पाककृती

बटाटेवडे आणि चिंच-खजूर आंबटगोड चटणी (फक्त फोटो...)

Primary tabs

थांबा, थांबा, थांबा. ही काही पाककृती नाही. एकच फोटो टाकणार आहे. पाककृतीबिती टाकायला मी काही बल्लवाचार्य नाही. बटाटेवड्यांची पाककृती Mrunalini यांनी आधीच मिपावर देऊन ठेवली आहे. उत्सुकांनी ती आवर्जून वाचा. इथे फक्त एक फोटो पहायला मिळेल. तोही अजिबात धड नाहीये. तेवढा धीर धरवला नाही आणि सर्व वडे + चटणी गट्टम केले गेले. ;-)

Batatewade&Chutney

हो, चिंच-खजुराच्या चटणीबद्दल चार ओळी निश्चितच खरडू शकेन.

साहित्य - चिंच, खजूर, गूळ, पाणी.
प्रमाण - सगळंच अदमासे. (मला काय प्रमाणबिमाण विचारताय...!)
कृती - हे सगळं एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात पंधरा-वीस मिनिटे उकळून घ्या. नंतर दाबून-पिळून-गाळून-बिळून घ्या. चटणी तयार...

उद्या पाणीपुरीचा बेत आहे...

बटाटेवड्यांसोबतच अर्ध्या बटाट्याचे बटाटाभजी आणि वांग्याच्या चारदोन चकत्यांची वांगीभजीपण गेलाबाजार करून पाहिली. वांग्यांच्या चकत्यांवर थोडेथोडे तिखटमीठ भुरभुरले आणि बेसनात घोळवून तळून घेतली. झाली गाड्याबरोबर नळ्याचीपण यात्रा!

पाककृती विभागात का? तर मी एवढं राबराब राबून (कुटुंबाचे एक्स्पर्ट अ‍ॅडवाइस-कम-टोमणे वैग्रे ऐकून घेत घेत हम भी कुछ कम नहीं असे म्हणत हे सगळं बनवलंय तर मग टाकूयात मिपावर. शेवटी काय आहे की मिपा आहे घरचं, होऊ द्या खर्च!

एन्जॉय माडी... चिअर्स!!! :-)

सस्नेह

आम्ही कोणताही प्रादेशिक वाद सुरु केलेला नाही.
अर्थात मध्य महाराष्ट्रीय लोकांना कोणताही वाद स्वत:वर ओढवून घेण्याची सवय आहे त्याला आम्ही बॉर्डरवाल्यांनी काय करावे ?
बाकी, वड्याचा स्वाद कसाही असला तरी वाद भारी खमंग आहे !

कवितानागेश

कुत्रं कशाला फिरकेल तिकडे? त्याच्याकडे कॅमेरा नसतो. :P
पण लिहिण्यासारख्म काही नसतं त्यामुळे प्रतिक्रिया येत नाहीत. पण वाचनसंख्या नॉर्मल असते.
इथे 'चर्चा' करायला भरपूर वाव असतो....
एकदा भेळ करा आता वरचीच चटणी वापरुन ;)

सूड

>>बाकी छायाचित्रणासारख्या विषयावर जीव तोडून लिहिलेल्या

जीव तोडून लिहीताय हे माहित असतं म्हणून नसत्या पिंका टाकून सत्यानाश करत नाही.

प्यारे१

क्लास मध्ये टीचर च टीच करणार ना सर?

पण तेच सर बाहेर थ्री फोर्थ टीशर्ट मध्ये पाणीपुरी खायला उभं असताना भेटले की गप्पा होतात ना? तसंच आहे हे! ;)

आम्ही फक्त...

चिंचेची चटणी बघीतली आणि आम्हाला तुम्ही पुणेकर असाल अशी शंका आली..

हल्ली उपनगरीय स्थानकाबाहेर या बिकानेर वाल्या हलवयांची गर्दी झाली आहे. सामोस्यांचे सारण वड्या मधे घालून हिरव्या लाल चाटन्यंबरोबर देतात. असा राग येतो म्हणून सांगू.
वरुन सुखी चटणी ठेवत नाही म्हणून तोंड वर करून सांगतात.

नीलमोहर

अरे एस भाऊ हे पण करतात का?
बाकी वडा आणि चटणीचा रंग यावर काही लिहीले असते पण नको,
छानच आहे हो, गंमत करते ;)

वडा (वडापाव सोबत मिळतो तो) हा आलुबोंडा/आलुगोंडा यापेक्षा वेगळा पदार्थ आहे. (अर्थात आलुगोंडा चवीला उजवा असतो) याचा आकार साधारणपणे टेनीस बॉल इतका असतो, अर्थात पुण्यात मिळणे अवघड आहे . मराडवाड्यातील/ विदर्भातील गावात किंवा शहरात मिळू शकेल.