(तुम्ही कोण म्हणून काय पुसता ? हिम्मत असेल तर वळा मागे?)
"भुते आहेत की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही.
हे जग " भूत आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "भूत नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे...
जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत.
नारायण धारप, रत्नाकर मतकरी, संत रामसे ह्यांनी अनेक ग्रंथातून ,चित्रपटातून भूतांचे अस्तित्व रेखाटले आहे, पण अर्थात हे सगळे काल्पनिकच असे नास्तिक म्हणतात.
पण एकाकी टेकडावर, कुठल्या पडीक किल्ल्यावर, कोकणातल्या जुनाट घरात किंवा कोणाच्या घरात अनेक मित्र जमलेले असताना अशा गप्पा रंगल्या कि अट्टल नास्तिक पण वाद ण घालता त्या एन्जोय करतो
मीही एखा दोन कथा लिहिल्या पण काल्पनिकच अनुभव शून्य !!
त्यामुळे नास्तिक ह्याच क्याटेगरीत मोडणारा, पण काही दिवसांपूर्वी एक अनुभव असा आला कि मला ह्यावर विचार करणे भाग पडले
तर झाले असे
प्रोजेक्ट चा वर्कलोड असल्याने जवळपास महिनाभर रात्री मी करी रोड वरून शेवटची ट्रेन पकडतो.
करी रोड स्टेशन वरून बाहेर यायचे असेल तर पूल चढून फ्लाय ओवर वरून चालावे लागते. सध्या मोनो रेल चे काम चालू असल्याने तो फ्लाय ओवर वाहनांसाठी बंद केलेला आहे
रात्री तर तिथे कोणीच नसतं, तर असाच wats app वर चॅट करत मी फ्लाय ओवर वरून स्टेशन कडे जायला निघालो, आजूबाजूला लक्ष नव्हतच. अचानक समोर एक नववारी नेसलेली म्हातारी बाई आली लंगडत होती आणि तिने मला विचारलं ल्येकरा ...टाईम काय झाला ?
मी बावचळून घड्याळात पाहिलं आणि सांगितलं तशी मान हलवत ती बाजूने निघून गेली, दोन पावले पुढे गेल्यावर मी सहजच मागे पहिले तर अक्खा फ्लाय ओवर रिकामा होता, कोणीच नव्हतं. एक दोन सेकंदात हि घटना घडली. इतकी फास्ट कि मला नक्की अशा कोणा बाईने वेळ विचारलेली का कि भास झाला वाटावी इतपत. खाली आलो बाकड्यावर बसलो .. एकदम डोकं हललेल .. दिवसभराची झोप उडलेली :)
तर नंतरही मी तीच ट्रेन अनेकवेळा पकडली , पण ती बाई काही मला दिसली नाही. ह्या अनुभवला कुठल्या क्याटेगरीत टाकायचे ते समजलेले नाही
तुम्हालाही असे आस्तिक नास्तिक च्या लेवल पेक्षा वेगळे अमानवीय अनुभव आले असतीलच
वाचायला आवडेल
💬 प्रतिसाद
(107)
स
स्पा
गुरुवार, 07/31/2014 - 13:20
नवीन
खिक्क
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 07/31/2014 - 13:25
नवीन
हा लेख पण टॅबवर टाईप केलास का? असो. ज्यांना भुते घाबरतात अशा लोकांची क्याटेगरी कोणती?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 07/31/2014 - 13:36
नवीन
दंगा करायला नवा धागा? मी पण, मी पण!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/31/2014 - 13:44
नवीन
*clapping* आल्या रे आल्या स्मायल्या आल्या! *dirol*
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/31/2014 - 13:45
नवीन
केला की नै चिमित्कार! ;) स्मायल्या मेल्यावत्या..मी त्यांना आत्म-लोकातून उद्धरिले! =))
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 07/31/2014 - 13:47
नवीन
भूते उद्धरु शकतात का? *unknw*
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 07/31/2014 - 13:51
नवीन
ते 'होली घोस्ट' असतील. ;)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 07/31/2014 - 13:53
नवीन
नायतर आत्ता कलियुगात उद्धार करायचं काम आउटसोर्स झालं असावं!
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 07/31/2014 - 13:48
नवीन
काय तरी मेलं, आयजीच्या जीवावर बायजी उदार नि सासूच्या जीवावर जावई सुभेदार !! *boredom*
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/31/2014 - 13:55
नवीन
कळ्ळं!!! :-/
lllllllllllllllllluuuuuuullllllllllllllllllluuuuuuulllllllllllllllluuuuuuullllllllllllllllllluuuuuuu

- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 07/31/2014 - 15:19
नवीन
इथे स्मायलीवाल्यांना रजा .दोन हाडके आडवी वरती ४४०वोल्ट खोपडीवाले पुढे या .
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 07/31/2014 - 15:56
नवीन
☠
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/31/2014 - 17:56
नवीन
हे सूक्ष्मरूपातले भूत आहे काय ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 08/01/2014 - 09:02
नवीन
हम्म...शक्यता नाकारता येत नाही ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/31/2014 - 19:26
नवीन
@दोन हाडके आडवी वरती ४४०वोल्ट खोपडीवाले पुढे या.>>>
हे घ्या! 
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/31/2014 - 16:09
नवीन
ह्म्म. आजकाल मला दांभिकतेच्या भुताने झपाटले :ड
अवांतर : ह्यावरुन आठवले
जेव्हा रानदास स्वामी तब्बल ३६-४० वर्षांच्या साधने नंतर त्यांच्या वृध्द आईला भेटायला आहे , तेव्हा त्यांचे बलदंद शरीरयष्टी तेजस्वी रुपडे पाहुन त्यांची आई अत्यंत आनंदित झाली व त्यांनी विचारले "नारायणा , तुला काही भूत वगैरे वश झाले की काय ?" त्यावर रामदासस्वामींनी उत्तर दिले "हो , मला एक मोठ्ठेच भूतच वश झाले आहे " आणि खालील अभंग रचला
अहाहा *i-m_so_happy*
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 07/31/2014 - 16:18
नवीन
हे भूत मात्र खरेच गोड आहे! :)
- Log in or register to post comments
य
यसवायजी
गुरुवार, 07/31/2014 - 16:40
नवीन
अहाहा *ok*
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 07/31/2014 - 19:00
नवीन
गोप्रो
- Log in or register to post comments
स
सुधीर
Fri, 08/01/2014 - 06:37
नवीन
हे भूत आवडलं!
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 07/31/2014 - 16:47
नवीन
आता मात्र भुते इथून पळ काढणार दुसऱ्या धाग्यावर .मला वाटलं ४४० वेळा घुंगरुं वाजवणार खविस (भुताचा एक प्रकार .अंगावर मोठे केस असतात ,हातातली घुंगरूवाली काठी आपटत जातो ,जाण्यायेण्याच्या वाटेत झोपल्यास उठवतो .बाकी त्रास देत नाही ).
- Log in or register to post comments
ध
धन्या
गुरुवार, 07/31/2014 - 16:54
नवीन
भूताचे एकुण प्रकार किती व कोनते? भूताच्या प्रत्येक प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती दया.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/31/2014 - 17:28
नवीन
@भूताच्या प्रत्येक प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती दया.>>> टनाटन परभात च्या साइटवर जा.. ना! =))
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 07/31/2014 - 17:43
नवीन
किती मार्कांचा प्रश्न आहे सांगा, त्यानुसार प्रतिसाद लिहिता येईल. *biggrin*
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/31/2014 - 18:28
नवीन
काहीका असेना पण एकदा जस्ट फॉर द सेक ऑफ डॉक्युमेन्टेशन , ही लिस्ट काढलीच पाहिजे !
आपल्या पुर्वजांची कल्पना शक्ती किती भन्नाट होती ते पाहु !!
बाकी माझी आवडती २ भुते - वेताळ आणि चेटुक ह्यापैकी वेताळ म्हणजे झाँबी सेम टु सेम लूक्स , आणि चेटुक म्हणजे हॅरीपॉटर मधील डॉबी सेम !
बाकी मी लोकांना सांगुन थकलो की हे दोघे मला वश आहेत पण लोक विष्वासच ठेवायला यतार नाहीत , आता अशा सगळ्या अविश्वासु माणसांवरच एकेक करुन सोदावे म्हणतो ह्यांना ! *biggrin*
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 07/31/2014 - 17:52
नवीन
१)कोणाची काही इच्छा बाकी राहिल्यावर ती पुरी करण्यासाठी प्रासंगिक करार भुते होतात .मृत्यूच्या जागी कधीकधी इतरांना दिसतात असे म्हणतात .पण त्यांच्या असण्यामुळे युअरोपात काही वाडे (कासल) आणि राजस्थानातले एक गाव ओस पडले आहे .दिसण्यापलीकडे त्रास नसतो .
इतर प्रकार :
२)मुंजा .
३)ब्रह्मराक्षस .
४)खवीस .
५)हडळ
६)डाकिण .
७)जखिण .
८)पिराचे भूत
९)वेताळ .
हे सर्व ऐकिव प्रकार आहेत आणि असणे आणि मानणे यात नेहमीच शंका निघतात .परंतू वास्तुशास्त्राच्या झटक्याने घरे विकली जात नाहीत तसेच या भुतांच्या झटक्याचे आहे .जनप्रवादापुढे हार मानावी लागते हे मात्र खरे आहे .
धनु लग्न ,धनु राशींच्या लोकांस कधीकधी भूत दिसू शकते पण यांना त्रास देत नाही असे म्हणतात . संतमंडळी .
पिराच्या जागा रानात कुठे असल्यास आजुबाजूस करंगळी वर करायला जाऊ नये .
भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे .असो .
उगाचच बाऊ नको .हलकेच घ्या .:-)
- Log in or register to post comments
ध
धन्या
गुरुवार, 07/31/2014 - 18:46
नवीन
पिराची जागा असलेले रान कसे ओळखावे?
मी लहानपणी ज्या रानात गुरे वळायचो, त्या रानात बहूतेक पिराची जागा नसावी. नाही तर वर केलेली करंगळीच काय उरलेली बोटेही देव आणि धर्म यावर वाद घालायला उरली नसती.
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
गुरुवार, 07/31/2014 - 18:49
नवीन
पिरा चे भूत....हाहाहा
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 07/31/2014 - 18:53
नवीन
आयला, भूत'पण'??????????
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 08/01/2014 - 00:29
नवीन
संमंध नावाचे पण भूत असते असे ऐकले आहे ? (कोकणात)
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 08/01/2014 - 10:25
नवीन
भूतांचे आणखी काही प्रकार (विशेषतः सिंधुदुर्गातले)
- देवचार
- चकवा
- राष्ट्रोळी
- आग्यावेताळ (वेताळाचा उपप्रकार)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 08/01/2014 - 14:32
नवीन
@आग्यावेताळ >>> *lol*
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 08/01/2014 - 15:22
नवीन
दु दु राहिलं काय ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 08/01/2014 - 15:28
नवीन
आज नागपंचमी आहे, दुदु नागोबा पिऊन गेला असेल आणि अगोबासाठी शिल्लक राह्यलं नसेल. *lol*
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 08/01/2014 - 19:02
नवीन
वेताळ आणि अग्यावेताळ असे दोन आयडी आहेत. येऊन तुमच्या मानगुटीवर बसतील हां!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 08/01/2014 - 20:31
नवीन
@दुदु नागोबा पिऊन गेला असेल आणि अगोबासाठी शिल्लक राह्यलं नसेल.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> =)) यमकात मारले..की मारण्यात यमक आले!? *blum3*
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 08/01/2014 - 11:08
नवीन
>>भूत दिसणे ही देव दिसण्याची अगोदरची पायरी आहे असाही आध्यात्मिक समज आहे .
म्हणजे स्पावड्याला आता देव दिसणार? *shok*
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 08/01/2014 - 11:12
नवीन
आजी म्या धन्य झाहलो
मला आता देव दिसणार
किंवा ती बाईच देवी नसेल कशावरून
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 08/01/2014 - 14:51
नवीन
बाई देवी आणि हडळबाई ह्यांच्या वर आपल्याला विशेष क्रश आहे हे जाता जाता नोंदवतो *man_in_love*
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 08/02/2014 - 01:15
नवीन
घ्या, स्पाची कथा मूळ पदावर! *biggrin*
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 07/31/2014 - 18:37
नवीन
भूतावळीच्या मागोव्यावर
सोनेरी हाडं आणि म्हातारा
झोंबी कुणा म्हणावे
जारण-मारण-८
फेर्यात अडकलेला....
भूतबाधा- एक गंडवणे
महाराष्ट्रातील भूतांबद्दल माहिती हवी
मी केलेली काही प्लॅन्चेट- मधुबाला
......
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 07/31/2014 - 18:56
नवीन
माझा आवडता भुताचा इडियो देवुन जावा म्हणतो ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... ;) { Dil }
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 08/01/2014 - 04:08
नवीन
भुतांनी भुतांचा भुतांसाठी काढलेला धागा...
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 08/01/2014 - 06:18
नवीन
रेल्वेच्या लांबच्या प्रवासात १)भुताच्या गोष्टी ,२)स्वप्ने ,३)लहानपणच्या फजिती हे चांगले गप्पांचे विषय आहेत .
- Log in or register to post comments
अ
अधिराज
Fri, 08/01/2014 - 11:35
नवीन
हाकामारी म्हणून एक प्रकार असतो. हाकामारी गोड व प्रेमळ आवाजात एखाद्याला ३ वेळा हाक मारते. त्याला भुलून जर कोणी त्या हाकेला ओ दिली तर झालं मग त्याचं कल्याण. कोणाला आहे का अनुभव हाकामारीचा??
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 08/01/2014 - 21:39
नवीन
मला पुषकळ्वेळा आलाय. माझ्या बर्याच मित्रमैत्रिणींना पण आलाय.
अर्धवट झोपेत असताना अशा हाका ऐकू येतात.
- Log in or register to post comments
श
शिद
Fri, 08/01/2014 - 11:48
नवीन
प्रत्येक विवाहीत पुरूषाला असेल हा अनुभव.
(पळा.......)
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 08/01/2014 - 11:50
नवीन
ख्याक
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 08/01/2014 - 11:50
नवीन
अॅक्च्युअली बरोबरे. कारण 'कल्याण' चा अर्थ कन्नड/तमिळादि भाषांत लगीन असाही होतो ;)
- Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव
Fri, 08/01/2014 - 12:23
नवीन
घारी चा डोळा
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »