Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले

श
श्रीगुरुजी
Wed, 11/12/2014 - 16:34
🗣 256 प्रतिसाद
सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्‍यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै. गोपीनाथ मुंड्यांनी जाहीररित्या सांगितले होते. केंद्रात सेनेला अत्यंत बिनमहत्त्वाचं फक्त १ मंत्रीपद देऊन भाजपने आपलं भविष्यातील धोरण स्पष्ट केलं होतं. भाजपचे धोरण ओळखूनच शिवसेनेने आपल्या चाली आखायला हव्या होत्या. परंतु सेना नेते आपल्याच अहंकारात, भ्रमात व नसलेल्या ताकदीच्या जोषात राहिले. भाजप जास्त जागा लढविण्यासाठी दबाव आणणार हे मे २०१४ मध्येच स्पष्ट झाले होते. अशावेळी मे ते सप्टेंबर या काळात शिवसेनेने धोरणीपणे विचारमंथन करून आपले डावपेच आखायला हवे होते. ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन भाजपचे समाधान करावे, आपण कधीच निवडून आलो नाही व ज्या जागा भाजपलाही जिंकणे अशक्य आहे अशा जागा देऊन त्याग केल्याचा आव आणावा, ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन त्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे देण्याचे जाहीर आश्वासन भाजपकडून घ्यावे व त्या बदल्यात केंद्रात जास्त व महत्त्वाची मंत्रिपदे मागून घ्यावीत, हे सुरू असतानाच मनसे व इतर काही स्थानिक पक्षांशी बोलणी करून भाजपविरूद्ध पर्यायी आघाडी तयार करावी असे अनेक पर्यात शिवसेनेला उपलब्ध असताना शिवसेना नेते गाफील राहिले. भाजप कदापिही युती तोडणार नाही, ज्या भाजपला आपण २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले आहे तो भाजप यापुढेही आपल्याच तालावर नाचत राहील, आपण म्हणू तसेच होईल या भ्रमात शिवसेना नेते राहिले. सुरेश प्रभू, मनोहर जोशी इ. समंजस नेत्यांना वाळीत टाकून उद्धव ठाकरे अत्यंत उथळ, वाचाळ, अविचारी असलेल्या व अजिबात दूरदृष्टी नसलेल्या संजय राऊत, रामदास कदम, रावते, प्रेम शुक्ला इ. नेत्यांवर विसंबून राहिले व त्याची फळे शिवसेनेला मिळाली. ४ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार होते. त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर येऊन आपली भेट घ्यावी अशी उद्धव ठाकर्‍यांची इच्छा होती. परंतु त्यांनी अमित शहा व मोदी या जोडगोळीला ओळखण्यात चूक केली. हे दोघे भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे प्रादेशिक पक्षांपुढे झुकणारे नसून अत्यंत धोरणी व प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व सहन न करणारे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाहीत. अमित शहा मुंबईत येऊन उद्धव ठाकर्‍यांना भेटणार नाहीत हे समजल्यावर तिळपापड होऊन शिवसेनेने 'शहाणा हो' ही पोस्टर्स सोशल मिडियातून पाठवायला सुरूवात करून त्यांना डिवचले. अमित शहांना डिवचणे म्हणजे थेट मोदींनाच डिवचण्यासारखं होतं हे सेना नेतृत्वाला कधी समजलंच नाही. अमित शहांनी शहाणपणा दाखवून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यावर शेवटी उद्धव ठाकर्‍यांना अमित शहांना मातोश्री भेटीचे सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवावं लागलं आणि इथेच शिवसेना झुकायला आणि डाव हरायला सुरूवात झाली. नंतर प्रत्यक्ष जागावाटपाची बोलणी सुरू असताना सुरवातीला भाजपने १३५-१३५-१८ असा फॉर्म्युला सुचविला होता. भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत दीडपट होती. त्यानुसार भाजप १६०-१७०, शिवसेना १००-११० व मित्रपक्ष १८ असेच जागावाटप हवे होते. असे असतानाही भाजपची मागणी जास्तीत जास्त १३५ जागांची होती. नंतरच्या चर्चेत भाजप १३०-१४०-१८ व त्यानंतर १२५-१४५-१८ इतका खाली उतरला होती. शिवसेनेला ही उत्कृष्ट संधी होती. भाजप १२५ जागा लढवत असल्याने भाजपला जास्तीत जास्त १०० जागा जिंकता आल्या असत्या व त्यामुळे भाजप बहुमतापासून खूप दूर राहिला असता (आता भाजपने १२२ जागा जिंकल्याने फार थोड्या जागांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज आहे.). शिवसेनेला १४५ जागा लढवून कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची व पर्यायाने मुख्यमंत्रीपद मिळविण्याची संधी होती. जरी भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तरी उपमुख्यमंत्रीपद व इतर अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली असती. युती करून एकत्र लढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी ला प्रत्येकी ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या व राष्ट्रवादीला खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला पाठिंबा देउन उपयोगच झाला नसता. पर्यायाने भाजपला सर्वार्थाने शिवसेनेवरच अवलंबून रहावे लागले असते. दुर्दैवाने उद्धव ठाकरे स्वतःच्या अहंकाराचे बळी ठरले. युती तुटल्यावर सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे मनसेबरोबर नवीन आघाडी त्यांना करता आली नाही. भाजपने आधीच योजना आखून सर्व मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला वळवून शिवसेनेला पूर्ण एकाकी पाडले. युती तुटली ही वस्तुस्थिती मान्य करून हे वास्तव समंजसपणे स्वीकारण्याऐवजी शिवसेनेने प्रचारात असभ्य पातळी गाठली. सामनातून व सभांमधून सातत्याने अमित शहा व मोदींना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत असभ्य व नकारात्मक प्रचार केला गेला. त्यांच्याबरोबरीने मित्रपक्षांचे राजू शेट्टी, रामदास आठवले, जानकर इ. ना ही लक्ष्य केले. शेवटी खडसेंविरूद्धही अत्यंत नकारात्मक प्रचार केला. महाराष्ट्रातील लोकांना मोदी हवे आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातून मुक्ती हवी आहे हे सेनेने न ओळखता काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी भाजपलाच आपला मुख्य शत्रू मानण्याची घोडचूक केली. मोदींना अफझलखानाची उपमा देणे, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहाची उपमा देणे, मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार करणे, आदित्य ठाकरे सारख्या पोराला चर्चेसाठी पाठविणे अशा अनेक घोडचुका सेनेने केल्या. याउलट भाजपने समंजसपणे शिवसेनेच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून आपला सकारात्मक प्रचार सुरू ठेवला व सेनेचे आपोआप खच्चीकरण होत गेले. त्याचेच परीणाम निकालात दिसले. भाजपच्या तुलनेत जेमतेम निम्म्या जागा मिळवून युतीतला मोठा भाऊ खरोखर कोण होता याचे जनतेनेच उत्तर दिले. तरीही भाजपला स्पष्ट बहुमत न मिळणे व आपल्याकडे तब्बल ६३ आमदार असणे हे शिवसेनेकडे हुकमी एक्के होते. त्यांनी आपली पाने नीट खेळली असती तर त्यांना बर्‍याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. कदाचित सेनेला अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदही मिळविता आले असते. ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले. भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले. भारतीय मतदार व्यक्तिगत असभ्य टीका व नकारात्मक प्रचार कायमच नाकारतो हे शिवसेनेच्या पराभवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनेच्या जागी मायावती असती तर तिने अत्यंत चातुर्याने पत्ते खेळून स्वत:च्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. किंवा राकाँ, काँ बरोबर मोट बांधून स्वतःचाच मुख्यमंत्री बनविला असता. दुर्दैवाने शिवसेना नेत्यांकडे धोरणीपणाचा संपूर्ण अभाव व अहंकार, स्वतःच्या नसलेल्या ताकदीबद्दल भ्रम, उर्मटपणा, अविचारीपणा, प्रक्षोभक शब्द, उथळ्पणा व असंमजपणा याशिवाय दुसरे काहीच नसल्याने शिवसेना युद्ध हरलीच पण तहातही हरली. ही निवडणुक शिवसेनेच्या अंताचा प्रारंभ ठरणार असे आता वाटत आहे.

प्रतिक्रिया द्या
121300 वाचन

💬 प्रतिसाद (256)
प
प्यारे१ Mon, 11/17/2014 - 12:15 नवीन
>>> बाजपाई 'वाजपेयी' असं मराठीत लिहीलं जातं बहुतेक. बाकी चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
पैसा Fri, 11/14/2014 - 07:27 नवीन
सगळ्यांचेच पाय मातीचे. आपण त्यात दगड आणि वीट कोण एवढे शोधत रहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
श
शशिकांत ओक गुरुवार, 11/13/2014 - 20:20 नवीन
Image removed. ळ : मातोश्री महाल, वांद्रे. वेळ : ओढवलेली! प्रसंग : बेतलेला! पात्रे : चेपलेली! मिलिंदोजी फर्जंद : (लगबगीने अंत:पुरात प्रवेश करत) शतप्रतिशत मुजरा, म्हाराज?...आँ, अरीच्चा?... कुटं ग्येलं आमचं म्हाराज? आत्ता हितं होतं, ग्येलं कुटं? (इकडे तिकडे बघत) म्हाराज होऽऽऽ, असाल तसं भाईर या! मुजऱ्याला आलुया नव्हं! उधोजीराजे : (कुठून तरी खोल आवाज येतो...) क...क...कोण...आहे...रे...तिकडे? मिलिंदोजी : (खुळ्यासारखे आसपास बघत) कुटून आवाज येतोय, त्येच कळं ना झालंय, म्हाराज! मुजरा करावा, तर कुटल्या दिशेला त्वांड करावं आनि कुटल्या साइटला.. उधोजीराजे : (नुसताच आवाज...) खामोश! एकदम खामोश! बकबक केलीया मारले जाल! मिलिंदोजी : (अजिजीने) स्वॉरी! मुजरा कुटं करू, त्येवडं सांगावं! उधोजीराजे : (वैतागलेल्या सुरात) मरो तो मुजरा!..बाहेर आमच्या दरबारात कोण कोण आलंय? मिलिंदोजी : (मान हलवत) कुटलं कोन आलंया? होते ते येकेक उटून गेल्ये! वैशे भी तुमकू भीड अच्छी नै लगती थी नाऽऽऽ...आता कुनी न्हाई! बिनधास्त या भाईर! उधोजीराजे : (अदृश्‍य अवस्थेतच थयथयाट करत) तुला...तुला...चे-ची-न!! मिलिंदोजी : (जीभ काढत) माफी असावी म्हाराज! शांतवन करन्यासाटी आलो हुतो! उधोजीराजे : (अजूनही अदृश्‍यच) कसलं सांत्वन करतोस, फर्जंदा! मुलुखगिरीची हौस फिटली इतकंच! होतं-नव्हतं, तेही गेलं, हाती धुपाटणं राहिलं! सांत्वनच करायचं, तर उभ्या महाराष्ट्राचं कर! ज्या हातानं या मुलखात शिवशाही आणण्याचा बेलभंडार उचलला; कल्याणकारी राजवटीचं शिवबंधन बांधलं! भ्रष्ट, दुष्ट मोगलाईला चारी मुंड्या चीत करण्याची शपथ देवविली, त्याच हातांनी आता ढोकळा खायचा, ढोकळा? छे...जगदंब, जगदंब! मिलिंदोजी : (जीभ काढत)...लईच ब्यकार पोझिशन झाली, म्हाराज! उधोजीराजे : (संतापलेला सूर दालनात घुमतो..!) बेकार? निकाल यायला सुरवात झाल्यापासून इथं माळ्यावर चढून बसलोय! सिंहासनावर विराजमान व्हायची ज्याची क्षमता, त्याच्यावर माळ्यावरच्या भंगारात बसायची पाळी यावी? ज्यानं घोड्यावर मांड टाकून अवघा महाराष्ट्र पादाक्रांत करावा, त्याचे पाय माळ्यावर बसून अवघडावेत? जगदंब, जगदंब! मिलिंदोजी : (हळहळत) चुक-चुक...झक मारली आनि झुनका खाल्ला, रास्सारी धावत बसला!...(जीभ चावत) म्हंजी...असं झालंय नव्हं! पन आता त्ये जाऊ द्या! झालं, ग्येलं, मिठी नदीला मिळालं, थालीपिठं खाया लगीलगी या, असा मुदपाकखान्यातून वैनीसायबांचा मेसेज हाय! उधोजीराजे : (माळ्यावरून खोल आवाजात) या पराभवाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही मुखात थालीपीठ काय, पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही! किंबहुना या माळ्यावरून पायउतारही होणार नाही! त्रिवार नाही!! मिलिंदोजी : (मिनतवाऱ्या करत) कशापायी जिवाला तरास करून घेतायसा? या खाली, दोघं बी मिळून डझनभर थालीपिठं हानू! पराभवाचा बदला कोनाचा घेयाचा? आनि कशापायी? काय बारकंसारकं आसंल, तर या इमानी चाकराला सांगा! चटशिरी करतोय की न्हाई बघा! उधोजीराजे : (किंचित विचारात पडत) असं म्हणतोस? मग दोन कामं करा! मिलिंदोजी : (गुडघ्यावर बसत) निस्ता हुकूम करा, म्हाराज! तुमचा बोल फुलासारकं न्हाई उचिलला तर नावाचा फर्जंद न्हाई! उधोजीराजे : (माळ्यावरती धडपडाट!) घोडा या प्राण्यावर कायमस्वरूपी बंदी आणा! आणि दुसरं... (दात ओठ खात) पहिले त्या आमच्या युवराज विक्रमादित्यांना इथं घेऊन या!! "मिशन वन फिफ्टी‘ करतोय, लेकाचा!! - ब्रिटिश नंदी
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Fri, 11/14/2014 - 06:09 नवीन
अरे कुठ नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा? गुरुजी याच समर्थन करून दाखवा पाहू 'वीजचोर' आमदाराकडेच वस्त्रोद्योग विकासाची जबाबदारी http://www.loksatta.com/mumbai-news/power-theft-accused-bjp-mla-suresh-halwankar-gets-responsibility-by-fadnavis-1041267/
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 11/14/2014 - 06:32 नवीन
महत्वाच्या राजा उदार बातमीवरही "मान्यवरांची" सुजाण प्रतिक्रिया अपेक्षीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
प्रसाद१९७१ Fri, 11/14/2014 - 07:13 नवीन
त्यांचे काम च होते ना ते रुळ तपासायचे आणि काही प्रॉब्लेम असेल तर कळवायचे. जे काम करणे अपेक्षीत होते ते केले म्हणुन बक्षीस? काय वेळ आली आहे :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रसाद१९७१ Fri, 11/14/2014 - 07:14 नवीन
ही अतिशय वाईट बातमी आहे. अश्या बातम्या सर्व पेपर नी पहील्या पानावर बॅनर हेडींग म्हणुन छापायला पाहीजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
आ
आजानुकर्ण Fri, 11/14/2014 - 13:31 नवीन
बातमीत वाईट काय आहे? भाजपाची अपरिहार्यता तुमच्या लक्षात आलेली दिसत नाही. (इति श्रीगुरुजी!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
कपिलमुनी Fri, 11/14/2014 - 13:27 नवीन
तुमच्याकडे सफाईने दुर्लक्ष करण्यात येणार आहे . अमेरीकेसोबत मंजूर केलेले अन्नसुरक्षा विधेयक , औषधाम्च्या किमतीवरचे नियंत्रण ई ई बातम्या कोणी पुढे आणणार नाही. आणि आणले तरी दुर्लक्ष करणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
च
चौकटराजा Fri, 11/14/2014 - 08:29 नवीन
माझे आवडते वाक्य ( ते माझेच आहे नेहरू म्हणतात आराम हराम है या प्रमाणे नाही) ,काँग्रेस हा भाजपाचा राजकीय गुरू आहे. ! ( तो जनसंघाचा नसला तरी ) .
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 11/14/2014 - 09:23 नवीन
+१ गुरुजींचे आणखी एक शतक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ध
धर्मराजमुटके Fri, 11/14/2014 - 10:17 नवीन
आराम हराम है ? नाही हो. मुळ वाक्य असे आहे " आराम हा राम आहे". मात्र कोणीतरी शुद्धलेखनाची मोठीच चुक करुन ठेवलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
आ
आनन्दा Fri, 11/14/2014 - 10:13 नवीन
शतकाबद्दल शुभेच्छा!.. बाकी यावरून माझीच एक भविष्यवाणी आठवली -
माझ्यादृष्टीने भाजपा आता ११०-१२० मधे अडकणे अधिक धोकादायक आहे. एक तर त्यांना पूर्ण बहुमत मिळाले पाहिजे, किंवा मग ~९०, म्हणजे शिवसेनेची स्पष्ट गरज पडेल अश्या सीट्स. १२०-१३० हा आकडा फारच विचित्र आहे. तिथे भाजपा पोचणे फारच घातक आहे राज्याच्या दृष्टीने..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 11/14/2014 - 10:25 नवीन
१२२ जागा हे फारसे घातक नाही. आगामी काही महिन्यातच शिवसेनेतील काही आमदार फुटुन भाजपत येऊन भाजप बहुमताचा आकडा गाठेल. फूट टाळण्यासाठी शिवसेनेला भाजपला पाठिंबा द्यावाच लागेल. कितीही मतभेद असले तरी भाजप शिवसेना पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी इच्छा आहे. शिवसेनेने अजून वस्तुस्थिती स्वीकारलेली नाही. भाजपवर 'सामना'तून रोज टीकेचा भडीमार सुरू असतो. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. सेनेने वस्तुस्थिती मान्य करून २०१७ मधील महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे, अन्यथा तिथेही वाट लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
द
दिवाकर देशमुख Sat, 11/15/2014 - 15:32 नवीन
फुट तर भाजपात पडणार आहे म्हणे ४० आमदारांना नितीन गडकरीच मुख्यमंत्री हवेत ;) उगाच दुसर्याचे बघायचे वाकुन आणि स्वतःचे ठेवायचे झाकुन चालु आहे तुमचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 11/15/2014 - 16:35 नवीन
>>> फुट तर भाजपात पडणार आहे म्हणे ४० आमदारांना नितीन गडकरीच मुख्यमंत्री हवेत स्वप्नांच्या हिंदोळ्यावर आनंदात झुलत रहा. *lol* *yahoo*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर देशमुख
द
दिवाकर देशमुख Sun, 11/16/2014 - 12:05 नवीन

जसे तुम्ही झुलत आहे तसेच ;) छत्तीसगड मधे इतक्या महिला मृत्युमुखी पडल्या आणि आपले परिधान मंत्री वर्ल्डटुरला गेले आहे आणि तिथुन फोटो शेअर करत आहे. साधी ट्विट देखील नाही या गोष्टीवर हेच काँग्रेसच्या राज्यात झाले असते तर छाती बडवत ट्विटचा महापुर आणला असता रोज चॅनल्स वर चर्चेची झडी लावली असती. पण भाजपाच्या राज्यात घडल्याने सगळे चॅनलवाले शेपुट घालुन गुपचुप ऑस्ट्रेलियाला पळुन गेले आनि फालतु बातम्या दाखवायला सुरुवात केली

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विटेकर Fri, 11/14/2014 - 10:43 नवीन
मला आशचर्य वाटते , युती तुटली नसती तर मिपाचे काय झाले असते ? इत्क्या महाचर्चा , आवेश , पुरावे शक्य तरी झाले असते का ? मला वाटते , युती तोडण्याचे जे कोणे शिल्प्कार असतील , त्यांना मिपातर्फे पुस्प्गुच्च पाठविण्यात यावा.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Fri, 11/14/2014 - 12:00 नवीन
हि बातमी वाचून लैच हहपुवा . मानल भाऊ काकाना . गुरुजी ऐकता ना वो ! http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Sharad-Pawar-took-Broom-for-Swachha-Bharat/articleshow/45144863.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 11/14/2014 - 16:45 नवीन
अशी नौटंकी करण्याची पवारांची जुनी सवय आहे. तुम्ही फार लक्ष देऊ नका आणि अजिबात गांभीर्याने घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
अ
अर्धवटराव Fri, 11/14/2014 - 18:43 नवीन
शरद पवार एनडीएची वाट चालू लागल्याचं चित्र
हे फार काहि अशक्य नाहि. तसंही शिवसेना केंद्रसत्तेतुन बाहेर पडल्यावर भाजपला "भरभक्कम मराठी" आधाराची गरज पडणारच आहे. पवारांव्यतिरीक्त कोण घेणार हि जबाबदारी... राष्ट्रवादी काँ. आणि भाजपने मतदारांना फार गृहीत धरल्याचं दिसतय. यात रा.काँ.चं काहि नुकसान होणार नाहि, पण याची किम्मत भाजपला चुकवावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 11/14/2014 - 19:04 नवीन
अशा पुड्यांवर आणि अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. भाजपला जिथे शिवसेनेच्या तब्बल १८ खासदारांची गरज नाही, तिथे ते राष्ट्रवादीच्या जेमतेम ६ खासदारांना हिंग लावूनसुद्धा विचारणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
द
दिवाकर देशमुख Sat, 11/15/2014 - 15:34 नवीन
२००९ पासुन जेव्हा हारलात तुम्ही तेव्हापासुनच अप्रचार करायला सुरुवात केली आहे भाजपाने आता दुसर्याला तोंड वर करुन कुठे बोलत आहेत.? विसरलात काँग्रेस विरुध्द काय काय अप्रचार चालु होते. आता जळायला लागली का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अनुप ढेरे Fri, 11/14/2014 - 13:02 नवीन
निवडणुकांचा खर्च राज्य सरकार करतं की केंद्र?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/14/2014 - 15:43 नवीन
कर भरणारे नागरीक करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गजानन५९ Sat, 11/15/2014 - 10:28 नवीन
अखेर भाजपने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव रडत खडत का होईना जिंकला, पण प्रश्न असा आहे कि शिवसेनेला इतके अपमानित करून या मोदी सेनेने काय साध्य केले ? ज्या सेनेच्या साथीत गेली २५ वर्ष तुम्ही गळ्यात गले घालून फिरत होतात ती यांना अचानक इतकी नकोशी का वाटू लागली ? मोदीसेना कदाचित ५ वर्ष इथे टीकेलही (ते पण आपल्या तथाकथित जाणत्या राजाच्या मनात असेल तर) पण जिथे स्वतः मोदी २७ सभा घेऊनही या लोकांना भ्रष्टाचार्वादी कॉंग्रेस (हे मोदींनी दिलेले नाव आहे )चा पाठींबा घ्यावा लागतोय तिथे पुढीलवेळी लोकांनी यांच्यावर का आणि कशासाठी विश्वास ठेवावा ? सेना चुकली असेल, नव्हे मी मान्य करतो कि सेना चुकली पण या मोदी लाटेत आणि बाळासाहेब हयात नसताना उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले हे हि काही कमी नाही. खरे तर याच उद्धव ठाकरेंची (मी धरून) सर्वांनी खिल्ली उडवली होती (खील्ली सम्राट राज ठाकरेंनी तर पार वडे आणि सुप बीप काढले होते ते त्यांच्यावर उलटलेच आहे.) पण जितका संयम उद्धावनी गेल्या २ महिन्यात दाखवला (जो सेनेच्या विचार (खरे तर आचार) सरणीत कधीच बसत नव्हता. वयक्तिक मला सेनेने विरोधात बसावे असे निकालापासून वाटत होते कारण साहजिकच भाजपसोबत सरकारमध्ये सेना गेली असती तरीही तिला कधीच तो आधीचा सन्मान मिळाला नसता. आता विरोधात बसून या कमकुवत सरकारविरुद राळ उठवून मान ताठ ठेवून वावरणे हेच खरे शहाणपणाचे ठरेल. खरे तर मी पक्का भाजपेयी माणूस ( भाजपेयी अशासाठी कि वाजपेयींचे विचार पटायचे पण मोदि चे पटतील असे नाही रादर ७०% मोदी विचार पटत नाहीत ) पण या तावडे, फडणीस, राजीव(प्रताप) रुडी, माधव भंडारी आणि खडसे मामांनी इतका माज करून ठेवला म्हणून वैतागून गेलोय कि साला भाजप नाही निवडून आले तरी चालेल पण या मंडळींचा माज कमी करा. असो साला गेल्या २ महिन्यातला राग बाहेर पडल्यामुळे आता कसे बरे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 11/15/2014 - 16:15 नवीन
>>> अखेर भाजपने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव रडत खडत का होईना जिंकला, पण प्रश्न असा आहे कि शिवसेनेला इतके अपमानित करून या मोदी सेनेने काय साध्य केले ? ज्या सेनेच्या साथीत गेली २५ वर्ष तुम्ही गळ्यात गले घालून फिरत होतात ती यांना अचानक इतकी नकोशी का वाटू लागली ? शिवसेनेबरोबर तीन पायांची शर्यत होती. संधी मिळताच भाजपने त्यातून आपला पाय काढून घेतला. शिवसेना वाटते तेवढी सरळ नाही. १९९५-९९ या काळात शिवसेनेने भाजपची प्रचंड फरपट केली होती. अहंभावी व उपद्रवी शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात सरकार चालविणे अत्यंत त्रासदायक ठरेल याची भाजपला कल्पना होती. ही युती तुटणारच होती. जागावाटप हे एक निमित्त झाले. >>> मोदीसेना कदाचित ५ वर्ष इथे टीकेलही (ते पण आपल्या तथाकथित जाणत्या राजाच्या मनात असेल तर) पण जिथे स्वतः मोदी २७ सभा घेऊनही या लोकांना भ्रष्टाचार्वादी कॉंग्रेस (हे मोदींनी दिलेले नाव आहे )चा पाठींबा घ्यावा लागतोय तिथे पुढीलवेळी लोकांनी यांच्यावर का आणि कशासाठी विश्वास ठेवावा ? जाणत्या राजाला कोणीच विचारत नाही म्हणून तर स्वतःहून न मागता पाठिंबा द्यायला पुढे आले. भाजपने याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. मनसे संपलेलीच आहे. राष्ट्रवादीचा न मागता दिलेल्या पाठिंबा प्रत्यक्षात न स्वीकारून पण त्याचाह उपयोग करून शिवसेनेचे ब्लॅकमेल थांबविले व शिवसेनेला सरकार स्थापनेत सामील करून घेतले नाही. त्याचवेळी शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देऊन काँग्रेसला उपाशी ठेवले. एकाचवेळी ३ विरोधी पक्षांना मॅनेज केल्यावर आता फक्त राष्ट्रवादीला संपविणे शिल्लक आहे. पुढील काळात राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील व राष्ट्रवादीला पाठिंबा काढून घ्यावाच लागेल. अशावेळी शिवसेनेला स्वतःहून पाठिंबा द्यावा लागेल. नाही दिला तर परत निवडणुक होऊन भाजपलाच फायदा होईल. >>> सेना चुकली असेल, नव्हे मी मान्य करतो कि सेना चुकली पण या मोदी लाटेत आणि बाळासाहेब हयात नसताना उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले हे हि काही कमी नाही. मान्य आहे. परंतु हातात ६३ आमदार असताना व भाजप बहुमतापासून बराच दूर असताना उद्धव ठाकर्‍यांनी योग्य ती पावले टाकली असती तर बरेच काही मिळविता आले असते (कदाचित अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपद सुद्धा). >>> खरे तर याच उद्धव ठाकरेंची (मी धरून) सर्वांनी खिल्ली उडवली होती (खील्ली सम्राट राज ठाकरेंनी तर पार वडे आणि सुप बीप काढले होते ते त्यांच्यावर उलटलेच आहे.) पण जितका संयम उद्धावनी गेल्या २ महिन्यात दाखवला (जो सेनेच्या विचार (खरे तर आचार) सरणीत कधीच बसत नव्हता. उद्धव ठाकर्‍यांनी गेल्या २ महिन्यात संयम दाखविला?????????????? हहपुवा हा त्यांचा संयम असेल तर संयम सुटल्यावर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. >>> वयक्तिक मला सेनेने विरोधात बसावे असे निकालापासून वाटत होते कारण साहजिकच भाजपसोबत सरकारमध्ये सेना गेली असती तरीही तिला कधीच तो आधीचा सन्मान मिळाला नसता. आता विरोधात बसून या कमकुवत सरकारविरुद राळ उठवून मान ताठ ठेवून वावरणे हेच खरे शहाणपणाचे ठरेल. सहमत. परंतु अजूनही शिवसेनेचे तळ्यात/मळ्यात सुरू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गजानन५९
द
दिवाकर देशमुख Sat, 11/15/2014 - 15:35 नवीन
फेसबुक सभारः- वो एक असाधारण भक्त था, 16 मई से पहले उसका एक ही काम था, दुसरो के ट्वीट्स पे जाके गालियां देना, फेसबुक पे सबके पोस्ट पे जा नमो- नमो लिखना! उसका मानना था, अगर मोदीजी बने प्रधान मंत्री, उसे मिलेंगे 15 लाख, सिलिंडर 100 रुपये में भरा जाएगा, पेट्रोल 20 रुपए लीटर! सारे कोंग्रेसी नेता जेल के अंदर होंगे, मोदी जी भारत को अमेरिका बना देंगे, एक-एक कर टूट रहे उस के सपने, मोदी के वादे सारे छूट रहे हैं! अब कभी-कभी वो सोशल साइट्स पर आता है, और चुपके से निकल जाता है, वो आज अंदर से दुखी है, पर अभी भी हारा नहीं है! मोदीजी की हर बात का बचाव करता है, लोगो से बोलता फिरता है “समय दो मोदी जी को”, वो आज दुखी है मोदीजी उसी रोबर्ट वाड्रा को बचा रहे हैं, जिसकी उसने 400 फोटो राष्ट्रीय दामाद वाली शेयर की थी! वो रिपोर्टरों को अब गाली भी नहीं दे सकता, कल तक वो जिन रिपोर्टरो को बिका बोलता था, आज वो मोदी के भजन गा रहे हैं, समझ नहीं आता वो आज किसे गाली दे! कभी किसी को आपटार्ड की गाली दे के निकल लेता है, वो आज कल अपने पुराने ट्वीट्स डिलीट करने में लगा है, मोदी जी के u -टर्न से तंग आकर, अब उसने ट्वीटना ही छोड़ दिया है! ये थी एक भक्त की व्यथा, अथ श्री नमो-भक्तम् कथा! ---- वरील लेखन कपोकल्पित आहे इथल्या कुणाशी संबंध लागल्यास तो केवळ योगायोग समजावा
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 11/15/2014 - 16:24 नवीन
राष्ट्रवादीने न मागता दिलेल्या पाठिंब्याचा भाजप पुरेपूर उपयोग करून घेईल असं वाटतंय. ४ प्रमुख विरोधी पक्षांपैकी मनसे संपलेली आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा थेट स्वीकार न करता किंवा स्पष्टपणे न नाकारता त्याचा उपयोग करून भाजपने शिवसेनेचे ब्लॅकमेलिंग मोडून काढले व शिवसेनेला सरकारमध्ये येऊन न देता आपली डोकेदुखी थांबविली. त्याचवेळी शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देऊन काँग्रेसला पूर्ण उपाशी ठेवले. आता काँग्रेसकडे विधानपरीषदेचे सभापतीपद हा एकमेव लाल दिवा आहे. तोसुद्धा काँग्रेसकडून काढून घेऊन राष्ट्रवादीकडे सोपविला जाईल व नंतर राष्ट्रवादीविरूद्धची भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढून राष्ट्रवादीच्या अंताचा प्रारंभ केला जाईल.
  • Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख Sun, 11/16/2014 - 06:15 नवीन
भाजपाने निर्लज्जपणे जनतेचा विश्वासघात करुन राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि त्यावर उत्तर द्यायला भक्तगण सोडले काल अमित शहा देखील पाय लावुन पळुन गेले उत्तर द्यायला हिंमत झाली नाही बहुतेक त्यांच्याकडे गुरुजी नव्हते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पैसा Sun, 11/16/2014 - 08:39 नवीन
राष्ट्रवादी हे सगळे गपपणे बघत बसतील असं वाटतं तुम्हाला? शरदराव पवार तुमच्या माझ्या वयापेक्षा जास्त वर्षे राजकारण करत आहेत आणि काँग्रेसलाही १८८५ पासूनचा इतिहास आहे. तुम्ही म्हणता तसं काहीही होणार नाही. हे सगळे मिळून आम्हाला खड्ड्यात गाडणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सौंदाळा Mon, 11/17/2014 - 05:49 नवीन
आजची बातमी (सकाळमधील) हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होऊन भाजपा - शिवसेना युती होण्याची शक्यता.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 11/17/2014 - 06:04 नवीन
हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होऊन भाजपा - शिवसेना युती होण्याची शक्यता.
सुरवातीला प्रत्येक ठिकाणी चुकणार्‍या शिवसेनेने विरोधी पक्षातच बसायचा निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिल्यामुळे पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढू शकेल.एक तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून भाजपच्या मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणावर नाराजी पसरली आहे.तसेच शिवसेना-भाजप यांच्यात परत बोलणी सुरू होऊ शकतील अशा बातम्याही आहेत. अशा वेळी "आम्हाला पाहिजे ती पदे द्या नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसतो" हा हुकमी एक्का शिवसेनेकडे असेल.विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा करून त्यात सरकारवर हल्ला चढविला आहेच.त्यातून शिवसेना एक आक्रमक विरोधी पक्ष बनू शकेल ही चिन्हे नक्कीच दिसली.राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन फार काळ सरकार चालल्यास भाजपविरोधी नाराजी अजून वाढेल आणि ते भाजपला परवडणार्‍यातले नाही. अशा वेळी शिवसेनेच्या आमदारांमध्ये फाटाफूट न झाल्यास इतक्या दिवसात चुकलेल्या खेळ्यांची भरपाई करायची संधी शिवसेनेकडे असेल. बघू त्याचा ते उपयोग करतात का ते. शिवसेना विरोधी पक्षात बसण्यावर ठाम आहे हे दाखवून द्यायला केंद्रात अनंत गीतेंचा राजीनामा देणे हे एक अजून प्रभावी पाऊल ठरू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
द
दुश्यन्त Mon, 11/17/2014 - 10:04 नवीन
सेनेने विरोधातच बसावे. एनसीपीची साथ घेवून त्यांनी एनसीपीला बदल्यात काय दिले ते समजून येईलच.अनेक मुद्द्यवर सभागृहात भाजपचे पितळ उघडे पडायची संधी आहे. आवाजी मतदान करून तात्पुरती विल मारून नेली आहे मात्र मोठी विधेयके पास करायला एनसीपी किंवा शिवसेनेकडे त्यांना हात पसरावाच लागेल. आता हिवाळी अधिवेशनात मराठा-मुस्लिम आरक्षण प्रश्न येणारच आहे. मराठा आरक्षणावर सगळे प्रश्न एक होतील पण मुस्लिम आरक्षणासाठी पण सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे असा आग्रह कॉंग्रेस-एनसीपी धरतील शिवसेना अर्थातच विरोध करणार. भाजपने देशात आत्तापर्यंत इतरत्र मुस्लिम आरक्षणाला विरोध केला आहे आता नवीन जोडीदाराचे (एनसीपी) ऐकणार की जुनी भूमिका घेणार हे दिसेलच. असे अनेक प्रसंग येतील जिथे शिवसेनेला सोडून एनसीपी जवळ केल्याने भाजपला अडचणीचे ठरणार आहे. आणि वर लोकांना/ मतदारांना पण यातून जायचा तो संदेश जाणार आहे.
  • Log in or register to post comments
ग
गजानन५९ Mon, 11/17/2014 - 12:12 नवीन
श्रीगुरुजी यांना खरच मनापासून विनंती इतके लांगुलचालन बरे नव्हे भाऊ बास आता :( मान्य आहे कि तुम्ही मोदी भक्त आहात पण जिथे चूक तिथे चूक काबुल करा ना राव जसे मैत्री मध्ये फ़क़्त गोड बोलणारा खरा मित्र नसतो वेळप्रसंगी आपण चुकत असू तिथे कान ओढणारा हाच खरा मित्र तसेच काहीसे इथेहि लागू पडेल. वर म्हंटल्याप्रमाणे अहो मी पण भाजपेयीच पण जिथे पक्ष चुकतो तिथे आपण आंधळेपणाने जर समर्थन करत बसलो तर मग बोलण्यासारखे काय राहते ? पक्षांना करू देना राजकारण पण निदान तुम्ही आम्ही (किमान चर्चेत तरी) तत्वांना चिकटून राहुयात न ? काय हरकत आहे ?
  • Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख Mon, 11/17/2014 - 13:36 नवीन
एकवेळ मोदी काँग्रेस मधे येतील परंतु गुरुजींना भाजप्यांच्या चुका दिसणार नाही
  • Log in or register to post comments
ज
जलिन्दर Tue, 11/18/2014 - 20:11 नवीन
शिवसेना श्रीगुरूजीनी मांडलेल्या लेखा प्रमाणे सध्याच्या तत्कालीन राजकीय घडामोडीमध्ये हरली असेल परंतु ही शिवसेनेच्या अंताची सुरूवात मात्र नक्कीच नसणार आहे, किंबहुना भविष्यकाळात शिवसेनाच हिंदूची एक कडवट संघटना म्हणून देशव्यापी होऊ शकते, याला आधार आहे आइसिस, एम आइ एम ह्या सारख्या संघटनांचा अन्य धर्मियामध्ये वाढत चाललेले आकर्षण तसेच जागतिक खिलाफत स्थापन करण्याचे पडू लागलेले स्वप्न ह्या मुळे कोठे तरी हिंदू समाज पण एका झेंड्याखाली एकत्र येईल असे वाटते. भाजप कॉंग्रेस प्रमाणे मवाळ भूमिके मध्ये जाऊ शकतो सत्ता आल्यामुळे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/19/2014 - 08:57 नवीन
मला एक गोष्ट समजत नाही. सगळे जण तावातावाने हे सांगत आहेत कि शिवसेनेने विरोधात बसायचे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठींबा घ्यायचा नाही मग सरकार कोणी चालवायचे ? राज्यपालांनी( राष्ट्रपती राजवट म्हणून). शेवटी ४२ टक्के आमदार असलेल्या पक्षाने नाही तर कुणी चालवायचे सरकार? हा जनादेश ज्यांना पटलेला नाही ( सर्व भाजप विरोधी लोकांना) त्यांनी एक गोष्ट का विसरली आहे कि ते समर्थन करीत असलेल्या एकही पक्षांला जनादेश नाहीच (२१ टक्के आणि कमी) आणि त्या जवळ जवळ सर्व पक्षांची मोट वळली तरी १४४ पार होत नाहीत. मग हा काथ्याकूट कशासाठी? कांग्रेस/ राष्ट्रवादीचे समर्थक तर असे बोलत आहेत कि आम्ही ९९ गुन्हे केले तरी चालतील तुम्ही एकही गुन्हा करायचा नाही. येथे मला महाभारतात श्रीकृष्णाने कर्णाला रथाचे चाक पृथ्वीने गिळलेला असताना विचारलेला प्रश्न आठवतो, द्रौपदी वस्त्रहरण पासून लाक्षागृहात पांडवांना जाळ्ण्य़ाच्या वेळेस तू कौरवांना दिलेला सहकार विसरलास, तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला अशी त्यांची परिस्थिती आहे? एक सुस्पष्ट असा पर्याय कोणी सुचवेल काय? शिवसेनेचे पाय धरून सरकार स्थापन झाले असते तर चालले असते पण त्यांना त्यांची जागा दाखविल्यामुळे काही लोकांच्या शेपटीवर पाय पडला आहे.विरोधासाठी विरोध याला काय अर्थ आहे? आदर्श पासून न्यायालयात असलेले घोटाळे अजून तडीला लागलेले नाहीत त्यामुळे नवीन लफडी काढून त्यात वेळ घालवण्यापेक्षा विधायक कामाला लागा असा स्पष्ट आदेश मोदी साहेबांनी दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेस/ राष्ट्रवादीची लफडी बाहेर का काढत नाही अशी कोल्हेकुई करण्यात काय हशील आहे.आधीची घाण साफ केल्यावर ते काम येणारच आहे. मोदी साहेब, लोक समजतात तेवढे दुधखुळे नाहीत- हे लोक का विसरतात. हि सगळी लफडी पुढची निवडणूक यायच्या अगोदर सहा महिने असताना बाहेर येतील. पवार साहेब "स्थिर" सरकर स्थापण्यासाठी उदार का झाले हे यातून समजते. जर सरकार आता पडले तरी काळजीवाहू सरकार म्हणून सहा महिने हातात येतात.उत्तम प्रशासन आणी सुशासन देऊ आणी मग काढू लफडी बाहेर म्हणजे पुढच्या वेळेस १४४ पार होतील इतका साधा सरळ विचार आहे भाजप हा स्वच्छ आणि निष्कलंक आहे असे मी तरी मानीत नाही. अडचणीच्या वेळेस गाढवाला बाप म्हणणे हा शहाणपणा असू शकतो. शिवाजी महाराजांनीसुद्धा औरंगजेबाशी लढण्यासाठी आदिलशहा आणी निजामशहाशी संधान बांधले होते हे आपला इतिहास सांगतो पण केवळ साधनशुचिता मानण्यासाठी आलेली संधी घालवणे हा मूर्खपणा ठरेल एवढे समजण्याइतके ते हुशार आहेत. राहिली गोष्ट समर्थकांची ते थोडे दिवस नाराज राहतील पण जर सहा महिन्यात उत्कृष्ट काम केले तर समर्थन वाढेल हेही माहिती आहे. IT IS BETTER TO BE PRAGMATIST THAN PURIST शुद्धतावादी होण्यापेक्षा समंजस होणे चांगले. मराठा आरक्षण कोणत्याही सामाजिक निकषावर टिकणार नाही हे कांग्रेस / राष्ट्रवादीलाहि माहित होते (आणि भाजपलाही) मग हात दाखवून अवलक्षण का करा? त्याला आमचाही पाठींबा म्हणून देवेन्द्रानि म्हटले आहे. निदान विरोधकांचे शस्त्र बोथट होते आणि आतले लोक ( तावडे आणि इतर)हि खुश होतात .
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 11/19/2014 - 11:45 नवीन
हे सगळे मान्य हो.. आमच्यासारखे लोक जे ना काँग्रेसचे ना भाजपचे ना आपचे समर्थन करतात त्यांच्या दृष्टीने पाहीले तर एक प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे हेच लॉजिक जेव्हा मनसेने रा.कॉ चा नाशिकमध्ये अथवा आपने दिल्लीत कॉ.चा पाठिंबा घेतला तेव्हा का नाही पटले? स्वतःवर वेळ आली की त्याच गोष्टी बरोबर सांगायच्या वरून त्यांचा हेतूच वाईट आणि आमचा हेतूच कसा चांगला असा 'holier than thou' पवित्रा घ्यायचा हे जास्त खटकते. इथे क्लिंटन वगळता बहुतेक लोकांनी (समर्थक खासकरून) जशा तर्‍हेचे समर्थन चालवलेय ते नक्कीच योग्य नाही. या पार्श्वभूमीवर क्लिंटनने सुस्पष्ट भुमिका मांडली आहे ती जास्त पटते. असो, योग्य अयोग्य भविष्यच ठरवेल तरीही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पिंपातला उंदीर Wed, 11/19/2014 - 11:47 नवीन
सह्मत हाड्क्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
क
कपिलमुनी Wed, 11/19/2014 - 12:03 नवीन
हाडक्याचे म्हणणे पटते . आणि , राष्ट्रवादीला १७६० नावे ठेउन त्यांचा पाठिंबा चालतो .. हे म्हणजे घरच्या बाईचा एक पाउल वाकडा पडला म्हणून गणिकेसोबत संसार थाटल्यासारखा आहे हो ! या भुमिकेचा बर्‍याच भाजपाप्रेमींनी सुद्धा विरोध केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
स
सुबोध खरे गुरुवार, 11/20/2014 - 06:41 नवीन
आपले म्हणणे मान्य आहे. मला विचारलं तर भाजपने एकवेळ कान्ग्रेसचा पाठींबा घेतला असता तरी चालला असता पण राष्ट्रवादीचा नको असे वाटते. परंतु कोणाचाही पाठींबा न घेता निर्नायकी अवस्थेत राज्य चालवणे ( राष्ट्रपती राजवट) यात राज्याचे नुकसानच होते. कारण सनदी नोकर किंवा राज्यपाल हे बहुधा बाहेरच्या राज्यातील असतात आणि त्यांना राज्याच्या प्रत्यक्ष प्रश्नाबद्दल तितकी आस्था असते असे नाही. ( उदा वसंत दादा पाटील सारख्या माणसावर सुद्धा राजस्थान चे राज्यपाल असताना महाराष्ट्राकडेच "जास्त" लक्ष देतात असा आरोप झाला होता ( अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळता राजकारण्यांची परिस्थिती सुद्धा वेगळी नसावी एवढेच त्यांना स्वतःच्या प्रश्नाबद्दल जास्त आस्था असते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रसाद१९७१ Wed, 11/19/2014 - 11:51 नवीन
भाजप ला ५ आमदार सापडले की जे मतदान झाले तर अनुपस्थित रहातिल आणी वेळ पडली तर राजीनामा देउन पुन्हा निवडुन येतील. म्.टा. ची बातमी.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/19/2014 - 16:06 नवीन
एवढे प्रतिसाद वाचण्याचं सार्थक झालं. दोन मोती मिळाले - भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे. दुवा १ नैतिक/अनैतिक या सापेक्ष कल्पना आहेत. घटनेत नैतिक/अनैतिकतेची व्याख्या नाही. दुवा २ विशेषतः दुसरा मोती फारच आवडला. फारच पोटंट आणि स्फोटक आहे.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Wed, 11/19/2014 - 16:30 नवीन
तु हे विचार मौक्तिक वाचल नहिस अजुन? http://www.misalpav.com/comment/631101#comment-631101 माझ्या मते तो धाग्याचा पर्मोच्च बिन्दु होता ; )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/19/2014 - 20:10 नवीन
‍कौल काढा. "या धाग्यातला परमोच्च बिंदू कोणता" असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
प्रदीप गुरुवार, 11/20/2014 - 12:49 नवीन
मला तर आपण सगळेच, व्यकिशः आणि समूहांमधून, हमाममधे आहोत, असे वाटू लागले आहे. त्यातील सिनीसिझम जाऊदेत, पण "भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे" ह्यात धक्का बसण्यासारखे काय आहे, हे समजले नाही. वास्तविक मी तर म्हणेन की भारतीयच काय जागतिक राजकारणातूनच नैतिकता कधीचीच हद्दपार झाली आहे. ह्याविषयी वेगळा धागा काढून सविस्तर चर्चा व्हावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विकास गुरुवार, 11/20/2014 - 15:49 नवीन
उठसुठ बिचार्‍या राजकारण्यांनाच का बोलता? सामान्य आणि विचारवंत नैतिकता पाळतात असे म्हणायचे आहे का? त्यांच्यातून अथवा त्यांच्या पाठींब्यातूनच तर राजकारणी समाज तयार होतो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/20/2014 - 13:48 नवीन
भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे. या जगात राजकारणात कोणत्या काळात, कोणत्या जागी स्वच्छ-शुद्ध नैतिकता होती ? किंबहुना हवे ते / फायद्याचे ते करणे आणि त्याला नैतिकतेचा मुलामा देऊन लोकांसमोर ठेवणे यालाच राजकारण म्हणतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
क्लिंटन गुरुवार, 11/20/2014 - 06:03 नवीन
आजच महाराष्ट्र टाईम्समध्ये आले आहे की अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे इत्यादींची चौकशी सुरू करण्यासाठी गृहमंत्रालयाने हालचाल सुरू केली आहे . प्रत्यक्षात काय होते ते बघायचे पण अशी सुरवात खरोखरच झाली असेल तर ती एक नक्कीच चांगली बातमी आहे. सध्या तरी किंपींग फिंगर्स क्रॉस्ड!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा