आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी.
मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. मग अनिस नेमके करते काय? देवालयात रांगा लावणाऱ्या भक्तांची प्रचंड गर्दी, हजारोंच्या संख्येने बोलले जाणारे आणि फेडले जाणारे नवस, स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी, हे सगळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश असताना सुद्धा जर वाढतच असेल तर मला असे वाटते अंनिस सपशेल नापास झाली आहे. त्यांची मुल्ये आणि विचार कुठेतरी भलत्याच दिशेला आहेत असे सारखे राहून राहून वाटते.
धर्म, कर्मकांडे, पूजाविधी आणि आयुष्यात येणारे बरेवाईट प्रसंग याचा काही सुतराम संबंध नाही असे स्वत:शिवाय कुणालाही पटवून व सिद्ध करून दाखवण्यात कार्यकर्ते कमी पडले आहेत. जर मानसिक आधारासाठी श्रद्धेचा भक्कम चबुतरा आवश्यक आहे आणि तो अंनिस च्या मते चुकीचा आहे तर इतक्या वर्षात त्यास सक्षम व्यवस्था उभी करण्यात इतके प्रकांड पंडित गाठीशी असताना अपयश का यावे? खरच अंनिसचा मूळ उद्देश नक्की अंधश्रद्धा निर्मुलन हाच आहे कि समस्त हिंदुस्तानी जनतेला त्यांच्या श्रद्धा सोडून अधांतरी लोंबकळत ठेवण्याचा आणि नंतर अशा श्रद्धाहीन, हतवीर्य समाजाला आपल्या धर्माच्या जाळ्यात ओढण्याचा काही आंतरराष्ट्रीय कट आहे? सध्या तरी त्यांच्या कामावरून असे काही विधायक आणि भारतीय जनतेशी प्रामाणिक असे वर्तन होताना दिसत नाही. एक प्रकारची हटवादी आणि म्हणूनच एक प्रकारची अंधश्रद्धा म्हणून हिंदू अंनिस कडे बघतात.
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
तुम्हाला काय वाटते?
(याआधी हा विषय मिपावर चघळला गेला असेलच, आवश्यकता नसेल तर धागा उडवा. पण मग मला आधीच्या धाग्यांचे काही स्त्रोत जरूर द्या.)
💬 प्रतिसाद
(130)
प
पुण्याचे वटवाघूळ
गुरुवार, 09/25/2014 - 15:26
नवीन
याविषयी मागच्या वर्षी आमच्या मित्रमंडळींमध्ये बरीच ई-मेला ई-मेली झाली होती. त्यातील इतरांनी मांडलेली मते (अॅसॉर्टेड) इथे लिहित आहे.तसेच मिसळपाववरच आणि इतर संकेतस्थळांवर आणि फेसबुकवर मी जे काही वाचले आहे त्यावरून पुढील गोष्टी लिहित आहे. यापैकी एकही गोष्ट मी मुळात लिहिलेली नाही तरीही सगळ्या मूळ लेखकांची नावे इथे लिहित नाही आणि त्याची गरजही नसावी.
घाटपांडे साहेब म्हणतात (की दाभोळकर म्हणतात ते उधृत करतात): "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात".आता ज्ञान किंवा अनुभव म्हणजे नक्की काय हा प्रश्न नक्कीच उभा राहतो.
एका ई-मेलमध्ये मला खालील मजकूर आला तो इथे जसाच्या तसा चिकटवत आहे:
"शास्त्रामध्ये अगदी मूलभूत आणि (अजून तरी) inviolable असे फार नियम नाहीत. असे नियम बहुदा दहा-बाराच असतील (न्यूटनचे नियम, वस्तुमान/उर्जेचा अक्षय्यतेचा नियम,ओहमचा नियम इत्यादी).पण इतर सगळे नियम हे या मूलभूत नियमांवरून derived असतात.अनेकदा असे derived नियम हे universal नसतात तर काही मर्यादांमध्ये लागू होतात.उदाहरणार्थ ऍल्युमिनिअम हे room temperature ला elastic असते पण ते वरच्या तपमानाला आणि एका ठराविक pressure मध्ये तोच धातू पूर्णपणे plastic असतो.या प्रकाराला superplasticity म्हणतात. म्हणजे हा धातू elastic आहे असे आपण म्हणतो त्याचवेळा त्याला एक caveat असते ते म्हणजे room temperature आणि atmospheric pressure.अनेकदा अशी बंधने या नियमांना असतात हे पहिल्यांदा लक्षातच येत नाही तर असे काही प्रयोग झाल्यानंतरच ते कळते.जर का मी असा काही प्रयोग करायला गेलो तर कदाचित सध्याच्या शास्त्रीय बैठकीप्रमाणे ते अशक्य असेल किंवा काऊंटर-इंट्युऊटिव्हही असेल.पण सद्यकालीन शास्त्रीय माहितीच्या चौकटीच्या पलीकडे गेल्याशिवाय असे नवीन प्रयोग होऊच शकणार नाहीत.आणि पूर्णपणे rational व्यक्तिला शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर विचार करणे शक्य कसे होणार?"
कारण त्यावेळी माहित असलेल्या ज्ञानाच्या आधारे सुपरप्लॅस्टिसिटी असे काही असते आणि अॅल्युमिनिअम हा धातू इलॅस्टिक सोडून दुसरे काही असू शकेल हे माहितच नव्हते.घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे.
ई-मेल कंटिन्यूज---
"यावरूनच मी म्हणतो की Circle of rationality is often enlarged by irrational people. जे rational असतात ते एखादी गोष्ट समोर दिसली नाही किंवा अन्य पध्दतीने तिचे अस्तित्व सिध्द करता आले नाही तर ती मान्य करत नाहीत आणि त्यातूनच नकळत आपल्यावरच बंधने घालून घेतात."
याविषयी तुमचे काय म्हणणे आहे घाटपांडेसाहेब?
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/25/2014 - 16:32
नवीन
मला जे काही म्हणायचे आहे ते मी वरील प्रतिक्रियेत म्हटले आहे. शेवटचे दोन परिच्छेद वाचा.
आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे
तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Sat, 09/27/2014 - 07:04
नवीन
असे असेल तर अंधश्रध्दा निर्मूलन कशाला करायला पाहिजे? समजा आज मला एखादी अंधश्रध्दा वाटत असली तरी काही वर्षांनी अनुभवात आणि ज्ञानात भर पडल्यानंतर तीच गोष्ट अंधश्रध्दा वाटणार नाही याची शक्यता आहेच ना. मग अंधश्रध्देला विरोध म्हणजे नक्की कशाला विरोध हा प्रश्न परत उभा राहतोच की. कारण अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कालनिरपेक्ष व्याख्या करता येत नसेल तर मग विरोध नक्की कशाला?
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 10/01/2014 - 11:47
नवीन
आज एखादी गोष्ट ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत बसत नसेल तर ती अवैज्ञानिक आहे हे म्हणणे भाग आहे. उद्या ती विज्ञानाच्या कक्षेत बसली तर तिला वैज्ञानिक म्हणु. पण म्हणुन आजच ती वै़ज्ञानिक आहे असे कशाला म्हणायचे? वर भल्या मोठ्या प्रतिसादात मी खरा वैज्ञानिक नकारज्ञ नसतो याचा उहापोह केला आहेच. अंधश्रद्धांना विरोधा हा खरतर त्यामुळे होणार्या शोषणाला विरोध आहे जशी विज्ञानाची प्रगती होत जाईल तशी अंधश्रद्धा कमी होतील. पुर्वी देवीचा रोग हा देवीचा कोप मानत होते. आज भारतात देवीचा रोगी शोधुन सापडत नाही.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/25/2014 - 14:06
नवीन
बराचसा सहमत.
बदल घडवून आणणारा बर्याचदा आपल्या बदलाच्या तत्वज्ञानाच्या इतका प्रेमात पडतो की, आपण बदल कशासाठी घडवून आणत आहे ते विसरतो... आणि त्या तत्वज्ञानात जर कोणी बदल सुचवला तर त्याचा कडवा विरोधक बनतो... म्हणजे एका अर्थाने बदलाचाच विरोधक बनतो !
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 11/07/2017 - 09:55
नवीन
अतिशय आवडला हा प्रतिसाद. अंगात येणार्या बायका मुळात मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात. घरातल्या व्यक्तिंकडुन अवहेलना, अपमान, हेळसांड सहन करणार्या असतात. त्यामुळे त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या असणारे कृत्य करत असल्या तरी मुळात अंधश्रद्धेच्या बळीच असतात. तसेच सार्याच अंधश्रद्धेचे. याचा अर्थ अंधश्रद्धा फोफावणार्या व्यक्तिला शिक्षा होऊ नये असे नव्हे पण अंधश्रद्धेला समजून घेणे आवश्यक आहे. अंनिसवाल्या सार्यांनीच अशे संञत भुमिका घेतली तर मोठे बदल निश्वित घडतील असे वाटते.
- Log in or register to post comments
ध
धन्या
गुरुवार, 09/25/2014 - 13:30
नवीन
मुळात अंधश्रद्धा म्हणून काही नसते. हा शब्द अंनिसने (किंवा त्यांच्याही आधी शाम मानवांनी ?) वापरायला सुरुवात केली असावी असे वाटते. मला हा शब्दच चुकीचा वाटतो.
श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते.
अंनिसने देव आणि धर्माविषयीच्या निरुपद्रवी श्रद्धांना (उदा. देवाची पुजाअर्चा) डोळस श्रद्धा म्हटले तर समाजास हानीकारक असणार्या श्रद्धांना (उदा. बळी देणे, बुवाबाजी) अंधश्रद्धा म्हटले. आणि त्यांनी त्यांचं लक्ष फक्त "अंधश्रद्धां"वर केंद्रीत केले. ही त्यांची अर्थातच "स्कोप रीडक्शन"ची स्ट्रॅटेजी होती.
लोकांच्या "श्रद्धांना" कुणाचाही विरोध नसावा या मताचा मीसुद्धा आहे. प्रत्येकाला आपापली श्रद्धा जोपासण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य असायलाच हवे. मात्र लोकांनी आपल्या श्रद्धा आपल्या घरात जपाव्यात. रस्त्यावर आणू नये. श्रद्धा रस्त्यावर आल्या की त्याचा किती त्रास होतो हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 09/25/2014 - 14:23
नवीन
परफेक्ट.
अवांतर - एका आठवड्याच्या आत आत्महत्येच्या विचारांपासून ते ट्यार्पीखेचक धाग्याकडे प्रवास केलेला पाहून लेखकाच्या मनोधैर्याचं कौतुक वाटतं. मध्ये एका टप्प्यावर 'धन्यवाद मिपाकरांनो, माझं आता ठीक चाललंय' असा धागा आला असता तर जास्त बरं वाटलं असतं.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 09/25/2014 - 14:26
नवीन
आत्मपरीक्षणाचा धागाही आला होता, ही माझी नजरचूक. क्षमस्व.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
गुरुवार, 09/25/2014 - 14:29
नवीन
त्या धाग्याचा दुसरा भाग पण येणार होता पण अजुन आला नाहीये. त्याच्या ऐवजी हे आले.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 09/25/2014 - 15:02
नवीन
येणार येणार येणार
दुसरा बी भाग येणार … ह्याच्यापेक्षा ज्यास्त ट्यार्पि खेचक आसनार.
सगळेच जरा वळणावर येत आहे. पूर्ण कथा टाकण्यात मजा आहे, उगाच च्यानलांसारखे काय रोज रोज कुटत बसायचे. मनोधर्य शाबूत राहण्यात मिपाची हिमालायेवढी मदत झाली आहे.
दुसरा भाग येणार आहे, फुल्ल यांड फायनल.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Fri, 09/26/2014 - 08:17
नवीन
पण काही म्हणा , आत्महत्येचे विचार मनात येणे ते अंनीस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देणे - हा मनस्थितीतील बदलाचा प्रवास तुम्ही अगदी कमी कालावधीत ( काही दिवसातच) पार केला या बद्दल तुमचे अभिनंदन !!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/26/2014 - 11:57
नवीन
अंनिस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्याचा विचार आत्महत्येच्या विचारांपासून निघालेल्या शंभर धाग्यामाधला एक आहे. मला काही लोकांनी पत्रिका, होम हवन, ग्रहशांती वैगेरे पुळचट उपाय करायला सांगितले. त्यानंतर झालेल्या मेंदूवादळानंतर हा सल्ला निपजला. एकूण माझा लेख आणि त्याचा अन्वयार्थ ज्याने त्याने आपल्या परीने लावला. सर्व प्रतिसाद वाचून असे वाटते कि साधारणपणे सगळ्यांना समोरच्याला "च्या बाजूने/च्या विरुध्द" असे वर्गीकरण केल्याशिवाय जमतच नाही. तुम्ही वादग्रस्त विषय काढले कि एकतर च्या बाजूने समजले जाता किंवा च्या विरुद्ध. ह्या लेखाचा काहीतरी भलताच अर्थ लावला गेला आहे.
कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी संबंध नसावा अशी माझी भाबडी अपेक्षा होती.
अंनिस चुकीचे काम करत आहे हे कुठेही म्हटले नाही. अंनिस फालतू आणि बेसलेस आहे असेही म्हटले नाही. त्यांच्या कडे लोकांचा बघण्याचा बदलत चालेला दृष्टीकोन आणि सद्य सामाजिक परिस्थिती ह्याच्यावर काही समाधान शोधता आले तर बरे असे मला वाटत होते
असो. मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे.
पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.
- Log in or register to post comments
स
सखी
Fri, 09/26/2014 - 18:18
नवीन
तुमच्या लेखाची पहीलीच ओळ आहे.
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा....
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Mon, 09/29/2014 - 02:10
नवीन
सखी यांनी तुमच्या लेखनातला आणि प्रतिसादातला विरोधाभास दाखवलेला आहेच. तेव्हा मिपाकरांना बिटवीन द लाईन समजत नाही वगैरे गैरसमजात राहू नये.
एवढं करण्याची गरज नाही. संयत भाषेत प्रामाणिकपणे लेखन केलं की पुरतं. हा प्रामाणिकपणा मिपाकरांना बिटवीन द लाइन स्वच्छ दिसतो. उगाच मिपाकरांना कळलंच नाही असं म्हणणं, आणि वर तिरकस बोलणं टाळलं तर आणखीनच चांगलं.
- Log in or register to post comments
न
निश
गुरुवार, 09/25/2014 - 13:43
नवीन
भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन ह्या सुध्दा अंधश्रद्धा निर्मुलनाशी निगडित आहेत. कस ते सांगतो ज्यामुलीना देवाशी लग्न लावुन देवदासी बनवण्यात आल त्यांच्या संमती शिवाय त्या मुली कालांतराने पुरुष वासनेला बळी पडतात व मग वेश्या व्यवसायात ओढ्यल्या जातात. अनिसमुळे येणार्या कायद्यामुळे ह्या वाईट प्रथेला नक्कीच लगाम लागेल. भिखारी का वाढतात हे जर बघितल तर जरा आपल्या मंदिराजवळ असणार्या त्यांच्या उपस्थितिवरुन कळेल आणि एक जर अनिसच काम एव्ह्ढ महत्वाच नव्हत तर मग दाभोलकरांनसारख्या विद्वान माणसाला जीव का गमवावा लागला. अनिसच काम हे फार महत्वाच होत व ते राहील. दाभोलकर व त्यांच्या अनिसला माझा लाख लाख वेळा सलाम.
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 09/25/2014 - 14:30
नवीन
खंग्री चर्चा.
धागाकर्ता स्वत: वाद प्रतिवाद करतोय हे पाहुन बरे वाटले.
येत राहीन वाचायला.
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
गुरुवार, 09/25/2014 - 15:12
नवीन
अशा विषयावरील धाग्यावर ठरलेले बॅटमन खेळायला आलेले पाहून वरील नाव नाही आले तर कसे चालेल म्हणून माहिती साठी ही प्रतिक्रिया.
सरांच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ अंनिसचा खरा चेहरा पुस्तकातील विचारांची आठवण झाली.
अनेक नव्या सदस्यांच्या माहितीसाठी सरांच्या पुस्तकातील काही प्रकरणे कोणी विचारणा केली तर डकवीन.
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 09/25/2014 - 15:18
नवीन
कुठल्याही व्यक्तीला तू मूर्खपणा करत आहेस, असे सांगितलेले आवडत नाही. अंधश्रद्ध लोकांचेही तसेच आहे. त्यामुळे त्यांना शहाणपणा शिकवायला जाऊ नये.आत्मोन्नतीच्या प्रवासात ते आपल्या कैक जन्म मागे आहेत असे समजावे.(याठेकाणी जन्म हा शब्द काल व्यक्त करण्यासाठी वापरला आहे. नाहीतर पुनर्जन्मावर तुमचे अंधश्रद्धा आहे असे कुणी म्हणेल.)
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
गुरुवार, 09/25/2014 - 15:24
नवीन
अंधश्रद्धाच काय, तथाकथित श्रद्धा सुद्धा मला अनावश्यक वाटते, तरीसुद्धा फक्त एवढेच नमूद करतो, की दाभोलकरांच्या व्याख्यानाचा मी बघितलेला एकमेव व्हिडियो मला कैच्या कैच वाटला होता.
- Log in or register to post comments
ह
होकाका
गुरुवार, 09/25/2014 - 16:06
नवीन
http://m.youtube.com/watch?v=Lw7ZNxnllGM
http://m.youtube.com/watch?v=Lw7ZNxnllGM
- Log in or register to post comments
म
मित्रहो
गुरुवार, 09/25/2014 - 21:00
नवीन
मी लहान असताना मला दाभोळकर माहीती नव्हते पण शाम मानव यायचे. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेपण यायचे. ते बरेच प्रयोग करुन दाखवयाचे आणि त्यामागचे शास्त्र सांगायचे. तेंव्हा मी श्रद्धा अंधश्रद्धा हे समजण्यापलीकडला होतो. मनात तेंव्हापासून एक पक्के ठसले हे सारे थोतांड आहे नंतरही या साऱ्यांचा विचार करताना मनात कुठेतरी तेच होते आणि असते.
समाज बदलत नाही असे नाही तो बदलला आणि बदलतोय. तो अंनिसमुळेच बदलतोय असे म्हणणे कठीण आहे, पण त्याचा काहीतरी परीणाम होत असनार हे नक्की. लहाणपणी जसा समाज होता आणि आता जसा आहे यात बराच बदल झालाय. आता कुणी मांजर आडवे गेेे म्हणून पाच पावलेे मागे जात नाही. लहान असताना हा आमचा खेळ होता, कुणी जात असेल तर मुद्दाम मांजर सोडायचे. तसेच हीचा पायगुण वाइट हाही प्रकार आता बराच कमी झालाय. पूर्ण कमी झालाय असे म्हणता येणार नाही पण कमी झालाय. कुष्ठरोग्याला दिली जाणारी वागणूक. काही बुरसट कल्पनांनी स्त्रीयांना होणारा त्रास आज बराच कमी झालाय. समाज बदलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमटे आणि बंग यांचे कार्य. ते जेंव्हा आदिवासी भागात गेले तेंव्हा कुणीही त्यांच्याकडे यायला तयार नव्हते पण लोक हळूहळू यायला लागले.काही गोष्टी या बदलायलाच हव्या कुण्या नदीत आंघोळ केल्याने पापक्षालन होते ही समजूत. त्या नदीचे काय होते? गंगेविषयी बरेच बोलले जाते पण गोदावरीची परिस्थिती पण काही चांगली नाही मग ती नाशिकला असो की बासरला.तीच गोष्ट पशूबळींची. खरेच या गोष्टी आपल्याला हव्या आहेत का? इथे मला अनिस काय म्हणते यापेक्षा मला काय वाटते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे?
हेही खरे आहे की काही गोष्टींचे प्रस्थ वाढलेय ज्योतीष्य, देवळातल्या रांगा, विशिष्ट ठिकाणी जायचा असलेला अट्टहास, कर्मकांड. याला अनिस जबाबदार आहे असे नाही म्हणणार मी. अनिस असते किंवा नसते तरीही असेच घडले असते. आर्थिक सुबत्ता आणि वाढती स्पर्धा हा जो समाजातील विरोधाभास आहे हे कदाचित त्यामागचे कारण असावे. दुसरे म्हणजे या गोष्टींमुळे फार नुकसान होत नाही त्यामुळे कुणी खूप जीव तोडून विरोध करीत नाही. या साऱ्या गोष्टी फार सोय़ीने स्वीकारायची सवय समाजाला जडलीय. ठरवलेल्या दिवशी जर बाळ हवे असेल तर दिवस पाहून सारे ठरविले जाते पण हेच जर का परीस्थिती वाइट झाली तर मग दिवस बघितला जात नाही.आधी अशी टोकाचीभिूमिका घेणारे लोक होते.
अनिसचे काम आहे त्यांच्या परीने आणि समजुतीने समाजाचे प्रबोधन करायचे ते त्यांना करु द्यावे ते होते की नाही हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या.
- Log in or register to post comments
द
दशानन
Fri, 09/26/2014 - 18:32
नवीन
धागा वाचून एकदम शॉक बसला आहे!
यांच्याकडून अश्या धाग्याची अपेक्षा नव्हती.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/26/2014 - 19:31
नवीन
असे काय आहे बुआ ह्यात?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 09/29/2014 - 06:30
नवीन
साधारण हीच प्रतिक्रिया माझीही आहे...
लेखक त्यांच्या मनस्थितीतुन बाहेर पडुन दुसरं काही लिहीत आहेत.. हे छानच आहे..
पण... आत्महत्या की कर्जबाजारी होणे असे पर्याय आयुष्यात उभे ठाकले असताना असे लेख लिहू शकणे व्यक्तिशः मला आश्चर्याचे वाटते.. वर कुठेतरी तुम्ही म्हणत आहात की काम करुन जो वेळ उरतोय त्यातुन हे लेख तिहीतोय.. पण इथे ज्या हिरीरीने प्रतिवाद करत आहात ते पाहुन तसंही वाटत नाहीये..
आणि लेखाबद्दल म्हणायचं झालं तर पहिलीच ओळ इतकी टीआरपी खेचक आहे की त्यावर काही मत देण्याची इच्छाच नाही..
बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करावं आणि काय करु नये ह्याच्याशी माझा काही संबंध नाही.. मला फक्त आश्चर्य वाटलं.. दशानन ह्यांना "शॉक" का लागला असावा हे समजतय...
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
Sat, 09/27/2014 - 08:09
नवीन
फुल्ल करमणुक असते. माझ्या गावात दर गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते,देवाची ३०-३५ फुटाची ध्वजाची काठी नाचवत नाचवत मिरवणुकीने देवाकडे नेली जाते , आजपर्यंत गावातल कोनीही अगदीच अपरिहार्य कारण असेल तरच अन्यथा या दिवशी दर्शन चुकवत नाही. यात दंडवत आणी देव अंगात येणे हे दोन प्रकार मजबुत चालायचे.साधारण मी १० वर्षाचा असताना आमच्या शाळामास्तर बापुसने मला या देव अंगात येण्याच्या कार्यक्रमापुर्वी सराटे दिले,व जेथे देव अंगात येतो त्या ठिकाणी टाकण्यास सांगितले,सराट्याची ( संस्कृत नाव गोक्षुर कंटक) ते कसेही फेका त्याच्यावर पाय पडला की की ते पायात घुसणारच. त्यामुळे ज्याच्या अंगात येइ व देवापुढे घुमायला जाई त्याच्या पायात मातीत पडलेला काटा घुसत असे, त्यावर्षी तर फुल्ल कल्ला, हाच प्रकार सलग तीन-चार वर्ष घडला,आपोआप दरवर्षी या घुमणार्यांची संख्या कमी कमी होत गेली व हळु हळु थांबली,विषेश म्हणजे देवाचे सगळ्यात मोठे भक्त गावचे कारभारी आमचे आजोबा.पण मात्रा अचुक लागु पडली आणी मागच्या विस वर्षात तरी परत देवापुढे कोनी नाचत-घुमत बसले नाही. आता दहा एक वर्ष झाली,वडिलच विश्वस्त आहेत विविध सुधारणा चालु आहे,पण श्रद्धा ठेवुन अंद्धश्रद्धेला पुर्ण फाटा देण्यात आला आहे.खरच असा एकतरी मास्तर प्रत्येक गावात असावा,इतक्या वर्षांचे आमचे बापलेकांचे गुपित आज मि.पा.मुळे बाहेर आले.असो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 09/27/2014 - 10:02
नवीन
हिच ती पद्धत !
- Log in or register to post comments
क
काउबॉय
Sat, 09/27/2014 - 10:25
नवीन
श्रध्देची व्याख्या
उदा. तेंडुलकर आज शतक ठोकणार... पुरावा काय या आधी ठोकल्याचा अनुभव. असे सगळेच म्हणतात म्हणून... ज्या पिलानेने आयुष्यात प्रथमच सचु खेळताना बघितला आहे तो ही श्रध्देने टाळ्या पिटतोय बरे नाही झाले शतक म्हणून हिरमोड झालाय म्हणुन पुढील म्याचला सुधा तिच तर्हा अन तोच हिरमोड हो शतक काय भोपळा फुटला नाय.... मायला अनीस क्रिकेटवर बंदी का घालत नाही ?
- Log in or register to post comments
क
काउबॉय
Sat, 09/27/2014 - 10:30
नवीन
कारण अनीसची श्रध्दा आहे सच्या शतक न्हवे शतकांचे शतक ठोकणार.
- Log in or register to post comments
क
काउबॉय
Sat, 09/27/2014 - 10:36
नवीन
तर आपल्या भौतिक जीवनाच्या ही अविभाज्य भाग आहेत पण शिरोमणी जेंव्हा त्याला निव्वळ विशिष्ट मुद्या पुरते मान्य करून विधाने करतात तेंव्हा निराकार गाढवाची हे वागन बरं न्हवे हीच कविता पुन्हा पुन्हा आठवू लागते
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3