शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले
सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै. गोपीनाथ मुंड्यांनी जाहीररित्या सांगितले होते. केंद्रात सेनेला अत्यंत बिनमहत्त्वाचं फक्त १ मंत्रीपद देऊन भाजपने आपलं भविष्यातील धोरण स्पष्ट केलं होतं. भाजपचे धोरण ओळखूनच शिवसेनेने आपल्या चाली आखायला हव्या होत्या. परंतु सेना नेते आपल्याच अहंकारात, भ्रमात व नसलेल्या ताकदीच्या जोषात राहिले.
भाजप जास्त जागा लढविण्यासाठी दबाव आणणार हे मे २०१४ मध्येच स्पष्ट झाले होते. अशावेळी मे ते सप्टेंबर या काळात शिवसेनेने धोरणीपणे विचारमंथन करून आपले डावपेच आखायला हवे होते.
११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन भाजपचे समाधान करावे, आपण कधीच निवडून आलो नाही व ज्या जागा भाजपलाही जिंकणे अशक्य आहे अशा जागा देऊन त्याग केल्याचा आव आणावा, ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन त्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे देण्याचे जाहीर आश्वासन भाजपकडून घ्यावे व त्या बदल्यात केंद्रात जास्त व महत्त्वाची मंत्रिपदे मागून घ्यावीत, हे सुरू असतानाच मनसे व इतर काही स्थानिक पक्षांशी बोलणी करून भाजपविरूद्ध पर्यायी आघाडी तयार करावी असे अनेक पर्यात शिवसेनेला उपलब्ध असताना शिवसेना नेते गाफील राहिले.
भाजप कदापिही युती तोडणार नाही, ज्या भाजपला आपण २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले आहे तो भाजप यापुढेही आपल्याच तालावर नाचत राहील, आपण म्हणू तसेच होईल या भ्रमात शिवसेना नेते राहिले. सुरेश प्रभू, मनोहर जोशी इ. समंजस नेत्यांना वाळीत टाकून उद्धव ठाकरे अत्यंत उथळ, वाचाळ, अविचारी असलेल्या व अजिबात दूरदृष्टी नसलेल्या संजय राऊत, रामदास कदम, रावते, प्रेम शुक्ला इ. नेत्यांवर विसंबून राहिले व त्याची फळे शिवसेनेला मिळाली.
४ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार होते. त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर येऊन आपली भेट घ्यावी अशी उद्धव ठाकर्यांची इच्छा होती. परंतु त्यांनी अमित शहा व मोदी या जोडगोळीला ओळखण्यात चूक केली. हे दोघे भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे प्रादेशिक पक्षांपुढे झुकणारे नसून अत्यंत धोरणी व प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व सहन न करणारे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाहीत. अमित शहा मुंबईत येऊन उद्धव ठाकर्यांना भेटणार नाहीत हे समजल्यावर तिळपापड होऊन शिवसेनेने 'शहाणा हो' ही पोस्टर्स सोशल मिडियातून पाठवायला सुरूवात करून त्यांना डिवचले. अमित शहांना डिवचणे म्हणजे थेट मोदींनाच डिवचण्यासारखं होतं हे सेना नेतृत्वाला कधी समजलंच नाही. अमित शहांनी शहाणपणा दाखवून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यावर शेवटी उद्धव ठाकर्यांना अमित शहांना मातोश्री भेटीचे सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवावं लागलं आणि इथेच शिवसेना झुकायला आणि डाव हरायला सुरूवात झाली.
नंतर प्रत्यक्ष जागावाटपाची बोलणी सुरू असताना सुरवातीला भाजपने १३५-१३५-१८ असा फॉर्म्युला सुचविला होता. भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत दीडपट होती. त्यानुसार भाजप १६०-१७०, शिवसेना १००-११० व मित्रपक्ष १८ असेच जागावाटप हवे होते. असे असतानाही भाजपची मागणी जास्तीत जास्त १३५ जागांची होती. नंतरच्या चर्चेत भाजप १३०-१४०-१८ व त्यानंतर १२५-१४५-१८ इतका खाली उतरला होती. शिवसेनेला ही उत्कृष्ट संधी होती. भाजप १२५ जागा लढवत असल्याने भाजपला जास्तीत जास्त १०० जागा जिंकता आल्या असत्या व त्यामुळे भाजप बहुमतापासून खूप दूर राहिला असता (आता भाजपने १२२ जागा जिंकल्याने फार थोड्या जागांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज आहे.). शिवसेनेला १४५ जागा लढवून कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची व पर्यायाने मुख्यमंत्रीपद मिळविण्याची संधी होती. जरी भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तरी उपमुख्यमंत्रीपद व इतर अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली असती. युती करून एकत्र लढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी ला प्रत्येकी ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या व राष्ट्रवादीला खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला पाठिंबा देउन उपयोगच झाला नसता. पर्यायाने भाजपला सर्वार्थाने शिवसेनेवरच अवलंबून रहावे लागले असते.
दुर्दैवाने उद्धव ठाकरे स्वतःच्या अहंकाराचे बळी ठरले. युती तुटल्यावर सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे मनसेबरोबर नवीन आघाडी त्यांना करता आली नाही. भाजपने आधीच योजना आखून सर्व मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला वळवून शिवसेनेला पूर्ण एकाकी पाडले.
युती तुटली ही वस्तुस्थिती मान्य करून हे वास्तव समंजसपणे स्वीकारण्याऐवजी शिवसेनेने प्रचारात असभ्य पातळी गाठली. सामनातून व सभांमधून सातत्याने अमित शहा व मोदींना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत असभ्य व नकारात्मक प्रचार केला गेला. त्यांच्याबरोबरीने मित्रपक्षांचे राजू शेट्टी, रामदास आठवले, जानकर इ. ना ही लक्ष्य केले. शेवटी खडसेंविरूद्धही अत्यंत नकारात्मक प्रचार केला. महाराष्ट्रातील लोकांना मोदी हवे आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातून मुक्ती हवी आहे हे सेनेने न ओळखता काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी भाजपलाच आपला मुख्य शत्रू मानण्याची घोडचूक केली. मोदींना अफझलखानाची उपमा देणे, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहाची उपमा देणे, मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार करणे, आदित्य ठाकरे सारख्या पोराला चर्चेसाठी पाठविणे अशा अनेक घोडचुका सेनेने केल्या.
याउलट भाजपने समंजसपणे शिवसेनेच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून आपला सकारात्मक प्रचार सुरू ठेवला व सेनेचे आपोआप खच्चीकरण होत गेले. त्याचेच परीणाम निकालात दिसले. भाजपच्या तुलनेत जेमतेम निम्म्या जागा मिळवून युतीतला मोठा भाऊ खरोखर कोण होता याचे जनतेनेच उत्तर दिले.
तरीही भाजपला स्पष्ट बहुमत न मिळणे व आपल्याकडे तब्बल ६३ आमदार असणे हे शिवसेनेकडे हुकमी एक्के होते. त्यांनी आपली पाने नीट खेळली असती तर त्यांना बर्याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. कदाचित सेनेला अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदही मिळविता आले असते.
ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले. भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले.
भारतीय मतदार व्यक्तिगत असभ्य टीका व नकारात्मक प्रचार कायमच नाकारतो हे शिवसेनेच्या पराभवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
शिवसेनेच्या जागी मायावती असती तर तिने अत्यंत चातुर्याने पत्ते खेळून स्वत:च्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. किंवा राकाँ, काँ बरोबर मोट बांधून स्वतःचाच मुख्यमंत्री बनविला असता. दुर्दैवाने शिवसेना नेत्यांकडे धोरणीपणाचा संपूर्ण अभाव व अहंकार, स्वतःच्या नसलेल्या ताकदीबद्दल भ्रम, उर्मटपणा, अविचारीपणा, प्रक्षोभक शब्द, उथळ्पणा व असंमजपणा याशिवाय दुसरे काहीच नसल्याने शिवसेना युद्ध हरलीच पण तहातही हरली.
ही निवडणुक शिवसेनेच्या अंताचा प्रारंभ ठरणार असे आता वाटत आहे.
💬 प्रतिसाद
(256)
क
क्लिंटन
Wed, 11/19/2014 - 10:59
नवीन
भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे.आणि सगळे पक्ष त्या गुन्ह्यात कमीअधिक प्रमाणात सहभागी आहेत. लोकसभा आणि राज्यसभा मिळून सुमारे ८०० तर विविध विधानसभांमध्ये मिळून ३००० असे ३८०० शत प्रतिशत स्वच्छ चारित्र्याचे निस्पृह प्रतिनिधी आपल्याला १२० कोटींच्या भारतात मिळत नाहीत याचा अर्थ आपणही त्या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे सामील आहोत.असो.
तांत्रिकदृष्या अल्पमतातील सरकारही पराभव होत नाही तोपर्यंत सत्तेत राहू शकते. १९९१ ते १९९३ या काळात नरसिंह रावांकडे बहुमत नव्हते तरीही त्यांच्या सरकारचा पराभव झाला नव्हता म्हणून ते अल्पमतातील सरकारही सत्तेत टिकून होते.
असे कधीही होऊ शकते.सांगलीत प्रथमच भाजपने लोकसभेची जागा जिंकली पण तासगावमधून आर.आर आबाच निवडून गेले.
हा राजकारणाचाच भाग असायची शक्यता जास्त. अशा अनेक गोष्टी राजकारणी उघड करत नसतात. १९९८ मध्ये तेलुगु देसमचे जी.एम.सी बालयोगी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडून गेले त्यावेळी तेलुगु देसम भाजपप्रणीत आघाडीचा भाग बनणार की नाही हे दोन्ही पक्षांनी उघड केले नव्हते. पहिल्यांदा तेलुगु देसम तटस्थ राहणार असे सांगितले जात होते. वाजपेयींच्या विश्वासदर्शक ठरावावर सरकारला २७४ आणि विरोधात २६१ मते मिळाली. सरकारला २७४ हा आकडा आला याचाच अर्थ तेलुगु देसमच्या इतर ११ (अध्यक्ष वगळून) खासदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले हे स्पष्ट झाले.त्यावेळीच पक्षाची भूमिका कळली. १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी मतदान झाले होते शनीवार १७ एप्रिल १९९९ रोजी. त्याच्या आधल्या दिवशी रात्री उशीरा मायावतींनी त्यांच्या पक्षाचे पाच खासदार तटस्थ राहतील असे लोकसभेत जाहिर केले होते (यह लडाई सापनाथ और नागनाथ के बीच मै है. हम इस लडाई मै किसी का पक्ष नही ले सकते). तरीही आयत्या वेळी मायावतींच्या पाच खासदारांनी सरकारविरोधी मत दिले. प्रत्येक वेळी नेत्यांनी जे काही ठरले असेल ते जगजाहीर करावे ही अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. प्रतिपक्षाची दिशाभूल करायला असे कात्रजचे घाट मधूनमधून दाखविले जातातच.
नाही निलंबित आमदारांना मतदानाचा हक्क नसतो. बहुमत म्हणजे सभागृहात हजर असलेल्या सदस्यांपैकी जितके सदस्य मत देतात त्यात सरकारच्या बाजूने जास्त मते मिळणे. ही मते एकूण सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असतीलच असे नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/14/2014 - 16:31
नवीन
>>> अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते.
आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई.
कार्यक्रम पत्रिकेवरील पहिला विषय सभापतींची निवड हा होता. तो त्या क्रमानुसारच पार पडला. आपले उमेदवार मागे घेऊन शिवसेना व काँग्रेसने भाजपकडे पुरेसे बहुमत आहे हे मान्य केले होते.
दुसरा विषय हा विरोधी पक्षनेत्याची निवड होता व तिसरा विषय विश्वासदर्शक ठरावावरील मतदान होता.
जोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कोण व विरोधात कोण हे नक्की होत नाही तो पर्यंत अधिकृत विरोधी पक्ष कोण हे ठरू शकत नव्हते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानानंतरच अधिकृत विरोधी पक्ष कोणता हे ठरणार होते. त्यामुळे दुसर्या व तिसर्या विषयांची अदलाबदल हा योग्य निर्णय होता.
>>> हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्यांसाठी , चलाखी करणार्यांसाठी या अपेक्षा नाहीतच .
नैतिक/अनैतिक या सापेक्ष कल्पना आहेत. घटनेत नैतिक/अनैतिकतेची व्याख्या नाही.
__________________________________________________________________________
>> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे
>> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे
एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही.
>> तुम्हाला गरज वाटत नसेल पण या धाग्यावर आणि इतर अनेक लोकांना ती वाटत आहे . आणि पारदशिकतेच्या मुद्द्यावर ते कळालेच पाहिजे.
राष्ट्रवादीचा पाठिंबा दुर्लक्षिलेला आहे.
_________________________________________________________________________
____________________________________________________________________________
>>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा.
आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच.
नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा.
>> पूर्वी ज्या आरक्षणांना भाजप विरोध करत होती त्याला राज्य सरकार आज सपोर्ट करत आहे.
आणि बाकी अजित पवार , भुजबळ , तटकरे यांच्या अटके नंतर बोलूच ( कोण हसतय रे तिकडे )
कोणती आरक्षणे?
____________________________________________________________________________
>> भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती .. याचे उत्तर शेवटपर्यंत दिलेच नहीत .
भाजप मला विचारून इतरांना मंत्रीपदे देत नाही किंवा इतरांच्या मंत्रीपदांची संख्या मी ठरवित नाही.
>>> आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा .
हे भाजपलाच ठरवू द्यात.
>>> सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत.
> अहो हेच तर अजून कोणी बोलला नाहिये ना ! राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असे ते सांगत आहेत . फडणवीस यांनी आम्ही तो स्वीकारला नाहीये असा स्टेट्मेंट दिला नाहिये अजून. ठरावानंतर असे स्टेट्मेंट दिले असेल तर दाखवा .
आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ?
बाजूने १३५ व विरोधात १०४ म्हणजे बहुमतच आहे. विश्वासदर्शक/अविश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सभागृहाच्या एकून सदस्य संख्येपेक्षा एकूण मतदानात ज्या बाजूने ५० टक्क्यांहून अधिक मतदान होते तो ठराव जिंकतो. उद्या २८८ पैकी फक्त २९ सदस्यांनी मतदान केले तर ठराव जिंकण्यासाठी १५ मते मिळाली तरी चालते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 11/19/2014 - 10:38
नवीन
याला आमच्याकडे बोटावरची थुंकी बदलणे म्हणतात.
मग अगोदरच ही गोष्ट ध्यानात आली नव्हती का ?
तुम्ही त्याच पद्धतीने डीफेंड करत आहात
तुम्हाला त्रास होत होता सेनेचा म्हणोन तुम्हालाच विचारला
हे राष्ट्रवादी तटस्थ होती तेव्हा कळाला फडणवीस किंवा कोणीही याचा स्पष्टीकरण दिला नव्हता
- Log in or register to post comments
स
समीरसूर
गुरुवार, 11/13/2014 - 10:44
नवीन
अशा परिस्थितीत भाजपने सत्तास्थापनेचा विचार सोडून द्यायला हवा होता. त्यात त्यांचेच भले झाले असते. राष्ट्रवादीचा कुचकामी आणि बिनभरवशाचा आधार घेऊन निंदानालस्ती सहन करण्यापेक्षा ठामपणे सत्तेला नकार दिला असता तर नवीन निवडणुकीत (जर शिवसेनेला तोपर्यंतदेखील समज आली नसती तर) त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले असते. आज नाही तर उद्या निवडणुक पुन्हा होणारच आहे. हे असलं बेंगरुळ आणि बालिश खेळ खेळून स्थापलेलं सरकार किती टिकणार हा प्रश्नच आहे. आणि ते देखील काकांच्या भरवशावर उभं राहिलेलं? मग तर प्रश्न आणखीनच जटील आणि कुटील होतो. :-) काका केव्हा सतरंजी ओढून घेतील ते खाली आदळणार्यांना देखील कळणार नाही. :-)
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 11/13/2014 - 11:55
नवीन
नाही, भाजप ने शिवसेने बरोबर सत्ता स्थापन करावयास हवी होती.
जर शिवसेनेला तोडायचेच होते म्हंटल्यावर तीने चुका करु नाहितर काही करु, भाजप ने त्या चुकांचे भांडवल का करावे ?
त्यांना शिवसेना जड जात आहे असे वाटत होते तर त्यांनी राष्ट्रवादी बरोबर संधान करुन आपला मार्ग आखला.
शिवसेने बरोबर युती तुटली होती, आणि आठवले, जानकर शेट्टी मंडळी भाजप बरोबर गेली (कारण केंद्रात त्यांची सत्ता होती, आणि वातावरण ही) पण मग भाजप ने राज ठाकरें बरोबर का नाही युती केली ?
कारण त्यांना माहिती होते राज ठाकरे त्यांना काही जास्त मदत करु शकणार नाही, उगाच १०-५ जागा आणि त्या ही मुंबई मधील काही सोडाव्या लागतील. त्या पेक्षा राष्ट्रवादी त्यांना जवळाचा वाटला. आणि ही सरासर धुळफेक होती बाकी जनतेला. हे आधीच ठरल्या मुळे असे झाले.
जर आवाजी मतदानात जर राष्ट्रवादी भाजप बरोबर होती तर तो आधीचा डाव होता, आम्ही त्यांचा पाठिंबा मागितला नव्हता अशी ही धुळफेकच आहे.
मग असे असेन तर कुठल्या तोंडाने दिल्लीत तुम्ही सर्वात मोठा पक्ष असुनही, आप अणि कॉन्ग्रेस ला एकाच नाण्याच्या दोन बाजु बोलता, तेथेही आपने पाठिंबा मागितलेला नव्हता. जर तेथे नाण्याच्या त्या २ बाजु असु शकतात, तर येथे ही ह्या नाण्याच्या २ बाजुच का नाही ?
अमित शहा-मोदी यां मध्ये उद्धव भरडले गेले. स्वता त्यांनाच काय भाजपा च्याच कीती तरी लोकांना राष्ट्रवादी बरोबर आपण जाणार आहोत हे वाटत नव्हते. मला वाटते देवेंद्र पण त्याच जनात होते.
तरीही एकत्र भाजप ने बहुमत आनायचे आणि नाही जमले तर शिवसेने बरोबर जायचे असेच करायचे होते.
राष्ट्रवादी हा धुर्त आहे तर भाजपा हा धोरणी पक्ष आहे आणि शिवसेना ह्या दोन्ही गोष्टीत फेल असला तरी तो चुकीचा असा जो सूर उमटत आहे तो त्यांची रणनिती चुकली असा पाहिजे त्यांची निती चुकीची नव्हती असे नमुद करावेशे वाटते.
आता आनखिन एक सांगतो.. (कृपया हे कोन म्हणाले होते हे विचारु नये, एक बारामतीकर असल्या कारणाने बर्याच गोष्टी ऐकलेल्या असतात.. उगाचच)
जर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे मिळुन १४४ आमदार झाले असते ( कॉग्रेस ला ही दूर ठेवुनच) तर शरद पवारांनी भाजपा बरोबर झालेली बोलणी विसरुन शिवसेने बरोबर जाण्याचे योजीले असते. आधीही हा पर्यत्न झाला होता पण तो त्यावेळेस फसला गेला होता. मला वाटते जोशींनी हे सांगितले आहे कुठल्याशा मुलाखतीमध्ये.
मला वयक्तिक रित्या राष्ट्रीय राजकारणात अटल बिहारी वाजपेयी आवडायचे, राजकारणी असा असावा सर्व पक्षात त्याला मान असावा, मोदी यांचे विकासाचे धोरण आहे पण त्या मध्ये साधे व्यापारी.. सामान्य धंदे बुडुन जातील अशी शंका मला आहे, परंतु हे परिनाम १० वर्षांनंतर दिसतील.
आताच मला वाटते FDI बांधकाम क्षेत्रात आण इतर बर्याच क्षेत्रात येण्यास त्यांनी पुर्ण संमत्ती दिलेली आहे. आणि अश्याच रिटेल FDI बद्दल त्यांनी कॉन्ग्रेस ला चुकीचे धरले आहे. रीटेल मध्ये ही लवकरच FDI आल्या शिवाय राहणार नाही.
विकास म्हणजे काय ? फक्त चकाचक जिवन शैली, चकाचक रस्ते पुल मॉल म्हणजे विकास ?
तर नाही, प्रत्येकाचे दरडोयी उत्पन्न वाढल्या नंतर त्याच्या गरजा भागल्या नंतर जे जे गरजेचे आहे ते देणे म्हणजे विकास.
तसे नसते तर मग पिंपरी चिंचवड चा विकास डोळ्यात भरणारा आहे. कोणीही या आणि रस्ते-पुल औद्योकीकरण बघावे आणि सांगावे. आता ५० हजार पगार असला तरी येथे साधा १ BHK फ्लॅट सामान्य माणसाला घेता येत नाही, हा विकास त्याच्या कामाचा नाही.
विषय राजकारणावरुन भरकटायला लागला असल्याने थांबतो
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/13/2014 - 16:41
नवीन
>>> अशा परिस्थितीत भाजपने सत्तास्थापनेचा विचार सोडून द्यायला हवा होता. त्यात त्यांचेच भले झाले असते.
भाजपचे भले झाले असते का ते माहित नाही, पण भाजपने सरकार स्थापन केले नसते तर विधानसभा बरखास्त होऊन पुन्हा एकदा निवडणुका होऊन अब्जावधी रूपयांचा चुराडा झाला असता व तोपर्यंत महाराष्ट्रात निर्नायकी अवस्था येऊन वाईट परीणाम झाला असता.
>>> हे असलं बेंगरुळ आणि बालिश खेळ खेळून स्थापलेलं सरकार किती टिकणार हा प्रश्नच आहे. आणि ते देखील काकांच्या भरवशावर उभं राहिलेलं? मग तर प्रश्न आणखीनच जटील आणि कुटील होतो. काका केव्हा सतरंजी ओढून घेतील ते खाली आदळणार्यांना देखील कळणार नाही.
भाजप काही बोळ्याने दूध पीत नाही किंवा शिवसेनेसारखा भ्रमात राहणारा गाफील पक्ष नाही. १९९९ ला वाजपेयी सरकार केवळ १ मताने पडले होते. त्या अनुभवातून भाजप खूप काही शिकला आहे. भाजपने कर्नाटकात (२००८-१३), राजस्थानात (१९९३-९८), उ.प्र. मध्ये (१९९७-२००३) अल्पमतातील सरकारे टिकविली आहेत. काकांनी सतरंजी ओढली तरीसुद्धा हे सरकार टिकेल याची खात्री बाळगा.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 11/14/2014 - 11:30
नवीन
कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/14/2014 - 16:38
नवीन
>>> कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल .
कायदेशीर व घटनात्मक मार्गाने ही अल्पमतातील सरकारे चालविली गेली होती. माहिती नसल्यास इतिहासाची पाने चाळा.
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Wed, 11/19/2014 - 07:59
नवीन
आवाजी मतदान आधी जे झालेले तेव्हा आमदारांनी आधीच समर्थन पत्रे दिलेली.
गुरुजी ही गोष्ट का लपवत आहेत. सुधरणार नाहीच म्हणा तुम्ही. भाजपाने रडीचाच डाव खेळला आहे सत्तेसाठी कोणत्याही थरावर जातात आणि भक्तांना सोशल मिडीयावर वार्यावर सोडतात :)
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Wed, 11/19/2014 - 08:04
नवीन
आणि काही काही आय.डी मिसळपाववर उच्छाद मांडायचाच म्हणून बॅन केले तरी लोचटासारखे परतपरत वेगवेगळ्या नावाने येतात.त्यातूनच कधीतरी उदयचा दिवाकर होतो. काय करणार? चालायचच :)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/14/2014 - 18:49
नवीन
>>> कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल .
विरोधकांमध्ये एकी नसली व त्यांच्यात फाटाफूट आणि वैचारीक विरोधाभास असला की सरकार अल्पमतात असले तरी ते टिकून आपला कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करते. अल्पमतातील सरकार टिकविण्यासाठी सोवळे सोडून ओवळे नेसावेच लागते असे नाही.
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 11/13/2014 - 11:11
नवीन
माझ्या नाशिकच्या मित्रांनी ही चर्चा जरूर वाचावी हि नम्र विनंती ..
( हसायला ही येईना आता )
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 11/13/2014 - 12:36
नवीन
वर थत्ते यांनी नमूद केल्याप्रमाणे त्या त्या पक्षाचे समर्थक काही झाले तरी आपल्या च पक्षाला मत देतात किंवा पक्षाने कितीही खालची पातळी गाठली तरी पक्षाचे समर्थन करतात . वर भाजप चे अनेक समर्थक तेच करत आहेत . आपल्या पक्षाने अनेक भर्श्टाचारि नेत्याच टोळक असणारया पक्षाच समर्थन घेतलं आहे हि खंत जर त्याना मनातून पण (दाखवायचे दात काहीही वेगळ असले तरी ) वाटत नसली तर या पक्षाच कॉंग्रेस सारखच वेगाने अधपतन का होत आहे याच उत्तर मिळेल . दुर्दैवम्हणजे हेच भाजप समर्थक टोळक इथ कॉंग्रेस कशी नैतिक दृष्ट्या अधपतित आहे , राष्ट्रवादी कशी भ्रष्ट आहे , मनसे नाशिक मध्ये राष्ट्रवादीचा पाठींबा घेणे कसे चूक आहे यावर इतर लोकाना प्रवचन देत होती . बाकी एवढी आंधळी भक्ती असणारे कार्यकर्ते पाहून इतर पक्षांना नक्कीच भाजप चा हेवा वाटत असेल . बाकी झोपलेल्याला जाग करता येत पण झोपेच सोंग घेतलेल्याला कस जाग करणार हा चिरंतन प्रश्नच आहे आंधळ्या समर्थकांची हि वृत्ती पाहून लालू , गडकरी , पवार अशा भ्रष्ट नेत्यांमागे कार्यकर्ते कसे उभे असतात ह्या मध्यमवर्गीय प्रश्नाचे उत्तर पण मिळाले . बाकी चालू द्या . राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाऊन या राज्याचे अजून वाटोळे करू नका म्हणजे झाल
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
गुरुवार, 11/13/2014 - 13:09
नवीन
भाजपने शेवटी एनसीपीशी संग करण्याचा आपला मनसुबा पूर्ण केला वर ते पटलावर येवू नये म्हणून आवजी मतदानाची चलाखी करून पाहिली पण परिणाम काय झाला? सगळीकडे भाजप आणि देवेंद्र यांची निर्भत्सना, टवाळी चालू आहे. भाजप आणि एनसीपीचे सेटिंग खूप आधीपासून सुरु होते ते आता उघड झाले आहे. भाजपचा मतदार नाराज आहे पवारांना काही फरक पडत नाही. भाजपकडे बहुमत नसतानाही सेनेला आधी विश्वासदर्शक ठराव पास होवू दे मग सत्तेत सामील व्हायचं बघू अस म्हणणे म्हणजे तुमची मुलगी आमच्या घरी द्या मात्र मुलगा कसा आहे वगैरे आत्ता काही बोलू नका ते लग्नानंतर पहा असे म्हणण्यासारखे झाले. केंद्रात एखाद फुटकळ मंत्रिपद दिल आणि राज्यात अशीच ४ खाती दिली तर सेना लगेच फरफटत आपल्या मागे येईल या भ्रमात भाजप राहिली. मात्र सेनेने केंद्रात विस्तारत येणार पद सोडून दिल आणि राज्यात पण विरोधात बसली हे बरच झाल. आता आवजी मतदान घेवून पवारांच्या कृपेने सरकार तरल मात्र जी अब्रू जायची ती गेलीच आहे. पुढे कधी तरी मतदान घ्यावच लागणार आहे, एनसीपी कधीही दगा देवू शकते ते होणार नाही तोवर हे 'पवारालंबी' सरकार चालणार आहे. एकंदरीत भाजपची लोकांत छी थु झाली आहे.यांचे खरे रूप समोर आले ते बरेच झाले.ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप उठवून सत्तेत आले त्यांच्याशी असलेली यांची मिलीभगत उघड झाली. सेनेने विरोधात बसून चांगले काम केले.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 11/13/2014 - 13:17
नवीन
मग भाजपाने राष्ट्रवादीसोबत जे काही केलंय त्याला काय म्हणायचं? शय्यासोबत की मधुर प्रेमसंबंध? (गुरुजींना उत्तर माहीत असेलच.)
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 11/13/2014 - 15:03
नवीन
http://www.misalpav.com/comment/627525#comment-627525
इथे गुरुजी ना वाटते कि राज ने राष्ट्रवादी शी 'साटलोट' केल त्यामुळे जनते ने त्याना लाथ दिली . बहुतेक राष्ट्रवादी आणि भाजप उच्च नैतिक मुल्य आणि महाराष्ट्राच हित जपण्यासाठी 'शय्यासोबत ' करत आहेत असा काहीसा त्यांचा ग्रह झाला असावा . राज चाच (राष्ट्रवादीचा बाहेरून पाठींबा ) नाशिक फ़ोर्मुला त्याना महाराष्ट्राच्या हिताचा वाटत आहे .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/13/2014 - 16:45
नवीन
दोन्हीपैकी काहीही नाही.
'दिल तो पागल है' हा चित्रपट आठवला. या चित्रपटात लोलो शाहरूखच्या मागे लागलेली असते. परंतु शाहरूख माधूरी दिक्षितच्या प्रेमात असतो. परंतु तो लोलोचे प्रेम स्वीकारत नाही व तिला झिडकारतही नाही. असे करण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही.सद्यस्थितीत असेच झाले आहे.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 11/13/2014 - 17:19
नवीन
असल 'अफलातून ' उत्तर वाचून आजानुकर्ण झीट येउन पडले आहेत असे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले .
भाजप - शाहरुख खान (दोन दोन मुली (पक्षी -शिवसेना व राष्ट्रवादी ) ज्याच्यामागे आहेत असा बाका छोरा )
राष्ट्रवादी - माधुरी दीक्षित (शाहरुख च प्रेम पात्र )
शिवसेना -करिश्मा कपूर (
कॉंग्रेस -अक्षय कुमार (राष्ट्रवादी कडून नाकारलेले गेलेले )
दिल तो पागल है च्या शेवट च्या सीन मध्ये नाईलाजाने अक्षय आणि करिश्मा (दोघेही नाकारलेले गेलेलं ) एकत्र येण्याची शक्यता दाखवली आहे . जसे काल विधानभवनात कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येउन धिंगाणा घालताना पाहून अनेकाना तो सीन आठवला असेल . बाकी राज आणि माया (बाकी माया हे नाव मोठे साहेब पक्षी राष्ट्रवादी याना लई शोभून दिसत म्हणा ) याचं मिलन काल अख्ख्या राज्याने पाहिलेच . जमली का हो गुरुजी casting ?
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 11/13/2014 - 17:23
नवीन
शाहरुख खान (भाजपा) माधुरीच्या प्रेमात आहेत म्हणजे माधुरी ही राष्ट्रवादी नसून महाराष्ट्राची सत्ता आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/13/2014 - 18:56
नवीन
*LOL*
- Log in or register to post comments
ह
हस्तर
Fri, 11/13/2020 - 14:14
नवीन
झाले एकत्र
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
गुरुवार, 11/13/2014 - 13:28
नवीन
भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत.
राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये.
जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची.
मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे.
ज्या मतदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस्च्या विरोधत मतदान केले हा त्या मतदारांचा विश्वासघात आहे.
+१
बाहेर लोकं भाजप आणि फडणवीसांची भयंक टवाळी करत आहेत, इथे बोलता येत नाही अश्या भाषेत त्यांचा उद्धर चालू आहे.खिंड लढवणारे काही तुरळक भक्त सोडले तर बहुतांशी लोकं भाजपवर नाराज आहेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 11/13/2014 - 13:30
नवीन
असेच म्हणतो.
(पश्चात्तप्त) बॅटमॅन.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 11/13/2014 - 14:38
नवीन
बाकी चालु द्या .. पण एक प्रश्न ,'पश्चात्तप्त' हा शब्द व्याकरण दृष्ट्याबरोबर आहे का ?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/14/2014 - 18:20
नवीन
बरोबर आहे...
बॅटमन भाजपच्या कारवाई पश्चात् तप्त (रागाने गरम) झालेला आहे... तेव्हा सांभाळून...... असे म्हणायचे असेल ;) :)
- Log in or register to post comments
ज
जयनीत
गुरुवार, 11/13/2014 - 15:47
नवीन
वरील मुद्द्यावर भाजप आपल्या धोरणाचे समर्थन करत आहे.
मूळ मुद्दा हा की शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीची साथ घेऊन भाजप ने काय मिळवले?
वेगळे पणा जपणारा पक्ष हा दावा ते आता कितीही करतील तरी ही त्याला आता तेव्हढा आधार राहणार नाही त्यांचे पक्के समर्थक तसे मानत राहतील तरीही सामान्य मतदार जो भाजप किंवा मोदीं कडे ज्या आशेने बघत होता त्यावर नक्कीच परिणाम होइल.
मुळात राष्ट्रवादीची साथ घेण्याची गरजच काय होती?
हरियाणात बहुमताचा आकडा गाठण्या साठी दहा पाच आमदार कमी पडले असते तेव्हा आय. एन. एल. डी. ची साथ घ्यावी लागली असती तर ते समर्थनीय तरी होते पण तिथे तशी परिस्थिती आली नाही तितका नशीबवान भाजप ह्या दोन राज्यांच्या निवडणुकां मध्ये होता महाराष्ट्रात ही तशी परिस्थिती नव्हती मग कशा साठी स्वत:च्या तथाकथीत स्वच्छ प्रतिमेला ला धक्का पोहचवला. अन तों ही इतक्या लवकर.
केंद्र सरकार अजूनही लोकप्रिय आहे न खाउंगा न खाने दुंगा ह्यावर लोकांनी विश्वास ठेऊन मते दिली होती आता ह्या कृतीचे समर्थन काय?
मी भाजपचा किंवा शिवसेनेचा समर्थक नाही त्या दोन्ही पक्षां बद्दल कुठलीही सहानुभूती नाही अन भाजप जे बोलतो त्यावर माझा काडीचाही विश्वास कधीच नव्हता तो इतकेच काय तर ह्याही पुढे जातील ह्यात काही शंका कधीच नव्हती पण इतक्या लवकर अन कसलीही गरज नसतांना ते असे करतील ह्याचे मात्र अतिशय आश्चर्य वाटले.
भाजपला शिवसेनेची अडचण होत होती शत प्रतिशत भाजप पाहिजे होता म्हणून त्यांनी असे केले. हे जागावाटपां च्या वेळे पासून ठरवून केल्या जात आहे. मग कारणे काहीही सांगितल्या गेली आता भाजप १२१ अन शिवसेना ६३ ही परिस्थिती असतांना त्यांनी शिवसेनेनी उपमुख्य मंत्री अन एक तृतीयांश मंत्रीपदे ही मागू नयेत त्यांनी नाक घासून जे मिळेल ते गोड मानून घ्यावे कारण ते आमच्या मुळे जिंकलेत हा अहंकार काय सांगतो?
अन त्या अहंकाराला ही काय आधार आहे हरियाणाच्या पक्षाने एकटे लढून आपली शक्ती किती पटीने वाढवली अन इथे आधी पासून भाजपचे चांगले अस्तित्व असतांना चार पक्षांशी युती करूनही बहुमाताचा आकड्याचा इतके दूर रहावे लागले तरीही आम्हीच सारे निर्णय घेणार तुम्ही मान्य करा हा हेका मात्र जात नाही.
भाजपची शक्ती शिवसेने पेक्षा जास्त होती हे मान्य त्यांनी जास्त जागा मागितल्या अन त्यासाठे वेगळे लढले इथपर्यंत ही ठीक पण नंतर मात्र आहे ती परिस्थिती मान्य करून पुढे जायला हवे होते. पण तसे केले नाही. शिवसेनेला ज्या अठरा जागा लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या ते काही भाजपचे उपकार नव्हते हे ही सिद्ध झालेच की. १८ लोकसभेचा मतदार संघात ६ प्रमाणे १०८ जागा होतात शिवसेनेने मिळवल्या ६३ म्हणजे हिशोब लावला की प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या साडे तीन मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली असे मान्य करावे लागते. (हे काही निवडणूक पूर्व अंदाज नसून सिद्ध झालेली आकडेवारी आहे ) पण थोड्या फार यशाने डोळे आंधळे झाली की ती कशी दिसणार?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 11/14/2014 - 06:51
नवीन
बरोबर शब्दात बोलला आहात, योग्य अगदी
- Log in or register to post comments
H
hitesh
Fri, 11/14/2014 - 11:02
नवीन
म्हणजे असे बघा केळीवाला बुट्टीभर केळी घेऊन बसला आहे. तुम्ही किती केळी घ्याल ? तुमच्या गरजेपुरतीच ना ?
भाजपाला बहुमताला १५ लोकांचीच गरज आहे. सेनेने फक्त १५ च लोक द्यावेत की.. सेनेचे साठ असले तरी तितके केळी भाजपाला नकोचआहेय्त.
म्हणजे भाजपाच १२० व सेनेचे १५. ... म्हणजे भाजपाची ताकद सेनेच्या आठपट भरते.
उरलेली केळी सेनेने फेकुन द्यावीत.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 11/14/2014 - 11:38
नवीन
अहो पण उद्धव सुटी केळी विकत नाही ना .. घ्यायची तर बुट्टीभर घ्या नाहीतर काहीच नाही.
- Log in or register to post comments
H
hitesh
Fri, 11/14/2014 - 13:19
नवीन
तो सगळी केळी विकेल तरीही त्याला १५ केळ्याचेच पैसे घ्यावे लागतील. उरलेली केळी बुट्टीत घालुन घरी न्यायची नसतील तरीही ती केळी त्याला फुकटच घालावी लागतील.
त्यामुळे २ : १ चा बालहट्ट सोडुन ८ : १ हे कटू सत्य त्यांनी स्वीकारले असते तर निदान केळ्रे कुजली तरी नसती.
आमचे पवार बघा.. सत्यनारायण घालायला केळी उसनीही दिली आणि पुजाही त्यानी स्वतःच सांगितल्याने पुजा संपल्यावर आपलीच केळी हक्काने घेऊनही गेले
- Log in or register to post comments
H
hitesh
Fri, 11/14/2014 - 13:29
नवीन
मला तर शंका आहे केळीच नव्हे भाजपा जी बाकीच्या खारका सुपार्या आमच्या म्हणुन सांगते त्याहीपवारांच्याच आहेत.
- Log in or register to post comments
V
vikramaditya
Sun, 11/16/2014 - 11:19
नवीन
केळ्यांचे उदाहरण नको.
नुकतेच मिपावर "वसईची पिवळी केळी" यावर आवाजी मत-प्रदर्शन झाले आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 11/13/2014 - 16:21
नवीन
राजकारण हा माझा प्रांत नाही. सर्व लोक भाजपचे चुकले म्हणताहेत. त्यांनी साधन शुचिता पाळायला पाहिजे होती. ते बरोबरही असेल पण माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मतदाराला असे वाटते कि भाजपने काय करायला पाहिजे होते. शिवसेनेपुढे लोटांगण घालायला पाहिजे होते? शिवसेनेने किती ताठरपणा निवडणुकीच्या अगोदर दाखवला होता हे आपण पाहिलेच आहे मग त्यांना झुकते माप देऊन त्यांच्या दुप्पट आमदार निवडून येउन सुद्धा त्यांच्या तालावर नाचायला पाहिजे होते. आज कितीही म्हणालात तरी भाजप ला ४२ टक्के जागा महाराष्ट्राच्या जनतेने दिल्या आहेत. बाकी लोकांना २१ टक्के किंवा त्याहूनही कमी जागा आहेत याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला जनादेश दिला आहे. अशा परिस्थितीत भाजप ने काय करायला हवे होते?
का विश्वास दर्शक ठरावात नापास होऊन लगेच निवडणुका परत घेऊन कर्जाच्या खाईत असलेल्या महाराष्ट्राला अजून काही शे कोटी रुपयाच्या खर्चात टाकायला हवे होते? किंवा राज्यावर ६ महिने राष्ट्रपती राजवट आणायला हवी होती? लोकांना नक्की काय हवे आहे?
प्राप्त परिस्थितीत त्यांनी जे केले ते कदाचित साधन्शुचीतेच्या दृष्टीने बरोबर नसेल पण याच्या पेक्षा चांगला पर्याय त्यांना उपलब्ध होता असे मला वाटत नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 11/13/2014 - 16:46
नवीन
सहमत
इथल्या काही जणांना ही अपरिहार्यता अजून लक्षात आलेली नाही.
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
गुरुवार, 11/13/2014 - 17:40
नवीन
मित्रा,सध्याच्या राजकारणात चालू घडामोडींची घडामोडींचीसुंदर व मार्मिक रेखाटने 'ढिंग टांग' मधून ब्रिटिश नंदी करतात. ती पहिल्या चहा बरोबर कुरकुरीत क्रम्स प्रमाणे खुसखुशीत वाटतात. मामला म्हणून एक... त्यातील शेपटीचा फटकारा मान डोलायला लावतो. (नंतर डकवतो.)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 11/14/2014 - 13:23
नवीन
काँग्रेसचा तो भ्रष्टाचार आणि भाजपाची ती अपरिहार्यता! युक्तिवाद छान आहे. खरंच. इथूनपुढं पानभर निबंध लिहायच्या ऐवजी एवढाच युक्तिवाद केलेला पुरे!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 11/13/2014 - 17:00
नवीन
सहमत आहे, काल ह सगळा घटनाक्रम पाहिल्यावर मी देखील निराश झालो होतो, पण कालांतराने विचार करता असे लक्षात आले की शिवसेना काय आणि राष्ट्रवादी काय, खाणार नाहीत असे कोणी सांगितले आहे? अगदी फॉर दॅट मॅटर भाजपा देखील.
आपल्याला सुशासनाशी मतलब. जर भाजपाने चांगले काम केले तर काय फरक पडतो त्यांनी असे बहुमत सिद्ध केले म्हणून?
माझ्याड्रुष्टीने साधन नव्हे, तर साध्य महत्वाचे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 11/13/2014 - 17:04
नवीन
-- प्रश्न केवळ साधनशुचीतेचा असेल तर भाजपने संपूर्ण सभागृहाला सरकारला पाठिंबा द्यायचे आवाहन करायला हवे होते. भाजपचे रूडी साहेब म्हणाले कि एक काँग्रेस सोडुन आम्हि कोणाचेही समर्थन घेऊ. त्यापेक्षा महायुती सरकार बनवत आहे, स्थिर सरकारसाठी ज्याला वाटेल त्याने पाठिंबा द्यावा, असा स्टॅण्ड घेतला असता तर बहुमत देखील मिळवता आले असते व चारित्र्यावर डाग देखील लागले नसते. अर्थात, हे सगळं जर-तर आणि भावनांचा खेळ आहे. जे झालं ते व्यवस्थीत गणित मांडुन केलं गेलं असणार.
- Log in or register to post comments
V
vikramaditya
Sun, 11/16/2014 - 11:30
नवीन
अपरिहार्य! निवडणुकाच लढवत बसले तर राज्य कधी करणार?
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 11/13/2014 - 17:22
नवीन
थोडक्यात काय तर बुंद से गयी वो हौदसे नही आती.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 11/13/2014 - 19:12
नवीन
राजकारण गेलं चुलीत. औषधांच्या किंमतीबद्दल अमेरिकी दबावाखाली बदललेले धोरण, पाकिस्तानला सबसिडाईज्ड गॅस द्यायचा प्रस्ताव, पर्यावरणविषयक धोरण इ. भाजपा सरकारचे गेल्या काही दिवसांतील काही निर्णय अजिबात पटत नाहीयेत. भाजपा म्हणजे स्वच्छ वगैरे काही गोड गैरसमज नसले तरी हे सगळे बरेच अनपेक्षित वाटले.
प्रादेशिक पक्ष संपवायचा भाजपाचा विचार असेल तरीही त्यासाठी स्वीकारलेले मार्ग बरोबर वाटत नाहीयेत. आता राष्ट्रवादीकडे भाजपाने पाठिंबा कुठे मागितला वगैरे कोणी कृपया सांगू नका. ते सगळं इतकं सोपं नसतं हे तुम्हा आम्हाला माहित आहे. अजितदादा पवारांनी शिवसेनेचे सरकार आणि त्याला दोन्ही काँग्रेसचा पाठिबा असा प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले. दुसरीकडे सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद देणार अशा बातम्या येत होत्या, मात्र सुरेश प्रभूंना मंत्रीपद मिळाले आहे. ते साहेबांच्या अगदी जवळचे आहेत असेही लगेच सगळीकडे लिहून येत आहेच.
दिल्लीत विधानसभा निवडणुकांत भाजपाने जे केले ते महाराष्ट्रात करायचे टाळले आहे. इथेही त्यांना तसे करता आले असते, कारण परिस्थिती अगदी तशीच होती. तसे काही झाले असते तर कदाचित पुढच्या निवडणुकांत लोकांनी त्यांना जास्त प्रमाणात मते दिली असती. आता ते कठीण वाटते. वाजपेयींची भाजपा आता नाही हे ठळकपणे दिसून येत आहे. त्याशिवाय बदलत्या परिस्थितीत रा.स्व.संघ आणि भाजपाचे समीकरण काय असेल याबद्दलही कुतुहल आहे.
सामान्य लोक आशेने किंवा भावनेच्या भरात मतं देऊन एका किंवा दुसर्या पक्षाला निवडून आणत असतात, त्यां सगळ्या राजकारण्यांना मात्र या लोकांशी किंवा त्यांच्या भावनांशी काही देणेघेणे नसते हे अनेकदा दिसून आले आहे. चलता है. जसे आम्ही, तसेच आमचे नेते. लोकशाईचा जय हो !!
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 11/14/2014 - 06:20
नवीन
नाही हो. वाजपेयींच्याच भाजपाने १९९८ मध्ये जयललितांशी (आणि इतर अनेकांशी) युती केली नसती तर वाजपेयी पंतप्रधान बनूच शकणे शक्य नव्हते. अगदी काठावरचे बहुमत असलेल्या वाजपेयी सरकारला तामिळनाडूतून घसघशीत ३० खासदारांचा पाठिंबा मिळाला. जयललितांशी युती केली नसती तर ३९ पैकी अगदी एखाद्या जागी तरी भाजप उमेदवाराचे डिपॉझिट वाचले असते तरी ते भाजपने आपले मोठे यश मानले असते!! जयललितांविरूध्दच्या आरोपांचा तपास करणार्या अधिकार्यांची एकसाथ बदली वाजपेयी सरकारने जयललितांनी पाठिंबा काढून घ्यायच्या दोन महिने आधी केली होती.त्यावर 'प्रत्येक अधिकारी कोणत्या ना कोणत्या केसचा तपास करतच असतो आणि कोणीही अधिकारी आयुष्यभर एकाच ठिकाणी थोडीच काम करतो' असे स्पष्टीकरण प्रमोद महाजन यांनी दिले होते. उत्तर प्रदेशातील नेत्यांच्या विरोधाला न जुमानता मायावतींना तीन वेळा मुख्यमंत्री करून त्यांना मोठे करण्यात वाजपेयींचाच हात होता. कल्याणसिंगांच्या मंत्रीमंडळात ९५ मंत्री होते आणि त्यात अनेक गँगस्टरचाही समावेश होता.त्यावर 'ते जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना मंत्री बनण्यापासून कोणीही अडवू शकत नाही' अशा स्वरूपाचे उत्तर वाजपेयींनीच दिले होते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की वाजपेयींनी सुध्दा अशा तडजोडी अनेकवेळी केल्या होत्या.त्याची किंमत त्यांना भरायला लागली का? नक्कीच लागली. सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर असूनही त्यांना २००४ मध्ये पंतप्रधान बनता आले नाही. यावेळीही राष्ट्रवादीशी तडजोड करून भाजपाने एक मोठी रिस्क घेतली आहे.पायात घुसलेला एक काटा काढायला दुसरा काटा वापरायचा आणि योग्य वेळ येताच दोन्ही काटे फेकून द्यायचे अशी रणनिती असावी असे एक भाजप समर्थक म्हणून मनापासून वाटते. तरीही जोपर्यंत दुसरा काटा हातात आहे तोपर्यंत अस्वस्थता राहणारच. पण भाजपाने एक काटा हातात घेतला हे मला आवडले नाही म्हणून त्यांच्या विरोधातील बाभळीच्या झाडाला मात्र मी मत देऊ शकणार नाही हे नक्कीच.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Fri, 11/14/2014 - 06:50
नवीन
वाजपेयी स्वतः अतिशय निस्पृह आणि आदरणीय होते . पण त्यांचे सरकार आणि मंत्री अनेक आरोपांनी घेरले गेले होते . किंबहुना आज जे भाजप चे कॉन्ग्रेसीकरण झाले आहे त्याची प्रक्रिया वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात सुरु झाली होती . वाजपेयी या सर्वासमोर हतबल झाले होते .
अवांतर - आज भक्तांच्या आंखो का तारा असणारया आणि मोदी यांचे विश्वासू असणार्या सुब्रमन्यम स्वामी यांनी अटलजी यांच्या विरुद्ध इतके घाणेरडे आरोप केले आहेत कि अटलजी यांच्या बद्दल असणारया आदरामुळे त्याच्या लिंक इथे देण्याचा मोह टाळत आहे . ऋषितुल्य अटलजी बद्दल असले बिभित्स आरोप करणारा इसम आज भाजप च्या थिंक tank मध्ये आहे यावरून भाजप साठी अटलजी आज अडगळीत जमा झाले आहेत हेच अधोरेखित हते
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 11/14/2014 - 07:10
नवीन
बाजपाईंचे उगाच कौतुक करु नका हो. कॉग्रेस चा माणुस असल्यासारखा वागणे कायम.
निस्पृह कसले, मानलेली मुलगी आणी जावई धिंगाणा घालत होते सरकार मधे आणि बरोबर भाजपचे शरद पवार प्रमोद महाजन आणी ब्रिजेश नावाचा सरकारी अधिकारी.
वाजपाईच्या जागी तेंव्हा मोदी सारखा कोणी असता तर पूर्ण बहुमतात भाजप आले असते निवडुन १९९९ सालीच.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/14/2014 - 10:27
नवीन
>>> निस्पृह कसले, मानलेली मुलगी आणी जावई धिंगाणा घालत होते सरकार मधे
हे माध्यमांनी निर्माण केलेले स्पेक्युलेशन आहे. त्यांच्या मानलेल्या मुलीच्या व जावयाच्या सरकारमधील धिंगाण्याचे काही पुरावे असतील तर कृपया ते उघड करावेत.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 11/14/2014 - 15:29
नवीन
कदाचित राजकीय अपरिहार्यतेपोटी मानलेली मुलगी व जावयाने काही प्रताप केले असतील. मला तरी अपरिहार्यतेपोटी केलेले प्रकार क्षम्य वाटताहेत बुवा. निदान काँग्रेससारखा भ्रष्टाचार तरी केला नाही ना!
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Fri, 11/14/2014 - 16:36
नवीन
तुम्हाला काही कळत नाही बघा आजानुकर्ण . जावई फ़क़्त गांधी घराण्याचा असेल तर कांही पुरावे द्यावे लागत नाहीत . भाजप सारख्या साधन शुचिता जपणारया पक्षाचे नेत्याचे जावई कसे भ्रष्टाचारी असतील ? तिथे मात्र पुरावे लागतात याना . लोक काहीही बोलतात . जळतात मेले त्यांच्या भरभराटी वर
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 11/14/2014 - 16:42
नवीन
@ प्रसाद१९७१, आजानुकर्ण, पिंपातला उंदीर,
वाजपेयींच्या मानलेल्या मुलीच्या व जावयाच्या सरकारमधील धिंगाण्याचे काही पुरावे असतील तर कृपया ते उघड करावेत.
जाताजाता ... मोदींविरूद्ध कणभरही पुरावा नसताना काँग्रेसने त्यांना १० वर्षे प्रचंड त्रास दिला. वाजपेयींच्या मुलीविरूद्ध किंवा जावयाविरूद्ध कणभर पुरावा जरी असता तरी त्यांना किती त्रास झाला असता याची कल्पनाच केलेली बरी.
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Sat, 11/15/2014 - 15:30
नवीन
भाजपावर आरोप झाले की पुरावे मागणे आणि काँग्रेसवर बिना पुराव्याने बोंबलत गावभर फिरणे हे यांचे धंदे आहे
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 11/17/2014 - 08:55
नवीन
@गुरुजी - असे पुरावे कधी देता येतात का हो?
आणि तुम्ही मी दिलेली दुसरी दोन नावे सोयीस्कर रीत्या विसरलात ( प्रम, आणी ब्रिजेश ), त्यांच्या बद्दल बोला की.
कोलगेट आणि २जी ची प्रकरणे कोणी केली.
माझे असे ही म्हणणे आहे की बाजपाईंच्या ऐवजी मोदींसारखा कोणी माणुस असता तर १९९७-९९ मधेच भाजपचे बहुमत आले असते.
किंवा बाजपाई पेक्षा कोणी दुसरा माणुस असता तर २००४ साली भाजप हरली नसती.
बाजपाईंनी भाजपला आतुन खाण्याचे काम ५० वर्ष केले. मनापासुन हिंदुत्ववादी मतदार कधीच बाजपाईंना मत द्यायला बाहेर पडले नाहीत.
आज पण बाजपाई प्रचारात असते तर भाजपला बहुमत मिळणार नाही ह्याची त्यांनी बरोबर काळजी घेतली असती.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »