Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्या अच्छे दिन आ गये ?

H
hitesh
Sun, 11/09/2014 - 23:28
🗣 107 प्रतिसाद
अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा . पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ? १. महागाई कमी करु म्हणणार्‍या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ? डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले. रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले. प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे ! इंटरनेटचे रिचार्ज दोन दिवस आधीच संपले . मोबाइलवाला बोल्ला , अच्छे दिन आ गये ! पूर्वी रिचार्ज ३० दिवस वॅलिड होते. आता दर तेवढाच . पण २८ दिवसच नेट पॅक वैध रहाणार ! मापात पाप करुन दर तितकाच ठेवण्याचा भासमान प्रयत्न कशाला ? सरळ दहा टक्के दरच वाढवायचा की ! औषधांच्या किमतीही भडकतील असा अMdaaj आहे. एटीएम मधुन पैसे काढण्यालाही आता ५ प्रयत्नांनंतर चाजेस भरावे लागतील. बुरी राते आ गयॅअ‍ॅ ...़कंडोम महागले ! २. मोदीप्रेमी लोकांचा एक मेसेज निवडणूक काळात फिरत होता. मोदी सरकार हे देश भ्रष्टाचारमुक्त कर्ण्यासाठी आम्ही निवडुन देणार आहोत. भले या सरकारने महागाई वाढवली तरी चालेल ! किती लब्बाड आणि हास्यास्पद वाक्य आहे हे ! भ्रष्टाचार प्रत्येक पातळीवर होत असतो म्हणुनच तर महागाई वाढते.. प्रत्येक पातळीवरचा भ्रष्टाचार जर सिग्निफिकंटली कमी झाला तर त्याचा दृश्य परिणामह्म्हणुन स्वस्ताई काही अंशी तरी यायलाच हवी ना ? ३. जनधन योजनेत दर अकाउंटला ५ हजार जमा होणार होते. आता मोदी सर्कार म्हणते फक्त ५०० च जमा होणार ! गेल्या सहा महिन्यात खरोखरच काही चांगले घडले आहे का ? एकुण कालावधीचा १/१० काल संपला ! मोदी सर्कारचा आढावा घेण्यासाठी हा धागा.

प्रतिक्रिया द्या
22236 वाचन

💬 प्रतिसाद (107)
च
चौकटराजा Mon, 11/10/2014 - 01:05 नवीन
प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे ! २००३ साली माझ्या पत्नीला डेंग्यू झाला होता त्यावेळी मला तिला ५ बॅग्ज प्लेटलेट्सच्या द्याव्या लागल्या किंमत प्रत्येकी ९०००/- ( रुपये नउ हजार प्रत्येकी) एकूण बरेहोण्याचा तेंव्हाचा खर्च होता रूपये बहात्तर हजार !!! अनेक गोष्टी अशा आहेत जे मोदींचेही सरकार करणार नाही. कारण त्यात प्रथम अडकतील ते इथले उद्योजक व राजकारणी.देशांतर्गत काळा पैसा बाहेर काढणे हे त्याचे महत्वाचे उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
H
hitesh Mon, 11/10/2014 - 02:10 नवीन
प्लेटलेटमध्ये सिंगल डोस आणि आरडीपी असे प्रकार असतात.. सिंगल डोनर खूप महाग असते. मी वर दिलेले रेट आरडीपीचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ब
बोका-ए-आझम Mon, 11/10/2014 - 02:24 नवीन
रिक्षा आणि टॅक्सी यांचे दर हे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या राज्यसरकारने वाढवले - जून-जुलै मध्ये.
  • Log in or register to post comments
H
hitesh Mon, 11/10/2014 - 07:35 नवीन
विसरलोच की ! रिक्षाचे दर वाढले ... काँग्रेस जबाबदार तेलाचे दर वाढले ... सौदी जबाबदार. रक्ताचे दर वाढले ... ब्लड ब्यान्क जबाबदार पपैचे दर वाढले .... शेतकरी आणि फळगाडीवाले जबाबदार. मोदींचा भाजपाचा संबंध म्हागाइशी येतोच कुठे नै का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 11/10/2014 - 13:08 नवीन
महागाई दर ५% च्या खाली आहे आता पण आधीच एवढे दर वाढलेले आहेत की त्यात थोडासाही बदल लोकांना जास्त वाटतोय. बाकी जेव्हा ६० वर्षे देशाला हातोहात बनवणारे जेव्हा असले लेख लिहितात तेव्हा असं भरून येतं म्हणून सांगू! खरं सांगायचं तर काँग्रेस कशालाच जबाबदार नाही. हे या देशातले नालायक लोक आहेत ना त्यांनाी काही कळत नाही. १० वर्षे पण काँग्रेसच्या नावाखाली भाजपनेच देश चालवला. काँग्रेस जबाबदार? छे! भलतंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/10/2014 - 05:34 नवीन
हितेशा, अरे जरा वेळ जाऊ दे की."परीक्षेत पहिला नंबर नक्कि मिळवीन' म्हंटले आहे.वार्षिक परीक्षेचा निकाल बघायचा असतो ना?अजून तर चाचणी परी़क्षाही झाली नाही आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 11/10/2014 - 05:38 नवीन
बाकी तुम्ही तिकडचे बोला.. आम्ही आपली साधी माणसे, आम्ही भाजी, कांदा, साखर वगैरे गोष्टी बघतो. बाकी मोबाईल वगैरे महागणे म्हणजे ते कधीतरी होणारच होते, किती दिवस तुम्ही खोटी स्वस्ताई दाखवणार? बाकी जाता जाता, माझा असा अंदाज आहे की जी काही दरवाढ झाली पाहिजे, त्याच्या दुप्पट दरवाढ ह्या वर्षी होईल, आणि त्यानंतर पुढची ५ वर्षे दर स्थिर राहतील.. राजकारण, दुसरे काय? ५ वर्षांनी कोणाला आठवणार आहे की पहिल्या वर्षी एव्हढी मोठी दरवाढ झाली होती म्हणून?
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत भोसले पाटील Mon, 11/10/2014 - 05:42 नवीन
अहो माईसाहब, आधी ६० च दिवस झालेत म्हणाले, आता फक्त ६ च म्हीने झाले म्हणतात, भाजपचे आश्वासन म्हणजे लबाडाघरचे आवतानं असते ,वाट्ल्यास आठवलेँना विचारा. शेतकर्यांचे नेते आणि राज्याच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असणारे पवारसाहेबच या देशाचे नेतृत्व करु शकतात ,भाजपातले चाळीस आमदार पवारसाहेबांच्या शब्दातलेच आहेत, शेवटी महाराष्ट्र पवारांच्या ताब्यातच राहिला.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/10/2014 - 09:41 नवीन
विश्वजीता, अरे शरदला जाण आहे पण नुसती जाण असून काय फायदा? राज्यात घाण करून ठेवली त्याचे काय? राज्याला ३ लाख कोटींचे कर्ज आहे असे चॅनेल्वाले म्हणते होते.कृषीमंत्री झाला खरा पण देशातल्या शेतकर्यांच्या १५-२० हजार रुपयांसाठी केलेल्या आत्महत्या?पीकांची नासाडी होत असताना शरदचे लक्ष स्टेडियमच्या हिरवळीवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वजीत भोसले पाटील
ब
बोका-ए-आझम Mon, 11/10/2014 - 13:11 नवीन
हो. बरोबर. पवारसाहेबच. तसंही आत्महत्यांमुळे शेतक-यांची संख्या कमी झालेलीच आहे. पवारसाहेबांच्या हातात प्रत्यक्ष सत्ता नाही तो एक प्रश्नच आहे. नाहीतर उरलेल्यांनी पणा आत्महत्य केल्या असत्या आणि हा प्रश्नच कायमचा निकालात निघाला असता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वजीत भोसले पाटील
म
मदनबाण Mon, 11/10/2014 - 05:46 नवीन
प्लेटलेट्समुळे बाजारात पपई सुद्धा महाग झाला आहे म्हणे ! बाकी चालु द्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 11/10/2014 - 07:28 नवीन
वेळ जाऊद्या थोडा अजून.... तीन वर्षं तरी. सध्या प्रत्येक गोष्टीला 'कर्स द प्रिडिसेसर' हा उपाय असतो. त्यावरून एक ज्योक आठवला. एका कंपनीत नवीन संचालक येतो. जुना संचालक त्याला १, २, ३ असे आकडे घातलेले तीन लखोटे देतो आणि कानमंत्र देतो. "जेव्हा तू मोठ्या अडचणीत येशील तेव्हा एक लखोटा उघडून पहा. त्यात तुझ्या अडचणीचे उत्तर असेल". काही काळानंतर लवकरच नवा संचालक अडचणीत येतो. कंपनीची वाट लागलेली असते. संचालक क्र १ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते, "तुमच्या पूर्वसुरींना दोष द्या". संचालक त्याप्रमाणे सगळ्याचे खापर जुन्या संचालकावर फोडतो. कालांतराने बाजारातल्या घडामोडींमुळे क्रायसिस नाहीसा होतो. असाच काही काळ गेल्यावर पुन्हा तीच वेळ येते. संचालक क्र.२ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते, "पुनर्रचना करा". संचालक ताबडतोब कंपनीतल्या सगळ्या खात्यांमधल्या म्यानेजर लोकांना इकडे तिकडे हलवतो. ऑपरेशन्सवाला परचेसमध्ये, परचेसवाला एच आर मध्ये... पुन्हा तो क्रायसिस कदाचित आपोआपच नाहीसा होतो. परत काही काळाने मोठाच क्रायसिस येतो. बेजार झालेला संचालक क्र ३ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते..... "तीन लखोटे बनवा". :)
  • Log in or register to post comments
H
hitesh Mon, 11/10/2014 - 07:57 नवीन
भाजप्यांचे दोन लखोटे तयारच आहेत. एकावर गांधी लिवले आहे. दुसर्‍यावर नेहरु लिवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/10/2014 - 09:35 नवीन
नितिन, म्हणजे कुठलाहि पक्ष सत्तेत असला तरी विशेष फरक पडत नाही असे म्हणतो आहेस ना? काही अंशी खरे आहे असे आम्हालाही वाटते.नेहरू गेल्यानंतर 'आता देशाचे काय होणार?" ह्या काळजीने अनेक मध्यम्वर्गीय व डावे,कॉग्रेसवाले चिंतीत झाले होते.पण नंतर इंदिरा काय्,मोरारजी काय... किंवा नंतरचे अनेक पंतप्रधान वा पक्ष, देश चालतच होता आपल्या गतीने.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Mon, 11/10/2014 - 09:43 नवीन
केजरीवाल यांनी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन १० दिवस पण होतात की नाही तेंव्हा त्यांच्या १० दिवसाच्या कारकीर्दीचा पंचनामा करणारा एक धागा उघडण्यात आला होता. आठवणीने ड्वाले पाणावले . बाकी चालू द्या . बाकी थत्ते यांचा प्रतिसाद जबराच
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/10/2014 - 13:38 नवीन
@ hitesh, क्ष पार्टी विरुद्ध य पार्टी अश्या अंध गदारोळात आम्हाला रस नाही... पण डोळे आणि कान उघडून पाहणे आणि त्याबाद्दल थोडाबहुत साधा समतोल विचार करायला आवडते. या लेखात विचारलेल्या गोष्टी विचारायला ६०-६५ वर्षे पूर्णपणे विसरलेले लोक गेल्या पाच-सहा महिन्यात रोज रोज त्या गोष्टी उगाळून विचारू लागले आहेत हे पाहून ड्वाले पानाव्ले ! :) असो. जागरूक नागरीक (मगे ते एकांगी का होईनात किंवा कागावाखोर का होईनात) हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे असे समजले जाते... तेव्हा लोकशाहीला जिवंत ठेवल्याबद्दल अभिनंदन ! आणि शुभेच्छाही !! आता एक सुजाण नागरीक म्हणून नविन सरकारच्या काही क्षुद्र गोष्टी म्हणजे कचरा न करणे (स्व:ता / दुसर्‍याने केलेला कचरा साफ करणे जरा जास्त कठीण आहे, म्हणून ते तुमच्यावर सोडतो), भ्रष्टाचारात (तेच ते हो, चिरीमिरी न देणे, इ इ) सहभागी न होणे वगैरेत सहभागी होऊन जर लोकशाहीत अजून जान ओतता आली तर पहा. सुरुवातीला इतके केलेत तर मग जरा अजून कठीण गोष्टी करायला पण मनाची तयारी होईल. काय म्हणता ? जागरूकता तेव्हाच फायद्याची, जेव्हा ती योग्य दिशेने चालत असते. तुम्ही एक जागरूक नागरीक असल्याचे वाटल्यानेच केवळ इतके लिहीले. बाकी तुमची मर्जी.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 11/10/2014 - 14:22 नवीन
इतर बिन खर्चिक उपाय नाना सांगेल. असो. दादा कोंड़्के चे गाणे आठवले
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Mon, 11/10/2014 - 14:55 नवीन
मोदिशेठ प्रचारात सांगायचे कि ६० वर्षात झाले नाही ते ५ वर्षात करून दाखवणार मग जनतेने ६ महिन्यात थोड्या फार रिझल्टची अपेक्षा केली तर काय चुकल? अच्छे दिन आले अंबानी अदानींचे!
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 11/10/2014 - 14:59 नवीन
ह्यांचे अच्छे दिन आले म्हणजे गेल्या ५+ महिन्यात त्यांच्यासाठी नक्की कायकाय झाले हे सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
H
hitesh Mon, 11/10/2014 - 15:00 नवीन
मोदी अंबानी कुंभमेळ्यात बिछडे हुये भाऊसारखे मिठ्या मारतात http://www.google.co.in/search?hl=en&site=webhp&tbm=isch&source=hp&ei=RsRgVKG-EsH4mAW3h4KoAQ&q=ambani+modi+manmohan&oq=ambani+modi+manmohan&gs_l=mobile-gws-hp.12...6033.16870.0.18605.21.21.0.2.2.1.2699.23836.2-1j2j0j2j5j5j4j2.21.0.cprnk%2Cekomodo%3Dtrue...0...1.1.58.mobile-gws-hp..12.9.9448.3.rWlVZ_8od08
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
H
hitesh Mon, 11/10/2014 - 15:08 नवीन
हेच अंबानी मनमोहनांसमोर कंबरेत झुकुन उभे रहायचे. http://www.google.co.in/search?site=&source=hp&ei=vcVgVLuJJtG0uAT2yYGADA&q=ambani+manmohan&oq=ambani+manmohan&gs_l=mobile-gws-hp.12...1910.10270.0.11756.16.16.0.3.3.0.747.8545.4-8j6j2.16.0.cprnk%2Cekomodo%3Dtrue...0...1.1.58.mobile-gws-hp..4.12.4717.3.BO-AL7TjheM#facrc=_&imgrc=S8zjF5qgcBtDYM%253A%3Bundefined%3Bhttp%253A%252F%252Fnimg.sulekha.com%252Fothers%252Foriginal700%252Fmanmohan-singh-sunil-mittal-mukesh-ambani-2008-11-3-5-3-42.jpg%3Bhttp%253A%252F%252Fwww.veethi.com%252Findia-people%252Fsunil_mittal-photos-46-1509.htm%3B640%3B455
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ब
बोका-ए-आझम Mon, 11/10/2014 - 15:45 नवीन
मनमोहनांसमोर कमरेत झुकून फारफार तर त्यांचा गुरखा राहात असेल. बाकी प्रत्येक जण त्यांच्यावर दादागिरीच करायचा. अगदी तो चाळीशीचा उनाड कार्टा राहुल पण. बरं, अंबानी असे झुकून उभे असल्याचा फोटो असल्यास तो टाकता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Mon, 11/10/2014 - 16:08 नवीन
वरच्या लिंकेत फोटो आहे की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
प्रदीप Mon, 11/10/2014 - 16:19 नवीन
कमरेत झुकल्याचे दिसते आहे आपणांस? सर्वसाधारणपणे समोरची व्यक्ति बोलत असतांना, थोडे झुकून ऐकणे हा, सुसंकृत समाजात, सर्वसामान्य शिष्टाचाराचा भाग समजला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Tue, 11/11/2014 - 01:26 नवीन
कंबरेत झुकणं म्हणजे अगदी काटकोनात झुकणं अपेक्षित नाही. पणसमोरच्या व्यक्तीला आदर देण्याची देहबोली दिसुन तेय आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
ट
टवाळ कार्टा Tue, 11/11/2014 - 02:54 नवीन
थोडेसे झुकून आदर देणे...कंबरेत झुकून हुजरेगीरी करणे हे सारखेच आहे का?? असेल तर पप्पूचे जोडे उचलणेपण तुझ्यासाठी चांगलेच असणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
म
मुक्त विहारि Tue, 11/11/2014 - 03:37 नवीन
चला, इथे काही वैचारिक वाचण्यापेक्षा आपण आपले खफवरच भेटू या... (बादवे, वरील प्रतिसाद ट्का ह्यांच्यासाठीच आहे, हे सुज्ञ लोकांच्या लक्षांत आलेच असेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
H
hitesh Tue, 11/11/2014 - 04:44 नवीन
काहीतरी गैरसमज होतोय. मनमोहन सिंग आणि अंबानी एकमेकाना योग्य तो आदर देत होते.. मोदी - अंबानीसार खे मिठ्या मारत जगाला आपला दोस्ताना दाखवत फिरत नव्हते. ंमला इतकेच सांगायचे होते. हे फोटो मोदीप्रेमींना पोटशूळ उठवणारे ठरणार याची कल्पना ह्प्तीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 11/11/2014 - 05:04 नवीन
हेच अंबानी मनमोहनांसमोर कंबरेत झुकुन उभे रहायचे.
मनमोहन सिंग आणि अंबानी एकमेकाना योग्य तो आदर देत होते
दोन्ही वाक्यांतला फरक समजतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Tue, 11/11/2014 - 05:08 नवीन
कंबरेत झुकुण , मान झुकवुन आदराने अंबानी उभे रहायचे. मनमोहन सिंगदेखील प्रतिनमस्कार करुन सुहास्य वदनाने वार्तालाप करायचे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 11/11/2014 - 05:55 नवीन
मनमोहन सिंगदेखील प्रतिनमस्कार करुन सुहास्य वदनाने वार्तालाप करायचे.
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Tue, 11/11/2014 - 06:56 नवीन
फोटु बघून मला जे वाटलं ते म्या लिवलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 11/11/2014 - 07:20 नवीन
मारली का कोलांटी उडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Tue, 11/11/2014 - 07:43 नवीन
कसली कोलांटी ? त्या वार्तालाप शब्दात इतकं हसण्यासरखं काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 11/11/2014 - 07:57 नवीन
ममो बोलतात? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Tue, 11/11/2014 - 08:21 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
दिवाकर देशमुख गुरुवार, 11/13/2014 - 09:35 नवीन
इतिहासाची वाट लावत सर्व ठिकाणी पिचकारी तर टाकत फिरत नव्हते ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बोका-ए-आझम Tue, 11/11/2014 - 08:26 नवीन
मला नेमकं कळलं नाही की मोदी आणि अंबानी यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या तर तुम्हाला का खुपतं? नंतर विचार केल्यावर तीन शक्यता जाणवल्या - १. मोदींनी तुमच्याऐवजी अंबानींना मिठी मारली. २. अंबानींनी तुमच्याऐवजी मोदींना मिठी मारली. ३. दोन पुरुषांनी एकमेकांना मिठी मारणे तुम्हाला खपत नाही. वरच्यापेक्षा काही वेगळे कारण असल्यास कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ट
टवाळ कार्टा Tue, 11/11/2014 - 08:50 नवीन
हितेस्भाईला कोनी मीटी मारत नसेल तर??? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ज
जेपी Tue, 11/11/2014 - 08:56 नवीन
हितेस भाई, स्वत:लाच मिठ्या मारु शकतात. *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सतिश गावडे Tue, 11/11/2014 - 14:37 नवीन
म्हणजे "आपलीच मिठी आपणाशी" का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अर्धवटराव Mon, 11/10/2014 - 16:44 नवीन
अंबानी काहि झालं तरी शेवटी बिझनेसमॅन. समोरच्या व्यक्तीला काय आवडतं तेच तो विकणार. मोदिंना त्याने आलिंगन देताना बघितलं असेल म्हणुन तिथे झप्पी. ममो नेहमी मॅडम आणि युवराजांसमोर झुकलेले म्हणुन... हॅ हॅ हॅ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
च
चौकटराजा Tue, 11/11/2014 - 05:49 नवीन
ही गोष्ट मनमोहन सिंग यानी केली की नाही माहीत नाही पण त्यांच्या काळात ती केली गेली हे खरे आहे. आपल्याकडे एकेका घरात चार चार गॅस सिलिंडर्स ची नोंद होती. व त्यामुळे ज्यांच्या कडे ते नाही त्याना सिलिंडर मिळण्यास विलंब लागत असे. त्यावर सोनिया व मनमोहन यांची तीव्र टवाळी करणारी व्यंगचित्रे चेपू वर टाकण्यात आली होती. ही सर्व कनेक्शन शोधून रद्द करण्यात आली व आता त्यामुळे इंधनाचा पुरवठा नीट होत आहे. सामान्य माणसाला गव्हर्नन्स म्हणजे नक्की काय हवे आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. असा एखादा मूलभूत सर्वस्पर्शी प्रश्न मोदीनी हाताळला आहे असे मला तरी दिसलेले नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 11/11/2014 - 06:16 नवीन
ही सर्व कनेक्शन शोधून रद्द करण्यात आली व आता त्यामुळे इंधनाचा पुरवठा नीट होत आहे.
जास्तीचे कनेक्शन तुम्ही पुरवठा नीट होत नव्हता म्हणुनच घेत होता ना ? नंबर लावलेले सिलेंडर वेळच्यावेळी उपलब्ध झाले तर कोणि जास्तीचे कनेक्शन का घेतील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
H
hitesh Tue, 11/11/2014 - 06:58 नवीन
दोन कनेक्शनात सामान्य कुटुंबाचे भागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 11/11/2014 - 07:08 नवीन
दोन सिलेंडर पुरतात आणि वेळच्यावेळी मिळतात तर मग जास्तीच्या सिलेंडरमागे पैसा का गुंतवावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Tue, 11/11/2014 - 07:18 नवीन
असे जास्तीचे घरगुती कनेक्शन व्यावसायिक लोक घेतात. खरे तर त्याना व्यावसायिक दराने मोठे सिलिंडर मिळु शकतात. माझ्याकडे सिलिंडरच नाही. इंडक्शनवरच संसार सुरु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 11/11/2014 - 08:07 नवीन
इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश साहेब. सरकार आणि एवढं वर्ष ढिसाळपणे काम करणार प्रशासन कामाला लावणं हे सोप्पं काम आहे का? आणि महागाई कोणाच्या काळात वाढली? निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेल चे भाव किती वाढले? लोकांचा आशावाद किती वाढला?
  • Log in or register to post comments
अ
अमित मुंबईचा Wed, 11/12/2014 - 12:12 नवीन
आणि ती सुद्धा 2 मिनिटात बनवणा कठीण, कमीत कमी 5 मिनिटे लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कपिलमुनी Wed, 11/12/2014 - 13:05 नवीन
याचा आणि सरकारचा काही सबंध नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव कमी झाले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा