Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 10/02/2014 - 17:07
🗣 177 प्रतिसाद
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील. हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्‍या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय. कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती. महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे. शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्‍याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत. http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hung-assemblies-in-maharashtra-haryana-20499.html कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही. निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल. आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.

प्रतिक्रिया द्या
90462 वाचन

💬 प्रतिसाद (177)
श
श्रीगुरुजी Tue, 10/07/2014 - 07:57 नवीन
त्यांना मंत्रीमंडळातून काढल्याने मराठी मते का जातील? गीते एकटेच अखिल महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात असा तुमचा गोड गैरसमज झालेला दिसतोय. मंत्रीमंडळात इतर अनेक मराठी मंत्री आहेत. मोदींना शिव्या देताना शिवसेनेचच हसं होतंय. त्यांची जीभ अगदी सैल सुटली आहे, पण सत्तालोभामुळे दिल्लीत व मुंबई/ठाणे महापालिकेत भाजपशी संबंध तोडायची तयारी नाही. मोदींनी अत्यंत प्रगल्भपणा दाखवून, शिवसेनेवर अजिबात बोलणार नाही, असे सांगून केवळ २-३ वाक्यात भाजप आणि शिवसेनेत किती फरक आहे ते दाखवून दिलंय. शिवसेनेचे व मनसेचे सर्व नेते भाजपविरूद्ध कमालीचा थयथयाट व त्रागा करत असताना दोघांनाही मोदींनी अनुल्लेखाने मारून आपली प्रगल्भता दाखवून दिली. अर्थात यातून सेनेच्या व मनसेच्या नेत्यांना प्रगल्भता येण्याची सुतराम शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
काळा पहाड Tue, 10/07/2014 - 18:36 नवीन
गुरुजी, एक सल्ला आहे. जॉर्ज बर्नार्ड शाँच एक वाक्य असं आहे: “Never wrestle with pigs. You both get dirty and the pig likes it.” डुकरांशी कुस्ती खेळू नका. तुम्ही दोघेही घाणीने तर माखालच, आणि डुकराला तेच आवडतं. दुसरं जॉर्ज कार्लिनचं एक वाक्य असं आहे: “Never argue with an idiot. They will only bring you down to their level and beat you with experience.” मूर्खाबरोबर वादविवाद करू नका. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर उतरावं लागतं आणि मग ते तुमच्यावर अनुभवाने मात करतात. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रतापराव Fri, 10/10/2014 - 15:34 नवीन
वरती कला पहाड ह्यांनी इंग्रजी लोकांच्या म्हणी दिल्या आहेत छान आहे पण हा धागा काथ्याकुट मध्ये आहे काथ्याकुट होणारच आपल्या आवडत्या पक्षावर टीका झाली म्हणून खचून जावू नका काळा पहाड.. . चार नेत्यांचे चार समर्थक आपल्या पक्षाची बाजू मांडणारच. आता नेतेच पातळी सोडून एकमेकांवर शिव्यागाळ करतात तर मिपाकरांनी काय घोडे मारलेय... माझ्या मते भाजपला सर्वाधिक जागा मिळतील पण त्या ७० च्या घरात असतील ते राष्ट्रवादीची नि इतर छोट्या मोठ्या पक्षांची मदत घेवून सरकार बनवण्याची शक्यताच जास्त वाटतेय. भाजपा-७०, शिवसेना-४५,कॉंग्रेस-६५ राष्ट्रवादी-५४ मनसे-१५ बाकी इतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
च
चौकटराजा Tue, 10/07/2014 - 05:53 नवीन
अफझल खान हा दिल्लीहून कसा काय आला .....? बर आला तर तो भेट घ्यायला मिठी मारायला आला होता ना ? इथे तर २५ वर्षाची मिठी सैल झालेली दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पैसा Tue, 10/07/2014 - 10:20 नवीन
ही इथली शिवीगाळ बघता क्लिंटनसारखे लोक निवडणुकांबद्दल काही लिहितील असं वाटत नाही! =))
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 10/07/2014 - 12:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
श्रीगुरुजी Wed, 10/08/2014 - 10:43 नवीन
सट्टेबाजांचा अंदाज http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/bookies-predict-modis-late-entry-will-damage-bjp-maharashtra/articleshow/44692788.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 10/08/2014 - 20:11 नवीन
बुकींचा स्वतःचा पूर्ण अंदाज Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/09/2014 - 09:29 नवीन
हे अजून एका सर्वेक्षणाचे आकडे, Image removed. हा त्यावरील सविस्तर लेख http://www.lensonnews.com/lonspecial/1/2/15959/1/maharashtra-assembly-election-2014.html हे आकडे खरे होतील की खोटे यावर माझे काहीही मत नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/10/2014 - 11:49 नवीन
हे आकडे भाजप प्रणीत आहेत
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 18:42 नवीन
कालपासून अनेक सर्वेक्षणांचे आकडे आले आहेत. हे कालच्या सर्वेक्षणांचे आकडे Image removed. आणि हा त्यावरील लेख http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bjpallies-154-seats-election-maharashtra-survey/articleshow/44769595.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 19:06 नवीन
काल 'झी २४ तास' च्या दुसर्‍या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल - भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३ आताच पाहिलेल्या २ सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल. (१) एबीपी-नेल्सन भाजप - १२०, शिवसेना - ६७, काँग्रेस - ४६, राष्ट्रवादी - ३६, मनसे - ८ (२) इंडिया टीव्ही भाजप : १३२-१४२, शिवसेना : ५२-६२, काँग्रेस : ३८-४८, राकॉं : ३३-४३, मनसे : ७-१३ आतापर्यंत जे अंदाज आहेत त्यांच्यामुळे गोंधळ अजूनच वाढलेला आहे. सर्व सर्वेक्षणांमध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल व मनसे हा सर्वात लहान पक्ष असेल हा समान मुद्दा आहे. मात्र एकूण जागांचा अंदाज खूप गोंधळात टाकणारा आहे. भाजपला मिळणार्‍या जागांचा अंदाज ९६-१५४ इतक्या मोठ्या कक्षेमध्ये आहे. शिवसेना ३८-६७ हीदेखील मोठी कक्षा आहे. काँग्रेस २५-६३ आणि राकाँ १६-४३ हा देखील खूप मोठा फरक आहे. सर्वांनीच मनसेला २० च्या आत जागा दिल्यामुळे मनसे अदखलपात्र पक्ष आहे. एकंदरीत महाराष्ट्रात जागांचा अंदाज काढणे अत्यंत अवघड झाले आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 19:11 नवीन
हरयाना राज्यासाठी खालील अंदाज आजच प्रसिद्ध झाले आहेत. १) एबीपी-नेल्सन भाजप - ३६, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - ३३, काँग्रेस - १६, इतर - ५ (२) इंडिया टीव्ही भाजप - ३४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २७, काँग्रेस - १९, इतर - १० हरयानात काँग्रेसचा दारूण पराभव निश्चित दिसतो व भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. कोणालाच स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. भारालो व भाजप मध्ये कमालीची चुरस दिसते. बहुमतासाठी किमान ४६ जागांची गरज आहे. काँग्रेस, भाजप व भारालो यापैकी कोणतेही दोन पक्ष एकत्र आले तर ४६ चा आकडा पार होतो. परंतु असे होण्याची शक्यता शून्य आहे. अगदी अशीच परिस्थिती डिसेंबर २०१३ मध्ये दिल्लीत निर्माण झाली होती. हरयानादेखील दिल्लीप्रमाणे राष्ट्रपती राजवटीकडे निघाला आहे असे दिसत आहे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 10/11/2014 - 07:40 नवीन
हरियाणामध्ये भाजपला इतक्या जागा सर्वेक्षण देत आहे याचे खरोखरच आश्चर्य वाटत आहे.महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्ये भाजपपुढचा मोठा प्रश्न म्हणजे राज्य पातळीवरील सक्षम नेतृत्वाचा अभाव.पूर्वी सूरज भान हे पक्षाचे तसे बऱ्यापैकी मोठे नेते होते तरीही राज्यपातळीवर नेतृत्व देऊ शकत नव्हते.सुषमा स्वराजही अंबाल्यातून हरियाणा विधानसभेवर निवडून जात.त्या राज्यात थांबल्या असत्या तरी राज्यात पक्षाला नेतृत्व मिळाले असते.पण १९९० च्या दशकाच्या सुरवातीलाच त्या केंद्रीय राजकारण्यात गेल्या आणि राज्यापासून दूरच गेल्या.१९९६ मध्ये भाजपने बन्सीलाल यांच्या हरियाणा विकास पक्षाशी युती करून निवडणुक लढवली होती.त्यावेळी रामविलास शर्मा यांचे नेतृत्व राज्यात येईल असे दिसत होते.पण २००० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांचे नाव अनेक वर्षे कुठेच नव्हते.मागच्या वर्षी ते प्रदेशाध्यक्ष झाले.वाजपेयी सरकारमधील मंत्री आय.डी.स्वामी २००४ आणि २००९ मध्ये दणकून पराभव झाल्यानंतर आणि वाढत्या वयामुळे सक्रीय नाहीत. बाकी नाव घ्यावा असा कोणीच नेता पटकन डोळ्यासमोर येत नाही. विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि त्यासाठी स्थानिक पातळीवरचा चेहरा मतदारांपुढे ठेवावा लागतो.लोकांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नावाने मते दिली.परत विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्याच नावाने मते देतील का हा प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 19:22 नवीन
वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे मानले तर खालील शक्यता आहेत. (१) भाजप + शिवसेना असे होण्याची अगदी थोडीशीच शक्यता आहे. या दोन पक्षातील वितुष्ट इतके विकोपाला गेले आहे व विशेषतः शिवसेनेचा अहंकार इतका तीव्र आहे की हे दोघे पुन्हा एकत्र यायचे असतील तर शिवसेना जवळपास अशक्य अशा अटी पुढे ठेवेल व त्यामुळे ते एकत्र येणार नाहीत. (२) भाजप + राष्ट्रवादी किंवा भाजप + काँग्रेस - अशी युती होण्याची शक्यता शून्य आहे. (३) काँग्रेस + राष्ट्रवादी + शिवसेना - मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार व कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार या मुद्द्यांवरून प्रचंड भांडणे होऊन अशी आघाडी प्रत्यक्षात येणार नाही. तसेच काँग्रेस शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी व अमराठीविरोधी पक्षाबरोबर आघाडी करण्यास नक्कीच कचरेल. विशेषतः शिवसेनेच्या उत्तर भारतीय व बिहारींविरूद्ध असलेल्या भूमिकेमुळे व २०१५ मध्ये होणार्‍या झारखंड व बिहार विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस शिवसेनेबरोबर आघाडी करणार नाही. (४) जर भाजप १४५ च्या खूप जवळ पोहोचला (१३० पेक्षा जास्त) व मनसेला १५ च्या आसपास जागा असतील तर कदाचित ते दोघे एकत्र येऊ शकतात. परंतु उद्धवप्रमाणेच राज ठाकरेचा अहंकार अत्यंत तीव्र आहे व तो अत्यंत बेभरवशाचा असल्यामुळे अशी युती झाली तरी ती टिकणार नाही. (५) त्यामुळे जर कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊन वर्षभरात पुन्हा निवडणुक होईल.
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Fri, 10/10/2014 - 20:23 नवीन
माझा अंदाज भाजप ९० ९५ शिवसेना ७० ७५ काँग्रेस ५० ५५ राष्ट्रवादी ३५ ४० आरपीआय रासप स्वा शे १५ १७ मनसे १० १५ ईतर १५ २०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
क्लिंटन Sat, 10/11/2014 - 08:55 नवीन
वेगवेगळी सर्वेक्षणे भाजपला २८-३०% मते देत आहेत.चौरंगी-पंचरंगी लढतीत २८-३०% मते २८८ पैकी ११०-१२० जागा नक्कीच देऊ शकतील.त्यातही भाजपची मते ही अधिक concentrated असतात त्यामुळे तेवढीच मतांची टक्केवारी असूनही पक्ष जास्त जागा मिळवू शकतो.मला वाटते की शिवसेनेने काही अक्षम्य चुका केल्या आहेत त्याचा फायदा भाजपला मिळून भाजप ११०-१२० जागा मिळवू शकेल. १. युती तुटल्यापासून शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपलाच लक्ष्य बनवत आहे.राज ठाकरेही कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य बनवित आहेत पण त्याचबरोबर मोदी हे पण टार्गेट आहेतच. तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीही शिवसेनेपेक्षा भाजप आणि मोदींवरच टिका करत आहेत. त्यामुळे असे चित्र हळूहळू उभे राहत आहे की ही निवडणुक विधानसभेची असली तरी आघाडी सरकारच्या कामावरील मत यापेक्षा नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे असे स्वरूप येत आहे. असे स्वरूप येणे भाजपसाठी चांगलेच आहे.कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या लोकांच्या मतांना एकवटायला भाजप हाच मोठा पर्याय उभा राहिला आहे. इतर पक्षांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही मोदी हे मोठे शत्रू वाटतात असे लोकांना वाटले तर ते चुकीचे ठरू नये. २. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे तुकडे करणार इत्यादी गोष्टी शिवसेनेला दर निवडणुकीच्या वेळी आठवतात तशा यावेळीही आठवल्या आहेत.या सगळ्या गोष्टी बोलायला शिवसेनेबरोबरच राज ठाकरेही आहेतच. इतकेच काय तर नारायण राणेही रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईतून हलविणार इत्यादी गोष्टी बोलत होते. नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे हे धृवीकरण करण्यात या मंडळींनीच हातभार लावला आहे.एकतर स्वत: नरेंद्र मोदींनी तसे होणार नाही असे जाहीरपणे सांगितले.स्वतंत्र विदर्भावर मोदींनी सांगितल्यानंतरही संभ्रम होता.पण पक्षाच्या जाहिरनाम्यात स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख नाही.तसेच गेल्या १-२ दिवसात पक्षाचे स्वतंत्र विदर्भवादी वाचाळवीर थोडे शांत आहेत. या सगळ्यातून एकतर शिवसेनेच्या मुद्द्यातील हवा बरीच कमी झाली आणि या निवडणुकीला विनाकारण मराठी विरूध्द गुजराती असे स्वरूप दिले गेले आहे आणि ते दिले भाजपने नाही तर शिवसेनेने.निदान मुंबईत बोरीवली,पार्ले, घाटकोपर,मुलुंड या भागातून एकगठ्ठा गुजराती मते भाजपला मिळतील याची व्यवस्था शिवसेनेने त्यातून करून ठेवली आहे. ३. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देणे ही उध्दव ठाकरेंची अक्षम्य चूक आहे असे मी म्हणेन.चार-पाच महिन्यांपूर्वीच लोकांनी नरेंद्र मोदी या एका नावावर भरभरून मते दिली होती.कदाचित एप्रिल-मे इतका नसेल पण नरेंद्र मोदी या नावाचा दबदबा अजूनही लोकांमध्ये आहेच.त्यामुळे खास शिवसेना स्टाईल शिवराळ भाषेत नरेंद्र मोदींना अशी उपमा दिल्यामुळे मोदींविषयी सद्भावना असलेल्या निदान काही लोकांची मते भाजपलाच मिळतील अशी व्यवस्थाही उध्दव ठाकरेंनी करून ठेवली आहे. ४. निवडणुकीनंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार अशा स्वरूपाच्या बातम्या कालपरवापासून येऊ लागल्या आहेत.यातून शिवसेना-मनसेच्या पारंपारिक मराठी मतदारांमध्ये संभ्रम वाढणार आहे हे नक्की.मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी थोडेफार "तगडे" उमेदवार दिले आहेत. उदाहरणार्थ दहिसरमध्ये मनसेकडून माजी महापौर शुभा राऊळ विरूध्द शिवसेनेकडून विनोद घोसाळकर, मागाठाणेमधून मनसेकडून प्रवीण दरेकर विरूध्द शिवसेनेकडून (२००९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दरेकरांना चांगली टक्कर दिलेले) प्रकाश सुर्वे, दिंडोशीत मनसेकडून शालिनी ठाकरे विरूध्द शिवसेनेकडून महापौर सुनील प्रभू, वांद्रे पूर्व मधून मनसेकडून शिल्पा सरपोतदार विरूध्द शिवसेनेकडून प्रकाश (बाळा) सावंत इत्यादी.मुळातच या दोन तुल्यबळ उमेदवारांमधील निवडणुक आणि त्यात हे नंतर एकत्र आले तर काय हा संभ्रम. अशा वेळी या दोन पक्षांना मानणाऱ्या मराठी मतांमध्ये उभी फूट पडून त्याचा फायदा इतरांना मिळायची शक्यता जास्त. तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त.राज ठाकरेंचा उत्तर भारतीय विरोध आणि शिवसेनेचा गुजराती विरोध यातून हे दोन समुदाय हे दोन्ही पक्ष ज्याला विरोध करत आहेत त्या पक्षाकडे--भाजपकडे वळायची शक्यता जास्त. मुंबई परिसरात अमराठी मतांची संख्या बरीच आहे आणि या परिसरात शिवसेना-मनसे यांच्यात मतविभागणी होणार असेल तर भाजपची वाट आणखी सोपी होईल.काही प्रमाणात कॉंग्रेसलाही याचा फायदा होईलच. ५. सीमेवर गोळीबार चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात काय करत आहेत म्हणून हाकाटी इतर सगळ्या पक्षांनी केली.अशा प्रकारचा प्रचार ही एक दुधारी तलवार असते. कालपासून सीमेवरील गोळीबार थंडावला आहे, भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे--त्यांनी एक गोळी मारली तर तुम्ही तीन गोळ्या मारा हे आदेश होते हे महाराष्ट्र टाईम्समध्ये आले आहे. तसेच लंडनमधील एका वर्तमानपत्रात असेही आले आहे---"The volume and intensity of India’s return fire is much higher than the usual calibrated response the Pakistanis have come to expect." याचा अर्थ आजपर्यंत भारत अशा आगळिकींना हातचे राखून प्रत्युत्तर देत असे पण यावेळी आपण जोरदार उत्तर दिले आहे. अर्थातच सामान्य मतदार मत देण्यापूर्वी लंडनमधील वर्तमानपत्रे वाचायला जाणार नाही.पण सीमेवर शांतता किमान मतदानापर्यंत टिकत असेल आणि पाकिस्तानकडून गोळीबार बंद होत असेल (एका अर्थी पाकिस्तानने माघार घेतली असेल) तर ते मतदारांना नक्कीच समजते. हा मुद्दा विधानसभा निवडणुकांमध्ये यायची खरं म्हणजे फारशी गरज नव्हती.पण तो आणला कोणी? शिवसेना-मनसे आणि कॉंग्रेसने.बदललेल्या परिस्थितीचा फायदा भाजपला नाही झाला (किंवा असा फायदा उठवायचा प्रयत्न भाजपकडून झाला नाही) तर नवलच. एकूणच काय की विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवायला स्थानिक चेहरा लागतो हा माझा अत्यंत आवडता hypothesis आहे. या फ्रंटवर निवडणुक लढविली गेली असती तर भाजप नक्कीच अडचणीत आला असता. पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला. अर्थातच भाजपला लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यश मिळेल असे मला स्वत:ला नक्कीच वाटत नाही.तरीही ११०-१२० जागांपर्यंत जायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Sat, 10/11/2014 - 09:14 नवीन
क्लिंटन सर, तुमच्या विश्लेषणाची वाट पाहत होतोच. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
शिद Sat, 10/11/2014 - 09:43 नवीन
+१०० क्लिंटन साहेब, तुमच्याकडून देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अंदाजांवर एखादा लेख येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
श
श्रीगुरुजी Sat, 10/11/2014 - 09:36 नवीन
विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! शिवसेनेच्या मनात भाजपविषयी इतका विखार भरला असेल याची २५ सप्टेंबर पूर्वी अजिबात कल्पना नव्हती. आपले वाढते सामर्थ्य ओळखल्यामुळेच भाजपला ११९ पेक्षा जास्त जागा लढवायच्या होत्या. त्यामुळेच सुरवातीला भाजपने १३५+१३५+१८ असे सूत्र आणले होते. कालांतराने भाजप १३०+१४०+१८ इतका खाली आला. शेवटी १२५+१४५+१८ या सूत्रावर भाजप तडजोडीला तयार झाला असता. परंतु उद्धमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. १५१ च्या पेक्षा खाली यायची सेनेची तयारीच नव्हती. मोदींची लोकप्रियता, भाजपचे वाढलेले सामर्थ्य, भाजपच्या बाजूने वळलेले जनमत, भाजपच्या बाजूने असलेला सर्व मित्रपक्षांचा कल, आपले घटलेली ताकद या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपला १५१ जागांचा हेका सेनेने चालूच ठेवला व त्यामुळे शेवटी भाजपला वेगळा मार्ग धरावा लागला. युती तुटली ही संधी समजून त्यानुसार आपली ताकद वाढवायची संधी सोडून सेनानेते भाजप व मोदींवर आणि मोदींचा उजवा हात असलेल्या अमित शहांवर तुटुन पडले. त्यांच्याविरूद्ध अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरून रोज त्यांचा उद्धार सुरू झाला. स्वत:ची व्हिजन, आघाडी सरकारची अकार्यक्षमता व भ्रष्टाचार, स्वतःच्या विकासाच्या योजना इ. वर जनतेला सांगण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचे वर्णन करण्यात व त्या घटनांची सांगड भाजपशी घालून त्यांना व्हिलन ठरविण्यातच सेनेचे बहुतांशी वेळ वाया घालविला. निव्वळ भाजप नव्हे तर इतर मित्रपक्षांवरही सेनेने तोंडसुख घेऊन भविष्यात ते आपल्याला मदत करणार नाहीत अशीच व्यवस्था करून ठेवली. त्याचे परीणाम सेनेला भोगावे लागणार आहेत. वास्तविक १२५+१४५+१८ हे सूत्र भाजपवर उपकार केल्यासारखे व आपण फार मोठा त्याग करत असल्यासारखे दाखवून सेनेने स्वीकारायला हवे होते. या सूत्रात सेनेची मोठ्या भावाची भूमिका कायम राहिली असती व स्वतःच्या ताकदीची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. तसेच भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवत असल्याने कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा मिळविण्याची संधी देखील मिळाली असती. कमी जागांवर तडजोड करताना महत्त्वाची मंत्रीपदे सेनेला घेता आली असती. परंतु आता स्वबळावर लढताना जर भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या (सर्वेक्षणाचे हेच अंदाज आहेत), तर आमची ताकद जास्त आहे हेच आम्ही सांगत होतो हे भाजपला सांगण्याची संधी मिळेल आणि आपल्या मोठ्या भावाची भूमिका सेना कायमची घालवून बसेल. >>> पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला. युती तुटल्यापासून सेनेने व्हाट्सअ‍ॅप व इतर माध्यमातून "मुंबई केंद्रशासित करणार, विदर्भ तोडणार, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुम्बईतून हलविले, इतर अनेक संस्था मुम्बईतून हलविणार" इ. अफवा सोडायला सुरूवात केली. त्या अफवांचे निराकरण करायला राज्यातील नव्हे तर केंद्रातील कणखर नेत्याची आवश्यकता होती. त्यामुळे प्रत्यक्ष मोदींनाच महाराष्ट्रात येऊन या अफवांचे निराकरण करावे लागले. त्यात भर म्हणून मोदींची तुलना अफझलखानाशी, अमित शहांची तुलना आदिलशहाशी करून सेनेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवून ठेवली. सेनेने सुरवातीपासूनच अत्यंत चुकीची पावले टाकली. भविष्यात पश्चाताप करून उपयोग होणार नाही. भाजपने सुरवातीपासूनच अत्यंत प्रगल्भ व संयमी धोरण ठेवून आपली मोट व्यवस्थित बांधली. सेनेचा व्यक्तिगत अहंकार, स्वतःच्या ताकदीविषयी अत्यंत अवास्तव व भ्रामक कल्पना, प्रचाराची असभ्य पातळी इ. मुळे सेनेला जोरदार फटका बसणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
नानासाहेब नेफळे Sat, 10/11/2014 - 09:56 नवीन
खोटे बोलायचं सोडा गुरुजी, मोदींनी राज्यातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत त्याविषयी चकार शब्द काढलेला नाही .गुजरातच्या सीएम आनंदीबेन इथे येऊन महाराष्ट्र भिकारी करणार्याची भाषा करतात त्यावर नरेंद्र मोदींनी एकही शब्द काढलेला नाही .विदर्भाविषयी भाजपच्या नेत्यांची एकवाक्यता नाही, एकंदर भाजपच्या सत्तापिपासु भुमिकेला साजेसं त्यांचं वर्तन चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रदीप Sat, 10/11/2014 - 12:09 नवीन
पूर्वी (म्हणजे ह्याच एकदोन धाग्यांच्या दरम्यान) तुम्ही अनेक आस्थापने (उदा. रिझर्व बँकेची काही खाती), काही सध्या कार्यरत असलेल्या गैर सरकारी कंपन्या, तसेच काही इथे होऊ घातलेली सरकारी आस्थापने महाराष्ट्राच्या बाहेर चालली आहेत, अशी हाकाटी केली होतीत. बराच आग्रह श्रीगुरूजींनी केल्यावर एकदोन भुरकट दुवे दर्शवलेत, ज्यातून असे काहीच सिद्ध झाले नाही. गैरसरकारी कंपन्यांचे म्हणाल तर, काही ठोस माहिती द्यावी. आणि मुख्य म्हणजे, जिथे असणे फायदेशीर आणि/अथवा कमी कटकटीचे असेल, तिथे ती जातील. त्यात गैर काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ह
हुप्प्या Mon, 10/13/2014 - 03:44 नवीन
प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्याचे हित बघतो असे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य ह्याबाबतीत मागे होते. पण पुढे ते बदलू शकेल. पण मुंबई व अन्य शहरे उद्योगाची केंद्रे आहेत. बाकी राज्यांनी इथे येऊन ह्या उद्योगांना आपल्या राज्यात येण्याचे आमंत्रण देणे, त्याकरता लालूच दाखवणे हे काही भाजपाप्रणित नाही. बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांनी असे मार्केटिंग केले आहे. त्यात काही चूक नाही. निरोगी स्पर्धा असेल तर प्रत्येक राज्य आपापल्या परीने त्या स्पर्धेत उतरणारच. आणि त्यात जो उत्तम सेवा, सुखसोयी पुरवेल तो जिंकणार हा जगाचा नियम आहे. भाजपाने ह्याविरुद्ध काही करावे अशी अपेक्षा चुकीची आहे. गुजराथचे मुख्यमंत्री उद्योगांनी आपल्या राज्यात यावे म्हणून आमिषे दाखवत असतील तर त्यांची इच्छा महाराष्ट्र भिकारी व्हावा हा जावईशोध कसा लावला बुवा? एखाद्या बँकेने गिर्‍हाईक पटवायला एखादी चमकदार जाहिरात केली तर त्यांची अशी इच्छा असते का की त्यांच्या प्रतिस्पर्धी बँकेने भिकारी व्हावे? नाही, दुसर्‍या बँकेने तोडीस तोड उत्तर दिले तर तसे होणार नाही. विदर्भ वेगळा असावा अशी भाजपाची भूमिका आहे. भारताच्या इतिहासात मोठी राज्ये तोडून छोटी राज्ये बनवण्याची अनेक उदाहरणे दिसतात. उलट उदाहरण एकही नाही तेव्हा भाजपाने वेगळ्या विदर्भाला समर्थन दिले तर काही आकाश कोसळत नाही. विदर्भ वेगळा करणे म्हणजे भारताचा लचका तोडून पाकिस्तान बनवला तशातला काही प्रकार नाही. छोट्या राज्याचे फायदे आहेतच. जनतेचा कल विचारात घेऊन तसे केले तर काही बिघडत नाही. निदान भाजपाचे लोक (फडणवीस वगैरे) उघडपणे "होय, आम्ही वेगळ्या विदर्भाचे समर्थक आहोत" असे सांगत आहेत. त्यात पाठीत खंजीर खुपसण्याचा काही प्रकार नाही. ह्या भूमिका खुल्या आहेत. लोकांना ते इतके खुपले तर त्यांना मते मिळणार नाहीत. अर्थात हा त्यांच्या जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल असे वाटत नाही. बाकी बर्‍याच समस्या आहेत ज्याबद्दल ते काय करणार हे लोकांना जास्त जिव्हाळ्याचे असेल. शिवसेना वा बाकी पक्षांनी त्याविरुद्ध आकांडतांडव करु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Sat, 10/11/2014 - 10:40 नवीन
नवीन सर्वेनुसार भाजपाला २८९ जागा मिळण्याचा अंदाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चौकटराजा गुरुवार, 10/16/2014 - 05:22 नवीन
तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त. सचाचा पहिला सिक्सर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ऋ
ऋषिकेश Fri, 10/17/2014 - 06:10 नवीन
बरेच दिवसांनी क्लिंटनसोबत शतप्रतिशत सहमत व्हायची वेळ आली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
श्रीगुरुजी Sat, 10/11/2014 - 09:00 नवीन
क्लिंटनसाहेब, बर्‍याच दिवसांनी तुमचे सविस्तर विश्लेषण वाचायला मिळाले. त्याबद्दल आभार! आता निवडणुक संपेपर्यंत नियमित लिहित चला. तुमच्या स्वतःच्या अंदाजाची अजूनही वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 10/12/2014 - 18:31 नवीन
काल अजून २ मतदानपूर्व सर्वेक्षणांचे निकाल प्रसिद्ध झाले. (१) दैनिक "सकाळ्"च्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल. भाजप - ९४, शिवसेना - ६१, राष्ट्रवादी काँग्रेस - ५९, काँग्रेस - ५१, मनसे व इतर - २३ (२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात खालील परिस्थिती असेल. भाजप - १२०-१२५, शिवसेना - ५८-६३, राष्ट्रवादी काँग्रेस - ३५-४०, काँग्रेस - ३८-४३ (२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार हरयानात खालील परिस्थिती असेल. भाजप - ३८-४४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २८-३४, काँग्रेस - १२-१६
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 10/13/2014 - 05:11 नवीन
सॉरी माझं निवडणुकांविषयी वाचन फार कमी आहे. मुळचे नौटंकी पळपुटे झाडुवाले विधानसभा लढवणार आहेत का? नसतील तर ठिके उगाचं मतं खाऊन जायचे.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 10/13/2014 - 05:12 नवीन
बाकी यंदा युती आणि आघाडी दोन्ही गंडल्यामुळे त्रिशंकु परिस्थिती होणार असं वाटतयं.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 10:50 नवीन
काल झी-२४ तास/तालिम चे तिसरे मतदानपूर्व सर्वेक्षण पाहिले. त्यांच्या पहिल्या दोन सर्वेक्षणांची व तिसर्‍याची तुलना करूया. (१) सर्वेक्षण क्र. १, प्रसिद्धीची तारीख - ०२/१०/२०१४ भाजप ९०, काँग्रेस ७२, शिवसेना ६१, राकाँ ३८, मनसे ६ व अपक्ष आणि इतर पक्ष २१. (२) सर्वेक्षण क्र. २, प्रसिद्धीची तारीख - ०९/१०/२०१४ - भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३ (३) सर्वेक्षण क्र. ३, प्रसिद्धीची तारीख - १२/१०/२०१४ - भाजप : ११०, शिवसेना : ५२, काँग्रेस : ६८, राकाँ : ३९, मनसे : ७, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : १२ १० दिवसांत भाजपच्या जागा ९० वरून ११० झालेल्या दिसताहेत, तर काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ७२, नंतर ६३ आणि आता ६८ असा वरखाली होताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ३८, नंतर ४० आणि आता ३९ असा वरखाली होताना दिसतोय, पण आकडे जवळपास स्थिर आहेत. शिवसेनेच्या बाबतीत सुरवातीच्या ६१ जागांवरून ५७ आणि आता ५२ जागांचा अंदाज आहे. तीनही सर्वेक्षणात मनसेला एक आकडी जागा (६-९) दर्शविल्या आहेत. डिस्क्लेमरः हे आकडे खरे आहेत की खोटे, चुकीचे ठरतील का बरोबर, पक्षपाती आहेत का निष्पक्षपाती याविषयी माझे काहीही मत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 11:15 नवीन
गेल्या ३-४ दिवसात अनेक वाहिन्यांनी आपापल्या मतदानपूर्व सर्वेक्षणांचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्याचा सारांश, - भाजपला दैनिक "सकाळ" ने ९४ जागांचा अंदाज दिला आहे. इतर दोन सर्वेक्षणांमध्ये भाजपला १५२-१५४ जागांचा अंदाज दिला आहे. यांच्याव्यतिरिक्त इतर ७ सर्वेक्षणांमध्ये भाजप १०५-१४२ च्या दरम्यान जागा मिळवेल असा अंदाज आहे. - शिवसेनेला एका सर्वेक्षणात ३८, इतर २ सर्वेक्षणात ४५-४७, एका सर्वेक्षणात ६७ व इतर ६ सर्वेक्षणात ५०-६३ जागा दाखविल्या आहेत. - राष्ट्रवादी काँग्रेसला २ सर्वेक्षणात १६-१७, एका सर्वेक्षणात ५९, एका सर्वेक्षणात ४५-५० व इतर ६ सर्वेक्षणात ३३-४३ जागा दाखविल्या आहेत. - काँग्रेसला २ सर्वेक्षणात २५-३०, एका सर्वेक्षणात ६८ व इतर ७ सर्वेक्षणात ३८-५२ जागा दाखविल्या आहेत. - मनसेला सर्वाधिक २१, सर्वात कमी ७ व इतर सर्वेक्षणात १०-२० जागा दिल्या आहेत. ढोबळमानाने बहुतेक सर्वेक्षणांनुसार खालील अंदाज दिसतो. भाजपः १०५-१४२, शिवसेना: ५०-६३, काँग्रेसः ३८-६२, राष्ट्रवादी काँग्रेसः ३३-४३, मनसे: १०-१२
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 10/13/2014 - 14:08 नवीन
गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज कोण कोण असावेत या निवडणुकीला? राणे पिता/पुत्र, पृथ्वीराजबाबा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 17:08 नवीन
राणे पितापुत्रांपैकी पुत्र धोक्यात आहेत. पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणार. अजितदादा, भुजबळ, राणे हे नक्कीच निवडून येणार. आघाडी सरकारमधील बहुतेक हेवीवेट निवडून येतील, परंतु लाईटवेट धोक्यात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
न
नानासाहेब नेफळे Mon, 10/13/2014 - 17:14 नवीन
फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत. गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 17:32 नवीन
>>> फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत. हे सर्वजण आपापल्या मतदारसंघातून आरामात निवडून येतील. वाहिन्यांनी फक्त मोदी, राज व उद्धव यांचीच भाषणे बहुतेक वेळ दाखविली. त्यामुळे इतर जण वाहिन्यांवर फारसे दिसलेच नाहीत. >>> गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल. गडकरी कशाला तोंड लपवतील? ते उघडउघड प्रचार करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र जवळपास ८० हून अधिक सभा घेतलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Mon, 10/13/2014 - 19:14 नवीन
मोदी, राज आणि उद्धव, शरद पवारच नाहीत, तर अनेक पक्षातले दुसर्या फळीतले नेते जसे की अजीत पवार सुप्रीया सुळे छगन भुजबळ पृथ्वीराज चव्हाण आर आर पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्याही सभा झाल्या आणि त्या लक्षणीय ठरल्या परंतु भाजपचे दुसर्या फळीतले नेते गायब होते ,कारण त्यांच्याकडे बघुन भाजपचे मतदान घटेल अशी भीती भाजपला वाटते. तावडे खडसे निवडुन येतील का याविषयी साशंकताच आहे .हे म्हणे राज्यात सक्षम सरकार देणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हाडक्या Mon, 10/13/2014 - 18:01 नवीन
पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणार
याबद्दल सध्या थोडी ५०/५० अवस्था म्हणता येईल. कारण राष्ट्रवादीने आपला उमेदवार खाली बसवला आहे आणि उंडाळकरांना (कॉ. चे गेल्या वेळचे आमदार, या वेळी अपक्ष ) पाठिंबा जाहीर केला आहे. याला काटशह म्हणून पृथ्वीराजबाबा यांनी स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवारास (अघोषित) माघार घेण्यास तयार केले आहे. थोडक्यात, काँग्रेसच्याच दोन (आजी-माजी) नेत्यांमध्ये दुरंगी लढत आहे आणि राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे काही सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
निशदे Mon, 10/13/2014 - 19:29 नवीन
श्रीगुरुजी, हे सर्व सर्वेक्षणाचे आकडे एका वेगळ्या प्रतिसादात अपडेट कराल का प्लीज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुहास.. Tue, 10/14/2014 - 17:34 नवीन
गुर्जी , हा धागा आपण भाजपाच्या प्रचारासाठी काढला होता अशी प्रत्येक पदो-पदी जाणीव होते आहे !! बाकी चालु द्यात ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सामान्यनागरिक Mon, 10/13/2014 - 14:57 नवीन
कॉन्ग्रेस नक्की वरती येणार ! राकॉं ची संगत सोडल्यानेच त्यांची अर्धी पापे धुतली गेली. अर्थात कॉन्ग्रेस धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे अशातला भाग नाही. पण ’प्रतिमा’ आणी आचरण हे राकॉं चे अगदीच वाईत आहे. आणि पृथ्वीराज बाबांनी नक्की पूर्ण विचार करुनच हाय कमांडला आघाडी तोडण्यास भाग पाडलेले आहे. नक्की फायदा होणार त्याचा !
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Mon, 10/13/2014 - 16:41 नवीन
शिवसेनेने प्रचारात आघाडी सरकारवर पण भरपूर टीका केली आहे मात्र मीडियाला टीआरपी साठी सेना-भाजप (या आधी सेना-मनसे ) अशी टीका जास्त सोयीची वाटते आणि ते त्याला प्रसिद्धी देतात. राज्य भाजपकडे चेहरा नाही आणि त्यांचे संघटन पण मजबूत नाही. मोदींची तीच तीच भाषणे ऐकून लोक पण आता समजून चुकले आहेत. आनंदीबेन पटेल मुंबईत येवून उद्योगपतींना 'मुंबईत काय ठेवलय गुजरातला चला' म्हणतात. कोस्टल डिफेन्स अकादमी, हिरे बाजार राज्यातून हलवून बाहेर गुजरातेत नेला. मराठी ध्रुवीकरण लक्षात घेवूनच भाजपने अमित शहांना पोस्तार्वरून हटवले,अमित शहाने पण उंदीर वगैरे बोलून सैनिकांना अजून डिवचले आहे. तसेच भाजपचा प्रचार सुरुवातीला फार निगेटिव स्वरूपाचा राहिला होता (कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र वगैरे) त्याची भरपूर टवाळी झाली. अमेरिकेतील भाषणे दाखवून महाराष्ट्रात मत मागत आहेत. तिकडे हरयाणात जावून त्यांची आत्मप्रौढीची भाषा (शिवाजीला, भगतसिंग ला जमले नाही ते मी केले अश्या आशयची) लोकांना पसंत पडणार नाही.गुजरात महाराष्ट्रापेक्षा प्रगत या फेकाड गोष्टी आहेत हे लोकांना उमगून चुकले आहे.मुंबई-ठाणे पट्ट्यात मराठी मतदारांत अंडरकरंत आहे आणि सर्वे दाखवतात तसे यश भाजपला मिळणार नाही असा अंदाज आहे. शिवसेना राज्यात चांगले यश मिळवेल.तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी बद्दल नाराजी आहे मात्र विधानसभेला त्यांना सर्व्हेत एकदम चिल्लर समजले गेले आहे तसे होनात नाही. विधानसभेत स्थानिक मुद्दे, उमदेवार महत्वाचे असतात. आघाडी हरणार हे नक्की मात्र दोघे मिळून ५०-६० जागा दाखवतात तसे होणार नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 17:28 नवीन
>>> शिवसेनेने प्रचारात आघाडी सरकारवर पण भरपूर टीका केली आहे मात्र मीडियाला टीआरपी साठी सेना-भाजप (या आधी सेना-मनसे ) अशी टीका जास्त सोयीची वाटते आणि ते त्याला प्रसिद्धी देतात. शिवसेनेचा ९० टक्के प्रचार भाजप व मोदींविरोधात होता. उद्धव ठाकर्‍यांच्या भाषणात अफझलखान, वाघनखे, कोथळा, औरंगजेब, शिवाजी महाराज, दिल्लीश्वर हेच शब्द पुन्हा पुन्हा येत होते. प्रत्येक भाषणात ते अफझलखानच्या वधाचा प्रसंग रंगवून सांगत होते. २१ व्या शतकातल्या निवडणुकीत १७ व्या शतकातील प्रसंग वारंवार सांगून त्यांनी काय मिळविले? एकंदरीत शिवसेनेने अत्यंत नकारात्मक व असभ्य पातळीवर जाऊन प्रचार केला. पु.ल.देशपांड्यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" या गाजलेल्या पुस्तकात वर्तमानात जगण्याचे नाकारून कायम इतिहासात रमणार्‍या "हरितात्या" या व्यक्तीचे चित्रण आहे. शिवसेना व उद्धव ठाकर्‍यांच्या रूपाने हरितात्या जिवंत आहेत याची खात्री पटली. >>> आनंदीबेन पटेल मुंबईत येवून उद्योगपतींना 'मुंबईत काय ठेवलय गुजरातला चला' म्हणतात. कोस्टल डिफेन्स अकादमी, हिरे बाजार राज्यातून हलवून बाहेर गुजरातेत नेला. "तुम्ही गुजरातमध्ये सुद्धा गुंतवणुक करा" असे आनंदीबेन पटेलांचे शब्द होते. या वाक्यातील "सुद्धा" हा शब्द समजला असेल तर या वाक्यात काहीही वावगे वाटणार नाही. कोस्टल डिफेन्स अ‍ॅकॅडमी हे चुकीचे नाव आहे. "मरीन पोलिस अ‍ॅकॅडमी" हे खरे नाव आहे. ही अ‍ॅकॅडमी गुजरातमध्ये नेली हा आरोप धादांत खोटा आहे हे पूर्वीच पुराव्यासहीत लिहिले आहे. माझे पूर्वीचे प्रतिसाद वाचा म्हणजे कळेल. हिरे बाजार गेली अनेक दशके सुरतमध्येच आहे. भारतातला बहुसंख्य हिर्‍यांचा व्यवसाय हा सुरतमधूनच होतो. डायमंड कटिंग, हिर्‍यांना पैलू पाडणे हा गुजरातमधील हा प्रचंड मोठा व्यवसाय असून मोदींनी मुख्यमंत्री झाल्यावर या व्यवसायातील कामगारांना त्यांच्या गावातच अखंड ३-फेज वीज उपलब्ध करून दिली होती व त्यामुळे कामगारांना आपल्या गावात राहूनच काम करता येऊ लागले. हिरे व्यवसाय मुंबईतून गुजरातला नेला ही एक लोणकढी थाप आहे. >>> मराठी ध्रुवीकरण लक्षात घेवूनच भाजपने अमित शहांना पोस्तार्वरून हटवले,अमित शहाने पण उंदीर वगैरे बोलून सैनिकांना अजून डिवचले आहे. तसेच भाजपचा प्रचार सुरुवातीला फार निगेटिव स्वरूपाचा राहिला होता (कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र वगैरे) त्याची भरपूर टवाळी झाली. मोदींशी अफझलखानशी तुलना करणे (इति उद्धव ठाकरे), युती तोडणार्‍यांना आम्ही भांडी घासायला लावू असे बोलणे (इति संजय राउत), अफझलखानाप्रमाणे मोदींचे थडगे महाराष्ट्रात बांधू (इति प्रेम शुक्ला) हा नकारात्मक प्रचार होता. मोदींनी आपण शिवसेनेवर टीका करणार नाही असे जाहीररित्या सांगून एक अत्यंत स्वागतार्ह व संयमी भूमिका घेतलेली असताना शिवसेनेचा भाजपला लक्ष्य करून नकारात्मक प्रचार सुरूच राहिला. २७ सप्टेंबरपासून शिवसेना सातत्याने भाजपला लक्ष्य करीत होती. अनेक दिवस गप्प राहिल्यानंतर शेवटी ८-९ ऑक्टोबरला अमित शहांनी नाव न घेता शिवसेनेवर टीका केली. भाजपने सुरूवात केलेली नव्हती. किंबहुना १०-११ दिवस भाजप गप्प होता. शेवटी त्यांचाही संयम सुटला व प्रत्त्युत्तर दिले गेले. >>> अमेरिकेतील भाषणे दाखवून महाराष्ट्रात मत मागत आहेत. तिकडे हरयाणात जावून त्यांची आत्मप्रौढीची भाषा (शिवाजीला, भगतसिंग ला जमले नाही ते मी केले अश्या आशयची) लोकांना पसंत पडणार नाही.गुजरात महाराष्ट्रापेक्षा प्रगत या फेकाड गोष्टी आहेत हे लोकांना उमगून चुकले आहे.मुंबई-ठाणे पट्ट्यात मराठी मतदारांत अंडरकरंत आहे आणि सर्वे दाखवतात तसे यश भाजपला मिळणार नाही असा अंदाज आहे. शिवसेना राज्यात चांगले यश मिळवेल.तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी बद्दल नाराजी आहे मात्र विधानसभेला त्यांना सर्व्हेत एकदम चिल्लर समजले गेले आहे तसे होनात नाही. विधानसभेत स्थानिक मुद्दे, उमदेवार महत्वाचे असतात. आघाडी हरणार हे नक्की मात्र दोघे मिळून ५०-६० जागा दाखवतात तसे होणार नाही. १९ तारखेला कळेलच कोणाची किती ताकद आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
न
नानासाहेब नेफळे Mon, 10/13/2014 - 19:21 नवीन
शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!!
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Tue, 10/14/2014 - 09:09 नवीन
१९ तारखेला सगळच कळणार आहे. बाकी या सर्व्हेत नीट विभागवार पाहिलं तर किती झोल आहे ते समजून येते. मराठवाड्यात शिवसेनेला २ तर राष्ट्रवादीला १ जागा 'झी २४ तास' वाले देत आहेत ? शिवसेना एकट्या परभणीतच दोन जागा जिंकेल बाकी जिल्ह्यात पण जागा राखेल/ वाढवेल. तीच बाब एनसीपीची भाजपला बीडमध्ये मुंडे यांची सहानुभूती कामाला येईल पण बाकी ठिकाणी एवढे सोपे नाही. विदर्भ सोडला तर भाजपचे ग्राउंड नेटवर्क किती मजबूत आहे हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून तर मोदींना २५+ सभा घ्याव्या लागल्या.संघ पण यावेळेस लोक्सभेसारखा उत्साही नाही. २००९ ला मनसेच्या हवेमुळे मराठी मते मोठ्या प्रमाणात विभागली त्यामुळे मनसेचे १३ आमदार आले पण सेना-भाजपचे त्याहून जास्त पडले तशी परिस्थिती आता नाही. प्रचार थांब्ल्यावरचे महत्वाचे तास, आणि मतदानाच्या दिवशी आपला मतदार घराबाहेर काढणे यासाठी शिवसेनेकडे खास करून मुंबई-ठाणे-कोकण मराठवाडा याठिकाणी चांगले नेटवर्क आहे.रस्त्यावर उतरणारे, लोकांशी कनेक्टेड असणारे सैनिक ही सेनेची जमेची बाब आहे. युती असताना भाजपला सेनचा या बाबतीत पण फायदा व्हायचा तो आता होणार नाही.कॉंग्रेसची पण स्वतःची अशी काही मते असतात ती अजिबात हलत नसतात. आघाडी तुटल्याने कॉंग्रेसचा फायदा झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचार, दादागिरीचे जास्त आरोप आहेत. कॉंग्रेसमध्ये नारायण राणेंचा अपवाद सोडल्यास तसे फारसे नाही. राणेंना तोंडदाखलं प्रचारप्रमुख केल मात्र चेहरा पृथ्वीबाबांचाच पुढे केला याचा फायदा कॉंग्रेसला होईल म्हणजे त्यांच्या जागा घटतील पण फार नाहीत. कॉंग्रेस ६० च्या आसपास राहील. लोकांचा जास्त राग एनसीपीवर आहे त्याचा त्यांना फटका बसेल. एनसीपीचे बदनाम चेहरे (विजय गावित, बनरव पाचपुते, कथोरे, सावकारे) भाजपात आल्याने नाही म्हटल तरी त्यांना पण याचा फटका बसेल. सेनेकडे जे बाहेरून लोक आले त्यांत (दीपक केसरकर, उदय सामंत, अनिल बाबर, राम पंडागळे ) लोकांची प्रचंड नाराजी असलेले फारसे दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 17:54 नवीन
>>> युती असताना भाजपला सेनचा या बाबतीत पण फायदा व्हायचा तो आता होणार नाही. युती असताना सेनेला भाजपचा जो जबरदस्त फायदा होत होता तो आता होणार नाही. भाजपमुळेच १९९० मध्ये सेनेची आमदारसंख्या १ वरून ५२ झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
द
दुश्यन्त Tue, 10/14/2014 - 09:17 नवीन
शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!! +१ शिवसेनेवर टीका केली असती तर होती नव्हती ती पण राज्य भाजपची पत घालवली असती. बाळासाहेबांच बोट धरून भाजप राज्यभर विस्तारली. विदर्भ सोडला तर भाजपचे नेटवर्क किती भारी आहे हे माहित आहे की. राष्ट्रवादीचे नेते आयात करून स्वबळ आजमावत आहेत. बुथवर बसायला, मतदारांना घराबाहेर काढायला र्ज्याभ्र भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? मोदी पीएम होतील अशी स्थिती असताना पण मुंबईत गुजराती मतदार बाहेर काढायला प्रयत्न करावे लागत होते. आता तर परिस्थिती वेगळी असणार. गुजराती, व्यापारी लोक सेनेशी पंगा घेणार नाहीत. आतून एक प्रकारचा धाक असतोच वर दंगलीत सेनाच त्यांना मदतीला येते. गुजरात आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर नेते आणून फायदा होणार नाही. उलट मराठी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होवून ते सेना आणि काही जागी मनसेला फायदेशीर ठरेल.
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Tue, 10/14/2014 - 09:29 नवीन
ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता नसणे याचा अर्थ भाजप हा मिडीयाचा वापर करुन फुगलेला पक्ष आहे ,आजपर्यंत सेनेचा त्यांना फायदा व्हायचा आता तो होणार नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
श
श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 17:27 नवीन
>>> ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता नसणे भाजपकडे ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता नाही हा जावईशोध लावल्याबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 17:37 नवीन
>>> शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!! बाळासाहेबांच्या आदरापोटी शिवसेनेवर टीका करणार नाही असे सांगून मोदींनी स्वतःला व भाजपला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले व शिवसेनेचे नेते त्यांच्यासमोर किती खुजे आहेत हे दाखवून दिले. >>> शिवसेनेवर टीका केली असती तर होती नव्हती ती पण राज्य भाजपची पत घालवली असती. बाळासाहेबांच बोट धरून भाजप राज्यभर विस्तारली. विदर्भ सोडला तर भाजपचे नेटवर्क किती भारी आहे हे माहित आहे की. शिवसेनेमुळे भाजप महाराष्ट्रात वाढला हा एक भ्रम आहे व शिवसेनेच्या नेत्यांनी जाणूनबुजून हा भ्रम पसरविला आहे. मी मागील एका प्रतिसादात शिवसेना व भाजपची युतीपूर्वी जी ताकद होती त्याची सविस्तर माहिती देऊन युतीपूर्व काळात शिवसेनेला मुंबईबाहेर कणभरही स्थान नव्हते व त्याच काळात भाजपचे महाराष्ट्राच्या सर्व भागात अस्तित्व होते हे दाखवून दिले आहे. माझे आधीचे प्रतिसाद वाचा म्हणजे तुमचे गैरसमज दूर होतील. >>> राष्ट्रवादीचे नेते आयात करून स्वबळ आजमावत आहेत. आयात नेते सर्व पक्षात आहेत. शिवसेनेने कोकणात केसरकर राकाँकडून आयात केले तर पर्वतीत सचिन तावरेसुद्धा राकाँकडून आयात केला. सेनेचे सर्व २८६ उमेदवार पाहिले तर त्यात अनेकजण आयात केलेले आहेत हे दिसेल. राकाँ व काँग्रेसने सुद्धा अनेक नेते इतर पक्षातून आयात केले आहेत. >>> बुथवर बसायला, मतदारांना घराबाहेर काढायला र्ज्याभ्र भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? भरपूर आहेत. उद्या कोणत्याही बूथवर जाऊन बघा. >>> मोदी पीएम होतील अशी स्थिती असताना पण मुंबईत गुजराती मतदार बाहेर काढायला प्रयत्न करावे लागत होते. चांगला विनोद आहे. >>> आता तर परिस्थिती वेगळी असणार. गुजराती, व्यापारी लोक सेनेशी पंगा घेणार नाहीत. आतून एक प्रकारचा धाक असतोच वर दंगलीत सेनाच त्यांना मदतीला येते. गुजरात आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर नेते आणून फायदा होणार नाही. उलट मराठी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होवून ते सेना आणि काही जागी मनसेला फायदेशीर ठरेल. गैरसमज आहे. सेना, मनसे, राकाँ हे गुजरात्यांविरूद्ध अत्यंत विखारी प्रचार करीत आहेत. या निवडणुकीत गुजराती मतदार त्यांना चांगलाच धडा शिकवतील. बघा १९ तारखेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा