Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले

श
श्रीगुरुजी
Wed, 11/12/2014 - 16:34
🗣 256 प्रतिसाद
सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्‍यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै. गोपीनाथ मुंड्यांनी जाहीररित्या सांगितले होते. केंद्रात सेनेला अत्यंत बिनमहत्त्वाचं फक्त १ मंत्रीपद देऊन भाजपने आपलं भविष्यातील धोरण स्पष्ट केलं होतं. भाजपचे धोरण ओळखूनच शिवसेनेने आपल्या चाली आखायला हव्या होत्या. परंतु सेना नेते आपल्याच अहंकारात, भ्रमात व नसलेल्या ताकदीच्या जोषात राहिले. भाजप जास्त जागा लढविण्यासाठी दबाव आणणार हे मे २०१४ मध्येच स्पष्ट झाले होते. अशावेळी मे ते सप्टेंबर या काळात शिवसेनेने धोरणीपणे विचारमंथन करून आपले डावपेच आखायला हवे होते. ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन भाजपचे समाधान करावे, आपण कधीच निवडून आलो नाही व ज्या जागा भाजपलाही जिंकणे अशक्य आहे अशा जागा देऊन त्याग केल्याचा आव आणावा, ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन त्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे देण्याचे जाहीर आश्वासन भाजपकडून घ्यावे व त्या बदल्यात केंद्रात जास्त व महत्त्वाची मंत्रिपदे मागून घ्यावीत, हे सुरू असतानाच मनसे व इतर काही स्थानिक पक्षांशी बोलणी करून भाजपविरूद्ध पर्यायी आघाडी तयार करावी असे अनेक पर्यात शिवसेनेला उपलब्ध असताना शिवसेना नेते गाफील राहिले. भाजप कदापिही युती तोडणार नाही, ज्या भाजपला आपण २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले आहे तो भाजप यापुढेही आपल्याच तालावर नाचत राहील, आपण म्हणू तसेच होईल या भ्रमात शिवसेना नेते राहिले. सुरेश प्रभू, मनोहर जोशी इ. समंजस नेत्यांना वाळीत टाकून उद्धव ठाकरे अत्यंत उथळ, वाचाळ, अविचारी असलेल्या व अजिबात दूरदृष्टी नसलेल्या संजय राऊत, रामदास कदम, रावते, प्रेम शुक्ला इ. नेत्यांवर विसंबून राहिले व त्याची फळे शिवसेनेला मिळाली. ४ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार होते. त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर येऊन आपली भेट घ्यावी अशी उद्धव ठाकर्‍यांची इच्छा होती. परंतु त्यांनी अमित शहा व मोदी या जोडगोळीला ओळखण्यात चूक केली. हे दोघे भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे प्रादेशिक पक्षांपुढे झुकणारे नसून अत्यंत धोरणी व प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व सहन न करणारे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाहीत. अमित शहा मुंबईत येऊन उद्धव ठाकर्‍यांना भेटणार नाहीत हे समजल्यावर तिळपापड होऊन शिवसेनेने 'शहाणा हो' ही पोस्टर्स सोशल मिडियातून पाठवायला सुरूवात करून त्यांना डिवचले. अमित शहांना डिवचणे म्हणजे थेट मोदींनाच डिवचण्यासारखं होतं हे सेना नेतृत्वाला कधी समजलंच नाही. अमित शहांनी शहाणपणा दाखवून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यावर शेवटी उद्धव ठाकर्‍यांना अमित शहांना मातोश्री भेटीचे सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवावं लागलं आणि इथेच शिवसेना झुकायला आणि डाव हरायला सुरूवात झाली. नंतर प्रत्यक्ष जागावाटपाची बोलणी सुरू असताना सुरवातीला भाजपने १३५-१३५-१८ असा फॉर्म्युला सुचविला होता. भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत दीडपट होती. त्यानुसार भाजप १६०-१७०, शिवसेना १००-११० व मित्रपक्ष १८ असेच जागावाटप हवे होते. असे असतानाही भाजपची मागणी जास्तीत जास्त १३५ जागांची होती. नंतरच्या चर्चेत भाजप १३०-१४०-१८ व त्यानंतर १२५-१४५-१८ इतका खाली उतरला होती. शिवसेनेला ही उत्कृष्ट संधी होती. भाजप १२५ जागा लढवत असल्याने भाजपला जास्तीत जास्त १०० जागा जिंकता आल्या असत्या व त्यामुळे भाजप बहुमतापासून खूप दूर राहिला असता (आता भाजपने १२२ जागा जिंकल्याने फार थोड्या जागांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज आहे.). शिवसेनेला १४५ जागा लढवून कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची व पर्यायाने मुख्यमंत्रीपद मिळविण्याची संधी होती. जरी भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तरी उपमुख्यमंत्रीपद व इतर अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली असती. युती करून एकत्र लढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी ला प्रत्येकी ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या व राष्ट्रवादीला खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला पाठिंबा देउन उपयोगच झाला नसता. पर्यायाने भाजपला सर्वार्थाने शिवसेनेवरच अवलंबून रहावे लागले असते. दुर्दैवाने उद्धव ठाकरे स्वतःच्या अहंकाराचे बळी ठरले. युती तुटल्यावर सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे मनसेबरोबर नवीन आघाडी त्यांना करता आली नाही. भाजपने आधीच योजना आखून सर्व मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला वळवून शिवसेनेला पूर्ण एकाकी पाडले. युती तुटली ही वस्तुस्थिती मान्य करून हे वास्तव समंजसपणे स्वीकारण्याऐवजी शिवसेनेने प्रचारात असभ्य पातळी गाठली. सामनातून व सभांमधून सातत्याने अमित शहा व मोदींना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत असभ्य व नकारात्मक प्रचार केला गेला. त्यांच्याबरोबरीने मित्रपक्षांचे राजू शेट्टी, रामदास आठवले, जानकर इ. ना ही लक्ष्य केले. शेवटी खडसेंविरूद्धही अत्यंत नकारात्मक प्रचार केला. महाराष्ट्रातील लोकांना मोदी हवे आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातून मुक्ती हवी आहे हे सेनेने न ओळखता काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी भाजपलाच आपला मुख्य शत्रू मानण्याची घोडचूक केली. मोदींना अफझलखानाची उपमा देणे, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहाची उपमा देणे, मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार करणे, आदित्य ठाकरे सारख्या पोराला चर्चेसाठी पाठविणे अशा अनेक घोडचुका सेनेने केल्या. याउलट भाजपने समंजसपणे शिवसेनेच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून आपला सकारात्मक प्रचार सुरू ठेवला व सेनेचे आपोआप खच्चीकरण होत गेले. त्याचेच परीणाम निकालात दिसले. भाजपच्या तुलनेत जेमतेम निम्म्या जागा मिळवून युतीतला मोठा भाऊ खरोखर कोण होता याचे जनतेनेच उत्तर दिले. तरीही भाजपला स्पष्ट बहुमत न मिळणे व आपल्याकडे तब्बल ६३ आमदार असणे हे शिवसेनेकडे हुकमी एक्के होते. त्यांनी आपली पाने नीट खेळली असती तर त्यांना बर्‍याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. कदाचित सेनेला अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदही मिळविता आले असते. ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले. भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले. भारतीय मतदार व्यक्तिगत असभ्य टीका व नकारात्मक प्रचार कायमच नाकारतो हे शिवसेनेच्या पराभवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनेच्या जागी मायावती असती तर तिने अत्यंत चातुर्याने पत्ते खेळून स्वत:च्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. किंवा राकाँ, काँ बरोबर मोट बांधून स्वतःचाच मुख्यमंत्री बनविला असता. दुर्दैवाने शिवसेना नेत्यांकडे धोरणीपणाचा संपूर्ण अभाव व अहंकार, स्वतःच्या नसलेल्या ताकदीबद्दल भ्रम, उर्मटपणा, अविचारीपणा, प्रक्षोभक शब्द, उथळ्पणा व असंमजपणा याशिवाय दुसरे काहीच नसल्याने शिवसेना युद्ध हरलीच पण तहातही हरली. ही निवडणुक शिवसेनेच्या अंताचा प्रारंभ ठरणार असे आता वाटत आहे.

प्रतिक्रिया द्या
121300 वाचन

💬 प्रतिसाद (256)
च
चिगो गुरुवार, 11/20/2014 - 08:44 नवीन
नव्या सरकारच्या आमदानीत हे सर्व घडताना दिसत आहे. हिंदुस्थानच्या संसदेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देणे व महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वतंत्र विदर्भाचे नारे देणे हा अपराध असून ‘अशा’ उलट्या ‘खोपडे’च्या लोकांवर मुख्यमंत्र्यांनी खरे म्हणजे कठोर कारवाई करायला हवी. अर्थात स्वत: मुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतल्यानंतर नागपुरात जाऊन महाराष्ट्रद्वेष्ट्या जहरी सापांना दूध पाजल्यावर अशा सापांची हिंमत वाढणारच. तशी ती वाढताना दिसत आहे आणि नैतिकता व तत्त्वाचे ‘हवाबाण’ सोडणारे मात्र अशावेळी गप्प बसले आहेत. "
हे असं एका अग्रगण्य वृत्तपत्राने लिहीणं, बलेही त्याची वैचारीक बैठक काहीही का असेना, हा महाप्रचंड मुर्खपणा आहे. वेगळा विदर्भ असावा की नको, तो आर्थिक आणि विकासदृष्ट्या सुदृढ असेल की नाही ह्यावर विचार करुन आणि प्रॅक्टीकल बाबी तपासून हा निर्णय व्हायला पाहीजे. आणि वेगळा विदर्भ मागणे म्हणजे देशद्रोह हे म्हणणार्‍यांना फाट्यावर मारले पाहीजे. नको तिथे इमोशनल वायझेडपणा करणारे वैदर्भियांना आवडत नाही. कमीत कमी ह्या एका वैदर्भियाला तरी नक्कीच नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी गुरुवार, 11/20/2014 - 08:48 नवीन
वेगळा विदर्भाची कारणे जर संयुक्तीक असतील तर तो दिलाच पाहिजे . आणि अशी मागणे ते घटनेच्या चौकटीत राहून करत आहेत.यात चुकीचे काहीच नाही. नेत्यांनी स्वार्थासाठी याचा बागुलबुवा बनवला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/20/2014 - 09:01 नवीन
'वेगळ्या खान्देशाच्या क्षीण हाकाही प्रसारमाध्यमातून कानावर येत आहेत.' उद्या वेगळा कोंकण, वेगळी मुंबई अशाही हाका सयुक्तिक कारणाने आणि घटनेच्या चौकटीत राहून होऊ लागल्या तर त्यांनाही वेगळे काढून, महाराष्ट्राचे नांव बदलून 'मराठी संघराष्ट्र' असे करावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 11/20/2014 - 09:25 नवीन
सयुक्तिक कारणाने आणि घटनेच्या चौकटीत
हा मुलभूत अधिकारच आहे फक्त काही लोक याचा गैरफायदा घेतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विटेकर गुरुवार, 11/13/2014 - 06:39 नवीन
आवडले ! नेहमीप्रमाणे क्लिंट्न यांचाही मार्मिक प्रतिसाद ! आता भाजप पुढची चाल काय खेळते यावर बाकीच्या सार्‍या गोष्टी अवलम्बून आहेत. शरद पवारांचा पाठिंबा घेतल्याने भाजपाचा प्रामाणिक मतदार आतून दुखावला गेला आहे. हे दुखणे भाजपाला बरे करयचे असेल तर आता सिंचन घोटाळ्यासारख्या भानगडी तातडीने बाहेर काढायला हव्यात, भ्रष्टाचारी आत जायला हवेत ! त्यामुळे हे दुखणे आपोआपच बरे होईल. कधे कधी मला वाट्ते , पवार धुरंधर राजकारणी आहेतच पण अमित शहा त्यांच्या वरचढ आहेत ! त्यांनी शिवसेनेचा काटा राष्ट्रवादीच्या काट्याने काढला. फक्त योग्य वेळ येताच , दोन्ही काटे फेकून देता आले पाहीजे !!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 11/13/2014 - 07:28 नवीन
कधे कधी मला वाट्ते , पवार धुरंधर राजकारणी आहेतच पण अमित शहा त्यांच्या वरचढ आहेत ! त्यांनी शिवसेनेचा काटा राष्ट्रवादीच्या काट्याने काढला. फक्त योग्य वेळ येताच , दोन्ही काटे फेकून देता आले पाहीजे !!
थोडा उलटा विचार केला तर. कॉन्ग्रेस ला विरोधी पक्ष पद ही मिळवुन द्यायचे नाही, भाजपाला शिवसेने बरोबर ही जाउन द्यायचे नाही. आण स्वताचे महत्त्व ही टिकवायचे असे राष्ट्रवादीचे धोरण असु शकनार नाही का ? भाजप कशी ही करुन सत्ता स्थापण करणार होती, जर त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतले असते तर कॉन्ग्रेस विरोधी पक्ष झाला असता, आणि या सगळ्यात राष्ट्रवादी कोठे तरी असता का ? उलट आता असलेल्या महानगर पालिका ही राष्त्रवादी ला गमवाया लागल्या असत्या. आणि हे झाले असते. त्यामुळे कोन वरचढ आहे हे सिद्ध झालेलेच आहे. उलट राष्ट्रवादी ला सोबत घेण्यात वरचढ पना नसुन धोक्याची पहिली चाहुल आहे हे येणारा काळ सांगेन. त्यातुन भाजपा सगळे भ्रष्टाचार बाहेर काढेल असे जे म्हंटले जाते, ते चुक आहे. महाराष्ट्र भाजप फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या म्हणण्यानेच चालेल. त्यांना वयक्तिक रित्या जास्त काही करता येइल असे मला वाटत नाही. बाकी सामान्य लोकांचा विकासा कडे कोणी लक्ष देइल का असे वाटते आहे. भाजप शिवसेने बरोबर गेम प्लॅन खेळण्यात अत्यंत यशश्वी झाली कारण तेथे उद्धव ठाकरे होते.. पण पवार साहेब असे आहेत ज्यांना विरोधी लोके ही साहेबच म्हणतात. त्यामुळे भाजप ने जे केले आहे सत्तेवर जाण्यासाठी ते कदापी समर्थनिय आणि पारदर्षी नाही. त्यामुळे पक्षीय वेगळेपण टिकवण्यात आत्ता साफ अपयशी ठरली. आणि एक विचार, जर शेवटच्या क्रमाम्कावर फेकल्या गेले तरी आपल्या पक्षाभोवती सत्ताकेंद्र फिरवत ठेवण्याला कुठली नीती म्हंटले पाहिजे, चानक्य निती पेक्षा ही वरचढ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मदनबाण गुरुवार, 11/13/2014 - 07:44 नवीन
ह्म्म्म.... वेळ मिळताच संपूर्ण विश्लेषण आणि क्लिंटनरावांचे प्रतिसाद वाचीन... जाता जाता :- शरदचंद्र पवार => राष्ट्रवादी कॉग्रेस => ४१ उद्धव ठाकरे => शिवसेना => ६३ शिवसेनेच्या जागा राष्ट्रवादी पेक्षा जास्त असुन सुद्धा त्यांची अशी अवस्था व्हावी यावरुन पक्ष प्रमुखांची निर्णय क्षमता आणि चाणाक्षपणा कमी पडला हे या सर्व घटना क्रमातुन अगदी स्पष्ट झाले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership
  • Log in or register to post comments
स
समीरसूर गुरुवार, 11/13/2014 - 07:54 नवीन
इथे असणार्‍यांइतके मला कळत नाही पण मला वाटते भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षातले नेते डोक्यावर पडलेले आहेत. थोडं समजदारीने वागले असते तर दोघांचा फायदा झाला असता. भाजपला राष्ट्रवादीच्या बेभरवशाच्या आधाराची गरज पडली नसती आणि त्यांची नामुष्की टळली असती. शिवसेनेला चांगले काम करून दाखवून प्रतिमा सुधारता आली असती आणि सत्तादेखील मिळाली असती. मुंबई टिकवण्यात याचा हातभार लागला असता. शिवाय आता अकारण जे राष्ट्रवादीचे महत्व वाढले ते घडले नसते. आता भाजप आणि शिवसेना बाजूला राहिले; राष्ट्रवादीच सगळी सूत्रे हलवते आहे असे चित्र निर्माण झाले आहे. अर्थात, शिवसेनेने थोडे पडते घ्यायला हवे होते यात वादच नाही. आपल्या जागा कमी, आपला करिष्मा संपलेला, आणि आपण बोलतो किती याचे भान शिवसेनेला राहिले नाही. शिवसेनेमध्ये काय करावे हा गोंधळ शेवटपर्यंत होता आणि त्याने त्याचा घात केला. शिवाय त्यांचे सल्लागार म्हणजे आनंदीआनंदच. भाजपनेदेखील नको तितके ताणले आणि शेवटी रडीचा डाव खेळले आणि टीकेचे धनी झाले. यात नुकसान दोघांनाही होणर हे नक्की.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 08:39 नवीन
महाराष्ट्र विधानसभेत १९८८ पासून आतापर्यंत आठ वेळा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आले. त्यापैकी सहा ठराव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर झाले आहेत. *२५ मार्च १९९५ - मनोहर जोशी सरकारवरील ठराव. *७ डिसेंबर १९९५ - मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव *१७ फेब्रुवारी १९९९ - नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव *२३ ऑक्टोबर १९९९ - विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर ठराव *१३ जून २००२ - विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव - मतदान अनुकूल १४३ तर विरोधात १३२ मते *२३ जानेवारी २००३ - सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ठराव - चर्चेविना आवाजी मतदानाने. *१६ जुलै २००६ - विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव - मतदान, अनुकूल १५३ मते, विरोधात शून्य मत *१९८८ - शरद पवार यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव - चर्चेविना आवाजी मतदानाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करणे ही जुनी व कायदेशीर प्रथा आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 11/13/2014 - 09:58 नवीन
या पैकी किती सरकारे अल्पमतात होती ते पण लिहा ना ! नेहमी तुम्हाला हव्या त्या चष्म्यातून कशाला बघता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 10:13 नवीन
सरकारे अल्पमतात होती की बहुमतात हा प्रश्नच उद्भवत नाही. आवाजी मतदानाची प्रक्रिया कायदेशीर होती का नव्हती एवढाच मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 11/13/2014 - 10:57 नवीन
अगोदर राज्यपालांना सरकारला पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी द्यावी लागते. वाजपेयी सरकारने पण पहिल्यांदा आवाजी मतदान घेतले होते तेव्हा बालयोगी यांना ते मंजूर झाले म्हणता आले असते. पण ते वाजपेयी होते, असले टेक्निकल आणि घाणेरडे खेळ त्यांना मंजूर नव्हते . म्हणून आवाजी मतदानानंतरही जेव्हा मतदनाची मागणी झाली ती त्यांनी मंजूर केली. आता मोदी आणि कंपनीचे पाय मातीचे आहेत त्याला कोण काय करणार. भाजपाचा काँग्रेसीकरण झालाय . सत्तेसाठी काय पण ! खाली म्हणले तसे रडीचा डाव ! आणि रेटून समर्थने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनुप ढेरे गुरुवार, 11/13/2014 - 12:18 नवीन
कपिलमुनीसाहेब, श्रीगुरुजींशी वाद घालू नका. त्यांच्या विरोधात बोललात तर लगेच तुम्हाला नाना नेफळे, माईसाहेब वगैरे म्हणायला सुरुवात करतील ते लगेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ह
हाडक्या गुरुवार, 11/13/2014 - 12:37 नवीन
*lol* . *lol* परत नान्याची आठवण झाली.. तोच बाजीप्रभूच्या सारखा श्रीगुरुजीसमोर अखंड खिंड लढवित असायचा.. तरी असोच.. ( डोळ्यास उत्तरिय लावल्याची स्माईली कल्पावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/13/2014 - 12:38 नवीन
अगदी अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 16:16 नवीन
नाही हो. कपिलमुनी हे नानासाहेब नाहीत. नानासाहेब, माईसाहेब इ. आयडी वापरणारी व्यक्ती अजून कोणकोणते आयडी वापरते याची मला पूर्ण माहिती आहे. निव्वळ नानासाहेबच नव्हे तर इथले इतर काही सदस्य कोणकोणते वेगवेगळे डूआय वापरतात हे मला माहिती आहे. माहिती हवी असल्यास व्यनि करा. पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये 'नाथा कामत'च्या व्यक्तिरेखेत एक वाक्य आहे. "उद्या विलेपारले ते गिरगाव वॉर्डापर्यंतच्या तमाम तरूणी बुरखा घालून हिंडल्या तरी नाथा नुसत्या त्यांच्या टाचांवरून किंवा चालीवरून त्यांची नावे व घरनंबर सांगेल." तद्वत इथल्या काही सदस्यांनी कितीही वेगवेगळे डूआय घेतले तरी नुसत्या त्यांच्या एका प्रतिसादावरून मी त्या आयडीमागच्या मूळ सदस्याला ओळखू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 16:01 नवीन
>>> अगोदर राज्यपालांना सरकारला पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी द्यावी लागते. याची गरज नसते. सरकार बनविण्यासाठी कोणत्या पक्षाला व नेत्याला आमंत्रण द्यायचे याविषयी घटनेने राज्यपालांना मार्गदर्शक तत्वे व अधिकार दिले आहेत. ज्या पक्षाकडे/युतीकडे स्पष्ट बहुमत आहे अशा पक्षाला राज्यपाल आमदारांची यादी न मागता सरकार स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. समजा कोणत्याच पक्षाकडे/युतीकडे स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपाल सर्वाधिक मोठ्या पक्षाला आमदारांची यादी न मागता सरकार स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात व त्यांना एका ठराविक कालावधीत विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊ शकतात. बोम्मई खटल्यात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की राजभवन ही बहुमत सिद्ध करण्याची जागा नसून बहुमत हे विधानसभेत सिद्ध करायचे असते. त्यामुळे आधी कमीतकमी निम्म्या आमदारांची यादी दाखवा आणि मगच मी सरकार स्थापनेचे निमंत्रण देईन अशी भूमिका राज्यपाल कायद्याने घेऊच शकत नाहीत. जर सर्व पक्षांनी सरकार स्थापनेविषयी असमर्थता दर्शविली तर राज्यपाल विधानसभा स्थगित करण्याची शिफारस करू शकतात. >>>> वाजपेयी सरकारने पण पहिल्यांदा आवाजी मतदान घेतले होते तेव्हा बालयोगी यांना ते मंजूर झाले म्हणता आले असते. पण ते वाजपेयी होते, असले टेक्निकल आणि घाणेरडे खेळ त्यांना मंजूर नव्हते . म्हणून आवाजी मतदानानंतरही जेव्हा मतदनाची मागणी झाली ती त्यांनी मंजूर केली. आवाजी मतदान हे संपूर्णपणे कायदेशीर व घटनेला धरून आहे. >>> आता मोदी आणि कंपनीचे पाय मातीचे आहेत त्याला कोण काय करणार. इथे मोदींच्या पायांचा काय संबंध? काल जे काही झाले ते पूर्णपणे कायद्याला व घटनेला धरून झाले आहे. याच्यात मातीचे पाय कोठून आले? >>> भाजपाचा काँग्रेसीकरण झालाय . सत्तेसाठी काय पण ! खाली म्हणले तसे रडीचा डाव ! आणि रेटून समर्थने ज्या प्रक्रियेची घटनेत तरतूद आहे व जी तरतूद या पूर्वी अनेक वेळा वापरली गेली आहे तो रडीचा डाव कसा होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Fri, 11/14/2014 - 11:07 नवीन
ज्या प्रक्रियेची घटनेत तरतूद आहे व जी तरतूद या पूर्वी अनेक वेळा वापरली गेली आहे तो रडीचा डाव कसा होतो?
सरकार पूर्ण बहुमतात आहे हे नक्की असेल तर ती सोय आहे. इथे सरकारचा बहुमत सिद्ध झालाच नव्हत . आणि आवाजी मतदानामधे नक्की कोणता निकष लावला गेला ? होय चा आवाज किती डेसिबल होता आणि नाही च किती डेसिबल ? आणि कहिजण समजा हो ओरडलेच नसतील किंवा पार्टी बदलून ओरडले असतील तर कसे कळणार ? भाजपाचे ऑन पेपर १४५ असते आणि लोकसभे प्रमाणे पूर्ण बहुमत असते तर कोणी आक्षेप घेतला नसता. आवाजी मतदानाची पळवाट काढणे अनैतिक आहे आणि भाजपाच्या नैतिकतेच्या मोठ्या गप्पा असतात म्हणून हा विरोधाभास जास्त जाणवला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 11/14/2014 - 16:36 नवीन
>>> सरकार पूर्ण बहुमतात आहे हे नक्की असेल तर ती सोय आहे. चूक. पूर्ण बहुमत असले किंवा नसले तरी घटनेनुसार आवाजी मतदान घेता येते. >>> इथे सरकारचा बहुमत सिद्ध झालाच नव्हत . आणि आवाजी मतदानामधे नक्की कोणता निकष लावला गेला ? होय चा आवाज किती डेसिबल होता आणि नाही च किती डेसिबल ? आणि कहिजण समजा हो ओरडलेच नसतील किंवा पार्टी बदलून ओरडले असतील तर कसे कळणार ? या सर्वांचा निर्णय सभापती करतात. >>> भाजपाचे ऑन पेपर १४५ असते आणि लोकसभे प्रमाणे पूर्ण बहुमत असते तर कोणी आक्षेप घेतला नसता. आवाजी मतदानाची पळवाट काढणे अनैतिक आहे आणि भाजपाच्या नैतिकतेच्या मोठ्या गप्पा असतात म्हणून हा विरोधाभास जास्त जाणवला . घटनेत काय नैतिक आहे व काय अनैतिक आहे अशी सब्जेक्टिव्ह व सापेक्ष कलमे नसतात. तिथे लोकशाही व्यवस्थेसाठी कायदे व नियम दिले आहेत. त्यानुसार आवाजी मतदान हे पूर्णपणे कायदेशीर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
द
दिवाकर देशमुख Sat, 11/15/2014 - 15:19 नवीन
तुमची जागा पक्की आता भाजपाचे प्रभारी म्हणुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मदनबाण गुरुवार, 11/13/2014 - 09:19 नवीन
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेसाठी तडजोडी करणाऱ्या भाजप सरकारचे मी तरी समर्थन करू शकणार नाही.तरीही यानिमित्ताने एक गोष्ट लिहावीशी वाटत आहे.पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे होते नाना फडणवीस.आपल्या मुत्सद्दीपणाने, बुध्दीमत्तेने आणि धूर्तपणाने अनेक राजकारणे त्यांनी लिलया पार पाडली. त्या नानांच्याच वंशजांपैकी देवेंद्र फडणवीस आहेत की नाही हे माहित नाही पण असेच धूर्त राजकारण खेळायची संधी त्यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या निमित्ताने आली आहे. पडद्यामागे काय झाले ते माहित नाही पण फडणवीसांनी किंवा अन्य कोणा भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नाही की त्यांच्यात काही बोलणी चालू आहेत असेही नाही.तर राष्ट्रवादीने पाठिंबा आपण होऊन देऊ केला आहे.त्यातून शिवसेनेकडील बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहेच.विश्वासमत संमत व्हायच्या आधीच फडणवीसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे १७० कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करायचा.तालुका पातळीवरील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे या समित्या म्हणजे पैसे खायचे कुरण होत्या हे सर्वमान्य आहेच.जर का सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या कुकर्मांवर फडणवीसांनी कारवाई सुरू केली तर राष्ट्रवादीचे हात दगडाखाली येतील हे नक्कीच.कारण त्या कारणावरून फडणवीसांचा पाठिंबा कसा काढणार? (१९९६-९७ मध्ये देवेगौडांनीही काँग्रेसचा पाठिंबा असतानाही काँग्रेसलाच अडचणीत आणायची खेळी केली होती त्याला समांतर खेळी करायची फडणवीसांकडे संधी आहे). आणि जर राष्ट्रवादीने पाठिंबा काढला आणि सरकार पडायची वेळ आली तर शिवसेनेची अवस्था त्या परिस्थितीत आणखी बिकट होईल. एकतर सरकारविरोधी मत देणे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने मत देणे आणि सरकारच्या बाजूने मत देणे म्हणजे भाजपपुढे आणखी नमते घेणे असा त्याचा अर्थ होईल. आणि फडणवीस परत ताठ मानेने निवडणुकांना सामोरे जाऊ शकतील. फडणवीसांना पाठिंबा शरद पवार का देत आहेत? कारण सहा महिन्यात परत निवडणुका झाल्या तर आपली खैर नाही हे त्यांना समजून चुकले आहे.हा पाठिंबा त्यांच्यासाठी फाशीचा दोर ठरवायची संधी फडणवीसांकडे आहे.
१००% सहमत. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेउन त्यांचीच चांगली पाचर मारली आणि याला व्यवस्थित प्रसिद्धी दिली गेली तर याचा मोठा फायदा भाजपला होइल असे मलाही वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership
  • Log in or register to post comments
स
समीरसूर गुरुवार, 11/13/2014 - 09:34 नवीन
एवढं किचकट राजकारण आहे हे? पण जनतेला इतकं नाही कळत. आज तरी भाजप आणि शिवसेना जनतेच्या रोषाचे धनी झालेले आहेत. उद्या जर पुन्हा निवडणूका झाल्या तर असंच काही होईल असं ठामपणे सांगता येत नाही. जनता कसा विचार करते हे राजकारण्यांचं राजकारण नाही ठरवत. एवढं सगळं कुटील कारस्थान रचण्यापेक्षा आधीच थोडा समंजसपणा दाखवला असता तर... मटामध्ये एक लेख आला होता. त्यात लेखकाने म्हटले होते की शरद पवारांना आपण एवढे धोरणी, मुत्सद्दी, मुरलेले राजकारणी म्हणतो. जे काही चाललं आहे त्यामागे शरद पवारांचाच हात आहे असं सगळे म्हणतात. शरद पवार जर एवढे पॉवरफुल आहेत तर त्यांना राष्ट्रवादीच्या ५० देखील जागा का नाही मिळवता येत? दर निवडणुकीला त्यांच्या जागा लक्षणीयरीत्या कमी कशा काय होत जातात? अजून एकदाही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का नाही होऊ शकला? त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्वाकांक्षेचं सोडून द्या. आता ते ही म्हणतील की मला कधीच पंतप्रधान व्हायचं नव्हतं म्हणून. :-) त्या लेखाचा रोख असा होता की प्रत्येक राजकीय घटनेचं विश्लेषण हे बरोबर असतंच असं नाही. मला वाटतं अतिकिचकट राजकारण खेळण्याच्या नादात पक्ष आपलं नुकसानच करून घेतात. शरद पवारांनी ते नेहमीच करून घेतलंय. म्हणून आजकाल स्वतःचा पक्ष नव्याने उभारण्यापेक्षा त्यांना नको त्या युक्त्या वापरून केवळ स्वार्थ साधण्यासाठी तग धरून रहावं लागतंय. पण हे फार काळ टिकणार नाही. अशा एक-दोन काड्यांवर फार काळ तरंगता येत नसतं. ही शेवटची स्वार्थ साधण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे. भाजप-शिवसेनेच्या मूर्खपणामुळे ती जनतेवर लादली गेली आहे इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/13/2014 - 10:35 नवीन
खरे तर ते राजकारण तेवढे किचकट नसतेच. शरद्चे म्हणतोस ते खरे आहे.पुलोदच्या स्थापनेच्यावेळी (१९७८ साली) अनेकांनी त्याचे मुत्सद्दी म्हणून तोंड भरून प्रशंसा केली होती. पण सध्याच्या राजकारण्यांची जातकुळी पाहिलीस तर तो अनेक बाबतीत उजवा ठरतो.देशाच्या राजकारणात मात्र राष्ट्रवादीचे राजकारण सपशेल फसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
म
मदनबाण गुरुवार, 11/13/2014 - 09:42 नवीन
सध्याच्या या घडामोडी पाहुन मला खव्यासाठी भांडणार्‍या बोक्यांची आणि माकडाची गोष्ट आठवली होती ! ;) Image removed. {चित्र जालावरुन घेतले आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/13/2014 - 09:46 नवीन
एकतर, भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितलेला नाही. राष्ट्रवादीने स्वतःहून तो घोषित केला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही राष्ट्रवादीने भाजपाच्या बाजूने मतदान केलेले नाही. राष्ट्रवादी त्यांच्या स्वघोषित पाठींब्याच्या धोरणानुसार 'तटस्थ' राहिले. बिजेपीच्या सांगण्यावरून नाही. राष्ट्रवादीचा पाठींबा आम्ही स्विकारला आहे असे अजून तरी भाजपने घोषित केलेले नाही. आता भाजपकडे ६ महिने आहेत आणि ८-१० आमदारांची गरज आहे. फोडतीलही ते एखाद्या पक्षातून.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 11/13/2014 - 10:08 नवीन
भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. ज्या मतदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस्च्या विरोधत मतदान केले हा त्या मतदारांचा विश्वासघात आहे. प्रादेशिक पक्ष : याबद्दलची मोदी शहा यांची भुमिका स्पष्ट आहे . हरयाणा , महाराष्ट्र आणि पंजाब मधे त्यांनी युती तोडली आहे. गोव्या मधे पण युती तोडली पाहिजे असे चालू आहे. त्यामुळे शिवसेनेने समंजसपणा दाखवूनही भाजपा ने युती टिकवलीच असती असे समजणे चुकीचे आहे. आता प्रश्न कालच्या गोंधळाचा : राजकीय समीकरणे काहीही असो , मी ज्यांच्या सोबत बोललो , चेपु वर, वैयक्तीक , किंवा आंजावर , सर्व सामान्य ( नमोरूग्ण नव्हे सामान्य !) लोकांचे एकच मत होते , भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला नको होता . यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर गुरुवार, 11/13/2014 - 10:31 नवीन
शिवसेना कितीका मूर्ख असेना, भाजप रडीचा डाव खेळली यात शंका नाही. आवाजी मतदान काय, मूग गिळून गप्प राहणे काय, अगदीच तांत्रिक बाबींचा आधार घेऊन कार्यभाग साधणे काय...मोदींच्या डरकाळी फोडून कामाला लागण्याच्या अगदीच विपरित असे हे महाराष्ट्र भाजपचे वर्तन होते. खेळतांना लहान मुले कशी बोटावरची थुंकी बदलतात तसा पोरखेळ केला भाजपने. आणि याचे नुकसान भाजपला भोगावेच लागणार. शिवसेनेइतकीच गोंधळाची अवस्था भाजपची होती. राष्ट्रवादीने काहीही केले तरी आश्चर्य वाटत नाही; सत्तेसाठी अक्षरशः 'काहीही' करणे हा त्यांचा धर्मच आहे. पण भाजपने हा जो रडीचा डाव खेळला तो काही पचनी पडला नाही. अजय जडेजाने फिक्सिंग केले तर काही विशेष वाटत नाही; सचिनने केले तर कसे वाटेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 11/13/2014 - 11:43 नवीन
अगदी हेच ! अ पार्टी विथ डिफरन्स आणि विपरीत वागणूक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
आ
आनन्दा गुरुवार, 11/13/2014 - 12:00 नवीन
ह्म्म.. काल माझ्या मनात देखील असेच विचार होते.. पण नंतर मी शांतपणे विचार केला की तसेही दगडापेक्षा वीट मऊ. त्यांनी सत्ता कशी मिळवली यापेक्षा ती कशी राबवली हे जास्त महत्वाचे आहे. तसेही त्यांनी केले ते नैतिकतेला धरून नसेलही, पण बाकीचे जे वागत होते ती कोणती नैतिकता होती? त्यामुळे सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉच असे ठरवले आहे, तसेही माझ्या दॄष्टीने ते याच्या पुढे कसे काम करतात हे महत्वाचे. आत्ता नेमके काय तोडपाणी झाले आहे ते पुढच्या निवडणूकीच्या वेळेसच बाहेर येईल. तोपर्यंत वाट पाहणे एव्हढेच आपल्या हातात आहे. आणि मुख्य म्हणजे, आत्ता अश्या प्रकारे सत्ता मिळवल्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण असणार आहे. जर काम नाही केले तर त्यांचा मफलरवाल होईलच, त्यामुळे मला वाटते भाजपा यावेळेस अधिक प्रामाणिकपणे सत्ता राबवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 16:22 नवीन
रडीच्या डावाचा प्रश्नच उद्भवत नाही. आवाजी मतदान हे पूर्णपणे कायदेशीर व घटनेला धरून आहे. यापूर्वी अनेकवेळा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला गेला आहे. भाजपने आवाजी मतदान प्रक्रिया वापरली तर तो रडीचा डाव कसा होतो? >>> शिवसेनेइतकीच गोंधळाची अवस्था भाजपची होती. भाजप मुळीच गोंधळलेला नव्हता. अगदी व्यवस्थित योजना आखून व आपल्याला हवी ती कायदेशीर व घटनात्मक प्रक्रिया वापरून भाजपने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतलेला आहे. >>> अजय जडेजाने फिक्सिंग केले तर काही विशेष वाटत नाही; सचिनने केले तर कसे वाटेल? ही तुलना चुकीची आहे. फिक्सिंग हे मुळातच बेकायदेशीर आहे व फिक्सिंग हा फौजदारी गुन्हा आहे. आवाजी मतदान हे कायदेशीर व घटनेला धरून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 11/13/2014 - 10:22 नवीन
श्रीगुरुजी - श्री गणेशा - श्री क्लिंटन वरिल सर्व प्रभुतींना माझा __/\/\__/\. वरिल सर्व प्रतिसादांचे वाचन करुन आमच्या राजकरणाविषयी ज्ञानात खुप भर पडत आहे. मला वाटते आज पर्यंत एकमेकांच्या विषयी मनात कसलेही किल्मिष न ठेवता फक्त ऊहापोह करण्याच्या उद्देशाने चाललेला प्रतिसादाला विनम्र प्रतिसाद देवुन आपले मुद्दे मांडत आहेत हा मि.पा च्या इतिसासात पहिल्यांदाच ठरतोय. इतर कोणी ही ह्या धाग्यावर उगाच भरकटवुन त्याची खिल्ली उडवु नये. स.पा मंडाळाला विनंती की अशा प्रतिसादाला पंख लावावेत.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 11/13/2014 - 10:54 नवीन
मराठी माणसाच्या आवडीच्या क्षेत्रापैकी एक म्हणजे राजकारण. आजच्या राजकारणातील इतके असंख्य कंगोरे असू शकतात आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध उलगडून सांगण्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन. माझ्याही ज्ञानात भर पडली आहे हे मी नमूद करु इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 10:25 नवीन
>>> भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. स्वत:ची ताकद भाजपच्या तुलनेत खूप कमी असताना स्वतः जास्त जागा लढविण्याचा हट्टाग्रह धरून बसणे आणि एकदा युती तुटल्यावर व्यक्तिगत पातळीवर उतरून असभ्य व नकारात्मक प्रचार करणे ही कोणाची चूक होती? राजधर्म पाळणे म्हणजे नक्की काय? एकदा युती तुटल्यावर भाजपने समंजसपणे शिवसेनेवर टीका न करता युतीधर्म पाळला होता. उलट शिवसेनेलाच युती तुटल्याचे वास्तव मानवले नाही व त्यांनी भाजपला मुख्य शत्रू मानून असभ्य व व्यक्तिगत टीका सुरू केली. राजधर्म भाजपनेच पाळला. शिवसेनेला ते जमले नाही. >>> जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे. त्यावर भाजपने भूमिका घेण्यासारखे काहीही नव्हते. एखाद्या सज्जन उमेदवाराला निवडणुकीत गावातल्या गुंडांनी स्वतःहून मत दिले म्हणजे त्या माणसाने त्यांचा पाठिंबा घेतला असा अर्थ होत नाही. राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या एकतर्फी पाठिंब्याचा भाजपने अधिकृत स्वीकार न करता किंवा अधिकृतपणे न नाकारता शिवसेनेला नमविण्यासाठी योग्य तो उपयोग करून घेतला. >>> प्रादेशिक पक्ष : याबद्दलची मोदी शहा यांची भुमिका स्पष्ट आहे . हरयाणा , महाराष्ट्र आणि पंजाब मधे त्यांनी युती तोडली आहे. गोव्या मधे पण युती तोडली पाहिजे असे चालू आहे. पंजाब व गोव्यात प्रादेशिक पक्षांबरोबर युती शाबूत आहे. >>> त्यामुळे शिवसेनेने समंजसपणा दाखवूनही भाजपा ने युती टिकवलीच असती असे समजणे चुकीचे आहे. शिवसेनेने समंजसपणा दाखवून भाजपची १२५-१३० जागांची मागणी मान्य केली असती तर युती १०० टक्के टिकली असती. >>> राजकीय समीकरणे काहीही असो , मी ज्यांच्या सोबत बोललो , चेपु वर, वैयक्तीक , किंवा आंजावर , सर्व सामान्य ( नमोरूग्ण नव्हे सामान्य !) लोकांचे एकच मत होते , भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला नको होता . यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे. भाजपला शिवसेना पाठिंबा देणार नाही, भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा नाही अशा परिस्थितीत सरकार स्थापन न करणे हा एकच पर्याय शिल्लक होता. भाजपने राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या पाठिंब्याची कमीतकमी गरज पडावी या दृष्टीने ९ अपक्ष व इतर लहान पक्षांच्या ५-६ आमदारांचा आधीच पाठिंबा मिळविला आहे. राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा दिलेला आहे. भाजपने तो मागितलेला नाही.
  • Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख गुरुवार, 11/13/2014 - 10:37 नवीन
आता तुम्ही भाजपाचे अधिकृत प्रभारी होण्याच्या मार्गावर आहे. थोडा अजुन लांगुलचालन करा. टिव्हीवर संधी मिळेल कारण इतकी भक्ती सध्या असणारे प्रभारी देखील दाखवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 16:24 नवीन
*LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर देशमुख
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 11/13/2014 - 16:30 नवीन
>>>लांगुलचालन करा अत्यंत चुकीचा आणि हीन पातळीवरील शब्दप्रयोग. समंने लक्ष द्यावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर देशमुख
द
दिवाकर देशमुख Sat, 11/15/2014 - 15:21 नवीन
हा शब्द तर पेपरात देखील असतो पेपर वाचत नाहीत का ? कैच्याकै खुसपट काढुन राहिले राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sun, 11/16/2014 - 04:28 नवीन
>>>>>हा शब्द तर पेपरात देखील असतो पेपर वाचत नाहीत का ? 'लांगूलचालन' हा शब्द मी कधी ऐकला नाही असा अर्थ तुम्ही काढता आहात. माझं वाक्य नीट वाचलंत तर कळेल, शब्द पहिल्यांदाच ऐकला असे म्हंटलेले नाही तर ह्या शब्दाचा 'प्रयोग' इथे अप्रस्तुत आहे असे म्हंटलेले आहे. 'लांगूलचालन' स्वार्थासाठी, सर्व लाजलज्जा सोडून, केले जाते. इथे तसे दिसत नाही. श्री. गुरुजी ह्यांचा एकूण घटनाक्रमाच्या विश्लेषणात कांही स्वार्थ दिसत नाही. म्हणून शब्दप्रयोग चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर देशमुख
द
दिवाकर देशमुख Sun, 11/16/2014 - 06:12 नवीन
आता अर्थ नेमका बसला. ज्यापद्दतीने डिफेंस करत आहेत त्यावर हा अतिउत्कृष्ट शब्द आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
क
कपिलमुनी गुरुवार, 11/13/2014 - 10:41 नवीन
राजधर्म पाळणे म्हणजे नक्की काय ? १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. >>राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. >>>राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या एकतर्फी पाठिंब्याचा भाजपने अधिकृत स्वीकार न करता किंवा अधिकृतपणे न नाकारता शिवसेनेला नमविण्यासाठी योग्य तो उपयोग करून घेतला. शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 16:35 नवीन
>>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. याची गरजच नव्हती. घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत. >>> २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. सत्य म्हणजे नक्की काय सांगायचं आहे? >>> ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते. >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >>> शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले. ठाणे (राम कापसे), शिवाजीनगर (अण्णा जोशी) अशा अनेक मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत करून आपला पक्ष वाढविला. पण युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून हे मतदारसंघ लाटले. भाजपने संधी मिळताच आपले सामर्थ्य वाढवून सेनेचे जोखड मानेवरून उतरविले. >>> मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे. सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
आ
आनन्दा गुरुवार, 11/13/2014 - 16:55 नवीन
>> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही.
याच्याशी असहमत. बाकी ठीक आहे. भाजपाने तो पाठिंबा स्वीकरला आहे की नाही हे लवकरच कळेल, स्वीकारला नसेल तर तसे त्यांना आता कृतीतून सिद्ध करावे लागेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Fri, 11/14/2014 - 11:28 नवीन
>>घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत. मला याबद्दल माहीती नाही . पण पूर्वी स्पष्ट बहुमत नसताना अशी यादी कीम्वा पाठिंब्याचे पत्र दिल्याचे स्मरते . विदा शोधून देतो. >>> २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. सत्य म्हणजे नक्की काय सांगायचं आहे? तुमच्याकडे नक्की किती आमदार आहेत , कोण तटस्थ आणि कोण विरोधी आहे. >>> ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते. >>> अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच . >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >> तुम्हाला गरज वाटत नसेल पण या धाग्यावर आणि इतर अनेक लोकांना ती वाटत आहे . आणि पारदशिकतेच्या मुद्द्यावर ते कळालेच पाहिजे. >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >> पूर्वी ज्या आरक्षणांना भाजप विरोध करत होती त्याला राज्य सरकार आज सपोर्ट करत आहे. आणि बाकी अजित पवार , भुजबळ , तटकरे यांच्या अटके नंतर बोलूच ( कोण हसतय रे तिकडे ;) ) >>> शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले. ठाणे (राम कापसे), शिवाजीनगर (अण्णा जोशी) अशा अनेक मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत करून आपला पक्ष वाढविला. पण युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून हे मतदारसंघ लाटले. भाजपने संधी मिळताच आपले सामर्थ्य वाढवून सेनेचे जोखड मानेवरून उतरविले. >> भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती .. याचे उत्तर शेवटपर्यंत दिलेच नहीत . आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा . >>> मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे. सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत. अहो हेच तर अजून कोणी बोलला नाहिये ना ! राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असे ते सांगत आहेत . फडणवीस यांनी आम्ही तो स्वीकारला नाहीये असा स्टेट्मेंट दिला नाहिये अजून. ठरावानंतर असे स्टेट्मेंट दिले असेल तर दाखवा . आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
क्लिंटन Fri, 11/14/2014 - 14:35 नवीन
वरील प्रतिसादात बर्‍याच गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे वाटते.
मला याबद्दल माहीती नाही . पण पूर्वी स्पष्ट बहुमत नसताना अशी यादी कीम्वा पाठिंब्याचे पत्र दिल्याचे स्मरते . विदा शोधून देतो.
कोणाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करायचे हा राष्ट्रपतींचा/राज्यपालांचा विशेषाधिकार असतो. के.आर.नारायणन यांनी १९९८ मध्ये सरकार स्थापन करायला वाजपेयींना आमंत्रित केले त्यापूर्वी समर्थनाची पत्रे घेतली होती.हा मार्ग नारायणन यांना योग्य वाटला.पण तसे राष्ट्रपती/राज्यपालांनी केलेच पाहिजे असा घटनात्मक दंडक अजिबात नाही.
जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते.
हे नक्की कोणत्या आधारावर लिहिता?तो रेफरन्स सांगा मग पुढील चर्चा (गरज पडल्यास) करता येईल.
अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच .
एक गोष्ट समजत नाही आवाजी मतदान या गोष्टीविषयी परवापासून अचानक आक्षेप का उफाळून आले आहेत? आवाजी मतदान ही पूर्णपणे संकेतांना आणि लोकशाहीच्या स्पिरीटला धरूनच असलेली संकल्पना आहे.
आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा .
शिवसेनेचे जोखड भाजपने फेकून द्यायला हवे होते का? असल्यास कधी? या प्रश्नाची उत्तरे भाजपच्या नेतृत्वावरच सोडलेली बरी नाही का? एक गोष्ट समजत नाही.भाजपने काय करायला हवे याची इतरांनाच काळजी फार जास्त असते. मागच्या वर्षीही मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तेव्हा सुषमा स्वराज का नाहीत, शिवराजसिंग चौहान का नाहीत, उत्तर प्रदेशातील कोणी नेता का नाही, अमका का नाही, तमका का नाही असे एकना दोन हजार प्रश्न भाजप बाहेरच्यांनाच पडलेले होते.आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवाणींच्या घरासमोर निदर्शने करून सांगितलेच की आणि तो सिग्नल पक्ष नेतृत्वाने मान्य केला. तुम्हाला मोदी मान्य नसतील तर मत देऊ नका.भाजपाने काय करावे याची फुकटची चिंता इतरांना कशाला? त्याचप्रमाणे शिवसेनेशी युती तोडायला हवी होती का नाही, कधी याची चिंता इतरांना कशाला?
आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ?
ठिक आहे ना. १३५ हे बहुमत नसेल तरी अल्पमतातील सरकार तर आहेच ना. नरसिंह रावांचेही सरकार पहिले अडीच वर्षे अल्पमतात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
क्लिंटन Fri, 11/14/2014 - 14:42 नवीन
आणि हो. फडणवीसांनी अल्पमतातले सरकार चालविले आणि ते चालले आणि सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी केल्या नाहीत तर माझे स्वतःचे तरी या सरकारविषयी आक्षेप राहणार नाही.पण तशा कोणत्याही तडजोडी केल्या जात नाहीत हे दाखवून द्यायची जबाबदारी मात्र फडणवीसांचीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ह
हाडक्या Fri, 11/14/2014 - 15:29 नवीन
+१ .. क्लिंटन, आपली मते बर्‍याच अंशी पटतायत. जरी भाजपबद्दल आदर एवढा नसला तरी या घटनाक्रमाने तो थोडा कमीच झलाय असे म्हणेन. याउप्पर आपण म्हणता तसे फडणवीस सरकार कसे ही जबाब्दारी (तडजोडी करत नाही आहोत हे दाखवण्याची) त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. (जाता जाता थोडे अवांतर : याच प्रकारच्या प्रसंगातून केजरिवाल पण गेले होते, तेव्हा त्यांनी आवाजी मतदानाचा सेफ मार्ग घ्यायला हवा होता असे वाटतेय, पण ते राजकीय चातुर्यात कमी पडले असावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जे लोक आत्ता या सरकारसाठी वाट बघायला तयार आहेत तेच लोक मात्र तेव्हा 'काँग्रेसची बी-टीम' म्हणायला दोन दिवस पण थांबले नव्हते असे निरिक्षण नोंदवतो. ;) 'शेवटी आपला तो बाब्या' हे अभ्यासू विश्लेषकांनाही सुटलेले नाही तर.. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 11/14/2014 - 18:14 नवीन
आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जे लोक आत्ता या सरकारसाठी वाट बघायला तयार आहेत तेच लोक मात्र तेव्हा 'काँग्रेसची बी-टीम' म्हणायला दोन दिवस पण थांबले नव्हते असे निरिक्षण नोंदवतो. Wink 'शेवटी आपला तो बाब्या' हे अभ्यासू विश्लेषकांनाही सुटलेले नाही तर..
नाही हो इतरांचे माहित नाही. आणि मी अभ्यासू आहे की विश्लेषक आहे की दोन्ही नाही हे मला माहित नाही.तरीही हा उपप्रतिसाद माझ्या प्रतिसादावर दिला आहे तेव्हा माझ्यापुरते तरी सांगतो.कोणत्याही पक्षाविषयीची मते बनविताना तो पक्ष नक्की कोणते पॅकेज देत आहे आणि त्या पॅकेजची अंमलबजावणी करायची त्या पक्षाची आणि नेत्याची क्षमता आहे की नाही या गोष्टी बघून मी माझी मते ठरवत असतो.पॅकेजमधील सगळ्या गोष्टी मला मान्य असतीलच असे नाही आणि एखाद्या पक्षाच्या पॅकेजमधल्या चार गोष्टी मला आवडल्या नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षाच्या पॅकेजमधल्या ४० गोष्टी आवडत नसतानाही त्या दुसऱ्या पक्षाचे समर्थन मला तरी करता येत नाही. मुळातच अण्णांचे आंदोलन आणि जनलोकपालची स्वप्नाळू मागणी या दोन्ही गोष्टींचा अगदी मी पहिल्या दिवसापासून विरोधक होतो.ते त्यावेळी मी मिसळपाववरही लिहिले होते.त्याच आंदोलनातून पुढे आलेल्या आम आदमी पक्षाविषयी माझे तरी चांगले मत असायचा संबंधच नव्हता.तसेच प्रशांत भूषण सारख्यांनी काश्मीरवरती उधळलेली मुक्ताफळे मला तरी अजिबात मान्य नव्हती.आणि मुळातल्या नव्या पक्षात त्याच प्रशांत भूषण सारख्यांना महत्वाचे नेतेपद दिले गेल्यामुळे आआपचे समर्थन मी करूच शकत नव्हतो.आणि त्यातून वीजेची बिलेच भरू नका, तोडलेले मीटर स्वत: जोडणे अशा अराजकतावादी प्रकारामुळे त्या पक्षाविषयी मत आणखी वाईट झाले.तेव्हा त्या पक्षाचे पॅकेज मला मुळातच आवडलेले नव्हते. तेव्हा माझे मत ज्या पक्षाविषयी मुळातच वाईट मत होते त्या पक्षाने परत कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला हा एक ट्रिगर होता असे म्हणता येईल फारतर. कदाचित आआप जर आर्थिकदृष्ट्या उजवा आणि राष्ट्रवादी असता आणि नंबर मिळवायला कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला असता तर कदाचित मी त्या पक्षाला कॉंग्रेसची बी टिम असे म्हटलेही नसते. आणि समजा आआपला स्वबळावर बहुमत मिळाले असते आणि कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला नसता तरी त्या पक्षाचे पॅकेज मला मुळातच मान्य नसल्यामुळे त्या परिस्थितीतही त्या पक्षावर मी टिकाच केली असती--कॉंग्रेसची बी टिम असे म्हटले नसते तर दुसरे काही म्हटले असते.हे आत्याबाईला मिशा असत्या तर अशा टाइपचे झाले तरीही मला वाटते माझा मुद्दा मी स्पष्ट केला आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीशी तुलना केल्यावर असे दिसते की भाजपच्या पॅकेजमध्ये राष्ट्रवादी ही मोठी पोखरणारी अळी आली आहे ती सगळ्या गोष्टींचा सत्यानाश करू शकेल.त्यामुळे महाराष्ट्र लेव्हलवर तरी वरकरणी कितीही चांगले वाटणारे पॅकेज भाजप देत असेल तरीही ती अळी आहे तोपर्यंत त्या पॅकेजवर विश्वास वाटणार नाही.तरीही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर नक्कीच विश्वास आहे.त्यामुळे पक्ष म्हणून अजून तरी माझे मत विधानसभा लेव्हलला भाजपला समर्थन न द्यायचे असले तरी लोकसभा निवडणुकांसाठी नक्कीच तसे नाही. आता हा प्रकार म्हणजे 'आपला तो बाब्या' असा होतो की नाही मला माहित नाही आणि ते माहित करून घेण्यात फारसा रसही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
अ
अनन्त अवधुत Fri, 11/14/2014 - 22:16 नवीन
+१ मला भाजपा + राष्ट्रवादी हि युती फारच अनैसर्गिक वाटते (अजूनही). सुबोध खरे यांचा "भाजपा कडे याच्या पेक्षा चांगला पर्याय उपलब्ध पर्याय नाही" हे विश्लेषण पटले. जोवर सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी केल्या नाहीत तर माझे स्वतःचे तरी या सरकारविषयी आक्षेप राहणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ह
हाडक्या Sat, 11/15/2014 - 17:58 नवीन
एवढाच साधक बाधक विचार 'आप' साठी का बरे कोणी केला नसावा असा प्रश्न पडतो. ते ही अशाच अगदी अश्शाच प्रसंगातून गेले होते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
क
कपिलमुनी Wed, 11/19/2014 - 10:14 नवीन
>>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. याची गरजच नव्हती. घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत.
असे श्रीगुरुजींनी लिहिले होते. मला नक्की रेफरन्स ( १९९८ चा ) आठवत नव्हता.
पण तसे राष्ट्रपती/राज्यपालांनी केलेच पाहिजे असा घटनात्मक दंडक अजिबात नाही.
तसे असेल तर ठीकच आहे . पण शेवटी मुद्दा तोच येतो सध्याचे सरकार तांत्रिक द्रूष्ट्या बहुमतात आहे पण नैतिकतेचे काय ? ( ती बासनात गुंडाळली आहेच ) सध्या पवारांनी राष्ट्रवादी तटस्थ होती असे सांगून संभ्रम दूर केला . पण मुख्यमंत्र्यांचे हे काम होते की नक्की किती आमदार त्यांच्या सोबत आहेत ते जनतेला सांगितले पाहिजे.
जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते.
हे श्रीगुरुजींनी लिहिले आहे . त्याचे स्पष्टीकरण ते देतीलच !
एक गोष्ट समजत नाही आवाजी मतदान या गोष्टीविषयी परवापासून अचानक आक्षेप का उफाळून आले आहेत? आवाजी मतदान ही पूर्णपणे संकेतांना आणि लोकशाहीच्या स्पिरीटला धरूनच असलेली संकल्पना आहे.
आवाजी मतदानाला आक्षेप मुळीच नाहिये. आ़क्षेप संभ्रमावस्थेला, अपारदर्शकतेला आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याबद्दल आहे . मतदानाच्या अगोदर किंवा मतदानानंतर मुख्यमंत्र्यांनी / अध्यक्षांनी सांगितला असता , राष्ट्रवादी तटस्थ राहिली आहे तर ते एव्ढा गदारोळ झालाच नसता. लोकसभेमधे पण आवाजी मतदानच झाले तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नाही. कारण स्पष्ट बहुमत होते. सरकार निवडण्याची प्रक्रिया शक्यतो संशयातीत असावी एवढीच अपेक्षा . एक्दा बहुमत सिद्ध झाले की पुढे ५ वर्ष आवाजी मतदान चालतेच.
आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा
शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले.
श्रीगुरुजींचा शिवसेनेबद्दल बराच त्रागा चालला होता, आता ते अधिकृत प्रवक्ते असल्याने विचारले , एव्ढा त्रास , मानहानी होती तर अगोदरच जोखड फेकायचा . भाजपाने काय करावे हा पक्षाचा प्रश्न आसला तरी ते आमच्याकडे मत मागायला येतात , त्यामुळे त्यांच्या भुमिकेवर मतप्रदर्शन करणे ( आवडली तर आवडली , नाही आवडली तर नाही ) हा मतदारांचा हक्कच आहे.
शिवसेनेशी युती तोडायला हवी होती का नाही, कधी याची चिंता इतरांना कशाला?
कारण लोकसभेला यांनी सेनेशी लग्न लावल्याने आमच्याकडे सेनेचा खासदार आहे आणि आता भाजपाचा आमदार म्हणून चिंता , यांच्या कोलांट्याउड्यामुळे लोकांचा नुकसान होतय .
१३५ हे बहुमत नसेल तरी अल्पमतातील सरकार तर आहेच ना
अल्पमतातील सरकारला मुळीच विरोध नाही. कित्येक अल्पमतातील सरकारांनी आपले कालखंड यशस्वी पूर्ण केले अहेत. पण मग फडणवीस बहुमताचा दावा का करत होते ? त्यांनी कुठेही सांगितला नाही , माझे सरकार अल्पमतातील आहे किंवा राष्त्रवादी तटस्थ आहे. बादवे , तुमचा अभ्यास खूप आहे म्हणून एक शंका, काँग्रेसचे ५ आमदार निलंबित आहेत, समजा अजून ५ म्हणजे एकूण १० आमदार निलंबित झाले तर २७७ पैकी १३९ आमदारांचे मत मिळाले तर बहुमत सिद्ध होउ शकते का ? निलंबित आमदारांस मतदानाचा हक्क असतो का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा