(तुम्ही कोण म्हणून काय पुसता ? हिम्मत असेल तर वळा मागे?)
"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही.
हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे...
जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत.
नारायण धारप, रत्नाकर मतकरी, संत रामसे ह्यांनी अनेक ग्रंथातून ,चित्रपटातून भूतांचे अस्तित्व रेखाटले आहे, पण अर्थात हे सगळे काल्पनिकच असे नास्तिक म्हणतात.
पण एकाकी टेकडावर, कुठल्या पडीक किल्ल्यावर, कोकणातल्या जुनाट घरात किंवा कोणाच्या घरात अनेक मित्र जमलेले असताना अशा गप्पा रंगल्या कि अट्टल नास्तिक पण वाद ण घालता त्या एन्जोय करतो
मीही एखा दोन कथा लिहिल्या पण काल्पनिकच अनुभव शून्य !!
त्यामुळे नास्तिक ह्याच क्याटेगरीत मोडणारा, पण काही दिवसांपूर्वी एक अनुभव असा आला कि मला ह्यावर विचार करणे भाग पडले
तर झाले असे
प्रोजेक्ट चा वर्कलोड असल्याने जवळपास महिनाभर रात्री मी करी रोड वरून शेवटची ट्रेन पकडतो.
करी रोड स्टेशन वरून बाहेर यायचे असेल तर पूल चढून फ्लाय ओवर वरून चालावे लागते. सध्या मोनो रेल चे काम चालू असल्याने तो फ्लाय ओवर वाहनांसाठी बंद केलेला आहे
रात्री तर तिथे कोणीच नसतं, तर असाच wats app वर चॅट करत मी फ्लाय ओवर वरून स्टेशन कडे जायला निघालो, आजूबाजूला लक्ष नव्हतच. अचानक समोर एक नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती आणि तिने मला विचारलं ल्येकरा ...टाईम काय झाला ?
मी बावचळून घड्याळात पाहिलं आणि सांगितलं तशी मान हलवत ती बाजूने निघून गेली, दोन पावले पुढे गेल्यावर मी सहजच मागे पहिले तर अक्खा फ्लाय ओवर रिकामा होता, कोणीच नव्हतं. एक दोन सेकंदात हि घटना घडली. इतकी फास्ट कि मला नक्की अशा कोणा बाईने वेळ विचारलेली का कि भास झाला वाटावी इतपत. खाली आलो बाकड्यावर बसलो .. एकदम डोकं हललेल .. दिवसभराची झोप उडलेली :)
तर नंतरही मी तीच ट्रेन अनेकवेळा पकडली , पण ती बाई काही मला दिसली नाही. ह्या अनुभवला कुठल्या क्याटेगरीत टाकायचे ते समजलेले नाही
तुम्हालाही असे आस्तिक नास्तिक च्या लेवल पेक्षा वेगळे अमानवीय अनुभव आले असतीलच
वाचायला आवडेल
💬 प्रतिसाद
(107)
प
प्रसाद गोडबोले
Mon, 08/04/2014 - 11:40
नवीन
ह्यावरुन , भारतभ्रमणाच्या वेळेस , रामदास स्वामी नक्कीच साऊथ इंडीयात फिरुन आले नसणार असे एक अनुमान काढत आहे *biggrin*
- Log in or register to post comments
अ
अधिराज
Fri, 08/01/2014 - 12:46
नवीन
*lol* :))
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 08/01/2014 - 13:23
नवीन
लग्नाच्या वेळी चकवा असतो .एक चांगलं भूत मागून हाका मारतं "सावधान ,सावधान !"पण गडी आपला फुडंच धावतो .ही आयुष्यात एकच बरोबर वेळ येते मागे वळून मागेच धावण्याची .मग बसतो टैब बडवत नाही चुकलो कप्पाळ बडवत .
बाकी स्पा भूत दिसल्यानंतर येते सिध्दी .तिथे फुरंगटून बसला नाहीस तर दिसतो देव .
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 08/03/2014 - 06:04
नवीन
माझा सगळ्यात आवडता भूताचा पिच्चर. :)

- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 08/04/2014 - 12:00
नवीन
हा एक किस्सा
मित्र कसार्याला राहणारा , एके रात्री अचानक त्याचे जवळचे नातेवाईक अपघातात दगावल्याने त्याला नाशिक ला जावे लागले.
कसारा घाटातून जाताना ,त्याला काहीतरी साईड मिरर मध्ये हलताना दिसले, त्याने निट पहिले तर एक मळकट कपडे घातलेली व्यक्ती डोकं वेंगावत जवळ जवळ गाडीच्या स्पीड ला (साधारण ६० च्या) धावत येत होती, थोडा वेळाने तो म्हातारा अगदी त्याच्या बाजूला आला , ह्याने गाडी तशी दामटवली ... बराच वेळ तो म्हातारा त्याला दिसत होता , आणि नंतर गायब झाला :)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 08/06/2014 - 18:36
नवीन
बाप्रे !!!!
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 08/06/2014 - 23:35
नवीन
आमचे एक गुरुजी कसारा -इगतपुरी भागातले .त्यांच्याकडे भुतांच्या छान छान ! गोष्टींची पोतडी होती स्पा.त्या सांगण्यावरून एक मजेदार किस्सा झालेला पाचवीत असतांना .सांगेन कधीतरी .कसारा घाटात बरेच अपघात होऊन त्यातली काहींची भुते वाट पाहत असतात आपली वळणावळणावर .त्यांना काहीतरी सांगायचं असतं पण ऐकून कोण घेतोय ?
मी जेव्हा गडावरच्या गुहेतून सकाळी खाली गावात येतो तेव्हा गाववाले मला वरपासून खाली पाहतात पाय उलटे वगैरे नाहीत ना ?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3