलं. तिचं तोंड पांढरं फटक दिसत व्हतं, आन हे लांब सुळ्यागत दात भायेर आलेलं. डोळ्यातून हिरवा लाईट येत होता. तेवढ्यात तिच्या पायाकडं लक्ष गेलं तर त्ये बी उलटे ना वो! म्या मनात म्हटलं ह्ये काय साधं परकरण नाय गडया, चला सटका इथनं पटकन. माझी तंतरली व्हती, पन कसचं काय ,सायकल आता लय जड झाली व्हती, पायडल मारायला लई तरास होत व्हता. तिच्यासाठी मी सायकल थांबवत नाय बघून ती लय चिडली आन मला पकडायला सायकलबरुबर पळू लागली. ती लैच भेसूर हासत व्हती. मग मला काय बुद्धी झाली आन मी मनातल्या मनात धोंडूबाबाचा धावा चालू केला, मग ती तशीच हवेत गायब झाली हाळूहाळू. तसाच घरला आलो,त्दोन दिवस तापानं फनफनलो व्हतो. आई म्हनत व्हती बाळा आता तरी शाना हो, पोरी बाळीच्या मागं नगं जात जाऊ.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/31/2014 - 12:33 नवीन
भुताच्या गोष्टी सांगायचा तास सुरू झाला काय ?हैत दोन चार . माझी बी येक हाय . बेवडे आणि वेडे यांना भुतं तरास देत न्हाईत .
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 07/31/2014 - 12:35 नवीन
साहेब तुमच्याकडे तर पोतडीत भरभरून किस्से असतील, येउंद्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 12:33 नवीन
भूताला असा मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा जड अस्वल बनवता येईल का की जो भूताला स्वतःलाही घाबरवेल?
  • Log in or register to post comments
अ
अधिराज गुरुवार, 07/31/2014 - 12:40 नवीन
भूत कशालाबी घाबरत नाय, त्ये फक्त देवगनाच्या मानसाला घाबरतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 13:06 नवीन
म्हणजे अजय देवगणच्या कुटुंबाच्या वाटेला भूते जात नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज
प
प्यारे१ गुरुवार, 07/31/2014 - 13:26 नवीन
राजूचाचा बघायला हवा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
श
शिद Fri, 08/01/2014 - 11:34 नवीन
देवगणांच्या अजयला येथे भुत प्रत्यक्ष दिसलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
य
यशोधरा गुरुवार, 07/31/2014 - 13:38 नवीन
ओ, देवगणाच्या माणसाला दिसत नाय. राक्षस गणाच्या माणसाला दिसलं तरी भ्या दाखवत नाय आणि माणूस गणाच्या माणसाला भ्या दाखवतं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज
अ
अधिराज Fri, 08/01/2014 - 11:29 नवीन
तसं नै ओ तै, देवगनाच्या मानसाला घाबरतं, म्हनून एखाद्या मनुश गनाच्या मानसाच्या बरुबर देवगनाचा मानूस असल तर त्यालाबी काही धोका नस्तो, भूतापासून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सूड Fri, 08/01/2014 - 11:31 नवीन
पण मनुष्यगणाच्या माणसाला भूत दिसतं म्हणतात, त्याचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज
अ
अधिराज Fri, 08/01/2014 - 12:44 नवीन
आवो मनुश गनाला दिसतंच कि, दिसतय आन तरास बी देतय. पन जर त्याच्या बरुबर देवगनवाल्याची शिकुरिटी आसल तर त्याला भूत दिसू शकल, ,पन तरास नाय देवू शकनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 12:35 नवीन
कोण म्हणतं आंम्ही नाही म्हणून.......?????????????? ;) थांबा दावितोच चिमित्कार आता!Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 07/31/2014 - 12:36 नवीन
धौती आत्मा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 12:46 नवीन
गवती पांडू! LLLLLLLLLLLLLLuuuuuuuuu Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सूड गुरुवार, 07/31/2014 - 12:55 नवीन
संत्रस्त आत्मा !! ळॉळ्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 13:05 नवीन
सुडुक खात्मा... ! Image removed. बोल्स्....... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कवितानागेश गुरुवार, 07/31/2014 - 12:43 नवीन
स्पाकाकांना पण TRP ची भुल पडली तर. येउ द्या!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/31/2014 - 13:12 नवीन
त्यांना ट्यार्पी नाय तर वाहव्वा लागते (चार लोकांची).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/31/2014 - 13:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सूड गुरुवार, 07/31/2014 - 13:16 नवीन
वाचतांय हां मी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा