Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जागो ग्राहक जागो....

म
मोदक
Tue, 12/09/2014 - 09:38
🗣 107 प्रतिसाद
गृहकर्जाबाबत बँकेचे नियम यावरून या धाग्याची कल्पना सुचली.. आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने... या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील.. माझे [ सध्या लगेच आठवणारे ;) ] दोन अनुभव.. ***************************************************************** लै लै लै भारी समजली जाणारी अत्यंत हुच्चभ्रू अशी बँक. स्थळ: पुण्यापासून ३५० किमी दूर - महाराष्ट्रातच. दिवस: बुधवार - कोणताही पब्लीक हॉलीडे नाही. वेळ: दुपारी १:०० मी ज्या पार्टीसोबत होतो त्यांचे या बँकेत व्यावसायीक करंट अकाऊंट आहे आणि त्यावर नेहमी भरभक्कम व्यवहार होतात. "Any Branch Banking" हा टॅगही असल्याने त्या बँकेच्या कोणत्याही बँकेत कितीही रकमेचे व्यवहार विनासायास होतात. अर्थात मोठी रक्कम काढावयाची असेल तर बँकेला आधी पूर्वसूचना देणे आवश्यक असते मात्र हा व्यवहार पैसे खात्यात भरावयाचा होता. बँकेत प्रवेश करून कॅशीयरच्या लाईनीत उभारणे, त्या दरम्यान नोटांचे विवरण तयार करणे व डिपॉझीट स्लिप भरणे वगैरे सोपस्कार पार पडले. कॅशीयर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.. थांबा साहेबांना विचारतो.. साहेब (असिस्टंट मॅनेजर) : तुमची कॅश स्वीकारता येणार नाही. मी : कारण कळेल का..? असिस्टंट मॅनेजर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये. मी : हरकत नाही साहेब.. एनी ब्रँच बँकींग आहे. असिस्टंट मॅनेजर : तरीपण घेवू शकत नाही. मी : तुमच्या मॅनेजरला बोलवा. असिस्टंट मॅनेजर : साहेब रजेवर आहेत. मीच मॅनेजर आहे आज. कॅश घेता येणार नाही. मी : नियम बघा.. घेता येते. मी महाराष्ट्रात सगळीकडे भरतो. व्यवहार बघा तुमच्या सिस्टीममध्ये.. आणि गावांची नावे बघा. असिस्टंट मॅनेजर : नाही घेणार. (आम्ही एकदम गोंधळून गेलो होतो) आता सोबतच्याने रिंगणात प्रवेश केला.. अहो साहेब.. आमचेच अकाऊंट आहे... सगळीकडे कॅश घेतात... असिस्टंट मॅनेजर : (बोलणे मध्येच तोडून आणि अत्यंत उद्धट सुरात..) अहो तुम्हाला सांगीतले आहे ते कळतेय का..? कॅश घेणार नाही.. आता दोघांचेही फ्युज गेले.. मी : ओ भाषा सुधारा.. सोबतचा : ओ तुम्हाला हे जड जाईल.. लेखी द्या कॅश देत नाही म्हणून. असिस्टंट मॅनेजर : लेखी देणार नाही. काय करायचे ते करा. मग आम्ही क्यू सोडला. आमच्याकडच्या एका कागदावर सगळा प्रसंग लिहून काढला आणि यावर अ‍ॅक्नॉलेजमेंटची सही द्या अन्यथा आमच्या अकाऊंटला एक रिलेशनशिप मॅनेजर असाईन्ड आहे त्याला कॉल करतो असा दम दिला. तो मॅनेजर सही देईल याची खात्री नव्हती कारण तशी सही देणे म्हणजे त्याने स्वत:च्या पंचनाम्यावर सही करण्यासारखे होते. पण साहेबांनी सही दिली. आम्ही धावपळ करून दुसरी ब्रँच शोधली व पैसे भरले. नंतर हे सगळे प्रकरण आणि त्या पत्राची प्रत cgmcsd@rbi.org.in या रिझर्व बँकेच्या ओम्बुड्समन \ कस्टमर केअरला पाठवली. बँकेने विनाअट त्वरीत लेखी माफी मागीतली व त्या असिस्टंट मॅनेजर साहेबांची त्याठिकाणाहून २५० किमी दूर एका ब्रँचमध्ये "बॅक ऑफिस" ला बदली केली. आता त्या ठिकाणी आमचे पैसे विनातक्रार स्वीकारतात. ***************************************************************** ऑफिसमध्ये कामात बुडलेल्या अवस्थेत असताना अचानक फोन वाजला.. टेलीकॉलर -(मंजुळ सुरात..) मोदक सर बोलताय का..? मी: हो. टेलीकॉलर : मी ** सर्विसमधून बोलत आहे.. तुम्हाला कार घ्यायची आहे का..? तुमचे XXXX बँकेसोबत होम लोन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगले इंटरेस्ट रेट देवू शकतो आणि अशी अशी ऑफर आहे.. तुम्हाला इंटरेस्ट आहे का..? (हे सगळे एका दमात) मी : (मनातल्य मनात) $%#^& हिला कसे कळाले माझे होम लोन आहे आणि ते पण या बँकेत..!!!! मी: (तिला घोळात घेत) मॅडम मला SX4 घ्यायची आहे. बोला.. आणि साधारणपणे १५ मिनीटांच्या चर्चेनंतर मला हवी ती माहिती कळाली. त्या सेल्सवालीचे नांव, तिच्या मॅनेजरचे नांव आणि सर्वात महत्वाचे बँकेच्या ज्या मॅनेजरने ही माहिती दिली त्याचे नांव. मग एक सुस्पष्ट असा मेल लिहिला. Subject: Complaint - Sharing Personal Details with Third Party. Hello, This is मोदक - My customer ID is १२३४५६७८९. Today morning I got a call from a Maruti Automobile dealer "***" from Fugewadi Pune, asking for any requirement for Auto Loan. I was assured lucrative interest rate since I am a prevailed customer of XXXX Bank. I was shocked to know that caller (Ms. XXXX from number +91-00000 00000) was referring to my home loan and my association with XXXX Bank. After demanding more information on 'my details available at their end' I got to know that "XXXX Has provided these details to her supervisor, Mr XXXX " and they have got data set for around 200 XXXX Home Loan customers. Therefore I would like to know, Is it legitimate to share Loan details / Personal details / Contact number with third party..? If not - I request a thorough investigation as to "Why personal details were made available to third party" I am really disappointed that such incident have taken place even after my contact number is registered for DND. Please feel free to revert in case any information required from my side. Regards, मोदक. नंतर त्या बँक मॅनेजरचा फोन आला.. त्यांनी असे फोन परत येणार नाहीत याची खात्री दिली आणि तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहोत अशी माफी मागितली मारूतीच्या शोरूममधून ज्या मुलीने फोन केला तिने माफी मागावी अशी अपेक्षा आहे का..? असेही विचारले या गोष्टीस मी नकार दिला कारण माझे काम झालेले होते. मला आजतागायत पुन्हा त्या शोरूम मधून किंवा कोणत्याही ठिकाणाहून Home Loan च्या रेफरन्सने फोन आलेले नाहीत. ***************************************************************** या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील.. *****************************************************************

प्रतिक्रिया द्या
69296 वाचन

💬 प्रतिसाद (107)
त
त्रिवेणी Tue, 12/09/2014 - 09:56 नवीन
चांगला धागा आहे. आपल्या सगळ्यांना फायदा होईल.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 12/09/2014 - 10:03 नवीन
वा.खू. साठवलेली आहे :)
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 12/09/2014 - 12:15 नवीन
खरोखर चांगला धागा आहे. असा फोन आला तर उपयोग होईल. एकदा मी ICICI च्या एका ब्रॅंचमध्ये काही कारणासाठी माझा customer ID दिला. त्या माणसाने आणखी एकाला बोलावून मला न विचारता माझे details दाखवले. माझ्या काही Transactions पाहून त्यांना मी कोठले क्रेडीट कार्ड वापरतोय व माझे ग्रुह कर्ज कोठले आहे ते त्यांना कळले. त्या दोघांनी लगेच माझा ताबा घेतला. मी ज्या कामासाठी आलो होतो ते बाजूला सारून मी ह्या क्रेडीट कार्ड ऐवजी ICICI क्रेडीट कार्ड व होम लोन चेंज करा वगैरे मागे लागले. मी शांतपणे उठून तडक तिथल्या मॅनेजरकडे गेलो आणि तक्रार केली. मॅनेजरने माझ्यासमोर दोघांना झाडल्यासारखे केले. कारण काही दिवसांनी तोच प्रकार दिसून आला. आजकाल HDFC, ICICI ब्रँच मध्ये जाणे मुश्किल झाले आहे. एका कामासाठी जायचे म्हणले तर तेथील शिपायापासून प्रत्येकजण insurance, credit card, personal or home loan या साठी मागे लागतो.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 12/09/2014 - 14:59 नवीन
तेथील शिपायापासून प्रत्येकजण insurance, credit card, personal or home loan या साठी मागे लागतो अशावेळी न विसरता आपल्याला दिली गेलेली आश्वासने ती आश्वासने देणार्‍यासमोरच एका कागदावर लिहून काढावीत व त्यावर त्याचे नांव, गळ्यात बॅज असेल तर एम्प्लॉयी आयडी, फोन नंबर आणि त्याच्या दोन किंवा तीन लेव्हल वरच्या मॅनेजरचे नांव, हुद्दा (रिजनल मॅनेजर / सेल्स मॅनेजर / एरीया मॅनेजर) आणि फोन नंबर घ्यावा. वरच्या मॅनेजरचे नांव आपल्याकडे असल्याने मिळालेली आश्वासने कन्फर्म करता येतात. सेल्स करणारे किराणा दुकानातली मुले काम सोडतात तसे काम सोडू शकतात कारण बहुतेकदा ते बँकेच्या पे रोल वर नसतात - ते एखाद्या DSA - Direct Sales Associate किंवा DST - Direct Sales Team कडून काँट्रॅक्टवर काम करत असतात. गळ्यात बॅज असला तरी तो "रिप्रेझेंटिटीव्ह" चा बॅज असतो - बँक अशा लोकांच्या बाबतीत कधीही हात वर करू शकते जर शंका असेल तर बिन्धास्त त्या मॅनेजरला फोनवावे आणि माहिती विचारावी. हे फोन रेकॉर्ड करून ठेवावेत. आजच्या Dogs Fight मध्ये सेल्स मॅनेजर कधीही "मला का फोन केला..?" किंवा "मी का माहिती देवू..?" असे म्हणणार नाही याची खात्री बाळगावी. आपणच नीट काळजी घेतली तर फसवणूक होण्याशी शक्यता खूप कमी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
स
सामान्यनागरिक Wed, 12/10/2014 - 06:06 नवीन
आपण सांगीतलेल्या ठिकाणी मलाही हाच अनुभव आला. माझ्या होम लोनचे काम करण्यासाठी एक इन्शुरन्स प्~ओलिसी मला जबरदस्तीने घ्यायला लावली. कधी एकदा ती सरेन्डर करुन माझे पैसे काढते असे झाले आहे. आणि आपल्या कस्टमरची माहिती तर ते सर्रास सगळ्यांना देतात. हल्लीतर लोन घेतांना कागद पत्रात एक अट असते की जरुर पडल्यास ते आपली महिती त्यांच्या कोणत्याही एजन्सी कडे देतील. मग हे लोक सर्रास कोणत्याही कारणासाट्।ई फोन करु लागतात. ट्राय कडे अशी सूचना करायला हवी की असे फोन आले की त्यांच्या आफिसात जाऊन त्यांना फटके मारण्याची परवानगी लोकांना द्यावी. असे गुन्हे पोलिसांनीही दाखल करुन घेऊ नयेत. तरच हे थांबेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
म
मराठी_माणूस Tue, 12/09/2014 - 12:27 नवीन
त्या असिस्टंट मॅनेजर साहेबांची त्याठिकाणाहून २५० किमी दूर एका ब्रँचमध्ये "बॅक ऑफिस" ला बदली केली.
आपली बदली अशा कारणामुळे झाली हे त्याला कळले का ?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/09/2014 - 14:08 नवीन
@आपली बदली अशा कारणामुळे झाली हे त्याला कळले का ?>> +++१११ छान धागा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मोदक Tue, 12/09/2014 - 14:23 नवीन
हो कळाले असणारच कारण नंतर त्याचाच मॅनेजर सॉरी सॉरी म्हणत होता... मी रजेवर होतो म्हणून असे झाले अन्यथा असे होत नाही वगैरे वगैरे. (वॉर्नींग देवून बदली केली हे त्याच्याच कडून कळाले!) आमच्या दॄष्टीने त्यावेळी आणि नंतर विनातक्रार सेवा मिळणे आवश्यक होते त्यामुळे त्या असिस्टंट मॅनेजरबाबत फारसा पाठपुरावा केला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ Tue, 12/09/2014 - 16:18 नवीन
मला आजतागायत हे समजलं नाही की एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या अकाऊंट असलेल्या शाखेव्यतिरिक्तच्या शाखांमध्ये का घेतली जात नाही. 'पणजी'च्या बँकेत माझ्या अकाऊंटला २ वेळा शिवाजीनगर ब्रँचला जाऊन पैसे भरावे लागले सिंहगड रोड ब्रेंच सोडून. बरेच लोक पैसे द्यायला नाटक करतात (सध्या ह्या अनुभवातून जातोय, ते वेगळं आहे) हे बँकवाले लोक घ्यायला पण नाटक करतात. काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. कुणी बँकेशी संबंधित व्यक्ती नक्की काय मुद्दा असतो साम्गेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 12/09/2014 - 16:28 नवीन
मला आजतागायत हे समजलं नाही की एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या अकाऊंट असलेल्या शाखेव्यतिरिक्तच्या शाखांमध्ये का घेतली जात नाही. मलाही हा प्रश्न पडतो पण एक खाते पगाराचे असल्याने हा प्रश्न पडत नाही कारण पगाराचा टॅग असल्याने कोठेही पैसे भरता येतात आणि IDBI बँकेमध्ये कोठेही कितीही पैसे भरता येतात असा अनुभव आहे. "पणजी"च्याच बँकेत "प्लॅटीनम कस्टमर" असा काहीतरी प्रकार आहे. आपण ठरावीक रकमेच्या फिक्स्ड डिपॉझीट्स ठेवल्या की तो टॅग मिळतो. कोठेही रांगेत उभे न राहता व्यवहार होतात, आपले खाते कोणत्याही शाखेमध्ये कसेही वापरता येते - ही माहिती २ वर्षांपूर्वीची आहे. सध्या पॉलीसी बदलली असल्यास कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 12/09/2014 - 16:34 नवीन
माझ्या पगारखात्यातच एका दिवसाला ५० ह. च्या वर पैसे घेतले जात नव्हते. २०११ ला घरासाठी केलेल्या काही उलाढालींतून आलेला अनुभव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Tue, 12/09/2014 - 19:10 नवीन
मोदक साहेब आपल्या खात्यात कोणीतरी रोख पैसे भरले आणि नंतर आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तर आपण त्याचा बचाव कसा करणार. अशा काही घटना सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्यामुळे बँका असा पवित्रा घेतात असे मला सायबर गुन्हे खात्यात काम करणाऱ्या पोलिस अधिकार्याने सांगितले होते. कोणत्याहि खात्यात चेक भरलेला चालतो कारण चेकचा आगापीछा काढता येतो. कितपत सत्य आहे माहित नाही पण तर्कसंगत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Tue, 12/09/2014 - 19:11 नवीन
अर्थात स्वताच्या खात्यात पैसे भरायला काय आडकाठी असावी ते कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक Wed, 12/10/2014 - 08:00 नवीन
अर्थात स्वताच्या खात्यात पैसे भरायला काय आडकाठी असावी ते कळले नाही. प्यारेकाकांचा आणि माझाही हाच मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/10/2014 - 08:07 नवीन
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे. मात्र ओळख न पटवता खात्यात पैसे भरण्याला आडकाठी करणे हे बँकेचे कर्तव्य आहे आणि तसे करणे खातेदाराच्या भल्याचेच आहे. हल्ली दुसर्‍याच्या खात्यात रोख पैसे भरताना (उदा. भाडेकरूने मालकाच्या खात्यात घरभाड्याचे पैसे भरताना) रक्कम फार मोठी नसली तरी हे पैसे कोण भरत आहे व का भरले जात आहेत याचे कारण लिखीत स्वरूपात मागितलेले पाहिले आहे. यामागे खातेदाराची सुरक्षा आहे हे मात्र खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 12/10/2014 - 08:52 नवीन
स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे. स्वतःची ओळख फोटोआयडी प्रूफ देउनही बँकेने स्वतःच्या खात्यात पैसे भरण्यास मनाई केल्यास ते चूक आहे. येथे प्यारे काकांचे स्वत:चे पगारखाते आहे परंतु होम ब्रँच मध्ये पैसे भरावयाचे नसून त्याच बँकेच्या वेगळ्या ब्रँचमध्ये पैसे भरण्यास परवानगी मिळाली नाही. याबाबतचा नेमका नियम कोणाला माहिती आहे का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
असंका गुरुवार, 12/11/2014 - 04:12 नवीन
कॅश घेण्यापासून ते सुरक्षित ठेवण्यापर्यंत अनेक कारणांनी बँकांना 'कॅश' व्यवहारात वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. जसे कॅश मोजणे, खोट्या नोटा ओळखणे, खोट्या नोटांची विल्हेवाट (!) लावणे, खर्‍या नोटांची बंडले बांधणे (याला आता पिन लावू देत नाहीत, त्यामुळे धोका वाढतो असे सगळे कॅशियर मानतात), कॅश ही दिवस अखेर शाखेला घालून दिलेल्या मर्यादेत (cash retention limit) राहिल हे बघणे- कारण अ. धोका ब. इंशुरन्स क. बॅंकेत शिल्लक पैशावर बँकेला कसलेही उत्पन्न मिळत नाही,- हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि जितकी जास्त शिल्लक कॅश तितके दिवस संपतानाचे काम जास्त. शिवाय हे सगळे काम बँकेच्या स्वतःच्या कर्मचार्‍यांनाच करावे लागते. याविरूद्ध चेकच्या बाबतीत ऑटोमेशन हे फार सुलभ आहे. MICR क्लिअरींग उपलब्ध असल्याने, मोठमोठ्या रकमा अगदी काही कळा दाबून खात्यात जमा होतात. पाचेक वर्षांपूर्वी तरी प्रायव्हेट बँका हे सगळे काम सरळ आऊटसोर्स करायच्या- आताचे माहित नाही. CTS किंवा चेक ट्रंकेशन सिस्टीम आल्यापासनं आता ते आणखी वेगवान आणि सुरक्षित झाले आहे. त्यामुळे बॅंका कॅशपेक्षा चेकला प्राधान्य देतात. आता प्रश्न आहे की दुसर्‍या शाखेत चेक भरले तर चालते, कॅश नाही. माझ्या मते बॅंका कॅश व्यवहार करून नका असे म्ह्णत नाहीत. फक्त कॅश व्यवहार करण्यासाठी जास्त चार्जेस लावू असे म्हणतात.सर्व्हिस चार्जेस चे सर्क्युलर मागवा आपल्या बँकेचे. त्यात सगळं स्पष्ट लिहिले असते. जर शाखेने नाही दिले तर वेबसाइटवर नक्कीच मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
असंका गुरुवार, 12/11/2014 - 04:30 नवीन
पगार खात्याचे म्हणताल तर नक्की माहित नाही, पण झीरो बॅलन्स वगैरे काही जास्तीच्या सुविधा त्या खात्यासाठी दिल्या असाव्यात. पगार खाते हे टेलर्ड प्रॉडक्ट आहे. त्यात costing करताना पगार हा सरळ खात्यावर जमा होणार असे गृहित असते. कॅश डीपॉझिट घेणे हा त्या खात्यासाठी बँकेला करावा लागणारा वाढीव खर्च होइल. एका मर्यादेवर अशी सुविधा देता येत नसावी.(शिवाय त्या पैशाचा उगम काय हे बघणे (-बघणे- तपासणे नव्हे!)बंधनकारक केले आहे- कारण ज्ञात उगम हा पगार आहे. कॅश भरली तर पगार खात्यात त्याचा उगम अज्ञात असेल. अँटी मनी लाँडरींगचे नियम)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
स
सुबोध खरे गुरुवार, 12/11/2014 - 06:17 नवीन
कंफ्युज्ड अकौंटंट साहेब पगाराच्या खात्यावर झीरो बॅलन्स वगैरे काही जास्तीच्या सुविधा बँक देते त्या काही उपकार म्हणून नाही तर पगाराचे पैसे दर महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या खात्यात पडतात पण ते पैसे फक्त गरजेनुसार काढले जातात त्यामुळे बँकेला हे पैसे ४ टक्के व्याजाने वापरायला मिळतात. लोकांचे असे लक्षावधी रुपये बँका वापरत असतात म्हणूनच आमच्या बँकेत पगाराचे खाते उघडा म्हणून त्यांचे एजंट लोकांच्या मागे लागलेले असतात. मी लष्करी सेवेत असताना आय डी बी आय, आय सी आय सी आय आणी कोटक महिंद्र बँकेच्या एझाण्टाणी माझ्या मागे फार धोशा लावला होता. मी त्यांना एकाच विचारले कि मी माझे एच डी एफ सी चे पगाराचे खाते सोडून तुमच्याकडे का यावे? हे फायदे नसते तर बँका तुम्हाला फुकट क्रेडीट कार्ड, फुकट डिमांड ड्राफ्ट, पगार इतका ओव्हर ड्राफ्ट अशा सुविधा का देतील? कॅश डीपॉझिट घेणे हा त्या खात्यासाठी बँकेला करावा लागणारा वाढीव खर्च होइल. जर बँक हे काम करत नसेल तर बँक आहे कशासाठी? शिवाय आलेला पैसा बँक वापरणारच त्यासाठी आम्हाला कष्ट होतात असे म्हणणार असतील तर बँका हव्यातच कशाला?आणी त्यांचे कर्मचारी पगार कशाचा घेतात? जर हि मुलभूत सुविधा माझ्या पगाराच्या खात्याला मिळणार नसेल तर बँकेचा उपयोग काय? राहिली गोष्ट माझ्या खात्यात पैसा भरण्यासाठी मी कुठून आणतो हे पाहणे बँकेचे काम नाही. ते आयकर खात्याचे आहे. आपण आपल्याला दिलेल्या कामापेक्षा दुसर्याचे काम का पाहावे? उलट मी जर पैसे भरतो आहे म्हणजे हे पैसे काळे नाहीत हेच सिद्ध होते. (ते मी तिजोरीत न ठेवता बँकेत भरत आहे). मला यात बँकेच्या कर्मचाऱ्यांचा काम टाळण्याकडे कल आहे असे वाटते आपल्या प्रतिसादाचा सूर बँका तुमच्या वर उपकार करीत आहेत असा वाटतो. कोणीच कुणावर उपकार करीत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
ह
हाडक्या गुरुवार, 12/11/2014 - 12:00 नवीन
+१०० .. खरे साहेब..
कोणीच कुणावर उपकार करीत नाहीत.
हे अगदी खरेय. आपल्याकडे सरकारी बँकांनी असा समज करुन दिलाय(घेतलाय) की ते लोकांवर उपकारच करत आहेत. दुर्दैवाने हे अजून बर्‍याच ठिकाणी दिसून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
असंका गुरुवार, 12/11/2014 - 12:10 नवीन
याचे उत्तर खाली देत आहे. इथे जागा पुरेशी नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पैसा गुरुवार, 12/11/2014 - 12:57 नवीन
५० हजारच्या वरच्या रकमेच्या रोखीच्या व्यवहारांची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवणे बँकाना बंधनकारक असते. त्यासाठी बँकेला फक्त तुमचे नाव माहित असून उपयोग नाही तर पॅन नंबरही आवश्यक असतो. पॅन कार्डाची कॉपी सोबत घेऊन गेलात तर पैसे घ्यायला नकार मिळू नये. होम ब्रँच सोडून इतर शाखांमधे बचत खात्याचे पैसे भरणे काढणे याला बहुतेक बँकांची मर्यादा ठरवलेली असते. तसेच १०० हून कमी डिनॉमिनेशनच्या नोटांमधे पैसे भरले तर त्यासाठीही सर्व्हिस चार्जेस असतात. (याचं कारण असं की समजा तुम्ही १० रुपयाची ५० बंडले ५०००० म्हणून भरलीत तर कॅशियरला ते पैसे मोजायला सुमारे एक तास लागेल. त्याचा एका तासाचा पगार विचारात घेतला तर असे ५०००० घेण्यात बँकेचे नुकसानच होते. त्याऐवजी ५०० रुपयांचे एक बंडल १ मिनिटात मोजून होते.) कॅश अवर्स संपायच्या आतच पैसे भरायला हवेत. कारण सगळे हिशेब पुरे करून कॅश मोजून टॅली करून डबल लॉकमधे ठेवायला बँक कर्मचार्‍यांना जेमतेम एक तास हातात मिळतो. दिवसभर ५०-५० लाख रुपये १ ते १०० मोजून ते कंटाळलेले असतात. प्रत्येक शाखेची कॅश लिमिट ठरलेली असते. त्यामुळे एका ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे भरायचे किंवा काढायचे असतील तर अशा व्यवहाराची कल्पना त्या शाखेला अगोदर देणे आवश्यक असते. ५०० किंवा हजाराच्या नोटांमधे फेक नोटा येण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. नेहमीचा कस्टमर असेल आणि त्याच्या कॅशमधे अशी फेक नोट सापडली किंवा पैसे कमी असले तर तर त्याच्याकडून पैसे परत मिळवणे हे सोपे असते. पण दुसर्‍या ठिकाणाहून आलेल्या कस्टमरच्या पैशात अशी फेक नोट सापडली आणि ती स्टेट बँकेत पकडली गेली तर बँक स्टाफला स्वतः पैसे भरावे लागतात, कारण त्या बाहेरून आलेल्या कस्टमरला तुम्ही पकडू शकत नाही. गर्दीच्या वेळी एकेक नोट चेक करत रहाणे जिकिरीचे होते. अशी अनेक कारणे असू शकतात. मात्र हे खरेच की यापैकी नेमक्या कोणत्या कारणासाठी आपण कॅश नाकारत आहोत हे बँक स्टाफने नम्रपणे सांगायला पाहिजे. ग्राहकांसोबत अरेरावीने वागू नका अशा सूचना सर्व स्टाफला वेळोवेळी दिलेल्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कविता१९७८ Tue, 12/09/2014 - 12:38 नवीन
मला खुप वर्षाआधी होम लोन घ्यायचे होते , पण पगार कमी होता म्हणुन को-ऑप बँकेमधे अर्ज केला होता, मॅनेजरने सांगितले की तुमचा पगार कमी आहे पण वडीलांच्या उत्पन्नाचा दाखला दिल्यास तुम्हाला पुर्ण रकमेचे लोन मिळु शकते. धावपळ करुन लगेचच वडीलांच्या उत्पन्नाचा दाखला काढला तरीही लोन पास होईना ६ महीने होत आले , मग आम्हाला कळले के ठाण्याला बँकेच्या हेडऑफीस मधे लोन शी संबंधित अधिकारी लाच घेतल्याशिवाय लोन अप्रुव्ह करत नाहीत. मग एक दिवस मी , बहीण आणि भावजी बँकेच्या हेडऑफीसला गेलो. तिथे लोन विभागातिल मॅनेजर साक्षात जमदग्नीचा अवतार वाटत होता. अतिशय उर्मट शब्दात भांडायला लागला. खुपच अद्वातद्वा बोलु लागला. थोड्या वेळाने एक अधिकारी आला अणि म्हणाला की तुमचा पगार कमी असल्याने तुम्हाला कमी लोन मिळेल आम्ही सांगितलं त्यासाठी बँकेने आम्हाला माझ्या वडीलांच्या उत्पन्नाचा दाखला जोडायल सांगितला होता आणि आम्ही तो जोडलाय पण ते ऐकेनात , मग माझ्या बहीणीच्या मिस्टरांनी सांगितलं की ठिकाय नको घेउस या बँकेतनं लोन , पेपर परत घेउन जाउ, तसा तो अधिकारी म्हणाला की तुम्हाला लोन कमी मिळतंय म्हणुन लोन नकोय असं अर्जात लिहा पण बहीणीच्या मिस्टरांनी सांगितलं अज्जिब्बात नाही बँकेचा कारभार अतिशय ढिसाळ आहे, सर्व कागदपत्रांची सांगितल्याप्रमाणे पुर्तता करुनही ६ महीन्यांपासुन अर्ज करुनही अद्याप लोन मिळालेलं नाहीये म्हणुन मला आता तुमच्या बॅंकेकडुन लोन नकोय असं लिहि, तसं लिहिलं तो अर्ज त्या मॅनेजर ने आणखी वर नेला तशी त्याला झाप बसली ; अर्ध्या तासात आला तो जमदग्नीचा भिगी बिल्लि बनुन, मॅडम कीती हो राग करता, जाउ द्या , बँकेने तुमचं लोन मंजुर केलंय, आता सर्व सोपस्कार करुन तुमच्या हातात सँक्शन पेपर्स देतो तुम्ही प्लीज बसा. मग आम्ही थांबलो दुपारी तर स्वत:च्या पाकीटातुन पैसे काढुन जेवण मागवत होता पण आम्ही नकार दिला, संध्याकाळी ५ वाजता सर्व पेपर्स हातात दिले आणि आम्ही ५.३० ची ठाणे-बोईसर बस पकडुन घरी. आणि याचा परीणाम असा झाला की बँकेने नंतर ८ दिवसात गृहलोन अप्रुव्ह होण्याची हमी देत सर्व शाखेत बोर्डस् लावले.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 12/09/2014 - 12:53 नवीन
यापुढे असल्या अडचणीच्या प्रसंगी सल्ला मागायला वकील सापडला ...
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 12/09/2014 - 13:12 नवीन
आमची "जिव्हाळ्याची ब्यांक" शैक्षणिक कर्जाचा "मोरॅटोरियम पीरियड" संपून दोन महिने झाले तरी ईएमायची रक्कमच ठरवून देईना. ब्रँच मॅनेजरला ईमेली करकरून थकलो. शेवटी चिडून त्या बँकेच्या चेअरमनचं नाव गुगलून पाहिलं तर चक्क ईमेल अ‍ॅड्रेस मिळाला. मग त्यांना ब्रँच मॅनेजरशी झालेलं सगळं ईमेल संभाषण फॉर्वर्ड केलं, आणि त्याला खालील आशयाची मेल लिहिली:
प्रिय सीएमडी कस्टमरला कर्जफेड सुरू करायचीय, पण ब्रँच मॅनेजरना त्यात रस नाही. आहे की नाही गंमत! अधिक माहितीसाठी मेल ट्रेल वाचा. आपला नम्र, आदूबाळ
दुसर्‍या दिवशी दुपारी मॅनेजरबाबूंचा फोन, आणि संध्याकाळपर्यंत ईएमायचं कॅल्क्युलेशन हाजिर!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/09/2014 - 14:25 नवीन
उत्तम धागा. आजच सकाळी एक फोन आला होता त्या त्ते म्हणत होते की तुम्हाला इन्टरेस्ट फ्री कर्ज हवे आहे का? कोणत्यातरी इन्शुरन्स कम्पनी चा होता. माझ्या कलीगशी या बद्दल बोललो. त्याला देखील दुपारी तसाच फोन आला. त्याने चौकशी केल्या नंतर ते लोक १० लाखापर्यन्त व्याज विरहीत कर्ज देऊ करत होते. त्याना असे बीनव्याजी कर्ज देणे कसे परवडते तसेच आमचा नंबर कोठून मिळाले विचारल्यावर त्यानी आर बी आय मधून असे साम्गितले आणि चिडून फोन बंद केला.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 12/09/2014 - 14:43 नवीन
इन्टरेस्ट फ्री कर्जाचा फंडा खूप सोपा आहे. शून्य % व्याज असले तरी प्रोसेसींग फी घेतातच - ती फी बँकेचा "नेट प्रॉफीट" असतो. (कसा ते माहिती नाही पण असतो इतकेच माहिती आहे) आणि जर ही स्कीम एखाद्या वस्तू साठी असेल (उदा. बजाज पल्सर) तर बजाज कंपनी त्या बँकेला ग्राहकाला शून्य % ने कर्ज दिल्याबद्दल पैसे देते - म्हणून बँकेला हे परवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ह
हाडक्या Tue, 12/09/2014 - 16:38 नवीन
इन्टरेस्ट फ्री कर्जाचा फंडा खूप सोपा आहे. शून्य % व्याज असले तरी प्रोसेसींग फी घेतातच - ती फी बँकेचा "नेट प्रॉफीट" असतो. (कसा ते माहिती नाही पण असतो इतकेच माहिती आहे) आणि जर ही स्कीम एखाद्या वस्तू साठी असेल (उदा. बजाज पल्सर) तर बजाज कंपनी त्या बँकेला ग्राहकाला शून्य % ने कर्ज दिल्याबद्दल पैसे देते - म्हणून बँकेला हे परवडते.
जल्ला तुमचा सिबिल स्कोर फारच भरभक्कम असणार हो..!! ;) (संदर्भ : क्रेडिट कार्डच्या धाग्यावरचा सिबिल विषयक संवाद)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
र
रेवती Tue, 12/09/2014 - 14:44 नवीन
चांगला धागा रे मादका! खूप माहिती मिळणारे मला. सध्या एकाला जास्त पैसे मागण्याबद्दल कसा झोडावा हा विचार करतीये. की झोडूच नये? फुल्या फुल्या.
  • Log in or register to post comments
स
साती गुरुवार, 12/18/2014 - 09:10 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 12/09/2014 - 14:47 नवीन
वरील लेखात हुच्च्भ्रू ब्यांक आणि पुण्यापासून दूर असताना अरेरावी केल्याचा उल्लेख आहे. तेवढा पटला नाही. हे सगळे पुण्यात व्हावे ही श्रींची इच्छा असताना दुसर्‍या गावातील लोकांची हिम्मत तर पहा! ;)
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 12/09/2014 - 16:09 नवीन
धन्यवाद मोदक. बरच शिकायला मिळेल या धाग्यातून. मी कुणाला धडा शिकवल्याचे आठवत नाही आठवलं तर नक्की लिहीन.
  • Log in or register to post comments
स
सुहास पाटील Tue, 12/09/2014 - 16:44 नवीन
साधारण साडेतीन वर्ष्यापुर्वीची गोष्ट. मी नुकताच सिंगल सिलिंडर ग्यास कनेक्शन घेतले होते ( भारत ग्यास ) . मला ते डबल करायचे होते. मी ग्यास वितरकाला सांगितले कि डबल कनेक्शन ला काय करायचे. त्याने मला सांगितले कि ३५०० रुपये भर मग मिळेल. मी त्याला विचारले इतके पैसे कश्या कश्या चे आहेत ते सांगा. त्याने मला सांगितले कि कि भारत ग्यास ची स्कीम आहे तुम्हाला घरगुती वापरायच्या वस्तू सुधा मिळतील ( तेल , तांदूळ इतर). मी त्याला सांगितले कि मला हे नकोय पक्त दुसऱ्या सिलिंडर कनेक्शन चे किती पैसे होतील ते सांगा. तो म्हणाला ठीक आहे नंबर लावा , कनेक्शन आले कि कळवतो . मी म्हणालो किती वेळ लागेल. तो : माहित नाही सहा महिने लागू शकतात. मी लगेच online goverment पोर्टल वर compalint takli. पुढच्या तीन आठवड्यात मला भारत ग्यास च्या ग्राहक खात्यातून फोन आला तुम्ही त्या ग्यास वाल्या कडे जा आणि मला फोन करा थितुन ( मला त्या अधिकार्याने स्वतःचा मोबाइल नंबर दिला ) . मी ग्यास वाल्याकडे जाऊन माझ्या सेल वरून त्या अधिकाऱ्याला कॉल केला नी त्या वितरकाला बोलायला लावले. पुढच्या पाच मिनटात मला दुसरे सिलिंडर मिळाले
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 12/09/2014 - 18:52 नवीन
पुर्वी या प्रकारचा एक धागा आला होता ब्यांका कशा फसवतात? त्यावर मी दिलेला प्रतीसाद पून्हा एकदा !! आयसीआयसीआय बँकेचा माझा अनुभव: मी आयसीआयसीआय बँकेकडून १५ लाखाचे गृह कर्ज २० वर्षासाठी घेतले आहे. गृह कर्जाबरोबर घराची विमा पॉलिसी घेणे बंधनकारक आहे. विमा पॉलिसी फक्त पहिल्या पाच वर्षासाठी होती हे माहित नव्हते. पाच वर्षांनी मला एक पत्र आले कि घराची विमा पॉलिसी संपली आहे, नवीन पॉलिसी काढावी लगेल. आमचा एजंट तुमच्या घरी येइल. एजंट घरी आला. त्यास पॉलिसीचे डीटेल्स विचारले. तर म्हणाला कि भूकंप झाला आणि इमारत पडली तर संपूर्ण कर्ज माफ होईल . माझे काही बरे वाईट झाले तर संपूर्ण १५ लाख माफ होतील आणि घर तुमच्या बायकोच्या नावावर होइल. (बायको बाजूला बसली होती. तिच्या डोळ्यात एक असुरी आनंद दिसला) दोन आढवड्यात पॉलिसी पोस्टाने घरी आली. संपूर्ण पॉलिसी काळजीपूर्वक वाचली. (कारण पाच वर्षापूर्वी वाचली नव्हती). पॉलिसीत कुठेच १५ लाखाच्या कर्ज माफीचा उल्लेख नव्हता. माझे बरे वाईट झाल्यास फक्त ८ लाखाची कर्ज माफी होईल आणि बाकीचे पैसे बायकोला भरावे लागतील असे लिहिले होते. मी एजंट ला फोन केला. एजंट म्हणू लागला कि माझ्यावर विश्वास ठेवा. जे मी काबुल केलेय ते सर्व मिळणार. मी म्हणालो कि सर्व मिळणार आहे तर तुम्ही पॉलिसी मध्ये लिहून का देत नाहीत ? त्यावर त्याने मला दुसरी पॉलिसी पाठवण्याचे आश्वासन दिले. एक महिना झाला तरी नवीन पॉलिसी आली नाही पण माझा हप्ता मात्र कापून जावू लागला. परत फोन केला. तर एजंट म्हणाला कि धीर धारा पॉलिसी येईल. पॉलिसी आली नाही पण दुसरा हप्ता हि कापून गेला. आता मात्र माझा धीर सुटला. तडक बँकेत गेलो, सर्व हकीकत सांगितली. बँक व्यवस्थापकाचे म्हणणे पडले कि तो एजंट नवीन होता त्याने तुम्हाला चुकीची माहिती दिली. तुम्ही हि पॉलिसी चालू ठेवा आणि तुम्हाला १५ लाखाचे कवरेज हवे असल्यास अजून एक पॉलिसी घ्या. मी सांगितले कि मला कोणतीच पॉलिसी नको आहे. माझे मी बघून घेईन. माझी पॉलिसी रद्द करा व मला सर्व भरलेले पैसे परत करा. व्यवस्थापकाने ते मान्य केले व मला एक आठवडा थांबण्याची विनंती केली. मी ३ आठवडे वाट पाहिली दरम्यान तिसरा हप्ता कापून गेला. मी पोलिसात जाण्याची धमकी दिली. व सर्व हकीकत बँकेच्या संचालकांना एमैल केली. दुसऱ्या दिवशी बँक व्यवस्थापक माझ्या घरी आले, सोबत नवीन एजंट होताच. दोघांनी माझी माफी मागितली आणि माझे कापून गेलेले हफ्ते स्वतःच्या खिशातून देतो असे सांगू लागले. मी म्हणालो कि पैसे खिशातून देण्याची गरज नाही. तरीही त्यांनी माझ्या हातात माझे कापून गेलेले पैसे दिले. आणि पॉलिसी रीतसर बंद झाल्यावर आमचे पैसे परत करा म्हणून सांगून गेले. परत एक महिना झाला आणि चवथा हप्ता कापून गेला. काहीच न करता वाट पहिली. शेवटी पॉलिसी रद्द झाल्याचे पत्र आले. माझे पैसे माझ्या खात्यात जमा झाले. पण एजंट काही त्याचे पैसे परत मागण्यास येत नव्हता. शेवटी व्यवस्थापकास पैसे नेवून दिले आणि त्याच्याकडून पैसे मिळाले असे लिहून घेतले. भयंकर मनस्ताप झाला तो निराळाच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 12/09/2014 - 21:42 नवीन
दुपारचे मस्त जेवण झालेले आणि अस्मादिक वामकुक्षी करायला जाणार, इतक्यात मोबाइल वर फोन आला. मी : हॅलो. तो : क्या आप क्ष्क्ष्क्ष्क्ष बोल रहे है? मी : आपण कोण? मला फक्त मराठी येते.तुमची भाषा मला समजत नाही. तो : आपण क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष बोलत आहात का? मी : व्हय रे सोन्या. तो : तुम्ही आत्ता जे मोबाइल जाळे वापरताय ना? त्याजागी आमच्या कंपनीचे मोबाइल जाळे वापरा. मी : कशाला रे भाऊ? तो: त्याचे अमके अमके फायदे आहेत. मी : तुम्ही स्वतः ते वापरत आहात का? तो : हो. मी : मग तुम्हीच वापरा ना. मला कशाला सांगताय? १. देवाच्या दयेने मला थोडी अक्कल आहे.त्यामुळे मला जे योग्य वाटते, ते मी करतो. २. मी तुमच्याकडे आलो होतो का? ३. मी तुम्हाला माझा मोबाइल नंबर दिला होता का? ४. मला तुमच्या सेवेची गरज नाही.त्यामुळे पुन्हा तुमच्या कडून फोन येता कामा नये.उद्या जर का परत फोन आला तर मी ग्राहक मंचाकडे तक्रार करीन. असे म्हणून मोबाइल ठेवून दिला. आज तागायत मीच हीच गुरुकील्ली वापरतो.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/10/2014 - 00:07 नवीन
एका बांगलादेशी मैत्रिणीची आठवण झाली. ती डॉक्टर आहे. हॉस्पिटलातून दमून आल्यावर असले फोन आले की ती "नो इंग्लीस" एवढेच म्हणते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 12/10/2014 - 02:50 नवीन
मराठीतच संभाषण करण्याचा हट्ट धरा. अर्धी लढाई तिथेच जिंकता. मग बाकीची खिंड लढवत न्यायची आणि सगळ्यात शेवटी "ग्राहक मंचाचा बाँब फोडायचा." त्याचा मानसीक किल्ला ढासळतो अन आपल्याला सुखाची झोप मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
H
hitesh Tue, 12/09/2014 - 22:35 नवीन
अक्षी बँकेत मलाही हाच अनुभव आला. एफ डी बाबत चौकशी करत असताना या एफ डी पेक्षा अमुक तमुक पॉलिशी घ्या . ती जास्त फायद्यात आहे . अशी उत्तरे मिळाली. तुम्ही बँकेचे कर्मचारी आहात की इन्शुरन्स कंपनीचे हा प्रश्न विचारुनकस्टटमर केअरला जुजबी तक्रारही नोंदवलि. आता छान सर्विस मिळते
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 12/09/2014 - 23:19 नवीन
श्या! ह्या पूणेकरांपुढे जर्र्रा म्हणुन पैसे कमवायची सोय नाही. स्वतः तर काय देत नाहीत, वर धागे काढुन जनक्षोभ वाढवतात. भारी माहिती. वाखू करुन ठेवते. कधी लागली माहिती तर येथुन घेता येइल. मोदक राव ठ्यंक्यु बरं.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 12/10/2014 - 12:20 नवीन
एकदा एअरटेलचे त्यांच्याच वेबसाईटवरून ऑनलाईन रिचार्ज केले. साधारण २०० रूपयांचे. मला हवा असलेला आणि वेबसाईटवर नोंदवलेला प्लॅन मिळण्याऐवजी भलताच (आणि नको असलेला) प्लॅन मिळाला. कस्टमर केअर सोबत बोलून वाद न घालता त्यांच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट, ट्रँन्झॅक्शन आयडी आणि माझे डिटेल्स इ-मेलने कस्टमर केअरला पाठवले. मी लिहिलेला मेल आणि त्यांचा आलेला रिप्लाय याचा दूर दूर तक संबंध नव्हता. त्यांच्या दुसर्‍या तिसर्‍या मेल रिप्लायला "मी लिहिले आहे ते तुम्हाला समजले असेल तर तुमच्या भाषेत तेच मला लिहून पाठवा" असाही एक खवचट प्रतिसाद दिला. या सगळ्यामध्ये दोन दिवस गेले. कस्टमर केअरकडून हे असेच लांबत जाणार अशी खात्री पटल्यावर शांतपणे हे सगळे उचलून फेसबुकवर टाकले - अर्थात मेल जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला नाही पण कुणाशी काय बोलणे झाले आहे ही साधारण माहिती टाकली. पुढच्या अर्ध्या तासात "इश्यू एस्कलेट" झाला. कस्टमर केअर आणि फेसबुकवरच्या त्यांच्या अकाऊंटचा माणूस फोन कर करून सगळे समजावून घेवू लागले. आणखी १५ मिनीटांनी मला हवा तो प्लॅन मिळणार नाही पण मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळाला. यामध्ये एक अनपेक्षीत गोष्ट झाली - कस्टमर केअर आणि फेसबुक वाले वेगवेगळ्या पातळ्यांवरून माझ्याशी बोलत होते आणि मला वाटत होते ते एकाच टीममधून आहेत. कारण दोघांनीही "मला हवा तो प्लॅन मिळणार नाही" आणि "मी केलेल्या रिचार्जच्या रकमेचा टॉकटाईम मिळेल" हेच सांगीतले होते. मला एकूण ४०० रूपयांचा टॉकटाईम मिळाला. फेसबुकवाल्याला हे सांगीतले व २०० रू रिव्हर्स करून घे म्हणून सांगीतल्यावर त्याने त्या गोष्टीला नकार दिला (कारण माहिती नाही) व तुम्हाला आमच्यातर्फे कॉम्प्लीमेंट समजा असे सांगीतले. :)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 12/10/2014 - 19:02 नवीन
कित्येक दिवस रखडलेल्या तक्रारी अ‍ॅक्सिस बँकेने काही तासांत कशा सोडवल्या ते इथे दिसतं. अर्थात्, अ‍ॅक्सिस बँकेने Customer Support ची सोय फेसबुक पानावर उपलब्ध करून दिलीय म्हणून हे शक्य झालं असेल, ICICI च्या फेसबुक पानावर Customer Support / Care हा टॅबच नाहीये! Same with HDFC's or State Bank of India's Facebook pages. कुणी जाहीरपणे लाज काढायची संधीच या संस्थांनी ठेवलेली नाही ;-) पण SBI चं SBIInTouch हे पान आहे तिथे अशी तक्रार करता येते असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
न
नाखु गुरुवार, 12/11/2014 - 05:42 नवीन
मागच्या पंधरवाड्यात नव्याने सुरु झालेल्या पिंपरीतील सिटि मॉल मध्ये कंपनी सहकार्याबरोबर गेले होतो.स्वगत कक्षात माहीती आणि फोन नं दिला (अनावधानाने खरा!) आणि.... तीन्च दिवसांनी "तुम्हाला गिफ्ट आहे/ फुकट हॉलीडे पॅकेज ई, चे कॉल सुरउ झाले आणि प्रत्येकाचे म्हणणे एकच "तुम्ही मॉल मध्ये केलेल्या खरेदीबद्दल एका लकी ड्रा मध्ये तुमची निवड झाली आहे. पण मी जागरूक मिपाकर(!!!) *THUMBS%%_%%UP* :GOOD: :good: *GOOD* *THUMBS UP* असल्याने बक्षीस घ्यायला ईतक्या लांब येउ शकत नाही तेव्हा माझ्या कंपनीतच या असा प्रेमळ आग्रह केला.(दुरदैवाने प्रतिसाद नाही).. आणि हो महत्वाचे मी आणि कंपनी सहकारी याने मॉल मध्ये एक "पै"चीही खरेदी केली नव्हती तरी "पात्र" झालो हे विशेष *clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: : *pleasantry* *db* :db:
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 12/11/2014 - 08:51 नवीन
बाळ सप्रेंच्या जागो ग्राहक जागो - एक अनुभव या धाग्यावर दिलेला एक असाच अनुभव... ********************************************************************** कोणत्यातरी टीनपाट हॉलीडे कंपनीने फोन करून त्रास द्यायला सुरूवात केली. तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये किचन अ‍ॅप्लायन्सेस चे फ्री गीफ्ट लागले आहे, त्याबरोबर २०,०००/- चे हॉलीडे व्हाऊचर पण मिळेल. खूप टाळाटाळ करून एका शनिवारी (आई वडीलांसह) त्यांच्या औंध ऑफिसात गेलो. बाबौ.. मासळी बाजार बरा. ३० / ४० टेबले, प्रत्येक टेबलाशेजारी ५ जण. ४ फ्यामिली आणि एक सेल्सवाली. विनाकारण गळेपडूपणा करत, "कुठे कुठे फिरता तुम्ही?", "इन्कम किती?" "आवडलेले ठिकाण कोणते?" असले प्रश्न विचारून आणि त्यांचे वेगवेगळे अल्बम दाखवून हैराण केले. मी अत्यंत शांतपणे दर १० / १५ मिनीटाला १ छोटा ग्लास कोल्ड्रींक संपवत सगळ्यांची मजा बघत बसलो. ऑफर अशी होती की त्यांची ६० / ७० हजाराची मेंबरशीप १२ हप्त्यात घ्यायची प्रश्नांची उत्तरे एकदम फ्लॅट टोन मध्ये देत होतो. उत्तरे ऐकून प्रश्न विचारणार्‍या कन्येचा चेहरा जास्ती पडत गेला.. Smile प्रश्न - आप कारसे आए हो क्या.. पार्किंग ठीकसे मिला ना..? मी - अ‍ॅप्रीशीएट यूवर कन्सर्न. ( कार का बाईक हा प्रश्नच उद्भवू दिला नाही ;-) ) प्रश्न - घर आपका खुद का है या रेंटेड..? मी - पर्सनल डीटेल्स शेअर नही करूंगा.. आप प्लीज हॉलीडे व्हाऊचर के बारेमे बताईये. प्रश्न - सर आपका पॅकेज कितना है..? मी - दो वक्त का खाना निकलताहै, अमाऊंट नही बताऊंगा. साधारणपणे २ तास सगळे सहन केल्यानंतर मी इंटरेस्ट नाही म्हणून सांगीतले.. कारण सांगीतले की ऑफर पटली नाही.. मला नक्की काय पटले नाही तेही शेवटपर्यंत सांगीतले नाही. ;) किचन अ‍ॅप्लायन्सेस म्हणून त्यांनी झकास प्याक केलेला एक मध्यम बॉक्स दिला.. मी पण निर्लज्जपणे बॉक्स तिथेच उघडून आत काय आहे (किंवा खरेच कांही आहे का..?) ते बघितले, आणि मगच तो घेवून आलो. तिथे जमलेले बहुतेक पब्लीक सोशल प्रेशर मुळे या फसव्या कल्पनांना बळी पडते असा कयास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
स्पंदना Fri, 12/12/2014 - 00:46 नवीन
मानल बुवा!! आम्चे एकदा चार तास खाल्ले होते. गळाला लागलेला मासा बडवावा तसे बडवत होते $#@%&%#@& !! कश्शे बश्शे सुटलो, लय वैतागलो होतो दोघे बी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे गुरुवार, 12/11/2014 - 09:05 नवीन
मोदक शेट क्या बात है. They deserved it.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 12/11/2014 - 09:11 नवीन
क्या बात मोदक. तुझ्यासाठी हे 'पाठपुरावा करुन जिंकणं' नेहमीचं झालेलं दिसतंय. ;)
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 12/11/2014 - 09:26 नवीन
हार जीत सोडा ओ प्यारे काका... आपण ग्राहक म्हणून जागरूक असलो तर आपले कमी नुकसान होते इतकेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
असंका गुरुवार, 12/11/2014 - 12:49 नवीन
डॉ. सुबोध खरे साहेब-
पगाराच्या खात्यावर झीरो बॅलन्स वगैरे काही जास्तीच्या सुविधा बँक देते त्या काही उपकार म्हणून नाही तर पगाराचे पैसे दर महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या खात्यात पडतात पण ते पैसे फक्त गरजेनुसार काढले जातात त्यामुळे बँकेला हे पैसे ४ टक्के व्याजाने वापरायला मिळतात. लोकांचे असे लक्षावधी रुपये बँका वापरत असतात म्हणूनच आमच्या बँकेत पगाराचे खाते उघडा म्हणून त्यांचे एजंट लोकांच्या मागे लागलेले असतात. मी लष्करी सेवेत असताना आय डी बी आय, आय सी आय सी आय आणी कोटक महिंद्र बँकेच्या एझाण्टाणी माझ्या मागे फार धोशा लावला होता. मी त्यांना एकाच विचारले कि मी माझे एच डी एफ सी चे पगाराचे खाते सोडून तुमच्याकडे का यावे? हे फायदे नसते तर बँका तुम्हाला फुकट क्रेडीट कार्ड, फुकट डिमांड ड्राफ्ट, पगार इतका ओव्हर ड्राफ्ट अशा सुविधा का देतील?
मी या प्रश्नाचे उत्तर देत होतो- "पगार खात्यात कॅश भरता येत नाही का?". मी असे कधी म्हणालो की बँकेला सॅलरी अकौंटमधून फायदा होत नाही म्हणून? बँकेला निश्चितच फायदा होत असणार. वरचे प्रश्न आणि मी जे त्याच्या आधी लिहिले होते त्यात मला तरी कसलाही संबंध दिसत नाही. म्हणून उत्तर द्यायचा प्रयत्न करत नाहिये. आपला काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर सांगा, मी माझ्या कुवतीप्रमाणे निश्चितच उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
कॅश डीपॉझिट घेणे हा त्या खात्यासाठी बँकेला करावा लागणारा वाढीव खर्च होइल. जर बँक हे काम करत नसेल तर बँक आहे कशासाठी?
साहेब मी एका MD कडे जायचो ट्रीटमेंट साठी. त्याने मला इंजेक्शनचा कोर्स लिहून दिला. आणि म्हणाला की तुमच्या फॅमिली डॉ. कडून दर तीन दिवसांनी एक टोचून घ्या. आता मी त्याला असे म्हणू का की जर हे इंजेक्शन तुम्ही टोचत नाही तर तुम्ही कशासाठी आहात? जर मी तसे म्हणालो तर तो म्हणेल ठीके, मी देतो, प्रत्येक इंजेक्शन टोचण्याची फी दोनशे रुपये टाका! हेही तसेच आहे. बँक नाही म्हणत नाही, फक्त त्याची फी लावते.
शिवाय आलेला पैसा बँक वापरणारच त्यासाठी आम्हाला कष्ट होतात असे म्हणणार असतील तर बँका हव्यातच कशाला?आणी त्यांचे कर्मचारी पगार कशाचा घेतात? जर हि मुलभूत सुविधा माझ्या पगाराच्या खात्याला मिळणार नसेल तर बँकेचा उपयोग काय?
यावर काही लॉजिकल उत्तराची आपल्याला खरंच अपेक्षा आहे का? मी बँकांना फार कष्ट पडतात वगैरे असे विधान कुठे केले आहे? आणि कर्मचारी पगार घेतात तो त्यांना बॅंक देते आणि काय काम करावं हेही बँकच सांगते. आपल्याला बँकेचा उपयोग होत नसेल तर 'बॅंकेत आपले खाते खरंच असायला हवे का' याचा अवश्य विचार करून योग्य तो निर्णय करा.
राहिली गोष्ट माझ्या खात्यात पैसा भरण्यासाठी मी कुठून आणतो हे पाहणे बँकेचे काम नाही. ते आयकर खात्याचे आहे. आपण आपल्याला दिलेल्या कामापेक्षा दुसर्याचे काम का पाहावे? उलट मी जर पैसे भरतो आहे म्हणजे हे पैसे काळे नाहीत हेच सिद्ध होते. (ते मी तिजोरीत न ठेवता बँकेत भरत आहे).
Anty Money Laundering हे शब्द आपण ऐकले नाहित असे मला वाटत नाही. त्यातूनही सांगतो, की पैसे कुठून आले हे बघण्याची जबाबदारी RBI ने बॅंकांवर टाकलेली आहे. आपले तसे मत नाही तरी इथे वस्तूस्थिती वेगळी आहे. बघणे आणि तपासणे या वेगळ्या गोष्टी आहेत. KYC म्हणजे काय हे आपणास माहित आहे ना? KYC च्या आधारे ग्राहकाचे प्रोफाइल तयार केलेले असते. ग्राहकाच्या खात्यात होणारे व्यवहार आणि हे प्रोफाइल यांच्यात एक संबंध असतो हे उघड आहे. जसे किराणा दुकानदार किती रकमा किती वेळा भरेल, या पद्धतीची माहिती. यात न बसणारा व्यवहार जर होऊ घातला असेल, उदा., रोज १०००/- रुपये भरणारा व्यक्ती एकदम लाख भर रुपये भरायला आला. अशा वेळी, ही रक्कम आणि त्या माणसाची बँकेत उपलब्ध माहिती जुळणार नाही. अशा व्यवहारात बँकेवर फक्त एक चौकशी करून तिची नोंद करायची जबाबदारी आहे. ती माहिती सत्य आहे किंवा कसे हे तपासणे बँकेला शक्य नाही याची नोंद घेतलेली आहे. हे मी वर थोडक्यात लिहिले होते.
मला यात बँकेच्या कर्मचाऱ्यांचा काम टाळण्याकडे कल आहे असे वाटते
याबद्द्ल मला काहीच म्हणायचे नाही. आपल्या मताचा आदर आहे. पण बँकेत टाळू म्हणून काम फार दिवस टळत नाही- जर कायमचेच टळले (बॅंक बंद पडली!) तर गोष्ट वेगळी.
आपल्या प्रतिसादाचा सूर बँका तुमच्या वर उपकार करीत आहेत असा वाटतो. कोणीच कुणावर उपकार करीत नाही.
मला तरी माझ्या कुठल्याही वाक्यात असा सूर जाणवत नाहिये. काही प्रश्न विचारले गेले होते की बँका असे असे करतात ते का करतात, त्यांची मी माझ्या मते उत्तरे दिली. (शक्य तेथे सेकंड चेक करूनच!). पण थोडा विचार केला तर बॅंकांचं अस्तित्त्व म्हणजे समाजाला केवढा मोठा वर मिळालेला आहे हे मला जाणवू शकते. आपल्याला तसे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/11/2014 - 13:01 नवीन
कंझ्युमर कोर्टाचे नाव घेऊन मोटोरोला वाल्यांना सरळ केले होते त्याबद्दल आधी एकदा लिहिले होते. पुन्हा कॉपी पेस्ट करत आहे. http://www.misalpav.com/comment/620543#comment-620543 माझ्या मुलीच्या मोटोरोला ई चा डिस्प्ले फुटला. ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरला २३ ऑगस्टला दुरुस्तीसाठी दिला, तेव्हा त्यांनी मोटोरोला कंपनीकडे चौकशी करून १८०० रुपये एस्टिमेट लिहून दिले आणि २० दिवसांत फोन मिळेल म्हणून सांगितले. मी एक महिना वाट बघून फोन केला तर म्हणतात की डिस्प्लेची किंमत आता ४००० झाली. तेवढे पैसे भरा नाहीतर फोन परत घेऊन जावा. बरं म्हटलं आणि मोटोरोलाच्या चॅट सपोर्टला विचारले की किंमत कधी वाढली. ते म्हणाले की २० सप्टेंबरला. म्हटल्यावर माझं डोकं सटकलं. कंपनीला सगळे डिटेल्स ईमेल केले आणि उत्तराची अजून वाट बघत आहे. दरम्यान सर्व्हिस सेंटरचा फोन आला की तुम्ही अजून फोन नेला नाहीत. त्याला म्हटले, की मी फोन देऊन एक महिना झाला तरी तुम्ही काय झोपा काढत होता का? मी अ‍ॅडव्हान्स पैसे देत होते ते तुम्ही घेतले नाहीत. आता मला २३ ऑगस्टच्या रेटने डिस्प्ले दुरुस्त करून द्या नाहीतर मी कन्झ्युमर कोर्टात जाते. आणखी काही वाद न घालता तो बुवा म्हणाला, वरिष्ठांशी बोलतो. नंतर त्याचा फोन आला की पुढच्या आठवड्यात फोन तयार होईल. दुरुस्तीसाठी फक्त १८०० रुपये द्या. काम झालं. कन्झ्युमर कोर्टाचं नाव घेतलं म्हणून हे चॅप्टर लोक सुतासारखे सरळ झाले. नाहीतर १८०० च्या डिस्प्लेचे माझ्याकडून ४००० काढून मधले खिशात घातले असते. सरळच आहे ना. ऑर्डर २४ ऑगस्टला दिली म्हणतात मग दर २० सप्टेंबरचा हा कोणता न्याय झाला? पण चेपलं तर चेपलं अशीच वृत्ती दिसते बरेचदा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/11/2014 - 14:12 नवीन
@कंफ्युज्ड अकौंटंट साहेब पगार खाते म्हणजे विशेषज्ञ नव्हे तर आपला फ्यामिली डॉक्टर. आपल्या फ्यामिली डॉक्टर ने आपल्याला सांगितले कि मी तुम्हाला इंजेक्शन फ्देणार नाही तर आपल्याला कसे वाटेल? रोज १००० रुपये भरायला आलेली व्यक्ती जर १ लाख रुपये भरायला आली तर आपण त्याचा PAN मागू शकता. पण त्याला खात्यात पैसे भरत येणार नाहीत हे कोणत्या नियमाधारे आपण सांगत आहात तो नियम पाहायला मला नक्की आवडेल. KYC च्या आधारे बँक काय प्रोफाइल करते आणि तो कोणत्या नियमात बसतो हे हि मला पाहायला आवडेल? @ पैसा ताई बर्याचशा बँकामध्ये आता खोट्या नोटा शोधणारी आणि नोटा मोजणारी यंत्रे बसविली आहेत त्यामुळे त्याला फार वेळ लागतो हे आता तरी मान्य करणे कठीण आहे. "जनहितार्थ जारी" रिझर्व बँकेच्या परिपत्र प्रमाणे http://rbidocs.rbi.org.in/rdocs/Notification/PDFs/87010713DCFL.pdf पारा २ i प्रमाणे सामान्य नागरिकाच्या नोटा मध्ये जर एखादी फेक नोट सापडली तर ती जमा करून घेणे हे बँकेचे कर्तव्य आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा