राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस
अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या . वाजपेयी यांच्यासोबत एका घरात त्या अनेक वर्षांपासून राहात होत्या .ज्या दिवशी कौल वारल्या त्यादिवशी सोनिया गांधी वाजपेयी यांच सांत्वन करायला त्याना भेटल्या . मनमोहन सिंग यांनी पण दूरध्वनी वरून संपर्क साधला . नंतर बदनाम झालेले वाजपेयी यांचे 'मानलेले' जावई रंजन भट्टाचार्य हे कौल यांच्या मुलीचे श्रीमान . Indian Express ने 'Mrs Kaul, Delhi’s most famous unknown other half, passes away' असा मथळा देऊन हि बातमी छापली . वाजपेयी यांनी 'मै कुंवारा हु , ब्रम्हचारी नही ' असे विधान केले होते तरी हे संबंध कायम सर्व सामान्य लोकांसाठी 'under the wraps ' होते किंबहुना जाणून बुजून ठेवण्यात आले होते . अटलजी ची सर्वसामान्य लोकांमध्ये जी प्रतिमा होती ती ढासळू न देण्यासाठी हा खटाटोप होता .
दुसरा प्रसंग - १४ नोव्हे . ला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो . पण त्यादिवशी 'कुजबुज ब्रिगेड ' च्या लोकांनी फेसबुक वर नेहरूंचे सिगरेट शिल्गाव्णारे , मद्याचा चषक हातात असणारे , महिलांसोबत जवळीक दाखवणारे (त्यातले बरेचसे Photo Shopped ) फोटो पसरवायला सुरुवात केली . उद्देश अर्थात नेहरू कसे बदफैली होते हे सिद्ध करण्याचा होता हे उघड होते . पण लेखाचा मुख्य मुद्दा हा नाही . नेहरूंचे सिगारेट पितानाचे फोटो टाकणारे अनेक परिचित स्वतः सिगारेट ओढतात . नेहरूंचे स्त्रियांसोबत फोटो टाकणारे अनेकजण स्त्रियांबद्दल काय 'नजरिया ' बाळगतात हे पण माहित होत . पण त्यांची अपेक्षा नेहरू हे आपले पंतप्रधान होते म्हणून त्यांनी काही गोष्टी करू नये अशी बालिश होती .
राजकारणी हि पण माणस असतात आणि सर्वसामान्य लोकांसारखी स्खलनशील असतात हे भारतीय जनमानस का मान्य करत नाही ? धुम्रपान व मद्यपान ह्या जगातले अनेक लोक सहज करत असणारया गोष्टी पण राजकारण्याना चार चौघात करण्याची मुभा नसावी ? काही दिवसांपूर्वी प्रफुल पटेल यांचा एका पार्टी मध्ये हातात कॉकटेल चा ग्लास असणारा फोटो आल्यावर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यावर गहजब केला होता . म्हणजे वाजपेयी यांनी आजन्म ब्रम्हचारी राहील पाहिजे किंवा कुठल्या मोठ्या पदावरच्या माणसाने धुम्रपान करू नये अशा भाबड्या अपेक्षांचे काय करायचे हा प्रश्न आहे . कुठल्याही नेत्याचे मूल्यमापन करण्याचे निकष काय असावेत ? वैयक्तिक चारित्र्य का तो /ती त्याचे काम किती कुशलतेने करतो हा ? देश अस्थिरतेच्या गर्तेत असताना देशाला एक स्थिर सरकार
देणे असो वा अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढवणे ; वाजपेयी यांचे हे कर्तुत्व ते एका महिलेसोबत राहतात यामुळे कमी होईल असे तत्कालीन भाजप नेतृत्वाला का वाटले असावे ? देशात लोकशाही रुजवणे , अनेक मुलभूत बदल घडवणे आणि स्वातंत्र्य लढ्यातल कर्तुत्व हे नेहरूंचे 'तसले ' फोटो टाकल्याने झाकोळून जाइल हा आत्मविश्वास त्यांच्या विरोधकांमध्ये कसा येतो .
बिल क्लिंटन यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या पहिल्या टर्म मध्ये मोनिका लेविन्स्की प्रकरण उघड झाले आणि मोठा गहजब उडाला . पण अमेरिकन जनतेने दुसऱ्यांदा पुन्हा बिल यांना निवडून दिले कारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले , अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबदबा पुन्हा प्रस्थापित केला . अमेरिकन जनतेने त्यांच्या देश चालवण्याच्या कौशल्याला दिलेली हि दादच होती . त्यासाठी त्यांनी क्लिंटन यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या 'प्रकरणाकडे ' कानाडोळा' केला . दुटप्पी पणाची मोठी परंपरा असलेल्या आपल्या देशात असे होईल ?
भारतीय नेते पण आपली 'Holier than cow ' अशी प्रतिमा बनावी यासाठी धडपडत करत असतात . आपण धुम्रपान /मद्यपान / सुंदर स्त्रियां सोबतचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ नये यासाठी त्यांची धडपड चालू असते . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा दिलदार नेता त्याला अपवाद . आपले हेनिकेन बीअर चे प्रेम बाळासाहेब यांनी कधी लपवले नाही . त्याना सतत ओढायला पाईप लागायचा . तुमच्या आवडी निवडी बद्दल तुम्ही unapologetic असाल तर तुमचे अनुयायी पण तुम्हाला स्वीकारतात ह्याचे बाळासाहेब ठाकरे हे उदाहरण . पण बहुतांश नेते लोकापवादाला घाबरून राहण्यातच धन्यता मानतात .
राजकारणी आणि त्यांच्या आयुष्यात येणार्या स्त्रिया हा विषय राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये चवीने चघळला जाणारा विषय . नेहरू आणि लेडी Mountbatten हे याचे उदाहरण . त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबध होते याची चर्चा आपण चवीने करणे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आपण करत असलेले आक्रमण नाही का ? सध्या मोदींच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चालू आहे . त्यांनी सोडलेल्या त्यांच्या बायकोपासून ते 'पाठलाग ' करत असणारया स्त्रीपर्यंत अनेक विषयावर चवीने चर्वित चर्वण चालू आहे . हे सगळे जरी खरे आहे असे मानले तरी 'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे . (एन . डी . तिवारी सारख्या नेत्याला अपवाद ठेवावे काय ?)
अर्थातच हे अवघड आहे . लोकांना मोठ्या लोकांबद्दल आणि एकूणच gossiping करायला आणि ऐकायला आवडत . पण जेंव्हा नेता निवडीची वेळ येते तेंव्हा कुठल्या निकषांना जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे लोकांनी ठरवायचे आहे . राजकारणी हि कितीही तिरस्करणीय जमात बनली असली तरी त्याना एवढा favor भारतीय जनते ने करावा .
(लेखात थोडा preaching चा टोन आला असल्यास क्षमस्व )
💬 प्रतिसाद
(143)
द
दिवाकर देशमुख
Tue, 11/18/2014 - 11:43
नवीन
मी वर आधी काय मुद्दा स्पष्ट केला आहे तो कृपया आधी वाचावा. " जसे त्या लोकांनी गांधी परिवार आणि नेहरुंबद्दलची विषवल्ली जशी लावली तशी काँग्रेस नेत्याने अथवा कार्यकर्त्याने कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अथवा सोशल मिडीयावर लावली आहे नाही" उलट गोडसेवर असणार्या नाटकाला देखील काँग्रेसच्या सरकारनेच मंजुरी दिली हे विसरु नये.
मोदीच्या पत्नीवर चर्चा करायची काही एक गरज नाही ती त्यांची खाजगी बाब आहे. काँग्रेस ने मुद्दा निवडणुक फॉर्म भरताना जागा मोकळी का सोडली जेव्हा लग्न झाले आहे.केवळ हाच उचललेला" बाकी त्यांचे संबंध कसे आहे वगैरे इतर बाबींची चर्चा पक्षाकडुन कुठे ही जाहीररित्या केलेली नाही.
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 11/18/2014 - 13:23
नवीन
उलट गोडसेवर असणार्या नाटकाला देखील काँग्रेसच्या सरकारनेच मंजुरी दिली हे विसरु नये.
मी ते नाटक जालावर देखील पहाण्याच्या भानगडीत पडलेलो नाही. फक्त मुद्दा वेगळा आहे म्हणून लिहीत आहे... त्या नाटकावर १९८९ साली प्रथम बंदी घालण्यात आली होती. तेंव्हा मला वाटते काँग्रेसचेच (शरद पवार मुख्यमंत्री) सरकार होते. नंतर केंद्र एनडीए - राज्ययुतीच्या काळात ते नाटक परत आणण्याचा घाट घालण्यात आला. पण तत्कालीन मनोहर जोशी सरकारने त्यावर (केंद्राकडून सुचवल्याप्रमाणे) बंदी घातली. तेंव्हा काँग्रेसचेच राज्यच नव्हते ते मंजुरी कसली देणार? २००१ साली त्या नाटकाला मंजूरी द्यावी लागली कारण कोर्टात ते केस जिंकले. आणि तेंव्हा देखील काँग्रेस सत्तेत नव्हतेच...
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 11/19/2014 - 05:21
नवीन
मला वाटत इथे घटनाबाह्य censorship चा मुद्दा महत्वाचा आहे . तस्लिमा नसरीन यांच्यावर लज्जा कादंबरी नंतर मुस्लिम धर्मगुरू नि काढलेला फतवा किंवा नर्मदा आंदोलनावर आमिर खान ने भाष्य केल्यावर भाजप ने त्याच्या फना या चित्रपटा चे प्रदर्शन रोखले हि या घटनाबाह्य censorship ची उदाहरण . मराठीपुरत बोलायच झाल्यास हिंदुत्व वादी संघटनांनी 'यदाकदाचित ' किंवा 'माकडाच्या हाती शाम्पेन ' या नाटकाचे बंद पाडलेले प्रयोग . (या संघटनांच्या मागण्या मान्य केल्यावर हे प्रयोग पुन्हा सुरु झाले . तसे कॉंग्रेस ने 'मी नथुराम …' सोबत केल्याच आठवत नाही . काही तुरळक निदर्शन झाली . जितेंद्र आव्हाड यांनी पण प्रयत्न केला पण नाटकाचे प्रयोग सुखनैव चालू राहिले
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 11/18/2014 - 15:03
नवीन
अस्स अस्स.. जरा हे पहा बर..
बाकी काही नाही, काँग्रेसच्या नेत्यांचे पाय पण मातीचेच आहेत..
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Tue, 11/18/2014 - 15:58
नवीन
नीट वाचा जरा तुम्ही मराठी या हिंदीच वाचा त्यांच्यातल्या नात्यावर बोलले आहे का? बायको आहे हे का अॅक्सेप्ट करत नाही ? हाच प्रश्न विचारला आहे. यात चिखलफेक आहे का? अनैतिक बोलले आहे असे वाटत आहे का? फॉर्म मधे स्टेटस लिहित नाही म्हणुन तो प्रश्न विचारलेला आहे. तेच त्यांनी लिहिले असते तर कोणीही विचारले नसते त्यांना.
काँग्रेसने असे विचारले का कधी "तुम्ही बायको का सोडली? वगैरे वगैरे चिखलफेक केली का?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 11/18/2014 - 17:42
नवीन
हायला, याचा अर्थ असा होतो होय?
माझा विंग्रजीचा अभ्यास वाढवावा लागणार म्हणजे..
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 11/18/2014 - 17:43
नवीन
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Wed, 11/19/2014 - 07:51
नवीन
सिंग बरोबर बोलले. उलट सिंग यांनीच प्रकरण लावुन धरल्याने शेवटी मोदींना मान्यच करावे लागले.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 11/19/2014 - 13:07
नवीन
उलट सिंग यांनीच प्रकरण लावुन धरल्याने शेवटी मोदींना मान्यच करावे लागले.
आधीच्या निवडणुकांमधे फॉर्म हाताने (कागदी) भरता येत असे आणि त्यात विवाहीत असण्याचा प्रश्न हा compulsory नव्हता. त्यामुळे त्या प्रश्नाला आधीच्या निवडणुकात "हो अथवा नाही" हे काहीच वापरले नव्हते. पण आता निवडणुक लढवण्याचा फॉर्म संगणकावरच (ऑन लाईन) उपलब्ध केला आहे आणि त्यात ह्या प्रश्नाचे उत्तर compulsory केले आहे. त्यामुळे उत्तर दिले गेले. त्यात सिंग यांचा काही संबंध नाही.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/19/2014 - 13:20
नवीन
किती प्रामाणिकपणा तो ! कागदी फॉर्म असला क उत्तर नै लिहिले तरी चालत होते का ?
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 11/19/2014 - 13:30
नवीन
जेव्हा एखादे उत्तर लिहीणे जरूरीचे नाही, तेव्हा ते न लिहीणे अप्रामाणिक ठरत नाही.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 11/19/2014 - 16:33
नवीन
हा नरो वा कुन्जरो वा चा प्रकार झाला अस वाटत नाहि का?
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 11/19/2014 - 20:14
नवीन
"नरो वा कुंजरोवा" चा हा प्रकार नाही. जे कायद्याने शक्य आहे ते त्यांनी केले - जेंव्हा उत्तर देणे गरजेचे नव्हते तेंव्हा दिले नाही, जेंव्हा आवश्यक होते तेंव्हा खरेच उत्तर दिले, नरो वा कुंजरोवा असे उत्तर दिले नाही.
पण या धाग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे मिळताना दिसत नाहीत - नेहरूंच्या खाजगी जीवनाबद्दल ज्यांचा हिंदू संघटना अथवा विचारांशी काडीचाही संबंध नाही, अशा विचारवंतांना/पत्रकारांना/लेखकांना का लिहावेसे वाटले असावे? त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत गाडी मोदींकडे कशाला वळवत आहात? आणि जर मोदींबद्दलच लिहायचे असेल तर असे भांडे लपवून कशासाठी?
- Log in or register to post comments
H
hitesh
गुरुवार, 11/20/2014 - 02:22
नवीन
एका पंतप्रधानाने स्वतःचे विवाहबाह्य संबंध दडवले तर बोलायचे की राष्ट्रहित धोक्यात येते.
मग दुसर्या पंतप्रधानाने आपली लग्नाची बायको कागदावर न लिहिणे हेही राष्ट्रहिताला घातक ठरु शकतेच की .
महत्वाच्या व्यक्तीनी आपले जवळचे नातेवाईक कागदावर जाहिर करावेतच की. पळवाटा आणि सबबी का सांगाव्यात ?
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 11/20/2014 - 04:10
नवीन
एका पंतप्रधानाने स्वतःचे विवाहबाह्य संबंध दडवले तर बोलायचे की राष्ट्रहित धोक्यात येते.
डूनस्कूल वाल्या करण थापरच्या संदर्भात हे बोलत आहात का? 'Edwina-Nehru affair got Kashmir deal done'
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 11/20/2014 - 05:05
नवीन
माझे प्रतिसाद selective reading न करता वाचणार असाल . वरची मोदी यांच्यावरची चर्चा दुसरे आयडी करत आहेत . माझा त्यात सहभाग नाही . नरो वा कुंजरो वा चा प्रतिसाद दिला आहे फ़क़्त . नेहरू यांच्याबद्दल मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे . तुम्ही selective reading करत असाल पण ती मी पुन्हा पुन्हा मांडायला बाध्य नाही . हे बघा - http://www.misalpav.com/comment/632336#comment-632336.
मोदी यांच्यावर ची भूमिका धाग्यात स्पष्ट मांडली आहे -
'पंतप्रधान ' मोदी यांचे मूल्यमापन करण्याचा हा निकष असू शकतो का ? त्यांचे मूल्यमापन करण्याचा निकष त्यांनी महागाई कशी नियंत्रित केली , परराष्ट्र धोरण कसे राबवले , भ्रष्टाचार कसा नियंत्रित केला हा असायला नको का ? नेत्यांची वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यांच्यात फरक केला पाहिजे असे माझे मत आहे .
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Mon, 11/17/2014 - 09:53
नवीन
वाजपेयी यांनी 'मी अविवाहित आहे ब्रह्मचारी नाही' असे विधान इन जनरल केले होते. तर्हि कॉंग्रेसने कधी 'मिसेस कौल' यांचा सरळ/ छुपा उल्लेख करून वाजपेयींना झोडपले नाही हे मान्यच करावे लागेल.
आणि शेवटी वाजपेयी आणि कौल यांचे जे काही होते ते परस्पर संमतीने होते. कौल यांचे पती हयात असतानाही त्यांना कल्पना होती मात्र मोदी आणि 'त्या महिलेचे' मात्र सगळे छुपे होते. एखाद्या महिलेवर पाळत ठेवायला सरकारी यंत्रणा कामाला लावणे यावर टीका व्हायलाच हवी.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/17/2014 - 10:01
नवीन
टीका व्हायलाच हवी.. चर्चा व्हायलाच हवी. पण कोणत्या विषयांतर्गत असा प्रश्न आहे. माझ्यामते हे सरकारची व्यक्तिगत आयुष्यातील घुसखोरी आहे. मोदींचे व्यक्तिगत चारित्र्य यामध्ये पणाला लागते असे मला वाटत नाही. म्हणून ही चर्चा इथे अप्रस्तुत आहे असे माझे मत आहे. नसेल तर मोदींचे पर्सनल इन्टरेस्ट (चारित्र्याशी संबंधित) होते याचे पुरावे द्या, चर्चा पुढे चालू करू.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 11/17/2014 - 06:42
नवीन
संघाचे बहुतेक सर्वत्र आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कारटे असेच असते.
बरखा मुंडे प्रकरणात संघाने सोयीस्कर मौन पाळले होते.
वाजपेयींबद्दल आदर आहे. मात्र त्यांच्या बद्दल मौनव्रत घेणारा संघ मात्र नेहरुंबद्दल वेगळी भुमीका घेतो.
हे अर्थातच सम्घाच्या नेहमीच्या साधनशुचितेचाच भाग आहे.
पवाराम्बद्दल भ्रष्टाचारीपणाची टीका करताना येडीयुर्राप्पांचे विस्मरण होते.
संघाला कोंग्रेससरखा सुसम्स्कृत विरोधी पक्ष लाभला आहे हे त्यांचे नशीब आहे.
कम्दाहार प्रकरणी कोम्ग्रेसने कधीच भाजपवर टीका केली नाही.
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Mon, 11/17/2014 - 07:44
नवीन
दुटप्पीपणा आणि निर्लज्जपणा दोन्ही भाजपात काठोकाठ भरला आहे त्याचेच प्राशन भक्तगणांनी केल्याने त्यांचे आचारविचार देखील तसेच झाले आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 11/17/2014 - 20:47
नवीन
http://www.oneindia.com/2009/04/14/soniagandhi-slams-advani-for-releasing-terroristsdu.html
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 11/17/2014 - 08:06
नवीन
एक मजा बघा. इतिहासातल्या नेत्यांचे मूल्यमापन करताना वैयक्तिक चारित्र्य आणि राजकीय कर्तृत्वाची गल्लत करू नका म्हणणार्या लोकांची वर्तमानातल्या नेत्यांबद्दल मात्र अशी गल्लत का होते? जो लिबरल दृष्टिकोन इतिहासातल्या नेत्यांबद्दल बाळगला जातो तो वर्तमानात का चालत नाही? ढोंगी कुठले.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/17/2014 - 08:27
नवीन
सोपे आहे -
नेता इतिहासात गेला हे तो पूज्य होतो.
(समर्थकांच्या दृष्टीने इन्फिनिटी आणि विरोधकांच्या दृष्टीने शून्य :) )
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 11/17/2014 - 08:48
नवीन
इतिहासातल्या नेत्यांचे मूल्यमापन करताना वैयक्तिक चारित्र्य आणि राजकीय कर्तृत्वाची गल्लत करू नका म्हणणार्या लोकांची वर्तमानातल्या नेत्यांबद्दल मात्र अशी गल्लत का होते?
इतिहासात गेलेल्या नेत्याचा फोटोव्यतिरीक्त तसा फारसा उपयोग नसतो.
आपण आपल्या इथल्या कोणत्याच नेत्याच्या इतर सवयी उदा तंबाखू ,दारू याबद्दल कधीच जाहीर चर्चा करत नाही. व्यसने हा वैयक्तीक चारित्र्याचा भाग नसतो का?
- Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख
Mon, 11/17/2014 - 09:09
नवीन
फोटोशॉपचा जितका उपयोग जगात केला जात नाही त्यापेक्षा जास्त उपयोग भक्तगण करतात.
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Mon, 11/17/2014 - 09:25
नवीन
सर्वसाधारण समाजमानस हे १० वर्षवयोगटाचेच असते. त्यांना व्यसने, स्त्री-पुरुषातील गुंतांगुत, त्यांच्या आवडीनिवडी, मनोव्यापार समजावुन घ्येण्याचा आवाका तसा कमीच असतो. भारतासारख्या देशात हे पूर्वीपासूनच घडत आलेले आहे. उदा. रामाने सीतेचा अकारणच लोकनिंदेच्या साठी त्याग करणे, संभाजीबद्दल तत्कालीन अनेक प्रवाद उठविले गेले.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 11/17/2014 - 09:59
नवीन
विजय मल्ल्या हे मात्र या बाबतीत राजकारणी असूनही (राज्यसभेवर आहेत म्हणून राजकारणी) त्या बाबतीत फारच लक्की आहेत.
कोणीच त्यांच्या कसल्याही वागणूकीवर कसलीच टीकाटिप्पणी करत नाही
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 11/17/2014 - 10:10
नवीन
किंगफिशरच्या विमानातील सर्व हवाई सुंद्र्यांचे इंटरव्ह्यू ते स्वतःच घेत अशी एक बाजारगप्प सोडल्यास दुसरे काहीच नाही.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Mon, 11/17/2014 - 11:55
नवीन
एफडीआर,जेएफके,क्लिंटन आणि नेहरूंसारखे राष्ट्रप्रमुख पाहिल्यावर त्यांची व्यसने,बदफैलीपणा यांचा त्यांच्या कर्तुत्वाशी घंटा संबंध नसतो हे नक्कीच समजले…बाकी स्वच्च्छ चारित्र्याचे अतिशय निष्क्रिय राष्ट्रप्रमुख आहेतच कि ;)
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/17/2014 - 12:15
नवीन
हो.. आणि भारतापुरते बोलायचे झाले तर लोक शिवाजी महरांजाबरोबर थोरल्या बाजीरावालादेखील मानतात की.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Mon, 11/17/2014 - 12:30
नवीन
नक्कीच…सेनासरकार बाजीराव _/\_
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 11/17/2014 - 13:10
नवीन
हो, पण एका मस्तानीवरून बदफैलीपणा सिद्ध होत नाही. असो.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 11/17/2014 - 14:16
नवीन
मी कुठे म्हणतोय बदफैली म्हणून? मला एव्हढेच म्हणायचे आहे की कर्तृत्वापुढे चारित्र्य आपण नेहमीच गौण मानले आहे, अर्थात रुचीपालट म्हणून असेल तरच. जनानखाना नव्हे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Mon, 11/17/2014 - 23:30
नवीन
तुमच्या आधीच्या सर्व प्रतिसादाशी सहमत
फक्त येथे एकच नमूद करू शकतो , बाजीराव ह्यांनी मोगलांच्या सारखा जंगी जनानखाना बाळगला नव्हता , मस्तानी त्यांची पत्नी
आता आंतरधर्मीय विवाह हि हिंदू समाजात त्याकाळी व आजही बंडखोर कृती मानली जाते त्यामुळे संबंधित लेखास हे उदाहरण बाद ठरते , तत्कालीन कालखंडात राजांचा जनानखाना हि आम बात होती.
अनेक हिंदू , मुस्लिम राजांचे होते.
त्यामुळे कर्तुत्व व चारित्र्य हा प्रश्नच त्याकाळात निर्माण झाला नाही ,पेशवाईत नाना ह्यांची चलती कर्तृत्वामुळे होती. हे विसरून चालणार नाही
बाकी नेहरू ह्यांचे अनेक मैत्रिणी होत्या , मात्र माउंटबेटन संबंधी प्रकरण वेगळे होते. ह्या दोघांची जवळीक व राजकीय घडामोडी ह्यामुळे ते विवादास्पद बनते. इंग्रजांनी माउंटबेटन वर एक सिनेमा बनवला त्यात माउंटबेटन च्या भारतीय राजांना आव्हान केल्याने त्यातील बहुतांशी भारतात सामील झाले मात्र पुढे आपल्या पत्नीशी असलेल्या नेहरूंच्या संबंधांची आपल्या मित्रात टिंगल टवाळी करणारे माउंटबेटन तसेस चर्चिल ला , नेहरूंना भारताने राष्ट्रकुल मध्ये सामील होण्यास राजी करून अजूनही ब्रिटीश साम्राज्याशी नाते टिकवून धरण्यास फशी पाडल्याची फुशारकी मारतांना दाखवले आहे.
त्या काळात हेरगिरी , हनी ट्रेप दुसर्या महायुद्धात युरोपात सर्रास होत होते , नेहरू व एडविना ह्यांची तशीच काहीशी केस होती.
सदर सिनेमात
जिना हे खलनायक व नेहरू हे सोबर व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व दाखवले आहे मात्र मुस्लिम लीग ने हिंसा सुरु केले तेव्हा गांधी ती थांबविण्यासाठी गावोगावी फिरत असतांना नेहरू ह्यांनी आपल्या घरी मेजवानी दिली असते तेव्हा माउंटबेटन आपल्या परिवारासह तेथे येतो , आणि मग काय घडते ते पहा २.०२ मिनिटानंतर पहा ,
फाळणी ला विरोध करणारे नेहरू पुढे कसे विरघळले हे ह्या दृश्यांतून दिसते. १,२८ मिनिटात
ह्या दृश्यात ७. ४६ पसून पहा.
हि संपूर्ण क्लिप पहा
गांधीजी ह्यांचे व्यक्तिमत्त्व तसे बरेच संतुलित दाखवले आहे मात्र पुढे त्यांनी स्वातंत्र्यानंतर दंगलीच्या बाबतीत जे वादग्रस्त निर्णय घेतले विशेषतः क्रूरकार्म्यास पाठीशी घातले
तो चांगला चित्रित केला आहे. ३.०८ मिनिटात
गांधी वधाचा प्रसंग येथे दाखवला आह ,
नाना पाटेकर ने नथुराम ची भूमिका केली आहे. १.३८ मिनिटात
हे असेच घडले असेल अशी १०० खात्री देता येणार नाही पण इंग्रजांचा ह्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिसतो ,
थरूर व पाकिस्तानी पत्रकार ह्यात शिकार व शिकारी कोण होते हे एक गौडबंगाल आहे , हा इसम संयुक्त राष्ट्रसंघात कार्यरत होता , ललना व हेरगिरी ह्या गोष्टी त्याला नवीन नव्हत्या.
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 04:02
नवीन
वा वा ! नाटकं आणि षिनिमा बघुन इतिहास समजुन द्यायच्या लबाड कलेला सलाम !
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Tue, 11/18/2014 - 19:31
नवीन
हितेश भाऊ
इतिहास कसा समजून घेतात
इतिहासावर लिहिलेले पुस्तक , लेख हे प्रत्येकवेळी तटस्थ होऊन लिहिले जातात का किंवा ते अचूक असल्याची खात्री कोणी देऊ शकतो का ,
इंग्रजांनी १९८६ साली माउंटबेटन ह्या राजघराण्याच्या संबंधित टीव्ही वर मिनी सिरीज काढली , त्यात त्यांनी नेहरू ह्यांना एडविना च्या प्रेमात बुडालेले दाखवले आहे तर पटेल हे आपल्या मुद्द्यांच्या ठाम असलेले दाखवले आहे.
इंग्रज म्हणजे काही मोदी नव्हे की आता त्यांच्यावर पटेल प्रेमाचा आळ घेता येईल. ह्यात त्यांनी जीना ह्यांची भूमिका अत्यंत अहंकारी दाखवली आहे. बाकी दंगली पेटल्यावर गांधी हे गावागावात ती थांबविण्यासाठी प्रयत्न करत असतांना नेहरू मेजवान्या व आपल्या दैनंदिन कामकाजात मग्न दाखवले आहेत.
एडविना व नेहरू ह्यांच्या प्रेम्प्रकार्नांचे अनेक दाखले आंजा वर सापडतील, आता एडविना ह्यांच्या विचारांचा नेहरूंवर पगडा असल्याचे इंग्रजांनी दाखवले ,इंग्रजांच्या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य संग्राम पाहून किंवा वाचून त्यांच्याशी भारतीयांच्या दृष्टिकोनातून आजतागायत वाचलेल्या इतिहासाची तुलना केली तर त्यातील सामाईक मुद्दे व विरोधाभासी मुद्दे पाहून तार्किक दृष्ट्या काय झाले असेल ह्याचा अंदाज बांधता येतो ,
बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास लिहितांना यवनांचे सुद्धा दस्तावेज तपासले आहेत , उद्द लाल शाहिस्तेखानाचे ३ बोट कापल्या गेल्याची घटना लिहितांना त्यांनी शाहिस्तेखानची लिहिलेली डायरी अभ्यासली होती.
पाकिस्तान व भारताच्या हद्दी व शहरांचे वाटप झालेले नसतांना
स्वतंत्र राष्ट्र होऊन पंतप्रधान मधून मिरवण्यात नेहरू ह्यांनी घोडचूक केली , पुढे लाहोर हातचे गेले व काश्मीर प्रश्नास सुरुवात झाली.
त्यापेक्षा शिवसेना परवडली ,खातेवाटपावर सहमती झाल्याशिवाय पाठिंबा न देण्याचे धोरण ठेवले , आधी पाठिंबा देऊन मग चर्चा केली असती तर हाती काहीही लागले नसते.
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 11/18/2014 - 23:05
नवीन
गांधी सरहद्दीवर काम करत होते तेंव्हा नेहरु दैनंदिन काम करत होते . हे तुम्हीच लिहिले आहे.
राहिला प्रश्न पार्टीचा.. तोही त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच भाग होता. का देशावर संकट आले किंवा घरात सुतक आले तर नेहरुनी हातावर कांदा भाकर खाणे तुम्हाला अपेक्षित होते का ? कोणतीही परिस्थिती असली तरी जो तो त्याचे दैनंदिन जेवण घेत असतो.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 11/19/2014 - 01:52
नवीन
नेहरू ह्यांचे दैनंदिन कामकाज.....
त्याकाळात हजारो लोक दोन्ही बाजूने मरत असतांना इंग्रजांनी हस्तक्षेप करावयास नकार दिला तेव्हा जीना ह्यांना एक्शनपेक कृती ला उत्तर देणे गांधी व नेहरू ह्यांना शक्य झाले नाही म्हणूनच नाईलाजाने पाकिस्तान झाला किंबहुना बहुसंख्य हिंदूचे प्रतिनिधित्व करणारे ही लोक अहिंसेच्या बेडीत बांधल्या गेल्याने आपले अल्पसंख्याक हिंसेला सुरुवात करतील त्याला प्रत्युत्तर देणे गांधी व नेहरू ह्यांना जमणार नाही ह्याची जीना ह्यांना खात्री होती .म्हणूनच त्यांनी हिंसेचा जुगार खेळले व त्यात यशस्वी झाले. त्यातल्या त्यात गांधी आपल्या मार्गाने प्रामाणिक प्रयत्न करत होते व त्यांच्या जीवावर ही बांडगुळे मजा मरत होती , काही दिवसांपूर्वी केरळात वृत्तपत्रात जे लिहिल्या गेले त्या धर्तीवर एल लेख मी आधीच मिपावर लिहिला होता , गांधीजीपेक्ष्या खरे तर ...
पुढे निदान एकच घराणे भारताच्या बोकांडी बसले नसते.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 11/19/2014 - 01:57
नवीन
करेंगे ह्या मरेंगे अशी स्थिती निर्माण झाली होती , देशात सांप्रदायिक दंगे पेटले हप्ते अश्यावेळी ह्यांच्या प्रणय चेष्टा ऐन भरात होत्या. त्यावरून १९४२ एव स्टोरी हा शिनेमा बनला असावा
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/19/2014 - 05:34
नवीन
आँ.. !
गांधीजी जेंव्हा समाजकार्य करत होते तेंव्हा उर्वरीत भारताचे लोक प्रणयचेष्टा करत होतेच की !
आमचे तुमचे पणजोबा / पणजी यांनी प्रणयचेष्टा थांबवली असती तर तुम्ही आम्ही इथे आलो असतो का ?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 11/19/2014 - 05:53
नवीन
बास. माझी तर बाबा सपशेल शरणागती.. यावर काय बोलणार? दंडवत स्वीकारा हितेशभौ.

- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 11/19/2014 - 08:08
नवीन
@हितेश
आमच्या पणजोबांनी जनतेचे नेतेपद स्वीकारले नव्हते. जनसेवेचा मक्ता घेतला नव्हता व त्यांना सत्तेचा लोभ सुद्धा नव्हता. व विवाहबाह्य संबंधातून आमची पुढली जन्मली नाही ,
आपण नेहरूंच्या विवाहबाह्य संबंधाचे उदात्तीकरण अश्या प्रकारे करतात जणू काही तुमची पिढी ... असो
राजकारणातील लष्करातील किंवा कार्पोरेट क्षेत्रातील मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना हनी ट्रेप वापरून फितूर केल्याची शेकड्याने उदाहरणे मिळतील.
भारत पाकिस्तान प्रश्न सुटला नसतांना स्वातंत्र्याची घाई करायला नको होती. फाळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ,दोन्ही भागातून शांततेत स्थलांतर झाल्यावर
स्वातंत्र्य घोषित केले असते. तर अनेकांचे प्राण वाचले असते.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 11/19/2014 - 08:16
नवीन
जनतेचे नेतृत्व स्वीकारले म्हणजे आहार निद्रा मिथुन या नैसर्गिक गरजा शून्य होतात का ?़की नेता व प्रजा यांची अॅनोटोमी फिजिओलॉजी वेगळी असते ?
विवाहबाह्य संबंधातुन जन्मले म्हणजे ते बाळ गुन्हेगार असते का ? त्याचे आई आणि बाप कायदेशीरच असतात जरी ते नवरा बायको नसतील तरीही.
तुमच्या लाडक्या भगवंताने ज्यापुढे गीता सांगितली ते गुणी हिंदु बाळ व त्याची इतर चार ( + एक ) भावंदे ही खर्या आई बापांनी जन्माला घातली होती का ?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 11/19/2014 - 16:57
नवीन
याच्यापुढे मी पामर काय बोलणार? महात्मा गांधी काय म्हणतात ते पाहुया -
यावर मी कमेंट करू इच्छित नाही कारण मग या धाग्याचे काश्मीर होईल, आणि इतरांना पण संयम पाळावा अशी विनंती करतो. जाता जाता एव्हढेच सांगेन की त्यांचा जन्म समाजसंमत मार्गाने झाला होता. नेहरूंचे १९४७च्या वेळचे तथाकथित विवाहबाह्य संबंध समाजसंमत होते असे आपल्याला म्हणयाचे असेल तर मग बोलणेच खुंटले.
नैसर्गिक गरजा या नैसर्गिक मार्गांनी पूर्ण व्हाव्यात नाही का? भारतीय समाजात अजून तरी विवाहबाह्य संबंध नैसर्गिक मानले जात नाहीत. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा नेहरू त्यांच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देण्यात मग्न होते, तेव्हा गांधीजी दंगली शांत करत फिरत होते, एव्हढी एकच गोष्ट तुम्हाला मुद्दा स्पष्ट करण्यास पुरेशी असावी.
पण असो, तेव्हढे सगळे तुम्हाला कळायची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आणि तुम्ही गुद्द्याच्या पातळीवर उतरल्यामुळे आता चर्चा होऊ शकत नाही असे स्पष्ट करतो.
- Log in or register to post comments
H
hitesh
गुरुवार, 11/20/2014 - 02:49
नवीन
गांधीजींबद्दल इतकं चांगलं मिसळपावावर वाचुन ड्वाळे पाणावले.
मोदीनी गांधीजींना नमन केल्यानंतर मिसळपावावर गांधीजींबद्दल चांगल्ही लिहिलं जाऊ लागलय.
मोदींचे अभिनंदन
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 11/20/2014 - 04:58
नवीन
नाही हो, गांधी एक व्यक्ती म्हणून, एक तत्वनिष्ठ म्हणून आम्हाला नेहमीच आवडतात. आम्हाला आवडत नाहीत ती त्यांची काही धोरणे, जी त्यांनी एक राजकारणी म्हणून राबवली, पण ती नंतर त्यागायची वेळ आली तेव्हा देखील त्यांच्च त्याग केला नाही. त्यामुळे एक राजकारणी म्हणून गांधी मला अनुकरणीय नाहीत.
तुम्हाला शंका असेल तर माझे इतरत्रचे प्रतिसाद वाचा, आणि मिपावर यापूर्वीही गांधींवर बरच चांगले लिहिले गेले आहे, किंबहुना माझ्या या मताला मिपावरील चर्चांचाच आधार आहे. तुम्हीच अभ्यास वाढवा.
नेहरूंबद्दल देखील आदर आहेच, पण स्वतःच्या वैयक्तिक (तुमच्या भाषेत नैसर्गिक)गरजा आणि राष्ट्राच्या गरजा यांमध्ये नेहरूंनी स्वतःच्या गरजांना प्राधान्यक्रम दिला, आणि ते देखील राष्ट्र संकटात असताना असा आक्षेप आहे.
असो, तुम्ही खाली आणि इथे पण जी मुक्ताफळे उधळली आहेत ते पाहता तुमच्याकडचपण्मुद्दे संपले आहेत असे समजून येत आहे. तेव्हा इत्यलम|
- Log in or register to post comments
H
hitesh
गुरुवार, 11/20/2014 - 03:55
नवीन
जेव्हा नेहरू त्यांच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देण्यात मग्न होते, तेव्हा गांधीजी दंगली शांत करत फिरत होते, एव्हढी एकच गोष्ट तुम्हाला मुद्दा स्पष्ट करण्यास पुरेशी असावी..
..........
नै हो म्हाराजा ! या वाक्यातुन काहीही निष्कर्ष निघत नाही.
मी दोन हॉस्पिटलात मिळुन रोज सोळा तास काम करतो. उरलेल्या वेळेत घरी माझ्या गरजाही पूर्ण करतो.. ( याशिवाय अजुन दोन विवाहबाह्य संबंध उपभोगण्याचीही समजा माझी इच्छा आहे.. एक स्त्री व एक पुरुष ).
हॉस्पिटलात पेशंट तळमळत असताना मी नैसर्गिक गरजा भागवत फिरतो. असे तुम्ही माझ्याबद्दल लिहिलेत तर ते वरकरणी खरे वाटेल , पण ते पूर्ण सत्य असेल का ?
,.........
- Log in or register to post comments
H
hitesh
गुरुवार, 11/20/2014 - 04:08
नवीन
आणि काय अहे . की तुम्हाला काँग्रेसमुक्त भारत करायचा होता. तो आता झाला ना ? मग आनंदाने कारभार करा ना ? आता ते गांधी न्हेरु कशाला चघळत बसलाय ?
हॅ म्हणजे खाष्ट सासु मेल्यावरही सुनेने सुखाचा संसार करण्याऐवजी दिवसरात्र तिच्या नावाने बोटं मोडत टाइमपास करण्यासारखे आहे.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 11/27/2014 - 08:21
नवीन
आम्ही करू इच्छितो पण सध्या तरी करणार नाही. ज्याला तुम्ही उत्तर देताय त्याचा धर्म/जात हिंदूंच्या विरूद्ध आहे. तो असंच बोलणार. शेवटी रक्तच घाणेरडं त्याला तो तरी काय करणार.
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Wed, 11/19/2014 - 19:55
नवीन
जरा हे अधिक स्पष्ट करशील का ?? कायद्याच्या कुठल्या कलमाने ते 'कायदेशीर आई बाप' असतात ??
'आमचा लाडका भगवंत' म्हणजे तुझा तो कोणी लागत नाही म्हणजेच ' तु कापुन आलेला बाटगा' काय ?? तुझे खरे स्वरूप उघड झाले याचे भान आहे का तुला. ज्या एका विशिष्ट हिरीरीने व त्वेषाने असे तुझे प्रतिसाद येतायत त्यावरुन तरी असेच दिसते.
'आमचा लाडका भगवंत' तुझा जर कोणीच लागत नसेल तुला त्याची एव्हढी विवंचना का ??
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »