Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कामाचे आणि बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग २

A
arunjoshi123
Sun, 11/23/2014 - 08:17
🗣 149 प्रतिसाद
मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे. तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते. या व्यतिरिक्त, आपण बर्‍यापैकी मध्यम वर्गाच्या आसपासचे असल्याने, आपल्या मनात बरेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, धार्मिक, मानववंशशास्त्रसंबंधित, उत्क्रांतीसंबंधित, इ इ अनेक प्रकारचे छोटे मोठे कामाचे वा बिनकामाचे १-२ ओळींचे विचार येतात. तितकी एक ओळ, विचार लिहिण्यासाठी धागा काढणे इष्ट वाटत नाही. तेव्हा असे प्रश्न नि विचार इथे एकेका प्रतिसादाच्या रुपाने सदस्यांनी टाकावेत. आता कोणी म्हणेल इंटरनेट, गुगल, विकिपिडिया असताना याची काही गरज नसावी. अर्थातच हे खरे आहे. याची ८०% गरज इंटरनेट भागवू शकते. पण तरीही खालील काही निरीक्षणे नोंदवतो. १. इंटरनेटवर आपण मशिनला प्रश्न विचारत असतो. मशिन भाव पोचला आहे का हे बर्‍याचदा कळत नाही. २. नेटवर आलेल्या शोधांना वाचून पाहून उर्जा कधी कधी इतकी घालावी लागते कि आपण ते कुतुहल "राहू देतो". ३. विकिपेडिया खूप छान आहे पण तो संज्ञा खूप वापरतो आणि अशा नव्या संज्ञांचे खूप सारे संदर्भ, लिंका देतो. ४. हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते. ५. उत्तर मिळत असताना जालाशी पुढे संवाद करता येत नाही. केल्यासही त्याला मिपीय संवादाचा फ्लेवर नसेल. अजून एक - असे बरेचशे प्रश्न असतात कि ते गुगलसाठी नसतातच. अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते. सध्याला आपण या इनिशिएटिवबद्दल काय म्हणू इच्छिता ते सांगा वा आपले प्रश्न विचारा, विचार प्रकट करा वा इतरांचे प्रश्न उत्तरा वा विचारांवर भाष्य करा. आपल्या विचारावरचे एखादे थर्ड पार्टीचे सहमतीपूर्ण भाष्य पाहिले कि दिवस फार चांगला जातो असे जनरल निरीक्षण आहे. ----------------------------- अर्थातच मिपा काय विचारले जात आहे, त्याचे काय उत्तर दिले जात आहे नि त्याधारित कृतींचा काय परिणाम होत आहे याला जबाबदार नसेल.

Book traversal links for कामाचे आणि बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग २

  • ‹ कामाचे बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग १
  • Up

प्रतिक्रिया द्या
49340 वाचन

💬 प्रतिसाद (149)
ब
बॅटमॅन Tue, 11/25/2014 - 09:34 नवीन
देवनागरीतला मजकूरही ठळक झालाय की. कोड काम करतोय म्हणजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Tue, 11/25/2014 - 11:43 नवीन
माझ्या मोबाईलवर दे॰ ठळक दिसत नाही म्हणून तसा समज झाला होता. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कंजूस Tue, 11/25/2014 - 09:12 नवीन
HTML आणि CSS चे धडे वाचा.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 11/25/2014 - 10:55 नवीन
लिंक द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Tue, 11/25/2014 - 12:31 नवीन
w3schoolsया साईटवरचे फक्त HTMLआणि CSS Tutorials वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
A
arunjoshi123 Tue, 11/25/2014 - 11:13 नवीन
अहो, मी ओपनसोर्स सॉफ्टवेअरची (कोडींग लँग्वेजचीच) मालकी कुणाची असते असा प्रश्न विचारला आहे. आता एच टी एम एल चे आज जे काही स्ट्रक्चर आहे त्यात समजा एक बदल करायचा आहे (समजा एक नवे फंक्शन टाकायचे आहे किंवा नवी व्हेरियेबलची टाईप टाकायची आहे किंवा तसलं काहीही. व्हीबी ५ आणि व्हीबी ६ मधल्या फरकांसारखे फरक करायचे आहेत)तर कोण करतं. तो बदल नक्की कसा करावा (म्हणजे नव्या फंक्शनचे नाव अ ठेवायचे का ब, इ इ ) यात "लोकांत" दुमत असले तर शेवटी कोणाच्या म्हणण्याप्रमाणे बदल होतो? उदा. अँड्रॉईडची वर्जन्स आहेत. नवे वर्जन कोण आणते? कि ओपनसोर्स मधला ओपन भाग सिमित असतो नि बाकीचा कॉपीरायटेड असतो? ओपनसोर्स आहे म्हणून मी उद्या च्या जागी असा प्रोग्रामिंग लँग्वेजमधेच बदल करू शकतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Tue, 11/25/2014 - 12:11 नवीन
१)एचटीएमेल चे जे स्टैँडर्ड रेफ्रन्स WCमध्ये मान्य झालेले असतात तेच क्रोम, आइइ, ऑपरा इ॰ ब्राउजरकडून अमलात आणले जातील/जातात आणि त्यातली 'एलमेंटस' ओळखली जातील. आता तुमची नवीन एलमेंटस ब्राउजर ओळखतील आणि त्या आज्ञा अमलात आणतील असं तुम्हाला वाटतंय का ? बरोबर ? २)AOSP =हे ANDROID चे सध्या जेलिबिन नवीनतम अवतरण आहे . हेच ओपन सोर्स वापरून नोकिआने android वर चालणारे X सिअरिज फोन बनवले आहेत परंतू गुगलने काही हातचे राखून ठेवले आहे ते रॉईल्टि दिल्याशिवाय नाही मिळणार.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 11/26/2014 - 19:21 नवीन
गुगलने काही हातचे राखून ठेवले आहे
हेही जाणायचे होते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
A
arunjoshi123 Wed, 11/26/2014 - 09:25 नवीन
१. सोन्यावर व्हॅट आहे का? महाराष्ट्रात किती % आहे? प्रतिष्ठित रजिस्टर्ड व्यापारी आणि काळा व्यवहार करणारे किरकोळ व्यापारी यांच्या दरांत इतका फरक असतो का? २. सध्याला कस्टम ड्यूटी आहे का? किती? कोणकोणत्या परदेशांतून सोने आणले तर ही ड्यूटी द्यावी लागणार नाही? साधारणपणे कायदेशीरपणे परदेशी भेट देणारा माणूस असे किती सोने विना-ड्यूटी आणू शकतो? ३. महाराष्ट्रात दागीन्यांचे सोने किती कॅरेटचे असते? हा कॅरेट प्रेफरन्स प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो असे आहे का? पूर्वोत्तर भारतात जवळजवळ २४ कॅरेटचे दागीने बनतात म्हणे. किती किती कॅरेटचे सोने ग्राहकांत कॉमन आहे? ४. गुंतवणूकीचे सोने (घरी ठेवायला घेतात ते बिस्किट) २४ कॅरेटचेच असते का? त्यावर शून्य मेकिंग चार्ज असतो का? ५. स्फटिक चिटकावलेले असताना त्यात सोने किती आहे हे कसे वजन करतात? ६. दागीने बनवण्यासाठी किती शुद्धतेच्या अधिकची शुद्धता चालत नाही. ७. मेकिंग चार्जेस किती % असतात. दागीना बनवणे किती अवघड आहे (डिजाईन किती कठीण आहे) यावर ते अवलंबून असते काय? ८. दुकानात मेकींग चार्ज घेतात. मित्रांकडून घेताना (ती डिजाईन मोडून दुसरी बनवायची असेल तर, इ) घेतात का? ९. तोळ्यात किती ग्राम असतात हे देखिल राज्यागणिक बदलते का? कुठे कुठे ११.क्ष ग्रामचा तोळा असतो म्हणे. १०. गुंतवणूक करायची असल्यास बिस्किटे घेऊन बँकेत व्याजी "डिपॉझिट" म्हणून ठेवता येतात काय? ११. सोने किती कॅरेटचे आहे हे ओळखायची शास्त्रीय पद्धत काय? कारण ते दुकानदाराला लगेच करावे लागते कोणी सोने विकण्यासाठी आणल्यास. १२. मेकिंग चार्जेस वजा जाता सोने खरेदी आणि विक्रीचा दर यांत फरक असतो काय? १३. हॉलमार्क, इ जिथे आहे तो भाग खराब करून सोन्याची विश्वासार्हता घालवता येते का? १४. सोने शुद्ध (म्हणजे सांगीतलेल्या कॅरेटचेच) आहे हे कळायचा ग्राहकासाठी मार्ग काय? १५. सोन्याच्या कॅरेटप्रमाणे त्याच्या कांतीत फरक पडतो काय? तो दिसू, भासू शकतो इतपत असतो का? १६. सोन्याचे भाव कडकायचा विशिष्ट महिना भारतात आहे काय? १७. कोणकोणते इतर बाजार त्यांच्या इंट्रिंसिक कारणांमुळे पडले तर सोन्याचा भाव वाढतो? १८. भारतात सध्याला सोन्याची एकही चालू खाण नाही काय? १९. सोन्याचे आयसोटोप्स असतात का? २० @ स्त्रीया - सोने न आवडणार्‍या स्त्रीया नगण्य मानता येतील काय? २१ @ ज्यांना सोने आवडते त्या स्त्रीया - तुम्हाला काय आवडते - सोन्याचे मूल्य कि रूप?
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 11/27/2014 - 09:36 नवीन
तुमच्या "२१ अपेक्षित प्रश्नसंच" चे उत्तर मी देवु शकेन अस वाटतय. कारण मी त्याच क्षेत्रात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 11/27/2014 - 10:08 नवीन
भाऊसाहेब, सोनेखरेदीची कितीतरी अंगे देखिल आम्हाला ठाऊक नसावीत. कृपया चांगलंस उत्तर द्या ना वेळ काढून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अजया Wed, 11/26/2014 - 10:21 नवीन
२१@स्त्रीया.. तुम्हाला सोनं घालतात त्या स्त्रीया अावडतात का लिहिलंय की काय वाटलं एकदम वाचताना!! तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर-सोन्याचे रूप आणि त्या रुपात दिसणारे मूल्य ^_~
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 11/26/2014 - 16:16 नवीन
प्रश्न वजनदार आहेत आणि हलके घ्या सांगता !
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 11/26/2014 - 19:20 नवीन
भौतिकशास्त्राच्या (आणि कामशास्त्राच्या सुद्धा बहुतेक ;) ) नियमांप्रमाणे वजनदार गोष्टी हलक्याने घेता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ए
एस Wed, 11/26/2014 - 18:40 नवीन
मराठी आंतरजालावरील पहिला (शोधला गेलेलाच अर्थात !) डुआयडी कोणता होता?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 11/27/2014 - 00:13 नवीन
आंजाचं माहीत नाही, पण पहिला ज्ञात डू आयडी मारीच राक्षस असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/27/2014 - 07:56 नवीन
तो की गौतम ऋषींचे रूप घेऊन आलेला इंद्र ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/27/2014 - 09:03 नवीन
समुद्र मंथनाच्या वेळचे विसरला काय? :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/27/2014 - 09:53 नवीन
मोहिनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/27/2014 - 09:58 नवीन
हा :) पण मोहिनी आधी का राहू-केतू आधी???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/27/2014 - 10:00 नवीन
पण तेव्हा सुध्धा "कुर्म" अवतार होताच ना...आणि मस्य अवतार त्याच्याही आधी...चायला किती वेरिएशनस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
थ
थॉर माणूस गुरुवार, 11/27/2014 - 10:21 नवीन
अवतार वेगळा आणि डूआयडी वेगळा ना? अवतार कुणाचा हे माहिती असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/27/2014 - 11:01 नवीन
तेही खरंच म्हणा. अन तसे पाहिले तर आपण सर्व त्या एका परमात्म्याचे डुआयडी आहोत. - इंहभप (इंटरनेट हभप) ब्याटामहाराज गॉथमकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
क
कंजूस गुरुवार, 11/27/2014 - 14:17 नवीन
१)डुआइडी का घेतात ?काही सुप्त इच्छापूर्ती असते का ? २)एक वेगळ्या रूपात लोकांसमोर यावं म्हणून अधिकृत आइडी घेऊ शकतो का ?उद्या समजा 'उदार' होऊन ( ते जरा कठीणच आहे म्हणा )लिहायचे ठरवले तर होता येईल का ?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 11/28/2014 - 07:59 नवीन
पीसीसाठी सर्वात उत्तम ऑडिओ, व्हिडीओ प्लेअर कोणता? उत्तम म्हणजे प्लेअर मुळेच आवाजाच्या, फितीच्या प्रतीत फरक पडत असेल तर तसा. शिवाय प्रत्येक प्रकारचे संगीत, चित्रफित ऐकण्यासाठी लेमॅनसाठी सेटींग्ज कळायला अत्यंत सुलभ. इतरत्र नसलेली फिचर्स असलेला. भारतीयांसाठी वेगळे काही असेल तर उत्तमच.
  • Log in or register to post comments
अ
असंका Sat, 12/06/2014 - 10:57 नवीन
"Downloading Do Not Turn Off Target" हा मेसेज किती वेळ दिसत राहू शकतो? हा मेसेज माझ्या फोनवर गेले बारा तास दिसत असून मी कंटाळून गेलो आहे. यातील टारगेट म्ह्णजे नक्की काय? PC की फोन?
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 12/06/2014 - 16:07 नवीन
१२ तास काय डाऊनलोड करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Sat, 12/06/2014 - 16:36 नवीन
बहुतेक ४९९ mb ची android upgrade file असेल. पण नक्की कोण काय आणि कुठे डाऊनलोड करत आहे तेच कळत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विजुभाऊ Sat, 12/06/2014 - 12:16 नवीन
एक प्रश्न आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्या वेळेस वर्ल्डकप ची ओरीजनल ट्रॉफी ही मुम्बै कस्टम्स मधे ड्यूटी न भरल्या मुळे अडकून पडली होती अशा बातम्या होत्या. त्या मूळ ओरीजीनल ट्रॉफीचे नंतर काय झाले? ती कुठे आहे? http://indiatoday.intoday.in/story/india-vs-sri-lanka-world-cup-final-icc-trophy-lifted-by-team-india-is-a-fake/1/134246.html
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 01/30/2017 - 11:03 नवीन
१. कचाट्यात सापडणे आणि तावडीत सापडणे या वाक्प्रचारांतील कचाटा आणि तावड हे काय आहे? २. प्रश्न धसास लावणे किंवा तडीस नेणे या वाक्प्रचारातील धस आणि तड काय आहे? -(मराठीतील वाक्प्रचार आणि म्हणी या कृषीसंस्कृतीत फुलून आलेल्या आहेत. तेव्हा या शब्दांचादेखील उदगम शेतीत वापरल्या जाणार्‍या अवजारांत असेल का? ) ३. आलबेल हा शब्द ऑल वेल यावरून आला का? तसेच नीट ह्या शब्दाचे देखील तसेच आहे का?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 01/30/2017 - 11:55 नवीन
१. कचाट्यात सापडणे आणि तावडीत सापडणे या वाक्प्रचारांतील कचाटा आणि तावड हे काय आहे?
दाते-कर्वे कोशातून तावडी—स्त्री. १ (गुजराथेंत रूढ) नर्मदेच्या कांठीं ज्या ठिकाणीं नर्मदा ओलांडतात तेथें टेकडीवर असलेली धर्मशाळा, चौकी. ज्या तावडींत नावडी राहतात तिला नावडातावडी म्हण- तात. २ (ल.) तावड; अधीनता; पकड; कबजा. ३ (ल.) कचाटा; तडाखा; सपाटा. हल्लीं हा मूळ शब्द प्रचारांतून गेला आहें. मात्र यापासून बनलेले तावडींत, तावडीस, तावडींतून हें शब्द प्रचारांत आहेत. -डींतून- क्रिवि. (एखाद्याच्या) ताडाख्यांतून; कचाट्या- तून; पकडींतून. (क्रि॰ सुटणें; निघणें). तावडींत, तावडीस- क्रिवि. कचाट्यांत; सपाट्यांत; पकडींत;तडाख्यांत. (क्रि॰ सांपडणें; पडणें). 'शत्रूच्या तावडीस सांपडलों तो काय करील तें करो.' धरणें, आणणें याशब्दाबरोबर कर्तरीप्रयोग होतो. जसें:- मी शत्रूस माझ्या तवडीस आणलें, धरलें.
प्रश्न धसास लावणे
दाते-कर्वे धस म्हणजे कडा/कपार हा अर्थ योग्य वाटतो. तसंच "तडीस नेणे" : तड हा तट्चा अपभ्रंश असावा.
३. आलबेल हा शब्द ऑल वेल यावरून आला का? तसेच नीट ह्या शब्दाचे देखील तसेच आहे का?
आलबेल सरळसरळ ऑल वेलचा अपभ्रंश आहे. पण नीट हा कानडी नेट्टगे (म्हणजे सरळ) वरून मराठीत आलेला आहे. इंग्रजी neat शी संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Mon, 01/30/2017 - 13:58 नवीन
आबा, माहितीबद्दल आभार. अश्या अनेक शब्दांबद्दल, वाक्प्रचारांबद्दल, म्हणींबद्दल शंका आहेत. आता दाते आणि मोल्सवर्थ कोश चाळून पाहीन. नीटबद्दल तसं वाटायचं कारण म्हणजे, अर्थांतील आश्चर्यकारक साम्य. अवांतरः परवा चौकशी या शब्दाबद्दल फेबूवर खूप छान माहिती मिळाली. काय, कसे, कोणी आणि याची परिणती काय(नक्की हेच चार कस का, याबाबत जरा संभ्रम आहे) असे चार कस कोणत्याही गोष्टीला लावणे म्हणजे चौकशी करणे होय. तिथे पोस्टलेखकाने श्री. बा. जोशी यांच्या 'गंगाजळी भाग १-४' आणि 'उत्तम मध्यम' या पुस्तकांचा उल्लेख केला होता आणि ही माहिती या पुस्तकांतून मिळाली असे लिहिले होते. आता ही पुस्तके वाचावी लागतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 01/30/2017 - 14:47 नवीन
हो - श्री बा जोशी सकाळमध्ये "गंगाजळी" नावाचं सदर लिहायचे. फार छान असायचं. खरा इंटरडिसिप्लिनरी विचार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Tue, 01/31/2017 - 06:54 नवीन
हो, त्याच लेखांचे संग्रह आहेत. राजीव सानेदेखील तशाच प्रकारचे वाटतात मला.. त्यांची गल्लत गफलत गहजब ही लोकसत्तेतील लेखमाला फार आवडलेली, पुस्तकदेखील संग्रही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
र
राही Tue, 01/31/2017 - 10:22 नवीन
9) To burst or push through; to force a passage through obstruction: also to pierce, penetrate, or sink into suddenly... 10) धसणें (p. 249) dhasaṇēṃ v c P (धस!) To ram or drive (in, down, onwards, home). -दाते-कर्वे. धस, धसकट म्हणजे अर्थात धान्य कापून उरलेला बुडखा, गवताची तीक्ष्ण काडी, कूस एकंदरीत या शब्दात बळजबरीने, आडदाण्डपणाने निकाल लावणे, असा 'अनर्थ' सुद्धा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
र
राही Tue, 01/31/2017 - 10:25 नवीन
वरील प्रतिसादातला संदर्भ मोल्स्वर्थ कोशातला आहे. दाते-कर्वेतला नव्हे. नजरचूक झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Tue, 01/31/2017 - 10:41 नवीन
तावडणे म्हणजे दामटणे, सक्तीने काम करून घेणे. सध्याही आपण ताबडणे, ताबडवून घेणे हे शब्द जुन्या अर्थानेच वापरतो. आवरी तावरी हे इथपर्यंत, तिथपर्यंत किंवा इकडे-तिकडे या अर्थाचे बोलीभाषेतले शब्द आहेत. तावडीचा अर्थ 'त्या तटी' 'तिकडे' असाही होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ख
खेडूत Tue, 02/07/2017 - 07:13 नवीन
इंग्रजी neat शी संबंध नाही.
असेच वाटते. माऊलींनी आनंदाचे डोही मधे 'बोलु जाता बरळ करीसी ते नीट' म्हटले आहे, ते इंग्रजीतले नीट खचितच नव्हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ख
खेडूत Tue, 02/07/2017 - 07:17 नवीन
दुरुस्ती: जेथे जातो तेथे या गाण्यात आहे- कदाचित तुकाराम महाराजांचाही असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
संदीप डांगे Tue, 02/07/2017 - 07:50 नवीन
तुकाराम महाराज, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.... बोलू जाता बरळ करीतसे नीट, गेली लाज धीट केलो देवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/30/2017 - 16:31 नवीन
आलबेल हा शब्द ऑल वेल यावरून आला का? ब्रिटिशांच्या काळात, पहारेकरी आवाराच्या टोकाला पोचला की त्याने दुसर्‍या पहारेकर्‍यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात "ऑल वेल" असे म्हणावे असा शिरस्ता होता. त्या ऑल वेलचे अपभ्रंशीत रुप म्हणजे "आलबेल". हे माझ्या लहाणपणी मोठ्यांच्या तोंडून ऐकले आहे. लेखी संदर्भ माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
R
Ranapratap Mon, 01/30/2017 - 14:10 नवीन
माझ्याकडे एच एम् टि चे जुने हातात बांधायचे घड्याळ आहे. सध्या बंद पडलेले आहे. दुरुस्त करून कुठे मिळेल.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 01/30/2017 - 16:09 नवीन
जिन्याखाली किंवा तशा अडचणीच्या ठिकाणी जे घड्याळवाले बसतात ते करतील. ठाण्याला पोंक्षे वॉच कं म्हणून गोखले रोडवर दुकान आहे ते करतील दुरुस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ranapratap
र
रानरेडा Tue, 08/08/2017 - 06:28 नवीन
आपण कोठे राहता ? मुंबईत गोरेगाव , खार किंवा चर्चगेट जवळ ?/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ranapratap
ग
गामा पैलवान Mon, 01/30/2017 - 22:37 नवीन
सौरा, कचपाश म्हणजे केसांचा फांस. त्यावरून कचाट्यात सापडणे म्हणजे केसांत अडकणे. हे केस बहुतेक भुताचे अथवा राक्षसाचे असावेत. किंवा केसाने गळा कापणे वगैरे उपमा असावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 01/31/2017 - 07:36 नवीन
गापै, धन्यवाद, हे केसांचा पाश घालणे हा काही तांत्रिक विधी असावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 01/31/2017 - 15:35 नवीन
सौर, तो असू शकतो. पण मला माहित नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
र
राही Tue, 01/31/2017 - 10:11 नवीन
कचाट हा देशी शब्द आहे. त्याचा अर्थ गोंधळ, गडबड, घोटाळा, लचांड असा आहे. दासबोधात कर्मकचाट हा शब्द आहे तर एकनाथी भागवतात कचाट आहे. (दाते-कर्वे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
र
राही Tue, 01/31/2017 - 06:04 नवीन
वरती कन्नड 'नेट्टगे'चा उल्लेख आला आहे. आपल्याकडे अगदी असाच 'नेटके' हा शब्द आहे आणि 'नीटनेटके' असा जोडशब्दही आहे.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 01/31/2017 - 06:59 नवीन
हो, नेट्टगे> नेटके> नीट असा प्रवाह असावा. सरळसोट सारखंच नीटनेटका असा जोडशब्द नंतर वापरात आला असावा. मराठी म्हणी, वाक्प्रचारांचा स्वतंत्र असा कोश नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा