क्या अच्छे दिन आ गये ?
अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा .
पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ?
१. महागाई कमी करु म्हणणार्या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ?
डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले.
रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले.
प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे !
इंटरनेटचे रिचार्ज दोन दिवस आधीच संपले . मोबाइलवाला बोल्ला , अच्छे दिन आ गये ! पूर्वी रिचार्ज ३० दिवस वॅलिड होते. आता दर तेवढाच . पण २८ दिवसच नेट पॅक वैध रहाणार ! मापात पाप करुन दर तितकाच ठेवण्याचा भासमान प्रयत्न कशाला ? सरळ दहा टक्के दरच वाढवायचा की !
औषधांच्या किमतीही भडकतील असा अMdaaj आहे.
एटीएम मधुन पैसे काढण्यालाही आता ५ प्रयत्नांनंतर चाजेस भरावे लागतील.
बुरी राते आ गयॅअॅ ...़कंडोम महागले !
२. मोदीप्रेमी लोकांचा एक मेसेज निवडणूक काळात फिरत होता. मोदी सरकार हे देश भ्रष्टाचारमुक्त कर्ण्यासाठी आम्ही निवडुन देणार आहोत. भले या सरकारने महागाई वाढवली तरी चालेल !
किती लब्बाड आणि हास्यास्पद वाक्य आहे हे ! भ्रष्टाचार प्रत्येक पातळीवर होत असतो म्हणुनच तर महागाई वाढते.. प्रत्येक पातळीवरचा भ्रष्टाचार जर सिग्निफिकंटली कमी झाला तर त्याचा दृश्य परिणामह्म्हणुन स्वस्ताई काही अंशी तरी यायलाच हवी ना ?
३. जनधन योजनेत दर अकाउंटला ५ हजार जमा होणार होते. आता मोदी सर्कार म्हणते फक्त ५०० च जमा होणार !
गेल्या सहा महिन्यात खरोखरच काही चांगले घडले आहे का ?
एकुण कालावधीचा १/१० काल संपला !
मोदी सर्कारचा आढावा घेण्यासाठी हा धागा.
💬 प्रतिसाद
(107)
च
चौकटराजा
Wed, 11/12/2014 - 10:55
नवीन
भारतात लोकशाही लोप पावली तरच महागाई संपेल. कारण लोकशाही व भाडवलशाही हे बहुतांशी एकमेकांच्या भगिनी आहेत. व " नफा" हे भांडवलशाहीचे प्रमुख सूत्र आहे. तेंव्हा महागाईचे विसरा.
सर्वच कायदे पाळायचे म्हटले तर भारतीय जनता अक्खी तुरूंगात जाईल. उदा दाखल, पायरेटेड सॉफटवेअर चा वापर १०० टक्के शोधायचा ठरवले तर जवळ जवळ प्रत्येक संगणक ग्राहक तुरुंगात असेल. पोलिसानी रस्त्यावर गाडीची इन्शुरन्स
पॉलेसी चेक करायचे नुसते मनात आणले तरी विमा कंपन्याना तीन शिफ्ट मधे काम मिळेल. तेंव्हा कायदद्याचे तंतोतंत
पालन विसरा.
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 11/13/2014 - 07:29
नवीन
100 वा प्रतिसाद
आता नानाला श्रद्धांजली म्हणुन सर्वांनी या धाग्यावर मौन पाळावे.
हि नल्म विनंती
- Log in or register to post comments
H
hitesh
गुरुवार, 11/13/2014 - 22:10
नवीन
धागा माझा आणि सारखं त्या नानाला का आणताय ?
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 11/14/2014 - 01:21
नवीन
हितेस भाई,
कारण तुम्हाला पाहुन आम्हाला नानाची आठवण येते.ते हि अशेच धागे काढायचे.
गेला बिचारा.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Fri, 11/14/2014 - 06:07
नवीन
अरे कुठ नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा
'वीजचोर' आमदाराकडेच वस्त्रोद्योग विकासाची जबाबदारी
http://www.loksatta.com/mumbai-news/power-theft-accused-bjp-mla-suresh-halwankar-gets-responsibility-by-fadnavis-1041267/
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Fri, 11/14/2014 - 07:55
नवीन
हा घ्या अजून एक मानाचा तुरा . शिक्षण खात्याचा राज्य मंत्रीच बनावट मार्क sheet बनवण्यामध्ये आरोपी . येल विद्यापीठ पदवीधारक स्मृती इराणी कमी होत्या का म्हणून अजून यांची भर
http://www.ndtv.com/article/india/new-junior-minister-for-education-faces-charges-of-forging-his-marksheet-620584
- Log in or register to post comments
त
तर्री
Mon, 12/01/2014 - 08:25
नवीन
ही चर्चा वाचून , केंद्र सरकार ची कामे कोणती ? हे सामान्य मतदाराने समजून घेणे गरजेचे आहे असे वाटले. नेट चार्ज , भाज्या , रक्त , औषधे यांच्या किमती ह्या मुख्यता मागणी आणि पुरवठा ह्या तत्वावर अवलंबून असतात. सरकारचे धोरण हे त्यावर दूरगामी परिणाम करते.
संरक्षण / अर्थ / गृह / परदेशनीती ह्या चार महत्वाच्या गोष्टीमध्ये माझ्या मते मोदी सरकारने आत्तापर्यंत कोणताही चुकीचा / वादग्रस्त निर्णय घेतलेला नाही ही सगळ्यात जमेची बाजू.
संरक्षण मंत्री पर्रीकर यांची नियुक्ती , एफ डी आय , जवानांचे वाढलेले मनोबल हे फार मोठे निर्णय सरकारने घेतले आहेत.
सरकारी बाबू व मंत्री कार्यालयात वेळेवर उपस्थित राहतात हे मोदींचे प्रचंड यश आहे. मी दिल्ली मधील सरकारी कार्यालायामाधला फरक अनुभवतो आहे.
मोदींची एक "करडी" नजर मंत्री मंडळावर आहे त्यामुळे शिस्त आणि कार्य क्षमता शतपटीने वाढली आहे. भ्रष्टाचार तर जवळ जवळ संपावर गेला आहे.
जरा थांबा - याचा एकत्रित परिणाम २ वर्षात स्पष्ट दिसेल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3