Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!

प
पगला गजोधर
Mon, 11/17/2014 - 07:45
🗣 128 प्रतिसाद
ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे. पुणे वेगाने कॉस्मोपॉलिटीन होत असल्यामुळे शहरात मैदानेच अस्तित्वात राहिलेली नाहीत. खेळांचा अभाव, बैठेकाम, दिवसरात्र संगणकावर बसणो, रात्रीचे काम, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो, अवेळी खाणे आदींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. यामुळे लठ्ठ असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग वेगाने जडू लागले आहेत. यामुळे पुणेकरांना लठ्ठपणाचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर आजाराबाबत पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या
33290 वाचन

💬 प्रतिसाद (128)
व
विलासराव Mon, 11/17/2014 - 07:46 नवीन
मी पयला!!!!!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 11/17/2014 - 07:49 नवीन
मी पयला काय विलासराव, पयला लठ्ठ? असो, असलांत तरी हरकत नाही. म्हणा, "अनिच्य!!!" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
द
दिपक.कुवेत Mon, 11/17/2014 - 07:51 नवीन
बेक्कार हसतोय पिडा काकांच्या ह्या वाक्यावर.... :D लोक्स आता तरी धागा पुर्ण वाचून, समजून "मी पयला" लिहित जा!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
इ
इरसाल Tue, 11/25/2014 - 06:45 नवीन
प्र.१ लठ्ठ म्हणजे काय ? प्र.२ लठ्ठालठ्ठी म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
ए
एस Mon, 11/17/2014 - 07:48 नवीन
अच्छा? म्हणजे मी तिघांमधला एक आहे होय? मला वाटायचे मी लाखांमधला एक आहे! :-P
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 11/17/2014 - 07:59 नवीन
आता मी पयला झालो, पण पिडांकाकांचा प्रतिसादपण उगीच उडाला. ओल्याबरोबर सुकं पण... असो! भारी होता. परत टाका हो! अमुच्यच ना? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पिवळा डांबिस Mon, 11/17/2014 - 08:12 नवीन
कशाला परत टाकायचा? ज्या कोणी उडवला असेल तो पुनःप्रकाशित करेलच की!! नायतर मग बघू काय करायचं ते! काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ज
जेपी गुरुवार, 11/20/2014 - 02:54 नवीन
दम भारी देतात. प्रतिसाद पुना जिवंत झाले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ह
हरकाम्या Mon, 11/17/2014 - 07:48 नवीन
विलासराव मोजणी झालेल्या पुणेकरात तुम्ही " पयले " का ?
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 11/17/2014 - 07:54 नवीन
आप कौनसे नंबर पे आते हो? पहले ३ में या उसके बाद? बाय द वे आम्हाला (पक्षी: मला) लठ्ठ आणि त्यातुन पुणेकर म्हटल्यावर एका व्यक्तिची प्रकर्षाने आठवण झाली आहे...
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 11/17/2014 - 08:04 नवीन
कोन बर्र दीपक-काका ? सांगा तरी बरे, तुमच्या डोळ्यासमोर कोण ते ? . . दरम्यान माझ्या बाजूचा म्हणतो, पुणेकर तरी बरे, तिघातला एकच लठ्ठ. नागपूरमध्ये तर दर ऐका नागपूरकरामध्ये तीन लठ्ठ ! असे म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
ब
बॅटमॅन Mon, 11/17/2014 - 07:55 नवीन
हे तर अमेरिकेपेक्षा जास्त % झालं की. वा वा वा, पुणे तिथे काय उणे.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 11/17/2014 - 07:56 नवीन
विलासराव 'मी पयला संघटना' बुडाली की, =))
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Mon, 11/17/2014 - 07:56 नवीन
पुणेकर " लठ्ठ " होत आहेत हे सांगण्यासाठी किंवा लठ्ठ पुणेकरांची संख्या मोजण्यासाठी कुठल्या संस्थेची गरज नाही. संध्याकाळी पुण्यात लागणार्या " वडापाव " च्या गाड्या आणि त्याभोवती उभे असलेले पुणेकर यावरुन ही गोश्ट सहज लक्षात येते.याशिवाय पुण्यात वाढणारी " Hotel " ची दिवसागणिक वाढणारी संख्या यावरुन पुणेकर हे " लठ्ठ " होत आहेत हे दिसतेच आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 11/17/2014 - 08:07 नवीन
वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय? मुंबई तर दशकानुदशके वडापाववर जगत आली आहे तरी लठ्ठ का बरं नै झाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
ए
एस Mon, 11/17/2014 - 08:09 नवीन
'कोकणात सगळेच भात खातात, कुठे आहेत लठ्ठ?'... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पगला गजोधर Mon, 11/17/2014 - 08:23 नवीन
वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय?
हुं, वडापावमधे थोडीच 'शिकरण आणि मटार उसळ' सारखी पोषकमुल्ये मुल्ये कुठे आहेत ? मग बोडी कशी पोसणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मुक्त विहारि Wed, 11/19/2014 - 21:52 नवीन
उदा, दाबेली चापणारी गुजराथी मंडळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह Tue, 11/25/2014 - 07:17 नवीन
किती वेळ उकडता हो बिचाऱ्या बटाट्याला, मुविकाका ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
व
विवेकपटाईत Sat, 11/22/2014 - 16:42 नवीन
तिथे लोकल मध्ये त्यांना पिळून काढला जातो. त्या मुळे मुंबईकर लठ्ठ होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सुबोध खरे Mon, 11/17/2014 - 08:34 नवीन
@हरकाम्या पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी फिरायला गेलो होतो तेथे एकाला एक खेटून असलेली हॉटेलं पाहून पुण्यात बायका संध्याकाळी स्वयंपाक करीत नाहीत कि काय अशी एक शंका मनात येऊन गेली ( पण उघड बोलायची हिम्मत झाली नाही--पुण्य नगरी सोडून आठ वर्षे झाली असल्याने वाद घालायची शक्ती आता राहिली नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
स
सस्नेह Mon, 11/17/2014 - 11:06 नवीन
*biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सामान्यनागरिक Mon, 11/17/2014 - 15:16 नवीन
खबरदार ! पुण्यातल्या लोकांची अशी निंदा केल्यास अति भयानक मानव संहारक अस्त्रे सोडण्यात येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
द
दिपक.कुवेत Mon, 11/17/2014 - 15:18 नवीन
सामान्य नागरिक बोलतोय म्हणजे परीस्थीती गंभीरच म्हटली पाहिजे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक
द
दिपक.कुवेत Mon, 11/17/2014 - 07:57 नवीन
उडालेत, उडवलेत कि मलाच दिसत नाहियेत?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 11/17/2014 - 07:58 नवीन
तीन पुणेकरांमागे माहीत नाही, पण दोन पुणेकरांमागे एक आहे हे माहीत आहे. ;)
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 11/17/2014 - 08:00 नवीन
ते दोन पुणेकरांमागे एक चिंचवडकर आहेत असे म्हणायचे होते का तुम्हांला? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
द
दिपक.कुवेत Mon, 11/17/2014 - 08:04 नवीन
मुद्दा काय....लठ्ठपणा!! तो तर कॉमन आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/17/2014 - 09:47 नवीन
@ते दोन पुणेकरांमागे एक चिंचवडकर>>> =))))) अहो...पण ते ऑलरेडीच लठ्ठ आहेत.. अता तुम्हाला त्यांना गलेलठ्ठ म्हणायचे असेल..तर बघा व्बॉ! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सूड Mon, 11/17/2014 - 10:35 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
व
वेल्लाभट Mon, 11/17/2014 - 08:05 नवीन
आता कराचं काय !?
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 11/17/2014 - 08:14 नवीन
सोपं आहे....पहिल्या ३ मधेच रहायचा प्रयत्न करायचा!!! (अर्थात तुम्हि पुणेकर असाल तरच हि अट लागू)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
न
नाखु Mon, 11/17/2014 - 08:08 नवीन
बरे झाले घाई-घाईत " मठ्ठ "असे वाचले होते (नसता गदारोळ होता-होता वाचला म्हणायचा!!!) बाकी बॅट्या मोड ऑन "पुण्यात वाढणारी " Hotel " ची दिवसागणिक वाढणारी संख्या यावरुन पुणेकर हे " लठ्ठ " होत आहेत हे दिसतेच आहे. हा निक्शर्ष फारच रोचक आहे बॅट्या मोड ऑफ. बाकी नेहमीप्रमाणे पुणे आणि अ-पुणे असा वळणावर धागा जाईलच.
  • Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद Mon, 11/17/2014 - 08:12 नवीन
करा चैन! खा! रोज शिकरण खा! मटार उसळ खा!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 11/17/2014 - 08:18 नवीन
तो पगले ये उदात्त कार्य आप अपने हाथ में क्यु नहिं लेते?? आगे बढो...हम आपके साथ है!!!
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 11/17/2014 - 08:26 नवीन
"पुणेकरांमध्ये जनजागृती" म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे, मी पगला आहे हे कबूल, पण येवडापन पगला नाय आपन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/17/2014 - 08:28 नवीन
This is not funny ... परवाच दिवाळीची खरेदी करायला कपड्यांच्या दुकानात गेलो अन मला साक्षात्कार झाला की आता मलाही स्लिम फिट शर्ट्स बसत नाहीयेत :( ढेरीची गोलाई ४- ५ महिन्यांची वाटायला लागलीये आता ... *dash1* काही तरी केलं पाहिजे राव :( आता परत पळायला सुरुवात केली पाहिजे च
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 11/17/2014 - 10:34 नवीन
>>काही तरी केलं पाहिजे राव आता परत पळायला सुरुवात केली पाहिजे च असं नुसतं म्हणत राह्यलात तर काय्येक होणार नाही गिर्जाकाका!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ए
एस Mon, 11/17/2014 - 08:33 नवीन
अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!
हे 'पुणो' कुठे आहे बरं?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 11/17/2014 - 09:43 नवीन
गल्तीसे मिस्टेक हुएला हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पैसा Mon, 11/17/2014 - 08:34 नवीन
सगळ्या जगात पुणे हे एकच शहर आहे काय??
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 11/17/2014 - 08:47 नवीन
या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 11/17/2014 - 11:16 नवीन
पुण्यालाच काय सोनं चिकटलंय बघू ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Mon, 11/17/2014 - 11:20 नवीन
या धाग्यात जर पुणे नसते तर कुणी ढुंकूनही पाहिले नसते. अ‍ॅग्री ऑर नॉट? कल्पना करून पहा, म्हणजे, 'तीन रत्नागिरीकरांमागे एक लठ्ठ!', 'तीन सांगलीकरांमागे एक लठ्ठ!', 'तीन नागपूरकरांमागे एक लठ्ठ!' किंवा अगदी 'तीन मुंबईकरांमागे एक लठ्ठ!'... असे काहीसे शीर्षक असते तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिवळा डांबिस Mon, 11/17/2014 - 08:50 नवीन
आता रत्नांग्रीत लठ्ठ शोधायचे म्हणजे शोधणार्‍यावर नाही नाही ते आरोप होणार!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 11/17/2014 - 11:20 नवीन
रत्नांग्रीत लट्ठंभारती कोण नाय. शोधायला लागला कोण तर आरोप नाय करणार, हायकोडतात केस घालीन सरळ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पगला गजोधर Mon, 11/17/2014 - 09:37 नवीन
पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 11/17/2014 - 11:23 नवीन
पुण्यनगरीत एक चहा फुकट मिळवण्यासाठी मला गोवा ते पुणे तीन फेर्‍या मारायला लागल्या. ते पुणेकर स्वतः पण काय खात असतील असं वाटत नै! मग लट्ठ कसे होतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सूड Mon, 11/17/2014 - 11:28 नवीन
दुसर्‍यांना काय देत नाही म्हंजे स्वत: काय खात नसणार हा समज जरा चुकीचा नै का वाटत? आठवा बरं तुम्ही शन्वारवाड्यावर आणलेली काजूची पाकीटं....किती वेळ तुमच्या डोळ्यासमोर राह्यली ;) झालंच तर कुंदा किती वेळात संपला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पगला गजोधर Mon, 11/17/2014 - 12:40 नवीन
'चहा फुकट मिळवण्यासाठी गोवा ते पुणे तीन फेर्‍या', मारण्याऐवजी, तिकिटाच्या(जर काढले असेल तर) रकमेत, वर्षभर घरीच तांब्याभर चहा परवडला असता किनै ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा