राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस
अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या . वाजपेयी यांच्यासोबत एका घरात त्या अनेक वर्षांपासून राहात होत्या .ज्या दिवशी कौल वारल्या त्यादिवशी सोनिया गांधी वाजपेयी यांच सांत्वन करायला त्याना भेटल्या . मनमोहन सिंग यांनी पण दूरध्वनी वरून संपर्क साधला . नंतर बदनाम झालेले वाजपेयी यांचे 'मानलेले' जावई रंजन भट्टाचार्य हे कौल यांच्या मुलीचे श्रीमान . Indian Express ने 'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा मथळा देऊन हि बातमी छापली . वाजपेयी यांनी 'मै कुंवारा हु , ब्रम्हचारी नही ' असे विधान केले होते तरी हे संबंध कायम सर्व सामान्य लोकांसाठी 'under the wraps ' होते किंबहुना जाणून बुजून ठेवण्यात आले होते . अटलजी ची सर्वसामान्य लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती ढासळू न देण्यासाठी हा खटाटोप होता .
दुसरा प्रसंग - १४ नोव्हे . ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो . पण त्यादिवशी 'कुजबुज ब्रिगेड ' च्या लोकांनी फेसबुक वर नेहरूंचे सिगरेट शिल्गाव्णारे , मद्याचा चषक हातात असणारे , महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped ) फोटो पसरवायला सुरुवात केली . उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते . पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही . नेहरूंचे सिगारेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात . नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेकजण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया ' बाळगतात हे पण माहित होत . पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नये अशी बालिश होती .
राजकारणी हि पण माणस असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही ? धुम्रपान व मद्यपान ह्या जगातले अनेक लोक सहज करत असणारया गोष्टी पण राजकारण्याना चार चौघात करण्याची मुभा नसावी ? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टी मध्ये हातात कॉकटेल चा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यावर गहजब केला होता . म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहील पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसाने धुम्रपान करू नये अशा भाबड्या अपेक्षांचे काय करायचे हा प्रश्न आहे . कुठल्याही नेत्याचे मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत ? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचे काम किती कुशलतेने करतो हा ? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार
देणे असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणे ; वाजपेयी यांचे हे कर्तुत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असे तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटले असावे ? देशात लोकशाही रुजवणे , अनेक मुलभूत बदल घडवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातल कर्तुत्व हे नेहरूंचे 'तसले ' फोटो टाकल्याने झाकोळून जाइल हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो .
बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ?
भारतीय नेते पण आपली 'Holier than cow ' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात . आपण धुम्रपान /मद्यपान / सुंदर स्त्रियां सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद . आपले हेनिकेन बीअर चे प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवले नाही . त्याना सतत ओढायला पाईप लागायचा . तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात .
राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यात येणार्या स्त्रिया हा विषय राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चवीने चघळला जाणारा विषय . नेहरू आणि लेडी Mountbatten हे याचे उदाहरण . त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबध होते याची चर्चा आपण चवीने करणे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण करत असलेले आक्रमण नाही का ? सध्या मोदींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चालू आहे . त्यांनी सोडलेल्या त्यांच्या बायकोपासून ते 'पाठलाग ' करत असणारया स्त्रीपर्यंत अनेक विषयावर चवीने चर्वित चर्वण चालू आहे . हे सगळे जरी खरे आहे असे मानले तरी 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे . (एन . डी . तिवारी सारख्या नेत्याला अपवाद ठेवावे काय ?)
अर्थातच हे अवघड आहे . लोकांना मोठ्या लोकांबद्दल आणि एकूणच gossiping करायला आणि ऐकायला आवडत . पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे . राजकारणी हि कितीही तिरस्करणीय जमात बनली असली तरी त्याना एवढा favor भारतीय जनते ने करावा .
(लेखात थोडा preaching चा टोन आला असल्यास क्षमस्व )
💬 प्रतिसाद
(143)
ज
जेपी
Sun, 11/16/2014 - 07:42
नवीन
ओके.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/16/2014 - 08:20
नवीन
छान धागा रे पिंपातल्या उंदरा.
ते तसे ठरवतातच असे आमचे मत.राजकारणि म्हंटले की तुमचे ते पब्लिक लाइफ आलेच ना? मग त्यात खाजगी आयुष्याची चौकशी होणारच.अटलजींचे हे प्रकार अगदी ७०च्या दशकापासून लोकांना परिचित होते.अर्थात ते योग्य की अयोग्य हा ज्याचा त्याचा प्रॉब्लेम. पण लोक चर्चा करणारच, नव्हे ती केलीच पाहिजे.
दारूबंदी झालीच पाहिजे म्हणणारा घरी पेग लावत असेल तर आपण त्याचे भाषण ऐकू का? असे हे विचारतात.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sun, 11/16/2014 - 09:40
नवीन
Holier than "cow"!!
एकच नंबर. आवडल्या गेले आहे.
(आगावपणाची सूचना - धागाकर्त्याने धाग्यात स्वतः प्रतिसाद दिल्यास स्पर्धकांचा उत्साह वाढेल)
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 11/16/2014 - 09:56
नवीन
मोनिका लेवेन्स्की प्रकरणानंतर साप्ताहिक सकाळमध्ये पाश्चिमात्य आणि भारतीय नेत्यांची व्यक्तिगत आयुष्ये आणि त्या-त्या जनतेचा त्याबाबतीतला उदारपणा ह्या विषयावर एक तौलनिक लेख आला होता. त्यामध्ये भारतीय मतदार हा उलट आपल्या नेत्यांच्या व्यक्तिगत आयुष्यांपेक्षा त्यांच्या राजकारणी म्हणून असलेल्या प्रतिमेवर जास्त विश्वास ठेवणारा आहे असे म्हटले होते. वरील उदाहरणांतही जास्त गहजब माजवणारी इंग्रजी प्रसारमाध्यमे होती हे लक्षात घेण्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
H
hitesh
Sun, 11/16/2014 - 10:04
नवीन
भारतीय राजकारणात या सगळ्या प्रकाराची सुरुवात कुजबुज संघाने केली अहे.
- Log in or register to post comments
व
विश्वजीत भोसले पाटील
Sun, 11/16/2014 - 10:23
नवीन
गांधीजींचे ब्रह्मचर्य टेस्टींगचे प्रयोग आरेसेसला फार आवडतात, कारण संघि त्याची फार चर्चा करत असतात. नेहरु एडविना हा तर संघिंचा आवडता विषय..........
- Log in or register to post comments
H
hitesh
Sun, 11/16/2014 - 15:38
नवीन
रा. स्व. सोंग ?
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Sun, 11/16/2014 - 12:09
नवीन
विकृत मानसिकता असणारेच अश्या पध्दतीची कृत्ये करतात. त्याच बरोबर गांधी जयंतीला माथेफिरुचे समर्थन करणारे पोस्टी फिरवणे हे देखील विकृतीच आहे. अश्या लोकांवर सरकारने त्वरीत उपचार चालु करावे.
वाजपेयींच्या खाजगी आयुष्याची कोणत्याही पक्षाने अथवा कोणीही खिल्ली उडवली नाही. पण गांधीद्वेषाने भरलेले माथेफिरु लोक जागोजागी इतर पक्षांच्या पुढार्यांची अत्यंत वाईट पध्दतीने खिल्ली उडवत चुकिचा प्रचार करत फिरतात. मानसिकताच अशी असल्याने त्यांच्या डोक्यात असेच विचार येतात.
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 11/17/2014 - 07:53
नवीन
अगदी बरोबर... गांधीद्वेषाने भारुन जाउन वाजपेयी, मोदी यांच्यावर चिखलफेक करणार्या "इतर" पक्षातल्या लोकांवर उपचार करण्यासाठी, सरकारने खास फॅसिलिटीज चालू करायल्या हव्यात...
सोबतच गांधीच्या मार्गाने चालणार्या एन डी तिवारी, दिग्विजय यांसारख्या महान नेत्यांसाठी गांधीरत्न, गांधीभूषण वगैरे सारखे पुरस्कार सुरु करावेत...
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Mon, 11/17/2014 - 08:03
नवीन
खर बोलल्यावर मिर्ची लागते. दिसुन आले.
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 11/17/2014 - 08:18
नवीन
अरे वा! आपल्याला दिसतेही का? वा वा वा...
बाकी गांधी म्हणजे नैतिकतेची, शुचितेची, सर्वोत्तम पातळी असे माननार्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार? सोइचे तेवढेच घ्यायचे, बाकिकडे कानाडोळा करणे याच परंपरेचे सर्व पाईक... चर्चा करा म्हणलं, कि वैयक्तिक पातळीवर येणार... असो..
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Mon, 11/17/2014 - 08:47
नवीन
तुमची अपेक्षा काय असते सगळ्यांना माहीत आहे.
छत्तीसगड मधे जे झाले त्यावर मोदींना वेळ आहे का काही बोलायला ? एक शब्द नाही तोंडातुन निघाले वेळ देखील नाही का? आणि ऑस्ट्रेलियात जाउन भाषण देत आहे फोटो काढत आहे. त्यासाठी भरमसाठ वेळ आहे
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 11/17/2014 - 09:52
नवीन
छत्तीसगढ़मध्ये जे झाले, त्या प्रकरणाचा इथे काय संबंध? उगाच आपलेच म्हणने रेटायला, नको ते मुद्दे आणू नयेत...
असेही, आमच्या अल्पमतीनुसार, संबंधित कंपनीच्या मालकाला, मुलाला अटक झालेली आहे, आणि मुख्यमंत्र्यांच्या जावयाची चौकशी चालू आहे... यापुढे आपल्याला काय भाष्य अपेक्षित आहे मोदींकडून?
अवांतर: शिरवळ मध्ये झालेल्या अपघातानंतर मोदींनी, आपला दौरा आटोपता घेउन, सार्वजनिक वाहन व्यवस्थेवर एक पत्रकार परिषद घ्यावी का??
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 11/17/2014 - 09:57
नवीन
अवांतराबाबतः
मुद्दा कदाचित योग्य असला तरी वाद करताना संवेदनाशून्यता दाखवू नये ही विनंती.
शिरवळमध्ये झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले लोक त्यांच्या कुटुंबांसाठी मोदींपेक्षाही जास्त महत्त्वाचे असणार आहेत. असो!
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 11/17/2014 - 13:34
नवीन
फक्त मुद्यांची उतरंड पाहून असे टंकले... अपघातातील व्यक्तिंसाठी असंवेदना नाही... अपघातग्रस्त कंटेनरच्या थोडेच मागे आमची गाडी होती... तीथे धावणार्या सुरुवातीच्या लोकांमध्ये माझेही कुटूंब होते. ते दृश्य आठवूनही थरकाप होतोय..
फक्त सांगायचे एवडेच होते, की, काही बाबतीत आपण काहीच करु शकत नसतो. फक्त शब्द तीथे तोकडे असतात.. प्रत्यक्ष कृती महत्वाची असते, आणि ती होते आहे...
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Mon, 11/17/2014 - 13:35
नवीन
तेच मोदी कडुन काय अपेक्षा आहे. अंबानीच्या हॉस्पिटलचे उद्घाटन करताना पीएमओ तर्फे ९ ट्विट केले गेले पण छत्तीस गड च्या घडामोडीवर एक ही ट्विट नव्हते? का ? याचा अर्थ सांगायची गरजच नाही म्हणा तरी तुमच्यासारखे भक्त अश्या गोष्टींना शुल्लकच लेखनार कारण तो भाजपाच्या राज्यात झाले आहे. काँग्रेसच्या नाही
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 11/17/2014 - 13:49
नवीन
असुद्यात हो... आहोत आम्हि भक्त.. पण फक्त बोलघेवडेपणा करण्यापेक्षा कृती करणारे आम्हाला जास्त प्रिय आहेत... नाहीतरी सध्या "मोदी" असे दिसले तरी लोकांना उलट्या, जुलाब वगैरे चालू होतात... मुद्दा कोणताही असो, मोदींवर टांग वर केल्याशिवाय बरेच वाटत नाही...
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Mon, 11/17/2014 - 15:05
नवीन
ट्विट का आले नाही त्यावर उत्तर नाही वाटते म्हणुन फाटे फोडायला सुरुवात केली
वाचुन मात्र करमणुक झाली :)
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 11/17/2014 - 17:27
नवीन
ट्विटर वापरता, की केवळ पेपरमध्ये वाचता? @pmoindia हे ट्विटर हॅंडल चेक करा सहा दिवसांपूर्वीचे... आपल्याला हवी ती ट्वीट मिळेल...
करमणूकिचे म्हणाल, तर धन्यवाद... लोकांना हसवणे हे पुण्यकर्म मानले जाते... आज आपल्या गाठीशी भरपूर पुण्य जमा झाले असेल...
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/17/2014 - 18:00
नवीन
आणि अजून एक, ४ दिवसांपूर्वी पेपरमध्ये अशीदेखील बातमी होती की पंतप्रधांनी छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांशी ३० मिनिटे चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
पण असो.. तुम्ही ते वाचाल अशी अपेक्षा नाहीच आहे.
जाता जाता, तुम्ही खाली माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही, अजूनही.
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Tue, 11/18/2014 - 06:53
नवीन
आढावा घेतला आणि फिरायला निघुन गेले.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 11/18/2014 - 07:04
नवीन
ह्म्म.. म्हणजे तुमची अशी अपेक्षा दिसतेय की त्यांनी ते जी२० वगैरे रद्द करून भारतात मुक्कम ठोकायला होता..
म्हणजे मग तुम्ही उलटे बोम्ब मारायला मोकळे.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 11/18/2014 - 18:53
नवीन
मोदी फिरायला गेले तरी त्यांचे बारीक लक्ष भारतातील घडामोडींवर आहे. शरद पवारांनी केलेल्या सफाई अभियानाचे त्यांनी फेसबुकवर कौतुक केले.
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 22:33
नवीन
नुस्तं नेटवरुन बघितलं तर चालतं... मोदींची खुर्ची उत्तर ध्रुवावरच ठेवली तरी चालेल
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 11/19/2014 - 00:57
नवीन
ओके, मग तुमचे काय म्हणणे आहे. मोदींनी परदेश दौरे करु नयेत का?
- Log in or register to post comments
र
रामदास
Sun, 11/16/2014 - 14:22
नवीन
हे गृहस्थ वर्हाडातील मोठे नेते. यांच्या रंगीत जीवनाबद्दल अनेक किस्से सांगीतले जातात. एका निवडणूकीपूर्वी हे अमेरीकेचा दौरा करून आले होते. त्यांच्या विरोधकांनी एक भुमका मतदार संघात पसरवली ती अशी की साहेब अमेरीकेतून असा गॉगल घेऊन आले आहेत की त्यातून त्यांना आरपार दिसते. तसे हे नेते कायम गॉगल वापरायचे. प्रचाराला बाहेर पडल्यावर एकाही घराचे दार उघडेना. निवडणूकीत पडले.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Mon, 11/17/2014 - 05:40
नवीन
@रामदास - भन्नाट किस्सा . ग्रामीण राजकारणात कसले भन्नाट ideas लढवल्या जातील सांगता येत नाही
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 11/19/2014 - 08:02
नवीन
तुमच्या एका किश्श्यावर हा टुकार धागा कुर्बान ;)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 11/16/2014 - 15:44
नवीन
मस्तच हो उंदीरमामा! फक्त एक तपशिलाची गफलत आहे - मोनिका लेविन्स्की प्रकरण बिल क्लिंटन यांच्या दुस-या टर्ममध्ये उघडकीला आले - १९९८ साली. क्लिंटनची पहिली टर्म ही जानेवारी १९९३ ते नोव्हेंबर १९९६ होती. मोनिका व्हाईट हाऊसमध्ये १९९५-९७ हा काळ काम करत होती. पण हे झालं तपशिलाबद्दल! मुद्दा एकदम बरोबर आहे!
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Mon, 11/17/2014 - 05:37
नवीन
बोका काका - तपशिलात मोठीच चूक झाली . cross check करून घ्यायला हवी माहिती हा धडा शिकलो
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Mon, 11/17/2014 - 07:05
नवीन
मी लिहिणार होतो तितक्यात श्री. बोका ए आझम यांनी चूक नजरेस आणून दिलीच आहे.
पण श्री. पिपातला उंदीर, ही तुमची केवळ तपशीलातली चूक नाहिये.
कारण या चुकीमुळे तुमचं पुढलं सगळं प्रतिपादन,
हे सगळं चूक ठरतंय.
कारण बिल क्लिंटनचं हे वागणं आणि तरीही हिलरीचं त्याला न सोडणं यावर नाराज असलेल्या अनेक अमेरिकन स्त्रिया (डेमोक्रॅट्सचा हुकमी मतदारसंघ) मला माहिती आहेत. क्लिंटनची ती दुसरी आणि अखेरची टर्म होती म्हणून तो आणि डॅमोक्रॅटस निभावले, नाहीतर बिल-हिलरीची खैर नव्हती....
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Mon, 11/17/2014 - 07:19
नवीन
मान्य : )
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Mon, 11/17/2014 - 07:28
नवीन
बाकी इतक्या मोकळेपणी तुम्ही मान्य केलेलं पाहून खरोखरच बरं वाटलं.
अशा चुका होतात लिहिण्याच्या भरात, पण त्या मोकळेपणाने मान्य करणारे विरळा...
त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंद्न!
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 11/17/2014 - 20:33
नवीन
क्लिंटनची ती दुसरी आणि अखेरची टर्म होती म्हणून तो आणि डॅमोक्रॅटस निभावले, नाहीतर बिल-हिलरीची खैर नव्हती....
दुसर्या टर्मच्या शेवटी हिलरी डेमोक्रॅट्सचा (बर्यापैकी) हुकमी मतदारसंघ असलेल्या न्यूयॉर्क राज्यातून सिनेटर म्हणून निवडून आली. त्याच वेळेस अॅल गोअरला नैतिकतेचा झटका आल्याने, त्याने क्लिंटनला प्रचारापासून लांब ठेवले, परीणामी हरला...त्या उलट नळावरील भांडणापेक्षा कडाक्याची भांडणे प्रायमरीत केल्यावरही बिल आणि हिलरी यांच्याकडून ओबामाने दोन्हीवेळेस प्रचार करवून घेतला आणि दॅट टूक "केअर" ऑफ ओबामा अँड ओबामाकेअर! ;)
बाकी जर मियॉ-बिबी राजी असले तर काही प्रश्न नाही. पण त्यातून कुणावर बळजबरी होत असेल तर तो मुद्दा आणणे अयोग्य नाही. तेच एन डी तिवारींसारख्या केसेस बद्दल (विशेष करून पितृत्व नाकारण्यासंदर्भात).
तसेच, जर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकणारी भानगड असेल तर त्याबद्दल त्या संदर्भातूनच मतपरीवर्तन करण्यात काही गैर नाही. या दुसर्या मुद्यासंदर्भात शशी थरूर यांची पाकीस्तानी पत्रकार स्त्री बरोबरची कथित मैत्री (संबंध होते का माहीत नाही, तो मुद्दा नाही) आणि त्यावरून बोलल्यावर काही दिवसात झालेला सुनंदा थरूर यांचा गूढ मृत्यू हे कदाचीत एक गंभीर उदाहरण होऊ शकते.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 11/20/2014 - 10:04
नवीन
उंदराला बोका साक्षी......
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sun, 11/16/2014 - 16:50
नवीन
चौफुला प्रकरण आठवता नाय का कुणाला?
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Sun, 11/16/2014 - 16:59
नवीन
कर्नाटकचे एक माजी मुख्यमंत्रि परदेश दौर्यावर जाताना आपल्याबरोबर मॉडेलसचा ताफा नेत.तामिळनाडूचे करूणानिधी ह्यांना दोन का तीन बायका होत्या.एका तामिळ मित्राच्या सांगण्यानुसार मतदारांनाही ह्याची कल्पना असायची पण त्यांची लोकप्रियता काही घटली नाही.कर्नाटकचे रामकृष्ण हेगडे ह्यांचे एका मोठ्या नर्तकीबरोबर संबंध होते.त्यांनी तिला न्युयॉर्कमध्ये घरही घेऊन दिले होते.पण हेगडे काम करणारे म्हणून प्रसिद्ध होते व त्यांची लोकप्रियता टिकून होती.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 11/16/2014 - 18:33
नवीन
कुठल्याही पुढार्याने आपली राजकीय ताकद, आपला प्रभाव ह्याच्या जोरावर संबंधित मुलीला भुलवून, लालूच दाखवून संबंध प्रस्थापित केले असतील तर ते निव्वळ वैयक्तिक म्हणता येत नाही. त्यांच्या राजकीय वजनाचा त्यात सहभाग आहे म्हणून ते लोकांपुढे येणे गैर नाही. आणि पुढार्यामधेही हिंमत असायला हवी की तो ठणकावून म्हणू शकला पाहिजे की होय मी लफडे केले. क्लिंटनने ही हिंमत दाखवली नाही. त्याने खोटारडी जबानी दिली. माझे ह्या महिलेशी कोणतेही लैंगिक संबंध नव्हते अशा अर्थाचे वाक्य टिंगल करण्याकरता वारंवार दाखवले जाते. अशा प्रकारे जेव्हा पुढारी आपले लैंगिक उपद्व्याप लपवू पहातो तेव्हा त्याचे लफडे बनते. जिथे लोकशाही असते तिथे ह्या वस्तुस्थितीला महत्त्व द्यायचे का नाही हे लोकांनीच ठरवायचे आहे. त्यांना आपला पुढारी कुटुंबवत्सल, रामाप्रमाणे एका बायकोशी एकनिष्ठ असणारा असावा असे वाटत असेल तर त्यांना तो अधिकार आहे.
आता नेहरू व गांधींकडे येऊ. गांधीवाद म्हणून ज्या तत्त्वांचा उदोउदो केला जातो ती तत्त्वे सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य तसेच पंचा प्रकरण घडल्यापासून साधी रहाणी ज्यात व्यसनापासून अलिप्त असणे अभिप्रेत होते. तर अशा गांधीवादाचा टेंभा मिरवणारे नेहरू आणि गांधी जेव्हा स्त्रियांशी लगट करताना दिसतात, सिगरेट वगैरे व्यसने करताना दिसतात तेव्हा ते विसंगत वाटते आणि त्यात ढोंगीपणा दिसतो. गांधीवादात उल्लेखलेली ही तत्त्वे अव्यवहार्य आहेत. त्यांना नको इतके डोक्यावर बसवून लोकांच्या अपेक्षा वाढवणे हे चूक होते.
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 11/17/2014 - 07:56
नवीन
दणकून सहमती...
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sun, 11/16/2014 - 19:36
नवीन
विधुर नेहरूंचे काही स्त्रीयांशी सम्बद्ध होते असे साङ्गतात. हि बाब एरवी त्यांची खासगी बाब मानता येइल. पण आधी viceroy आणि १५ ऑगस्ट १९४७ नंतर governor general (gj) म्हणून नेहरूंचे बॉस असणाऱ्या mountbatten यांच्या पत्नीशी त्यांचे सम्बद्ध असणे हि खाजगी बाबत मानता येत नाहि. गुप्त हेरांनी या भानगडीची माहिती mountbatten यांना दिली नसेल असे वाटत नाहि. फाळणीच्या आधीच्या आणि नंतर जिना यांच्याशी झालेल्या त्रि पक्षीय वाटाघाटीत हे दुखावलेले gj निष्पक्षपाती राहिले असतील का ?
फाळणी नंतर viceroy ने gj म्हणून रहावे याची खटपट नेहरूंनी का केली असावी ? पाकिस्तानने तसे केले नाहि.
काश्मीरबाबत नेहरूंचे निर्णय gj च्या प्रभावाखाली घेतले गेले नाहीत का ?
हे प्रश्न भारताच्या भवितव्याशी निगडीत आहेत.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Mon, 11/17/2014 - 05:57
नवीन
@आठवले - नेत्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यामधील गोष्टी मिळवण्यासाठी आपल्या समाजामधील clout चा वापर करणे सर्वथैव अयोग्यच . वाजपेयी यांच्या सत्ता काळात रंजन भट्टाचार्य हे एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनले होते . मोदी यांनी पण 'त्या ' महिलेचा पाठलाग करताना सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचे आरोप आहेत . नेहरू हे hardcore गांधीवादी कधीच नवते . त्यांच्यावर पाश्चात्य विचाराचा आणि राहणीचा पगडा होता . लेडी mountbatten यांच्या आणि नेहरू यांच्या संबंधाचा गवगवा झाल्याने mountbatten यांच्या भारताकडे बघण्याच्या दृष्टीकोनात पूर्वग्रह आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तुमच्याशी सहमत .
अवांतर - वाजपेयी यांचे राजकुमारी कौल यांच्याशी असणारे संबंध हे दिल्लीच्या वर्तुळात सगळ्याना माहित असले तरी त्याचा वापर प्रचारात कॉंग्रेस यांनी वाजपेयी यांचे प्रतिमा हनन करण्यासाठी कधी केला नाही हे मान्य करावे लागेल . Give devil his due
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/17/2014 - 06:38
नवीन
हो.. जिथे नेता प्रामाणिकपणे या गोष्टींची कबुली देतो तेव्हा असे प्रश्न येत नाहीत. वर रमेशसाहेबांनी म्हणल्याप्रमाणे जेव्हा नेत्याची उक्ती आणि कृती यांमध्ये अंतर दिसायला लागते तेव्हाच हे प्रश्न निर्माण होतात.
नेहरूंचे पण तसेच आहे - त्यांचे नेमके लेडी माऊंट्बॅटनसोबतच संबंध(?) कसे, प्रश्नचिन्ह अशासठी की ते संबंध नेमके कोणत्या प्रकारचे होते याबद्दल मला माहीत नाही. पण खरेच असेल तर या संबंधांचा गव्हर्नर जनरलने उपयोग करून घेतला नसेलच असे कशावरून? (संबंध असतील तर) याच नेहरूंनी हिंदू मॅरे़ज अॅक्ट पास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती हे विशेष.
गांधींबद्दल असेच आहे - गांधींची मूळ तत्वे कोणती? अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, गांधी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात ब्रह्मचारी होते हे सत्य आहे (असेल असे मी मानतो, पण त्यांचे ब्रह्मचर्याचे प्रयोग कोणाचे तरी शील पणाला लावून चालले होते. ही हिंसा नव्हे का? किंबहुना आपल्या ब्रह्मचर्याची परीक्षा करण्यासाठी नग्न तरूणींना बिचान्यात घेऊन झोपणे हे सामाजिक ब्रह्मचर्याचे उदाहरण होऊच शकत नाही.)
असो, कोणीतरी नेहरू/गांधींना ओढले आहे म्हणून लिहावे लागले. इत्यलम.
तरीही त्यांच्या जयंतीच्या दिवशी मुद्दाम त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करणे कदाचित अयोग्यही असेल, पण इतर लोकांनाही त्याच दिवशी लोकांना गांधी नेहरूंची आठवण येते हे देखील तितकेच खरे ना?
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 11/19/2014 - 08:38
नवीन
गांधीजी ब्रम्हचर्य पाळायचे? ब्रम्हचर्याचा जो साधारण अर्थ आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे, त्या अर्थाने गांधीजी कधीच ब्रम्हचारी नव्हते. पत्नी आणि मुलेबाळे असणारा गृहस्थ होता तो..
हा प्रयोग त्यांनी स्वतःच्या मना-इंद्रियांवरील ताबा तपासण्यासाठी केला होता, असे वाटते. त्याला संबंधित स्त्रियांची सहमती होती, असे वाटते..
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/17/2014 - 06:40
नवीन
असहमत. वाजपेयींनी जाहीर स्वीकृती केली म्हणून काँग्रेसला काही करता आले नाही. नाहीतर मोदींच्या बाबतीत काय झाले ते सार्यांना ठाऊक आहे..
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Mon, 11/17/2014 - 07:43
नवीन
जाहीर स्वीकृती म्हणजे काय रे भाउ
तसे एनडी तिवारी ने देखील जाहीर स्वीकृती दिली म्हणुन बहुदा आशिर्वाद घ्यायला राजनाथ गेले होते ? ;)
मोदी चे जासुसी प्रकरण काय होते ते जरा सांगतात का मग ?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/17/2014 - 08:24
नवीन
इथेच वर आलेले आहे - वाजपेयींनी स्वतः मान्य केले- मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही म्हणून.. हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर.
मोदींचे जासूसी प्रकरण हा सरकारचा 'सर्वसामान्यांच्या जीवनातला हस्तक्षेप' या सदरात जाते, वैयक्तिक चारित्र्य या भागात येत नाही. तस्मात इथे पास - वेगळ्या धाग्यावर चर्चा करू.
आता उरले एन डी तिवारी - त्यांनी जाहीर स्वीकृती दिलेली नाही - उलट त्यांच्या मुलाने त्यांची जबरदस्ती स्वीकृती घेतली आहे. आता राजनाथ सिंग त्यांना भेटायला का गेले या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही, कारण ते निवडणूकीपूर्वीचे राजकारण आहे आणि मी काही राजनाथ सिंगांचा समर्थक नव्हे. पण मला त्यात काही वावगे देखील वाटत नाही कारण राजकारण म्हणले की अश्या काही गोष्टी येतात. आणि तसेही एखाद्याच्या मित्रपरिवारात चारित्र्यहीन लोक असल्यानुळे तो लगेच चारित्र्यहीन होत नाही.
आणि जाता जाता - बहुधा काँग्रेस इतरांच्या (वाईट ?)चारित्र्याचा राजकारणासाठी उपयोग करत नाही असे म्हणण्याचा अधिकार तुम्हीच घालवला आहे. कारण वरील तीनही गोष्टींचा कोंग्रेसने पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. आणि त्याचे पुरावे तुम्हीच वर दिलेले आहेत.
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Mon, 11/17/2014 - 08:44
नवीन
मोदींनी सरकारी व्यवस्था जासुसीसाठी वापरली होती त्यामुळे त्याला हायलाईट केले गेले आहे. तिच्याशी काय संबंध आहे त्यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याने टिप्पणी केली नाही ( केली असल्यास पुरावा देउन मगच बोलावे )
राहिले तिवारी त्याचा संबंध तर भाजपाबरोबर देखील आहे त्याचे कर्म तो भोगत आहे .
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/17/2014 - 09:10
नवीन
हा घ्या.. अजून अहे तर अजून देतो.
ही काँग्रेसच्या परपपूज्यांची बातमी
आणि मुख्य म्हणजे विषय वैयक्तिक चारित्र्याचा आहे, सरकारच्या वैयक्तिक अवकाशातील घुसखोरीचा नव्हे. मोदींचे स्नूपगेटमध्ये काही पर्सनल इंटरेस्ट (चारित्र्याशी संबंधित) होते का याबद्दल तुमच्याकडे काही पुरावे असतील तर द्या आणि मग आपण मान्य करू की ही चर्चा इथे संयुक्तिक आहे म्हणून.
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Tue, 11/18/2014 - 06:55
नवीन
मी आशा करतो की आपणास इंग्रजी वाचता येत असेल आणि त्याच्या शब्दांचा अर्थ देखील लावता येत असेल.
धन्यवाद
आणि येत नसल्यास मराठी आणि हिंदी वर्तमानपत्रातली बातमी वाचा आणि मग बोला.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 11/18/2014 - 07:34
नवीन
हा हा हा. चूक झाली खरी. तुमचा वरचा प्रतिसाद वाचला नाही.
पण तरीही मला हसू आवरत नाही कारण तुम्ही ती बातमी मोदींच्या चारित्र्याशी जोडली आहे. जर त्या काळातील बातम्या नीट वाचल्या तर तुम्हाला हे कळून येईल की त्यामध्ये मोदींचे पर्सनल इंटरेस्ट नसून राजकीय इंटरेस्ट होते. आणि मी कधीपासून ओरडून हेच सांगतोय की यामध्ये मोदींचे चारित्र्याशी संबंधित पर्सनल इंटरेस्ट आहेत हे सिद्ध करा, आणि मग आपण या गोष्टीवर इथे चर्चा करू, नाहीतर वेगळ्या धाग्यावर चर्चा करू.
नाहीतर या धाग्यावर मोदींना ओढून धागा भरकतवू नका.
मोदींच्या पत्नीबद्दल इथे चर्चा होऊ शकते, पण तो मुद्दा इथे कोण काढत नाहीये.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »