महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील.
हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती.
महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे.
शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.
हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत.
http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hung-assemblies-in-maharashtra-haryana-20499.html
कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही.
निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल.
आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.
💬 प्रतिसाद
(177)
न
नानासाहेब नेफळे
गुरुवार, 10/02/2014 - 17:45
नवीन
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राकाँ
असा क्रम असेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/03/2014 - 10:21
नवीन
भाजप पहिल्या क्रमांकावर व मनसे पाचव्या क्रमांकावर असणार हे नक्की. २, ३ व ४ वर नक्की कोण असेल ते सांगता येणे अवघड आहे. दुसर्या क्रमांकावर राकाँ नक्कीच नसेल.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 10/02/2014 - 19:34
नवीन
काय हो? ह्याला काय संभाळून पिणं म्हणतात का? :)
तुमच्यासारखे गुर्जीलोकं असं करतात म्हणून पिणारे बदनाम होतात बघा!!! :)
अवो म्हारास्ट्रात हा भजनसुत कुठे आला?
- Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे
गुरुवार, 10/02/2014 - 20:15
नवीन
'सब भूमी गोपाल की, जय बोलो हरी नाम की' हे गुर्जींचे आवडते भजन असावे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/03/2014 - 10:24
नवीन
आधीच्या परिच्छेदातील काही वाक्यांची नक्कल नवीन परिच्छेदात चिकटवताना जरा दुर्लक्ष झाले. एकदा लेख प्रकाशित झाल्यावर नंतर संपादित करण्याची सोय नसल्याने ते वाक्य तसेच राहिले.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 10/03/2014 - 18:45
नवीन
हा धागा वाचायच्या लगेच आधी तुमचा तो धागा वाचल्याकारणाने जरा थोडी गंमत केली, इतकंच!:)
राग नसावा...
- Log in or register to post comments
द
दशानन
Fri, 10/03/2014 - 19:04
नवीन
>>तुमच्यासारखे गुर्जीलोकं असं करतात म्हणून पिणारे बदनाम होतात बघा!!!
=))
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/03/2014 - 10:41
नवीन
काल झी-२४ तास/तालिम चे मतदानपूर्व सर्वेक्षण पाहिले. त्यांचे अंदाज खालीलप्रमाणे -
भाजप ९०, काँग्रेस ७२, शिवसेना ६१, राकाँ ३८, मनसे ६ व अपक्ष आणि इतर पक्ष २१.
सी-व्होटर व तालिम या दोघांनीही भाजपला अनुक्रमे ९३ व ९० जागांचा अंदाज दिला आहे. शिवसेनेसाठी सुद्धा दोघांचा अंदाज अनुक्रमे ५९ व ६१ जागांचा आहे. पण इतर पक्षांसाठीचे त्यांचे अंदाज पूर्ण वेगळे आहे. सी-व्होटरने काँग्रेससाठी ४० जागांचा अंदाज दिला आहे तर तालिमने काँग्रेसला तब्बल ७२ जागा दाखविल्या आहेत. राकाँला सी-व्होटरने ४७ तर तालिमने ३८ आणि मनसेला सी-व्होटरने २७ तर तालिमने फक्त ६ जागांचा अंदाज दिला आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा येणार यावर दोन्ही सर्वेक्षणांचे एकमत आहे. भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल तर मनसे ५ व्या क्रमांकावर असेल यावर देखील दोघांचे एकमत आहे. भाजप-सेनेच्या बाबतीत दोन्ही सर्वेक्षणांचे अंदाज जवळपास सारखे आहेत. परंतु इतर ३ पक्षांच्या बाबतीत दोघांचे अंदाज खूप वेगळे आहेत.
निकालानंतर दोनच शक्यता (खरं तर तीन) दिसतात. भाजप+शिवसेना परत एकत्र येऊन भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू शकतील. परंतु उद्धव ठाकर्यांचा इगो आड आला तर ते एकत्र येणे अवघड आहे. भाजपबरोबर तुटलेली युती शिवसेनेने खूपच जिव्हारी लावून घेतलेली आहे. त्यात भर म्हणून इतर सहकारी पक्ष भाजपबरोबर गेले. त्यामुळे शिवसेनेचा विलक्षण त्रागा व थयथयाट सुरू आहे. आपल्याला सोडून कोणी बाहेर गेला तर ते शिवसेनेला सहन होत नाही व त्या व्यक्तीवर ते विलक्षण तुटुन पडतात व अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका करतात. त्यामुळे शिवसेना सोडून गेलेले सहसा सेनेत परत येत नाहीत कारण ते परत येऊ नयेत अशी व्यवस्था शिवसेनेनेच केलेली असते. भुजबळ, राणे, गणेश नाईक, राज ठाकरे इ. मोठे नेते सेना सोडून गेल्यानंतर याच कारणामुळे कधीही परत आले नाहीत. याउलट इतर पक्ष विलक्षण लवचिक आहेत. त्यामुळे त्या पक्षात ये-जा सतत सुरू असते. सध्या सेनेने भाजपला आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू ठरविले आहे. त्यामुळे निकालानंतर शिवसेनेचा ताठा कायम राहिला तर कोणालाच सरकार स्थापन करता येणार नाही. यदाकदाचित शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर सेनेला भाजपची मदत लागेल. हे ओळखून निकालानंतर सर्वांनीच आपले व्यक्तिगत इगो बाजूला ठेवणे आवश्यक आहे.
दुसरी शक्यता म्हणजे शिवसेना+काँग्रेस्+राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे. ही शक्यता अगदीच कमी वाटते कारण मुख्यमंत्री कोणाचा यावर एकवाक्यता होण्याची सुतराम शक्यता नाही.
भाजप्+राकाँ ही युती अशक्य आहे. किंबहुना भाजप काँग्रेस किंवा राकाँची मदत घेणे अशक्य आहे.
तिसरी शक्यता म्हणजे कोणालाच स्थापनेसाठी बहुमत न मिळाल्याने राष्ट्रपती राजवट लावून ६ महिन्यांनी पुन्हा निवडणुक घेणे. बहुतेक पक्ष या प्रस्तावाला अनुकूल नसतील.
एकंदरीत २ गोष्टी अधोरेखित होताहेत. शिवसेनेच्या सहभागाशिवाय कोणालाच सरकार स्थापन करता येणार नाही हे नक्की आणि कोणत्याही सरकारसाठी मनसेच्या मदतीची गरज नाही हे पण नक्की.
- Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे
Fri, 10/03/2014 - 11:53
नवीन
राज्यात काँग्रेसची प्रतिमा स्वच्छ आहे, हे ओपिनियन पोलवरुन दिसते. पृथ्वीराज चव्हाणांचे नेतृत्व, काँग्रेसच्या एकाही मंत्र्यावर पंधरा वर्षात मोठे आरोप नाहीत. आदर्श प्रकरणात राज्याचे फार नुकसान झाले नाही व त्यात सर्व पक्ष सेनाधिकारी गुतले असल्याने थेट काँग्रेसकडे आरोप येत नाही. काँग्रेसने चव्हाणांना स्टार प्रचारक करुन फक्त सोनियांच्या सभा घ्याव्यात ,तरुणांमध्ये राहुल गांधीविषयी निगेटीव मत आहे.
राज्यात योग्य प्रयत्न केल्यास काँग्रेस ८५ जागा जिंकू शकेल व राष्ट्रवादी, अपक्ष यांच्या मदतीने सत्ता स्थापण करु शकेल.
खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्यात आहे ,कागदी वाघाच्या फुकाच्या डरकाळ्या चालू आहेत.
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Sun, 10/05/2014 - 09:07
नवीन
अहो गुर्जी ज्या ठाम पणे तुम्ही गोष्टी मांडता त्याच कौतिक वाटत राव .. पण अगदी काही महिन्यांपुर्वी पुर्वी
"मोदी पंतप्रधान होणार नाहीत , अस्थिर लोकसभा येऊन 2017 ला मोदी पंतप्रधान होतील"
अस काहीस म्हटल होत तेंव्हा सुधा कवतिकच वाटल होत बर..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 10/05/2014 - 17:16
नवीन
२०१३ मध्ये असे वातावरण होते की २०१४ च्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होईल परंतु बहुमतापासून बराच लांब राहील. २०१४ सुरू झाल्यावर परिस्थितीत खूप बदल झाला. भाजपने बिहार, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उ.प्र., महाराष्ट्र इ. राज्यात नवीन मित्रपक्ष मिळवून स्वतःच्या व रालोआच्या मतात भर घातली. त्यामुळे व माध्यमे आणि राजकीय पंडीतांच्या अपेक्षेपेक्षा खूपच मोठी मोदी लाट आल्याने भाजपला स्पष्ट बहुमत मिळून मोदी पंतप्रधान झाले. जर रालोआला २५० किंवा त्याच्या पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान न होता अडवाणी किंवा सुषमा स्वराजांना संधी मिळाली असती.
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 10/03/2014 - 10:52
नवीन
क्लिंटन यावर लेख लिहिणार आहेत काय? लिहिल्यास उत्तम.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 10/03/2014 - 11:07
नवीन
मी त्यांच्याच लेखाची आतुरतेने वाट पहात आहे.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 10/03/2014 - 13:32
नवीन
प्रूथ्विराज चव्हाणांना पुढे करून कॉन्ग्रेस सर्वात जास्त जागा जिंकेल असे दिसते आहे. तब्बल १५ वर्षांनी सत्ता मिळण्याचा चान्स विरोधकांना होता. सेना नेत्यांचे ईगो व राज्य भाजपाचे लिंबु टिंबु नेतृत्व त्यास कारणीभूत होय.
मनसेची ती ब्ल्यु प्रिंट एवढी मोठी आहे की ती वाचून पूर्ण होईस्तोवर निवडणूक संपेल.पण अनेक तरूणांना मनसे आशावादी वाटते. राष्ट्रवादीचे नेते निवडणूकीनंतर पक्षाचे नामकरण तालुकावादी कॉन्ग्रेस करतील असे हे विनोदाने म्हणतात.आमचा अंदाज-
कॉन्ग्रेस
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी
तुमचे ते दलित रिपब्लिकन्,डेमोक्रॅट्स वगैरे
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 10/03/2014 - 14:26
नवीन
आपल्या राज्यात निवडणुक असल्याने हरयाणामधील निवडणुकांकडे फारसे लक्ष दिले नव्हते.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्या नंतर ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी लिहिले होते की विविध निवडणुकपूर्व अंदाज व्यक्त करणार्यांनी तोंडघशी पडू नये म्हणून भाजप व रालोआला हातचे राखून जागा वर्तवल्या होत्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतही मला असेच वाटत आहे. या अंदाजांवर लोकसभा निवडणुकीच्या चुकलेल्या अंदाजंचा प्रभाव पडल्यासारखा वाटत आहे. सेना व भाजपच्या जागांमध्ये फारसा फरक असणार नाही व दोहोंमध्ये प्रथम क्रमांकासाठी चुरस असेल असा माझा अंदाज आहे.
भाजपच्या युती तोडण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी व मनसे यांची अस्तित्वासाठीची लढाई सोपी झाली.
१९९९ च्या निकालांनंतर उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर सत्ता नको या धोरणापायी भाजपने नकळत राष्ट्रवादीच्या प्रगतीला हातभार लावला. १९९९ ते २००४ या काळात राष्ट्रवादीला राज्यातली सत्ता मिळाली नसती तर कदाचित आज ते अस्तित्वातही नसते.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 10/03/2014 - 14:38
नवीन
झी २४ तासच सर्वे हास्यास्पद आहे.खासकरून विभागवार जागा गंडलेल्या आहेत. शिवसेनेला मुंबई, ठाणे, कोकणात अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा दाखवल्या आहेत.भाजपलाही विदर्भात फक्त १९ जागा दिल्यात. कॉंग्रेस एन्सीपीवर लोकांचा प्रचंड राग आहेच मात्र राज्य भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व गुजराथी शहा आणि मोदी ठरवणार काय? राज्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष असेल. निवडणुकीनंतर सेना भाजप एकत्र येवून सरकार बनवू शकतात. सेनेने शंभरी ओलांडली तर सेना+ माणसे+ छोटे पक्ष (शेकाप वगैरे) एकत्र येवूनही सरकार बनू शकतात मात्र जास्त शक्यता शिवसेना-भाजप अशीच आहे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 10/03/2014 - 14:39
नवीन
सेना+ मनसे+ छोटे पक्ष (शेकाप वगैरे) एकत्र येवूनही सरकार बनू शकतात
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sat, 10/04/2014 - 02:48
नवीन
या सर्वे मुळे येत्या दहा बारा दिवसातील मोदींच्या भाषणांच्या परिणामांचे मुल्यमापन करण्यासाठी महत्वाचा असा baseline data मिळाला आहे.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 10/04/2014 - 13:32
नवीन
शिवसेनेवर टीका टाळून भाजपा शिवसेननेला हे दाखवून देणार की तुम्ही रिजनल पार्टीच आहात. तेंव्हा जास्त्य हुस्श्यारी करायची नाय. राज ठाकरेंचे काय सांगावे ? त्यानीच सर्वांची मोठी फसवणूक केल्याची भावना मला अनेकानी बोलून दाखविली आहे. भ्रष्टाचारावर ते कमी बोलतात .शासकीय गोंधळाची उदाहरणे देतात पण पुराव्यासह भ्रष्टाचार सिंद्ध करणारी कोणतीही यंत्रणा त्यांचाकडे नाही शिवसेनेकडेही नाही. आपण काही पुरावे समोर आणले तर आपलेही पुरावे येतील अशी भीति त्याना( दोघाना) वाटत असावी. भाजपाला पूर्ण बहुमत अशक्य आहे. पण भाजपाचा आलेख उत्तरोत्तर भारतासह महाराष्ट्रात वाढता राहील.बाकी माय मराठी म्हाराष्ट्र भवानी आई माताभगिनी अशा शब्दानी १४४ जागा मिळणे जसे भावाना अशक्य तसे सतत शाहू आंबेडकर, फुले असे बडबडून १४४ जागा कॉग्रेस व राका ला ही अशक्य ! लोकाना
कांदा व बटाटा इतका महाग का याचे उत्तर मात्र कोणीच द्यायला तयार नाही. ( खरे उत्तर असे आहे की त्या भावाला कांदे बटाटे सहज विकत घेणारा एक नव श्रीमत मध्यमवर्गीय समाज वाढतो आहे ! )
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sat, 10/04/2014 - 18:49
नवीन
आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांची खालील आशयाची मुक्ताफळे ऐकली किंवा वाचली आहेत.
-कावळे पळाले शूर मावळे उरले
-कुतुबशाही- आदिलशाही यांचा विमोड करू
-ते औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकून आमच्या पाठीत खंजीर खुपसतात
- मतांच्या वाघनखाने विरोधकांचे कोथळे बाहेर काढतील- वगैरे
यावरून उधोजीराव आणि शिवसैनिक हे कोणत्या जमान्यात वावरत आहेत या विषयी संभ्रम निर्माण होतो.
- Log in or register to post comments
श
शिद
Sat, 10/04/2014 - 20:15
नवीन
अगदी अगदी.
हि आजची बातमी: ५ वर्षाची जुनी युती तोडणा-यांना आम्ही भांडी घासायला लावू.
महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलायाचं सोडून हे कागदी वाघ पोकळ डरकाळ्या मारत आहेत. सेनेच्या बाळ राज्यांचं पण तोंड हल्ली भलतंच सुटायला लागलं आहे.
- Log in or register to post comments
श
शिद
Sat, 10/04/2014 - 20:17
नवीन
सेनेच्या बाळ राज्यांचं पण तोंड हल्ली भलतंच सुटायला लागलं आहे.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sat, 10/04/2014 - 13:45
नवीन
जागा आरामत जिंकेल. मनसे,रिपब्लिक,स्वाभिमानी व इतर सरकार स्थापनेला भाजपाला मदत करतील. कॉग्रेस महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष असेल. सेना आपल्या फुटणार्या मावळ्याना सांभाळावे कसे ह्यात दिवस काढेल.राकॉ ह्याना आत्मपरिक्षण करण्यास ५ वर्षाचा वेळ मिळेल.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 10/05/2014 - 02:18
नवीन
शिवसेना बहुधा जास्त दुखावली गेली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या भाषणात भाजपावर जरा जास्तच टीका असते. भाजपाचे सर्व उच्चपदस्थ नेते युती तुटल्याचे दु:ख व्यक्त करतात पण आता प्रचाराला लागतो. आघाडी हा जास्त मोठा प्रतिस्पर्धी आहे असे आवर्जून सांगतात. त्यांच्या बोलण्यात शिवसेनेवर फार टी़का नसते. कदाचित लोकांना भाजपाची पद्धत जास्त आवडेल. वेळ इतका कमी असल्यामुळे शिवसेना आपल्या प्रचारात आपण काय करू, सद्य सरकारने काय दिवे लावले ह्यावर भर द्यायला हवा. भाजपा कसा वाईट हे सांगून काँग्रेस व राकॉचाच फायदा होण्याची शक्यता.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sun, 10/05/2014 - 06:59
नवीन
ठाकरे कुटुंबियांचे नोकर चालवतात काय असा प्रश्न पडला आहे. मिलिंद नार्वेकर हा उध्दव ठाकरेचा खाजगी सचिव व संजय राऊत हा सामना संपादक ह्याना किती अमर्याद अधिकार आहेत ह्याची कल्पना येत नाही. जो जो शिवसेनेतुन बाहेर पडतो तो तो मिंलिदबद्दलच बोलत बाहेर पडतो. इकडे संजय राऊत महाराष्ट्र पौराणिक काळात असल्यासारखे टुकार सीग्रेडचे अग्रलेख लिहुन डोके भडांवुन सोडतात.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Sun, 10/05/2014 - 07:06
नवीन
आणि खुद्द श्री. उद्धव ठाकरे यांची भाषणे/पत्रकारपरिषद/ मुलाखती (गेल्या दोन आठवड्यामधील) यू-ट्यूबवर पाहिली...
हसावं की रडावं हे कळेना!!!
:) की :(
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 10/05/2014 - 08:19
नवीन
अगदी हेच म्हणते. ४०-५० वर्षापूर्वीची बाळासाहेबांच्या सभा, असलाच प्रकार होता.त्यांचे चाहते(आमचे "हे" ही त्यात) त्याला चौफेर टोलेबाजी,खरपूस समाचार म्हणत.
अर्थकारण्,शेतीचे प्रश्न,बेरोजगारी,नोकर्या हे सगळे सत्ताधार्यांनी पाहून घ्यायचे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sun, 10/05/2014 - 11:54
नवीन
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला तयार नाहीत. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत. मुंडे गेल्यावर भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. आताचे जे नेते आहेत ते शहा- मोदींकडे पाहून निर्णय घेतील म्हणून पंतप्रधान आता जिल्हा-तालुका ठिकाणी जावून सभा घेत आहेत. मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे. पृथ्वीराज जसे सोनिया दरबारी चकरा मारायचे तसाच प्रकार भाजपकडून होईल. राष्ट्रवादीतून भ्रष्ट नेते आयात करून भाजपला पक्ष वाढल्याचा भास होत आहे.भाजपवाले त्यांचे बिभीषण म्हणून समर्थन पण करत आहेत. हरियानात डीपी यादव (नितेश कटाराचा खुनी विकास यंदाचा पिता) हा गुंड, बाहुबली अमित शहाण्बरोबर सतेज शेअर करत फिरतो आहे. भाजपला सत्तेची हाव आहे मात्र आव असा की आमच्यासारखेच शुद्ध कुणीच नाही.लोकसभेचे चित्र वेगळे होते. तेव्हा मोदींनी अध्यक्षीय निवडणुकीसारखे चित्र बनवून फायदा घेतला. आता तसे चित्र नाही १०० दिवसातला कारभार बघून लोक पण जमिनीवर आले आहेत. विधानसभेत स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात. मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sun, 10/05/2014 - 19:26
नवीन
चालू दे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 10/05/2014 - 17:07
नवीन
>>> मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.
-१
भाजपच्या जन्मापासूनच (एप्रिल १९८० पासून) महाराष्ट्रातील भाजपचा जनाधार शिवसेनेच्या तुलनेत जास्त होता. १९८० च्या निवडणुकीत भाजपचे स्वबळावर महाराष्ट्राच्या विविध भागातून १२ आमदार निवडून आले होते. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ इ. सर्व भागातून भाजपचे १-२ आमदार निवडून आले होते. शिवसेना ज्या मुम्बई-ठाणे भागाला स्वतःचा बालेकिल्ला समजते, त्या भागातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नव्हता तर भाजपचे २-३ आमदार जिंकले होते. त्याच निवडणुकीत राज्यात शिवसेनेला ० जागा मिळाल्या होत्या.
अगदी १९८५ च्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे १६ तर शिवसेनेचा फक्त १ आमदार निवडून आला होता. १९८९ मध्ये भाजपशी युती झाल्यानंतरच महाराष्ट्रात शिवसेनेचा विस्तार झाला व जास्त आमदार निवडून यायला सुरूवात झाली. शिवसेनेला फक्त मुंबई-ठाण्यातील थोड्या मराठी बहुल भागात अस्तित्व होते तर भाजपला त्याच काळात महाराष्ट्राच्या सर्व भागात थोडातरी जनाधार होता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 10/05/2014 - 17:24
नवीन
बादवे, या निवडणुकीत विनोदमूर्ती केजरीवाल व त्यांचा पक्ष कोठे आहे? प्रचाराच्या गंभीर वातावरणात त्यांच्या मर्कटलीला वातावरणातला ताण हलका करतात. अरविंद, वी मिस यू.
- Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे
Sun, 10/05/2014 - 19:16
नवीन
समानशिले व्यसनेशू सख्यम् असा प्रकार नाही ना गुरुजी तुमचा!
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sun, 10/05/2014 - 17:47
नवीन
तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे शरद पवारांच्या पुलोदमध्ये होता.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/06/2014 - 10:44
नवीन
>>> तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे शरद पवारांच्या पुलोदमध्ये होता.
१९८५ मध्ये भाजप, जनता पक्ष, समाजवादी काँग्रेस व शेकाप या ४ पक्षांनी एकत्र येऊन पुलोद बनविले होते. भाजपचे १९८० मध्ये फक्त स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते तर १९८५ मध्ये पुलोदमध्ये राहून १६ आमदार निवडून आले होते. त्यामुळे पुलोदमुळे भाजपला फक्त ४ जागांचा फायदा झाला होता.
- Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे
Sun, 10/05/2014 - 19:23
नवीन
1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद पवार व प्रमोद महाजन एकत्र आले होते व सेनेला एकटे पाडले होते. पवारांच्या कृपेने भाजपच्या १६ जागा आल्या होत्या.शेवटी भाजप पवारांच्या कृपेने दोन आकड्यात गेला आणि आज त्यांनाच टारगेट करतोय.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/06/2014 - 10:53
नवीन
>>> 1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद पवार व प्रमोद महाजन एकत्र आले होते व सेनेला एकटे पाडले होते. पवारांच्या कृपेने भाजपच्या १६ जागा आल्या होत्या.शेवटी भाजप पवारांच्या कृपेने दोन आकड्यात गेला आणि आज त्यांनाच टारगेट करतोय.
साफ चूक. १९८० मध्येच भाजपचे फक्त स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते. कोणाचीही कृपा नसताना फक्त स्वबळावर भाजपच्या दोन आकडी जागा होत्या. पुलोदमुळे त्यात फक्त ४ जागांची भर पडली.
सेनेला पुलोदमध्ये घेतले नव्हते कारण इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेला अजिबातच जनाधार नव्हता. शिवसेनेला घेतले असते तर तेव्हा सुद्धा मायभवानीची आण, मर्द मराठा, शूर मावळे असले इतिहासकालीन शब्द वापरून शिवसेनेने ४०-५० जागांचा हट्ट धरला असता आणि त्यापैकी जेमतेम १-२ जण निवडून आले असते. पवार व इतर पक्ष हे ओळखून होते म्हणूनच अजिबात जनाधार नसलेल्या शिवसेनेला पुलोदमध्ये घेतले नव्हते. त्यावेळी रागावलेल्या शिवसेनेचा स्वबळावर फक्त १ आमदार निवडून आला होता. शिवसेनेला पुलोदमध्ये ने घेण्याचा निर्णय योग्य होता हे शिवसेनेच्या कामगिरीवरून सिद्ध झाले होते.
बादवे, भाजप पवारांच्या किंवा इतर कोणाच्याही कृपेने २ आकड्यात गेला नव्हता. डिसेंबर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत इतर सर्व पक्षांचे अक्षरशः पानिपत झाले होते. देशात काँग्रेसला ४१४ जागा व महाराष्ट्रात ४८ पैकी तब्बल ४३ जागा मिळाल्या होत्या. जेमतेम ३ महिन्यात मार्च १९८५ मध्ये विधानसभेची निवडणुक होती. याही निवडणुकीत सर्व पक्षांचे व आपल्या पक्षाचे सुद्धा पानिपत होईल व स्वतंत्र लढलो तर काँग्रेसला कमीतकमी २५० जागा मिळतील व इतर सर्व पक्षांना एक आकडी जागा मिळतील हे ओळखून पवार व इतर ३ पक्ष एकत्र येऊन पुलोद स्थापन केले होते. त्यामुळे मतांचे विभाजन टळून काँग्रेसला १६० व पुलोदला १०४ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी एकत्र येणे ही सर्व विरोधी पक्षांच्या अस्तित्वाची गरज होती. जशी भाजपला गरज होती, तितकीच गरज पवारांना व जनता पक्षालाही होती. त्यामुळे कोणीही कोणाच्या कृपेवर नव्हते.
- Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे
Mon, 10/06/2014 - 11:20
नवीन
राम मनोहर लोहियांच्या आंदोलनाचा फायदा जनसंघाला झाला होता, 77ला जनता पार्टीचे सरकार आले त्यात जनता दल काँग्रेसचे काही अवतार समाजवादी अगदी कम्युनीस्टांचेही योगदान होते. जनसंघाने आपली विचारधारा गुंडाळुन यांच्या बरोबर जायचे ठरवले व लोहिया पर्वात हात धुवुन घेतले. त्यामुळे राज्यात भाजपच्या १९८०ला बारा जागा येऊ शकल्या ,कारण सेक्युलर मते मिळाली.
२०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/06/2014 - 13:27
नवीन
अहो आण्णा आणि कंपनीने त्या दाढीवाल्या रामदेव बाबाची लाट पळवली. :-) बाकी चालूद्या.
- Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे
Mon, 10/06/2014 - 13:49
नवीन
काँग्रेसविरोधी लाटेचा दाढीवाल्याला फायदा झाला.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/06/2014 - 13:50
नवीन
खिक्क्
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Mon, 10/06/2014 - 15:41
नवीन
२०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते.
म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार जी लाट केजरीवाल आणि कं. ने आणली, तिचा त्या केजरीवालच्या पक्षालाच अजिबात फायदा न होता, भाजपला झाला!! क्या बात है!!
काँग्रेस पक्षही अशाच धुंदीत पुढील काही काळ राहो, म्हणजे त्याचा नायनाट तो पक्ष स्वतःच करील, अशी त्या गणरायाच्या च्ररणी प्रार्थना करून, 'घाशीराम' मधील एक तराना येथे उर्धृत करतो:
तनाना तनाना तनाना धीं तनन देरे ना, एक तेचि नाना,
धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब तनाना...
तेव्हा आम्ही सर्व तनाना आहोत, साहेब! आपण एक तेचि नाना!!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/06/2014 - 17:37
नवीन
>>> राम मनोहर लोहियांच्या आंदोलनाचा फायदा जनसंघाला झाला होता, 77ला जनता पार्टीचे सरकार आले त्यात जनता दल काँग्रेसचे काही अवतार समाजवादी अगदी कम्युनीस्टांचेही योगदान होते. जनसंघाने आपली विचारधारा गुंडाळुन यांच्या बरोबर जायचे ठरवले व लोहिया पर्वात हात धुवुन घेतले. त्यामुळे राज्यात भाजपच्या १९८०ला बारा जागा येऊ शकल्या ,कारण सेक्युलर मते मिळाली.
नाना, जरा अभ्यास वाढवा हो. तुमचा इतिहास-भूगोल अगदीच कच्चा आहे. मॅट्रीकच्या परीक्षेत किती मार्क पडले होते हो तुम्हाला या विषयात?
उगाच नेहमीप्रमाणे काहीच्या काही फेकू नका. राम मनोहर लोहिया १९६७ मध्येच गेले. आणिबाणी १९७५-७७ या काळात होती. १९७७ ला आणि नंतर १९८० ला कुठुन आले लोहियांचे आंदोलन? तुम्ही प्रत्येक धाग्यावर फेकाफेकी करता आणि तुमची फेकाफेकी उघडकीला आली की माती खाता. या धाग्यावरही तुम्ही माती खाल्लीत.
>>> २०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते.
केजरीवालांच्या लाटेचा केजरीवालांना फायदा न होता भाजपला कसा झाला हो? आपल्या लाटेवर स्वार होऊन निदान केजरीवाल तरी जिंकायला हवे होते ना?
- Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे
Mon, 10/06/2014 - 17:50
नवीन
माफ करा ,लोहिया नव्हे जयप्रकाश नारायण. जेपी मुवमेंट असे वाचा.क्षमस्व.
ADMIN उपरोक्त माझ्या कमेंटमध्ये लोहिया ऐवजी जयप्रकाश नारायण असे करावे.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Sun, 10/05/2014 - 19:34
नवीन
http://jagatapahara.blogspot.com/2014/10/blog-post_4.html
८० च्या दशकातील शिवसेना भाजप आणि पवार यांच्या राजकारणाचा आढाव घेणारा भाऊ तोरसेकर यांचा लेख वाचनीय आहे.युतीचा फायदा सेनेपेक्षा भाजपलाच जास्त झाला हे त्यांचे निरीक्षण आहे.
.
आजही शिवसेनेचे संघटन मुंबई,ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात बर्यापैकी मजबूत आहे.बहुरंगी लढतीत शिवसेनेलाच या भागात जास्त फायदा होईल. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात चारही पक्षांना जवळपास सारखी संधी आहे (कॉंग्रेस एनसीपीला जर जास्त आहे). विदर्भात प्रामुख्याने भाजप कॉंग्रेस मध्येच लढत होईल.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Mon, 10/06/2014 - 05:34
नवीन
विदर्भाबाबत जरा असहमत.
पश्चिम विदर्भात व पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात सेनेचे चांगले बस्तान आहे. गेल्या तीनही लोकसभा निवडणुकांत सेनेने चांगले यश मिळवले. परंतु विधानसभांमध्ये मात्र सेनेला तेवढे यश मिळाले नाही. या भागांतील शेतकर्यांसाठी उद्धव ठाकरेंएवढा लढा कुणीही लढलेला नाही.
बाकी भाजपवर टिका करण्यामागे सेनानेतृत्वाची अशी रणनीती असू शकते.
गेल्या पंचवीस वर्षांपासून युती असल्यामुळे दोन्ही पक्षांची स्वतःचे स्वतंत्र व दोघांचे मिळून एकत्रित असे मतदारगट आहेत. केंद्रात भाजपचे बहुमत असणारे (रालोआ) सरकार नुकतेच आले असल्याने त्यांना त्याचा नैसर्गिक फायदा मिळून एकत्रित गटाची बहुतांश मते भाजपला मिळू शकतात. याउलट १९९९ सालानंतर सेनेजवळ राज्याची सत्ता नव्हती व केंद्रातही महत्त्वाचे खाते नव्हते. त्यामुळे एकत्रित मतदारगटाची मते स्वतःकडे वळवायची असल्यास भाजपवर टिका करणे क्रमप्राप्त आहे.
लोकसभा निवडणुकीतील उत्तुंग यशामुळे भाजपचे मतदार सुखावले असले तरी भाजप व त्यांच्या मातॄसंघटनेबद्दल कडवटपणा बाळगणारे अनेक मतदारगट आपल्या राज्यात आहेत. त्यांच्या जोरावरच काँग्रेस व राष्ट्रवादीचे गेल्या निवडणुकांतील निर्णायक यश अवलंबून होते. इतर कुणाला काहीही वाटो या मतदारगटाला भाजपचे आघाडीवर पोचणे आवडणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर कुणालाही मतदान केल्याने भाजपचे नुकसान होण्याऐवजी लाभच होणार आहे. या मतदार गटाने सेनेला मतदान केल्यास दोहोंसाठीही विन-विन परिस्थिती बनू शकते.
हे सर्व अंदाज किती बरोबर आहेत ते १९ तारखेला स्पष्ट होईल किंवा संमिश्र निकाल येऊन नेमके काहीही स्पष्ट होणार नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/06/2014 - 11:23
नवीन
भाउ तोरसेकर काही काळ 'सामना'त होते. त्यामुळे शिवसेनेविषयी त्यांना ममत्व वाटणे स्वाभाविक आहे. सेनेचा भाजपला फायदा झाला असे त्यांचे वैयक्तिक मत असले तरी आकडेवारीचे निष्कर्ष बरोब्बर उलटे आहेत.
शिवसेनेचा जन्म १९६६ मध्ये झाला. १९६७, १९७२, १९७८ व १९८० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. नाही म्हणायला १९६९ मध्ये एका पोटनिवडणुकीत सेनेचे वामनराव महाडीक आमदार म्हणून निवडून आले होते. तो एकमेव अपवाद. शिवसेनेचे अस्तित्व फक्त ठाणे व मुंबईतल्या काही ठराविक भागात होते. ठाणे/मुंबईच्या बाहेर शिवसेनेला अस्तित्व नव्हते. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभर व महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसची प्रचंड लाट होती. महाराष्ट्रात त्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे ४८ पैकी ३९ खासदार निवडून आले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेने इंदिरा काँग्रेसशी युती केली होती व मुंबईत २ जागा लढल्या होत्या. इंदिरा काँग्रेसची प्रचंड लाट असून, मुंबईत लढत असून व इंदिरा काँग्रेसबरोबर युती असूनसुद्धा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पडले होते. त्यामुळे मुंबईत सुद्धा सेनेला फारसे अस्तित्व नाही हे सिद्ध झाले.
१९८० च्या एप्रिलमध्ये गुढीपाडव्याला भाजपची स्थापना झाली. लगेचच दीड महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक झाली. त्यात शिवसेनेचे शून्य व भाजपचे स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते. आपला बालेकिल्ला समजला जाणार्या मुंबई/ठाण्यात सुद्धा शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. याउलट भाजपने मुंबईत २, ठाण्यात १, कोकणात १, पुण्यात २, मराठवाड्यात १, विदर्भात ३-४ ठिकाणी आपले आमदार निवडून आणले होते. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या भाजपला, १४ वर्षे जुनी असलेल्या सेनेपेक्षा, जास्त भागात व तुलनेने जास्त पाठिंबा आहे हे तेव्हाच सिद्ध झाले होते.
नंतर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर जोशी व वामनराव महाडीक मुंबईतून भाजपच्या कमळ चिन्हावर लढले होते. जर शिवसेना भाजपपेक्षा जास्त मजबूत होती तर मग का ते भाजपच्या चिन्हावर लढले?
नंतर १९८५ मध्ये पुलोदमध्ये सामील झाल्यावर भाजप आमदारांची संख्या १२ वरून १६ वर गेली तर शिवसेनेने पहिल्यांदाच खाते उघडून त्यांचा फक्त १ आमदार निवडून आला होता. मुंबई/ठाण्याला आपला बालेकिल्ला समजणार्या सेनेला तिथल्या ५० हून अधिक जागांपैकी फक्त एका जागेवर जिंकता आले होते. शिवसेनेची ताकद अत्यल्प आहे हे तेव्हाच सिद्ध झाले होते. भाजपचीही फार मोठी ताकद नव्हती, पण भाजपला शिवसेनेच्या तुलनेत जास्त जनाधार होता व भाजपला महाराष्ट्राच्या सर्व भागात कमीअधिक प्रमाणात जनाधार होता.
१९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती झाल्यावर सेनेच्या आमदारांची संख्या १ वरून ५२ वर गेली तर भाजप १६ वरून ४२ वर पोहोचला. हे स्पष्ट आहे युती झाल्यामुळे सेनेला भाजपच्या तुलनेत दुप्पट फायदा झाला. सेनेने तब्बल १८३ जागा लढवून फक्त ५२ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने १०५ जागा लढवून ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २००४ पर्यंत हेच चित्र दिसले. भाजपच्या तुलनेत कितीतरी जास्त जागा लढवून सेना जेमतेम ८-१० जागा जास्त मिळवायची.
२००९ मध्ये तर हेही चित्र फिरले. तब्बल १६९ जागा लढून सेनेला फक्त ४४ जागा मिळाल्या तर ११९ जागा लढून भाजपने ४६ जागा मिळविल्या. म्हणजे १९७९-८० मध्येही सेनेच्या तुलनेत भाजपला जास्त पाठिंबा होता आणि २००९ मध्ये तीच परिस्थिती होती.
मागील आठवड्यात २-३ वृत्तपत्रात, १९९० पासूनच्या निवडणुकातील सेना-भाजप मतांची टक्केवारी आली आहे. १९९० पासून सातत्याने हे दिसले आहे की भाजप जिथे लढतो त्या मतदारसंघात भाजपच्या मतांची टक्केवारी ही शिवसेना ज्या ठिकाणी लढते त्या मतदारसंघांच्या तुलनेत किमान ५ टक्क्यांनी जास्त आहे. याचा सरळ अर्थ असा की जर समोरे शिवसेनेचा उमेदवार असेल तर किमान ५ टक्के मतदार सेनेच्या विरोधात काँग्रेस-राकाँला मते देतात आणि समोर भाजपचा उमेदवार असेल तर किमान ५ टक्के मतदार काँग्रेस-राकाँऐवजी भाजपला मते देतात.
याचे निष्कर्ष असे की (१) शिवसेनेच्या तुलनेत भाजपला जास्त मतदारांची पसंती आहे आणि (२) भाजपने शिवसेनेच्या तुलनेत जास्त जागा लढविल्या असत्या तर युतीचे जास्त आमदार निवडून आले असते.
अशा परिस्थितीत भाजपने जास्त जागा मागणे हे तार्किक आहे आणि आपल्याला भाजपपेक्षा जास्त पाठिंबा आहे आणि म्हणून आम्ही जास्त जागा लढणार हा शिवसेनेचा भ्रम आहे.
असो. घोडामैदान जवळ आहे. दोघेही आता स्वबळावर लढत आहेत. ज्या पक्षाला दुसर्या पक्षापेक्षा कमी जागा मिळतील त्याने निमूटपणे दुसर्याची ताकद मान्य करावी.
- Log in or register to post comments
द
दशानन
Sun, 10/05/2014 - 19:54
नवीन
तुम्ही कधी हरियाणा (NCR नाही) फिरला आहात?
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Mon, 10/06/2014 - 09:14
नवीन
राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चकरा माराव्या लागायच्या, मुक्काम ठोकून राहायला लागायचे.. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/06/2014 - 11:30
नवीन
>>> राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही.
राज ठाकरे म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का? आपल्या स्वतःच्या काकांचा विश्वासघात करून बाहेर पडलेल्या आणि कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना तर कधी भाजपला पाठिंबा देणार्या व त्यांचा पाठिंबा घेणार्या राज ठाकर्यांची विश्वासार्हता किती?
>>> मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.
हे नुसते हवेतले अंदाज आहेत.
>>> अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चकरा माराव्या लागायच्या, मुक्काम ठोकून राहायला लागायचे.. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको.
एवढे असूनसुद्धा महाराष्ट्रातील मतदारांनी काँग्रेसला का वारंवार सत्तेवर आणले?
>>> महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.
फारच थोड्या लोकांना शिवसेना किंवा मनसे हे पर्याय जवळचे वाटू शकतील.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Mon, 10/13/2014 - 07:06
नवीन
नसतील, राज ठाकरे हे ब्रम्हदेवाची वाणी नसतीलही, पण त्यानी उपस्थित केलेला प्रश्न अगदी योग्य आहे...
जर महाराष्ट्रातील जनता दिल्लीहून येणार्या आदेशावर नाचणार्या मुख्यमंत्र्यांना कंटाळली असेल तर भाजपाला मत देऊन आजच्या काळात त्या परिस्थीतीत कसा बदल घडणार आहे ते सांगा!!!!
भाजपाच्या कुठल्याही स्टेट लिडरची आज मोदी-शहांच्या समोर विरोधात काही बोलायची टाप नाही!
कशाला उगाच मत द्यायचं लोकांनी भाजपाला?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »