Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.

स
संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 09:12
🗣 130 प्रतिसाद
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी. मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. मग अनिस नेमके करते काय? देवालयात रांगा लावणाऱ्या भक्तांची प्रचंड गर्दी, हजारोंच्या संख्येने बोलले जाणारे आणि फेडले जाणारे नवस, स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी, हे सगळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश असताना सुद्धा जर वाढतच असेल तर मला असे वाटते अंनिस सपशेल नापास झाली आहे. त्यांची मुल्ये आणि विचार कुठेतरी भलत्याच दिशेला आहेत असे सारखे राहून राहून वाटते. धर्म, कर्मकांडे, पूजाविधी आणि आयुष्यात येणारे बरेवाईट प्रसंग याचा काही सुतराम संबंध नाही असे स्वत:शिवाय कुणालाही पटवून व सिद्ध करून दाखवण्यात कार्यकर्ते कमी पडले आहेत. जर मानसिक आधारासाठी श्रद्धेचा भक्कम चबुतरा आवश्यक आहे आणि तो अंनिस च्या मते चुकीचा आहे तर इतक्या वर्षात त्यास सक्षम व्यवस्था उभी करण्यात इतके प्रकांड पंडित गाठीशी असताना अपयश का यावे? खरच अंनिसचा मूळ उद्देश नक्की अंधश्रद्धा निर्मुलन हाच आहे कि समस्त हिंदुस्तानी जनतेला त्यांच्या श्रद्धा सोडून अधांतरी लोंबकळत ठेवण्याचा आणि नंतर अशा श्रद्धाहीन, हतवीर्य समाजाला आपल्या धर्माच्या जाळ्यात ओढण्याचा काही आंतरराष्ट्रीय कट आहे? सध्या तरी त्यांच्या कामावरून असे काही विधायक आणि भारतीय जनतेशी प्रामाणिक असे वर्तन होताना दिसत नाही. एक प्रकारची हटवादी आणि म्हणूनच एक प्रकारची अंधश्रद्धा म्हणून हिंदू अंनिस कडे बघतात. आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे. तुम्हाला काय वाटते? (याआधी हा विषय मिपावर चघळला गेला असेलच, आवश्यकता नसेल तर धागा उडवा. पण मग मला आधीच्या धाग्यांचे काही स्त्रोत जरूर द्या.)

प्रतिक्रिया द्या
41807 वाचन

💬 प्रतिसाद (130)
ब
बाळ सप्रे गुरुवार, 09/25/2014 - 18:58 नवीन
रॅशनल थिंकिंग करण्याची पात्रता होती, पण सगळे करतात म्हणून आपणही असं होत गेलं. सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार केला गेला नाही. पण दाभोलकरांची पुस्तके वाचल्यावर हे तर आपल्याला माहीत आहे मग आपण इतके वर्ष असे का वागत राहीलो. सगळे करतात म्हणून करायची गरज नसते याची जाणीव झाली. आणि छोट्या छोट्या गोष्टींची चिकित्सा करुन खरच एखाद्या गोष्टीत तथ्य असेल तरच स्वीकारणे आणि बाकी गोष्टी त्यागणे अशी सवय लागली. अर्थात आई वडीलांमुळेच हे प्रथम वाचनात आले. घरातून मुक्त विचारसरणीला तेवढाच पाठींबा मिळाल्याने विचार आणि आचारात सुसंगती आणू शकतो. घरातील वातावरण पूर्वी खूप धार्मिक होते. बरीच सूक्ते, रुद्र वगैरे पाठ होता. प्रसंगी पूजा वगैरे सांगितल्याही होत्या. लग्न देखिल पत्रिका पाहून वेदोक्त वगैरे झालय!! ९२-९३ ला रामजन्मभूमी मुद्द्यावर भारून जाउन फक्त कारसेवेला जायचे बाकी होते. पण आता कोणताही धार्मिक कार्यक्रम करत नाही. अर्थात दुसर्‍या कोणी बोलवल्यास नातेसंबंध जपण्याच्या हेतुने उपस्थिती धडते. मुलाची मुंज करण्याचा मानस नाही. कुठे शिक्षणाच्या हेतुने दूर ठेवण्याची वेळ आल्यास स्नेहसंमेलनाच्या रुपात धार्मिक विधीशिवाय मुंज होईल. मुलाची पत्रिका अस्तित्वातच नाही. या विचारांची पत्नीवर सक्ती नाही. पण तिलाही बर्‍याच गोष्टी पटतात. इतका बदल घडलाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ए
एस गुरुवार, 09/25/2014 - 19:22 नवीन
तुमचे अभिनंदन आणि कौतुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
व
विलासराव Fri, 09/26/2014 - 05:47 नवीन
+१. मलाही दाभोळकरांचे काम मोलाचे वाटते. ज्या गोष्टी पटल्या त्या घेतल्या.न पटलेल्या सोडुन दिल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 12:48 नवीन
त्याचे असे आहे कि, अंनिस हि एक मोठी प्रतिष्ठित संघटना आहे. १५ वर्षांपूर्वी जो आदर आणि मान अंनिस ला होता, ज्या प्रकारची लोकभावना होती ती आज काहीशी धुसर झाली आहे. इतक्या वर्षांच्या अविरत कष्टांनंतर जर लोक आपल्याकडे संशयाने बघत असतील तर ती दाभोलकरांची संघटना बांधणीची सारी मेहनत फुकट जायची. अंनिस एक लोकशाहीवादी संघटना असेल तर त्यांना ह्या टीका आणि प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. सतत लोकांना आव्हान देऊन, चिथावून पदरात अपमान आणि संशय पडण्यापेक्षा अंधश्रद्धेत अडकलेल्या, अडकू शकणाऱ्या जनतेला हळुवारपणे सामंजस्याने योग्य मार्गावर आणणे आवश्यक आहे. कुठलेही आंदोलन उभे राहायला वाढायला प्रचंड कष्ट करावे लागतात. अंनिस रसातळाला जाऊ नये हि अंतिम इच्छा. सुधारणेची अपेक्षा आहे आणि मदतीची तयारीपण आहे. पण अशी सुधारणा खरेच अंनिस मान्य करेल का हा मूळ प्रश्न. अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित आणि श्रीमंतांमध्ये वाढणारी दैववादी मानसिकता भारताला परत मागे धाडू शकते. इथे असलेल्या प्रत्येकाच्या मताचा आदर आहेच. पण खरेच अंनिस वाचवण्यासाठी, तिची परिणामकता वाढवण्यासाठी, तिचे जाहीर उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचाराने आवश्यक आहे. मी असा प्रश्न स्वत:ला विचारला आणि त्यातून अंनिस च्या मूळ किंवा छुपा हेतू काय असेल असाही प्रश्न उभा राहिला. शंका दूर केल्याशिवाय सहभाग शक्य नाही.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 16:58 नवीन
एखाद्या माणसाला साप चावल्यावर त्याला डॉक्टरकडे नेण्याऐवजी भगत्/बाबा कडे नेणे हे थांबवण्यासाठी अनिसंने काय केले पाहिजे होते असे तुम्हाला वाटते? तुमचे विचार अनिसंकडे पोहोचविण्याची जबाबदारी माझी...तुमच्या प्रतिसादात एका अक्षराचाही बदल न करता देणार उत्तर???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 12:49 नवीन
आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 13:00 नवीन
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे. दुसर्‍यांनी काय करावे हे सांगायला मी काही अनिसचा कार्यकर्ता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 17:00 नवीन
अनिसंने काय करावे हे मात्र "तुम्ही" सांगणार...टाळ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 08:16 नवीन
अरे टवाळा - घाटपांडे साहेबांनी विचारले की "अनिस चे काय करावे" असे, म्हणुन सांगितले. नाहीतर कोणी काय करावे हे सांगायला जायला मी काय अनिस चा कार्यकर्ता आहे? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 08:23 नवीन
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे.
हे तुम्हीच लिहिले ना???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 08:34 नवीन
अहो पण ते का लिहीले ते बघा ना. पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले. विचारलेच नसते तर कशाला सांगायला आलो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/26/2014 - 09:20 नवीन
पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते हायला! मी विचारले होते? काहीही काय फेकताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ट
टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 09:50 नवीन
पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले
मग तुम्ही पण पेठकरकाकांच्या प्रतिसादाखालिच लिहायला हवे होते...इथे का लिहिले??...आणि ते तर म्हणत आहेत की
हायला! मी विचारले होते? काहीही काय फेकताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 10:06 नवीन
आता अस करा की अंनिसने काय प्रकाश घाटपांडे - Thu, 25/09/2014 - 16:19 आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा उत्तर द्या
पेठकर नाही धाटपांडे काका !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 10:53 नवीन
वोक्के...आता मी विचारलेल्या प्रश्नाचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
थ
थॉर माणूस Fri, 09/26/2014 - 11:11 नवीन
अहो कुणाशी वाद घालताय... राणीचे पाईक ते. इंग्लंडात बसून भारत कसा फालतू आणि भारतातल्या माणसांनी काय करावं त्याविषयी गफ्फा मारणे हा त्यांचा इगो कुरवाळण्यासाठीचा उद्योग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 12:02 नवीन
वा...बरे झाले या आयडीवरची धूळ झटकली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
म
मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 13:06 नवीन
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? या वाक्याला एक अहंकाराचा दर्प येतो आहे . इतरांना शुद्धीकरणाचे, आत्मनिरिक्षण / परीक्षण करण्याचे सल्ले देणारे स्वतःच्या योग्यतेबद्दल केव्हढा आत्मविश्वास बाळगून असतात याचे कौतुक वाटते. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. आणि तुम्हाला जे जास्तं योग्यं वाट्ते , म्हणजे भिकारी/ वेश्या निर्मुलन , ते कार्यं (शक्यं असल्यास) हाती घ्यावेत . पण कृपया दुसरा करीत असलेल्या कार्याला असे हीन लेखु नका . समर्थांनी सांगीतले आहे : क्रियेवीण वाचाळता व्यर्थं आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 13:51 नवीन
माझ्या अहंकाराबद्दलचे आपले गैरसमज दूर होतील अशी आशा करतो, माझ्या प्रश्नातच माझे उत्तर उपरोधिकपणे उच्चारले आहे. अंनिस काय करते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे का? कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न राहातच नाही जेंव्हा मुसलमान किंवा ख्रिश्चन जबरदस्ती किंवा आमिषाने एखाद्यास धर्मांतर करण्यास भाग पडतो. दुसऱ्याच्या घरात घुसून त्याच्या श्रद्धांची चिरफाड करताना चार बोट आपल्याकडेही असतीलच याचे भान असावेच. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही हे कसे ठरवणार? तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. हेच अंनिस ला सांगितले तर आम्ही ढोंगी का? साधे उदाहरण आहे. ज्योतिष हे शास्त्र नाही, त्याचा काही उपयोग नाही, लोकांना फक्त लुबाडतात. चला मान्य आहे तुमचे. पण ज्योतिष धुडकावून लावण्याआधी स्वत: खपून काही अभ्यास केला आहे का? नुसते आव्हान देत फिरल्याने काही होत नाही. असो माझ्या ज्योतिषावर विश्वास आहे कि नाही याबद्दल नंतर कधी. वैद्यकशास्त्रात एका डॉक्टरचे निदान दुसरा डॉक्टर मान्य करत नाही, एकाची उपचारपद्धती दुसरा चालू ठेवत नाही. तिथे सुरु असलेला सगळा भोंगळ कारभार चालतो, तो काय लोकांच्या जीवाशी आणि पैश्याशी खेळ नाही का? तिथल्या अंधश्रद्धांचा अंनिस ने काय भांडाफोड केला? अंनिस ने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धाविषयी समान भूमिका घ्यावी अन्यथा नाव बदलावे असे माझे एक मत. यात मीच काही कार्य हाती घेतले तरच मला बोलण्याचा अधिकार असे काही आहे का? लोकांना "काहीतरी केल्याचे" समाधान हवे असते. त्याने काय फरक पडतो, नाही पडत याचा त्यांना विचार करण्यास भाग पडले कि ते चिडतात असे आजवरच्या अनुभवांवरून माहित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 14:12 नवीन
तुम्ही सामाजिक काय वैयक्तीक काय तसेच श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सामाजिक समस्या यात गल्लत करीत आहात असे वाटते . जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे हा गुन्हाच आहे कारण त्यात सामाजिक/ वैयक्तीक आणि धार्मिक स्वतंत्र्याची पायमल्ली होते आहे. मला वाटते अशा कृत्याचे समर्थन माझ्या उत्तरात कुठेच नाहीये . तुम्हाला अंनीस चे कार्यं पटत नाही हे तुमचे मत आहे आणि तुमच्या मतस्वातंत्र्याचा मी आदर करते . तसेच तुम्हीही इतरांच्या मत स्वातंत्र्याचा आदर करावा इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 14:33 नवीन
मतस्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल शतप्रतिशत सहमत बाल सप्रे ह्यांनी हि मला हाच प्रतिसाद दिला कि आपण समस्या आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात. मग इतर सामाजिक समस्येप्रमाणे अंधश्रद्धा हि सामाजिक समस्या असली पाहिजे की ती वैयक्तिक समस्या आहे? मग वैयक्तिक समस्या हि सामाजिक केंव्हा होते आणि त्यात लुडबुड करण्याचा इतरांना केंव्हा अधिकार प्राप्त होतो? माझा खरच आता गोंधळ व्हायला लागला आहे खरच अंधश्रद्धा म्हणजे फक्त धार्मिक अंधश्रद्धा का? ह्या शब्दाला असा संकुचित अर्थ कसा प्राप्त झाला? त्यामुळे अंनिस हे धर्मविरोधी आहे असा नकारात्मक प्रचार झाला आणि त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मनीषा Fri, 09/26/2014 - 08:10 नवीन
उदाहरणार्थ अंनीस ही एक समाजिक चळवळ आणि अंनीस ला विरोध करायचा ? पाठिंबा द्यायचा? की त्या पासून अलिप्त रहायचे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्नं त्यात कुणी ढवळा ढवळ करणे योग्यं होणार नाही . हे तत्वं वापरून तुम्ही सामाजिक आणि वैयक्तिक बाबींचे वर्गीकरण करा . आणि त्तुमच्या वैयक्तिक समस्यांमधे लुडबुड करायचा अधिकार कुणालाच नाही जो पर्यंत तुमच्या वर्तनाने कुणाला उपद्रव होत नाही. हाच नियम तुम्हालाही लागू होईल . इतरांच्या खाजगी गोष्टींमधे तुम्ही नाक खुपसले तर तो गुन्हा समजला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 13:08 नवीन
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो....
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 13:10 नवीन
साधा प्रश्न आहे, अनिस नसती तर आज काही जाणवण्या इतका थोडा तरी फरक पडला असता का? माझ्या मते नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 13:17 नवीन
ओपिनियन पोल घ्या. माझ्या मते अंनिस मुळे लोक विचार तर करायला लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 13:23 नवीन
७०-८० च्या दशकात नास्तिकतेच प्रमाण जास्त होते. कोणी देव देव करायला लागले तर त्याची थोडी का होइना चेष्टाच होयची. १९९०-२००० नंतर, देव, बाबा, बुवा, सण, परंपरा ह्यांना मोठीच प्रतिष्ठा मिळाली आहे. कदाचित हेच अनिसचे कॉट्रीब्युशन असावे. ( हे हलके घ्या ). माझ्या मते अनिसला महाराष्ट्राच्या इतिहासात २ ओळी इतकी पण जागा नाही. त्या दोन ओळी पण कदाचित खुना बद्दल असतील ( आणि त्यामागच्या राजकारणा बद्दल )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 09/25/2014 - 13:26 नवीन
नक्कीच काका. मुद्देसुद प्रतिसाद खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
पैसा गुरुवार, 09/25/2014 - 13:17 नवीन
उत्तम प्रतिसाद काका! अतिशयच आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
संदीप डांगे गुरुवार, 09/25/2014 - 13:18 नवीन
विचारांना विचारांनीच संपवता येते ह्या आमच्या अंधश्रद्धेला दाभोलकरांना लागलेल्या बुलेट ने संपवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 09/25/2014 - 13:24 नवीन
हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार घेऊन संपवावे लागले त्यांना... त्यापेक्षा सरळ सोप्पी मुठ का मारली नाही..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 13:30 नवीन
मारली असेल. प्रॉपर बसली नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ब
बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 14:09 नवीन
काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. आत ठसठसतंय चैतन्य, वाट त्याला देणार नाही. मुठीत सामावली दुनिया, प्रकट तिला करणार नाही. जगन्नाथाचा रथ हा, हस्ते परहस्ते चालवणार नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सूड गुरुवार, 09/25/2014 - 14:22 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सौंदाळा गुरुवार, 09/25/2014 - 14:27 नवीन
जब्राट, अजुन लिवा की जरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड गुरुवार, 09/25/2014 - 14:37 नवीन
नको, आहेत ते प्रतिसाद पण उडायचे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 14:42 नवीन
___/\___ जौ दे रे! जुन्या पेशवेकाळाच्या पलिकडं जावं लागेल. :) नकोच बोलूस त्यापेक्षा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 09/25/2014 - 17:33 नवीन
मुठीकडून मिठीकडे वळा आता बॅटमन ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 18:07 नवीन
हा हा हा! गुडवन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 18:18 नवीन
हायला...माझ्या प्रतिसादाला पंख लागले :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
क
काउबॉय गुरुवार, 09/25/2014 - 18:24 नवीन
नाही तर अश्लील अश्लील ओरडलो असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 18:31 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय
ब
बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 09:32 नवीन
मूठ असो वा मिठी पडता ती दिठी अन मग पाठोपाठी काय जाहले || जाहले ते ते पाहिले ऐकिले तैसेचि ठेविले समजले तर समजले नाही का हो ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
स्वप्नांची राणी Fri, 09/26/2014 - 10:26 नवीन
हो हो, हो... ;) अनुप ढेरे यांचा प्रतिसाद काय चपखल बसतोय ना सगळिकडे '...कळला नाही'वाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 11:13 नवीन
हा हा हा, अगदी अगदी..त्याचे कारणही मूठच असेल, नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
व
वाडीचे सावंत गुरुवार, 09/25/2014 - 19:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अनुप ढेरे गुरुवार, 09/25/2014 - 13:34 नवीन
:O प्रतिसाद कळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 09/25/2014 - 13:30 नवीन
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही.
समितीने अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कशी व्याख्या केली आहे? अंधश्रध्दाविरोधी लढा म्हणजे नक्की कशाच्या विरोधात लढा अपेक्षित आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 13:42 नवीन
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप." "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात" आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे. [आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते. परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे') आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.असा त्याचा अर्थ घेतला जातो. तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 13:45 नवीन
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि
तुम्ही सुद्धा आता "बाबा वाक्यम प्रमाणम" च्या दिशेने चालला आहात. इथे बाबा दाभोलकर झाले आहेत. बाकी बुवा पण असेच म्हणतात ना की ह्य/त्या धर्मग्रंथात असे लिहीले आहे/तसे लिहीले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/25/2014 - 13:49 नवीन
आपल्या प्रतिसादावरुन असे वाटते की आपण माझा प्रतिसाद पुर्वग्रह न बाळगता वाचला नाही. मी फक्त संदर्भ दिला आहे. माझे आनुषंगिक मत पुढे आले आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा