राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस
अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या . वाजपेयी यांच्यासोबत एका घरात त्या अनेक वर्षांपासून राहात होत्या .ज्या दिवशी कौल वारल्या त्यादिवशी सोनिया गांधी वाजपेयी यांच सांत्वन करायला त्याना भेटल्या . मनमोहन सिंग यांनी पण दूरध्वनी वरून संपर्क साधला . नंतर बदनाम झालेले वाजपेयी यांचे 'मानलेले' जावई रंजन भट्टाचार्य हे कौल यांच्या मुलीचे श्रीमान . Indian Express ने 'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा मथळा देऊन हि बातमी छापली . वाजपेयी यांनी 'मै कुंवारा हु , ब्रम्हचारी नही ' असे विधान केले होते तरी हे संबंध कायम सर्व सामान्य लोकांसाठी 'under the wraps ' होते किंबहुना जाणून बुजून ठेवण्यात आले होते . अटलजी ची सर्वसामान्य लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती ढासळू न देण्यासाठी हा खटाटोप होता .
दुसरा प्रसंग - १४ नोव्हे . ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो . पण त्यादिवशी 'कुजबुज ब्रिगेड ' च्या लोकांनी फेसबुक वर नेहरूंचे सिगरेट शिल्गाव्णारे , मद्याचा चषक हातात असणारे , महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped ) फोटो पसरवायला सुरुवात केली . उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते . पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही . नेहरूंचे सिगारेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात . नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेकजण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया ' बाळगतात हे पण माहित होत . पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नये अशी बालिश होती .
राजकारणी हि पण माणस असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही ? धुम्रपान व मद्यपान ह्या जगातले अनेक लोक सहज करत असणारया गोष्टी पण राजकारण्याना चार चौघात करण्याची मुभा नसावी ? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टी मध्ये हातात कॉकटेल चा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यावर गहजब केला होता . म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहील पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसाने धुम्रपान करू नये अशा भाबड्या अपेक्षांचे काय करायचे हा प्रश्न आहे . कुठल्याही नेत्याचे मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत ? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचे काम किती कुशलतेने करतो हा ? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार
देणे असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणे ; वाजपेयी यांचे हे कर्तुत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असे तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटले असावे ? देशात लोकशाही रुजवणे , अनेक मुलभूत बदल घडवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातल कर्तुत्व हे नेहरूंचे 'तसले ' फोटो टाकल्याने झाकोळून जाइल हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो .
बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ?
भारतीय नेते पण आपली 'Holier than cow ' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात . आपण धुम्रपान /मद्यपान / सुंदर स्त्रियां सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद . आपले हेनिकेन बीअर चे प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवले नाही . त्याना सतत ओढायला पाईप लागायचा . तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात .
राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यात येणार्या स्त्रिया हा विषय राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चवीने चघळला जाणारा विषय . नेहरू आणि लेडी Mountbatten हे याचे उदाहरण . त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबध होते याची चर्चा आपण चवीने करणे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण करत असलेले आक्रमण नाही का ? सध्या मोदींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चालू आहे . त्यांनी सोडलेल्या त्यांच्या बायकोपासून ते 'पाठलाग ' करत असणारया स्त्रीपर्यंत अनेक विषयावर चवीने चर्वित चर्वण चालू आहे . हे सगळे जरी खरे आहे असे मानले तरी 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे . (एन . डी . तिवारी सारख्या नेत्याला अपवाद ठेवावे काय ?)
अर्थातच हे अवघड आहे . लोकांना मोठ्या लोकांबद्दल आणि एकूणच gossiping करायला आणि ऐकायला आवडत . पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे . राजकारणी हि कितीही तिरस्करणीय जमात बनली असली तरी त्याना एवढा favor भारतीय जनते ने करावा .
(लेखात थोडा preaching चा टोन आला असल्यास क्षमस्व )
💬 प्रतिसाद
(143)
प
प्यारे१
गुरुवार, 11/20/2014 - 08:38
नवीन
शांत गदाधारी भीम शांत. तो त्याच्या लहानपणापासून तसाच आहे. ;)
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 11/27/2014 - 08:23
नवीन
रक्तात प्रोब्लेम आहे.
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Wed, 11/19/2014 - 07:56
नवीन
छत्तीसगड येथे चुकिचे सरकारी उपचार झाल्याने मरण पावलेल्या भारतीयांकडे दुर्लक्ष करुन मोदी विदेश दौरे करत आहेत हे प्रकरण देखील चेष्टा प्रणय वगैरे मधे येतात का ?
, देशात सांप्रदायिक दंगे पेटले हप्ते अश्यावेळी ह्यांच्या प्रणय चेष्टा ऐन भरात होत्या. त्यावरून १९४२ एव स्टोरी हा शिनेमा बनला असावा >>. तुम्ही स्वत: तिथे उपस्थित होतात का? कि ऐकिव भगव्यांच्या माहीतीवरुन बोंबलत फिरत आहेत ?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 11/19/2014 - 05:10
नवीन
चित्रपट असो वा कादंबर्या . हि मनोरंजनाची साधन आहेतच पण ती प्रपोगंडा साधन पण आहेत (काही तुरळक अपवाद वगळता ). निपक्ष विश्लेषणात त्याना आधार मानले जात नाही .
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 11/19/2014 - 07:48
नवीन
ह्म्म.. ही गोष्ट तर खरीच आहे, पण बर्याच वेळेस हे चित्रपटवाले खूप रीसर्च पण करतात बर का. केवळ विश्वासार्हतेसाठी
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 11/19/2014 - 08:22
नवीन
सदर टीव्ही मालिका हि इंग्रजी प्रेक्षकासाठी होती भारतीयांसाठी नाही. साल १९८६ आता नेहरूंना वाईट व पटेलांना चांगले दाखवण्यामागे त्यांचा काय बरे हेतू असावा , गांधींचे व्यक्तिमत्त्व संतुलित दाखवले आहे.
मुळात मुसलमान हे जीना ह्यांचे ऐकत होते , ते हिंसा करत होते व हिंसेपासून संरक्षण इंग्लिश आर्मी करणार नसेल तर स्वतःचे रक्षण करण्यास गांधी हिंदूंना अहिंसा ,शांती संयमाचा पाठ देत होते , गांधीनी १५ ऑगस्ट दिल्लीत वाजतगाजत म्हणूनच साजरा केला नाही कारण सर्वस्व गेलेली अनेक शीख , हिंदू , मुसलमान कुटुंबे त्यांच्या सभोवताली होती व हि हिंसा रोखण्यास आपले तकलादू तत्त्वे अपयशी ठरल्याची बोचरी जाणीव त्यांना होती.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/19/2014 - 09:03
नवीन
देशासमोर गांधीजी हे एकच गुरु होते का हो ?
रणावीण स्वातंत्र्य कुणाला मिळाले का ? वगैरे वीर गप्पा मारणारे इतर गुरुजी गप्प का बसले होते? हिंदुंना हिंसेचा धडा गिरवायला शिकवण्यासाठी ते का नाही पुढे झाले ?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 11/20/2014 - 09:05
नवीन
ह्म्म.. आता कसे आलात लेव्हलवर. थोडक्यात तुम्हाला गांधींशी काही देणेघेणे नाहीये. तुमचा अजेंडा वेगळाच आहे.
आता तुमच्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर - भारत स्वतंत्र झाला तेव्हा सत्ता उघड उघड काँग्रेसच्या हातात आली, त्यामुळे त्या सार्या लोकांना तुमच्या भाषेत हिंसावादी ठरवले गेले. अर्थात जिथे शिवाजी महारजांना देखील लुटारू म्हटले जाते, तिथे हे असे म्हणणे म्हणजे किस पेड की पत्ती. नाहीतर लोकसंख्या हस्तांतरण वगैरे उपाय मांडलेले होतेच की. फक्त तेव्हा ते कोणी मनावर घेतले नाहीत, आणि आधी स्वतंत्र्य की आधी स्थैर्य यामध्ये आधी स्वातंत्र्य चा जय झाला.
- Log in or register to post comments
H
hitesh
गुरुवार, 11/20/2014 - 10:51
नवीन
लोकाना हिंसा शिकवणार्याना सत्ताच कशाला हवी होती ? दंगली सुरु असताना स्वतःचे हिंसक मित्र वas हस्त्रे घेउन ते का नाही जनतेला मदत करायला गेले ? का यांचा जहाल मार्ग फक्त कवनं आणि नाटकं लिहिण्यापुरताच होता ?
समाजाला हिंसेची गरज होती तर ती गरज जहाल लोकान्नी पुरी करायला हवी होती .
स्वतः लपुन बसले आणि नंतर मग गांधींच्या अहिंसेवर सगळे बिल फाडायला कशाला यायचे ?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 11/20/2014 - 12:15
नवीन
ओक.. म्हणजे हिंदूंनी शस्त्रे हातात घ्यायला हवी होती असे तुमचे म्हणने आहे तर. आता दुटप्पी कोण बोलतेय ते तुम्हीच ठरवा.
सगळ्या हिंदूंना नव्हे, तर केवळ पोलिसांना जरी शस्त्रांचा वापर करायला परवानगी दिली असती तरी दंगली आटोक्यात राहिल्या असत्या.
आणि बाय द वे, त्यावेळेसही हिंदू/शीख संघटनांनी बरेच मदतकार्य केले होते, जालावर शोध घ्या, मिळेल
सर्वसामान्य हिंदु समाज कधीच हिंसक नव्हता आणि नाही (बघा, तुम्ही एव्हढी हाणामारी करून देखील मी संयम सोडला आहे का ते? कारण मी सामान्य आहे).
(अवांतर)
तत्कालीन राज्यकर्ते हिंदूंचे/ निर्वासितांच्या हिताचे रक्षण करण्यात कमी पडले म्हणून हिंदूंनी शस्त्रे हातात घेतली. तरी देखील आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहास लक्षात घेतलात तर हिंदूंपेक्षा मुस्लिम समाज दंगली>च्या वेळेस अधिक शस्त्रसज्ज होता असे ध्यानात येईल. हिंदू संरक्षणासाठी सरकारवर अवलंबून होते, आणि जिथे हिंदू संरक्षणासाठी शस्त्रे हातात घेतात तिथे त्यांचे पोलिसी बळाद्वारे दमन केले जाते. अर्थात त्यात पोलीसांचादेखील दोष नाही, कारण बहुतांशवेळा हिंदू प्रतिक्रिया म्हणूनच शस्त्रे हातात घेतात, त्यामुळे त्यांना शस्त्रे मिळेपर्यंत पोलीस खाते सावरलेले आणि सज्ज असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करयचा तर सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय (केवळ शस्त्रसज्ज हिंदूंच्या भरवश्यावर) हिंदूंचे रक्षण होणे शक्य नव्हते.
बाय द वे, गांधींच्या अहिंसेला आलेली ही फळे पहा, थोडेसे अवांतर होतेय, पण समजून घ्या.
Gandhi started for Noakhali on 6 November and reached Chaumuhani the next day. After spending two nights at the residence of Jogendra Majumdar, he embarked on his tour of Noakhali, barefoot on 9 November. For the next seven weeks he covered 116 miles and visited 47 villages. He set up his base in a half burnt house in the village of Srirampur where he stayed put till 1 January. He organised prayer meetings, met local Muslim leaders and tried to win their confidence. Mistrust between Hindus and Muslims continued to exist, and stray incidents of violence occurred even during his stay in Noakhali. On the evening of 10 November, Sunday, two persons were reported to be murdered on the way while returning home after attending Mohandas Gandhi’s evening prayer at Duttapara relief camp.[60]
Gandhi's stay in Noakhali was resented by the Muslim leadership. On 12 February 1947, while addressing a rally at Comilla, A. K. Fazlul Huq stated that Gandhi's presence in Noakhali had harmed Islam enormously.[61] His presence had created a bitterness between the Hindus and the Muslims.[61] The resentment against Gandhi's stay in Noakhali grew day by day. Towards the end of February 1947 it became vulgar. Gandhi's route was deliberately dirtied everyday and the Muslims began to boycott his meetings.[61] Gandhi took a goat from India. He kept that goat with him in noakhali. local Muslims stole that goat and ate it.[35] Mohandas Gandhi discontinued his mission halfway and started for Bihar on 2 March 1947 at the request of the Muslim League leaders of Bengal. On 7 April, more than a month after leaving Noakhali, Gandhi received telegrams from Congress party workers in Noakhali, describing attempts to burn Hindus alive. He stated that the situation in Noakhali demands that the Hindus should either quit or perish.[62]
संदर्भ
पण मी हे सगळे तुमच्याशी का बोलतोय? सॉरी.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 11/17/2014 - 13:34
नवीन
खुद्द महाराजांच्या ७ राण्या होत्या ना? बाकी आजही गावांमध्ये २-३ लग्नं केलेले (त्यातले २ शिक्षक आहेत.) आणि इतर 'असेच' लोक ठाऊक आहेत. :)
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 04:13
नवीन
आठ
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 04:27
नवीन
जनानखाना बाळ्गला की राज्यकारभार बुडतो, हे तत्व पटत नाही ! आउरंगजेबाच्या जनानखान्यात ८०० बायका होत्या म्हणे !
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 05:18
नवीन
आमच्या बेगमेला आम्ही नेहमी सांगतो...मुअलमान ८०० संभाळण्याप्वेक्षा हिंदुंच्या आठ नै तीनदेखील सांभाळणं मुश्किल असतं !
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 11/18/2014 - 05:25
नवीन
'बेगमी करणे' ह्या मराठी शब्दप्रयोगाचा उगम मुघल काळातील काय? ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 11/18/2014 - 05:32
नवीन
ते बेगामी करणे असे आहे वाटते
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 11/19/2014 - 09:29
नवीन
आ हितेसभाई तो आपलु जागो मोहन प्यारे छे !
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 11/18/2014 - 07:44
नवीन
सहमत. पण औरंगजेबाच्या जनानखान्याबद्दलचं मत पटत नाही. त्याला ३-४ च बायका होत्या, नाटकशाळांचे तितकेसे व्यसन असल्याचेही कुठे दिसत नाही.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 11/18/2014 - 07:51
नवीन
थोरल्या बाजीरावाला मानतात कारण त्याने प्रचंड पराक्रम गाजवला. त्याची उभी हयात त्याने स्वराज्य वाढवण्यात आणि जपण्यात घालवले. महाराजांनी जे उभे केले ते रयतेचे राज्य होते आणि ते राजे होते. तेच राज्य शाहू महाराजांसाठी बाजीरावाने जपले आणि जोपासले. राजांनी आणी सरदार उमरावांनी उपस्त्रिया आणि नाटकशाळा बाळगणे त्या काळात सर्वमान्य होते. बरोबरीच्या घराण्यांमध्ये लग्ने होत असत तर निम्न कुळातील स्त्रिया उपस्त्रिया म्हणून बाळगल्या जात पण बर्याचदा त्यांना पत्नीचा दर्जा मिळत असे. जो मस्तानीला मिळाला. चिमाजीअप्प्पा आणि नानासाहेब मस्तानीच्या विरोधात होते पण त्यांनी समशेर बहाद्दराला मात्र योग्य ते शिक्षण दिले आणि सरदारकीही. सांगण्याचा उद्देश हाच की मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावाने तिच्याशी लग्न केले नाही परंतु तिचा दर्जा पत्नीचाच होता. महाराजांनी त्यांच्या कारकीर्दीत आठ लग्ने केली म्हणून त्यांच्या चारित्र्यात खोट येत नाही. संभाजी महाराजांबद्दलही बर्याच कथा अस्तित्व्तात आहेत. खरेखोटे देव जाणे. पण इतिहास त्यांना त्याबद्दल लक्षात ठेवत नाही तर त्यांच्या नऊ वर्षांच्या लाढ्यासाठी लक्षात ठेवतो.
महाराजांची आणि बाजीरावाची तुलना जरुर करा. दोघांनीही रयतेचे राज्य आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले पण तसे करताना मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाल तुच्छ लेखणे ("थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की" असा उल्लेखही तुच्छतापुर्णच वाटतो) हे मात्र चुकीचे होइल.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 11/18/2014 - 10:42
नवीन
सॉरी.. तुच्छ लेखणे हा हेतू मुळीच नव्हता, उलट बाजीरावाच्या कर्तृत्वापुढे अश्या गोष्टींची दखल देखील घेतली जात नाही असे मला म्हणायचे होते. अर्थात तुम्ही वर दिलेली बरीच माहिती माझ्यासाठी नवीनच आहे. त्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 11/18/2014 - 14:17
नवीन
सहमत, त्यातूनही अंडरलैनशी विशेष सहमत.
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 11/17/2014 - 12:25
नवीन
देशहितापुढे त्यांनी वैयक्तीक वासनांचा कायम त्याग करुन दाखविलेला आहे.
त्यांच्या संयमी जीवनाच्या तेजापुढे पोळुन व नंतर जळुन काहिंनी त्यांच्या वैयक्तीक त्यागावर विनाकारण च शिंतोडे उडविले
आणि उडविणारे तरी कोण
स्खलनशील दिग्वीजय आणि अति स्खलनशील शशी थरुर
खरा अस्सल भारतीय पठडितला संयम दाखवला तो मोदिंनींच
श्रीमान योगी संसार काय चिमण्या कावळे हि करतात अस काहिस कुठल्याशा पोलादि का काय ते वीर नेत्याने
म्हटलेल च आहे.
परित्यक्ता या शब्दाच मुळ मात्र शोधावस वाटत.
काय वाटल असेल मिसेस मोदिंना कोण ते जोडप आल होत चायनीज का कुठल ताजवर तेव्हा सिंगल मोदि त्यांना होस्ट होते.
शाळेत किती ७ गाड्या आल्या होत्या निवडणुकीपुर्वी :
समजवायला "
मिसेस मोदींनी एक मार्मिक प्रश्न विचारला होता मी मिसेस मोदि नसते तर तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आला असतात का ?
त्याग कळत च नाहि हो हल्लीच्या सुखलोलुप पिढिला
सदभावना ? त्याचा तर पत्ताच नाही
पण ते परित्यक्ता म्हणजे टाकलेली बाई अस असत का हो ?
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Mon, 11/17/2014 - 13:38
नवीन
दंडवत तुम्हाला तुम्हीतर गुरुजींना मागे टाकणार
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 23:08
नवीन
वैषयिक भोग भोगत देशप्रेम किंवा इतर कर्तव्ये करता येत नाहीत का ?
- Log in or register to post comments
H
hitesh
Sat, 11/29/2014 - 08:58
नवीन
मोदीना घरसंसार नाही.. त्यामुळे मोदी निरिच्छ भावनेने काम करतात म्हणे ! असे मोदीभक्त अभिमानाने सांगत होते.
पण मोदींच्या सरकारातील बाकीचे लोक घरपरिवारवालेच आहेत ना ?
हे म्हणजे भीष्माचार्यासरखे झाले.. मला स्वतःला नको हो , पण आमच्या दोन राजकुमाराना बायका हव्या आहेत , म्हणुन मी अंबा अंबालिका वगैरे पळवतोय !
मला नको हो ! आमच्या पक्षाच्या बाकी लोकांसाठी मी सगळे व्यवसाय पळवतोय हो
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Sun, 11/30/2014 - 21:59
नवीन
अरे, एक तर तु डु.आय.डी. तुझे पितळ तर केव्हाच उघडे पडलेय, तुला येथे कोणी हिंग लावुन विचारीत नाही. मग कशासाठी हे चाळे चालविले आहेस तु ?? जरा खुडुक बस आता.
( वैकुंठ्वासी नान्या नेफळाप्रेमी )
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Mon, 11/17/2014 - 12:59
नवीन
एक समयोचित लेख
‘डिस्कव्हरी’ ऑफ जवाहरलाल नेहरू
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/jawaharlal-nehru/articleshow/45170951.cms
- Log in or register to post comments
त
तिमा
Mon, 11/17/2014 - 14:08
नवीन
ठराविक नेत्यांबद्दल चर्चा केली आहे आणि काही नेत्यांना साळसूदपणे वगळले आहे. बहुतेक, नंतर होणार्या परिणामांच्या भीतिने असावे.
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 11/17/2014 - 21:17
नवीन
नेहरूंच्या व्यक्तीगत संबंधांच्या संदर्भात बोलणे आणि त्यावरून योग्यता ठरवणे योग्य नाही. तसले ब्लॉग्ज कडे दुर्लक्ष..
पण असे बोलणारे का बोलू शकले हे पाहीले तर काय दिसते? ह्यात कुजबुज ब्रिगेड पेक्षा इतिहास संशोधक ब्रिगेड्स आणि पत्रकारीता अधिक आहे. त्यातही ह्यांना नेहरूंच्या १९४७-४८ च्या काळातील प्रेमसंबंधाबद्दल जास्त पडलेले दिसते. त्याचे कारण देश फाळणीतून होरपळत असताना पहीले पंतप्रधान काय करत होते, हे आहे का केवळ एक गोरी व्यक्ती त्यात असल्याने नकळत असलेले गुलामीवृत्तीतले आकर्षण या संशोधनात आहे, ते त्यांचे त्यांनाच माहीत. पण एडविना प्रमाणेच नेहरू हे पद्मजा नायडू (सरोजिनी नायडूंची कन्या) आणि मृणालीनी साराभाई (विक्रम साराभाई यांच्या "troubled" विवाहातील पत्नी) यांच्या देखील जवळ होते. पण त्याबद्दल विशेष लिहीले गेलेले नाही.
वरील चर्चा/लेखात नेहरूंचा संदर्भ देत जणूकाही चार ब्रिगेडी टाळकीच हा विषय चघळतात असे म्हणले गेल्याने जरा पाहीले तर कुठले ब्रिगेड दिसले? खाली काही उदाहरणादाखल... यात नेहरूंचे कुणाशी संबंध होते/नव्हते हा मुद्दा नसून त्यावर लिहीणारे कोण आहेत हे दाखवण्याचा मुद्दा आहे. यांना (आणि अशा अनेकांना) नेहरूंबद्दल का लिहावेसे वाटले असावे? त्याबद्दल आपले काय मत आहे?
'Nehru Was Generally Happy To Be Among Either Mountains Or Interesting Women' - Priyadarshini Sen Interviews Alex von Tunzelmann (आउट्लूक मॅगझिन)
अजून एक आउट्लूक मधील लेख...
करण थापर, मला नाही वाटत ब्रिगेडी आहेत. ;) ते काय म्हणतात, हे येथे पहा.
Edwina Mountbatten: a life of her own - Janet P. Morgan - 1991 - More editions
A biography of Edwina Mountbatten describes her childhood of luxury, her marriage to Lord Mountbatten, her extramarital affairs, and her association with Nehru, Churchill, and others
Edwina and Nehru: A Novel - लेखिका Catherine Clement
Jawaharlal Nehru, a Biography - ब्य Sankar Ghose - 1993 - After coming to know of Nehru's imprisonment she wrote on 16 January 1941, 'Since then I have thought of you constantly. . . . As you ... Of all the notable ladies he came across, Nehru's closest friendship was with Lady Edwina Mountbatten.
वगैरे वगैरे...
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 04:06
नवीन
नेहरुना शेवटच्या दिवशी चेस्त पेन झाले होत. तंव्हा त्याना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलात अॅडम्ट केले होते.
तेंव्हा त्याम्च्या बरोबर एक प्रख्यात नटी होती. खरे आहे का हे ?
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 04:11
नवीन
अर्थात तिने मदत करुनही नेहरुना मृत्युवर वैजय मिळवणे शक्य झाले नाही व त्यांची आयुष्य - माला तुटली.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 11/18/2014 - 05:35
नवीन
"तेंव्हा त्याम्च्या बरोबर एक प्रख्यात नटी होती. खरे आहे का हे"
होय. दिल्लीत तेव्हा असणार्या ह्यांच्या मित्रानेही हे सांगितले.नर्गिसची आई जद्दनबाई ही एक मोठी अभिनेत्री व नर्तकी.हिची तीन लग्ने झाली होती त्याशिवाय ती मोतीलाल की जवाहरलाल नेहरूंबरोबर असायची असे म्हंटले जायचे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 11/18/2014 - 06:28
नवीन
हायला माईसाहेब तुमचा टेम्पो आवडला.. आणि ज्या प्रकारे तुम्ही तो कॅरी करत आहात ते आहून तर आपण तुमचे तुमच्या "ह्या"ंच्यापेक्षा फॅन!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 11/18/2014 - 06:45
नवीन
+१११
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 07:05
नवीन
नेहरुना चेस्ट पेन मध्यरात्री झाली.. त्यावेळी त्या नटीने त्याना एम्सला अॅडमिट केले. पण नेहरू गेले.
........
त्यावेळी एका भाजपाच्या नेत्याने टीका केलेअॅ ... रात्री बारा वाजता ती त्यांच्या घरॅअॅ काय करात होतेअॅ ?
........
हे ' अटल ' नेते तेच ज्यानी नंतर अविवाहीत आहोत पण ब्रमचारी नाहेअॅ याची कबुलेअॅ दिली .
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 13:00
नवीन
तेंव्हा ते जनसंघाचे नेते होते.
१९८० नंतर ते भाजपात गेले.
- Log in or register to post comments
H
hitesh
गुरुवार, 11/20/2014 - 14:25
नवीन
या धाग्यावर एकही स्त्री आयडी फिरकली नाही.
त्यामुळे ताम्चा जाहिर. णिषेध
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 11/20/2014 - 16:03
नवीन
"माईसाहेब..." हा स्त्री (लिंगी) आयडी नाही असे म्हणायचे आहे का? ;)
- Log in or register to post comments
H
hitesh
Fri, 11/21/2014 - 02:18
नवीन
त
तॉ एकच स्त्री आयडी इथे आहे.
धन्यवाद
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/26/2014 - 15:13
नवीन
http://www.mtmobile.in/regular/details.php?storyid=2§ion=desh
बैकोचे नाव जाहिर करायचे नाही.
पण तिची सुरक्षा मात्र सर्कारी खर्चातून.
वा मोदीजी वा
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 11/26/2014 - 19:08
नवीन
तुम्ही नक्की कशाचे डॉक्टर आहात?
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Wed, 11/26/2014 - 20:11
नवीन
आज आता आणखी वेगळे काय ढोसून आलायस ??
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 12/01/2014 - 01:42
नवीन
हे बहूदा डू-आय-डी असावेत......
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3