क्या अच्छे दिन आ गये ?
अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा .
पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ?
१. महागाई कमी करु म्हणणार्या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ?
डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले.
रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले.
प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे !
इंटरनेटचे रिचार्ज दोन दिवस आधीच संपले . मोबाइलवाला बोल्ला , अच्छे दिन आ गये ! पूर्वी रिचार्ज ३० दिवस वॅलिड होते. आता दर तेवढाच . पण २८ दिवसच नेट पॅक वैध रहाणार ! मापात पाप करुन दर तितकाच ठेवण्याचा भासमान प्रयत्न कशाला ? सरळ दहा टक्के दरच वाढवायचा की !
औषधांच्या किमतीही भडकतील असा अMdaaj आहे.
एटीएम मधुन पैसे काढण्यालाही आता ५ प्रयत्नांनंतर चाजेस भरावे लागतील.
बुरी राते आ गयॅअॅ ...़कंडोम महागले !
२. मोदीप्रेमी लोकांचा एक मेसेज निवडणूक काळात फिरत होता. मोदी सरकार हे देश भ्रष्टाचारमुक्त कर्ण्यासाठी आम्ही निवडुन देणार आहोत. भले या सरकारने महागाई वाढवली तरी चालेल !
किती लब्बाड आणि हास्यास्पद वाक्य आहे हे ! भ्रष्टाचार प्रत्येक पातळीवर होत असतो म्हणुनच तर महागाई वाढते.. प्रत्येक पातळीवरचा भ्रष्टाचार जर सिग्निफिकंटली कमी झाला तर त्याचा दृश्य परिणामह्म्हणुन स्वस्ताई काही अंशी तरी यायलाच हवी ना ?
३. जनधन योजनेत दर अकाउंटला ५ हजार जमा होणार होते. आता मोदी सर्कार म्हणते फक्त ५०० च जमा होणार !
गेल्या सहा महिन्यात खरोखरच काही चांगले घडले आहे का ?
एकुण कालावधीचा १/१० काल संपला !
मोदी सर्कारचा आढावा घेण्यासाठी हा धागा.
💬 प्रतिसाद
(107)
च
चिगो
Tue, 11/11/2014 - 08:29
नवीन
कॅप्टन जॅक स्पॅरोचं वाक्य चोरतोय.. इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश साहेब..
तुम्ही जो ममोंचा आणि अंबानीचा फोटो दिलाय त्यावरुन ते कुजबूज करताहेत असं दिसतंय. अश्यावेळी दोन्ही व्यक्ती एकमेकांकडे डोकं झुकवतात. (जसे फोटोत दिसत आहे.)
हे जुनंच आहे.. ज्यावेळी कुठल्याही / दुसर्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे फ्री केलं गेलं, त्याच्या सहा महीन्यांच्या आतच हा ५ प्रयत्नवाला रुल आला..
बाकी चालू द्या..
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Tue, 11/11/2014 - 08:50
नवीन
अश्यावेळी दोन्ही व्यक्ती एकमेकांकडे डोकं झुकवतात. (जसे फोटोत दिसत आहे.)
(सह्याद्रीसारख्या वगैरे) ताठ मानेचे आणि कणखर कण्याचे मराठी लोक कुण्णाकुण्णासमोर मान तुकवत नाहीत, तेव्हा हे असले शिष्टाचार आम्हाला समजतच नाहीत.
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 11/11/2014 - 10:18
नवीन
आपल्याच बँकेच्या ATM मधून एका महिन्यात पाच पेक्षा जास्त व्यवहार- इथे शिल्लक रक्क्म बघणे हाही एक व्यवहार धरला गेला आहे- केल्यास, पूर्वीही शुल्क लागू होत होते?
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 11/13/2014 - 11:22
नवीन
दुसर्या बँकेच्या एटीएम मधून पाचपेक्षा जास्त व्यवहार केल्यास (ज्यात माझ्या माहितीप्रमाणे शिल्लक रक्कम बघणे पण धरल्या जाते) शुल्क लागू होते. हा नियम "इतर कुठल्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढा" नियम लागल्याच्या सहाएक महिन्यातच लागू झाला, असे स्मरते.. आपल्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढायला हा पाच व्यवहारवाला नियम नाही, पण डेली मॅक्सिमम विथड्रॉवल लिमीट आहे..
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/11/2014 - 11:01
नवीन
मेरे अच्छे दिन आयेंगे.....
मेरे अच्छे दिन आयेंगे.....
करन अर्जुन सारखं.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Tue, 11/11/2014 - 11:26
नवीन
मथितार्थाशी सहमती आहे.
युपीएसरकारहून वेगळे नी विशेष असे अजून तरी या सरकारने काही भरीव केलेले पोचले नाही. काही सुधारणा आहेत पण या वेगात व लेव्हलच्या सुधारणा युपीएतही होत होत्या. जरा लहान मंत्रीमंडळ वगैरे होते, ते ही आता राहिले नाही.
कदाचित सरकारने खरंच काही विशेष केले नसेल किंवा मग माझ्यापर्यंत पोचायला वेळ लागेल. अजुन एक लोकसभेचे पूर्णांशाने येणारे हिवाळी अधिवेशन होईपर्यंत वाट पाहणे उत्तम. त्यात सरकारची प्राथमिकता व दिशा स्पष्ट होईल
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 11/11/2014 - 11:53
नवीन
मुळातला प्रश्न मग हा होतो की युपीए सरकारचे ६ महिने पूर्ण झाल्यावर इतका आरडाओरडा झाला होता का? त्या सरकारचेही समर्थक असतीलच - त्यांना कोणी विचारलं का? तर नाही. हे असले प्रश्न फक्त भाजप सरकारला विचारले जात आहेत.स्वत:ला सुजाण मतदार म्हणवणा-यांनी फक्त एकाच पक्षाला टार्गेट करणं हे चुकीचं आहे. मग गोध्रा हत्याकांड अजून चघळणा-या आणि नंदीग्रामवर मूग गिळून बसणा-या 'सिक्युलर'पत्रकारांमध्ये आणि आपल्यात काहीच फरक राहिला नाही असा अर्थ होतो.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 11/11/2014 - 13:03
नवीन
त्यांनी १०० दिवसात यंव करू आणि त्यंव करू अशा बाता मारल्या नव्हत्या म्हणून नाही झाला
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Tue, 11/11/2014 - 13:11
नवीन
मला वाटते युपीएने १०० दिवसात महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. १९९१ च्या जाहिरनाम्यात काँग्रेसने सत्तेत येताच १०० दिवसात अन्नधान्यांचे दर जुलै १९९० मध्ये होते त्या दराला आणू असे आश्वासन दिले होते असे आठवते.
मला वाटते की नरेंद्र मोदी सरकारचे पहिले ५ महिने १०० पैकी १०० मार्क देण्याच्या योग्यतेचे नक्कीच नाहीत. तरीही मी स्वतः ७५ पर्यंत मार्क देऊ शकेन. ७५ मार्कच का १०० का नाही हा प्रश्न रास्त आहे.अपेक्षा १०० काय १२० मार्कांची ठेवा आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर टिका जरूर करा.पण तेच करताना इतर पर्याय १० मार्क द्यायच्याही लायकीचे नाहीत हे विसरले जाऊ नये ही अपेक्षा. आणि २५ मार्क कुठे गेले म्हणून टिका करताना मुळात २५ मार्कही मिळवू शकणार नाही त्यांना नकळत पाठिंबा दिला जाऊ नये ही काळजी घेतली की झाले.
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/11/2014 - 14:43
नवीन
पूर्वीच्या काळी मिसळपाव मायबोली नव्हते.
त्या काळात सामान्य माणसाला व्यक्त व्हायला एकच ठिकाण होते.. पेप्रातली वाचकांची पत्रे.. सारकारबर टीका करणारी पत्रे , मजकूर लिहायला तेंहा तीच स्पेस अवेलेबल होती. लोक त्यातही लिहित होतेच.
आज हे नवेन माध्यम आल्याने लोक इथेही लिहु लागलेत.
त्यामुळे काँग्रेसविरुद्ध लिहित नव्हता , साठ वर्षे लिहित नव्हता , आताच का लिहिता , असा पोरकट राज ठाकरी बाणा बाळगु नये.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 11/12/2014 - 11:30
नवीन
उदयन. मायबोलीवरचा नवा आयडी काय आहे ?
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 11/12/2014 - 11:40
नवीन
अच्छा म्हणजे 'मी कधीच हवेत लिहित नाही' असे अभिमानाने लिहिणारे तेच का हे? बरं मग वाजपेयी अफझलला फाशी न देताच सिंहासन सोडून पळून गेले असे हवेत कसे काय लिहू शकले बाबा हे?असो. सध्या पंतप्रधान पिकनिकवर तीन देशांच्या दौर्यावर गेले आहेत.बहुदा हे पण पिकनिकच्याच मूडमध्ये असावेत :)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 11/11/2014 - 14:35
नवीन
काँग्रेसनेही २००४ मध्ये India Shining वर टीका करताना आपले सरकार आम आदमी ची काळजी घेईल, आपण शेतक-यसंच्या आत्महत्या थांबवू,अक्षरधाम, संसदगृह हल्ला, IC ८१४ विमान अपहरण यासारख्या घटना होऊ देणार नाही अशी जबराट आश्वासनं दिली होती. त्यातली किती पूर्ण झाली यावर काँग्रेसचे पाठीराखे म्हणवणारे किंवा भाजप सरकारवर टीका करणारे काय म्हणतात ते ऐकायला उत्सुक आहे.
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/11/2014 - 14:48
नवीन
काँग्रेसने कसाब आणि अफजलगिरुला फाशी दिली .
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Tue, 11/11/2014 - 16:27
नवीन
असं होय? सर्वांच्या ज्ञानात अमूल्य भर टाकल्याबद्दल आभारी आहे.मला तर वाटत होते की कसाब आणि अफझल गुरूला भारतीय कायद्याने फाशी दिले.तो गैरसमज दूर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/12/2014 - 18:27
नवीन
या घोषणा कुणाच्या होत्या ?
मंदिर वही बनायेंगे
दावूद ला फरफटत आणू
३७० कलम रद्द करू
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 11/11/2014 - 16:48
नवीन
कसाब भारतात इतक्या सहजपणे येऊ शकला कारण तटरक्षक दलाची सुरक्षा नव्हती. १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बाँबस्फोटांसाठी जे RDX वापरण्यात आलं ते सहजपणे भारतात येऊ शकलं. दोन्ही वेळी देशाति आणि राज्यात काँग्रेस सरकार होतं. हा योगायोग आहे? कसाबच्या गोळ्यांना तीन कर्तबगार पोलिस अधिकारी बळी पडले कारण बुलेटप्रुफ व्हेस्ट्स नव्हत्या. देशात संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री हे काँग्रेसचे होते. त्याचा जाब त्यावेळी विचारला का कोणी? आणि जेव्हा कोणीही अच्छे दिन कहां है असं विचारतो तेव्हा तो हे मान्य करतो की आत्ताचे दिवस चांगले नाहीत. त्याला जबाबदार कोण? गेली १० वर्षे राज्य करणारे की गेले ५ महिने राज्य करणारे ?
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/11/2014 - 18:11
नवीन
हो का ?
जेंव्हा अफजलगुरुनं फटाका फोडला तेंव्हा हिंदुत्वाचे शिलेदार वाजपेयीजी प्रधानसेवक होते.
अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले.
फाशीवर पक्के शिक्केमोर्तब आणि प्रत्यक्ष फाशी हे काँग्रेसच्याच कारकिर्दीत घडले.
बरोबर ना ? तपशिलात चुका असतील तर दुरुस्ती करावी.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 11/11/2014 - 20:39
नवीन
सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे अतोनात नुकसान होते आहे असे केवळ मलाच वाटते आहे काय ?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 11/11/2014 - 21:13
नवीन
नाही. मलाही तसेच वाटते...कोण असावेत बरे हे ?? ग्रेट्थिन्कर, नानासाहेब.... मात्र सर्वांच्या आई माईच आहेत.
- Log in or register to post comments
य
यश राज
Wed, 11/12/2014 - 04:41
नवीन
पोटेसाहेब राहिलेच की......
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Wed, 11/12/2014 - 05:49
नवीन
नेफळे, ग्रेट्थिन्कर या येड्या आयडींच्या धनी माईसाहेब आहेत असं वाटत नाही.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 11/11/2014 - 22:23
नवीन
मिपाच्या प्रांगणांत डू आय.डीं.ची कमतरता नाही....
किंबहुना ही मराठीतील अशी एकमेव साईट असेल की, जिथे हाकललेली माणसे परत-परत येतात.
हे म्हटले तर मिपाचे यश पण आहे आणि मिपाच्या प्रगतीला खीळ घालण्याचा उपद्याप पण आहे.
खरे तर ह्या अशा डू.आयडीं.च्या प्रतिसादाकडे किंवा लेखांकडे लक्षच न देणे हा ह्यावर एक उपाय होवू शकतो.
पण सगळ्यांना हा उपाय मान्य होईलच असेही नाही.
खरे सांगायचे तर आता डू.आयडींचीच कीव करावीशी वाटते.
माणसाने सोशीक असावे पण लाचार असू नये.
- Log in or register to post comments
श
शिद
Tue, 11/11/2014 - 22:25
नवीन
वरील सर्वांंशी सहमत. ( फक्त विमे ह्यांच्या प्रतिसादापर्यंत :) )
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 11/11/2014 - 22:38
नवीन
एक नवीन उपक्रम सुरु करुया का मिपावर?? डुआयडी व सीरीयल डुआयडींची जंत्री द्यायची व ओळखायची :)
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/12/2014 - 10:25
नवीन
तू डु आय डी आहेस . तू आमच्यासोबत लिहू नकोस.
हे ,
तू सूतपुत्र आहेस, तू आमच्याशी बरोबरी करु नकोस.
याच्यासारखेच वाटते ना ?
युक्तिवाद सुचत नसले की डिस्क्रिमिनेशन कसे वापरावे याचे हे उदाहरण मानावे का ?
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 11/12/2014 - 10:29
नवीन
तुलना चुकली. सूतपुत्र होणे किंवा न होणे कोणाच्या हातात नसते ते ज्या घरात जन्म घेऊ त्यावर ठरविले जाते. पण ड्युप्लिकेट आय.डी करणे/न करणे हे आपल्या हातात असते :)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 11/12/2014 - 10:41
नवीन
सूतपुत्र स्वता सूतपुत्र असल्याचे मान्य करायचा :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 11/12/2014 - 11:19
नवीन
कर्णःमीऽऽच तोऽऽ....अरे मीऽऽच तोऽऽ....राऽजपुत्र, सूतपुत्र!!!!!
दुर्योधनः याला विचारत नाही कोणी कूऽत्रं!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 11/12/2014 - 11:30
नवीन
ऐसा नक्को बोल रे...
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 11/13/2014 - 07:25
नवीन
बॅट्या, बॅट्या बॅट्या.....लेका रामदास आठवले का नाही झालास ?
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 11/12/2014 - 06:14
नवीन
फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरच होऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का? सर्वोच्च न्यायालयाने अफझल गुरूला फाशी द्यायचा निकाल दिला होता ४ ऑगस्ट २००५ रोजी.त्यावेळी कोण बरे पंतप्रधान होते? पृथ्वीवरच्या कालगणनेनुसार मनमोहनच पंतप्रधान होते. तुमच्या स्वप्नाळू जगात त्यावेळीही वाजपेयीच पंतप्रधान असतील तर कल्पना नाही. सुरवातीला तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार नाही असे म्हणत होता त्यामुळे ऑक्टोबर २००६ मध्ये त्याच्या फाशीची तारीख ठरलीही होती. पण शेवटच्या एक-दोन दिवसात त्याच्या वतीने त्याच्या बायकोने दयेचा अर्ज केला आणि फाशी लांबणीवर पडली. त्याला प्रत्यक्षात फाशी दिले कधी? फेब्रुवारी २०१३ मध्ये. कोणत्याही दयेच्या अर्जावर केंद्रीय गृहमंत्रालयाचे मत आल्याशिवाय राष्ट्रपती त्यावर निर्णय देऊ शकत नाहीत.ते मत देण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने जवळपास ४ वर्षांची दिरंगाई केली. गृहमंत्रालयाचे मत मिळाल्यानंतरही तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही त्यावर काही बोलायला तयार नव्हत्या.म्हणजे ऑक्टोबर २००६ ते फेब्रुवारी २०१३ या काळात तुमचेच मनमोहन सरकार आणि मुळातल्या तुमच्याच पक्षाच्या राष्ट्रपती झोपून होत्या त्याचे काय?
मग काय उपकार केले का? देशाच्या कायद्याने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कामच होते.त्याची काय मातब्बरी सांगता?
साफ चूक
हहपुवा
यातील पहिल्या मुद्द्याचे उत्तर दिले आहेच. त्यातील सगळे मुद्दे चुकीचे आहेत हे वर लिहिलेच आहे.तरीही ते बरोबर आहेत हे क्षणभर गृहित धरले तरी "त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडून गेले" या म्हणण्याला काय अर्थ आहे? वाजपेयी सरकारचा निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणून ते सिंहासन सोडून गेले. पराभव झाल्यावर त्यांना जायलाच हवे. हा लोकशाहीचा भाग आहे. वाजपेयी सिंहासन सोडून गेले या शब्दप्रयोगावरून नक्की काय म्हणायचे हे समजत नाही.केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रीपदाचे सिंहासन सोडून पळून गेला तसे वाजपेयी पळून गेले असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या वंडरलँडमध्ये तुम्हीच सुखात रहा.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/12/2014 - 07:16
नवीन
छान छान.. माहितीपूर्ण पोस्ट.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 11/12/2014 - 07:59
नवीन
नाना मटेरियल संपल का ?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 11/12/2014 - 20:37
नवीन
@हितेशसाहेब,तुम्ही अफझल गुरू आणि कसाब यांना फासावर चढवण्याचं श्रेय काँग्रेसला देताय तर जरा हे पण सांगा की एवढी देशभक्तीपर कामे करणा-या काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत फक्त ४४ जागा का मिळाल्या?
बरं, अफझल गुरूची फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम केली २००६ मध्ये. त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला, ज्याचं उत्तर ठराविक काळात द्यावं असं कुठलंही बंधन आपल्या राज्यघटनेने राष्ट्रपतींवर घातलेलं नाही. प्रणव मुखर्जींनी राष्ट्रपती झाल्यावर कसाब आणि अफझल गुरू यांचे दयेचे अर्ज फेटाळले आणि त्यांना फाशी देण्यात आलं. पण काँग्रेसला कुठे काय फायदा झाला? त्याचं कारण लोकांनीही ही सरकारची जबाबदारी आहे हे ओळखलं आणि काँग्रेसला श्रेय लाटू दिलं नाही.
अजून एक. संसदेवर हल्ला झाला डिसेंबर २००१ मध्ये. त्यानंतर अफझल गुरूला अटक आणि सत्र न्यायालयातला खटला ही प्रक्रिया वाजपेयींच्या भाजप सरकारने सुरु केली. न्यायालय तपास करत नाही. ते काम पोलिस करतात. तुम्ही जर फाशी देण्याचं श्रेय काँग्रेसला देत असाल तर अटकेचं श्रेय तुम्हाला भाजपला द्यायला पाहिजे. पण तुम्ही देत नाही, कारण तुम्ही काँग्रेसचे समर्थक आहात. तो तुमचा हक्क आहे. तसाच भाजपचं समर्थन करणं हा आमचा हक्क आहे. तुम्ही तुमच्या हक्काचं तुम्ही पालन करा अथवा करु नका. आमच्या हक्काचं आम्ही पालन करूच.
- Log in or register to post comments
H
hitesh
गुरुवार, 11/13/2014 - 05:03
नवीन
अटकेचं श्रेय भाजपाला दिलेले आहे.. सुरुवातीची प्रक्रिया वाजपेयींच्या कारकिर्दीत झाली याचा उल्लेख मी केलेला आहे.
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/11/2014 - 22:30
नवीन
मोदी सरकारच्या कारकिर्दीत धार्मिक उन्माद वाढला की काय ?
१. सरकार आले आणि चारच दिवसात शंकराचार्य बोलले ... साईबाबा हिंदु नाहीत , ते संतही नाहीत. त्यांची पुजा करु नका.. पुढे काय झाले माहीत नाही.
२. इमामानी मोदीना एका कार्यक्रमात बोलावले नाही. त्याचा मोठा इशु झाला.
पण मोदींच्या सिंहासनारोहण समारंभाला मोदीनी देखील इमामाना बोलावले नव्हते. इतर धर्मगुरुना मात्र आमंत्रणे धाडलेली होती. याबाबत कुणी काही बोलत नाही.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 11/12/2014 - 08:21
नवीन
साईबाबांची (किंवा अन्य कोणाचीही) पूजा करावी किंवा करू नये हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि याविषयी इतर कोणीही काहीही सांगितले तरी त्याला भारतीय समाज फाट्यावर मारतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. यापुढेही त्यात काही बदल होईल असे वाटत नाही-- अगदी शंकराचार्यांनी सांगितले तरी. आणि कुंभमेळ्यांमध्ये कोणी अंघोळ आधी करायची यावरून मारामारी करणार्या अखाड्यातील साधूंवरही ज्या शंकराचार्यांचा वचक चालत नाही (की अशी मारामारी करणे यात काही वावगे आहे असे त्यांना वाटत नसेल तर) अशा शंकराचार्यांना कितपत महत्व द्यायचे हे भारतीयांना नक्कीच कळते. त्यामुळे शंकराचार्य जे काही बोलले ते बोलले त्याचे पुढे काही झाले नाही आणि होणारही नाही.
नक्की कोणते धर्मगुरू मोदींच्या शपथग्रहण समारंभासाठी आले होते? नावे सांगू शकाल का?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 11/12/2014 - 08:56
नवीन
आलेले हे खरे आहे पण ते देवेंद्रसाठी....नरेंद्रसाठी माहीत नाही
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/12/2014 - 09:07
नवीन
नऊ नोवेंबर २०१४ च्या लोकसत्तात तिरकस रेघ या लेखात संदर्भ आहे.
http://epaper.loksatta.com/371491/indian-express/09-11-2014?show=touch#page/18/2
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 11/12/2014 - 10:54
नवीन
त्यांची रेघ कायम तिरकस च असते.
जाताजात सरळ रेघ मारतात ते वाचनीय असत.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Tue, 11/11/2014 - 22:50
नवीन
बुरे दिन गये ऐसा पिछले छे महिनोसे क्यू मेहसूस हो रहा है ?
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Wed, 11/12/2014 - 05:25
नवीन
कॉग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजपा असो नाहीतर आणखी कोणताही पक्ष असो साला महागाई वाढणारच.
जर कोणी रोखण्यासाठी प्रयत्न करत असेल तर प्रश्नाच्या मुळाशी जायला पाहिजे. त्यासाठी लोकसंख्या वाढीला आळा घातला पाहिजे.
एखादा तरी पक्ष लोकसांख्या वाढीला आळा घालण्यासाठी चीनसारखे प्रयत्न का करत नाही. नंतर मग सगळेच प्रश्न योग्य प्रशासनाने सुटतील.
बांग्लादेशीं बरोबरच इतरही घुसेखोरी करुन येणारे आपल्या इथे अनाधिकृत पणे राहुन नोकर्या मिळवुन आपले पर कॅपिटा उत्पन्न कमी करण्यास हात भार लावत आहेत.
एक निरिक्षण आजुबाजुला वावरणार्या लोकांचे :-
वरिल कोणत्याही पक्षाच्या राजवटीत गुटखा , तंबाखु, सिगारेट, दारु या जास्त महसुल मिळणार्या सर्व पदार्थांचे भाव काय कोणत्याही सरकारच्या रजवटीत कमीच ठेवलेत का नाही ना मग ते भाव दुप्पट , तिप्पट वाढुन सुध्दा दिवसाला ७/८ गुटखा पॅकेट संपविणारे , दारु पिणारे, लोक का बरे महागाईच्या नावाने ओरडतात.
( इथे कोणाचा ही अपमान करण्याचा हेतु नाही, मी रोज ट्रेन मध्ये / बसमध्ये ऐकतो कि लोक तावातावाने बोलत असतात आणि प्लॅटफोर्मवर , रस्त्यावर पानाचा, गुटख्याचा फवारा मारतात)
अजुन एक साला एक तरी सोन्याचे दुकान दाखवा ना की तेथे गर्दी नाही आहे. अगदी महागतले महाग वा.ह.पे. असो की कल्याण ज्वेलर्स असो की टीबीझेड असो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 11/12/2014 - 05:39
नवीन
हे काही चांगले निर्णय
http://www.visordown.com/motorcycle-news--general-news/motorcycle-abs-compulsory-from-2016/21856.html
http://trak.in/tags/business/2014/11/08/airbags-abs-compulsory-cars-india/
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 11/12/2014 - 08:04
नवीन
आमचे अच्छे दिन-
मागच्या महिण्यात 1 GB नेट पॅक साठी 126 रु. लागायचे आज 94 रु.यात 1 GB नेटपॅक मिळाले.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/12/2014 - 08:53
नवीन
कुठले सिम कार्ड घेतले ?
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/12/2014 - 08:43
नवीन
उर्दु शिक्षक नेमण्यास विरोध.
http://m.loksatta.com/maharashtra-news/urdu-education-in-marathi-schools-protest-demonstrations-in-kolhapur-1040439/
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/12/2014 - 08:51
नवीन
पाप्याचे पितर असलेल्याने अचानक बाळसे धरावे आणि ही रोड व्यक्ती बघता बघता गलेलठ्ठ व्हावी तसे नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे झाले आहे. १६ मे रोजी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा या सरकारची घोषणा होती मिनिमम गव्हर्न्मेंट, मॅग्झिमम गव्हर्नन्स. म्हणजे आमचे सरकार लहान असेल मात्र त्याची गती आणि परिणामकारकता जास्त असेल, असे मोदी सरकारचे म्हणणे होते. येत्या रविवारी या सरकारला सहा महिने होतील. या अर्धवार्षिक काळात आपल्याच या दाव्याचा विसर मोदी सरकारला पडलेला दिसतो. कारण सुरुवातीला मोदींसह अवघे ४५ जणांचे असलेले मंत्रिमंडळ एकदम ६६ वर गेले असून मावळलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अवाढव्य मंत्रिमंडळाशी त्याची स्पर्धा होऊ शकेल. संदर्भ : लोकसत्ता
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/12/2014 - 08:52
नवीन
http://m.loksatta.com/aghralekh-news/political-intention-behind-expanding-modi-cabinet-1040201/
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 11/12/2014 - 09:06
नवीन
नाना,
निवडुन आलेल्या खासदारांची संख्या बघता एवढ मंत्रीमंडळ पायजेच.त्याच लोकसत्तेच्या लेखात ममोच पण दिलत ते का लिवल नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »