Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!

प
पगला गजोधर
Mon, 11/17/2014 - 07:45
🗣 128 प्रतिसाद
ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे. पुणे वेगाने कॉस्मोपॉलिटीन होत असल्यामुळे शहरात मैदानेच अस्तित्वात राहिलेली नाहीत. खेळांचा अभाव, बैठेकाम, दिवसरात्र संगणकावर बसणो, रात्रीचे काम, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो, अवेळी खाणे आदींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. यामुळे लठ्ठ असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग वेगाने जडू लागले आहेत. यामुळे पुणेकरांना लठ्ठपणाचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर आजाराबाबत पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या
33290 वाचन

💬 प्रतिसाद (128)
ब
बॅटमॅन Mon, 11/17/2014 - 13:38 नवीन
होंय!!!! इतकें असतां स्वतंत्र जागीर करोन घ्यावी, त्यास पेस्तर बोभाट आलियास उपराळा तेणेंगुणें तेथेंच काढतां येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ज
जेपी Mon, 11/17/2014 - 12:45 नवीन
आमचे तातश्री असेच बोलतात.कोणालाच काही कळत नाय
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/17/2014 - 13:14 नवीन
@कोणालाच काही कळत नाय>> =)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
द
दिपक.कुवेत Mon, 11/17/2014 - 13:30 नवीन
तुम्हि बोलताय काय? असे कसे रे तुम्हि सगळे पुणेकर??
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 11/17/2014 - 13:33 नवीन
तू गंप रांव रे!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
स
सूड Mon, 11/17/2014 - 13:34 नवीन
हयसंर कोण विषय धरुन बोलतंत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
त
तिमा Mon, 11/17/2014 - 13:49 नवीन
मिपाकरांमधे लठ्ठपणाचं प्रमाण काय आहे ? एकूण आणि पुणेरी मिपाकरांमधे.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 11/17/2014 - 13:50 नवीन
डु-आयडी किती वेळा मोजायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ट
टवाळ कार्टा Mon, 11/17/2014 - 17:46 नवीन
तुमचे किती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ट
टवाळ कार्टा Mon, 11/17/2014 - 17:47 नवीन
१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ए
एस Mon, 11/17/2014 - 18:30 नवीन
अरे बाप रे! एवढे आहेत? मला माहीतच नव्हतं! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
स्पा Mon, 11/17/2014 - 13:53 नवीन
ह्या ह्या बरीच करमणूक होतेय
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 11/17/2014 - 17:09 नवीन
दु दु स्पा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सूड Mon, 11/17/2014 - 17:20 नवीन
दु दु is अगोबा, स्पा is just वशाड मेलो !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/17/2014 - 18:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
सिरुसेरि Mon, 11/17/2014 - 14:06 नवीन
पुण्यामध्ये जिमची संख्याही वाढते आहे . पण त्या बद्दल कोण बोलणार नाही .
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 11/17/2014 - 14:16 नवीन
तुम्ही बोला आम्ही ऐकामा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
ध
धडपड्या Mon, 11/17/2014 - 14:27 नवीन
असं कसं, असं कसं? उगाच नावं का ठेवायची? आता केस विंचरताना, आरशात दोन्ही कान दिसत नाहीत, पॅंट जरा मोठ्या आणाव्या लागताहेत, तर लठ्ठ लठ्ठ म्हणून चिडवू नये कोणी..!! सकाळी फिरायला गेल्यावर उगाच चार दोन बटाटेवडे, घरी आल्यावर चहासोबत उगाच डिशभर पोहे, जेवणात चार पाच पोळ्या, उगाच जरासा भात, बाधू नये म्हणून तूप, संध्याकाळी फिरताना भेळ वगैरे, आणि रात्रीचे थोडेसे जेवण... एवढ्याश्याने कोणी लठ्ठ होतं का?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/17/2014 - 14:42 नवीन
अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!
जर तीन माणसांच्या मागे असलेला माणूस दिसत असेल तर तो खरंच खूप लठ्ठ, नाहीतर कमीत कमी पुढच्या माणसांपेक्षा जास्त उंच असणार ! हे झालं एक साधं विश्लेषण. परतू खरा प्रश्न असे आहेत... १. हे "पुणो" आहे तरी कुठे ??? २. त्या माणसाला तीन माणसांच्या मागे उभे राहण्यास भाग पाडण्याचा अन्याय कोण करत आहे ? त्यालाही इतरांबरोबर पुढे उभे राहण्याचा लोकशाही हक्क असला पाहिजे... मग तो लठ्ठ असो की उंच, काही फरक पडत नाही. इतका अन्याय होऊनही शासन अजून का बरे झोपलेले आहे ???
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 11/17/2014 - 14:55 नवीन
गजोधरांच "णो" ह्या शब्दावर पगल्या सारखं प्रेम आहे. आता हेच बघा ना...संगणकावर बसणो, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो ई. तसचं ते पुणो. आपल्या माणसांना सॉरी मिपाकरांना आपणोच समजून घ्यायचो हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पगला गजोधर Tue, 11/18/2014 - 04:51 नवीन
गल्तीसे मिस्टेक हुएला हय. लठ्ठपणा =>जाड बोटे =>मोबैलवर टंकताना होणार्या चुका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
स
समीरसूर Tue, 11/18/2014 - 12:54 नवीन
गजोधरांच "णो" ह्या शब्दावर पगल्या सारखं प्रेम आहे. आता हेच बघा ना...संगणकावर बसणो, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो ई. तसचं ते पुणो. आपल्या माणसांना सॉरी मिपाकरांना आपणोच समजून घ्यायचो हो... अक्षरशः खाली पडतोय की काय इतके महाभयंकर हसलो. कंट्रोलच होईना... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
र
रेवती Mon, 11/17/2014 - 17:21 नवीन
व्यायामाला पर्याय नाही हेच यातून सुचवायचय ना! मग बरोबरच्चे ते!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 11/18/2014 - 13:50 नवीन
पुणेकरांनी पुन्हा सायकली चालवायला घ्याव्यात.नाहीतरी पुणे सायकलींचे शहर म्हणून ओळकह्ले जायचेच.उत्तम व्यायाम होतो.बायकांना,मुलींना तोंडाभोवती तो दहशतवादी स्कार्फ गुंडाळायची गरज नाही.अर्थात त्यासाठी गाड्यांचे प्रमाण कमी करावे लागेल.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 11/18/2014 - 14:19 नवीन
बायकांना,मुलींना तोंडाभोवती तो दहशतवादी स्कार्फ गुंडाळायची गरज नाही.
हेच एखाद्या पुरुषाने म्हटले असते तर "घरातल्या स्त्रियांची आठवण येऊन मन द्रवलं कसं नाही" छाप प्रतिक्रियांचा पाऊस पडला असता. (माईसाहेब व नेफळट नानासाहेबांचा फॅन) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
त
त्रिवेणी Wed, 11/19/2014 - 08:08 नवीन
नाय हो खरच म्हणता आहेत ते. गाड्यांमुळे खुप प्रदुषण होते आणि त्यामुळे स्किन, केस खराब होतात ना. म्हणुन बायका बांधतात तसा स्कार्फ. आता दहशदवाद्यांनी केली ही फॅशन फॉलो तर काय बिघडले. (निष्पाप) त्रिवेणी
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 11/19/2014 - 08:11 नवीन
निष्पाप नस्तंय, निरागस अस्तंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
त
त्रिवेणी Wed, 11/19/2014 - 08:42 नवीन
हो हो खरच की.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा