अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!
ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे. पुणे वेगाने कॉस्मोपॉलिटीन होत असल्यामुळे शहरात मैदानेच अस्तित्वात राहिलेली नाहीत. खेळांचा अभाव, बैठेकाम, दिवसरात्र संगणकावर बसणो, रात्रीचे काम, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो, अवेळी खाणे आदींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. यामुळे लठ्ठ असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग वेगाने जडू लागले आहेत. यामुळे पुणेकरांना लठ्ठपणाचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर आजाराबाबत पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
💬 प्रतिसाद
(128)
स
सस्नेह
Mon, 11/17/2014 - 11:30
नवीन
हे मात्र खरं...आख्ख्या महाराष्ट्राचा गाळिव 'अर्क' पुण्यात जमा झाला आहे..
आणि हे सगळे स्वतःला पुणेकरच म्हणवतात !
रच्याकने, हे 'ऐकामाद्वितीय ' काय भानगड आहे ?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 11/17/2014 - 12:29
नवीन
.
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 11/17/2014 - 12:41
नवीन
या!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 11/17/2014 - 13:28
नवीन
पूस्प्गूच कुठंय ?
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 11/17/2014 - 13:42
नवीन
पूस्प्गूचाची बाय (तिच्या) सासूबैंच्या धाकानं हल्ली येत नाय इकडं. :-) काय बाय, खरां आसां ना?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 11/17/2014 - 13:00
नवीन
ऐकामाद्वितीय म्हणजे 'ऐका माझे (पहिले व) दुसरे (बोलणे)'.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 11/17/2014 - 11:43
नवीन
आणि पुण्यातले सगळेच "पुणेकर" ऐकामाद्वितीय??
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 11/17/2014 - 12:32
नवीन
म्हणजे काय, सौन्शयच नाही ! पुणेकर व एकमेवाद्वितीय हे समानार्थीच शब्द आहे, बेसिक आहे.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 11/17/2014 - 08:39
नवीन
अरे बापरे......
पुण्याबद्दल हे असले भलतेच काय ऐकायला मिळतय?
पूर्वीचं पुणे राहीलं नाही आजकाल?
- Log in or register to post comments
ज
जेपी
Mon, 11/17/2014 - 08:52
नवीन
मी जर पुण्यात कुठला व्यवसाय चालु केलातर तो नक्कीच खाण्याशी संबधीत आसेल.एवढी खादाडी मी इतर कुठे पाहिली नाही.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 11/17/2014 - 09:49
नवीन
@JP, या या तुम्हीपण दुकान टाका पुण्यात, मराठवाड्याचे धपाटे, शेगावची कचोरी, कोल्हापुरी मिसळ, मालवणी फिश, सांगलीची भेळ, धारवाडी पेढे, राजस्थानी कचोरी यांच्या सारखी कैक दुकाने आधीच हैत, त्यात तुमचं पण ऐक दुकान.
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Mon, 11/17/2014 - 09:11
नवीन
होय अगदी
एक नक्किच लठ्ठ आणि बाकिचे दोन हेल्मेट न घालणारे मठ्ठ अस प्रमाण असणार आहे !!!
कृपया ह. घ्या !!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 11/17/2014 - 09:29
नवीन
=)) वणवा पेटेल यावरून
- Log in or register to post comments
ज
जेपी
Mon, 11/17/2014 - 09:57
नवीन
वणवा पेटेल यावरुन>>>>>
पेटु द्या .तेवढीच चरबी जळुन लठ्ठपणा कमी होईल.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 11/17/2014 - 09:40
नवीन
ओ कैच्या कै नका सांगू, बाकीचे दोघे कारवाले, मग कशाला ते हेल्मेट का घालतील ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 11/17/2014 - 09:51
नवीन
हा हा हा, अगदी अगदी =))
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Mon, 11/17/2014 - 10:15
नवीन
ह.घ्या.ची काही गरज नाहीये. हेल्मेट न घालणारे फक्त मठ्ठच नसतात तर गाढव, अडेलतट्टू, बिनडोक आणि रा.गां. ही असतात.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 11/17/2014 - 10:51
नवीन
रा.गां. म्हन्जे?...व्यनी करता काय?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 11/17/2014 - 10:57
नवीन
>>> रा गां.
आयला ! ही सर्टीफाईड 'उपाधी' कधीपासून झाली? ज्युपिटरची एस्केप वेलॉसिटी?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/20/2014 - 03:22
नवीन
ह्याचे उत्तर अजुन आलेले नाही :(
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 11/17/2014 - 09:55
नवीन
एक नक्किच लठ्ठ आणि बाकिचे दोन हेल्मेट न घालणारे मठ्ठ अस प्रमाण असणार आहे !!!
शॅम्पेन आजोबा :काही शंका
१) पुण्यात हेल्मेट घालणारे सर्वच जण मठ्ठ नसतात हे कशावरून?
२) सर्व लठ्ठ माणसे हेल्मेट वापरतात हे कशावरून?
३) लठ्ठ लोक असणारे पुणे म्हणजे नक्की कोणते पुणे अभिप्रेत आहे. नदिच्या अलिकडचे? ( लाल देवळापर्यन्तच फक्त) की आणखीन नदिच्या अलीकडचे ( लाल देवूळ ते मगरपट्टा व्हाया बंडगार्डन )? नदिच्या पलीकडचे ( डेक्कन ,नळस्टॉप , कर्वेनगर ,कोथरूड , पौड रोड भुसारी कॉलनी सहीत) की मग नदी पलीकडचे हुच्च पुणे ( बाणेर , औंध हिंजेवाडी इ. )
पिंची, हडपसर ,खडकी , विश्रान्त वाडी हे भाग कोणत्या पुण्यात ठेवायचे यावर तज्ञांचे दुमत आहे. ९ बहुतेक हे भाग बारामतीशी सल्लग्न आहेत)
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Mon, 11/17/2014 - 10:37
नवीन
अहो विजुभौ उर्फ खापर पणजोबा , तुम्ही आजिबात पुणेकर नाहीत हे ठामपणे सांगू शकतो
दर खेपेस मागच्या खेपे पेक्षा पुण्यातील वाहतूकीची आधिक-आधिक लागलेली वाट आणि
जागो जागी सहज दिसून येणारी "बाळसेदार" (पिठुळ पोती टाइप) माणसे सहजपणे नजरेस पडतात..
जास्त वेळ भु'गोला' वर वाद घालताना आपण गोल झालोय हेच कळल नसणार !!
असो आपल्याला काय बुवा त्याच..
(मस्तानीप्रेमी) माझीही शॅम्पेन
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 11/17/2014 - 10:01
नवीन
पुण्यात गेल्या १० हजार वर्षात कधीही कोणीही मठ्ठ नव्हतं, नाही, आणि पुढची १० हजार वर्षे नसेल.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 11/17/2014 - 10:18
नवीन
हे असे बोलणारेदेखील अत्रे सासवडचे , पुणे जिल्ह्यातलेच होते
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 11/17/2014 - 10:37
नवीन
माहीत नाय बा!! आम्ही आपलं आठवड्यातनं तीनदा तरी वजनं उचलायला जातो, दोरीउड्यांचे १५० चा एक असे तीन सेट करतो, घरी येऊन ओटमील खातो. ;)
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 11/17/2014 - 21:32
नवीन
गाढवाला घोड्याच्या तबेल्यात बांधल्याने त्याचा घोडा होत नाही !!! ;-)
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/18/2014 - 10:12
नवीन
पण मग पुणे हे घोड्यांचा तबेला का? ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 11/18/2014 - 12:12
नवीन
माझी एक पुणेकर आतेबहीण 'हुजूरपागा' नावाच्या शाळेत जायची, तर तिचा पुणेकर भाऊ तिला आणि तिच्या मैत्रिणींना 'हुजूरपागेतल्या घोड्या' म्हणायचा!
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/18/2014 - 12:17
नवीन
तसं म्हणायला गेलं तर मुंबैला धोबीतलाव आहे, तिथल्या लोकांना गाढव म्हणायला काहीच हरकत नाही. ;)
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 11/23/2014 - 14:05
नवीन
धोबीतलावात धोबी असण्याची अपेक्षा समजू शकतो गाढव mandatory का ??
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/18/2014 - 10:26
नवीन
मी =गाढव,
मी = exमुंबईकर
म्हणून गाढव=मुंबईकर...?
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 11/18/2014 - 12:19
नवीन
तुम्ही = (सध्या ) ...कर ?
:-> ...कर = गाढव ?
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/18/2014 - 12:22
नवीन
हे समीकरण गैरलागू आहे हो. अट बघा ना, गाढव (मुंबैकर/exमुंबैकर) घोड्यांच्या तबेल्यात (पुण्यात) बांधल्याने त्याचा घोडा (पुणेकर) होत नाही.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 11/18/2014 - 12:45
नवीन
माझं गणित अंमळ कच्चं आहे हो
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 11/23/2014 - 14:08
नवीन
करेक्शन.... एक्स बदलापूरकर ;-)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Mon, 11/17/2014 - 11:12
नवीन
पुण्यात दोन दोन बारीक माणसं आहेत ???
कै च्या कै ...
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 11/17/2014 - 11:17
नवीन
१)सतत खाण्यापेक्षा सतत खाण्याचाच विचार करणं यामुळे लठ्ठपणा येतो.
२)जिवाला काहितरी विवंचना असावी. पाच पोळ्या खाल्यास पहिल्या तीन पचतील का या काळजीने दोन पोळ्यांची शक्ती वापरली जाते आणि मेद वाढत नाही.
जाणकार आणखी सांगतीलच.
- Log in or register to post comments
ग
गौरी लेले
Mon, 11/17/2014 - 12:26
नवीन
सगळे पुणेकरांवर खार खाउन का असतात देव जाणे ?
नसेल झेपत तर नका राहु ना पुण्यात ... कोणीसक्क्ती केलीये का ?
बाकी माझ्या माहीती नुसार ही माहीती चुकीची आहे , पुण्यात अजुन तरी ओबेसीटी इतकी तीव्र नाहीये !
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 11/17/2014 - 12:29
नवीन
>>> खार खाउन
वजन वाढायला लोणच्याचा खार सुद्धा कारणीभूत असतो बहुधा!
मला कल्पना नाही. काटा मोडला मागच्या वेळी वजन करायला गेलो तेव्हापासून वजन करत नाही. ;)
- Log in or register to post comments
ग
गौरी लेले
Mon, 11/17/2014 - 12:35
नवीन
नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला प्यारे जी ?
मला आपला प्रतिसाद कळाला नाही .
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 11/17/2014 - 13:00
नवीन
लोणच्याच्या खारावर टिप्पणी केलेली होती. समजलं का?
- Log in or register to post comments
ग
गौरी लेले
Mon, 11/17/2014 - 13:11
नवीन
लोणच्याच्या खारावर टिप्पणी केलेली होती. >>>
पण त्याचा वजन वाढीशी ( विशेषतः पुण्यातल्या ) काय संबंध ?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 11/17/2014 - 13:28
नवीन
पुन्याचं कोन काय बोल्लंय काय तै? आमी खाराचं बोल्लो व्हतो ना! खारामधे लई त्याल, लई मीठ आस्तंय.तेनं कोलेस्टेरॉल वाडतंय आनि वजन पन असं म्हनतेत.
आमाला कल्पना नै. आसं म्हनलो.
तुमी मूळ पुन्याच्याच का ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 11/17/2014 - 13:05
नवीन
खारीसारखा बिचारा क्यूट जीव....त्याला खातं का कुणी? हे पुणेकर म्हणजे ना, वाट्टेल त्या कल्पना करतात.
तदुपरि-भारतीय संविधानानुसार आम्ही अख्ख्या भारतात कुठेही जाऊयेऊ, पुण्यात रहा वा नका राहू हे कुणी सांगायचं काम नाही.
पुणेकरांबद्दल काही बोलल्यावर इतका फणकारा असेल तर स्वतंत्र पुणे मिळवा आधी अन मग बोला. कसें?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 11/17/2014 - 13:19
नवीन
पुणेकरांबद्दल काही बोलल्यावर इतका फणकारा असेल
>>> लेले ... म्हणजे सदाशिव पेठी असतील रे त्या म्हणुन राग आला असेल त्यांना !
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 11/17/2014 - 13:34
नवीन
ळॉळ =))
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 11/17/2014 - 13:37
नवीन
>> म्हणजे सदाशिव पेठी असतील रे त्या म्हणुन राग आला असेल त्यांना !
हो तर !! त्या लेले आणि तुम्ही गोडबोले...तुमच्याशिवाय कोण नीट ओळखणार त्यांना! ;)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 11/17/2014 - 15:10
नवीन
पण आम्ही शनिवार पेठेतील आहोत तेही सातार्याच्या , त्यातही वरच्या शनिवार पेठेतले ...
जमीन आस्मानचा फरक आहे ...अगदी देशस्थ कोकणस्थ इतका फरक आहे ;) :D
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 11/17/2014 - 13:28
नवीन
@स्वतंत्र पुणे मिळवा आधी अन मग बोला.कसें?>>> आपल्याला-स्व तंत्र,असे म्हणायचे होते काय??? 
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 11/17/2014 - 13:30
नवीन
ते आधीपासूनच आहे की! सगळेच स्व-तंत्रानं वागतात ना 'पुन्यात'?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »